रविवार, १९ एप्रिल, २०२०

💥🌸दिनविशेष🌸💥* २० एप्रिल

*💥🌸दिनविशेष🌸💥*

*२० एप्रिल १८६२* 

*लुई पास्चर व क्लॉड बर्नार्डने पास्चरायझेशनचा प्रयोग केला.*

पाश्चर यांनी दूध टिकवण्यासाठी निर्जंतुकीकरण या प्रक्रियेचा शोध लावला. या प्रक्रियेला त्यांच्या नावावरून पाश्चरायझेशन असे म्हणतात.

दूध, खाद्यपदार्थ, बिअर, मद्य, फळांचे रस इ. पदार्थांचे त्यांत असणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे लवकर किण्वन (आंबवण्याची क्रिया) होते. तसेच त्यांस खराब चव व वास येऊन आरोग्यास हानिकारक अशा सूक्ष्मजंतूंची निर्मिती व वाढ त्यांत होते. हे टाळण्यासाठी अशा पदार्थांवर उष्णतेचा संस्कार विशिष्ट तापमानास करतात. त्यामुळे या किण्वनाच्या क्रियेस प्रतिबंध होऊन पदार्थातील हानिकारक घटकांचा पूर्णतः वा अंशतः नाश होतो. तसेच या संस्कारामुळे अशा पदार्थांच्या रासायनिक घटकांत फारच थोडा बदल होतो. सूक्ष्मजंतूंमुळे मद्य व बिअर खराब होतात, असे लूई पाश्चर यांना आढळून आले.

जर मद्य व बिअर ५७.२०० से.पर्यंत काही मिनिटे तापविली, तर त्यांतील हानिकाकरक सूक्ष्मजंतूंचा नाश होतो, असे त्यांनी १८६० मध्ये दाखवून दिले. या प्रक्रियेचा ऑस्ट्रियातील मद्य गाळणाऱ्यांनी प्रथम वापर केला व तिला ‘पाश्चरीकरण’ या अर्थाचे नाव दिले. प्रथम ही प्रक्रिया मद्य व बिअरसाठी वापरीत असत. तथापि या प्रक्रियेने तयार झालेले पदार्थ जास्त काळ टिकतात, तसेच किण्वन होण्यास रोध होतो व सूक्ष्मजंतूंचा नाश होतो असे दिसून आल्यानंतर तिचा उपयोग दूध, लोणी, चीज, फळांचे रस इत्यादींसाठीही करण्यात येऊ लागला; परंतु दुधाच्या बाबतीत वापरली जाणारी एक प्रक्रिया म्हणूनच पाश्चरीकरण प्रक्रिया लोकांना अधिक परिचयाची आहे.

निर्जंतुकीकरण व पाश्चरीकरण या प्रक्रिया एकच नाहीत. १००० से. पेक्षा जास्त तापमानास खाद्यपदार्थ तापविल्यास त्यातील सर्व सूक्ष्मजंतूंचा नाश होतो; पण काही वेळा त्याच्या गुणधर्मांत बदल होतो. सामान्यतः डबाबंद खाद्यपदार्थ व बाटल्यांतील खाद्यपदार्थ यांसाठी या प्रक्रियेचा वापर करतात, कारण या संस्कारामुळे सर्व सूक्ष्मजंतूंचा नाश होऊन पदार्थ जासत चांगले टिकतात . याउलट पाश्चरीकरण ही प्रक्रिया सामान्यतः ५०० – ६० से. या दरम्यान करतात त्यामुळे अनावश्यक व रोगकारक सूक्ष्मजंतूंचा नाश होतो. तथापि पदार्थाच्या रासायनिक किंवा भौतिक गुणधर्मात फरक होत नाही. उच्च तापमानाचा अल्पकाल वापर करून पाश्चरीकरणची प्रक्रिया केल्यास तिला झटपट (फ्लॅश) पाश्चरीकरण असे म्हणतात.

तापमान व ते किती वेळ ठेवले यांवर सूक्ष्मजंतूंच्या नाशाचे प्रमाण अवलंबून असते. मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस या सूक्ष्मजंतूंमध्ये इतर प्रकारच्या सूक्ष्मजंतूंपेक्षा जास्त तापमान सहन करण्याची क्षमता असते. या सूक्ष्मजंतूंचा नाश ८२० से. तापमान २ – ३ सेकंद ७१० से. १२ सेकंद. ६६० से. २ – ५ मिनिटे, ६०० से. २० मिनिटे व ५९० से. ३० मिनिटे दिल्यास होतो. क्षारीय (अल्कलाइन) फॉस्फेटेज या एंझाइमाच्या (जीवरासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थाच्या) नाशास लागणाऱ्या तापमानापेक्षा मायकोबॅक्टिरियम ट्यूबरक्युलॉसिसच्या नाशास थोडे कमी तापमान लागते. क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम व क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स यांसारखे काही बीजाणुशील (जननशील सूक्ष्म घटक तयार करू शकणारे) रोगकारक सूक्ष्मजंतू पाश्चरीकरणानंतरही जिवंत राहू शकतात; पण पाश्चरीकरणानंतर लगेच प्रशीतन केल्यास (थंड करण्याची क्रिया केल्यास) त्यांच्या वाढीस प्रतिबंध होतो. ‘क्यू’ ज्वराचे सूक्ष्मजंतू (रिकेट्सिया बर्नेटी) पाश्चरीकरणानंतरही जिवंत राहू शकतात. इतर सूक्ष्मजंतू जिवंत ठेवून खाद्यपदार्थ नासण्यास वा खराब होण्यास कारणीभूत होणाऱ्या अबीजाणुशील सूक्ष्मजंतूंचा नाश होऊन पदार्थाच्या चवीत व गुणधर्मात फरक पडणार नाही अशा प्रमाणित शक्तीच्या बीटा व गॅमा किरणांच्या साह्याने पाश्चरीकरण करण्याची पद्धतही काही वेळा वापरली जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा