शुक्रवार, २७ मार्च, २०२०

💥🌸दिनविशेष🌸💥 28 मार्च

*💥🌸दिनविशेष🌸💥*

*Nathan Stubblefield*

*inventor of wireless telephone*

*Died - March 28, 1928*

Nathan B. Stubblefield (November 22, 1860 - March 28, 1928) was an American inventor and Kentucky melon farmer. It has been claimed that Stubblefield demonstrated radio in 1892, but his devices seem to have worked by audio frequency induction or, later, audio frequency earth conduction [1] (creating disturbances in the near-field region) rather than by radio frequency radiation for radio transmission telecommunications.
Though there were contemporaneous experiments by others such as William Preece, Stubblefield has been proposed as a claimant for the invention of wireless telephony, or wireless transmission of the human voice, which would, however conflict with the four documented patents for the photophone, invented jointly by Alexander Graham Bell and Charles Sumner Tainter in 1880. The photophone allowed for the transmission of sound on a beam of light, and on June 3, 1880 Bell and Tainter transmitted the world's first wireless telephone message on their newly invented form of telecommunication

💥🌸दिनविशेष🌸💥 27 मार्च

*💥🌸दिनविशेष🌸💥*

*विल्हेम राँटजेन*

*एक्स-रे अर्थात क्ष-किरणांचा शोध*

*जन्मदिन - मार्च २७ १८४५*

जीवन
एक्स-रे अर्थात क्ष-किरणांचा शोध लावणारे प्रा. विल्हेम कॉनरॅड राँटजेन यांचा जन्म जर्मनी देशातील लेनेप येथे मार्च २७ १८४५ ला एका शेतकरी कुटुंबात झाला. विल्हेम यांचे वडील हे जर्मन तर आई डच होती. त्यांचे शालेय शिक्षण नेदरलँड्स देशात आणि उच्च शिक्षण स्वित्झर्लंड देशात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी युरोपमधल्या अनेक विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले.
संशोधन
सन १८८५ साली जर्मनीतल्या वुर्झबर्ग विश्वविद्यालयातल्या प्रयोगशाळेत काम करत असतांना प्रा. राँटजेन यांना क्ष-किरणांचा शोध अचानकपणे लागला. एकदा काही प्रयोग करण्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत अंधार केला. कॅथॉड रे ट्युब (सी.आर.टी.) वापरून ते त्यांच्या प्रयोगाच्या तयारीला लागले होते. त्या प्रयोगात त्यांनी बेरियम प्लॅटिनो सायनईड वापरले होते. अंधार्‍या खोलीत प्रयोग सुरू असल्याने काही वेळाने प्रा. राँटजेन यांना वेगळ्याच रंगांच्या प्रकाश लहरी चमकतांना दिसल्या शिवाय खोलीच्या काळा पडद्यावरही विचित्र आकृती उमटलेल्या दिसल्या. ते प्रयोग करीत असलेल्या सी. आर. टी. चे तोंड पक्के झाकलेले असूनही भिंतीवरच्या पडद्यावर आकृत्या पाहून त्यांनी त्या अज्ञात किरणांना एक्स असे नाव दिले. या किरणांच्या आरपार जाण्याच्या गुणधर्माचा उपयोग माणसाच्या शरीरातील भाग पाहण्यासाठी होवू शकतो असे प्रा. राँटजेन यांनी सप्रयोग दाखवून दिले.
पुरस्कार
क्ष-किरणांचा उपयोग करून माणसाच्या हाडांच्या विविध समस्यांचा अभ्यास आणि उपाय करणे अत्यंत सुलभ झाले. या अनमोल शोधामुळे प्रा. राँटजेन यांना १९०१ साली भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
फेब्रुवारी १० १९२३ रोजी प्रा. राँटजेन आणि त्यांचे दोन विद्यार्थी याच क्ष-किरणांच्या घातक मार्‍यामुळे मृत्यु पावले.

