शुक्रवार, २० मार्च, २०२०

💥🌸दिनविशेष🌸💥 20 march

💥🌸दिनविशेष🌸💥

         सर आयझॅक न्यूटन

*एक थोर इंग्रज भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ*

*स्मृतिदिन - मार्च २०, इ.स. १७२७*

सर आयझॅक न्यूटन (एफ.आर.एस्.) (४ जानेवारी १६४३ - २० मार्च १७२७) हे एक थोर इंग्रज भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांनी वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडून केप्लर चे नियम सिद्ध केले.
गतिकीमध्ये त्यांनी न्यूटनचे तीन गतीचे नियम मांडले. त्यांनी परावर्ती दुर्बीण बनवली, व प्रकाशाचे मूलभूत रंगात विघटन करून दाखविले.
गणितामध्ये त्यांनी ग्यॉटफ्रीड लिब्नित्झ याच्याबरोबर कलन ही गणितशाखा विकसीत केली.
बालपण
सर आयझॅक न्यूटन जानेवारी ४, इ.स. १६४३ रोजी इंग्लंडमधील लिंकनशायर काउंटीच्या वूलस्थॉर्प या गावात जन्मले. आयझॅक न्यूटनचे वडील वारल्यानंतर त्यांच्या आईने दुसरे लग्न केल्यामुळे आयझॅक त्याच्या आजीजवळ राहिले. वयाच्या १२ वर्षांपर्यंत आयझॅक जेमतेम दोन वर्षे शाळेत होते. त्यांना गणिताची आवड उत्पन्न होऊ लागली होती. तेवढ्यात त्यांचे सावत्र वडील स्मिथ वारले. आपल्या नूतन बाळाला घेऊन आयझॅकची आई हाना लिंकनशायरला परत आली. तिने आयझॅकला शाळेतून काढून शेताच्या कामाला लावले. एक दिवस दुपारी आयझॅक दमूनभागून झाडाच्या सावलीत बसले होते. मंद वारा वाहत होता. आयझॅकची तीक्ष्ण बुद्धी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आयझॅकना वाटले, आपण वार्‍याचा वेग मोजावा. त्यांच्याजवळ वेग मोजायला काही साधन नव्हते. आयझॅकने एकदा वार्‍याच्या दिशेने उडी मारली. जिथे उडी पडली तिथे एक दगड ठेवला. मग जरा वेळाने वार्‍याच्या उलट दिशेने उडी मारली व त्या उडीच्या जागी दगड ठेवला. या दोन दगडांतील अंतर एका दोरीच्या साह्याने आयझॅक मोजत असताना त्यांचे मामा, विल्यम आयस्कॉफ शेतावर आले. विल्यम आयस्कॉफ केंब्रीजमध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये व्यवस्थापक होते. त्यांनी विचारले, "हे तू काय करतोस?"
आयझॅक म्हणाले, "मी वार्‍याचा वेग मोजतो आहे". या उत्तराने मामा अवाक झाले. त्यांना आयझॅकची तीव्र असामान्य बुद्धी कळली. घरी जाऊन त्यांनी हानाला आयझॅकला शाळेत घालायला सांगितले. १६६१ मध्ये आयझॅक ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांचा गुरुत्वाकर्षणाचा शोध सर्वांनाच माहीत आहे. १६६८ मध्ये त्यांनी ६ इंच लांब, एक इंच रुंद दुर्बीण शोधून काढली. आजही लंडन म्युझियममध्ये ही दुर्बीण आहे. मार्च ३१, इ.स. १७२७ ला त्यांचा मृत्यू झाला.
न्यूटनचे गती-नियम
प्रथम नियम
कोणतीही स्थिर अथवा स्थिर गतीतील वस्तु बाह्य बला शिवाय आपल्याच मूळ स्थितीत राहते.
द्वितीय नियम
कोणत्याही वस्तुच्या संवेगाच्या बदलाचा दर हा त्या वस्तूवरील बलाच्या प्रमाणात असतो.
तृतीय नियम
कोणत्याही वस्तूवरील क्रिया व प्रतिक्रिया समान व विरुद्ध दिशेने असतात.

💥🌸दिनविशेष🌸💥 19march

*💥🌸दिनविशेष🌸💥*
*मारियो जे. मोलिना*

*मेक्सिकन रसायनशास्त्रज्ञ*

*जन्म: १९ मार्च १९४३*
 
मारियो जे. मोलिना (स्पॅनिश: Mario José Molina-Pasquel Henríquez; जन्म: १९ मार्च १९४३) हा एक मेक्सिकन रसायनशास्त्रज्ञ आहे. पृथ्वीच्या वातावरणामधील अंटार्क्टिकावर पडलेले मोठे छिद्र शोधुन काढण्यासाठी त्याला पॉल जे. क्रुट्झन व फ्रँक शेरवूड रोलंड ह्या शास्त्रज्ञांच्या समवेत १९९५ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. नोबेल पारितोषिक मिळवणारा तो पहिला मेक्सिकन व्यक्ती आहे.

