शनिवार, २५ एप्रिल, २०२०

💥🌸दिनविशेष🌸💥 25एप्रिल

*💥🌸दिनविशेष🌸💥*

         *गुलियेल्मो मार्कोनी*

*भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेता*

*जन्मदिन - एप्रिल २५, १८७४*

गुलियेल्मो मार्कोनीचा जन्म इटलीतील 'बोलोन्या' शहरात एप्रिल २५, १८७४ रोजी झाला. मार्कोनीच्या जन्माच्या आधी १८६८ मध्ये मॅक्‍सेल या शास्त्रज्ञाने विजेचा प्रवाह वातावरणात आहे, अशी कल्पना मांडली होती. या वीजप्रवाहाचे गुणधर्मही त्याने वर्णिले होते. पण बाकीच्या शास्त्रज्ञांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
मार्कोनीला लहानपणापासूनच विजेच्या प्रवाहाबाबत कुतूहल होते. हाइनरिक हर्ट्‌‌‌झचे लेखही त्याने वाचले होते. १८९५ मध्ये मार्कोनी हर्ट्‌‌झच्या संशोधनावर आपल्या वडिलांच्या बोलोन्यातील मोठ्या वाड्यात काम करू लागला. तो आपला पहिला बिनतारी संदेश एक मैल लांब पाठवू शकण्यात यशस्वी झाला. जून २, १८९४ मध्ये इंग्लंडमधील मुख्य पोस्ट ऑफिसच्या छपरावरून मार्कोनीचे पहिले प्रात्यक्षिक करण्यात आले. सरकारी अधिकारी, पोस्टातील मान्यवर त्या वेळी उपस्थित होते.
सॅल्सबरीमध्ये दुसर्‍या प्रात्यक्षिकाला वायुदल व सेनादलातील बरेच अधिकारी आले. आता दोन मैलांवरून बिनतारी संदेश दहा मैलांपर्यंत पोचू शकत होता. हळूहळू मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचे जाळे सर्वत्र पसरत गेले. १९१४ मध्ये पहिले जागतिक युद्ध पुकारले गेले. मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचा इटालियन नौदल, वायुदलास फार उपयोग झाला. जगातील सर्वांत मोठे वायरलेस स्टेशन मार्कोनीने उभारले. मार्कोनीला भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक व इतर अनेक पारितोषिके मिळाली.

दिनविशेष 24 एप्रिल

दिनविशेष
भारतीय शास्त्रज्ञ
*मोरेश्वर वासुदेव चिपळोणकर*

*स्मृतिदिन - २४ एप्रिल १९८८*

पुणे विद्यापीठाच्या स्थापनेनंतर भौतिकशास्त्र विषयात जे काही उल्लेखनीय कार्य शिक्षण व संशोधन या क्षेत्रात झाले, त्याचा पाया डॉ. मोरेश्वर वासुदेव चिपळोणकर यांनी रचला. त्यांचा जन्म अकोला, खानदेश येथे झाला. त्यांनी एम.एस्सी. पदवी बनारस विद्यापीठातून प्राप्त केल्यानंतर भौतिकशास्त्र विषयातील ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ ही पदवी १९४२ साली मिळविली. एम.एस्सी. नंतर थेट डी.एस्सी. ही पदवी मिळविणे निश्चितच प्रशंसनीय बाब आहे. त्याचबरोबर त्यांनी उत्कृष्ट प्रबंधाबद्दल मुंबई विद्यापीठाचे मूस सुवर्णपदकही मिळविले. त्यानंतर काही काळ त्यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये ‘स्कूल ऑफ रेडिओ फिजिक्स अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स’ या विभागात प्राध्यापक व संचालक म्हणून काम केले. पुढे त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ मीटिऑरॉलॉजीमध्ये प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतरचा १९५२ ते १९६९ हा काळ त्यांनी पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख या पदावर व्यतीत केला. त्यांनी केलेले संशोधनकार्य हे मुख्यत: रेडिओ फिजिक्स, नाइट एअर ब्लो, हवामानशास्त्र अभ्यास, खगोलशास्त्र आणि भारतीय संगीतातील विज्ञान इत्यादी विषयांशी निगडित होते. ढग, वीजवावटळी, विजांचा कडकडाट, जमिनीजवळील विद्युतक्षेत्र व निरनिराळ्या उंचीवरील हवेचे तापमान आणि दाब इत्यादी घटकांसंबंधीचा प्रायोगिक व तात्त्विक अभ्यास करून डॉ. चिपळोणकरांनी अनेक प्रबंध प्रसिद्ध केले आहेत. वाऱ्यापासून ऊर्जा मिळवण्याच्या उद्देशाने हिंदुस्थानच्या पश्चिम आणि दक्षिण प्रदेशावर वाहणाऱ्या वाऱ्यांचा अभ्यासही त्यांनी केलेला आहे.

‘ओझोनोस्फिअर’मधील आणि जमिनीलगतच्या थरांतीलही ओझोन वायूसंबंधीची अचूक मोजमापे हिंदुस्थानात करणारे हे पहिलेच संशोधक होत. वारिसात तोफोंच्या नैसर्गिक आविष्कारात उत्पन्न झालेल्या ध्वनिलहरींच्या साहाय्याने ओझोनोस्फिअरमधील तापमानाचा त्यांनी अचूक अंदाज केलेला आहे व त्या आविष्काराचे उगमस्थानही निश्चित केले आहे. ‘अ‍ॅटमॉस्फेरिक्स’ किंवा रेडिओमध्ये ऐकू येणारा खडखडाट यासंबंधी व त्यावरून ‘आयनोस्फिअर’संबंधीचा प्रायोगिक अभ्यास त्यांनी स्वत: व अनेक विद्यार्थ्यांच्या मदतीनेही बरीच वर्षे करून या शाखेत भर घातली आहे.

संधीप्रकाशाच्यावेळी आकाशातून येणाऱ्या तेजाचेही अचूक मोजमाप अनेक वर्षे करून ‘स्ट्रॅटोस्फिअर’मधील निरनिराळ्या उंचीवरील हवेचे तपमान व घनताही अजमावली आहेत. त्याचप्रमाणे आयनोस्फिरमधील निरनिराळ्या थरांतून रात्रीच्या वेळी येत असलेल्या अत्यंत मंद प्रकाशाचे म्हणजेच रात्रीप्रकाशाचे मोजमाप निरनिराळ्या पद्धतींनी त्यांनी स्वत: आणि विद्यार्थ्यांकरवीही अनेक वर्षे केलेले आहे.

स्फोटक ध्वनिलहरींच्या परिणामामुळे धातूंच्या अंतर्रचनेत आणि त्यांच्या गुणधर्मात जे बदल घडून येतात त्यासंबंधीही त्यांनी संशोधन केले आहे. आकाश निरीक्षणासारख्या अनेक उपक्रमांत त्यांचा सहभाग होता.

पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभाग हा देशातील अग्रगण्य विभाग म्हणून गणला जातो. या विभागाने अलीकडच्या काळात भौतिकशास्त्रातील शाखांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटविला आहे. त्यांपैकी हवामानशास्त्र आणि अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेले अवकाशशास्त्र या विषयांत झालेल्या प्रगतीचा पाया चिपळोणकर यांनी अनेक दशकांपूर्वी घातला. ही परंपरा त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी पुढे चालू ठेवली. डॉ. मो. वा. चिपळोणकर यांच्याकडून त्यांना मिळालेली संशोधनाची प्रेरणा ही त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांची साक्ष देते.

१९७०च्या दशकानंतर संशोधनासाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या. त्याचप्रमाणे नवीन विषयांचा विकास झाला. त्यात मटेरियल सायन्स, न्यूक्लिअर फिजिक्स, बायोफिजिक्स, लेझर त्याचप्रमाणे सैद्धान्तिक भौतिकी यांचा समावेश करता येईल. या पार्श्वभूमीवर विचार केला, तर मो. वा. चिपळोणकर यांच्या काळात संशोधन करणे ही अत्यंत जिकिरीची बाब होती. परंतु डॉ. मो. वा. चिपळोणकर यांच्यामध्ये असणारी संशोधनाची आवड, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी, वागणुकीतील साधेपणा आणि सरळमार्गी व्यवहार या गोष्टींच्या बळावर त्यांनी संशोधन सुरू ठेवले. ते स्वत: अत्यंत कडक शिस्तीचे भोक्ते होते. त्यांचा व्यवहार हा अत्यंत सचोटीचा होता.

अध्यापन, संशोधन व इतर शैक्षणिक जबाबदाऱ्यांमधूनही डॉ. चिपळोणकर वाचन व अध्ययन चिकाटीने व जिद्दीने करीत. त्यांच्या दिनक्रमात सकाळचा वेळ हा वाचन आणि अध्ययनाकरिता राखून ठेवलेला असे. विभाग आणि विद्यापीठाचे अनुशासन व प्रशासन हे नेहमी दुपारी १२ ते ३ या वेळात असे. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा व त्यांना मार्गदर्शन या करता नंतरचे दोन-तीन तास वापरले जात. ते संध्याकाळी आणि रात्री आपल्या आवडीच्या शास्रीय विषयांचे वाचन करीत. त्यांचे ज्येष्ठ सहकारी व नामवंत रसायनशास्रज्ञ डॉ. शंकर खंडो कुलकर्णी-जतकर यांनी अध्ययन आणि वाचन निष्ठा जागृत ठेवण्याच्या त्यांच्या जिद्दीबद्दल खूपच प्रशंसोद्गार काढलेले आहेत. ज्येष्ठ व तरुण वैज्ञानिकांना एकत्र येता यावे व विचारांचे आदान प्रदान व्हावे याबाबत त्यांनी ‘विज्ञान’ नावाचा वैचारिक मेळावा भरवण्याचे कार्य केले. प्रत्येक वर्षी हा तीन दिवसीय मेळावा ते स्वखर्चाने भरवीत असत. अंगीकृत कार्य उत्कृष्टपणे व्हावे यासाठी पदरमोड करण्यास ते सदैव तयार असत.

‘मराठीतून विज्ञान प्रसार’ या विषयात त्यांनी केलेले योगदानही खूपच अमूल्य आहे. प्रसाराची साधने अत्यंत सीमित असतानाही त्यांनी केसरी, सकाळ, सृष्टिज्ञान, विज्ञानयुग, स्वराज्य यांसारख्या नियतकालिके आणि साप्ताहिकांमधून शंभरहून अधिक लेख लिहिले. विज्ञानातील अचूकपणावर त्यांचा कटाक्ष असे. सृष्टिज्ञान मासिकाच्या संपादक मंडळात त्यांनी अनेक वर्षे काम केले. इंडियन फिजिक्स असोसिएशन, पुणे विभागातर्फे विज्ञान प्रसाराचे कार्य करणार्‍या व्यक्तीस ‘डॉ. मो. वा. चिपळोणकर’ हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे आणि हा पुरस्कार मिळणे म्हणजे मराठीतून विज्ञान प्रसाराच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचीच पावती समजली जाते. यातच चिपळोणकर यांच्या कार्याचे आणि निष्ठापूर्ण जीवनाचे महत्त्व सामावलेले आहे.

— डॉ. पंडित विद्यासागर

दिनविशेष *एप्रिल २४*

दिनविशेष

*एप्रिल २४, इ.स. १९९०*

*अवकाशाचा वेध घेण्यासाठी हबल दुर्बिण अंतराळात सोडली*

हबल दुर्बीण ही अवकाशाचा वेध घेण्यासाठी नासा व युरोपियन अवकाश संस्था यांनी संयुक्तपणे सोडलेली दुर्बिण आहे. ही दुर्बिण १९९० साली सोडण्यात आली. ही अवकाशात सोडण्यात आलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी तसेच सर्वात प्रगत दुर्बिण आहे. या दुर्बिणीचे नाव अमेरिकेच्या एडविन हबल या खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आले. ही दुर्बिण नासाच्या मोठ्या वेधशाळांच्या प्रकल्पातील एक प्रकल्प आहे.
इटालीत जन्‍माला आलेल्‍या गॅलिलिओने चारशे वर्षांपूर्वी, १६१० साली दुर्बिणीचा शोध लावला. गॅलिलिओने दुर्बिणीच्‍या साह्याने चंद्रावरील डाग आणि गुरूचे चार उपग्रह शोधून काढले. दुर्बिणीच्‍या शोधापासून सुरू झालेला अवकाश संशोधनाचा हा प्रवास आजतागायत सुरू आहे. गॅलिलिओने लावलेला दुर्बिणीचा शोध संशोधनक्षेत्रात क्रांतिकारक ठरला. त्या दुर्बिणीचे सर्वात प्रगत रूप हबल दुर्बिणीच्‍या रूपाने आपणास दिसते. अवकाशाचा वेध घेण्‍यासाठी ‘नासा’ व युरोपीयन अवकाश संस्‍था यांनी संयुक्‍त रीत्‍या तयार केलेली हबल दुर्बीण (HubbleSpace Telescope (HST)) २४ एप्रिल १९९० रोजी अवकाशात सोडण्‍यात आली. अवकाशात सोडण्‍यात आलेली ती सर्वात मोठी व प्रगत दुर्बीण. ‘हबल’ने काढलेल्‍या छायाचित्रांमुळे जगभरातील खगोलप्रेमी भारावून जातात. दुर्बिणीने लागलेल्‍या अनेक शोधांवर पुस्‍तकेही लिहिण्‍यात आली आहेत.
पृथ्‍वीपासून तीनशेऐंशी मैल दूर अवकाशात स्थित असलेल्‍या हबल दुर्बिणीचे वस्‍तुमान अकरा हजार एकशेदहा किलोग्रॅम आहे. तिचा व्‍यास २.४ मीटर असून एकूण क्षेत्रफळ ४.५ वर्ग- मीटर एवढे आहे. पृथ्‍वीवरील परिमाणांनुसार ‘हबल’चा आकार फार मोठा नाही, मात्र तिचा अवकाशात काम करण्‍याचा आवाका फार मोठा आहे. दुर्बीण पृथ्‍वीभोवती सात हजार आठशे मीटर प्रती सेकंद वेगाने जवळपास वर्तुळाकार कक्षेत फिरते. ती दर शहाण्‍णव मिनिटांनी पृथ्‍वीची प्रदक्षिणा पूर्ण करते. दुर्बीण दिवसाचे चोवीस तास आणि वर्षाचे तीनशेपासष्‍ट दिवस कार्यरत असते. ‘हबल’चे आरोग्‍य, सुरक्षा आणि कार्यक्षमता यांवर देखरेख करण्‍याचे आणि दुर्बीण नियंत्रित करण्‍यासाठी शेकडो शास्‍त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञ नासा च्‍या ‘गोदार्द स्‍पेस फ्लाइट सेंटर ’ आणि ‘स्‍पेस टेलिस्‍कोप सायन्‍स इन्स्टिट्यूट ’ (STScI) येथे अहोरात्र कार्यरत आहेत. ‘हबल’ दुर्बीण पृथ्‍वीच्‍या वातावरणाबाहेर, प्रकाश प्रदूषणापासून दूर अवकाशात बसवण्‍यात आल्‍याने ती कोणत्‍याही दृश्‍यात्‍मक अडथळ्याशिवाय अवकाशाचे निर्भेळ रूप पाहू शकते. दुर्बिणीमुळे मानवाच्‍या अवकाश निरीक्षण क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
धूळ आणि हेलियमच्या ढगात ता-याचा जन्म होताना ‘हबल’ने टिपलेले हे प्रसिद्ध छायाचित्र.आकाशगंगेमध्‍ये आजवर ज्‍या सर्वांत मोठ्या तार्‍याचा जन्‍म पाहण्‍यात आला, त्‍या खगोलीय घटनेचा ‘हबल’कडून जो फोटो काढण्‍यात आला, त्‍या फोटोचा एक लहानसा भाग म्‍हणजे शेजारी दिसत असलेला फोटो. त्यावरून ‘हबल’च्‍या कामाच्‍या व्‍याप्‍तीचा अंदाज यावा. हबल दुर्बिणीने घेतलेले वेध पाहण्‍याकरता येथे क्लिक करा.
‘हबल’ दुर्बिणीला २४ एप्रिल २०११ रोजी वीस वर्षे पूर्ण झाली. रॉकेट इंजिनीयरिंगचे प्रणेते हर्मन ओबर्थ , रॉबर्ट गोदार्द आणि कॉन्स्टंटाइन सिओलकोव्हस्की या शास्त्रज्ञांपैकी हर्मन ओबर्थ यांनी १९२३ साली ‘The Rocket into Planetary Space’ हा प्रबंध लिहून पृथ्वीच्या कक्षेत एक दुर्बीण रॉकेटच्या साहाय्याने फिरती ठेवता येईल, अशी कल्पना मांडली. अमेरिकेच्‍या एडविन हबल (१८८९-१९५३) या खगोलशास्त्रज्ञाच्‍या नावावरून दुर्बिणीचे नामकरण करण्‍यात आले. एडवीन हबल यांनी १९२४ साली अवकाश निरीक्षण करण्‍याच्‍या हेतूने त्‍या काळची सर्वात मोठी शंभर इंचाची हूकर दुर्बीण वापरली होती. ‘हबल’चे यशस्‍वी प्रक्षेपण २४ एप्रिल १९९० रोजी डिस्कव्‍हरी या स्‍पेस शटलच्‍या साह्याने करण्‍यात आले. ‘हबल’चे अवकाशातील स्‍थान पृथ्‍वीपासून फार जवळ असल्‍याने आकाश निरभ्र असल्‍यास तिच्‍या गडद रंगामुळे ती साध्‍या डोळ्यांनीही दिसू शकते. (‘हबल’ कोणत्‍या वेळी पाहता येईल हे जाणण्‍यासाठी येथे क्लिक करा. तेथे select from map वर क्लिक करून आपला देश-शहर निवडा. मग satellites मध्‍ये HST वर क्लिक करा. तेथे हबल कोणत्‍या वेळी पाहता येईल याचा तक्‍ता दिसेल.)
‘हबल’ने आपल्‍या वीस वर्षांच्‍या कार्यकाळात पाच लाखांहून अधिक छायाचित्रे पृथ्‍वीकडे पाठवली आहेत. या छायाचित्रांच्‍या माध्‍यमातून ‘हबल’ने ब्रम्‍हांडाच्‍या माहितीचा प्रचंड साठा मानवाला खुला करून दिला आहे. १३.७५ अब्‍ज वर्षापूर्वी झालेल्‍या महास्‍फोटातून विश्‍वाचा जन्‍म झाला ही गोष्‍टही हबलमुळे सिद्ध झाली आहे. या दुर्बिणीमुळे शास्‍त्रज्ञांना डार्क एनर्जी ची माहिती मिळाली. तसेच आतापर्यंत कल्‍पनाविष्‍कार समजली जाणारी ‘कृष्‍णविवर’ ही संकल्‍पना प्रत्‍यक्ष अस्तित्‍वात असल्‍याचे पुरावेही ‘हबल’ने दिलेले आहेत.
‘हबल’ अवकाशात सोडण्‍यात आल्‍यानंतर तिचा सुरुवातीचा काही काळ निरीक्षणकर्त्‍यांसाठी असमाधानाचा ठरला. सुरुवातीलाच ‘हबल’चे भिंग नादुरुस्‍त झाले. त्‍यामुळे दुर्बिणीकडून चांगली छायाचित्रे प्राप्‍त होत नव्‍हती. ‘हबल’वर प्रचंड खर्च झालेला असल्‍याने त्‍यावेळी प्रकल्‍पावर मोठी टिका करण्‍यात आली. मात्र शास्‍त्रज्ञ आणि अभियंत्‍यांनी ‘हबल’च्‍या दुरुस्‍तीसाठी दहा दिवसांची मोहीम आखली होती. दुरुस्‍तीची ही घटना कादंबरी-चित्रपटात शोभावी अशीच आहे. दुरुस्‍तीसाठी पाठवलेल्‍या यानांनी ‘हबल’चा दोन दिवस अवकाशात पाठलाग केला. त्‍यानंतर यानाच्‍या महाकाय हातांनी ‘हबल’ला पकडले. तिची दुरुस्‍ती केली. त्‍यानंतर तिच्‍या चाचण्‍या केल्‍या आणि तिला अवकाशात सोडून दिले. दुर्बिणीची वैज्ञानिक उपकरणे सुधारण्‍यासाठी तसेच तिची कार्यक्षमता वाढवण्‍यासाठी १९९० पासून चार मोहिमा पार पडल्‍या आहेत. ‘हबल’ कार्यक्षमतेने अवकाशनिरीक्षणात गुंतलेली आहे. दुर्बीण आणखी पंधरा ते वीस वर्षे सक्षमतेने काम करू शकेल, असे शास्‍त्रज्ञ सांगतात.
नव्‍याचा शोध घेणे हा मानवाचा स्‍थायिभाव आहे आणि त्यास ‘हबल’ पूरक ठरली आहे. तार्‍यांचे जन्‍म-मृत्‍यू, आकाशगंगेचा विस्‍तार अशा अनेक संकल्‍पना ‘हबल’ने छायाचित्रांच्‍या मदतीने समजावून सांगितल्‍या आहेत. केवळ वर्तमान नव्‍हे तर भूतकाळाची खिडकी उघडावी त्‍याप्रमाणे विश्‍वनिर्मिती, तारे-ग्रहांची निर्मिती आणि अन्‍य बर्‍याच घटनांची माहिती मानवाला पुरवलेली आहे. ती अधिक विश्‍वसनीय, वस्‍तुनिष्‍ठ आणि सैद्धांतिक मांडणीस प्रेरक ठरत आहे.

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

Today in Science 23 April


Today in Science

Max von Laue


  Died 23 Apr 1960 (born 9 Oct 1879). 

German physicist who was a recipient of the Nobel Prize for Physics in 1914 for his discovery of the diffraction of X-rays in crystals. This enabled scientists to study the structure of crystals and hence marked the origin of solid-state physics, an important field in the development of modern electronics

💥🌸दिनविशेष🌸💥* 23 एप्रिल

*💥🌸दिनविशेष🌸💥*

*मॅक्स प्लांक*

*जर्मन भौतिकीविज्ञ, पुंज सिद्धांताचे जनक*

*जन्मदिन - २३ एप्रिल १८५८*

जर्मन भौतिकीविज्ञ. सुप्रसिद्ध ⇨ पुंज सिद्धांताचे जनक व १९१८ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म कील येथे झाला. म्यूनिक व बर्लिन येथील विद्यापीठांत गुस्टाफ किरखोफ व हेर्मान फोन हेल्महोल्ट्स या नामवंत शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिक्षण झाले. ⇨ऊष्मागतिकीच्या दुसऱ्या नियमावर प्रबंध लिहून त्यांनी १८७९ मध्ये म्यूनिक विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी मिळविल्यानंतर त्याच विद्यापीठात (१८८०-८५) व नंतर कील (१८८५-८९) येथे ते भौतिकीचे प्राध्यापक होते. १८८९ मध्ये बर्लिन विद्यापीठात किरखोफ यांच्या जागेवर प्लांक यांची नेमणूक झाली व तेथेच १९२६ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर शास्त्रीय संशोधनाकरिता खास स्थापन करण्यात आलेल्या कैसर व्हिल्हेल्म सोसायटीचे ते १९३०-३७ मध्ये अध्यक्ष होते. याच संस्थेचे पुढे माक्स प्लांक सोसायटी असे नामांतरण करण्यात आले.
किरखोफ यांच्या मार्गदर्शनाखाली प्लांक यांनी सुरूवातीला ऊष्मागतिकीसंबंधी संशोधन केले. ⇨एंट्रॉपी, ऊष्माविद्युत् (उष्णतेचे सरळ विद्युत् ऊर्जेत होणारे रूपांतर) व विरल विद्रावांचा सिद्धांत याविषयी त्यांचे निबंध त्या वेळी प्रसिद्ध झाले. प्लांक यांचे प्रमुख कार्य कृष्ण पदार्थाच्या (सर्वच्या सर्व आपाती प्रारण-पडणारी तरंगरूपी ऊर्जा-शोषून घेणाऱ्या व तापविला असता संपूर्ण प्रारण उत्सर्जित करणाऱ्या आदर्श व काल्पनिक पदार्थाच्या) प्रारणासंबंधीचे आहे [⟶ उष्णताप्रारण]. कृष्ण पदार्थाने उत्सर्जित केलेल्या ऊर्जेच्या तरंगलांबीचे वितरण आणि त्याचे तापमान यांतील संबंधाचे प्रत्यक्ष प्रयोगाने केलेले निरीक्षण आणि लॉर्ड रॅली इत्यादींनी मांडलेली सूत्रे यांत तफावत असल्याचे आढळून आले होते. प्लांक यांनी ऊर्जा व प्रारणाची कंप्रता (एका सेकंदात होणाऱ्या कंपनांची संख्या) यांतील संबंध शोधून काढला आणि तो प्रस्थापित करण्यासाठी प्रारण ऊर्जा ही फक्त पृथक् मूल्ये घेते किंवा पुंजांच्या (क्वांटाच्या) स्वरूपात उत्सर्जित होते, या क्रांतिकारक गृहीतकाचा आधार घेतला. v कंप्रतेच्या अनुस्पंदकाची [विशिष्ट कंप्रतेला अनुस्पंदन दर्शविणाऱ्या प्रयुक्तीची; ⟶ अनुस्पंदन] ऊर्जा hv असते, येथे ℎ हा स्थिरांक असून त्याला आता प्लांक स्थिरांक असे नाव प्राप्त झाले आहे. प्लांक यांनी १९०० साली मांडलेली पुंजाची कल्पना ही भौतिकीच्या विकासातील एक अतिशय महत्त्वाची पायरी ठरलेली आहे. सुरूवातीला प्लांक यांच्या शोधाचे महत्त्व व अभिजात भौतिकीवर त्याचे होणारे परिणाम यांचे योग्य मूल्यमापन झाले नाही. तथापि ⇨प्रकाशविद्युत् परिणामाचे अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी केलेले स्पष्टीकरण आणि यासारखेच अभिजात सिद्धांत व प्रत्यक्ष निरीक्षित घटना यांतील फरकांचे स्पष्टीकरण करणे पुंज सिद्धांतामुळेच शक्य झाले.

मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

💥🌸दिनविशेष🌸💥* *२२ एप्रिल

*💥🌸दिनविशेष🌸💥*

 *२२ एप्रिल १९७०*

*पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला*

पृथ्वी दिन हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर पाळण्यात येतो. अमेरिकेत २२ एप्रिल रोजी हा दिन पाळला जातो, तर संयुक्त राष्ट्रे २० मार्च रोजी, म्हणजे सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थेट समोर असण्याच्या दोन बिंदूपैकी एका बिंदूशी पोचण्याच्या दिवशी, संपातबिंदू पॄथ्वी दिन पाळतात.

पर्यावरणरक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचासिनेटर गेलॉर्ड नेल्सन याने २२ एप्रिल, इ.स. १९७० रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिनाचे आयोजन केले. पहिला पृथ्वी दिन अमेरिकेत पाळला गेला, तरीही त्या कार्यक्रमाचा राष्ट्रीय समन्वयक असलेला डेनिस हेस याने स्थापलेल्या संस्थेने इ.स. १९९० साली १४१ देशांमध्ये या दिवसाचे आयोजन करून पृथ्वी दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. सध्या अर्थ डे नेटवर्क या संस्थेच्या समन्वयाने १७५ देशांमधून हा दिवस साजरा केला जातो. इ.स. २००९ साली संयुक्त राष्ट्रांनी २२ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय धरणीमाता दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली.

💥🌸Today in Science🌸💥 *21 april 1992*


*💥🌸Today in Science🌸💥

         *21 april 1992*

*The first discoveries of extrasolar planets are announced by astronomers Alexander Wolszczan and Dale Frail. They discovered two planets orbiting the pulsar PSR 1257+12.*

An exoplanet or extrasolar planet is a planet that orbits a star other than the Sun, a stellar remnant, or a brown dwarf. More than 1900 exoplanets have been discovered (1911 planets in 1207 planetary systems including 480 multiple planetary systems as of 15 April 2015). There are also rogue planets, which do not orbit any star and which tend to be considered separately, especially if they are gas giants, in which case they are often counted, like WISE 0855−0714, as sub-brown dwarfs.
The Kepler space telescope has also detected a few thousand candidate planets, of which about 11% may be false positives. There is at least one planet on average per star. Around 1 in 5 Sun-like stars[a] have an "Earth-sized"[b] planet in the habitable zone,[c] with the nearest expected to be within 12 light-years distance from Earth. Assuming 200 billion stars in the Milky Way,[d] that would be 11 billion potentially habitable Earth-sized planets in the Milky Way, rising to 40 billion if red dwarfs are included. The rogue planets in the Milky Way possibly number in the trillions.

परग्रह

*💥🌸दिनविशेष🌸💥*

*Extrasolar planet - परग्रह*

सूर्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाला परग्रह म्हणतात. १९९२ पर्यंत परग्रहांच्या अस्तित्वाची कल्पना शास्त्रज्ञांना नव्हती. १९९२ मध्ये पहिल्या परग्रहाचा शोध लागला. त्यानंतर, १ मार्च २०१७ पर्यंत २,६९२ ग्रहमालांमध्ये ३,५८६ परग्रहांचा शोध लागला आहे. त्यामधील ६०३ ग्रहमालांमध्ये एकापेक्षा जास्त परग्रह आहेत.[१] यांपैकी दोन हजाराहून जास्त परग्रहांचा शोध नासाच्या केप्लर दुर्बिणीने लावला आहे.[२] त्याशिवाय केप्लरने तीन हजाराहून जास्त संभाव्य परग्रहांचा शोध लावला आहे. परग्रहांचे थेट निरीक्षण करणे अत्यंत अवघड (अनेक वेळा अशक्य) असल्याने त्यांचा शोध अप्रत्यक्ष पद्धतीने घेतला जातो. त्यामुळे संभाव्य परग्रहातील किती खरे परग्रह आहेत हे खात्रीशीर सांगणे अवघड आहे.

सुमारे पाच पैकी एका सूर्याएवढ्या आकाराच्या ताऱ्याभोवती पृथ्वीएवढ्या आकाराचा परग्रह त्या ताऱ्याच्या वास्तव्ययोग्य क्षेत्रामध्ये परिभ्रमण करतो असा अंदाज लावला जातो. म्हणजे आकाशगंगेमध्ये २०० अब्ज तारे आहेत असे मानले, तर असा अंदाज लावता येतो की, आकाशगंगेमध्ये पृथ्वीएवढ्या आकाराचे संभाव्य वास्तव्ययोग्य ११ अब्ज ग्रह आहेत.

सोमवार, २० एप्रिल, २०२०

Today in Science 20 April

Today in Science


Charles Gordon Curtis

  Born 20 Apr 1860; died 10 Mar 1953 
U.S. inventor who devised a steam turbine widely used in electric power plants and in marine propulsion. He was a patent lawyer for eight years. He patented the first U.S. gas turbine (1899). Among his other achievements, the Curtis multiple-stage steam turbine (patented 1896, sold rights to GE in 1901) required one tenth the space and weighed one eighth as much as machines it replaced. The Curtis generator was the most powerful steam turbine in the world and represented a significant advance in the capacity of steam turbines. In spite of its high-power output, this machine cost much less than contemporary reciprocating steam engine-driven generators of the same output.

Today in Science 19 april


Today in Science

Glenn T. Seaborg

  Born 19 Apr 1912; 
died 25 Feb 1999 at age 86. 
American nuclear chemist. During 1940-58, Seaborg and his colleagues at the University of California, Berkeley, produced nine of the transuranic elements (plutonium to nobelium) by bombarding uranium and other elements with nuclei in a cyclotron. He coined the term actinide for the elements in this series. The work on elements was directly relevant to the WW II effort to develop an atomic bomb. It is said that he was influential in determining the choice of plutonium rather than uranium in the first atomic-bomb experiments. Seaborg and his early collaborator Edwin McMillan shared the 1951 Nobel Prize for chemistry. Seaborg was chairman of the US Atomic Energy Commission 1962-71. Element 106, seaborgium (1974), was named in his honour.

रविवार, १९ एप्रिल, २०२०

💥🌸दिनविशेष🌸💥* २० एप्रिल

*💥🌸दिनविशेष🌸💥*

*२० एप्रिल १८६२* 

*लुई पास्चर व क्लॉड बर्नार्डने पास्चरायझेशनचा प्रयोग केला.*

पाश्चर यांनी दूध टिकवण्यासाठी निर्जंतुकीकरण या प्रक्रियेचा शोध लावला. या प्रक्रियेला त्यांच्या नावावरून पाश्चरायझेशन असे म्हणतात.

दूध, खाद्यपदार्थ, बिअर, मद्य, फळांचे रस इ. पदार्थांचे त्यांत असणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे लवकर किण्वन (आंबवण्याची क्रिया) होते. तसेच त्यांस खराब चव व वास येऊन आरोग्यास हानिकारक अशा सूक्ष्मजंतूंची निर्मिती व वाढ त्यांत होते. हे टाळण्यासाठी अशा पदार्थांवर उष्णतेचा संस्कार विशिष्ट तापमानास करतात. त्यामुळे या किण्वनाच्या क्रियेस प्रतिबंध होऊन पदार्थातील हानिकारक घटकांचा पूर्णतः वा अंशतः नाश होतो. तसेच या संस्कारामुळे अशा पदार्थांच्या रासायनिक घटकांत फारच थोडा बदल होतो. सूक्ष्मजंतूंमुळे मद्य व बिअर खराब होतात, असे लूई पाश्चर यांना आढळून आले.

जर मद्य व बिअर ५७.२०० से.पर्यंत काही मिनिटे तापविली, तर त्यांतील हानिकाकरक सूक्ष्मजंतूंचा नाश होतो, असे त्यांनी १८६० मध्ये दाखवून दिले. या प्रक्रियेचा ऑस्ट्रियातील मद्य गाळणाऱ्यांनी प्रथम वापर केला व तिला ‘पाश्चरीकरण’ या अर्थाचे नाव दिले. प्रथम ही प्रक्रिया मद्य व बिअरसाठी वापरीत असत. तथापि या प्रक्रियेने तयार झालेले पदार्थ जास्त काळ टिकतात, तसेच किण्वन होण्यास रोध होतो व सूक्ष्मजंतूंचा नाश होतो असे दिसून आल्यानंतर तिचा उपयोग दूध, लोणी, चीज, फळांचे रस इत्यादींसाठीही करण्यात येऊ लागला; परंतु दुधाच्या बाबतीत वापरली जाणारी एक प्रक्रिया म्हणूनच पाश्चरीकरण प्रक्रिया लोकांना अधिक परिचयाची आहे.

निर्जंतुकीकरण व पाश्चरीकरण या प्रक्रिया एकच नाहीत. १००० से. पेक्षा जास्त तापमानास खाद्यपदार्थ तापविल्यास त्यातील सर्व सूक्ष्मजंतूंचा नाश होतो; पण काही वेळा त्याच्या गुणधर्मांत बदल होतो. सामान्यतः डबाबंद खाद्यपदार्थ व बाटल्यांतील खाद्यपदार्थ यांसाठी या प्रक्रियेचा वापर करतात, कारण या संस्कारामुळे सर्व सूक्ष्मजंतूंचा नाश होऊन पदार्थ जासत चांगले टिकतात . याउलट पाश्चरीकरण ही प्रक्रिया सामान्यतः ५०० – ६० से. या दरम्यान करतात त्यामुळे अनावश्यक व रोगकारक सूक्ष्मजंतूंचा नाश होतो. तथापि पदार्थाच्या रासायनिक किंवा भौतिक गुणधर्मात फरक होत नाही. उच्च तापमानाचा अल्पकाल वापर करून पाश्चरीकरणची प्रक्रिया केल्यास तिला झटपट (फ्लॅश) पाश्चरीकरण असे म्हणतात.

तापमान व ते किती वेळ ठेवले यांवर सूक्ष्मजंतूंच्या नाशाचे प्रमाण अवलंबून असते. मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस या सूक्ष्मजंतूंमध्ये इतर प्रकारच्या सूक्ष्मजंतूंपेक्षा जास्त तापमान सहन करण्याची क्षमता असते. या सूक्ष्मजंतूंचा नाश ८२० से. तापमान २ – ३ सेकंद ७१० से. १२ सेकंद. ६६० से. २ – ५ मिनिटे, ६०० से. २० मिनिटे व ५९० से. ३० मिनिटे दिल्यास होतो. क्षारीय (अल्कलाइन) फॉस्फेटेज या एंझाइमाच्या (जीवरासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थाच्या) नाशास लागणाऱ्या तापमानापेक्षा मायकोबॅक्टिरियम ट्यूबरक्युलॉसिसच्या नाशास थोडे कमी तापमान लागते. क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम व क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स यांसारखे काही बीजाणुशील (जननशील सूक्ष्म घटक तयार करू शकणारे) रोगकारक सूक्ष्मजंतू पाश्चरीकरणानंतरही जिवंत राहू शकतात; पण पाश्चरीकरणानंतर लगेच प्रशीतन केल्यास (थंड करण्याची क्रिया केल्यास) त्यांच्या वाढीस प्रतिबंध होतो. ‘क्यू’ ज्वराचे सूक्ष्मजंतू (रिकेट्सिया बर्नेटी) पाश्चरीकरणानंतरही जिवंत राहू शकतात. इतर सूक्ष्मजंतू जिवंत ठेवून खाद्यपदार्थ नासण्यास वा खराब होण्यास कारणीभूत होणाऱ्या अबीजाणुशील सूक्ष्मजंतूंचा नाश होऊन पदार्थाच्या चवीत व गुणधर्मात फरक पडणार नाही अशा प्रमाणित शक्तीच्या बीटा व गॅमा किरणांच्या साह्याने पाश्चरीकरण करण्याची पद्धतही काही वेळा वापरली जाते.

💥🌸दिनविशेष🌸💥 19 एप्रिल

*💥🌸दिनविशेष🌸💥*

         *आर्यभट्ट उपग्रह*

*भारताने विकसीत केलेला पहिला उपग्रह*

*प्रक्षेपण दिन - १९ एप्रिल १९७५*

आर्यभट्ट् हा भारताने विकसीत केलेला पहिला उपग्रह आहे. थोर भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट्ट्टांचे नाव ह्या उपग्रहाला देण्यात आलेले आहे.
हया उपग्रहाचे प्रक्षेपण तेव्हाच्या सोविएत संघराज्यातील कापुस्टीन यार ह्या अवकाश केंद्रावरुन १९ एप्रील १९७५ साली कॉसमॉस-३एम हा उपग्रह वाहक वापरून करण्यात आले. सौर उर्जेवर चालणारा आर्यभट्ट् उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ( इस्रो ) विकसीत केला होता. सुमारे पाच दिवस पृथ्वी भवती प्रदक्षीणा घातल्या नंतर उपग्रहाचा इस्रोशी संपर्क तुटला. ह्या उपग्रहाने ११ फेब्रुवारी १९९२ साली पृथ्वी च्या वातावरणात पुनःप्रवेश केला होता.

दिनविशेष🌸 * 19 एप्रिल

*💥🌸दिनविशेष🌸💥*

            *चार्ल्स डार्विन*

*उत्क्रांतिवादाचा जनक*

*स्मृतिदिन - १९ एप्रिल, १८८२*

चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले.
इंग्लंडमधील श्रॉपशायर परगण्यात फेब्रुवारी १२, इ.स. १८०९ रोजी चार्ल्सचा जन्म झाला. १८१८ मध्ये तो शाळेत जाऊ लागला. त्याला रसायनशास्त्राची फार आवड होती म्हणून आपल्या भावाच्या मदतीने त्याने आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यात छप्पर घालून एक छोटीशी प्रयोगशाळा उभारली होती व तेथे तो प्रयोग करत बसे. त्याचे शाळकरी सोबती त्याच्या या नादाची टर उडवत. कालांतराने त्याची डॉ. ग्रॅट या जीवशास्त्रज्ञाची ओळख झाली. डार्विनने १८२५ मध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या क्राइस्ट महाविद्यालयात नाव नोंदवून पदवी मिळवली. तेथे त्याला जीवजिवाणू व कीटक निरीक्षणाचा नाद लागला.
१८२६ मध्ये कॅप्टन किंगने दक्षिण अमेरिकेच्या संशोधनाची मोहीम काढली. त्याच्या हेन्स्लो नावाच्या मित्राच्या निमंत्रणावरून डार्विन मोहिमेत सामील झाला. त्या मोहिमेवर तो पाच वर्षे होता. निरनिराळे पक्षी-प्राणी एकमेकांशी कसे वागतात, कसे एकमेकांशी जुळवून घेतात, याचे निरीक्षण व अभ्यास त्याने केला व तेथे उत्क्रांतिवाद, सहजीवन, 'बळी तो कान पिळी', ही मूलभूत नैसर्गिक तत्त्वे तो शिकला. माणसाचा मूळ पुरुष, चारपायी पायाच्या माकडापासून झाला असला पाहिजे असे विचार त्याच्या डोक्यात घुमू लागले. वेगवेगळे प्राणी कसे निर्माण झाले या विषयावरच्या त्याच्या Origin of Species या नोव्हेंबर २४ रोजी प्रकाशित झालेल्या शोधप्रबंधाच्या १२५० प्रति एका दिवसात खपल्या. हा सिद्धांत बायबलच्या विरुद्ध जात होता. त्याचा निषेध करण्यासाठी १८६० मध्ये ऑक्‍सफर्डमध्ये विल्बर फोर्स या बिशपने सभा बोलावली. डार्विन आपल्या प्रयोगशाळेत शांतपणे प्रयोग करत बसला होता. हक्सले डी हूकर या शास्त्रज्ञाने डार्विनची बाजू सडेतोड व सोदाहरण मांडली. बिशपला डार्विनचा सिद्धांत मान्य करावाच लागला. डार्विनला त्या यशाची ना खंत ना खेद. तो कार्यातच मग्न राहिला.

चार्ल्स डार्विनचे मराठीतील पुस्तके
- उत्क्रांति
- डार्विनचि आत्मकथा
- डार्विनचा सिद्धांत