💥🌸दिनविशेष🌸💥 27 मार्च

*💥🌸दिनविशेष🌸💥*

            *युरी गागारिन*

*सोवियेत संघाचा अंतराळयात्री*

*स्मृतिदिन - मार्च २७, इ.स. १९६८*

युरी अलेक्सेइविच गागारिन (रशियन: Ю́рий Алексе́евич Гага́рин, उच्चार: [ˈjurʲɪj ɐlʲɪˈksʲeɪvʲɪtɕ gɐˈgarʲɪn];) (मार्च ९, इ.स. १९३४ - मार्च २७, इ.स. १९६८) हा सोवियेत संघाचा अंतराळयात्री होता.
युरीचा जन्म सोवियत संघाच्या ग्रामीण भागातील एका गरीब कुटंबात झाला. घरच्या परिस्थितीमुळे लहान वयातच धातूच्या ओतकामाच्या कारखान्यात फाउण्ड्रीमन म्हणून युरी काम करू लागला. अविश्रांत कष्ट आणि तीव्र बुद्धिमत्ता असल्याने एक चांगला कामगार म्हणून युरीचे नाव झाले. त्याला विमानाच्या कारखान्यात नोकरीची संधी आली. याही कामात त्याने मेहनत घेऊन नाव कमावल्याने त्याला विमानदलात घेण्यात आले. हळूहळू युरीला अंतराळवीर होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.
एप्रिल १२, इ.स. १९६१ रोजी गागारिन अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने ८९ तास ३४ मिनिटे भ्रमण केले. या पराक्रमाबद्दल त्याला अनेक देशांचे पुरस्कार मिळाले. त्यात ऑनर ऑफ लेनिन आणि सोवियत संघाचा नायक या पुरस्कारांचाही समावेश आहे.
वयाच्या ३४ व्या वर्षी एका विमान अपघातात युरीचा मृत्यु झाला.

*💥🌸दिनविशेष🌸💥* 26मार्च

                 
                      *💥🌸दिनविशेष🌸💥*


*Georg Tannstetter*

*a medical doctor, mathematician, astronomer*

*Died - 26 march 1535*

Georg Tannstetter (April 1482 – 26 March 1535), also called Georgius Collimitius, was a humanist teaching at the University of Vienna. He was a medical doctor, mathematician, astronomer, cartographer, and the personal physician of the emperors Maximilian I and Ferdinand I. He also wrote under the pseudonym of "Lycoripensis".[1] His Latin name "Collimitius" is derived from limes meaning "border" and is a reference to his birth town: "Rain" is a German word for border or boundary.

Born in Rain am Lech in the Duchy of Bavaria, he studied in Ingolstadt. In 1503, he followed a call of Conrad Celtis to the University of Vienna, where he taught mathematics. He soon became a leading figure amongst the humanists in Vienna. In 1510, he became the personal physician of emperor Maximilian I, who would six years later ennoble him with the predicate "von Thanau".

He travelled with his student Joachim Vadian to Buda in 1518. After his earlier work in c. 1527 he edited a map of Hungary, today known as Tabula Hungariae, from the manuscript of Lazarus Secretarius, a Hungarian clerk. The map was published by Johannes Cuspinianus, printed 1528 in Ingolstadt by Petrus Apianus; its unique copy is in the National Library of Hungary. It is generally praised for its details (c. 1300 settlements) and the relative accuracy of the distances between the settlements. It was one of the very first regional maps, included a scale but the manuscript was seriously reshaped, so it is uneasy to recognize the geography of Hungary. Tannstetter is also considered a pioneer of the history of science with his work Viri Mathematici, containing biographies of mathematicians at the University of Vienna from the 15th century.

In 1530, he moved to Ferdinand's court at Innsbruck, where he died five years later.

💥🌸दिनविशेष🌸💥 26 मार्च

*💥🌸दिनविशेष🌸💥*
*बाबूराव रामचंद्र बागूल*

*विज्ञानवादी दृष्टिकोन असलेले मराठी लेखक, कवी*

*स्मृतिदिन - मार्च २६, २००८*

बाबूराव रामचंद्र बागूल (जुलै १७, १९३० - मार्च २६, २००८) हे दलित साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते. विद्रोही दलित कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवणाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. प्रभावी भाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारूण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते.

वेदा आधी तू होतास
     वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास
     पंचमहाभूतांचे पाहुन
विराट, विक्राळ रूप
     तू व्यथित, व्याकुळ होत होतास
     आणि हात उभारून तू
याचना करीत होतास
     त्या याचना म्हणजे ऋचा
सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव
     तूच साजरे केलेस,
सर्व प्रेषितांचे बारसेही
     तूच आनंदाने साजरे केलेस,
हे माणसा,
     तूच सूर्याला सूर्य म्हंटले
आणि सूर्य सूर्य झाला,
     तूच चंद्राला चंद्र म्हटले
आणि चंद्र चंद्र झाला
     अवघ्या विश्वाचे नामकरण
तूच केलेस
     अन प्रत्येकाने ते मान्य केले
हे प्रतिभावन माणसा
     तूच आहेस सर्व काही
तुझ्यामुळेच सुंदर
     झाली ही मही

या त्यांच्या कवितेतुन त्यांची वैज्ञानिक दृष्टी दिसुन येते.

मानसन्मान, पुरस्कार
धारावी (मुंबई), येथे ७ फेब्रुवारी १९९९ रोजी भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. उद्‌घाटनाचे भाषण डॉ. आ.ह. साळुंखे यांनी केले होते.
बागुलांच्या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ’जनस्थान पुरस्कार’ २००७ साली त्यांना देण्यात आला.
महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार
मार्च २६, २००८ रोजी बागुलांचे नाशकात निधन झाले.

*💥🌸दिनविशेष🌸💥* 25 मार्च

*💥🌸दिनविशेष🌸💥*

*वसंत गोवारीकर*

*ज्येष्ठ शास्त्रज्ञ*

*जन्मदिन - २५ मार्च १९३३*

अवकाश संशोधन, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या क्षेत्रातील त्यांचे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म १९३३ साली कोल्हापूरला झाला. कोल्हापूरला एमएस्सी करून त्यांनी लंडनच्या बìमगहॅम विद्यापीठातून पीएचडीची पदवी प्राप्त करून घेतली. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या एटॉमिक एनर्जी व एव्हिएशनमध्ये काम केले. या वेळी भारताच्या अवकाश संशोधनशास्त्राचे प्रमुख डॉ. विक्रम साराभाई यांनी त्यांना भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमासाठी भारतात बोलावून घेतले. १९६७ साली ते थुम्बा येथे रुजू झाले. अग्निबाणांसाठी लागणारे घन इंधन बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यासाठी त्यांनी प्रॉपेलंट इंधन कॉम्प्लेक्स, अमोनियम परक्लोरेट प्लान्ट अशी युनिट्स स्थापन केली. सॉलिड प्रॉपेलंट स्पेस बूस्टर प्लान्ट हे जगातले सर्वात मोठे युनिट त्यांनी स्थापन केले. त्यांनी बनवलेले एचटीपीबी हे घन इंधन विकसित करून आता ३० वष्रे झाली तरी आजही ते जगातले अद्ययावत असे इंधन आहे. १९७९ साली डॉ. वसंत गोवारीकर हे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक झाले. १९८७ ते १९९३ या कालावधीत गोवारीकर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. त्यांनी हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी मॉडेलही त्यांनी तयार केले. नंतर या मॉडेलला गोवारीकर मॉडेल म्हणून नाव देण्यात आले.