 १९७० सालच्या आसपास ओझोनचा थर अंटार्क्टिकांवरती काही भागांत नष्ट झाला असून तेथे अतिनील किरणांचे प्राबल्य वाढले असल्याचे लक्षात आले. याचा शोध घेताना मानवनिर्मित क्लोरोफ्लुरोकार्बन (सीएफसी) च्या द्रव्याचा हा परिणाम असल्याचे लक्षात आले. हा एक तर्क आहे. हे सीएससीचे निरुपद्रवी कण जेव्हा हळूहळू ओझोनच्या थरातील ओझोनबरोबर संयोग पावतात, तेव्हा मोठ्या प्रमाणातील विघटनाला सुरुवात होते. यामुळे अतिनील किरणांचा पृथ्वीवर मारा वाढल्यास कातडीचे कर्करोग वाढतील व उष्णता वाढून बर्फ वितळून पाण्याची जागतिक पातळी वाढेल, अशी भीती व्यक्त केली गेली.
या सर्वांचा परिणाम म्हणून ओझोन वायू या दशकात चर्चेचा केंद्रबिंदुच बनला आहे. सीएफसीचा वापर सर्व एरोसोलमध्ये व शीतीकरणासाठी केला जातो. याचे उत्पादन बंद करून त्याचे पर्याय सर्वांनी वापरावेत, या स्वरूपाचा सर्व देशांनी एक करार मॉन्ट्रियल येथे केला आहे. टप्प्याटप्प्याने उत्पादन कमी करणे व पर्यायी वापर सुरू करणे हे त्यात अपेक्षित आहे.
काही शास्त्रज्ञांच्या मते ओझोनचा थराची थर नष्ट होणे यामध्ये मानव व प्राणिजातीला अणुयुद्धाएवढाच धोका उद्भवतो. काहींचे मत याला प्रतिकूल आहे. पण एक गोष्ट निर्विवाद आहे, ती म्हणजे ओझोनचा थर आहे तसाच टिकणे, हे आपल्यालाच काय, पण पृथ्वीवरच्या सर्वच सजीव सृष्टीला आवश्यक आहे.

बुधवार, १८ मार्च, २०२०

💥🌸दिनविशेष🌸💥 18 मार्च

💥🌸दिनविशेष🌸💥

रुडॉल्फ डीज़ल

*जर्मनी के प्रसिद्ध इंजीनियर*

*जन्मदिन - १८ मार्च १८५८*

रुडॉल्फ डीज़ल (सन् 1858 - 1913), जर्मनी के प्रसिद्ध इंजीनियर थे। इनकी खोजों के आधार पर ही डीजल इंजन बना।
जीवनी
रुडॉल्फ डीजल का जन्म पैरिस में हुआ था। इनके मातापिता सन् 1870 से इंग्लैंड में रहने लगे, किंतु अपेन बेटे को इन्होंने जर्मनी में ऑग्सवर्ग और म्यूनिख के कालेजों में पढ़ने भेजा। शिक्षा के पश्चात् ये कुछ काल तक पैरिस में शीतक यंत्रों के एक कारखाने के मैनेजर रहे, किंतु फिर म्यूनिख लौट गए!
म्यूनिख में इन्होंने वे अनुसंधान आरंभ किए जिनके आधार पर भविष्य में डीज़ल इंजन बना। सन् 1893 में इन्हीं अनुसंधानों से संबंधित ग्रंथ दि थ्योरी ऐंड कंस्ट्रक्शन ऑव ए रेशनल हीट मोटर नामक ग्रंथ इन्होंने लिखा। इसी वर्ष क्रुप तथा ऑग्सबर्ग के कारखानों में डीज़ल इंजनों का निर्माण आरंभ हुआ, किंतु इसको व्यावहारिक रूप देने में इन्हें चार वर्ष लगे।
सन् 1899 में इन्हीं इंजनों के बनाने का कारखाना इन्होंने ऑग्सबर्ग में खोला और अपना शेष जीवन इन इंजनों को पूर्ण रूप से उपयोगी बनाने में बिताया। फिर भी ये इनसे विशेष आर्थिक लाभ न उठा सके और न इनकी पूर्ण उपयोगिता देखने के लिये जीवित ही रहे। सितंबर, सन् 1913 की एक रात, ऐंटवर्प से हारिविच जाते हुए, जहाज से समुद्र में गिरकर ये डूब गए।

