शुक्रवार, २२ मे, २०२०

💥🌸दिनविशेष🌸💥* 23 मे

*💥🌸दिनविशेष🌸💥*

    *ओगुस्तँ लुई कॉशी*

        *फ्रेंच गणितज्ञ*

*स्मृतिदिन - मे २३, १८५७*
 
ओगुस्तँ लुई कॉशी (ऑगस्ट २१, १७८९:पॅरिस - मे २३, १८५७:स्कोक्स, फ्रांस) हा फ्रेंच गणितज्ञ होता.
गणित हा विषय म्हणजे बुद्धीला व्यायाम! या व्यायामासाठी आवश्यक असणारा बुद्धीचा खुराक उपजत असणारे, गणिताच्या अनेक कूटप्रश्नांची उत्तरे शोधून काढणारे फ्रेंच गणितज्ज्ञ ऑग्युस्तीन कोशी यांचा जन्म पॅरिस येथे २१ ऑगस्ट १७७९ रोजी झाला. फ्रान्समधल्या गणितातील नावाजलेल्या, एकोल पॉलिटेक्निकमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. परंतु तो काळ फ्रेंच राज्यक्रांतीचा होता आणि त्यांचे वडील क्रांतिकारकांचे विरोधक. परिणामी, या संस्थेतील शिक्षकांनी त्यांची हेळसांड केली तेव्हा तेथून ते बाहेर पडले आणि अभियांत्रिकी शिक्षण घेतले. परंतु गणिताच्या प्रेमापोटी याच क्षेत्रात संशोधन करण्याचे त्यांनी ठरवले. बहुपृष्ठांक आणि समरूप अर्थक्रियेबद्दल त्यांनी मांडलेले दोन सिद्धान्त एकत्रित करून ‘निर्धारक’च्या अत्याधुनिक संकल्पनेला जन्म दिला. यानंतर त्यांनी द्रवीय पृष्ठावरील लहरीच्या प्रसरणाची गणिती प्रक्रिया मांडल्याने त्यांना ‘अ‍ॅकॅडमी डे’ सायन्सेसचे पारितोषिक देण्यात आले. परिणामी, त्यांची ‘अ‍ॅकॅडमी डे’ सायन्समध्ये निवड करण्यात आली. त्यांनी विशुद्ध गणित आणि उपयोजित गणित या दोन्ही शाखांतील समस्यांवर मांडलेले सिद्धान्त स्वीकारण्यात आले. विश्लेषणाच्या तर्कशास्त्रीय पाया सुधारण्याच्या समस्येवरही त्यांनी संशोधन केले.
फ्रान्सचा सर्वश्रेष्ठ गणितज्ज्ञ म्हणून एव्हाना त्यांचा नावलौकिक झाला होता. ज्या संस्थेतून हेळसांड झाल्याने ते बाहेर पडले, त्याच पॉलिटेक्निक संस्थेत अध्यापक म्हणून मोठय़ा सन्मानाने त्यांची नियुक्ती झाली. त्यांना ‘कॉलेज द फ्रान्स’ आणि सॉर्बान येथे व्याख्यानासाठी बोलावण्यात येऊ लागले. भूमितीशास्त्रातील काटेकोरपणा गणितात त्यांना आणावयाचा होता. २३ मे १८५७ रोजी त्यांचे निधन झाले.

💥🌹आजचा दिनविशेष🌹💥 *२२ मे*

*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*

              *२२ मे*

*जागतिक जैवविविधता दिन*

*जैवविविधता*
म्हणजे सजीवांमधील एखाद्या जाति, परिसंस्था, बायोम, किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता. परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे. जैवविविधता बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ उष्णप्रदेशीय भागामध्ये जैवविविधता अधिक तर ध्रुवीय भागामध्ये विविधता कमी असते.

झपाट्याने होणाऱ्या परिसरातील बदलांमुळे सजीव सामूहिकरीत्या लुप्त होतात. एका अंदाजानुसार पृथ्वीवर असलेल्या एकूण सजीवांपैकी एक टक्का सजीव लुप्त झाले आहेत. सजीवांची पृथ्वीवर निर्मिती झाल्यापासून आजपर्यत पाच वेळा मोठ्या प्रमाणात आणि अनेक वेळा लहान प्रमाणात जैवविविधतेचा नाश झाला आहे. फेनेरोझोइक महाकल्पामध्ये (५४ कोटी वर्षांपूर्वी) जैवविविधतेचा महाविकास ‘कॅम्ब्रियनकल्पामधील विविधतेचा स्फ़ोट’ या नावाने ओळखला जातो. बहुपेशीय सजीवांमधील सर्व संघांची (फायलम) निर्मिती झालेली होती. त्यांपुढील ४० कोटी वर्षांमध्ये जैवविविधतेचा पुन्हा पुन्हा नाश झालेला होता. ‘कार्बोनिफेरस’ युगामध्ये सदाहरित वनांमधील वनस्पति आणि प्राण्यांचा नाश झाला. ‘पर्मियन ट्रायासिक’ युगामध्ये २५ कोटी वर्षांपूर्वी झालेला जैवविविधतेचा नाश सर्वात मोठा होता. तीन कोटी वर्षांपूर्वी पृष्ठवंशी सजीवांनी पुन्हा एकदा आपला जम बसवला. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झालेला ‘क्रिटेशियस –टर्शरी विनाश’ हा नजीकच्या काळातील जैवविविधतेचा नाश होय. याच काळात डायनोसॉर नष्ट झाले. जैवविविधतेमध्ये माणसाचा प्रवेश झाल्यानंतर जैवविविधता आणि जनुकीय विविधता हळू हळू नाहीशी होत आहे. यास ‘हॉलोसिन विनाश’ असे म्हटले जाते. मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाल्याने जैवविविधतेचा हा ता नाश होत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने जैव विविधतेच्या नाशाकडे लक्ष देण्यासाठी इसवी सनाचे २०११-२०२० हे दशक जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले आहे.पूर्वी घराच्या आजूबाजूला वेगवेगळी फळांची व फुलांची झाड लावली जायची जेणेकरून त्यावर पक्षी फुलपाखर बाग्डवीत पण आताच्या सध्याच्या स्तिथीत पाहिलं तर सगळीकड कोन्क्रीतीकरण वाढलेलं आहे त्यामुळ आजूबाजूला जास्त परिसरच नाहीये व जेवढा आहे तेवढ्यात वेग्वेगली शो ची झाड लावली जातात अस जर होत राहील तर त्या फुलपाखरांनी बागडायचं कुठ त्यांनी मध कुठ तयार करायचा?

*जैवविविधता विकास (उत्क्रांति)*

आज अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेमागे ३५० कोटी वर्षांचा इतिहास आहे. सजीवांची नक्की निर्मिती केव्हा झाली हे जरी वैज्ञानिकाना सांगता आले नाही तरी पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर वीस ते तीस कोटी वर्षानंतर प्राथमिक रचना असलेले सजीव अस्तित्वात आले यावर वैज्ञानिक ठाम आहेत. साठ कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले सजीव आदिजीव, जीवाणू, असे एकपेशीय रचनेचे होते. चोपन्न कोटी वर्षापूवी फॅनरोझोइक कल्पामध्ये झालेल्या कँब्रियन युगामध्ये जैवविधतेमध्ये प्रचंड वाढ झाली. या प्रकारास कँब्रियन एक्स्प्लोजन असे म्हणण्याची पद्धत आहे. कँब्रियन युगामध्ये बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली. पुढील ४०कोटी वर्षामध्ये विविधतेमध्ये बहुतांशी अपृष्ठवंशी सजीव अधिक संख्येने होते. याच कालखंडात पृष्ठवंशी सजीव घातीय श्रेणीने वाढत गेले. या वाढीबरोबर अनेक पर्यावरणीय कारणाने जैवविविधतेचा नाश होत होता. समूह विलोपन क्रियेमुळे जैवविविधतेमध्ये घट आणि वृद्धी हे प्रकार सजीवांच्या निर्मितीपासून चाललेले आहेत. कार्बनिफेरस युगामध्ये झालेल्या विलोपनामध्ये पर्जन्यवने भूपृष्ठाखाली गाडली गेली. या काळात गाडल्या गेलेल्या जीवाश्मांवर उच्च दाब आणि कार्बन वेगळा होण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेले दगडी कोळसा आणि क्रूड ऑइल आजच्या आपल्या इंधनाची ९०% गरज भागवत आहे. पंचवीस कोटी वर्षापूर्वी पर्मियन-ट्रायसिक युगाच्या संधिकालात झालेल्या विघटनाने जैवविविधतेची सर्वाधिक हानी झाली. (या काळात डायनोसॉर नष्ट झाले). या धक्क्यातून सावरण्यास पृष्ठवंशी सजीवाना तीन कोटी वर्षे लागली. गेल्या दोन तीन कोटी वर्षांच्या जीवाश्मांच्या अभ्यासावरून असे आढळून आले आहे की आजच्या एवढी जैवविविधता कधीही अस्तित्वात नव्हती. सर्व वैज्ञानिकांना हे म्हणणे पूर्णपणे मान्य नाही. जीवाश्मीकरण सर्व सजीवांचे कधीही प्रातिनिधित्व करू शकत नाही हा त्यांचा आक्षेप. काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार तीस कोटी वर्षापूर्वी आणि आजच्या जैवविविधतेमध्ये फारसा फरक नसावा. सध्याच्या सजीव जातींची संख्या दोन दशलक्ष ते शंभर दशलक्ष एवढी असावी. सर्व पर्यायाचा विचार करून सजीवांची संख्या १३० ते १४० लाखांपर्यंत पोहोचते. यांमधील संधिपाद प्राण्यांची संख्या सर्वाधिक आहे. ज्या ठिकाणी सजीवामध्ये संघर्ष कमी आहे म्हणजे निसर्ग निवडीच्या “फिटनेस” ला (डार्विंनचा सिद्धान्त) सामोरे जावे लागत नाही अशा ठिकाणी जैवविविधता वृद्धिंगत होते.
========================
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र
*दिनविशेष चाचणी सोडविण्यासाठी क्लीक करा* 👇👇👇👇👇👇

======================

गुरुवार, २१ मे, २०२०

Today in Science* 21 may

               ========================
संकलन :-श्री सतिश दुवावार, चंद्रपूर
------------------------------------------------
*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*

    *Today in Science*

     *21 May 2010*

*JAXA, the Japan Aerospace Exploration Agency, launches the solar-sailspacecraft IKAROS aboard an H-IIA rocket. The vessel would make a Venus flyby late in the year.*

IKAROS (Interplanetary Kite-craft Accelerated by Radiation Of the Sun) is a Japan Aerospace Exploration Agency (JAXA) experimental spacecraft. The spacecraft was launched on 21 May 2010, aboard an H-IIArocket, together with the Akatsuki (Venus Climate Orbiter) probe and four other small spacecraft. IKAROS is the first spacecraft to successfully demonstrate solar sailtechnology in interplanetary space.

On 8 December 2010, IKAROS passed by Venus at about 80,800 km (50,200 mi) distance, completing the planned mission successfully, and entered its extended operation phase.
========================
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र
*दिनविशेष चाचणी सोडविण्यासाठी क्लीक करा* 👇👇👇👇👇👇
======================

