शनिवार, ११ जुलै, २०२०

7 जुलै

*♻️विज्ञान शिक्षक मित्र♻️*
========================
*💥🌹 दिनविशेष🌹💥*
      *🌸आर्थर कॉनन डॉइल🌸*

*स्कॉटिश डॉक्टर व ’शेरलॉक होम्स’ या गुप्तहेरकथांचे लेखक* 
(जन्म: २२ मे १८५९, मृत्यू 7 जुलै 1930)

    आयरिश कथा कादंबरीकर. ‘शेरलॉक होम्स’ ह्या जगद्‌विख्यात व्यक्तिरेखेचा निर्माता. एडिंबरो येथे एका रोमन कॅथलिक कुटुंबात जन्मला. एडिंबरो विद्यापीठातून वैद्यकाची एम्.डी. ही पदवी संपादन केली (१८८५). काही वर्षे वैद्यकाचा व्यवसायही केला. तथापि १८९० नंतर त्याने स्वतःस सर्वस्वी लेखनास वाहून घेतले मात्र बोअर युद्ध सुरू झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत जाऊन एक प्रमुख शल्यचिकित्सक म्हणून त्याने काम केले.

डॉइल हा मुख्यतः रहस्यकथाकार म्हणून ओळखला जातो. विक्षिप्त पण चतुर गुप्तहेर शेरलॉक होम्स हा त्याचा मानसपुत्र अ स्टडी इन स्कार्लेट (१८८७) ह्या त्याच्या पहिल्याच कादंबरीत अवतरला. एडिंबरो येथील एक नामवंत शल्यचिकित्सक डॉक्टर बेल ह्याच्यावरून ही व्यक्तिरेखा त्याला अंशतः सुचली. डॉक्टर वॉटसन हा शेरलॉक होम्सचा साहाय्यक. ही जोडगोळी इतकी लोकप्रिय झाली, की जिवंत माणसांचा उमटावा तसा त्यांचा ठसा डॉइलच्या वाटकांवर उमटला. देशोदेशींच्या गुप्तहेरकथालेखनावरही डॉइलचा प्रभाव पडलेला आहे. संविधानकाची कौशल्यपूर्ण हाताळणी, वेधक निवेदनशैली ही त्याच्या रहस्यकथा-कादंबऱ्यांची लक्षणीय वैशिष्ट्ये आहेतच तथापि गुन्ह्याच्या संशोधनचित्रणात शेरलॉक होम्सच्या व्यक्तिरेखेआडून स्वतः डॉइलने जी कल्पकता दाखविली, तिचा प्रभाव एकूण गुन्हेशास्त्रावरही पडला. नाटके, चित्रपट इत्यादींसाठी त्याच्या कथा-कांदबऱ्यांचा परिणामकारपणे उपयोग करून घेण्यात आलेला आहे. डॉइलच्या प्रसिद्ध शेरलॉक होम्स कांदबऱ्या अशा : द साइन ऑफ द फोर (१८९०), द हाउंड ऑफ द बास्कर्व्हिल्स [१९०२, ह्या कादंबरीचे मराठी रूपांतर प्र. के. अत्रे ह्यांनी मोहित्यांचा शाप (आवृ. दुसरी १९६७) ह्या नावाने केलेले आहे] आणि द व्हॅली ऑफ फिअर (१९१४). त्याच्या अनेक कथांतूनही शेरलॉक होम्स आणि वॉट्सन ही जोडगोळी आलेली आहे.

रहस्यकथा-कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्याने काही ऐतिहासिक कादंबऱ्या व कविताही लिहिल्या. द व्हाइट कंपनी (१८९१), रोडनी स्टोन (१८९६) व सर नायगेल (१९०६) ह्या त्याच्या काही ऐतिहासिक कादंबऱ्या, तसेच साँग्ज ऑफ ॲक्शन (१८९८) आणि साँग्ज ऑफ द रोड (१९११) हे त्याचे दोन कवितासंग्रहही प्रसिद्ध झाले.


दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटन यांच्यात झालेल्या युद्धात द ग्रेट बोअर वॉर (१९००) ह्या नावाने लिहिलेल्या इतिहासात त्याने निःपक्षपातीपणाने दोन्ही बाजूंचे समतोल मूल्यमापन केले आहे तथापि १९०२ मध्ये द वॉर इन साउथ आफ्रिका : इट्स कॉज अँड काँडक्ट हे पुस्तपत्र लिहून त्याने ब्रिटिश सरकारची बाजू मांडली. घटस्फोटाच्या कायद्यावर लिहून त्याने ब्रिटनमधील स्त्रियांच्या समान हक्कांचे समर्थन केले, तसेच बेल्जियम सत्तेने केलेल्या पिळवणुकीच्या निषेधार्थ त्याने लेखन केले.

आयुष्याच्या अखेरीस त्याने आपला सर्व वेळ अध्यात्मावरील श्रद्धा दृढ करण्यात व्यतीत केला त्यात एक व्य़क्तिगत दृष्टी होती. रोमन कॅथलिक पंथाचा तर वयाच्या एकविसाव्या वर्षीच त्याने त्याग केला होता. १९१७ ते १९२५ मध्ये त्याने यूरोप, ऑस्ट्रेलिया, कॅनडा इ. ठिकाणी जाऊन अध्यात्मावर भाषणे दिली, द न्यू रेव्हिलेशन (१९१८), द व्हायटल मेसेज (१९१९), द वाँडरिंग्ज ऑफ अ स्पिरिच्यूअलिस्ट (१९२१) आणि हिस्टरी ऑफ स्पिरिच्यूअलिझम (१९२६) ही अध्यात्मपर पुस्तके त्याने लिहिली. ससेक्स परगण्यातील क्रोबर येथे तो निधन पावला.
गोखले, शशिकांत
*========================

4 जुलै


*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*
            *मेरी क्युरी*

*पदार्थ विज्ञानातील शास्त्रज्ञ*

*स्मृतिदिन - ४ जुलै, इ.स. १९३४*
 
मारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी (७ नोव्हेंबर, इ.स. १८६७ - ४ जुलै, इ.स. १९३४) या शास्त्रज्ञ होत्या. इ.स. १९०३ साली पदार्थ विज्ञानातील (भौतिकशास्त्र) संशोधनामुळे व इ.स. १९११ साली रसायनशास्त्रातील संशोधनामुळे दोनदा नोबेल पारितोषिकाने सन्मानित होण्याचा मान मेरी क्युरी यांच्याकडे जातो.
*जीवन*
मेरी क्युरी यांचा जन्म पोलंडची राजधानी वॉर्सा येथे झाला. त्यांचे मूळचे नाव स्क्लोदोव्स्का असे होते. वयाच्या सोळाव्या वर्षी तिने शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. इ.स. १८९५ साली तिचा विवाह पिएर क्युरी या संशोधकाशी झाला. हिने पहिल्या महायुद्धाच्या काळात क्ष-किरण व्हॅन उभारली, क्ष-किरण यंत्रे पुरवली तसेच क्ष-किरण यंत्रे चालविण्याचे प्रशिक्षणही दिले. कॅन्सर या आजारावर काम करण्यासाठी मेरी क्युरीने रेडियम संशोधन संस्था उभारली होती. याच संस्थेत मेरी क्युरी यांची मुलगी आयरीन क्युरी सुद्धा सक्रिय होती. पुढे आयरीन क्युरीलाही नोबेल पारितोषिक मिळाले.
*संशोधन*
किरणोत्सारीता या शब्दाचे श्रेय मेरी क्युरी यांच्याकडे जाते. मेरी आणि पिएर क्युरी या दोघांनी पिचब्लेंडसारखी खनिजे युरेनियमपेक्षाही जास्त प्रमाणात बेक्वेरल किरण उत्सर्जित करतात हे दाखवून दिले. मेरीने पिचब्लेंडमधून मोठ्या प्रमाणात किरणोत्सार करणारा पदार्थ वेगळा करुन एका नवीन मूलद्रव्याची भर घातली. या नवीन मूलद्रव्यास मेरीने आपल्या पोलंड देशावरुन पोलोनियम असे नाव दिले. पुढे मेरी आाणि पिएर क्युरी यांना पोलोनियमपेक्षाही जास्त किरणोत्सारी रेडियम नावाचे मूलद्रव्य सापडले. रेडियम हे युरेनियमपेक्षा १६५० पट जा्स्त किरणोत्सारी आहे. एक ग्रॅम रेडियममून दर सेकंदाला जितका किरणोत्सार बाहेर पडतो त्याला १ क्युरी किरणोत्सार असे म्हटले जाते.
*पुरस्कार*
नोबेल पारितोषिक पटकावणार्‍या त्या पहिल्या महिला होत्या. तसेच दोन नोबेल पारितोषिके मिळवण्याचा पण पहिला मान त्यांनी मिळवला.
भौतिक शास्त्रात नोबेल पारितोषिक (इ.स. १९०३)
डेवी पदक (इ.स. १९०३)
मात्तॉय्ची पदक (इ.स. १९०४)
इलियत क्रेसन पदक (इ.स. १९०९)
रसायनशास्त्रात नोबेल (इ.स. १९११)
*========================*

6 जुलै

*♻️विज्ञान शिक्षक मित्र♻️*
=======================
*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*
        *शास्त्रज्ञ जॉर्ज सायमन ओहम(ओम)*
    यांचा आज स्मृतिदिन*
(जन्म: १६ मार्च, १७८९,मृत्यू: ६ जुलै, १८५४)

व्यवसायाने शिक्षक असलेले जॉर्ज सायमन ओहम हे जर्मन देशाचे थोर पदार्थ वैज्ञानिक आणि गणित तज्ञ होते. अध्यापानासोबत त्यांना विविध वैज्ञानिक प्रयोग करण्याची आवड होती. इटलीच्या अलेस्सान्द्रो व्होल्टा या शास्त्रज्ञाच्या कार्याचा प्रभाव ओहोम यांच्यावर होता. विद्युतरासायनिक घट (इलेक्‍ट्रोकेमिकल सेल) ची क्षमता आणि धातू, अधातू यांची विद्युत वाहकता संदर्भातील ओहोमचे प्रयोग आजही प्रसिद्ध आहेत. विद्युत-वहन संदर्भात ओहोमनी त्यांच्या प्रयोगाद्वारे 'विद्युत धारा आणि विभवांतर या एकमेकीशी समप्रमाणात असतात' हा नियम प्रस्थापित केला. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या स्मरणार्थ विद्युत-प्रतिकार-शक्ती (इलेक्‍ट्रिक रेझीसटन्स) मापन एककासाठी 'ओहोम' असे नाव दिले आहे.
*आज 6 जुलै या थोर शास्त्रज्ञाचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने त्यांच्या विषयीचा ही माहिती.*
जॉर्ज सायमन ओहम यांचा जन्म 16 मार्च 1789 रोजी एरल्यानजेन येथे झाला. जोहान्न उल्फ उल्फ्गंग हे त्यांचे वडील आणि मारिया एलिझाबेथ बेक्क हि त्यांची आई. आई वडिलांचे कोणतेही औपचारिक शिक्षण नव्हते. वडील कुलूप बनविणे आणि त्यांची दुरुस्ती करण्याचा व्यवसाय करायचे (व्यवसायाने वडील लॉकस्मिथ होते). ओहोम दहा वर्षाचा होता तेंव्हाच आईचे निधन झाले. जोहान्न उल्फ उल्फ्गंग स्वत: ओहोमचा सांभाळ केला. राहत्या गावी ओहोमला शिक्षण पूर्ण करता आले. बालपणी ओहोमचे वडील त्याला दररोज व्यायाम शाळेत घेऊन जायचे. तेथे ओहोमाची भेट झाली कार्ल क्रायस्टीयन व्हॉन लांग्सडॉर्फ या प्राध्यापक व्यक्तिमत्वाची. कार्ल क्रायस्टीयन व्हॉन लांग्सडॉर्फ हे एरल्यानजेन विद्यापीठात पदार्थ विज्ञान विषयाचे प्राध्यापक. कार्ल क्रायस्टीयन व्हॉन लांग्सडॉर्फ आणि ओहोमचे यांच्यात सख्यत्व निर्माण झाले. पदार्थ विज्ञानातील प्राथमिक स्वरूपाचे धडे ओहोमनी बहुतेक प्रा. कार्ल क्रायस्टीयन व्हॉन लांग्सडॉर्फ यांच्या मार्गदर्शनाखाली या व्यायाम शाळेतच गिरविले असतील. वडीलासोबत ओहोम नेहमी वीज, वीज वाहकता, आणि त्याचे उपयोग या विषयावर गप्पा मारायचा.

पदवी शिक्षणानंतर सप्टेंबर 1806 मध्ये ओहोम स्विझरलॅंडच्या गॉत्सडट बेई निडाऊ येथील एका शाळेत शिक्षक पदावर कार्यरत झाला. त्यानंतर म्हणजे 1809 मध्ये प्रा. कार्ल क्रायस्टीयन व्हॉन लांग्सडॉर्फ यांची बदली आणि पदोन्नती हेडल्बर्ग विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभाग प्रमुखपदी झाली. पुढील उच्च शिक्षणासाठी आपणही हेडल्बर्ग विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागात जावे असे ओहोमला (आणि त्याच्या वडिलांना सुद्धा) वाटायचे. आपली नोकरी करतच आपण बहिस्थ स्वरूपाचे शिक्षण घ्यावे हा कार्ल क्रायस्टीयन व्हॉन लांग्सडॉर्फ यांनी दिला. युलर, लाप्लास आणि लक्रोइक्‍स यांच्या संशोधन कार्याचा अभ्यास करण्यासाठी कार्ल क्रायस्टीयन व्हॉन लांग्सडॉर्फ यांनी ओहोमला सल्ला दिला. पदार्थ विज्ञान आणि गणित विषयातील सर्वोच्च अध्ययन करण्याची ओहोमची आशा होती. याच दरम्यान ओहोमच्या वडिलांचे निधन झाले. मार्च, 1809 मध्ये ओहोम गॉत्सडट बेई निडाऊ येथील शिक्षकाची नोकरी सोडली आणि खाजगी शिकवणी शिक्षक (ट्युटर) म्हणून काम करायचे ठरविले. सलग दोन वर्षे त्यांनी या खाजगी शिकवणी शिक्षकाची भूमिका बजावली.

1811 मध्ये ओहोम एरल्यानजेन विद्यापीठात गणित संशोधन विद्याभ्यासाठी दाखल झाला. गणितीय संकल्पना, विशिष्ठ सूत्रात मांडणी करून त्याचे विद्युत शास्त्रासाठी उपयोग करण्या संदर्भातील उल्लेखनीय अभ्यासाकरिता एरल्यानजेन विद्यापीठानी 25 ऑक्‍टोबर 1811 रोजी ओहोमला डॉक्‍टरेट पदवी बहाल केली. ओहोमच्या या उल्लेखनीय संशोधन कार्याच्या गौरवार्थ एरल्यानजेन विद्यापीठानी दोन वर्षाकरिता ओहोमला गणित विषयाच्या प्राध्यापक पदी रुजू करून घेतले. 1813 साली बावरिया सरकारनी ओहोमला सरकारी प्राध्यापक पदासाठी निमंत्रण दिले. फेब्रुवारी 1816 पर्यंत ओहोम सरकारी प्राध्यापक पदाचे काम पहिले. त्यानंतर बावरिया सरकारनी, ओहोमला बाम्बार्गच्या शालेय गणिताची प्रत सुधार कामासाठी पाठविले. 11 सप्टेंबर 1817 रोजी ओहोमच्या प्रयत्नामुळे बाम्बार्गच्या शालेय गणिताची प्रत सुधारल्याची बावरिया सरकारनी मान्य केले. गणितासोबत ओहोमनी बाम्बार्गच्या शालेय पदार्थ विज्ञान या विषयाची सुद्धा प्रत सुधारावी अशी अपेक्षा बावरिया सरकारनी व्यक्त केले. हेही आव्हान ओहोमनी स्वीकारले.

बावरिया सरकारनी ओहोम आता गणित आणि पदार्थ विज्ञान या दोनही विषयाचा तज्ञ असल्याचे मान्य केले. ओहोमचे अथक प्रयत्न आणि बावरिया सरकारची आर्थिक पाठबळ यामुळे बाम्बार्गची शाळा आता विज्ञान शाळा म्हणून प्रसिद्धीस आली. याच शाळेत ओहोमनी प्रयोगशाळेत यांत्रिक उपकरणे बनविली आणि पदार्थ विज्ञानातील गॅल्व्हानिक सर्किट गणितीय सूत्रात मांडणी केलेले संशोधन पत्रिका (रिसर्च पेपर) प्रसिद्ध केले. या संशोधनाच्या गौरवार्थ 1852 मध्ये म्यूनीच विद्यापीठांनी ओहोमला प्रायोगिक पदार्थ विज्ञान विभाग प्रमुखपदी पाचारण केले. ओहोमनी म्यूनीच विद्यापीठांच्या प्रायोगिक पदार्थ विज्ञान विभागामध्ये विद्युत शास्त्रातील अनेक प्रयोग केले. इटलीच्या अलेस्सान्द्रो व्होल्टा या शास्त्रज्ञाच्या कार्याचा प्रभाव ओहोमवर होता. विद्युतरासायनिक घट (इलेक्‍ट्रोकेमिकल सेल) ची क्षमता आणि धातू अधातू यांची विद्युत वाहकता संदर्भातील ओहोमचे प्रयोग प्रसिद्ध आहेत. विद्युत-वहन संदर्भात ओहोमनी त्याच्या प्रयोगाद्वारे विद्युत धारा आणि विभवांतर या एकमेकीशी समप्रमाणात असतात (संवाहकाच्या दोन टोकांत वाहणारी विद्युतधारा, त्या दोन टोकांमधील विभवांतराच्या समानुपाती असते) हा नियम प्रस्थापित केला. अशा थोर शास्त्रज्ञाचे 6 जुलै 1854 रोजी निधन झाले. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या स्मरणार्थ विद्युत-प्रतिकार-शक्ती (इलेक्‍ट्रिक रेझीसटन्स) मापन एकासाठी ओहम असे नाव दिले आहे. 
            ---प्रा. विठ्ठलराव ख्याडे
*========================*

5 जुलै

*💥🌸दिनविशेष🌸💥*.              
   *जोसेफ निकेफोर निओपेस*

*फोटोग्राफिचे संशोधन*

*स्मृतिदिन - ५ जुलै १८३३*

हा एक फ्रेंच संशोधक होता. आता सहसा त्याला फोटोग्राफीचा  शोधकर्ता म्हणुन मानले जाते. आणि त्या क्षेत्रात एक अग्रणी म्हणून मानले जाते. निओपेसने हेलिओग्राफी या तंत्रज्ञानाच्या साह्याने फोटोग्राफिक प्रक्रियेचे जगातील सर्वात जुने उत्पादन तयार केले. १८२५ मध्ये त्याने फोटोएन्ग्रेव्ह प्रिंटिंग प्लेटद्वारे प्रिंट घेतली. १८२६-२७ मध्ये त्याने प्रत्यक्ष जगाच्या दृश्याचे सर्वात जुने जिवंत फोटोग्राफ काढण्यासाठी एका आदिम कॅमेऱ्याचा वापर केला. ही कल्पना त्याच्या मोठ्या भावाची होती जी त्याने प्रत्यक्षात उतरवी आणि विकसित केली.

3 जुलै


*💥🌹 Today in Science🌹💥*
        *Jacob Schick*

*Inventor of first electric razor*

*Death - July 3, 1937*

Col. Jacob Schick (September 16, 1877 – July 3, 1937) was an American inventor and entrepreneur who patented the first electric razor and started the Schick Dry Shaver, Inc. razor company.[1] He is the father of electric razors. Schick became a Canadian citizen in 1935 to avoid an investigation by the Joint Congressional Committee on Tax Evasion & Avoidance after he moved most of his wealth to a series of holding companies in the Bahamas.

*Inventions*

Successfully patented first electric razor in May, 1930.[3] Also patented the General Jacobs Boat for use in shallow water, and an improved pencil sharpener.
*========================

2 जुलै

*♻️विज्ञान शिक्षक मित्र समूह♻️*
========================
*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*
       
*💥🌸दिनविशेष🌸💥*
            *डग्लस एंजल्बर्ट*

*कंप्युटरच्या माऊसचे संशोधन*

*स्मृतिदिन - २ जुलै २०१३*

डगलस कार्ल एंजेलबर्ट अथवा डगलस कार्ल एंगेल्बर्ट (30 जनवरी 1925 – 2 जुलाई 2013) एक अमेरिकी अभियंता और आविष्कारक थे। उन्हें मुख्यतः संगणक माऊस के आविष्कारक और हाइपरटेक्स्ट, सहयोगी सॉफ्टवेयर और इंटरएक्टिव कंप्यूटिंग के रूप में जाना जाता है।
*पूर्व जीवन*
डग एंजेलबर्ट का जन्म अमेरिका के ओरेगन स्थित पोर्टलैंड में हुआ था। उनके पिता कार्ल लुईस एंगेल्बर्ट एक रेडियो मैकेनिक और मां ग्लेडिस शेर्लोट अमेलिया मुनसन एंगेल्बर्ट गृहणी थीं। उन्होंने ओरेगन स्टेट यूनिवर्सिटी से विद्युत अभियांत्रिकी की पढ़ाई की। उन्होंने दूसरे विश्व युद्ध के दौरान रडार टेक्नीशियन की भूमिका निभाई। उन्होंने नासा की पूर्ववर्ती संस्था नाका में विद्युत अभियंता के तौर पर भी काम किया, लेकिन जल्द ही वह इस नौकरी को छोड़कर डॉक्टरेट की उपाधि के लिए बर्कले स्थित कैलीफोर्निया विश्वविद्यालय चले गए। इंसान के ज्ञान को बढ़ाने में संगणक कैसे मदद कर सकता है, इस बात में अभिरूचि उन्हें स्टैनफोर्ड शोध संस्थान ले आई।

*कैरियर और उपलब्धियाँ*

स्टैनफोर्ड शोध संस्थान में उन्होंने ऑग्मेंटेशन शोध केन्द्र के नाम से अपनी प्रयोगशाला स्थापित की। उनकी प्रयोगशाला ने एआरपीएनेट के विकास में सहयोग किया़, जिसने इंटरनेट का उद्भव हुआ। उन्होंने 1968 में सैन फ्रांसिसको में माउस का पहला सार्वजनिक प्रदर्शन किया। इसी कार्यक्रम में उन्होंने पहले वीडियो टेलीकांफ्रेंस का प्रदर्शन किया और टेक्स्ट आधारित लिंक के अपने सिद्धान्त की व्याख्या की।1883 में एसआरआई 40,000 अमरीकी डॉलर में इस तकनीक का लाइसेंस एपल को विक्रय किया।

*व्यक्तिगत जीवन*

उनकी प्रथम पत्नी बेलार्ड, जिनकी विवाह के 47 वर्ष पश्चात 1997 में मृत्यु हुई, से चार बच्चे गेरडा, डायना, क्रिस्टीना और नॉर्मन हैं। 26 जनवरी 2008 को उन्होंने "करेन ओ'लियरी एंजेलबर्ट" से पुनर्विवाह किया। 2007 में एंजेलबर्ट अलजाइमर नामक रोग पाया गया था। 2 जुलाई 2013 को उनका गुर्दे की विफलता के कारण निधन हो गया।

*पुरस्कार*

नेशनल मेडल फॉर टेक्नालॉजी, लेमेलसन-एमआईटी पुरस्कार, टर्निंग पुरस्कार (1997), लोवेलास पदक, नोर्बेर्ट वीनर अवार्ड फॉर सोशल एंड प्रोफेशनल रिस्पांसिबिलिटी, कंप्यूटर इतिहास संग्रहालय फैलो अवार्ड.
*========================

1 जुलै


*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*
        
       *वसंतराव नाईक*

      *हरितक्रांतीचे प्रणेते*

*जन्मदिन - १ जुलै १९१३*

वसंतराव नाईक (०१ जुलै. १९१३: पुसद, यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र - इ.स. १८ ऑगस्ट १९७९)

        आज १ जुलै, महाराष्ट्रातील कृषी क्रांतीचे जनक, वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस, त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कृषीदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

कृषी विद्यापीठामार्फत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचे काम वसंतराव नाईक यांनी केल्यामुळेच महाराष्ट्रात हरितक्रांती होऊ शकली. त्यातूनच वसंतराव हरितक्रांतीचे प्रणेते ठरले.
वसंतराव नाईक यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे स्थापन केली. चार कृषी विद्यापीठे असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. या कृषी विद्यापीठांमार्फत त्यांनी दर्जेदार बियाणे निर्माण केले. या बियाणांमुळे कृषिक्षेत्रात नवी क्रांती झाली. धान्य उत्पादन वाढले. एकाच वेळी धवल व हरितक्रांती घडवून आणण्याचे संपूर्ण श्रेय वसंतराव नाईक यांना जाते.
वसंतराव नाईक यांच्यात आधुनिक महाराष्ट्र कसा घडवायचा हा दृष्टिकोन होता. आज आणली जात असलेली अन्नसुरक्षा योजना वसंतराव नाईकांनी त्याकाळी मांडली होती.

नाईकांनी अन्नधान्याचे आव्हान स्वीकारले आणि राज्यभर तुफानी दौरे करुन शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीने शेती करुन संकरित बियाणांचाच जास्तीत जास्त पेरा करुन राज्याला व पर्यायाने देशाला अन्नधान्याच्या गंभीर संकटातून बाहेर काढण्याचे कळकळीचे आवाहन केले. संकरीत बियाणांचा वापर करायचे शेतकऱ्यांना केवळ आवाहनच त्यांनी केले नाही. तर त्यांच्या स्वतःच्या गहुली व शेलू येथील शेतीत संकीरत बियाणांची मोठय़ा प्रमाणावर लागवड त्यांनी केली. त्यांच्या या धाडसी धोरणामुळे संकरित बियाणांचा प्रचार तडकाफडकी झाला आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील चित्र बदलले. सुरुवातीला शंभर एकर जमीन संकरित बियाणांच्या लागवडीखाली होती, ती ५०,००० एकरांच्या पुढे गेली व हे प्रमाण सतत वाढत होते. नाईकांच्या प्रयत्नांना मोठय़ा प्रमाणात यश येत होते. याच वेळी अमेरिकेने पीएल 480 करारांतर्गत कुरापती काढून अन्नधान्याचे जहाज रोखून धरल्याबरोबर नाईकांचा प्रखर राष्ट्रीय बाणा जागृत झाला आणि ते पुण्याच्या शनिवार वाडय़ासमोर गरजले, ‘महाराष्ट्र जर येत्या दोन वर्षात अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्या.’ त्यांचे हे आवाहन स्वीकारुन सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली. या यंत्रणेतील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी चोखपणे बजावली व महाराष्ट्र आणि पुढे देशसुध्दा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. विदेशातील निकृष्ट दर्जाच्या धान्याची आयात करणे बंद झाले.

जो देश अन्नधान्याच्या बाबतीत सर्वस्वी परावलंबी बनला होता तो स्वावलंबी झाला ही परिस्थिती त्यांच्या हयातीतच आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतांनाच निर्माण झाली.हे विशेष महत्त्वाचे आहे. म्हणूनच बांगलादेशाच्या युध्दाच्या वेळेस म्हणजे १९७१-७२ साली बांगलादेशाच्या लक्षावधी निर्वासितांना भारत सरकार अन्न पुरवू शकले. बलाढय़ शक्ती असलेल्या रशियाला अथवा चीनलासुध्दा त्या काळात जे शक्य झाले नाही ते भारताने करून दाखविले. त्यामुळे भारत सर्वत्र कौतुकाचा विषय बनला. भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचा जागतिक अन्न व शेती संघटनेच्यावतीने व डॉ. बोरलॉग यांच्या मेक्सिकोतील आंतरराष्ट्रीय गहू व मक्याच्या संशोधन केंद्रातर्फे आणि अनेक राष्ट्राच्या वतीने जाहीर गौरव केला गेला. या गौरवात नाईकांचा मोठा वाटा होता.

१९७२ च्या दुष्काळाचा सामना करतांना नाईकांनी जे परिश्रम घेतले. त्याला तोड नाही. या दुष्काळामधूनच क्रांतकारी अशा रोजगार हमी योजनेने महाराष्ट्रात आकार घेतला. या योजनेच्या अंमलबजावणीचे श्रेय नाईकांनाच जाते. त्यातही रोजगाराची हमी देणारी एवढी मोठी आणि क्रांतीकारी योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशपातळीवरचे पहिले राज्य होते. आज तर महाराष्ट्राची ही योजना केंद्र सरकारने जशीच्या तशी राष्ट्रीय स्तरावर नरेगा च्या नावाने सुरु केली आहे. यामागे महाराष्ट्राचे व ही योजना सुरु करणाऱ्या ह्या महान नेत्यांचे कर्तृत्व आहे. विशेष म्हणजे आर्थिक अडचणीत असतानाही एवढी मोठी कोटय़ावधी रुपयांची योजना कशी सुरू करायची असा प्रश्न पडला असतानाही तत्कालीन विरोधीपक्ष नेते कृष्णराव धुळुप आणि इतर सर्व विरोधीपक्ष सदस्यांनी सरकारला करवाढ करायचे सुचवून जगातील संसदीय लोकशाहीच्या इतिहासात एका नवीन घटनेची नोंद झाली.

नाईकांनी महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेत. या प्रयत्नातूनच महाराष्ट्रातील ज्वारी खरेदी योजना, कापूस एकाधिकार योजना, वसंत बाध बंधाऱ्यांची निर्मिती, तब्बल चार कृषी विद्यापीठाची निर्मिती, अनेक सहकारी सुतगिरण्या आणि सहकारी साखर कारखान्यांची निर्मिती, सहकारी दुग्ध विकास संघाची निर्मिती, या सारख्या कृषी क्षेत्राशी आणि शेतकऱ्यांशी निगडीत अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्यात. नाईकांचे शेती आणि शेतकऱ्यांवर निस्सीम प्रेम होते. ते त्यांनी स्वतः पुरते मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील अनेक पुढाऱ्यांना त्यांनी आग्रहाने शेती घ्यायला लावली. नाईकांनी शेती व शेतकर्यांवर जसे प्रेम केले तसेच पक्षातील व विरोधी पक्षातील नेत्यांचाही सदैव आदर केला. आज नाईकांचा जन्मदिवस. त्यानिमित्त ह्या महानायकास विनम्र अभिवादन.
*========================*

1 जुलै दिनविशेष

   
 *♻️🌸दिनविशेष🌸♻️*

               *१ जुलै*

          *डाॅक्टर दिवस*

आपण भारतात १ जुलै रोजी भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा करतो.
सध्याच्या धावपळीच्या युगात अनारोग्य हा कळीचा मुद्दा आहे. जसे आईशी आपले नाते असते तसेच ते आपली डॉक्टरशी असते. कोणत्याही आरोग्यविषयक तक्रारीसाठी आपण ज्या व्यक्तीवर अवलंबून असतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर. डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या मागण्यांसाठी डॉक्टरांची सततची होणारी आंदोलने, उपोषणे आणि या घटनांचे सर्वसामान्यांवर होणारे दुष्परिणाम तसंच इतर क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रातही बोकाळलेला भ्रष्टाचार. तत्सम असंख्य गोष्टींमुळे एकूणच वैद्यकीय व्यवस्थेबद्दलचं सर्वसामान्यांचं मत काहीसं कलुषित झालेलं दिसतं. असं असताना आज हा दिवस नव्याने डॉक्टर-रुग्ण या नात्यातील विश्वासार्हता दृढ करण्याच्या उद्देशाने साजरा केला गेल्यास भविष्यात आंदोलनाप्रसंगी सर्वसामान्यांना वेठीस न धरण्याचे आशादायी चित्र आपण रंगवू शकतो. मुळात, समाजात चांगल्या-वाईट प्रवृत्ती समाजाच्या सर्वच स्तरावर आहेत. डॉक्टरही माणूस आहे, हे आपण विसरून चालणार नाही. आपल्या कर्तव्याप्रती दक्ष असणा-या, दिनरात्रीची तमा न बाळगता सेवेसाठी तत्पर असणा-या आणि संशोधनातून वैद्यकीय क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणा-या तसंच कित्येकांना नवं जीवनदान देणा-या अनेक डॉक्टरांची उदाहरणं आजही आपल्या आसपास दिसतात. त्यामुळे डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. आज हा दिवस त्या चांगल्या गोष्टींची आठवण करण्याचा.. आपल्या डॉक्टरांनी आतापर्यंत आपल्या जीवनात सुदृढ आरोग्यासाठी केलेल्या मदतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा. आतापर्यंत आपल्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घेत आलेल्या आपल्या डॉक्टरांना आजच्या जागतिक डॉक्टर दिनानिमित्त त्यांच्याही उत्तम स्वास्थ्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा.
--संजीव वेलणकर

मंगळवार, ७ जुलै, २०२०

28 जून

*डाॅ. कमला माधव सोहोनी*

*भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ*

*स्मृतिदिन - २८ जुन १९९८*

       डॉ.कमला माधव सोहोनी यांचा जन्म बंगळुरूला झाला. योगायोग म्हणजे याच वर्षी त्यांचे वडील नारायण भागवत यांनी बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून रसायनशास्त्र घेऊन एम. एस्सी. केली होती.  नुकत्याच सुरू झालेल्या या इन्स्टिट्यूटमधील पहिल्याच तुकडीत नारायणरावांनी प्रवेश मिळवला होता आणि एम. एस्सी. मिळवली. १९१९ साली पत्नीच्या निधनानंतर मुलांसह ते मुंबईत आले. त्यांच्या कन्या दुर्गाबाई भागवत या प्रसिद्ध मराठी लेखिका म्हणून नावाजल्या, तर कमला सोहोनी यांनी रसायनशास्त्रातील शास्त्रज्ञ म्हणून नाव कमावले. कमला मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून रसायनशास्त्र आणि भौतिकी विषय घेऊन बी.एस्सी. झाल्या आणि मुंबई विद्यापीठातून पहिल्या वर्गात, पहिल्या आल्या. त्यांना ‘सत्यवती लल्लुभाई सामळदास शिष्यवृत्ती’ आणि जुन्या मुंबई प्रांताची टेक्निकल रिसर्च स्कॉलरशिप मिळाली.  

त्यानंतर त्यांनी वडिलांसारखेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एम. एस्सी. करण्यासाठी अर्ज टाकला, पण त्यांना प्रवेश नाकारला गेला. याविषयी शहानिशा करण्यास वडिलांनी कमलाबरोबर बंगळुरूला जाऊन इ़न्स्टिट्यूटच्या संचालकांची - नोबल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांची भेट घेतली.  त्यांनी  ‘‘ती मुलगी आहे म्हणून आम्ही प्रवेश नाकारला,’’ असे सांगितले.  तेव्हा कमलाने उत्तर दिले की, ‘‘तुम्ही मला प्रवेश नाकारून माझ्यावर आणि माझ्यानंतर येणार्‍या मुलींवर अन्याय करीत आहात.  मी मुंबईला परत जाणार नाही. येथेच तुमच्या दारापुढे बसून सत्याग्रह करीन’’. हे ऐकून डॉ. रमण चमकले पण म्हणाले की, ‘‘मी तुला प्रवेश देईन पण एका अटीवर; वर्षभर तात्पुरता प्रवेश देऊन काम ठीक असेल तरच प्रवेश पक्का करीन, नाहीतर तुला काढून टाकीन.’’ कमलाने ते मान्य केले आणि वर्षभर श्रीनिवासय्यांच्या हाताखाली उत्तम काम करून डॉ. रमणकडून वाहवा मिळवली. कडधान्ये, दूध यांतील प्रथिने वेगळी करून त्यांचे अमिनो आम्लात पृथक्करण यावर त्यांनी संशोधन केले आणि त्या कामावर १९३६ साली त्यांनी एम. एस्सी. मिळवली.

त्यानंतर वर्षभर त्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये होत्या. त्या वेळी त्यांना मुंबई विद्यापीठाच्या दोन शिष्यवृत्त्या-‘सर मंगळदास नथुभाई’ आणि ‘स्प्रिंगर रिसर्च स्कॉलरशिप’- मिळाल्या. त्याआधारे केंब्रिज विद्यापीठात दाखल होऊन त्यांनी १९३९ साली पीएच.डी. मिळवली. त्यांनी वनस्पतीतील सायटोक्रोमचे अस्तित्व शोधून मूलभूत संशोधन केले.  त्याबद्दल नोबल पुरस्कार विजेते डॉ. सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी पण त्यांच्या कामाची वाखाणणी केली.

१९३९ साली दिल्लीच्या लेडी हार्डिंग्ज महाविद्यालयात त्या जीवरसायनशास्त्र शिकवत होत्या. डॉ. सुशिला नायर यांनी डॉ. कमलांच्या हाताखाली ‘रक्तातील कोलेस्टेरॉल व निरनिराळ्या दुखण्यांत त्याचा होणारा प्रभाव’ यावर संशोधन केले. डॉ. सुशिला नायर यांनी नंतर म. गांधींबरोबर काम केले आणि त्या स्वतंत्र भारताच्या आरोग्यमंत्री झाल्या. १९४२ साली डॉ. कमला कुन्नूर येथील पोषण संशोधन प्रयोगशाळेच्या उपसंचालक झाल्या. येथे त्यांनी जीवनसत्त्वावर संशोधन केले. 

सप्टेंबर, १९४५ साली त्यांचा विवाह डॉ. माधव सोहोनी यांच्याशी झाला आणि त्या मुंबईत स्थायिक झाल्या. त्या वेळचे मुंबई नगरपालिकेचे आयुक्त बलसारा होते. त्यांनी डॉ. कमला सोहोनींना मुंबई नगरपालिकेत पब्लिक अ‍ॅनॅलिस्टचे काम दिले.  येथे दोन वर्षांनी त्यांनी मुंबईच्या रॉयल इ़न्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये जीवरसायनशास्त्र विभाग सुरू केला आणि त्याच्या त्या विभागप्रमुख झाल्या. त्यांच्या हाताखाली १० पीएच.डी. चे विद्यार्थी संशोधन करीत होते. तसेच, डॉ. मगर हे व्याख्यातेही डॉ. कमलांना संशोधन आणि प्रयोगशाळा सुसज्ज करण्यास मदत करायचे.  या दोघांनी ‘नीरा’ या भारतीय पेयाची पौष्टिकता आणि कडधान्यातील ‘टिप्सिन इनहिबिटर्स’ यांवर संशोधन केले.

डॉ. कमलांना हाफकिन संस्थेच्या पुनर्रचना समितीवर नेमेले गेले आणि त्यांनी संशोधन आणि उत्पादन विभाग वेगवेगळे करण्याचा सल्ला १९६० साली दिला आणि त्याप्रमाणे आजही हे दोन विभाग वेगळे आहेत.  बडोद्यात महाराज सयाजीराव विद्यापीठात जीवशास्त्राचा विभाग सुरू करण्यास त्यांनी मदत केली. त्या इतर अनेक विद्यापीठांच्या समित्यांवर सल्लागारम्हणून होत्या. 

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांच्या सांगण्यावरून त्यांनी ताड, माड, शिंदी आणि खजूर या चार प्रकारच्या पाम वृक्षांतील नीरेचे संशोधन केले आणि त्यांच्या या संशोधनाचा गौरव १९६० साली डॉ. राजेंद्रप्रसादांच्या हस्ते, सर्वोत्कृष्ट संशोधनाचे पदक देऊन केला गेला.

१९४२-१९४३ साली आरे कॉलनीची स्थापना झाली.  पूर्वी आरेचे दूध काचेच्या बाटलीतून सील करून वितरित व्हायचे. दिनकर देसाई शिक्षणमंत्री असताना, आरेच्या सीलबंद बाटलीतील दुधात अळ्या सापडल्या आणि त्याचे पर्यवसान शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीत झाले. श्री. देसाईंनी हे कोडे उलगडण्याकरिता डॉ. कमला सोहोनींना पाचारण केले. त्यांनी सर्व निरीक्षणांती निष्कर्ष काढला, की ग्राहकांनी परत केलेल्या रिकाम्या बाटल्या न धुतल्यामुळे त्यांत माशा, किडे अंडी घालतात ते दिसत नाही. अशा बाटल्यांत दूध भरल्यामुळे अंड्यांतून बाहेर आलेल्या अळ्या दुधात सापडल्या. त्यामुळे रिकाम्या बाटल्या स्वच्छ धुवून देणे ही अट ग्राहकाला घातली गेली.

डॉ. कमला सोहोनी १९६५ ते १९६९ या चार वर्षांसाठी भारतीय विज्ञान संस्थेच्या (इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) संचालिका होत्या. या संस्थेच्या त्या पहिल्या महिला संचालिका होत्या. त्यांनी तडफदारपणे काम केले आणि योग्य निर्णय घेतले. १९६९ साली त्या निवृत्त झाल्या. 

त्यानंतर कमला सोहोनी जवळजवळ २७ वर्षे ग्रहक चळवळीतर्फे भेसळ प्रतिबंधाचे काम पाहिले. विद्युत उपकरणांवर भारतीय मानकाचा शिक्का असायला हवा, याचा त्यांनी आगह धरला. १९७४ साली मराठी विज्ञान परिषदेतर्फे तळेगावला त्यांचा सत्कार करण्यात आला.

29 जून

*प्रशान्त चन्द्र महालनोबिस*

*भारतीय वैज्ञानिक आणि गणितज्ञ*

*जन्मदिन - २९ जून १८९३*

प्रशांत चंद्र महालनोबिस (२९ जून, इ.स. १८९३ - २८ जून, इ.स. १९७२) हे भारतीय शास्त्रज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ होते.

जन्म- २९जून १८८३, कोलकाता,बंगाल,ब्रिटिश भारत

मृत्यू- २८ जून १९७२ कोलकाता,पश्चिम बंगाल, भारत

हे भारतीय शास्त्रज्ञ व संख्याशास्त्रज्ञ होत.

त्यांना भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्यासाठी ओळखले जाते.ते स्वातंत्र्योत्तर भारताच्या नवनिर्वाचित मंत्रीमंडळाचे सांख्यिकी सल्लागार बनले.तसेच औद्योगिक उत्पादन जोरदार वाढ करून बेरोजगारी कमी करण्याचा सरकारच्या उद्देशपूर्तीसाठी त्यांनी योजना तयार केली.

महालनोबिस यांची प्रसिद्धी 'महालनोबिस अंतर' यासाठी आहे जे की, एक संंख्याशास्त्रीय एकक आहे. त्यांनी भारतीय सांख्यिकी संस्थेची स्थापना केली.
आर्थिक योजना आणि सांख्यिकी विकास या क्षेत्रातील प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकार त्यांचा जन्मदिवस २९ जून हा 'राष्ट्रीय सांख्यिकी दिवस'म्हणून साजरा करते. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश सामाजिक-आर्थिक नियोजन आणि धोरण निश्चितीमधे प्रो.महालनोबिस यांच्या योगदानाबद्दल तरुण पिढीला जागरूक करणे तसेच प्रेरणा देणे होय.

पुरस्कार

वेलडॉन मेमोरिअल प्राईज (१९४४)

पद्मविभूषण (१९६८)


30 जून

*३० जुन २०२०*

*जागतिक लघुग्रह दिवस*
*World Asteroid Day 30 June 2020*

अस्टेरॉइड म्हणजे लघु ग्रह!! त्यांना प्लॅनेटॉइड असे ही म्हटले जाते. सूर्यमाला तयार होताना ज्यांच्यापासून मोठे ग्रह तयार होऊ शकले नाहीत, असे उर्वरित राहिलेले असंख्य छोटे मोठे दगडधोंडे(पाषाण), अशनी, एका ठराविक कक्षेतून सूर्याच्या भोवती फेरी मारत असतात. यातील काहींच्या कक्षा या पृथ्वीकक्षेला छेदून जातात. केवळ एकमेकांना छेदणाऱ्या कक्षा असल्याने त्यांची टक्कर होत नाही; तर त्यासाठी पृथ्वी कक्षेला छेदनाऱ्या छेदबिंदूपाशी एकाच वेळी पृथ्वी व अशनी, लघुग्रह, वा धूमकेतू यावा लागतो. पृथ्वीला टक्कर देऊ शकतील असे सुमारे दहा लक्ष लघु ग्रह अवकाशात फिरत आहेत. यापैकी खूपच कमी म्हणजे अगदी काही टक्केच लघुग्रह शास्त्रज्ञांनी आजपर्यंत शोधले आहेत. प्रत्येक लघुग्रह हा आकाराने वेगवेगळा असतो. ज्ञात असलेला सर्वात मोठा लघु ग्रह सेरेस हा आहे जो ९४० किमी (५८३ मैल) इतका मोठा आहे. सर्वात लहान लघुग्रह २०१५ टी सी २५ हा असून तो फक्त ६ फूट लांब आहे जो पृथ्वी जवळून ऑक्टोबर २०१५ ला गेला होता.
बरेच लघु ग्रह अनियमित आकाराचे असून काही मोठे च फक्त थोडे गोलाकार असतात. तर काही लघु ग्रहांवर मोठे खड्डे अथवा विवरे असतात जसे की वेस्टा या लघु ग्रहावर २८५ मैल एवढे मोठे व्यासाचे क्रेटर आहे.१५० हून अधिक लघु ग्रहांना एक किवा दोन चंद्र देखील आहे. बायनरी म्हणजे जोडी ने एकमेकां भोवती फिरणारे लघु ग्रह देखील अस्तित्वात आहेत. सामान्यपणे लघु ग्रहावरील सर्वसाधारण तापमान हे वजा १०० डिग्री फेरेनहाईटस एवढे म्हणजे वजा ७३ अंश सेल्सिअस एवढे असते. त्यांच्या पृष्ठभागावर धुळीचे आच्छादन असते. कोट्यवधी वर्षांपासून त्यांची स्थिती आहे तशीच असल्याने त्यांच्या अभ्यासातून सौर मालेच्या उत्पत्ती विषयी खुप महत्वपूर्ण माहिती मिळेल अशी अभ्यासकांना आशा आहे. 
लघु ग्रह अथवा अशनी हे सौर मालेत तीन ठिकाणी आढळतात. प्रामुख्याने मंगळ आणि गुरू ग्रह यामधील भागात सर्वात जास्त संख्येने लघु ग्रह आहेत. यालाच लघु ग्रह पट्टा अथवा अस्टे रॉइड बेल्ट असे संबोधले जाते. येथे १०० किमी व्यास असलेले २०० पेक्षा जास्त लघु ग्रह आहेत. तसेच १.१ मिलियन हे ५ किमी पेक्षा जास्त व्यास असलेले व १.९ मिलियन लघु ग्रह १ किमी पेक्षा जास्त व्यास असलेले आहेत. त्याशिवाय लाखों च्या संख्येने छोटे छोटे अशनी आहेत. 

*जागतिक लघुग्रह दीन* साजरा करण्या मागचा उद्देश हा आहे की पृथ्वीतलावरील बहुसंख्य जनता पृथ्वीवर काय घडतय यातच गुरफटलेली असते. अवकाशातील लघुग्रह वा अशनी या घटका पासुन पृथ्वीला किती मोठा धोका संभवतो याविषयी ते अनभिज्ञ असतात. त्यामुळेच या विषया संबंधी पृथ्वी वासियांना जागृत करण्यासाठी, लघुग्रहां चे सोलर सिस्टीम मधील काय स्थान आहे ते ओळखण्यासाठी व त्यापासून होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी काय करता येईल याचे मार्गदर्शन करण्यासाठी जागतिक लघुग्रह दीन साजरा करण्यात येतो.
 यामागे पृथ्वीला व पृथ्वीवरील सजीवांना धोकादायक ठरणाऱ्या अंतराळातील दगडधोंडे, खडक, अशनी, लघुग्रह, धूमकेतू यांबाबत सावध करण्याचा केवळ हेतू आहे. ३० जुन १९०८ सालात पृथ्वी वरील सायबेरिया प्रांतात तुंगुश्का खोऱ्यात अशनी आदळल्यामुळे सुमारे २००० एकरचा परिसर अक्षरशः भस्मसात झाला.  तुंगुश्का खोऱ्याचा हा परिसर दुर्गम आणि दलदलीचा असल्याने, तेव्हा मोठ्या प्रमाणावर होऊ शकलेली जीवितहानी टळली. ही टक्कर जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकलेल्या अणु बॉम्ब पेक्षा एक हजार पटीने अधिक शक्तिशाली होती. तुंगुष्का अशनी ही पृथ्वीच्या नजीकच्या काळात अवकाशातून आलेली सर्वात मोठी नैसर्गिक वस्तू होय.
या तूंगुष्का घटनेच्या स्मरणार्थ ३० जून हा दिवस 'जागतिक लघुग्रह (अशनी) दिन' म्हणून पाळण्याचे ठरले.

सुमारे चारशे पन्नास कोटी वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीचा जन्म झाला. तर साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मेक्सिकोच्या युकातन भागात कोसळलेल्या महाकाय अशनीमुळे निर्माण झालेला प्रलयंकारी महास्फोट हा त्यावेळी पृथ्वीवरील डायनॉसोरच्या नाशास कारणीभूत ठरल्याचे अभ्यासकांचे मत आहे. ही वेळ मानवावर ही येऊ नये यासाठी आपल्याला आताच अनेक उपाय योजना करून ठेवाव्या लागतील हे नक्की! 
या बाबत प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ निल डिग्रिज टायसन यांचे विचार इथे मांडणे आवश्यक ठरते. ते म्हणतात: लघुग्रह अथवा अशनी पृथ्वी कडे येत असताना त्यांचा मार्ग बदलण्याची आपली(मानवाची) क्षमता असतानाही जर आपण त्याची तयारी केली नाही आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या टकरी मुळे डायनोसोरससारखा आपलाही  विनाश झाला तर या अनंत विश्वातील एलियन साठी ती मोठी हास्यास्पद बाब ठरेल आणि मी त्याचा एक भाग बनू इच्छित नाही!! हे विधान मजेशीर असले तरीही त्यामागचा गर्भितार्थ फार मोठा आहे.

यावर्षी प्रथमच कोरोना महामारी मुळे हा दिवस डिजिटल स्वरूपात साजरा केला जाणार आहे. याचे थेट प्रसारण लकझेंबर्ग शहरातून केले जाणार आहे. यादरम्यान या क्षेत्रातील विविध तज्ज्ञ  सौर मालेच्या निर्मितीमध्ये लघु ग्रहांचे योगदान तसेच लघु ग्रह शोधण्या साठी , त्यांना ट्रॅक करण्यासाठी तसेच आलेल्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी वापरण्यात येणारे नवनवीन तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करतील.
भारतात ही यादिवशी विविध कार्यक्रम साजरे केले जातात. नाशिक येथील स्पेस सायन्स विषयी मोलाचे कार्य करत असलेली संस्था कल्पना युथ फाऊंडेशन तर्फे या दिवशी मनोरंजक अशा मोफत क्विझ चे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती. सहभागी होण्यासाठी लिंक खालील प्रमाणे:

29 जून


*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*
        *पद्मनाभन कृष्णगोपाल अयंगार*

*भारत के गणमान्य परमाणु वैज्ञानिक*

*जन्मदिन - २९ जुन १९३१*

पद्मनाभन कृष्णगोपाल अयंगार (29 जून 1931 – 21 दिसम्बर 2011) भारत के गणमान्य परमाणु वैज्ञानिक थे। वे भारत के प्रथम परमाणु बम परीक्षण के सूत्रधार थे। वे भाभा परमाणु अनुसंधान केन्द्र (BARC) के निदेशक और उसके बाद परमाणु ऊर्जा आयोग के अध्यक्ष रहे। वे भारत-अमेरिका असैनिक नाभिकीय सहयोग के विरुद्ध बोलने वालों में अग्रणी थे। उनका मत था कि यह समझौता अमेरिका का अधिक हित साधता है।

देश के संपूर्ण विकास का विचार मन में रखकर कार्य करनेवाले वैज्ञानिकों (संशोधकों) में से एक सम्माननीय वैज्ञानिक हैं, डॉ. पी. के. अय्यंगार। देश के विभिन्न विभागों से आये हुए इन वैज्ञानिकों के कार्यक्षेत्र भी वैविध्यपूर्ण होते हैं। कुछ संशोधक अपने चुने गए विषयों के मूलभूत संशोधन में डूब चुके होते हैं। जनसामान्य को ऐसे संशोधन कार्यों की जानकारी होती ही है, ऐसा नहीं है। दैनंदिन जीवन में कभी-कभी इस कार्य का उपयोग दैनिक व्यवहार में होता ही है, ऐसा भी नहीं है। फिर भी कालांतर में इसी संशोधन के कारण सामान्य मनुष्य का दैनंदिन जीवन भी अप्रत्यक्ष रूप में सुलभ होता रहता है।

पद्मनाभ कृष्ण गोपाल अय्यंगार ने १९६३ में मुंबई महाविद्यालय से डॉक्टरेट की उपाधि प्राप्त की। मुंबई के भाभा अणु संशोधन केन्द्र में पदार्थ विज्ञान अध्ययन विभाग के संचालक के रूप में उन्होंने अपने कार्य का आरंभ किया।

वैज्ञानिक क्षेत्र में विशेष तौर पर अणु ऊर्जा संबंधित क्षेत्र में डॉ.अय्यंगार ने यश प्राप्त किया। ‘सॉलिड स्टेट फिजिक्स’ यह उनके अध्ययन क्षेत्र का विशेष पसंदीदा विषय है। न्यूट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपी तकनीकी ज्ञान एवं उसका उपयोग इस विषय में भी उन्होंने बहुमूल्य संशोधन किए हैं। अ‍ॅटॉमिक फोर्सेस का संबंध एवं उसे ढूढ़ँने के लिए न्यूट्रॉन तकनीकी ज्ञान का उपयोग करने से संबंधित तकनीकी ज्ञान विकसित करना, इसी क्षेत्र को चुनकर डॉ. अय्यंगार ने उसमें महत्त्वपूर्ण संशोधन कर दिखलाया। इसी तकनीक की सहायता से डॉ. अय्यंगार ने अनेक प्रकार के धातुकण एवं विविध प्रकार के क्रिस्टल आदि का अध्ययन किया। साथ ही इसके लिए कुछ विशेष प्रकार की उपकरण व्यवस्था भी विकसित की।

‘पूर्णिमा’ परमाणु केन्द्रों की एक श्रृंखला निर्माण करने में भाभा अणु संशोधन केन्द्र को यश प्राप्ति हुई (१९७२)। अणुशक्ति का उपयोग करके सब्जी, फल, कृषि उत्पादन की क्षमता कैसे बढ़ाई जा सकती है, साथ ही इसका दर्जा कैसे बढ़ेगा, इसके साथ ही अणु शक्ति का उपयोग करके विद्युत निर्मिति को कैसे बढ़ाया जा सकता है, इन सभी क्षेत्रों में संशोधन कार्य करने में डॉ. अय्यंगार का अहम योगदान था।

‘इंडियन अ‍ॅकॅडमी फॉर सायलेन्स’ इस संस्था के वे सदस्य बन गए और वहाँ की फेलोशिप भी उन्हें प्राप्त हुई। ‘इंडियन फिजिक्स अ‍ॅकॅडमी’ साथ ही इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन नाम की संस्था के वे सदस्य बन गए। हंगेरी के ‘रोलँड इव्होट्व्होस अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स’ के वे सदस्य बन गए। डॉ. शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार से उन्हें १९७१ में सम्मानित किया गया। केन्द्रीय वैज्ञानिक एवं औद्योगिक संशोधन संस्था के पुरस्कार से उन्हें गौरवान्वित किया गया। १९७५ में पद्मभूषण भारत सरकार का यह नागरी पुरस्कार उन्हें दिया गया। केरल के ‘सायन्स एवं टेक्नॉलॉजी’ इस संस्था ने भी उन्हें संशोधन के गौरवार्थ में पुरस्कार प्रदान किया गया। ‘इन्सा कौन्सिल’ इस संस्था ने १९८२ में उन्हें अपनी सदस्यता प्रदान की।

भारत सरकार के अणु ऊर्जा आयोग ने ‘बी.ए.आर.सी. स्टडिज इज कोल्ड फ्युज़न’ नामक पुस्तक प्रसिद्ध की। इस पुस्तक का संपादन डॉ. पी. के. अय्यंगार ने एम. श्रीनिवासन् के सहकार्य से किया था।

भाभा अणुसंशोधन केन्द्र के अनेक विभागों के प्रमुख पद का भार सँभालते हुए डॉ. पी. के. अय्यंगार ने इस केन्द्र के संचालक पद का सूत्र भी पूरी जिम्मेदारी के साथ सँभाला। भाभा अणु संशोधन केन्द्र के संचालक पद से विभूषित होनेवाले ये सारे संशोधक अन्तरराष्ट्रीय स्तर पर उन विशेष क्षेत्रों के महान संशोधक के रुप में जाने-माने जाते हैं। इन वैज्ञानिकों के संशोधनीय नियोजन के कारण इस देश के अणुऊर्जा विषयक विकास में गति प्राप्त हुई है, इसमें कोई दोराय नहीं है।

28 जून


*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*
        *प्रशान्त चन्द्र महालनोबिस*

 *भारतीय वैज्ञानिक आणि गणितज्ञ*

*स्मृतिदिन - २८ जून १९७२*
 
      प्रशान्त चन्द्र महालनोबिस (बंगला: প্রশান্ত চন্দ্র মহলানবিস ; २९ जून १८९३- २८ जून १९७२) एक प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक एवं सांख्यिकीविद थे। उन्हें दूसरी पंचवर्षीय योजना के अपने मसौदे के कारण जाना जाता है। भारत की स्वत्रंता के पश्चात नवगठित मंत्रिमंडल के सांख्यिकी सलाहकार बने तथा औद्योगिक उत्पादन की तीव्र बढ़ोतरी के जरिए बेरोजगारी समाप्त करने के सरकार के प्रमुख उद्देश्य को पूरा करने के लिए योजना का खाका खींचे।  महालनोबिस की प्रसिद्धि महालनोबिस दूरी के कारण है जो उनके द्वारा सुझाया गयी एक साख्यिकीय माप है। उन्होने भारतीय सांख्यिकीय संस्थान की स्थापना की।  आर्थिक योजना और सांख्‍यि‍की विकास के क्षेत्र में प्रशांत चन्‍द्र महालनोबिस के उल्‍लेखनीय योगदान के सम्‍मान में भारत सरकार उनके जन्‍मदिन, 29 जून को हर वर्ष 'सांख्‍यि‍की दिवस' के रूप में मनाती है। इस दिन को मनाने का उद्देश्‍य सामाजिक-आर्थिक नियोजन और नीति निर्धारण में प्रो॰ महालनोबिस की भूमिका के बारे में जनता में, विशेषकर युवा पीढ़ी में जागरूकता जगाना तथा उन्‍हें प्रेरित करना है।