शनिवार, ११ एप्रिल, २०२०

दिनविशेष 12 एप्रिल

युरी अलेक्सेइविच गागारिन 
युरीचा जन्म सोवियत संघाच्या ग्रामीण भागातील एका गरीब कुटंबात झाला. घरच्या परिस्थितीमुळे लहान वयातच धातूच्या ओतकामाच्या कारखान्यात फाउण्ड्रीमन म्हणून युरी काम करू लागला. अविश्रांत कष्ट आणि तीव्र बुद्धिमत्ता असल्याने एक चांगला कामगार म्हणून युरीचे नाव झाले. त्याला विमानाच्या कारखान्यात नोकरीची संधी आली. याही कामात त्याने मेहनत घेऊन नाव कमावल्याने त्याला विमानदलात घेण्यात आले. हळूहळू युरीला अंतराळवीर होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.
एप्रिल १२इ.स. १९६१ रोजी गागारिन अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने ८९ तास ३४ मिनिटे भ्रमण केले. या पराक्रमाबद्दल त्याला अनेक देशांचे पुरस्कार मिळाले. त्यात ऑनर ऑफ लेनिन आणि सोवियत संघाचा नायक या पुरस्कारांचाही समावेश आहे.
वयाच्या ३४ व्या वर्षी एका विमान अपघातात युरीचा मृत्यु झाला.

💥🌼दिनविशेष🌼💥* 12 april

*💥🌼दिनविशेष🌼💥*

*१२ एप्रिल १९६१*

*सोवियेत संघाचा युरी गागारिन अंतराळात जाणारा प्रथम माणूस झाला.* (Spacecraft - Vostok)
  
The Vostok (Russian: Восток, translated as East) was a type of spacecraft built by the Soviet Union. The first human spaceflight in history was accomplished on this spacecraft on April 12, 1961, by Soviet cosmonaut Yuri Gagarin.
 The spacecraft was part of the Vostok programme in which six manned spaceflights were made from 1961 to 1963. Two further manned space flights were made in 1964 and 1965 by Voskhod spacecraft, which were modified Vostok spacecraft. By the late 1960s both were superseded by the Soyuz spacecraft, which are still used as of 2014.

दिनविशेष🌸💥* 13 एप्रिल


*💥🌸दिनविशेष🌸💥*

*राॅबर्ट वॅटसन*

*'रडार'च्या संशोधनात विकासात्मक सहभाग*

*जन्मदिन - १३ एप्रिल १८९२*


प्रतिध्वनीचे तत्त्व वापरून रडारची निर्मिती केली गेली आहे. १९३५ साली रॉबर्ट वॉटसन - वाॅट यांनी पहिली रडार यंत्रणा वापरात आणली. ही यंत्रणा मुख्यत: विमानांचा शोध ती दूरवर असतानाच घेण्यासाठी तयार केली गेली होती. अत्यंत वेगाने येणारे शत्रूचे विमान दूरवर असतानाच त्याबद्दलची माहिती या पद्धतीने मिळू लागली. आज याच यंत्रणेचा वापर सर्व ठिकाणी अज्ञात गोष्टींचा ठावठिकाणा घेण्यासाठी केला जातो.

 रडार म्हणजे *रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग.* रेडिओ लहरींचा वापर करून ही यंत्रणा काम करते. अर्थातच दृश्य स्वरूपात वस्तू दिसण्याची गरज त्यामुळे राहत नाही. धुळ, धुके, पाऊस, रात्र वा अंधार या कशाचाही या यंत्रणेवर परिणाम होत नसल्याने ही अत्यंत उपयोगी व खात्रीलायक यंत्रणा म्हणून समुद्रावरील बोटी, विमाने, क्षेपणास्त्रे यांसाठी वापरली जाते.

 रडारचे काम रेडिओलहरींद्वारे चालते. सर्व दिशांना सातत्याने पाठवल्या जाणाऱ्या रेडिओलहरी एखाद्या वस्तूवर (विमानावर) आदळतात. त्यांतील परतणार्‍यांतील काही पुन्हा ग्रहण केल्या जातात. या परतणार्‍या लहरींचे, विद्युतभारातून प्रकाशात रूपांतर केले जाते. गोलाकार पडद्यावर चमकदार प्रकाशकण अशा स्वरूपात हे रूपांतर रडार वापरणार्‍याला दिसते. रेडिओलहरींचे प्रक्षेपण व ग्रहण यांमधील कालावधी मोजून ग्रहणकेंद्र व वस्तू यातील अंतर मोजले जाते. सेकंदाचा हजारावा भाग जर यासाठी लागत असेल, तर विमान दीडशे किलोमीटरवर आहे, असा हिशोब केला जातो. अर्थातच यामुळे मिळणार्‍या सूचनेमुळे त्या विमानाचा समाचार घेणे किंवा जनतेला त्यापासून सावध करणे सहज शक्य होते. रडारची सूचना व विमान पोहोचणे या दरम्यान सहसा पंधरा ते वीस मिनिटे सहज मिळू शकत असल्याने त्याचा खूपच फायदा होऊ शकतो.

रडारवर दिसणारा ठिपका, त्याची तीव्रता, स्पष्टता व त्यामुळे निर्माण होणाऱ्या आवाजाचा 'बीप' असा संदर्भ या सर्वांवरून दिशा, गती, उंची यांचा खुलासा कॉम्प्युटरमुळे सध्या झटकन मिळू शकतो. विमानात बसवलेल्या रडारमुळे समोरून येणारी विमाने, विमानतळावरील यंत्रणा, हवेतील वादळे, टाळायला आवश्यक असलेले ढग किंवा पर्वतशिखरे यांचा पत्ता विमानातील नेव्हिगेटरला लगेच लागतो. बोटीवर पाण्यातील पातळीवर लहरींचे प्रक्षेपण करून निर्वेध प्रवास चालू राहतो. अनेकदा दाट धुक्यामध्ये वेगात बोट चालवणेही रडारमुळे शक्य झाले आहे.

 रडारचा वापर सुरू झाला आणि अचानक होणारे विमानांचे हल्ले थांबले. जागरूक रडार यंत्रणेमुळे वैमानिक व शत्रूची रडार यंत्रणा या दोघांनाही एकमेकांचे अस्तित्व कळले आहे, हे आता प्रथम लक्षात येते. या प्रकारावर मात करण्यासाठी रेडिओलहरीच शोषुन घेतल्या जातील, असे द्रावण वा असा पृष्ठभाग शोधण्याचा सतत प्रयत्न चालू आहे. त्याला अंशतः यश मिळाले आहे. पण व्यावहारिक उत्पादन अजून जमलेले नाही. प्रचंड वेग, कमी उंची व असा पृष्ठभाग यांचे एकत्रित स्वरूप करण्याचाही प्रयत्न केला गेला आहे. अर्थात हे सर्व लष्करी स्वरूपाचे प्रयत्न आहेत.

 रडारची यंत्रणा, तिची माहिती गोळा करण्याची क्षमता व पल्ला हा ठराविक असतो. त्यामुळे सरहद्दीवर अनेकदा रडार यंत्रणेचे सक्षम जाळे बसवले जाते. या जाळ्याला भेदून एखादे अज्ञात विमान जेव्हा प्रवेश करते, तेव्हा सारी संरक्षण यंत्रणा तातडीने जागी होण्याची व्यवस्था जागरूक देशात केली जाते. भारतातही या स्वरुपाची यंत्रणा सर्व सरहद्दींचे सतत जागरूकपणे रक्षण करत असते.

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

💥🌸दिनविशेष🌸💥* म.जोतीराव फुले* 11एप्रिल

   
    💥🌸दिनविशेष🌸💥

*महात्मा जोतीराव गोविंदराव फुले*

*वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक*

*जन्मदिन - एप्रिल ११, इ.स. १८२७*

महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले
सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. –

“ विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।  ”

जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर केले. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’
मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्याच ा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.
सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

💥🌼दिनविशेष🌼💥. *रॉबर्ट एडवर्डस्‌




*💥🌼दिनविशेष🌼💥*

*रॉबर्ट एडवर्डस्‌*

*नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश शरीरक्रियाशास्त्र*

*स्मृतिदिन - १० एप्रिल २०१३*

सर रॉबर्ट एडवर्डस्‌ (२७ सप्टेंबर १९२५ - १० एप्रिल २०१३) हे नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश शरीरक्रियाशास्त्र होते. त्यांना "आयव्हीएफ' (IVF) तंत्राचा उपयोग करून टेस्टट्यूब बेबी जन्माला घालण्याच्या संकल्पनेचे प्रणेते समजले जाते. त्यांच्या व त्यांचे दिवंगत सहकारी पॅट्रिक स्टेप्टो यांच्या प्रयत्नांना १९७८ मध्ये यश येऊन जगातील पहिली टेस्टट्यूब बेबी ठरलेल्या लुईस ब्राऊनचा जन्म झाला होता.

 गर्भाशयाबाहेर कृत्रिम गर्भधारणा घडवुन आणल्याने वंध्यत्व असलेल्या बर्‍याच स्त्रियांना व त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. कृत्रिम गर्भधारणा होऊन मुल जन्माला आले ते सर्वप्रथम इंग्लंडमध्ये. १९७८ मध्ये इंग्लंड येथे एडवर्ड आणि स्टेप्टो यांनी कृत्रिम गर्भधारणेने मुल जन्मल्याची माहिती जगाला दिली. १९८६ पर्यंत जगात ११००० मातांमध्ये यापद्धतीने गर्भधारणा झाली होती. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा पद्धतीने जन्माला येणार्‍या मुलांना टेस्ट ट्युब बेबी असे म्हटले जाते.
या पद्धतीत काय करतात ते अाता पाहु. सर्वप्रथम स्त्रीच्या बिजांडातुन बीज काढले जाते. तिच्या पतीच्या शुक्राणुबरोबर नियंत्रित अशा प्रयोगशाळेतील परिस्थितीत त्या बीजाचा संयोग घडवुन आणला जातो. नंतर हे फलन झालेले अंडे स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जाते. तेथे ते रुजते व त्यानंतर नैसर्गिकरीत्या जशी वाढ होते, त्याप्रमाणेच गर्भाची वाढ होते. प्रसूतीही नेहमीप्रमाणे होते. मूल ९ महिने ९  दिवस परीक्षानळीत वाढत नाही; हे आता तुमच्या लक्षात आले असेलच.
मासिक पाळीच्या चक्रात बीजांडातुन स्त्रीबीज बाहेर येते. ते  गर्भाशयाच्या दोन नलिकांद्वारे ओढुन घेतले जाते. नंतर या नलिकांमध्ये शुक्राणु व स्त्रिबीज यांचे मिलन होते. या नलिका जर रोगग्रस्त वा खराब झालेल्या असतील, तर स्त्रीला वंध्यत्व येते. अशा वंध्यत्वात टेस्ट ट्युब बेबी या पद्धतीचा खुपच उपयोग होतो व मातृत्वाला पारख्या होणार्‍या स्त्रियाही मुलाला जन्म देऊ शकतात.

*दिनविशेष* 14 October

दिनविशेष

*14 October 1968*

*The first live TV broadcast by American astronauts in orbitperformed by the Apollo 7 crew*
Apollo 7 was an October 1968 human spaceflight mission carried out by the United States. It was the first mission in the United States' Apollo program to carry a crew into space. It was also the first U.S. spaceflight to carry astronauts since the flight of Gemini XIIin November 1966. The AS-204 mission, also known as "Apollo 1", was intended to be the first manned flight of the Apollo program. It was scheduled to launch in February 1967, but a fire in the cabin during a January 1967 test killed the crew. Manned flights were then suspended for 21 months, while the cause of the accident was investigated and improvements made to the spacecraft and safety procedures, and unmanned test flights of the Saturn V rocket and Apollo Lunar Module were made. Apollo 7 fulfilled Apollo 1's mission of testing the Apollo Command/Service Module (CSM) in low Earth orbit.

दिनविशेष 9April



विज्ञान दिनविशेष

*J. Presper Eckert*

*Born - April 9, 1919*

*invented the first general-purpose electronic digital computer (ENIAC)*


John Adam Presper "Pres" Eckert, Jr. (April 9, 1919 – June 3, 1995) was an American electrical engineer and computer pioneer. With John Mauchly he invented the first general-purpose electronic digital computer (ENIAC), presented the first course in computing topics (the Moore School Lectures), founded the first commercial computer company (the Eckert–Mauchly Computer Corporation), and designed the first commercial computer in the U.S., the UNIVAC, which incorporated Eckert's invention of the mercury delay line memory.

💥🌸दिनविशेष🌸💥* 9 एप्रिल




*💥🌸दिनविशेष🌸💥*
    
 *९ एप्रिल १९९४*

सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अजमेर में पैदा हुए भार्गव ने थियोसोफिकल कॉलेज, लखनऊ और क्वींस कॉलेज, वाराणसी से शुरुआती पढ़ाई की थी। उन्होंने वर्ष 1944 में भौतिकी, रासायन और गणित में बीएससी किया था। वर्ष 1946 में एमएससी की डिग्री हासिल की थी। उन्होंने महज 21 वर्ष की आयु में ही लखनऊ विश्वविद्यालय से सिंथेटिक ऑर्गेनिक रसायन में पीएचडी की थी। वह कैंसर के क्षेत्र में शोध के लिए साल 1953 में अमेरिका गए थे।

सीसीएमबी वेबसाइट के मुताबिक उन्होंने कैंसर के खिलाफ कारगर दवा 5-फ्लूरोयूरेसिल की खोज में महत्वपूर्ण भूमिका निभाई थी। भार्गव ने ब्रिटेन और फ्रांस के कई शोध संस्थानों में काम किया था। उन्होंने वर्ष 2005 में इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्च (आइसीएमआर) के लिए एआरटी (असिस्टेड रिप्रोडक्टिव टेक्नोलॉजी) के नियमन को लेकर दिशा-निर्देश तय करने में उल्लेखनीय भूमिका निभाई थी। वह जीएम फसलों के विरोधी थी। उन्होंने देश में इसके इस्तेमाल पर कम से कम 15 वर्षो तक के लिए रोक लगाने की वकालत की थी।

भार्गव मोलेक्युलर बायोलॉजी के क्षेत्र में ख्याति प्राप्त वैज्ञानिक थे। उनके प्रयासों के कारण ही 1970 के दशक में विज्ञान एवं तकनीक मंत्रालय में बायोटेक्नोलॉजी का अलग विभाग बनाया गया था। उनकी कोशिशों का ही नतीजा था कि बेसिक बायोलॉजी के क्षेत्र में शोध-अनुसंधान के लिए वर्ष 1977 में सीसीएमबी की स्थापना की गई। उन्हें पद्म भूषण, फ्रांस के प्रतिष्ठित लीजन द ऑनर (1998) के अलावा सौ से ज्यादा राष्ट्रीय और अंतरराष्ट्रीय सम्मान से नवाजा जा चुका था।

💥🌼दिनविशेष🌼 8 एप्रिल

💥🌼दिनविशेष🌼

       *वालचंद हिराचंद*

*भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना काढला*

*स्मृतिदिन - ८ एप्रिल इ.स. १९५३*

वालचंद हिराचंद यांचा जन्म २३ ऑक्टोबर इ.स. १८८२ ला सोलापूर येथे झाला. वालचंद यांचा कल शिक्षणापेक्षा धंद्याकडे असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले. वडिलांच्या आडत कामात त्यांचे मन रमत नव्हते. त्यात त्यांना, ज्वारीच्या व कापसाच्या व्यापारात झळ सोसावी लागली होती, म्हणून ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात उतरले. बांधकाम व्यवसायाचे माहीतगार असलेल्या फाटक यांच्याबरोबर फाटक-वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू केले. बार्शी लाइट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरुवात करून सुमारे १४ वर्षे त्यांनी भागीदारीत अनेक पुलांची उभारणी केली. एडशी-तडवळ, बोरीबंदर-करी रोड-ठाणे-कल्याण व हार्बर ब्रँच लाइन यांसारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले व तडीस नेले. मुंबईतील व ब्रिटिशांच्या मर्जीतील नावाजलेल्या व्यावसायिकांना मागे सारून त्यांनी ही कामगिरी केली. मुंबईचा तानसा प्रकल्प, बोरघाट बोगदा, सिंधू नदीवरील व इरावती नदीवरील पूल बांधण यांसह अनेक छोट्या मोठ्या प्रकल्प उभारणीमध्ये वालचंद हिराचंद यांनी त्यांच्यातील धडाडी दाखवली.
ब्रिटिश जहाज कंपन्यांना झुकते माप देण्याच्या भूमिकेमुळे या व्यवसायात त्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले होते; मात्र न डगमगता ब्रिटिश व्यवस्थेशी त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली; तसेच ब्रिटिशांच्या मर्जीतील जहाजे चालवणारी बीआय(ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगशन कंपनी) ही कंपनी विकत घेण्याची भाषा केली.
जहाज बांधणीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह देशात प्रथमच बोगदा बनवण्याचे तंत्रज्ञान अंमलात आणले. बॉम्बे सायकल अ‍ॅन्ड मोटार ही मोटारनिर्मिती कंपनी आणि विमाननिर्मितीसाठी हिंदुस्थान एअरक्राफ्ट या कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. पाइप फाउंड्री, खाणकाम, रायफल बनवणे, सॉ मिल, चॉकलेट व साखर कारखाना आदी क्षेत्रे त्यांनी काबीज केली. साखर उद्योगासाठी साखर कारखाने निर्मितीचा प्रकल्प राबविला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्‌स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली.
प्रीमिअर इलेक्‍ट्रॉनिक्‍स, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड, सिंदिया स्टीमशिप कंपनी, रावळगाव शुगर फॅक्टरी, अ‍ॅक्रो इंडिया, बॉम्बे सायकल अ‍ॅन्ड मोटार कंपनी, हिंदुस्थान कन्स्ट्रक्‍शन, इंडियन ह्यूम पाइप, प्रीमिअर ऑटोमोबाईल्स, नॅशनल रायफल्स, वालचंद कूपर लिमिटेड, वालचंदनगर इंडस्ट्रीज आदी कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. कामगारांशी सलोख्याचे संबंध राखून त्यांच्या अडचणी जाणून पावले टाकली.
उल्लेखनीय
डिसेंबर २३, इ.स. १९४० रोजी हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना त्यांनी, तत्कालीन म्हैसूर राज्यात बंगलोर येथे सुरू केला. याच 'हिंदुस्थान एअरक्रॉफ्ट लिमिटेड' कंपनीचे पुढे इ.स. १९६४ साली हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असे नामांतर झाले. या कंपनीने आजपर्यंत, भारतातील अत्याधुनिक विमानांच्या निर्मितीचे आणि देखभालीचे काम केले आहे.

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

भारतीय शास्त्रज्ञ भाग 1 *सत्येंद्रनाथ बोस*


📱आम्ही तंत्रस्नेही शिक्षक*
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================
 *माहिती भारतीय शास्त्रज्ञांची भाग 1*

    *वार - मंगळवार दि.31/12/2019*
💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛
 *विश्वविख्यात शास्त्रज्ञ- सत्येंद्रनाथ बोस*

*जन्म - जानेवारी १ १८९४*

सत्येंद्रनाथ बोस (बंगाली: সত্যেন্দ্রনাথ বসু} (1894-1974) भारतीय शास्त्रज्ञ
बोस-आइन्स्टाईन जोडीतील विश्वविख्यात शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ यांचा जन्म जानेवारी १ १८९४ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ हे रेल्वेत नोकरीला होते.
१९१५ सालीच सत्येंद्रनाथांनी अल्बर्ट आइनस्टाइन यांचा मूळ जर्मन भाषेतील असलेला सापेक्षता सिद्धांत सर्वप्रथम इंग्रजी भाषेत भाषांतरित केला. १९१६ ते १९२१ या काळात सत्येंद्रनाथांनी कोलकाता येथील विद्यापिठात प्राध्यापक पदावर काम कले. १९२१ साली ते ढाका येथील विद्यापिठातील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
१९२३ साली सत्येंद्रनाथांनी प्रसिद्ध गणिती मॉल्ट यांच्या समीकरणांशी संबंधित स्वतःचे शोध इंग्लंड येथून प्रकाशित होणारे मासिक फिलॉसॉफीकलकडे पाठविले पण ते शोध छापण्यास त्या मासिकाने नकार कळविला. या घटनेमुळे सत्येंद्रनाथ निराश झाले नाहीत, त्यांनी त्यांचा प्रबंध आइन्स्टाईन यांच्याकडे जर्मनीला पाठविला. आइन्स्टाईन यांनी तो लेख जर्मन भाषेत भाषांतरित करून तेथे तो छापून येण्यास मोलाची मदत केली. लेख जगभरातील गणितींच्या पसंतीस उतरला, त्यामुळे बोस प्रसिद्धिस आले. आपल्या कामाच्या व्यापातून सत्येंद्रनाथ यांनी सुट्टी काढून ते मादाम मेरी क्युरी यांच्यासह पॅरीस येथे १० महिने काम केले. हे काम आटोपून सत्येंद्रनाथ जर्मनीला गेले. तेथे त्यांचे भव्य स्वागत झाले. आइन्स्टाईन यांच्यामुळे इतर वैज्ञानिक जसे मॅक्स प्लांक, एर्विन श्रोडिंजर, वोल्फगांग पॉली, वर्नर हायझेनबर्ग, सोमरपॅण्ड यांच्याशी अनेक विषयांवर विस्तृत चर्चा करता आल्या.
१९४५ साली सत्येंद्रनाथांनी आपली ढाका येथील नोकरी सोडून ते कोलकाता येथे १९५६ पर्यंत प्रोफेसर म्हणून काम केले. या कामातून सेवानिवृत्त झाल्यावर विश्व भारती विद्याल्याचे उपकुलपति म्हणून त्यांची नेमणूक झाली.
भौतिकशास्त्र विषयाचे त्यांनी २४ लेख लिहिले. या विषयातील हे सर्व लेख अत्यंत महत्त्वाचे समजले जातात.
१९५८ साली सत्येंद्रनाथांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले आणि त्यांना राष्ट्रीय प्रोफेसर म्हणण्यात येऊ लागले, त्याच वर्षी लंडन येथील रॉयल सोसयटीने त्यांना आपला फेलो म्हणून जाहीर केले.
दि. फेब्रुवारी ४ १९७४ रोजी सत्येंद्रनाथांचे हृदय रोगामुळे निधन झाले.
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग 2 🌸होमी जहांगीर भाभा🌸