दिनविशेष 20 मे

💥🌹आजचा दिनविशेष🌹💥

   *क्रिस्तोफर कोलंबस*

*अमेरिका खंडाचा शोध*

*स्मृतिदिन - २० मे १५०६*
 
अमेरिका खंड शोधणारा ख्रिस्तोफर कोलंबस (जन्म ऑक्टोबर ३१, १४५० व ऑक्टोबर १४५१ च्या दरम्यान ते २० मे १५०६) हा इटली देशाचा नागरिक असून, प्रदेशशोधक, दर्यावर्दी व वसाहतकार होता. त्याचा जन्म जेनोआ ह्या गणराज्यात (आजकालच्या इटलीचा वायव्य भाग) झाला. स्पेनच्या राजेशाही आश्रयाखाली तो चारदा ॲटलांटिक महासागर ओलांडून जाऊन आला व त्यामुळे उरोपला अमेरिकी खंडांची ओळख होउ शकली. त्या जलयात्रा व हिस्पोलिनिओला बेटावर कायमची वसाहत स्थापण्याचे त्याचे प्रयत्न ह्यांनी पुढच्या स्पेनच्या नव्या जगाच्या वसाहत मोहिमेचा पाया घातला.
युरोपीय साम्राज्यवाद व आर्थिक प्रतिस्पर्धा वाढत होत्या व युरोपीय राज्ये संपत्तीच्या शोधात नवनवीन व्यापारी मार्ग स्थापन करत होते. ह्या पार्श्वभूमीवर पूर्व दिशेला असलेला हिंदुस्थान देश हा पश्चिमी सागरमार्गाने गाठता येईल ह्या तर्कावर आधारलेल्या कोलंबसच्या मोहिमेला शेवटी स्पेनचा शाही पाठिंबा मिळाला. स्पेनच्या राजेशाहीला त्या मोहिमेत आशिया खंडातल्या अतिफायदेशीर मसाल्याच्या व्यापाराद्वारे आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर कुरघोडी करण्याची संधी दिसली. आपल्या १९४२च्या पहिल्या सफरीत त्याच्या अंदाजाने कोलंबस जपानला पोचणार होता त्याऐवजी बहामा द्वीपसमूहावर पोहोचला. ज्या ठिकाणी त्यांचे जहाज लागले त्या जागेला कोलंबसने साल्व्हाडोर हे नाव दिले. पुढच्या तीन मोहिमांत कोलंबस बुद्रुक व खुर्द इंडीज, वेनेंझुएलाचा कॅरिबिअन किनारा व मध्य अमेरिका ह्या भागांना भेटून आला व त्याने ते प्रांत स्पेनच्या राजांच्या अधिकाराखाली आल्याचे जाहीर केले.
तुर्कांनी काॅनस्टॅन्टीनोपल जिंकल्याने युरोपीयांचे आशिया खंडाशी व्यापार करण्याचे मार्ग बंद झाले. त्यामुळे व्यापार करण्यासाठी नविन मार्ग शोधण्याची आवश्यकता होती. यासाठी कोलंबस सागरी मार्गाने निघाला खरा पण तो भारतात न पोहचता उत्तर अमेरिकेत पोहचला. पण आपण भारतातच पोहोचलो आहे अशी त्याची समजूत झाली. मात्र काही वर्षांनी अमेरिगो व्हेस्पुसी हा कोलंबसच्या मार्गावर निघाला व अमेरिका खंडात पोहचला. पण त्याला लक्षात आले की हा भारत नसून दुसरीच भूमी आहे कारण भारतातील लोकं शेती करतात हे त्याला माहित होते. त्यामुळे त्याच्या नावावरून या खंडाला अमेरिका असे नाव दिल्या गेले.
कोलंबस हा अमेरिकेला पोहोचणारा पहिला युरोपीय शोधक नव्हता. लिफ एरिकसनने ११व्या शतकात नोर्स मोहिमेखाली अमेरिका गाठली होती. पण त्याचा पाठपुरावा झाला नाही आणि त्यामुळे त्यातून टिकाऊ असा युरोप व अमेरिका संबंध अस्तित्वात आला नाही, तो कोलंबसच्या सफरींमुळे होण्यास सुरुवात झाली. पुढची काही शतके युरोपचा हा अमेरिका-शोध, कब्जा व वसाहतीकरण चालूच राहिले. त्याचा आधुनिक जगाच्या घडणीवरही बराच प्रभाव पडला. कोलंबसने क्रिस्ती धर्माचा प्रसार ही स्वतःची मोठी कर्तबगारी मानली.
आपण पूर्व दिशेला असलेल्या हिंदुस्थानात न पोचता युरोपीयांना अपरिचित असलेल्या खंडात पोचलो हे कोलंबसने कधी कबूल केले नाही. उलट जिथे तो पोचला त्या रहिवाशांना त्याने इंडियोस (स्पॅनिश भाषेत हिंदुस्थानी) असे संबोधले. पुढे कोलंबसचे स्पेनचा राजा व त्याने नेमलेला अमेरिकी वसाहतीवरचा प्रशसक यांच्याशी संबंध बिघडले व त्याची परिणती १५०० मध्ये कोलंबसच्या अटकेत व हिस्पनोलिआ बेटाच्या राज्यपालपदावरून हकालपट्टी होण्यात झाली. त्यावर कोलंबस व त्याचे वारसदार ह्यांनी आपल्याला राज्याकडून अपेक्षित हक्काचा लाभ मिळावा ह्यासाठी बरीच वर्षे कायदेशीर लढाई दिली.
========================
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र 
*दिनविशेष चाचणी साठी क्लीक करा*
======================