💥🌸दिनविशेष🌸💥 24 मार्च

*💥🌸दिनविशेष🌸💥*
*२४ मार्च*

*जागतिक क्षयरोग दिन*


जगभरात सोन्याचा जो साठा आहे, त्यातील 20 टक्के भारतीयांकडे आहे.अमेरिकेतील आयबीएम तसेच मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीच्या स्टाफमध्ये 28 ते 34 टक्के भारतीय आहेत.तसेच अमेरिकन स्पेस एजन्सी नासामधील तीन कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी भारतीय आहे.अमेरिकेत प्रॅक्टीस करणारे 100 पैकी 38 डॉक्टर आपले भारतीयच आहेत. तसेच विश्वाची निर्मिती कशी झाली या विषयीचा बिग बॅंग संशोधन प्रकल्पात भारतीय शास्त्रज्ञ आहेत व्वा!
पण आता पुढील आकडेवारीवरही एक नजर टाकूया.आज आपल्या देशामध्ये दररोज 40 हजारहुन अधिक लोकांना क्षयरोगाचा संसर्ग होतो.यापैकी पाच हजारांहून अधिक लोकांनी क्षयाची लागण होते. या पैकी एक हजाराहून अधिक रूग्ण क्षयरोगाने मरण पावतात.म्हणजेच दर दीड मिनिटाला एक रूग्ण क्षयरोगाने मरण पावतो.त्याचप्रमाणे आपल्या देशात दरवर्षी अठरा लाखाहून अधिक नवीन क्षयरूग्ण आढळून येतात. त्यातील आठ लाख रूग्ण हे थुंकीदूषीत असून ते इतरांना हा रोग देण्यास सक्षम आहेत. जागतिक आरोग्य संस्थेच्या अंदाजानुसार सन 2020 मध्ये जगातील अंदाजे एक अब्ज क्षयरोगाने त्रस्त असतील. क्षयरोगाची आकडेवारी ही दिवसेंदिवस वाढत आहे. शासनस्तरावर सन 1992 मध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यामध्ये झाली व सन 2005 सालापर्यंत हा कार्यक्रम संपूर्ण देशात राबविण्याचा संकल्प सोडण्यात आला.व आज पूर्ण भारतात हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक 24 मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा. हाडे सांध्याचा क्षयरोग,लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग,आतड्यांचा क्षयरोग इत्यादी.
सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डॉटस्‌ म्हणजे डायरेक्टली ऑब्जर्व्ह ट्रीटमेंट वूईथ शॉर्टटर्म केमोथेरपी नावाचा औषधोपचार क्षयरोगावर केला जातो.सहा महिने व आठ महिने असा हा उपचाराचा कालावधी असून नवीन क्षयरोग्यांनी सुरूवातीचे सहा महिने डॉटस्‌ची औषधी व्यवस्थीत घेऊन त्याची तपासणी दिलेल्या वेळेत केल्यास हा आजार 100 टक्के पूर्ण बरा होतो. सध्या खात्रीशीर उपचार म्हणून या डॉटस्‌ उपचार प्रणालीकडे पाहिले जाते.ही उपचार पध्दती सरकारी दवाखान्यातून मोफत दिली जाते.क्षयरूग्णाला डॉटस्‌ उपचार सुरू झाल्यास रूग्णाच्या गावातच त्याला आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी वर्कर अशा वर्कर यांच्या मार्फत डॉटस्‌ दिला जातो.
क्षयरोगाची अनेक रूग्ण, क्षयरोगाविरोधाी औषधी योग्य डोसमध्ये व योग्य कालावधीपर्यंत घेत नाहीत.या अर्धवट उपचारापुढे तसेच क्षयरोग जंतूमध्ये होणाऱ्या उत्परिवर्तामुळे क्षयरोगाविरोधी औषधी पचविण्याची किंवा त्यांना दाद न देण्याची क्षमता या जंतूमध्ये निर्माण होते. ज्या प्रमाणे डास आता डीडीटी या औषधाला दाद देत नाहीत.तद्वतच क्षयरोग जंतू या क्षयरोगविरोधी बहुविध औषधाला प्रतिसाद देत नाहीत.अशा औषधरोधक जंतूमुळे होणाऱ्या रोगास मल्टिपल ड्रग रेझिस्टन्ट टी.बी.असे म्हणतात. एमडीआर टीबी उपचार पध्दती ही साधारण 24 ते 27 महिने असून ही उपचार पध्दती खूपच खर्चीक आहे.याचा उपचार लाखोंच्या घरात असून यासाठी लागणारा खर्च शासन करीत आहे. परंतु क्षयरोग्याने सुरूवातीलाच पूर्ण उपचार (6 ते 8 महिने कोर्स) घेतल्यास ही वेळ येणार नाही.
आज देशात क्षयरोग व एडस्‌ ही दोन आजार आपल्यासमोर आव्हानात्मक उभी आहेत. एचआयव्ही/एडस्‌ ची बाधा झालेल्या व्यक्ती पैकी 60 टक्के लोकांना क्षयरोगाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. क्षयरोग हा एचआयव्ही बाधीत व्यक्तीमधील सर्वात जास्त प्रमाणात आढळून येणारा संधी साधू आजार आहे. एचआयव्हीच्या विषाणूंनी आपल्या शरीरात प्रवेश मिळविल्यानंतर ते आपले रोग प्रतिकार शक्तीच नष्ट करून टाकतात.परिणामी क्षयरोग सहजपणे होतो.याला आळा घालण्यासाठी डॉटस्‌ उपचार पध्दतीचा अवलंब केला गेला पाहिजे. डॉटस्‌ पध्दतीमुळे एचआयव्ही संसर्गी

बुधवार, २५ मार्च, २०२०

💥🌸दिनविशेष🌸💥 २३ मार्च

*💥🌸दिनविशेष🌸💥*

             
*२३ मार्च*

     *जागतिक हवामान दिन*

आज जगभरात २३ मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो.

हवामानाबाबत संपूर्ण जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सार्यांबनाच हवामानाचे महत्त्व समजावे, हवामान चांगले राहण्यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे, कोणकोणत्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत, याविषयी जाणीव आणि जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने २३ मार्च हा दिवस जागतिक हवामानदिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या चाळीस वर्षांच्या तुलनेत मागच्या दशकात हवामानात झालेले बदल सर्वांच्याच चिंतेचा विषय बनलेले आहेत. हवामान बदलाच्या परिणामांमुळे आज भारतातीलच नव्हे, तर जगभरातील शेतीक्षेत्र ग्रासले आहे. भविष्यातही हवामान बदलाचे परिणाम कमी-जास्त प्रमाणात प्रभाव दाखवतच राहतील. त्यामुळे आपण संभाव्य परिस्थितीचा वेध घेऊन आपत्कालीन उपाययोजनांसाठी तयार राहणे आवश्यक आहे. विसाव्या शतकात मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. पण या प्रगतीसोबतच हवामानातील बदल आणि वातावरणातील कमी होणारा संरक्षक ओझोन थर यांचे भीषण संकटही त्यातूनच उभे राहिले. जीवसृष्टीवरील दुष्परिणामाच्या रूपाने आपण ते अनुभवतो आहोत. हवामानातील बदल हा जागतिक तापमानवाढीमुळे होणारा सर्वाधिक चिंताजनक परिणाम आहे. अनेक देशांमध्ये, विशेषत: युरोप आणि अमेरिकेसारख्या देशात हवामानातील बदल स्पष्टपणे जाणवत आहेत.

💥🌸दिनविशेष🌸💥 २२ मार्च

*💥🌸दिनविशेष🌸💥*

               *२२ मार्च*

            *जागतिक जल दिन*

  जागतिक जल दिन' हा एक आंतरराष्टीय दिवस आहे.प्रतिवर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो.[१]स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे.

आयोजक
UN (Water) म्हणजेच युनायटेड नेशन (वाॅटर) ही संस्था या दिवसाचे आयोजन करते.स्वच्छता आणि पाणी या दोन विषयांवर ही संस्था प्रामुख्याने काम करते.१९९३साली प्रथम जागतिक जल दिन साजरा करण्यात आला.

संकल्पनाधारित उपक्रम
प्रतिवर्षी संयुक्त राष्टाचे सदस्य असलेल्या देशांकडून हा दिवस साजरा केला जातो.त्यासाठी प्रतिवर्षी एक नवी संकल्पना मांडली जाते.त्या संकल्पनेला अनुसरून वर्षभर उपक्रम राबवले जातात.उदा.पाणी आणि ऊर्जा,पाणी आणि शाश्वत विकास इ.

💥🌸दिनविशेष🌸💥 २१ मार्च

💥🌸दिनविशेष🌸💥

                *२१ मार्च*

*दिवस व रात्र समान असणारा दिवस*

खगोलशास्त्राशी निगडित घडणाऱ्या विविध बाबी खगोलप्रेमींबरोबरच सामान्य माणसांनाही आपल्याकडे आकर्षित करीत असतात. दिवस मोठा, रात्र लहान किंवा रात्र मोठी दिवस लहान, दक्षिणायन, उत्तरायण, सुपरमून यांचे दर्शन, खगोलशास्त्राशी निगडित घडणाऱ्या विविध बाबी खगोलप्रेमींबरोबरच सामान्य माणसांनाही आपल्याकडे आकर्षित करीत असतात. दिवस मोठा, रात्र लहान किंवा रात्र मोठी दिवस लहान, दक्षिणायन, उत्तरायण, सुपरमून यांचे दर्शन, अशा काही ठराविक दिवशी घडणाऱ्या दिवसांचे, घटनांचे विशेष अप्रूप सामान्यांना असते. आजचा (२१ मार्च) दिवसही विशेष असून, हा दिवस आणि रात्र आज समान असणार आहे. बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र आज अनुभवण्यास मिळणार आहे.

सूर्य २१ मार्च व २२ किंवा २३ सप्टेंबर या दिवशी खगोलीय विषुववृत्तावर असतो. त्यामुळे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असते. म्हणून या दिवसांना विषुव दिन असे म्हणले जाते. या दिवशी सर्वत्र सूर्योदय व सूर्यास्त अनुक्रमे सकाळी व संध्याकाळी सहा वाजता होतो, असे सामान्यत: मानले जाते. हे दिवस वगळता दिवस व रात्र नेहमी लहान मोठे असतात. दिवस रात्रीची ही असमानता पृथ्वीच्या आसाच्या कलन्यामुळे निर्माण होते. जो गोलार्ध सूर्याकडे कलतो, त्या गोलार्धात दिवस बारा तासापेक्षा मोठा रात्र बारा तासांपेक्षा लहान असते. ज्यावेळी कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो तेव्हा पृथ्वीवर दिवस-रात्र समान असते. म्हणजे बरोबर १२-१२ तासांचे असतात.