📱आम्ही तंत्रस्नेही शिक्षक
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================
🔎 *माहिती शास्त्रज्ञांची भाग -०२*

 *वार - मंगळवार    दि ७/०१/२०२०*
💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)

⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

 *🌸होमी जहांगीर भाभा🌸  
- भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ*

*जन्मदिन - ऑक्टोबर ३०, इ.स. १९०९*

होमी भाभा (इ.स. १९०९ - इ.स. १९६६) भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते.
जीवन
भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. वडील जहांगीर भाभा हे बॅरीस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तीमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम वक्ताही होते.
त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रातच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरींगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रीज विद्यापिठातून इ.स. १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली.
इ.स. १९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टी ची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.
संयुक्त राष्ट्रच्या सभेला जातांना २४ जानेवारी, इ.स. १९६६ या दिवशी फ्रान्सच्या हद्दीत असतांना त्यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यु नंतर ट्रॉम्बे येथील अणु संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र असे ठेवण्यात आले.
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग 3 *जयंत नारळीकर*

📱आम्ही तंत्रस्नेही शिक्षक*
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================
🔎 *माहिती शास्त्रज्ञांची भाग ३*

    *वार -मंगळवार  दि.१४/०१/२०२०*

💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

*जयंत विष्णू नारळीकर*

*भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक*

*जन्म - जुलै १९, १९३८*

नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्‍नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.

संशोधन
*स्थिर स्थिती सिद्धान्त*

डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.

चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
*साहित्यातील भर*
विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर सातत्याने विज्ञानचिषयक माहितीने भरलेले ललित लेखन प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.
*विज्ञानकथा पुस्तके*
अंतराळातील भस्मासुर अभयारण्य टाइम मशीनची किमया प्रेषित यक्षांची देणगी याला जीवन ऐसे नाव वामन परत न आला व्हायरस
इतर विज्ञानविषयक पुस्तके
आकाशाशी जडले नाते गणितातील गमतीजमती युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी)
नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)
विज्ञान आणि वैज्ञानिक विज्ञानगंगेची अवखळ वळणे विज्ञानाची गरुडझेप
विश्वाची रचना
विज्ञानाचे रचयिते
सूर्याचा प्रकोप
Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)
Seven Wonders Of The Cosmos

आत्मचरित्र
चार नगरांतले माझे विश्व

*पुरस्कार*
१९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला हे पुरस्कारही मिळाले आहेत. २०१४साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-२०१३ जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)
चरित्र
डॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे ’विज्ञान यात्री डॉ.जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.

*शाॅर्ट फिल्म*

खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एका लघुपटाद्वारे घेतला गेला आहे. साहित्य अकादमीची निर्मिती असलेल्या एका तासाच्या या लघुपटाचे दिग्दर्शन अनिल झणकर यांनी केले आहे.
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग 4 *सुब्रह्मण्यन चंद्रशेखर*

आम्ही तंत्रस्नेही शिक्षक
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================
🔎 *माहिती शास्त्रज्ञांची -०४*

    वार -मंगळवार  दि.२१/०१/२०२०
💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

   *💥🌸सुब्रह्मण्यन चंद्रशेखर🌸💥*

       *भारतीय खगोलशास्त्रज्ञ*

           सुब्रह्मण्यन चंद्रशेखर हे शास्त्रज्ञ आहेत. पद्मविभूषण सुब्रह्मण्यम् चन्द्रशेखर (१९१०-१९९५) भारतीय शास्त्रज्ञ. खगोलशास्त्राचे ब्रूस मेडल, नोबेल पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
 जीवन
डॉ. चन्द्रशेखर यांचा जन्म ऑक्टोबर १९ १९१० रोजी लाहोर येथे झाला. त्यांचे वडील सुब्रह्मण्यन् हे तेव्हा लाहोर येथे भारतीय रेल्वेच्या ऑडीट खात्यात होते. लाहोरला त्यांचा जन्म झाला त्याआधी काही महिने त्यांच्या आजोबांचे,रामनाथ चंद्रशेखरांचे निधन झाले होते.दाक्षिणात्य ब्राम्हण कुटुंबात आजोबांच्या मृत्युनंतर जन्माला आलेल्या अर्भकाला ,तीच व्यक्ती जन्माला आली,असे समजून तिचे नाव दिले जाते. तसे चंद्रशेखरांना त्यांच्या आजोबांचे नाव ठेवण्यात आले.लाहोरच्या लॉरेन्स गार्डन या भागात होते. वडील सुब्रह्मण्यन् हे कर्नाटक संगीताचे उत्तम जाणकार आणि स्व‌तः वायोलीन वादकही होते आणि संगीतशास्त्र वरील काही पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले तर चन्द्रशेखर यांच्या आई सीता बालकृष्णन याही अतिशय हुशार होत्या, त्यांनी इंग्रजीतील पुस्तकांचे तमिळ भाषेत अनुवाद केले. तर त्यांचे काका, विश्व प्रसिद्ध वैज्ञानिक सर सी. व्ही. रामन होते. अशा हुशार घराण्यातील असलेले डॉ. चन्द्रशेखर स्वतःही लहानपणापासून प्रतिभावान होते.
डॉ. चन्द्रशेखर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घरीच झाले, तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मद्रास येथे झाले. १९३० साली डॉ. चन्द्रशेखर बी. एस. सी. झाल्यानंतर केंब्रीज विद्यापीठातील ट्रिनीटी कॉलेज मध्ये उच्च शिक्षणासाठी दाखल झाले. तेथून पी. एच. डी. झाल्यानंतर डॉ. चन्द्रशेखर शिकागो विद्यापीठ येथे १९३९ साली सहाय्यक प्राध्यापक म्हणून रूजू झाले.
 संशोधन
डॉ. चन्द्रशेखर यांची खरी ओळख म्हणजे "चन्द्रशेखर मर्यादा". ११ जानेवारी १९३५ या दिवशी डॉ. चन्द्रशेखर यांनी एक सिद्धांत मांडला. पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांची सांगड घालून चन्द्रशेखर यांनी श्वेत बटूंची कमाल वस्तुमानमर्यादा सूर्यापेक्षा ४४ टक्के इतकी असू शकते असे आपल्या सिद्धांताद्वारे मांडले. यात सूर्यापेक्षा लहान असलेले तारे म्हणजे बटू तारे यांचे अस्तीत्त्व कशामुळे टिकून आहे हे गणीताद्वारे डॉ. चन्द्रशेखर यांनी मांडले. या सिद्धांतासाठी डॉ. चन्द्रशेखर यांचा विरोध करणारे डॉ. आर्थर एडिंगटन हेही याच समस्येवर विचार करीत होते, पण त्यांना यावर उत्तर सापडले नाही. एडिंटन यांनी चन्द्रशेखर यांच्या सिद्धांताला विरोध केल्याने तो सिद्धांत मागे पडला.
डॉ. चन्द्रशेखर यांनी १९३९ साली आपला सिद्धांत An Introduction to the Study of Stellar Structure नावाच्या पुस्तकात विस्तृत रुपात मांडला. १९५० च्या दशकात शास्त्रज्ञांना या सिद्धांतील मते पटू लागली. त्या दिशेने संशोधन सतत सुरूच होते. अखेर जगभरातील शास्त्रज्ञांना डॉ. चन्द्रशेखर यांचे म्हणणे पटले. १९८३ साली त्यांच्या संशोधनाची मान्यता म्हणून डॉ. चन्द्रशेखर यांना जगातील सर्वोच्च समजले जाणारे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
अखेरपर्यंत अमेरिकेतच स्थाईक राहणारे आणि संशोधन कार्यात कार्यरत राहणार्‍या डॉ. चन्द्रशेखर यांचा मृत्यु ऑगस्ट २१ १९९५ रोजी झाला.
 पुरस्कार
हेन्री नॉरिस रसेल व्याख्याता (इ.स. १९४९)
ब्रुस पदक (इ.स. १९५२)
रॉयल ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक (इ.स. १९५३)
पद्मविभूषण (१९६८) - भारत सरकार
हेन्री ड्रेपर पदक (इ.स. १९७१)
नोबेल पारितोषिक भौतिकशास्त्र (इ.स. १९८३)
रॉयल सोसायटीचे कोप्ली पदक (इ.स. १९८४)
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग 5 *राप्पल कृष्णन*

*📱आम्ही तंत्रस्नेही शिक्षक*
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================

🔎 *माहिती शास्त्रज्ञांची -भाग ५*

    *वार - मंगळवार  दि.२७/०१/२०२०*
💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

*राप्पल संगमेश्‍वर कृष्णन*

*भारतीय भौतिकशास्त्रज्ञ*

*जन्मदिन - २३ सप्टेंबर १९११*

       राप्पल संगमेश्‍वर कृष्णन यांचा जन्म केरळातील राप्पल येथे झाला. त्यांचे शिक्षण मद्रास विद्यापीठ (डी. एस्‌सी.), बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेज (पीएच्. डी.) येथे झाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत संशोधन साहाय्यक (१९३५–३८) आणि भौतिकीचे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर तेथेच त्यांनी १९४८–७२ या काळात भौतिकी विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केले. १९७३ मध्ये केरळ विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर त्यांची नेमणूक झाली. १९३८ मध्ये केंब्रिज येथील कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत संशोधन करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती.

राप्पल संगमेश्‍वर कृष्णन यांचे प्रमुख संशोधन कार्य प्रकाशाचे प्रकीर्णन (विखुरणे), वर्णपटविज्ञान, स्फटिक भौतिकी व अणुकेंद्रीय भौतिकी या शाखांतील आहे. त्यांनी नवीन प्रकाशकीय परिणामाचा शोध लावला व सैद्धांतिक रीत्या त्याचे व्यापक स्वरूप प्रस्थापित केले. भौतिक-रासायनिक प्रश्नांत उपयुक्त असलेल्या या परिणामाला ‘कृष्णन परिणाम’ असे नाव प्राप्त झाले आहे. स्फटिक भौतिकीसंबंधी १९५१ पासून ते संशोधन करीत असून १९५८ साली ‘प्रोग्रेस इन क्रिस्टल फिजिक्स’ हा व्याप्ति  प्रबंध त्यांनी प्रसिद्ध केला. त्यांचे १६० हून अधिक संशोधन पर निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.

इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स (लंडन), अमेरिकन फिजिकल सोसायटी, इंडियन अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सेस व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया या संस्थांचे ते फेलो आहेत. १९४९ च्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या भौतिकी विभागाचे ते अध्यक्ष होते.
*----------------------------------------*
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग 7 वसंत गोवारीकर


आम्ही तंत्रस्नेही शिक्षक
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================
🔎 *माहिती शास्त्रज्ञांची भाग ७*
   *वार -मंगळवार  दि.११/०२/२०२०*

💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

      *💥वसंत गोवारीकर💥*
           *ज्येष्ठ शास्त्रज्ञ*

           अवकाश संशोधन, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या क्षेत्रातील त्यांचे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म १९३३ साली कोल्हापूरला झाला. कोल्हापूरला एमएस्सी करून त्यांनी लंडनच्या बìमगहॅम विद्यापीठातून पीएचडीची पदवी प्राप्त करून घेतली. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या एटॉमिक एनर्जी व एव्हिएशनमध्ये काम केले. या वेळी भारताच्या अवकाश संशोधनशास्त्राचे प्रमुख डॉ. विक्रम साराभाई यांनी त्यांना भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमासाठी भारतात बोलावून घेतले. १९६७ साली ते थुम्बा येथे रुजू झाले. अग्निबाणांसाठी लागणारे घन इंधन बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यासाठी त्यांनी प्रॉपेलंट इंधन कॉम्प्लेक्स, अमोनियम परक्लोरेट प्लान्ट अशी युनिट्स स्थापन केली. सॉलिड प्रॉपेलंट स्पेस बूस्टर प्लान्ट हे जगातले सर्वात मोठे युनिट त्यांनी स्थापन केले. त्यांनी बनवलेले एचटीपीबी हे घन इंधन विकसित करून आता ३० वष्रे झाली तरी आजही ते जगातले अद्ययावत असे इंधन आहे. १९७९ साली डॉ. वसंत गोवारीकर हे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक झाले. १९८७ ते १९९३ या कालावधीत गोवारीकर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. त्यांनी हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी मॉडेलही त्यांनी तयार केले. नंतर या मॉडेलला गोवारीकर मॉडेल म्हणून नाव देण्यात आले.
स्मृतिदिन - २ जानेवारी २०१५
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग 6 *सतीश धवन*

आम्ही तंत्रस्नेही शिक्षक
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================

🔎 *माहिती शास्त्रज्ञांची भाग ६

    *वार -मंगळवार  दि.४/०२/२०२०*
💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛
         
          *सतीश धवन*

*भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्वाचे योगदान*

           दक्ष अध्यापक, संशोधक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंता, निष्ठावान, व्यापक दृष्टिकोन असलेला कार्यक्षम नेता या गुणांमुळे सतीश धवन हे ज्या क्षेत्रात शिरले, त्या संबंधित संस्थेत त्यांनी आमूलाग्र बदल घडवला. धवन यांचा जन्म काश्मीरमधील श्रीनगरचा. पंजाब (लाहोर) विद्यापीठाचे पदवीधर. गणित, भौतिकशास्त्रात बी. ए., इंग्रजी साहित्यात एम. ए., अभियांत्रिकीत बी. ई., मिनिसोटा विद्यापीठातून विमानविद्या अभियांत्रिकीत एम. एस. (१९४७), कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून विमानविद्या अभियंता, (१९४९) विमान विद्याशास्त्र व गणितात पीएच. डी., (१९५१) अशा तऱ्हेने कला-विज्ञान अभियांत्रिकी मानवशास्त्र यांना कवटाळण्यास शिक्षणविस्तार व विश्वव्यापी दृष्टिकोन असलेला असामान्य शास्त्रज्ञ म्हणजे डॉ. सतीश धवन!

धवन यांनी वायुगतिशास्त्रात संशोधन आरंभले. त्याकाळी रचनातीत प्रवाह (सुपरसॉनिक फ्लोज्) व शॉक फ्लोज् या गूढविषयावर शोधनिबंध डॉ. धवन यांनी ठोस निरीक्षणांसह सादर केले. त्यातील अचूकतेमुळे ते गाजले. पृष्ठीय घर्षणजन्य प्रेरणा (फ्रिक्शन ड्रॅग) मोजण्याची सोपी पद्धत त्यांनी शोधली. श्लिकटिंग यांच्या ‘बाऊंड्री लेयर’ या ग्रंथाच्या गेल्या अर्धशतकातील सर्व आवृत्त्यांमध्ये धवन यांच्या संशोधनांची नोंद झालीय.

१९५९-६१ दरम्यान डॉ. कलामांना वायुयान विकास संस्थेत (एडीई), हॉवरक्राफ्टच्या विरुद्ध दिशांनी फिरणा-या पंख्यांचा आराखडा बनवताना अडचण आली. आपल्या संचालकांच्या अनुमतीने ते भारतीय विज्ञान संस्थेत जाऊन ते धवनसरांना भेटले. रोज १ तासप्रमाणे १० शनिवार १० व्याख्याने डॉ. कलामांना दिली. व्याख्यानापूर्वी प्रश्न विचारून ते विद्यार्थ्यांची ग्रहणक्षमता व उपयायोजनक्षमता पारखून घेत. सत्रान्ती आराखडा बनवण्याइतके डॉ. कलामांचे मन खंबीर झाले.

१९७२ मध्ये अवकाश आयोग (स्पेस कमिशन) व भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) यांच्या अध्यक्षपदी आणि अवकाश विभागात (डिपार्टमेंट ऑफ स्पेस) भारत शासनाच्या सचिवपदी झालेली नियुक्ती अनेकांना प्रेरक ठरली. डॉ. साराभाईंनी अंतराळ कार्यक्रमात संघटनात्मक व व्यवस्थापकीय शिस्त निर्माण केली, तर इस्रोला अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त डॉ. धवन यांनी केले.

१९८० साली, बंगलोरमधील इस्रेच्या मुख्यालयात आगामी दोन दशकातील अंतराळ मोहिमांची सांगोपांग चर्चा डॉ. कलाम करत होते. दुस-या दिवशी डॉ. धवन यांनी त्या चर्चेची माहिती घेतली. त्यांनी सोबत आणलेल्या तक्त्यांच्या सहाय्याने आगामी १५ वर्षातील मोहिमांचे आराखडे तयार केले. त्यामध्ये भूस्थिर व उपग्रहांसाठी प्रक्षेपण याने व उपग्रहमालिका यांचा समावेश होता. धवनसर मोहिमेच्या यशाचे श्रेय इतरांना देऊन स्वत: चुका, त्रुटी व अपयशाचे धनी होत.

१० ऑगस्ट १९७९ रोजी, कलामांच्या अध्यक्षतेखाली झालेली मोहीम फसली. पण माध्यम पत्रकारांना तोंड देताना आपले अपयश मान्य करून आगामी मोहीम जबाबदारीने करण्याची ग्वाही धवनसरांनी दिली. यानंतर १९ जुलै १९८० रोजी, दुस-या प्रक्षेपण यानाने ‘रोहिणी’ उपग्रहाला यशस्वीरित्या भ्रमण कक्षात नेऊन सोडले, तेव्हा पत्रकारांसमोर डॉ. कलामांनाच त्यांनी बोलायला लावले. अशा तऱ्हेने धवनसरांनी सहका-यांमध्ये निकोप दायित्वाची भावना फुलवली. त्यांनी सहका-यांसाठी मूल्यमापन व बढत्या ही पद्धत आणली. त्यामुळे अधिक कार्यक्षम अभियंत्यांना पुढे जाण्यास वाव मिळाला. पुढे त्यांनी राष्ट्रीय अंतरीक्ष कार्यक्रम हा नागरी उपक्रम म्हणून राबवला.

या प्रकारात वरिष्ठांनी कनिष्ठांनी कसे वागावे याचा आदर्श ‘धवनसर’ असल्याचे कलमांना वाटे. १९८१ साली, डॉ. धवन यांना पद्मविभूषण व डॉ. कलाम यांना पद्मभूषण देऊन देशाने गौरविले. १९९० मध्ये हैद्राबादमध्ये ‘पक्ष्यांची उड्डाणे’ या विषयावर धवन सरांचे व्याख्यान झाले, त्यावेळी डॉ. कलामांनी त्यांची ओळख करून दिली. ३१ मे १९९२ रोजी, ‘लॉच व्हेइकल प्रोग्राम’वर धवनसरांनी चर्चा आयोजित केली होती. डॉ. कलामांनी इस्रे संचालकांसमोर आपले विचार मांडले. प्रा. धवन यांनी डॉ. कलामांच्या डीआरडीओमध्ये बदलीची घोषण करून सा-यांना धक्का दिला. १९८० पासून प्रा. धवन यांनी निश्चित केलेल्या पथावरून देशाची संरक्षण तंत्रज्ञानाबाबत प्रगती झाली व तो स्वयंपूर्ण ठरलाय.

१९९९ मध्ये, राष्ट्रीय एकात्मतेचा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ डॉ. सतीश धवन यांच्या चतुरस्र् व्यक्तिमत्त्वाला लाभला. राष्ट्रीय समस्या सा-यांना बरोबर घेऊन वैज्ञानिक मार्गाने सोडवण्याच्या धवनसरांच्या प्रतिभाशाली कर्तृत्वाचा सन्मान असल्याचे डॉ. कलाम यांना त्या क्षणी वाटले.