मंगळवार, १९ मे, २०२०

Today in science 19 may

*💥🌸दिनविशेष🌸💥*

     *१९ मे १९७१* 

*सोवियेत संघाने मार्स २ या अंतराळयानाचे प्रक्षेपण केले.*

The Mars 2 was an unmanned space probe of the Mars program, a series of unmanned Mars landers and orbiters launched by the Soviet Union May 19, 1971. The Mars 2 and Mars 3 missions consisted of identical spacecraft, each with an orbiter and an attached lander. The orbiter is identical to the Venera 9 bus or orbiter. The type of bus/orbiter is the 4MV. They were launched by a Proton-K heavy launch vehicle with a Blok D upper stage. The lander of Mars 2 became the first man-made object to reach the surface of Mars, although the landing system failed and the lander was lost.

On May 19, 1971, the Proton-K heavy launch vehicle launched the probe from Baikonur Cosmodrome. After the first stage separated the second stage was ignited. The third stage engine blasted Mars 2 into parking orbit, then the Blok D upper stage sent Mars 2 on the trans-Mars trajectory.

दिनविशेष🌹 19 मे

-------------------------------------
*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*

      *🌸जमशेदजी टाटा🌸*

३ मार्च, इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४

*आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग  समुहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांचे निधन*

*जमशेदजी नसरवानजी टाटा (३ मार्च, इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४) पारशी, भारतीय उद्योजक होते. टाटा समूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते.*

त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत. त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. टाटांना "भारतीय उद्योगाचे जनक" म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशांत ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही, कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते.

*सुरुवातीचे जीवन*
जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरात झाला. त्यांचे वडील नसरवानजी व आई जीवनबाई टाटा हे त्यांच्या पारशी कुटुंबातील पहिले व्यापारी होते. कुटुंबाची परंपरा तोडून त्यांनी मुंबईत निर्यात व्यापार संस्था सुरू केली. जमशेदजी टाटा १४ व्या वर्षी मुंबईत आपल्या वडिलांकडे आले. आणि त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तेथे ते कॉलेजातील एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. त्यांची बुद्धिमत्ता पाहून काॅलेजच्या प्रिन्सिपाॅलांनी त्यांची डिग्री समाप्त होईपर्यंतची पूर्ण फी परत केली. जमशेदजीनी १६ वर्षाचे असताना १० वर्षाच्या हीराबाई दबू हिच्याशी विवाह केला.

१८५८ मध्ये जमशेदजींनी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतला. १८५७ सालचे भारतीय बंड ब्रिटिश शासनाने दडपून काढले होते. ब्रिटिश सरकारच्या विरुद्धचा विद्रोह त्यावेळी नवीनच होता. मात्र टाटांनी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारास शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला. आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या शाखा स्थापन करण्यासाठी टाटा यांनी इंग्लंड, अमेरिका, युरोप, चीन आणि जपान सारख्या परदेशांत अनेकदा प्रवास केला.

*व्यवसाय*
१८६८ पर्यंत टाटा आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते. त्यावर्षी त्यांनी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. १८९६ मध्ये चिंचपोकळी येथील एक दिवाळखोर तेल गिरणी विकत घेतली आणि तिची एका कापडाच्या गिरणीत रूपांतर केले. या गिरणीचे नाव त्यांनी अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. पुढे दोन वर्षांनंतर नफा मिळवण्यासाठी ती मिल टाटांनी विकली आणि १८७४ मध्ये नागपूरला एका स्पिनिंग मिलची स्थापना केली, १ जानेवारी १८७७ रोजी त्यांनी एम्प्रेस मिलची स्थापना केली.

त्यांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा वॉटरफ्रंट येथील ताजमहल हॉटेलचेया उद्घाटन झाले. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारे ते एकमेव हॉटेल होते.

*टाटा स्टील*
टाटा स्टील (पूर्वी टिस्को - टाटा आयर्न आणि स्टील कंपनी लिमिटेड) ही आशियातील पहिली आणि भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. तिच्या कोरस ग्रुपने दरवर्षी २,८ कोटी टन स्टीलचे उत्पादन केल्यानंतर ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली.

*टाटांनी स्थापन केलेल्या अन्य संस्था*
बंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स : विज्ञान आणि अभियांत्रिकी यांमधील संशोधन आणि शिक्षणासाठी प्रख्यात भारतीय संस्था.
टाटा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी (नवीन नाव - टाटा पॉवर कंपनी) : ८००० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या स्थापित क्षमतेची भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज कंपनी.
व्यक्तिगत जीवन
टाटांनी हिराबाई दाबू यांच्याशी विवाह केला. त्यांची मुले दोराबजी टाटा आणि रतन टाटा यांना सुद्धा टाटा ग्रुपचे अध्यक्ष म्हणून यश मिळाले. टाटाची बहीण जेरबाईने मुंबईतील एका व्यापाऱ्याशी लग्न केले. त्यांचा मुलगा त्यांना शापुरजी सकलातवाला हे बिहार आणि ओरिसामध्ये टाटा ग्रुपचे कोळशाचा व लोखंडाचा व्यापार सांभाळत होते. नंतर ते टाटांचे मॅन्चेस्टर कार्यालय सांभाळण्यासाठी इंग्लंडला निघून गेले आणि नंतर ब्रिटिश संसदेचे सदस्य झाले.

*मृत्यू*
१९०० साली व्यवसाया निमित्त जर्मनी ला असताना ते खूप आजारी पडले. १९ मे १९०४ रोजी बॅड नौहैम या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना इंग्लंड मधील पारशी समाजाच्या ब्रूकवूड दफन भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

*वारसा*

झारखंडमधील साचि गावात टाटाचा लोखंड व पोलाद प्रकल्प उभारला गेला. गाव गावात वाढला आणि रेल्वे स्टेशनचे नाव टाटानगर असे ठेवले गेले. आता झारखंडमधील जमशेदपूर या नावाने ओळखले जाणारे हे एक मोठे शहर आहे.


*पुस्तके*
आर. एम. लाला (१ मे २००६). द लव ऑफ इंडिया: द लाइफ ॲंड टाइम्स ऑफ जमशेदजी टाटा पेंग्विन पुस्तकं
दीनशॉ एडुलजी वाका (१९१५). जे. एन. टाटाचे जीवन आणि जीवन कार्य:
टाटायन-गिरीश कुबेर. -टाटा उद्योगसमूहाची समग्र माहिती देणारे मराठीतील पुस्तक
========================
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र
https://vidnyanmitr.blogspot.com/
======================

🌸दिनविशेष🌸 18 मे

*💥🌸दिनविशेष🌸💥*

          *बर्ट्रांड रसेल*

*एक विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञ, गणितज्ञ*

*जन्मदिन - १८ मे १८७२*
 
Thought is subversive and revolutionary, destructive and terrible, Thought is merciless to privilege, established institutions, and comfortable habit. Thought is great and swift and free.
- बर्ट्रांड रसेल

बर्ट्रांड रसेल हे एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील एक प्रमुख तत्त्वज्ञ, गणिती, इतिहासकार, सामाजिक-राजकीय टीकाकार. या माणसानं पुस्तकं लिहिली, लेख लिहिले, भाषणं दिली, वाद घातले. जन्मभर विचारांचा पाठपुरावा केला. सत्य, विवेक, उदारमतवाद, युद्ध, हट्टाग्रह यांबद्दल रसेलनं गेल्या शतकात लिहून ठेवलेलं आजही तितकंच लागू आहे.
वैचारिक स्पष्टता आणि निष्पक्ष चिकित्सा हे रसेल यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य! व्यक्ती कितीही महनीय असली, तरी रसेल तिच्या मोठेपणाचे दडपण घेत नाहीत. तिच्या विचारांना तर्कसंगतीची कसोटी लावून त्यातील काय ग्राह्य आणि काय त्याज्य याची निर्भिड चर्चा ते करतातच. 'अनपॉप्युलर एसेज्'मध्ये रसेल प्लेटो, अ‍ॅरिस्टॉट्लपासून ते लेबनीझ, कांट, हेगेल, मार्क्स या सर्वांच्या विचारांमधील किंवा वर्तणुकीतील विसंगतीची चर्चा करतात. त्यामागील हेतू अर्थातच त्या व्यक्तीची अप्रतिष्ठा करणे हा नसून, विवेकवादाचा प्रसार हाच असतो.
आपल्या समजुती, आपले आचार-विचार सर्वश्रेष्ठ, आपली जात किंवा धर्म सर्वांत योग्य असे मानून ते इतरांवर लादण्याच्या प्रवृत्तीविरुद्ध रसेल जन्मभर लढले. त्यासाठी त्यांनी लेखणी हेच अस्त्र वापरले. 'अनपॉप्युलर एसेज्' हे असेच एक अस्त्र होय. त्यातील लेखांचे विषय वरकरणी निरनिराळे वाटले, तरी त्यांमधील अंतःप्रवाह एकच आहे. तो म्हणजे सत्ताधार्‍यांच्या किंवा बलवानांच्या हट्टाग्रहांपायी समस्त मानवजातीस सहन करावा लागलेला त्रास!
हट्टाग्रहांना दूर कसे ठेवायचे याचेही अनेक साधे-सोपे मार्ग रसेल सुचवतात. त्यातील सर्वांत व्यवहार्य मार्ग म्हणजे *विज्ञानाची कार्यपद्धती शिरोधार्य मानणे. विज्ञान कधीही कुठल्याही सिद्धांतास त्रिकालाबाधित सत्य समजून कवटाळून बसत नाही. त्या त्या परिस्थितीतील सर्वांत संभवनीय स्पष्टीकरण याच दृष्टिकोनातून त्यांकडे बघते. नव्या प्रयोगांमधून नवी निरीक्षणे समोर आली, तर आधीचे निष्कर्ष बदलण्याची तयारी ठेवते. विज्ञान वैज्ञानिकांची किंवा प्रचलित समजुतींची सत्ता मानत नाही. म्हणूनच विज्ञान नव्या विचारांचा गळा घोटत नाही*
याउलट धर्मशास्त्रांत सत्ता व्यक्तींची किंवा व्यक्तींनी बनवलेल्या नियमांची असते. कालांतराने अशा व्यक्तींचे देव तरी होतात किंवा सत्ताधारी तरी. मग त्यांनी केलेले नियम मोडणे हे पाप तरी समजले जाते, किंवा गुन्हा तरी. *विज्ञान कोणालाही देव करत नाही, तरी ते नम्र व लवचीक असते.* याउलट धर्मशास्त्रे उद्दाम व ताठर होतात. सत्य हा अनेकदा सत्याचा आभास असतो. हा आभास कधी बुद्ध्या तयार केलेला असतो, तर कधी माणसाच्या आकलनशक्तीला पडलेल्या मर्यादांमुळे निर्माण होतो. या मर्यादांचे भान असणे, म्हणजे विवेक. असे भान माणसाला स्वमत-आग्रहांपासून परावृत्त करते; दुसर्‍याला आपल्यापेक्षा निराळे मत असण्याचा अधिकार आहे, हे मान्य करते. हाच झाला उदारमतवाद. आज जगाला या दोन्ही गुणांची नितांत गरज आहे, असे रसेल पोटतिडिकीने १९४० साली सांगत होते, कारण त्या वेळी जगाचा प्रवास पहिल्या महायुद्धाकडून दुसर्‍या महायुद्धाकडे सुरू होता