💥🌸दिनविशेष🌸💥 17 march

*💥🌸दिनविशेष🌸💥*

*आयरिन जोलिये-क्युरी*

*भौतिक विज्ञानिक*

*स्मृतिदिन - १७ मार्च १९५६*

नोबेल परोतोषिक मिळविणाऱ्या रेडीअम धातूचा शोध लावणाऱ्या प्रख्यात विज्ञानिक प्येअर व मारी क्युरी यांची मुलगी इरिन ज्योलीयो क्युरी या सुद्धा भौतिक विज्ञानिक होत्या .त्यांनी आपल्या आई वडिलांचा उज्ज्वल वारसा तेवढ्याच सामर्थ्याने चालवून आपले नाव अजरामर करून ठेवले .
इरींचा जन्म पॅरिस येथे १२/सप्टेंबर /१८९७ रोजी झाला .सॉरबोन विद्यापीठात व पॅरिस विद्यापीठात रेडीअम इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतल्यानंतर आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन केले .१९२६ साली त्या फ्रेड्रिक यांचाबरोबर विवाह झाला .फ्रेड्रिकणी किरणोत्सर्गी धातूचे विद्युत रसायन या विषयावर प्रबंध लिहून डॉक्टरेत मिळविली होती .रेडिओ ऑकतीव्ह अलीमेंत्स वर या दांपत्याचे संशोधन चालू होते .कृत्रिम किरणोत्सर्गीकंच्या सहाय्याने जीवनाच्या विविध अंगोपांचा सखोल अभ्यास करता येतो .पहिल्या महायुद्धात त्यांनी परिचारिका म्हणून काम केले होते .व सैनिकांच्या शरीरात घुसलेल्या गोळ्यांच्या जागा नक्की करण्यासाठी रेडीओलोजिक मोटारकार याचा शोध लावला .
कृत्रिम किरणोत्सर्गी(कण वा किरण बाहेर टाकणारी ) मुलदव्ये तयार करण्यात इरीनने पतीबरोबर कार्य केले .या साठी दोघांना १९३५ साली रसायनशास्त्रचे नोबेल पुरस्कार मिळाले .१९४७ मध्ये सॉरबोन विद्यापीठात प्राध्यापक व तेथील रेडीअम प्रयोगशाळेच्या संचालिका म्हणून नेमणूक झाली .बरीच वर्षे किरणोत्सर्गी हताळल्यामुळे त्यांना रक्ताचा कर्करोग होऊन १७ मार्च १९५६ रोजी इरिन यांचा मृत्यू झाला .

रविवार, १५ मार्च, २०२०

*💥🌸दिनविशेष🌸💥

*💥🌸दिनविशेष🌸💥*.  

*गेऑर्ग झिमॉन ओम*

 *जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ*

*जन्मदिन - मार्च १६, इ.स. १७८९*

गेऑर्ग झिमॉन ओम[१] (: जॉर्ज सायमन ओह्म ; जर्मन: Georg Simon Ohm) (मार्च १६, इ.स. १७८९ - जुलै ६, इ.स. १८५४) हा बव्हेरियन-जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ होता. याने शाळेत शिक्षकी पेशा करताना अलेस्सांद्रो व्होल्टा या इटालियन आविष्कारकाने बनवलेल्या विद्युतरासायनिक घटावर अधिक संशोधन करण्यास आरंभ केला. या संशोधनातून घडवलेल्या स्वनिर्मित उपकरणाद्वारे याने संवाहकाच्या दोन टोकांतील विभवांतर आणि संवाहकातून वाहणारी विद्युतधारा यांच्यामधील परस्परसंबंध सिद्ध केला. हा संबंध "ओमचा नियम" म्हणून प्रसिद्ध आहे.
ओमचा नियम
संवाहकाच्या दोन टोकांत वाहणारी विद्युतधारा, त्या दोन टोकांमधील विभवांतराच्या समानुपाती असते.
गेऑर्ग झिमॉन ओम[१] (: जॉर्ज सायमन ओह्म ; जर्मन: Georg Simon Ohm) (मार्च १६, इ.स. १७८९ - जुलै ६, इ.स. १८५४) हा बव्हेरियन-जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ होता. याने शाळेत शिक्षकी पेशा करताना अलेस्सांद्रो व्होल्टा या इटालियन आविष्कारकाने बनवलेल्या विद्युतरासायनिक घटावर अधिक संशोधन करण्यास आरंभ केला. या संशोधनातून घडवलेल्या स्वनिर्मित उपकरणाद्वारे याने संवाहकाच्या दोन टोकांतील विभवांतर आणि संवाहकातून वाहणारी विद्युतधारा यांच्यामधील परस्परसंबंध सिद्ध केला. हा संबंध "ओमचा नियम" म्हणून प्रसिद्ध आहे.
ओमचा नियम
संवाहकाच्या दोन टोकांत वाहणारी विद्युतधारा, त्या दोन टोकांमधील विभवांतराच्या समानुपाती असते.

शैक्षणिक क्रांती 16मार्च

शैक्षणिक क्रांति

दिनविशेष 15 मार्च

*💥🌸दिनविशेष🌸💥




    *व्लादीमीर हाफ्किन*

*कॉलरा रोगावर लस शोधून काढली*

*जन्मदिन - 15 मार्च 1860*

व्लादीमीर हाफ्किन (रूसी: Мордехай-Вольф Хавкин) (15 मार्च 1860 - 26 अक्टूबर 1930) रूस के यहूदी जीवाणुवैज्ञानिक थे। उन्होने पेरिस के पास्चर संस्थान में काम किया जहाँ उन्होने हैजा-रोधी टीका विकसित किया जिसको उन्होने भारत में सफलतापूर्वक परीक्षण किया। वे हैजा और बुबोनिक प्लेग और कॉलरा के विरुद्ध टिका बनाने और उसका जाँच करने वाले पहले सूक्ष्मजीववैज्ञानिक के रूप में जाने जाते हैं।