इस्रेचे अध्यक्ष म्हणून एक तपाच्या सेवेचा गौरव म्हणून त्यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर २००२ रोजी ‘इस्रेचे’ पुनर्नामकरण होऊन ते सतीश धवन स्पेस सेंटर असे केले गेले. डॉ. धवन यांची समस्येविषयीची आस्था व कार्यातील वस्तुनिष्ठता या नेतृत्वगुणांचा गौरव पंतप्रधान वायपेयी यांनी केला. शिक्षक दिनी ‘उत्कृष्ट शिक्षक’ असलेल्या आपल्या शास्त्रज्ञ गुरूचा सन्मान पाहून डॉ. कलामांचे मन समाधानाने भरून आले.
सतिश धवन (२५ सप्टेंबर – ३ जानेवारी २००२) यान्चे भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्वाचे योगदान होते. ते भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्यानंतर ISRO (Indian Space Research Organisation) चे १९७२ साली अध्यक्ष झाले. त्यांना भारतातील प्रायोगिक fluid dynamicsच्या संशोधनाचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म श्रीनगरमधे झाला आणि शिक्षण भारत तसेच अमेरिकेत झाले.
त्यांनी ग्रामीण शिक्षण, Remote Sensing तसेच Satellite Communication च्या क्षेत्रात मुलभूत संशोधन केले. त्यांच्या प्रयत्नांनी भारत INSAT - दूरसंचार उपग्रह, IRS - दूरसंवेद उपग्रह आणि PSLV - Polar Satellite Lanch Vehicle यासारखे प्रकल्प यशस्वी करू शकला.
त्यांच्या स्मरणार्थ श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण स्थळाचे सतीश धवन अंतराळ केंद्र असे नामकरण करण्यात आले.
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग 8 एम.जी.के. मेनन

आम्ही तंत्रस्नेही शिक्षक*
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================

🔎 *माहिती शास्त्रज्ञांची भाग 8*

    *वार -मंगळवार  दि.18/02/2020*
💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

*एम.जी.के. मेनन*

   प्रसिद्ध वैज्ञानिक ,जन्मदिन - २८ आगस्ट १९२८

भारतीय भौतिकविज्ञ. त्यांनी प्रामुख्याने ⇨ विश्वकिरण व ⇨ मूलकण भौतिकी या विषयांत संशोधन केलेले आहे.

मेनन यांचा जन्म मंगलोर येथे झाला. त्यांचे शिक्षण जोधपूर येथील जसवंत कॉलेज, मुंबई येथील रॉयलइन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि इंग्लंडमधील ब्रिस्टल विद्यापीठ येथे झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम्. एस्‌सी. व ब्रिस्टल विद्यापीठा ची पी. एच्. डी. या पदव्या संपादन केल्या. ते ब्रिस्टल विद्यापीठात संशोधन सहाय्यक होते (१९५२–५३). त्यानंतर त्यांनी मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या संस्थेत प्रपाठक (१९५५–५८), सहयोगी प्राध्यापक (१९५८ ६०), भौतिकी विद्यापीठात प्राध्यापक व अधिष्ठाते (१९६०–६४), वरिष्ठ प्राध्यापक व उपसंचालक (भौतिकी, १९६४–६६) आणि होमी भाभा यांच्या अपघाती निधनानंतर संस्थेचे संचालक (१९६६–७५) या पदांवर कामे केली. यांखेरीज भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी विभागाचे सचिव व इलेक्ट्रॉनिकी आयोगाचे अध्यक्ष (१९७१–७८), संरक्षण खात्याच्या संशोधन व विकासाचे सचिव आणिसंरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या महासंचालकाचे वैज्ञानिक सल्लागार (१९७४–७८), कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्चचे महासंचालक (१९७८–८१), भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रविद्या विभागाचे सचिव (१९७८ पासून), पर्यावरण विभागाचे सचिव (१९८० पासून), अतिरिक्त उर्जा उद्‌गम आयोगाचे सचिव (१९८१ पासून), वगैरे विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. फेब्रुवारी १९८६ मध्ये पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली.

मेनन यांनी ब्रिस्टल येथे अणुकेंद्रीय मूलकणांच्या छायाचित्रण पायस [⟶ कण अभिज्ञातक] तंत्र व त्याचा मूलकणांच्या अभ्यासातील उपयोग यांसंबंधी संशोधन केले. त्यांनी केलेल्या तांत्रिक विकास कार्यामुळे बदलत्या उर्जेच्या म्यूऑनांचे, उच्च उर्जाभारित व ज्यांच्या उर्जा अतिशय अरुंद कक्षेत सामावलेल्या आहेत अशा पायॉनांचे आणि भारी मेसॉनच्या (K-मेसॉनच्या) क्षयक्रियेत दुय्यम कण म्हणून उद्‌भवणारे इलेक्ट्रॉन यांचे अस्तित्व प्रथमच दाखविता आले. त्यांच्या कार्यामुळे विचित्र कणांच्या गुणधर्माचे (विशेषतः K - मेसॉनांच्या Kπ2, Kμ3 व Ke3 या क्षयक्रियांचे) स्पष्टीकरण देणे शक्य झाले. त्यांनी अणुकेंद्रीय पायस तंत्राबाबत केलेल्या संशोधनामुळे हे तंत्र १९५४ पर्यंत १५ लि. इतका प्रचंड स्तरयुक्त पायसाच्या राशीचा उपयोग करण्याइतके विकसित झाले. भारतात परतल्यावर त्यांनी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये अतिशय उंचीवरील (सु. ३,३०० मी.) बलून उड्डाणा चे तंत्र विकसित केले आणि त्याच्या साहाय्याने चुंबकीय विषयवृत्ताच्या नजीक प्राथमिक विश्वकिरणांचा अभ्यास कार्यक्रम प्रस्थापित केला. बलून उडविणे, त्याचे मार्गनिरीक्षण करणे, पुनर्प्राप्ती करणे व लागणारी उपकरण सामग्री तयार करणे या सर्व गोष्टींचा या कार्यक्रमात समावेश होतो. १९६० सालापासून मेनन यांनी कोलारच्या सोन्याच्या खाणीत अतिशय खोल जागी म्यूऑन, न्यू ट्रिनो, दुर्बल आंतरक्रिया व इतर संबंधित आविष्कार यांविषयी अभ्यास करण्यासाठी प्रयोगांची उभारणी केलेली आहे. सध्या यांमध्ये प्रोटॉनाचे आयुर्मान (१०३० - १०३२ वर्षे) मोजण्याची योजना आहे याकरिता १५० टन वजनाचा अभिज्ञातक तयार करण्यात आला आहे.

मेनन यांना त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ रॉयल कमिशन फॉर द एक्झिबिशन ऑफ १८५१ याचा वरिष्ठ पुरस्कार (१९५३–५५), शांतिस्वरुप भटनागर पुरस्कार (१९६०), रॉयल एशियाटिक सोसायटीचे दुर्गाप्रसाद खेतान स्मृती पदक (१९७८), जवाहरलाल नेहरु विज्ञान पुरस्कार (१९८३), सी. व्ही. रामन संशोधन प्राध्यापक पुरस्कार (१९८५), तसेच पद्मश्री (१९६१) व पद्मभूषण (१९६८) हे सन्मान आणि जोधपूर, दिल्ली, अलाहाबाद, जादवपूर, सरदार पटेलव बनारस या विद्यापीठांच्या सन्मानीय पदव्या मिळालेल्या आहेत. ते इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (अध्यक्ष १९७४–७६), इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी (अध्यक्ष १९८१), महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, महाराष्ट्र ॲसोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स, रॉयल सोसायटी (लंडन), रशियाची ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्टस् ॲन्ड सायन्सेस वगैरे अनेक वैज्ञानिक संस्थांचे सदस्य आहेत. यांखेरीज भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. बंगलोर; भारत सरकारचा अवकाश आयोग; संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांची विज्ञान व तंत्रविद्या अनुप्रयोग सल्लागार समिती (१९७२–७९, दोन वर्षे अध्यक्ष); इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इन्स्टिट्यूट्‌स  फॉर ॲडव्हान्सड स्टडी, स्टॉकहो म; कॉस्मिक रे कमिशन ऑफ इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर ॲन्ड ॲप्लाइड फिजिक्स (१९६३–६९, सचिव १९६९–७२, अध्यक्ष १९७२–७५) इ. अनेक सरकारी, खाजगी, आंतरराष्ट्रीय व भारतीय संस्थांचे आणि आयोगांचे सदस्य, सल्लागारवा संचालक या नात्याने त्यांनी कामे केली आहेत वा अद्यापही करीत आहेत. विश्वकिरण व मूलकण भौतिकी या विषयांवरील त्यांचे ८१ शास्त्रीय निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग 9 *चंद्रशेखर वेंकट रामन*


📱आम्ही तंत्रस्नेही शिक्षक
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================
🔎 *माहिती शास्त्रज्ञांची भाग ९*

    *वार - मंगळवार दि.२५/०२/२०२०*

💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

         *चंद्रशेखर वेंकट रामन*

*जन्म - नोव्हेंबर ७, १८८८*

चन्द्रशेखर वेंकट रामन् (नोव्हेंबर ७, १८८८-नोव्हेंबर २१, १९७०) हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते.
सी.व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन्‌हे काही काळ बंगलोरातही होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले.रमणचे ६ मे १९०७ रोजी लोकासुंदरी अम्मल (१८९२-१९८०) बरोबर लग्न झाले होते.त्यांना चंद्रशेखर आणि रेडिओ-खगोलशास्त्रज्ञ राधाकृष्णन हे दोन पुत्र होते.रमण हे सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांचे काका होते,ज्यांना पुढे १९३१ मध्ये चंद्रशेखर मर्यादेच्या शोधासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार (१९८३) जिंकला आणि तारकीय उत्क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या अणू प्रतिक्रियेवर त्यांनी केलेल्या त्यानंतरच्या कार्यासाठी.

आयुष्यभर,रमणने दगड, खनिज पदार्थांचे विस्तृत वैयक्तिक संग्रह विकसित केले आणि मनोरंजक प्रकाश-विखुरलेल्या गुणधर्मांसह साहित्य,जे त्याने आपल्या जगातून प्राप्त केले आहे आणि भेट म्हणून.नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी तो अनेकदा लहान हाताळण्या एवढा स्पेक्ट्रोस्कोप घेऊन जात असे.

*संशोधन*
त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) या शोधासाठी ते ओळखले जातात. १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन यांना मिळाले होते.

*सन्मान आणि पुरस्कार*
चंद्रशेखर वेंकटरामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकाला प्रसिद्धीसाठी पाठवला होता.

रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून त्यांची निवड झाली त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात (१९२४) आणि किताबधारी व्यक्ती म्हणून १९२९ मध्ये.
1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक त्याने जिंकले.
1941 मध्ये त्याला फ्रँकलिन पदक देण्यात आले.
१९५४ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1957 मध्ये त्यांना लेनिन शांतता पुरस्कार देण्यात आला.1998 मध्ये, अमेरिकन केमिकल सोसायटी आणि इंडियन असोसिएशन फॉर द कल्टीवेशन ऑफ सायन्स यांनी रामनचा शोध आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक केमिकल लँडमार्क म्हणून ओळखला.
सर सी.व्ही रामन यांच्या नावाने रँचो (रिसर्चर्स ॲन्ड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन) नावाची पुण्याची संस्था इ.स. २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबरमध्ये ’सर सी.व्ही. रामन पुरस्कार’ देत असते. २०१५ सालच्या पुरस्काराचे मानकरी :
1. आदित्य आशुतोष जोशी (वैद्यकीय तंत्रज्ञान)

2. ध्रुवीन व्यास

3. गोपाळ गाढवी

४. प्राची दुबळे (आदिवासी संगीत)
५. सुधीर पालीवाला (कचरा व्यवस्थापन)
६. रमेश बोतालजी (सांडपाणी व्यवस्थापन)

मृत्यू

ऑक्टोबर १९७० च्या शेवटी,रमण त्यांच्या प्रयोगशाळेत कोसळले;त्यांच्या हृदयातील झडप वाटेने निघाले होते. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आणि डॉक्टरांनी त्यांना चार दिवस जगण्यासाठी मुदत दिली.ते वाचले आणि काही दिवसांनी त्यांनी रुग्णालयात राहण्यास नकार दिला कारण त्यांनी त्यांच्या अनुयायांनी वेढलेल्या त्यांच्या संस्थेच्या बागेमध्ये मरणे पसंत केले.

रमणच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी,त्यांनी आपल्या एका माजी विद्यार्थ्यास सांगितले,"अकादमीच्या नियतकालिकांना मरण येऊ देऊ नका,ते देशात विज्ञानाच्या गुणवत्तेचे संवेदनशील संकेतक आहेत . "ती संध्याकाळ, रमण यांनी आपल्या संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाशी भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर संस्थेच्या व्यवस्थापनासंबंधीकार्यवाही बद्दल त्यांच्याशी चर्चा केली.२१ नोव्हेंबर १९७०रोजी रमनचा दुसर्‍या दिवशी पहाटे नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग १० 💥उडुपी रामचंद्र राव💥


📱आम्ही तंत्रस्नेही शिक्षक
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================

🔎 *माहिती भारतीय शास्त्रज्ञांची भाग १०*

   *वार -मंगळवार  दि.३/०२/२०२०*
💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

*💥उडुपी रामचंद्र राव💥*

*भारतीय खगोलशास्त्रज्ञ*

*जन्मदिन - १० मार्च १९३२*

उडुपी रामचंद्र राव तथा यू.आर. राव हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ होते.

यू.आर. राव यांचा जन्म कर्नाटकातील दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील अदमारू या खेड्यात झाला. म्हैसूरमधील शिक्षणानंतर त्यांनी मद्रासला विज्ञानात पदवी, बनारस विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी व गुजरात विद्यापीठातून पीएच.डी. असे शिक्षण घेतले. नंतर ते अवकाशयानांच्या अभ्यासासाठी अमेरिकेला गेले.

*कारकीर्द*

अमेरिकेतील एमआयटी संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर यू.आर राव डलास येथील टेक्सास विद्यापीठात प्राध्यापक झाले. १९६६मध्ये भारतात परत येऊन अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीत ते संशोधन करू लागले. तेथे डॉ. विक्रम साराभाई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. देशाने पहिला आर्यभट्ट हा उपग्रह सोडला तेव्हापासून त्यांची अवकाश संशोधनातील कारकीर्द सुरू झाली.

*आर्यभट्ट*

पहिला उपग्रह सोडण्याचा प्रस्ताव त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींपुढे मांडला गेला, तेव्हा त्यांनी डॉ. राव यांना विचारले, उपग्रहाला पैसे किती लागतील, त्यावर राव यांनी तीन कोटी सांगितले. इंदिरा गांधींनी लगेच होकार दिला. त्या वेळी मनमोहन सिंग नुकतेच अर्थसचिव झाले होते. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत जो पहिला प्रकल्प मंजूर केला तो आर्यभट्ट उपग्रहाचा.

*अन्य उपग्रह*

यू.आर. राव यांनी १९८४ ते १९९४ या काळात भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे नेतृत्व केले. दहा वर्षे ते अवकाश खात्याचे सचिव व इस्रोचे अध्यक्ष होते. ‘आर्यभट्ट’नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भास्कर, अ‍ॅपल, रोहिणी, इन्सॅट आदी श्रेणींचे किमान वीस उपग्रह तयार झाले.

*मंगळाची मोहीम*

भारताने ४५० कोटी रुपयांतील परवडणारी मंगळ मोहीम राबवली व फत्तेही केली. त्याच्या पडद्यामागचे सूत्रधार डॉ. रावच होते. या मंगळ मोहिमेची घोषणा मनमोहन सिंग यांनी केली तेव्हा सिंग पंतप्रधान होते.

*पुरस्कार आणि सन्मान*

वॉशिंग्टन येथील ‘सॅटेलाइट हॉल ऑफ फेम ऑफ द सोसायटी ऑफ सॅटेलाइट प्रोफेशनल्स इंटरनॅशनल’ या संस्थेत समावेश झालेले यू.आर. राव हे पहिले भारतीय आहेत. (२०१३ मध्ये)
इंटरनॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅस्ट्रॉनॉटिक्सचा थिओडोर व्हान करमान पुरस्कार
पद्मविभूषण
युरी गागारिन पुरस्कार, वगैरे.
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग ११ 💥🌸आर्यभट्ट🌸💥



*📱आम्ही तंत्रस्नेही शिक्षक*
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================
🔎 *माहिती भारतीय शास्त्रज्ञांची भाग ११*

  *वार - मंगळवार दि.९/०३/२०२०*
💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

      *💥🌸आर्यभट्ट🌸💥*

                 आर्यभट्ट यांचे मुळ गाव बिहारमधील कुसुमनगर हे आहे ,त्यांनी प्राचीन ज्योतिष ग्रथांचे संशोधन केले आहे तसेच स्वतः अनुभव घेऊन आर्यभट्टीय या ग्रथांची रचना केली गणितशास्त्रात आणि ज्योतिषशस्त्रात हा ग्रंथ अतिशय महत्वाचा समजला जातो गीतिकापडातील श्लोकांची संख्या १३ आहे यामध्ये आकाशाचा विस्तार पृथ्वी ,चंद्र ,सूर्य ,आणि ग्रह यांची अंतरे मोजण्याची लहान मोठी मापे या तेरा श्लोकांत दिली आहे आर्यभट हे वेध घेण्यात प्रवीण होते पृथ्वी स्वतः भोवती फिरते , हे निछितपणे सांगणारे आर्यभट हे पहिलेच शास्त्र असावेत आज रूढ़ असलेले अनेक सिद्धांत त्यांनी इ.स. च्या पाचव्या शतकात सर्वप्रथम सांगितले होते त्यांच्या ग्रंथाचा प्रचार व प्रसार दक्षिण भारतात झाला १६-१७ शतका पर्यंत दक्षिण भारतात त्याचे अध्ययन आणि अध्यापन सुरु होते आजही दक्षिणेतल्या वैशनव पंथात आर्यभटाना फार मान आहे १९ एप्रिल १९७५ या दिवशी भारताने आपला पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडला त्या उपग्रहला आर्यभटांचे नाव देऊन भारताने प्राचीन संशोधकाचा गौरव केलेला आहे

अमावस्येला सूर्यग्रहण व पौर्णिमेस चंद्रग्रहण यांचा संबंध चंद्र व पृथ्वी यांच्या सावल्यांशी आहे, हे त्यांना माहीत होते. तसे त्यांनीनोंदवून ठेवले आहे. पहिला आर्यभट्ट याने सूत्रांचा उपयोग खगोलशास्र विषयक ग्रंथांत मोठ्या प्रमाणावर केला. अशा ग्रंथांत आकडेमोड द्यावी लागते परंतु मजकूर तर मुख्यत्वे काव्यमय व यमकात असतो. मग संख्या पद्यात बसवण्यासाठी त्या अक्षराने निर्दिष्ट करायच्या व ती अक्षरे वृत्तात बसवून श्लोकात लिहावयाची असा मार्ग आर्यभट्टाने अवलंबला. त्यामुळे अक्षरसंख्या कमी होते, शिवाय वृत्तबद्ध लिखाण होते. त्यावेळी लेखनाची साधने उपलब्ध नसल्याने त्या संख्या अशा प्रकारे लक्षात ठेवणेही सोपे जात असे आर्यभटाने ० अंशापासून ते ९० अंशापर्यंत ३/१११ अंशाच्या फरकाने सर्व कोन घेऊन त्यांचे ज्यार्ध कसे काढावेत हे सांगितलेले आहे. तसेच पृथ्वी स्वत:भोवती एकसारखी फिरत असते, म्हणजेच तिला दैनंदिन गती आहे हे सांगणारा पहिला शास्रन होय. वर्षाचे दिवस ३६५, घटी १५, पळे ३९, विपळे १५ इतक्या सूक्ष्म भागांपर्यंत कालमापन नोंदवून ठेवले आहे. तसेच 'पाय' नावाची गणित संकल्पनेची किंमत ६३,८३२/२०,००० आहे असेही नोंदवले आहे सूर्यसिद्धान्तावर याने लिहिलेला एक टीका ग्रंथ 'सूर्य सिद्धान्त-प्रकाश ' या नावाने प्रसिद्ध आहे.

*आर्य ग्रथाचे भाग*

(१) गीतिका पाद, (२) गणितपाद,(३) कालक्रियापाद, (४) गोलपाद.

मात्र वर्तमानकाळात त्या ग्रंथाची एकही संहिता उपलब्ध नाही असे दिसून येते. अंकगणित ,बीजगणित व भूमिति या गणिताच्या शाखांचा त्याचा सखोल अभ्यास होता. आज बीजगणितावरचा उपलब्ध जुना ग्रंथ विख्यात ज्योतिर्वेत्ता आर्यभट्ट याचा आहे. व वयाच्या तेविसाव्या वर्षीच त्याने बीजगणितावरचा आणि ज्योतिषावरचा ग्रंथ लिहिला. म्हणून आर्यभट्ट यास बीजगणिताचा जनक असे मानण्यात येते.
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग 12 💥मोक्षगुंडम विश्वेश्वरैया💥


*📱आम्ही तंत्रस्नेही शिक्षक*
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================
🔎 *माहिती शास्त्रज्ञांची भाग 12*

    *वार -मंगळवार  दि.17/03/2020*
💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

*💥मोक्षगुंडम विश्वेश्वरैया💥*

*भारतीय अभियंता-नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर'*

*स्मृतिदिन - १४ एप्रिल १९६२*

        सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' ; (कन्नड भाषा|ಶ್ರೀ ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ); सप्टेंबर १५ १८६१ - एप्रिल १४ १९६२). हे एक भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूरतालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी जन्मलेले समर्थ अभियंते व नागरीक होते. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला.ब्रिटीशांनी पण त्यांना,त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो. काही ठिकाणी,विशेषतः, त्यांच्या जन्मराज्य असलेल्या कर्नाटकात,या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.

अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर,त्यांनी बॉम्बे (सध्याचे मुंबई) येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली.नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून निमंत्रण आले.त्यांनी, दख्खन क्षेत्रात पाटबंधाऱ्यांची एक अतीशय क्लिष्ट योजना राबविली. त्यांनी 'सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली' विकसीत केली व त्याचे पेटेंट घेतले जी सन १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील खडकवासलाधरणास लावण्यात आली. ही द्वारे,धरणातील साठ्याची पूरपातळी,पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आलीत.या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे,ती टिग्रा? धरण ग्वाल्हेर व कृष्णराज सागर धरण म्हैसूर येथे बसविण्यात आली. विश्वेश्वरैया यांनी हैदराबाद शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्याने त्यांना सत्कार मुर्ती झाले.विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.

सर मो. विश्वेश्वरैया यांनी,कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासुन ते उदघाटनापर्यंत सर्व कामांची देखरेख केली.या धरणाचे बांधकामाने,ते बांधल्या गेल्याच्या वेळचे,आशियातील सर्वात मोठे सरोवर निर्माण झाले. त्यांना यामुळे, 'म्हैसूर राज्याचे पिता' म्हणून ओळखले जायचे.त्यांचे म्हैसूर राज्याचे नोकरीदरम्यान,त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील म्हैसूर सोप फॅक्टरी,,किटकनाशक प्रयोगशाळा,भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्,श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट,बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी,स्टेट बँक ऑफ मैसुर,सेंचुरी क्लब,मीसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले. त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला.ते, प्रामाणीकपणा, वेळेचे नियोजन,व एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते. तिरुमला-तिरुपतीदरम्यानच्या रस्तेबांधणीतहेए त्यांनी योगदान केले.
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग 13 💥श्रीनिवास रामानुजन💥



*📱आम्ही तंत्रस्नेही शिक्षक*
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================

🔎 *माहिती शास्त्रज्ञांची भाग 13*


    *वार -मंगळवार  दि.30/03/2020*

💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

    *💥श्रीनिवास रामानुजन💥*

श्रीनिवास रामानुजन (जन्म : तिरोड-तंजावर, २२ डिसेंबर १८८७; मृत्यू : कुंभकोणम, २६ एप्रिल १९२०) भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.

*जन्म व संशोधन*
या महान गणितज्ञाने वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.

रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजनने त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले.इंग्लंडला गेल्यावर रामानुजन यांची तब्येत खराब झाली.रामानुजन यांना इंग्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा त्यांना भेटण्यासाठी जी.एच .हार्डी एका मोटारीतून गेले. त्या मोटारीचा क्रमांक होता १७२९ .हार्डीनी रामानुजन यांना ही गोष्ट सांगताना मोटारीचा क्रमांक बोरिंग होता असं सांगितले.तेव्हा तत्काळ रामानुजन यांनी 'नाही तो क्रमांक बोरिंग नव्हता, उलट तो एक खूपच चांगला नंबर आहे. ही दोन वेगवेगळ्या घनांच्या बेरजेने येणारी सगळ्यात लहान संख्या आहे.' {१२३+१३=१७२९ आणि १०३+९३=१७२९). तेव्हापासून १७२९या संख्येला हार्डी -रामानुजन संख्या म्हटले जात . १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.

रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी केली जाते. गणिताच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे रामानुजन फाईन आर्ट्‌समध्ये नापास झाले होते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. त्याकाळी कागदाची किंमत जास्त असल्याने रामानुजन पाटीवर गणित सोडवायचे. काही काळानंतर त्यांनी वहीवर गणित सोडवण्यास सुरुवात केली.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या तीन वह्या समोर आल्या. एका वहीमध्ये ३५१ पाने होती. त्यांत १६ धडे सहज वाचता येतील व समजतील असे होते. मात्र काही मजकूर विस्कळीत,अस्पष्ट होता. दुसऱ्या वहीमध्ये २५६ पाने होती. त्यातील २१ स्पष्ट होती, तर१०० पानांवरील मजकूर समजण्यासारखा नव्हता .तिसऱ्या वहीमध्ये ३३ पाने अव्यवस्थित होती .

*मृत्यू*

शारंगपाणीजवळच्या रस्त्यावर, कुंभकोणम येथे रामानुजनच्या घरी
१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरुणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी – एप्रिल २७, १९२० रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण गणितविश्वाचे नुकसान झाले.
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग -14 *💥 डॉ. शंकर आबाजी भिसे💥


📱आम्ही तंत्रस्नेही शिक्षक*
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================
🔎 *माहिती शास्त्रज्ञांची भाग 14*

    *वार - मंगळवार दि.7/04/2020*

💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛
*💥भारताचे एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे💥*
(२९ एप्रिल १८६७ – *७ एप्रिल* १९३५)

             दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावणारे, चाळीसहून अधिक शोधांचे एकस्व संपादन करणारे आणि शतकापूर्वी भारतीयांच्या नावानं नाक मुरडणाऱ्या अमेरिकेन लोकांमध्येच मानाचं स्थान मिळवणार्‍या डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा २९ एप्रिल १८६७ हा जन्मदिन. भारताचे एडिसन म्हणून ओळखल्या जाणार्‍या या महान शास्त्रज्ञाचा जन्म मुंबईमध्ये एका मॅजिस्ट्रेटच्या घरात झाला. 'आयुष्यात भाकरीची भ्रांत सुटायची असेल तर त्यासाठी सरकारी नोकरी हा एक चांगला पर्याय आहे,'असा विचार असलेल्या कुटुंबात जन्माला आलेला हा शंकर पुढे महान शास्त्रज्ञ होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण शाळेत असताना एकदा त्यांच्या वाचनात युरोपीयन शास्त्रज्ञांनी भारतीय शास्त्रज्ञांबद्दल केलेलं विधान आलं. त्यात युरोपीय शास्त्रज्ञांनी भारतीय शास्त्रज्ञांवर ताशेरे ओढले होते. ''संशोधन करून एखादं नवं यंत्र तयार करण्याचं तंत्र भारतीय शास्त्रज्ञांकडे नाही. फार तर ते यंत्र चालवू शकतील,फारच झालं तर त्या यंत्राची नक्कल करतील. यापलीकडे भारतीय शास्त्रज्ञांची झेप नाही.'' असा उल्लेख त्यात होता. भारतीय शास्त्रज्ञांबद्दल युरोपीय शास्त्रज्ञांनी केलेलं बेलगाम विधान ऐकून धुळ्याच्या शाळेत शिकत असलेल्या त्या चिमुरडय़ा मुलाने युरोपीयांचं हे विधान त्यांच्याच धरतीवर जाऊन त्यांनाच पुसायला लावीन, असा निर्धार केला.

लहानपणी एकदा भिसे साखर आणायला वाण्याकडे गेले. त्यावेळी वाण्याने लबाडी करून कमी वजनाची साखर दिल्याचं त्यांच्या लक्षात आलं. याबाबत त्यांनी व्यापाऱ्याला विचारलं असता, ''माझ्या काटय़ावर विश्वास नसेल तर आपोआप वजन करणारं यंत्र शोधून काढ.'' असं त्या वाण्याने त्यांना खोचकपणे म्हटलं. त्यावेळी 'एक दिवस तुला असे यंत्र देईन,' असं ठामपणे छोटे शंकरराव त्याला म्हणाले.त्यावेळी आपल्या मुलाची यंत्रांची ही आवड पाहून वडिलांना आनंद वाटला होता. पण सरकारी नोकरीच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्यांनी शंकररावांनाही ३० रुपये महिना पगारावर कारकुनाच्या नोकरीवर ठेवलं.याच सुमाराला म्हणजे साधारण १८९७ मध्ये 'इन्व्हेन्टर रिव्ह्यू अँड सायंटिफिक रेकॉर्ड' या मासिकाने 'स्वयंमापन यंत्र' करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिऱ्हाईकाला हवं तेवढं वजन करून देणारं यंत्र. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. तयार केलेले हे यंत्र त्यांनी त्या वाण्याला आवर्जून दाखवले.यानंतर १९०० मध्ये भिसे यांचं लक्ष मुद्रण व्यवसायातील यंत्रसामग्रीकडे लागलं. त्या काळी प्रचलित असलेल्या लायनो, मोनो इत्यादी यंत्रांच्या रचना आणि कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून त्यांनी 'भिसोटाइप' या यंत्राचा शोध लावला व त्याचं प्रथम इंग्लंडमध्ये आणि नंतर अमेरिका, जर्मनी, फ्रान्स या देशांमध्ये एकस्व (पेटंट) घेतले. या यंत्राच्या उत्पादनासाठी सर रतनजी टाटा यांचे सहकार्य मिळवून'द टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट' ही कंपनी लंडन येथे १९१० मध्ये स्थापन केली; पण १९१५ मध्ये ती बंद पडली. त्याच सुमारास दर मिनिटाला साधारण बाराशे अक्षरं छापणारं 'गुणित मातृका' हे यंत्र तयार केलं आणि १९१६ मध्ये ते विक्रीला आणलं.

१९१६ साली भिसे अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी 'युनिव्हर्सल टाइप मशीन' या कंपनीच्या विनंतीनुसार 'आयडियल टाइप कास्टर' हे यंत्र शोधून काढले आणि अमेरिकेत त्याचं एकस्व घेतलं. या यंत्राच्या उत्पादनासाठी त्यांनी 'भिसे आयडियल टाइप कास्टर कॉर्पोरेशन' ही कंपनी स्थापन करून १९२१ मध्ये पहिलं यंत्र विक्रीला आणलं. याशिवाय मुद्रण व्यवसायातली आणखी अशी अनेक यंत्रे त्यांनी तयार केली. १९१०मध्ये ते आजारी असताना त्यांच्यावर करण्यात आलेल्या औषधी उपचारातलं एक भारतीय औषध फार गुणकारी ठरलं. या औषधाचं रासायनिक पृथ:करण त्यांनी करवून घेतलं आणि त्याचा गुणकारीपणा आयोडिनामुळे आहे, हे जाणलं. १९१४ साली भिसेंनी स्वतच एक नवीन औषध तयार करून त्याला 'बेसलीन' हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरलं. पहिल्या महायुद्धात या औषधाचा अमेरिकन लष्कराने मोठय़ा प्रमाणावर वापर केला. या औषधावर आणखी संशोधन करून आयोडीन घटक असलेलं, पण पोटात घेता येईल असं एक औषध त्यानंतर भिसेंनी तयार केलं आणि त्याच्या उत्पादनासाठी १९२३ मध्ये न्यूयॉर्क इथे कंपनी स्थापन केली. १९२७ मध्ये या औषधाचं उत्पादन आणि वितरणाचे हक्क त्यांनी शेफलीन कंपनीला विकले. या औषधास त्यांनी 'आटोमिडीन' (आण्विय आयोडीन) हे नाव दिलं. हे औषध बऱ्याच रोगांवर उपयुक्त ठरलं.१९१७ साली त्यांनी कपडे धुण्यासाठी वापरता येईल असं एक संयुग तयार केलं. त्याला 'शेला' हे नाव देऊन त्याच्या निर्मितीचे हक्क एका इंग्लिश कंपनीला विकले.भिसे यांनी विद्युत शास्त्रातही बरंच प्रयोगात्मक संशोधन केलं. त्यांनी तयार केलेल्या 'स्वयंचलित आगामी स्थानदर्शक' यंत्रामुळे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आपोआप कळणार होतं. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरायला नकार दिला. सध्या चच्रेत असलेल्या सौरऊर्जेवर चालू शकतील अशा मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांचीच!समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा, वातावरणातले विविध वायू वेगळे करणारं यंत्र, जाहिराती दाखविणारं यंत्र, स्वयंचलित मालवाहक, स्वयंचलित वजन वितरण आणि नोंदणी करणारं यंत्र, एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी विजेच्या सहाय्याने छायाचित्रे पाठविणारं यंत्र अशा अनेक यंत्रांचे शोध त्यांनी लावले.१९२७ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाने त्यांना डी. एस. सी. ही पदवी दिली.

२९ एप्रिल १९२७ रोजी- भिसे यांच्या ६० व्या वाढदिवशी अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत 'अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ' म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. खरं तर १९०८ सालीच युरोपीय व अमेरिकन नियतकालिकांनी भिसे यांना 'इंडियन एडिसन' हे बिरुद बहाल केलं होतं. शिकागो विद्यापीठाने त्यांना सायको-अ‍ॅनालिसिसमधील डॉक्टरेट बहाल केली, तर माऊंट व्हेरनॉनच्या चेंबर ऑफ कॉमर्सने भिसे यांना मानद सदस्यत्व दिले. मुद्रणशास्त्रातील भिसे यांच्या संशोधनाचा अंतर्भाव अमेरिकन पाठय़पुस्तकांत झाला. १९०० साली मद्रास येथे भरलेल्या इंडियन इंडस्ट्रियल काँग्रसचे ते अध्यक्ष होते.अमेरिकेतल्या जागतिक दर्जाच्या 'हुज हू' या संदर्भग्रंथात समावेश झालेले भिसे हे पहिलेच भारतीय. 'भारताचे एडिसन' असे म्हणून त्यांना गौरवण्यात आलं. त्यावेळी २३ डिसेंबर १९३० रोजी भिसे यांनी आपले आदर्श असलेल्या थॉमस अल्वा एडिसन यांची त्यांच्या प्रयोगशाळेत भेट घेतली.
════════════════

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

💥🌸दिनविशेष🌸💥* ७ एप्रिल


*💥🌸दिनविशेष🌸💥*
              *७ एप्रिल*

*जागतिक आरोग्य दिवस*

जागतिक आरोग्य संघटनेचा ७ एप्रिल हा वर्धापन दिवस.
तो दरवर्षी ‘जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा होतो. 

आपला देश तरुणांचा देश आहे. ५० टक्के लोकसंख्या २५ वर्षांखाली आहे. १० वर्षांखालील मुलांची संख्या १९ टक्के आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून शासकीय यंत्रणा, युनिसेफ, अनेक सेवाभावी संस्था कुपोषणाविरुद्ध कार्यरत आहेत आणि तरीही आज जगातील सर्वाधिक कुपोषित मुले आपल्या देशात आहेत. गेल्या दशकात नवजात बालकांचे आणि पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण बरेच कमी झाले आहे; परंतु पाच वर्षांखालील मुलांमध्ये ३७ टक्के कुपोषित आहेत. ३९ टक्के मुलांची उंची वयाच्या मानाने कमी आहे, तर २१ टक्के मुलांचे वजन उंचीच्या मानाने कमी आहे. आठ टक्के मुलांची अवस्था खूप बिकट आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या मते जन्माच्या वेळी बाळाचे वजन जर २.५ किलोपेक्षा कमी असेल तर त्याच्या मृत्यूची शक्यता २० पटीने वाढते. आपल्या देशात १९ टक्के नवजात बालकांचे वजन २.५ किलोपेक्षा कमी असते. याचे कारण कुपोषित/अल्पवयीन माता. देशातील ५८ टक्के मुलांना पंडुरोग (हिमोग्लोबिनची कमतरता) आहे. प्रौढांमध्येसुद्धा कुपोषणाचे प्रमाण काळजी करण्यासारखेच आहे. येथे २० टक्के पुरुष आणि २३ टक्के स्त्रिया अन्नाच्या कमतरतेमुळे कुपोषित आहेत, तर २१ टक्के स्त्रिया आणि १९ टक्के पुरुष चुकीच्या आहारामुळे लठ्ठ आहेत.. म्हणजे कुपोषितच आहेत. मधुमेह, अतिरक्तदाब, हृदयविकार, कर्करोग आणि फुफ्फुसाचे विकार यांच्या वाढत्या प्रमाणाला थांबविणे अत्यावश्यक आहे. हे सगळे रोग तरुणपणातच शरीरात आरक्षण करून ठेवतात.

काय करता येईल?

काही दिवसांपूर्वी कुठे तरी एक गोष्ट वाचली होती. इटलीच्या व्हेनिस गावातील एका हॉटेलमध्ये लेखकाने एक वेगळाच प्रकार बघितला. त्याच्या शेजारच्या टेबलावर बसलेल्या माणसाने दोन कॉफीची ऑर्डर दिली आणि वेटरला ‘त्यातली एक भिंतीसाठी’ असे सांगितले. वेटरने कॉफीचा एक कप त्याच्या टेबलावर ठेवला आणि त्याला दोन कॉफीचे बिल दिले आणि शेजारच्या भिंतीवर एक चिठ्ठी चिकटवली. हॉटेलमध्ये आलेल्या इतर ग्राहकांपैकी काहींनी एक जादा कॉफीची ऑर्डर दिली आणि वेटरने प्रत्येक वेळी एक चिठ्ठी भिंतीवरती चिकटवली. काही दिवसांनी लेखक पुन्हा त्याच कॉफी शॉपमध्ये गेला, तेव्हा त्याने एका माणसाला कॉफी शॉपमध्ये प्रवेश करताना पाहिले. त्या फाटक्या माणसाने एक कॉफीची ऑर्डर दिली आणि ‘भिंतीवरची’ अशी पुष्टी जोडली. वेटरने अदबीने त्याला कॉफी आणून दिली. कॉफी पिऊन तो माणूस शांतपणे पैसे न देता निघून गेला. वेटरने भिंतीवरची एक चिठ्ठी कमी केली. ‘आहे रे’ गटाने ‘नाही रे’ गटासाठी राबवलेली अप्रतिम अशी ही योजना – ज्यात देणाऱ्याला शेखी मिरवता येत नाही आणि घेणाऱ्याला कमीपणाही घ्यावा लागत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेटर दोन्ही गटांतल्या व्यक्तींना सारखीच वागणूक देतो.

आपल्या देशाला भेडसावणाऱ्या कुपोषणाच्या समस्येवर शासनाच्या मदतीशिवाय आपल्याला काही करता येईल का? आपल्या देशातल्या सर्व हॉटेल्समध्ये अशी ‘भिंत’ असायला पाहिजे. खिशात पैसे नसलेल्या माणसाला तेथे मानाने जेवता यायला पाहिजे. त्याची कुणीही फुकटय़ा म्हणून हेटाळणी करायला नको. आपल्या देशबांधवांकडे पोटभर खायला पुरेसा पैसा नाही ही गोष्ट आपल्याला अस्वस्थ करणारी असावी. निराधार लहान मुलांना पोटाची खळगी भरण्याकरिता हात पसरावे लागू नयेत, हे आपण करू शकतो. सगळ्यांनी युद्धपातळीवर कुपोषणाविरुद्ध आघाडी उघडायला पाहिजे. सरकारीपेक्षा असरकारी काम व्हायला पाहिजे. शासनानेसुद्धा रुग्णालयांऐवजी खानावळी उघडायला पाहिजेत, जेथे कुठल्याही भुकेल्या व्यक्तीला जेवण मिळेल. आपल्या देशात असंख्य मंदिरे आहेत, तेथे दिवसभर जेवणरूपी प्रसाद उपलब्ध असावा.

शाळेतील माध्यान्ह आहार योजना १५ ऑगस्ट १९९५ साली सुरू झाली, तरीही शाळेत सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी घेरी येऊन पडणारी मुले प्रत्येक शाळेत आहेत. आजही २६ टक्के शाळकरी मुले उपाशी असतात. उपाशी पोटी शिकवलेल्या गोष्टींचे आकलन कमी होते. आमच्या देशाचा ‘जागतिक भूक निर्देशांक’ चांगला नाही. ग्लोबल हंगर इंडेक्सच्या नकाशावर आपल्या शेजारी देशाचा चीनचा हिरवागार नकाशा त्यांच्याकडे भुकेल्यांची संख्या खूप कमी आहे हे दर्शवितो तेव्हा माझ्या मनात चीनच्या प्रगतीचे हेच कारण असावे असा विचार सहज डोकावून जातो. मुलांना मिळणारा माध्यान्ह आहार स्वादिष्ट असावा म्हणजे सधन आणि निर्धन दोन्ही मुलांना तो आवडावा. सर्व आमदारांनी माध्यान्ह आहार स्वत: चाखून प्रमाणित करावा. मुलांच्या आहारावर होणारा खर्च भविष्य निर्वाह निधी समजावा. मुलांना आहार सकाळी मिळावा, कारण त्यांना तेव्हाच त्याची गरज असते.

सार्वत्रिक आरोग्यछत्र योजनेत या अन्नछत्राचा समावेश असणे गरजेचे आहे, कारण हॉस्पिटल आणि औषधे आजारासाठी उपयोगाचे, आरोग्यासाठी नव्हे. त्यामुळे रोगप्रतिबंधाच्या कार्यक्रमाला उजवे माप मिळाले पाहिजे. त्याला आरोग्य संवर्धनाच्या कामात मानाचे स्थान मिळावे.

*💥🌸दिनविशेष🌸 * ६ एप्रिल



*💥🌸दिनविशेष🌸💥*                                                           *६ एप्रिल १९७३*

*गुरू, शनी, सौर वारे आणि वैश्विक किरणांचा अभ्यास करणारे पायोनियर-११ अवकाशात सोडले.*

पायोनियर ११ तथा पायोनियर जी हे नासाने प्रक्षेपित केलेले अंतरिक्षयान आहे. हे यान ६ एप्रिल, इ.स. १९७३रोजी सोडण्यात आले होते. २५९ किग्रॅ वजनाचे हे यान गुरू, शनि आणि लघुग्रहांचा पट्टा पार करत सूर्यमालेच्यासीमेपलीकडे गेले आहे. कमी ऊर्जेमुळे ३० नोव्हेंबर १९९५ नंतर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला.