सोमवार, ४ मे, २०२०

!! संख्याविषयक महत्त्वाची प्राथमिक माहिती

 संख्याविषयक महत्त्वाची प्राथमिक माहिती

*अंकाची स्थानिक किंमत*
संख्येतील कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत काढताना त्या अंकापुढे जेवढे अंक असतील तेवढे शून्य त्या अंकापुढे येतात.
उदा.- ४५१२३ या संख्येतील ५ ची स्थानिक किंमत ५००० तर २ ची स्थानिक किंमत २० होय.

*एक अंकी एकूण संख्या ९ आहेत तर दोन अंकी ९० , तीन अंकी ९०० आणि चार अंकी एकूण संख्या ९००० आहेत.*

*लहानात लहान-*
▪एक अंकी संख्या १ आहे
▪दोन अंकी संख्या १० आहे
▪तीन अंकी संख्या १००
या प्रमाणे ० वाढवीत जाणे

*मोठ्यात मोठी-*
▪एक अंकी संख्या ९
▪दोन अंकी संख्या ९९
▪तीन अंकी संख्या ९९९
पुढे याचप्रमाणे ९ वाढवीत जाणे

*कोणत्याही संख्येला ० ने गुणले असता उत्तर ० येते.*

*० ते १०० पर्यंतच्या संख्यात*
▪२ पासून ९ पर्यंतचे अंक प्रत्येकी २० वेळा येतात.
▪१ हा अंक २१ वेळा येतो.
▪० हा अंक ११ वेळा येतो.
▪१ ते १०० पर्यंतच्या संख्यात २ पासून ९ पर्यंतचे अंक असलेल्या एकूण संख्या प्रत्येकी १९ येतात.
▪दोन अंकी संख्यात १ ते ९ या अंकाच्या प्रत्येकी १८ संख्या असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा