Pages
- Home
- गणितीय सूत्रे
- विज्ञान दिनविशेष
- शोधांचा मागोवा
- लोकसत्ता कुतूहल
- विकासपीडिया
- विज्ञान पुस्तके
- ऑनलाइन टेस्ट
- नवोपक्रम निकाल
- वर्तमानपत्र e पेपर
- वाचनालय e-library
- अभासक्रम फ्लिपबूक
- भारतीय वैज्ञानिक माहिती
- Dixa smart
- सायन्स प्रोजेक्ट
- डिस्कवरी
- विशेष चाचणी
- Inspire awards
- सामान्य ज्ञान (G.K Test)
- शै. व्हिडिओ
- कोविड-19 प्रश्नमंजुषा
- अवकाशवेध
- दिनविशेष प्रश्नमंजुषा
- वर्ग 1 ते 9 ऑनलाइन टेस्ट
- ISRO compitation
- राणी लक्ष्मीबाई दिनविशेष चाचणी
- योगदिन प्रश्नमंजुषा
- लोकसंख्या दिन प्रश्नमंजुषा
- आपले नाव मंगळ ग्रहावर पाठवा
- इयत्ता निहाय शैक्षणिक दिनदर्शिका
- शिक्षक दिन चाचणी
- भारतीय वैज्ञानिक
शुक्रवार, १ मे, २०२०
Today in Science 1 may
*Lawson Tait*
Birth 1 may 1845
Robert Lawson Tait (1 May 1845 – 13 June 1899) was a pioneer in pelvic and abdominal surgery and developed new techniques and procedures. He emphasized asepsis and introduced and advocated for surgical techniques that significantly reduced mortality. He is well known for introducing salpingectomy in 1883 as the treatment for ectopic pregnancy, a procedure that has saved countless lives since then. Tait and J. Marion Sims are considered the fathers of gynecology.
*Robert Lawson Tait*
*During this time, his work included:*
1)First removal of an organ (ovary) (oophorectomy) for pain.
Observation of 2)association of cystic ovaries and excessive menstrual bleeding.
3)Surgical induction of menopause by removal of ovaries.
4)Removal of infected tubes.
5)Drainage of pelvic abscess.
6)First appendectomy 1880. It was later learned that he was anticipated by French-born English surgeon Claudius Amyand in 1735.
7)First cholecystotomy (gallbladder surgery).
8)Asepsis in lieu of Lister's antisepsis; he avoided the use of carbolic acid.
9)Flushing of peritoneal cavity at end of operation.
💥🌸दिनविशेष🌸💥 *२ मे
*💥🌸दिनविशेष🌸💥*
*२ मे २०२०*
*विश्व खगोल विज्ञान दिवस*
*अंतरीक्ष विज्ञान दिवस*
विश्व खगोल विज्ञान दिवस ( World Astronomy Day) हर साल मनाया जाने वाला इवेंट है जिसे विश्व भर में बसंत और पतझड़ के मौसम में वर्ष में दो बार मनाया जाता है, इस वर्ष वर्ल्ड एस्ट्रोनॉमी डे 2 मई दिन शनिवार को मनाया जाएगा
एस्ट्रोनॉमी डे कब मनाया जाता है? When Is World Astronomy Day In Hindi
हर साल वर्ल्ड एस्ट्रोनॉमी डे दो बार बनाई जाता है एक बसंत में तथा दूसरा पतझड़ में, सामान्यतया अप्रैल और अक्टूबर में मनाए जाते हैं
विश्व खगोल विज्ञान दिवस मनाए जाने के पीछे उद्देश्य आम जनता का खगोल विज्ञान (Astronomy) से परिचय करवाना है इसके अंतर्गत सामान्य लोग, शौकिया खगोल शास्त्री, अंतरिक्ष विज्ञान में दिलचस्पी रखने वाले लोग मिलते हैं और अंतरिक्ष विज्ञान के रोचक और अनोखे प्रयोग करते हैं. भारत के और दुनिया भर के स्कूलों में बच्चों में अंतरिक्ष विज्ञान के प्रति रुचि उत्पन्न करने के लिए कई तरह के रोचक प्रयोग जैसे टेलीस्कोप से चंद्रमा तारों , ग्रहों को देखना आदि प्रयोग किए जाते हैं, इन प्रयोगों को करने से बच्चे रोमांचित हो जाते हैं तथा जो लोग अंतरिक्ष विज्ञान के बारे में जानना चाहते हैं वह भी इस प्रकार के कार्यक्रमों में शामिल होकर जानकारी हासिल करते हैं.
विश्व खगोल विज्ञान दिवस का इतिहास – History Of World Astronomy Day In Hindi
विश्व खगोल विज्ञान दिवस (World Astronomy Day) की शुरुआत अमेरिका के कैलिफोर्निया मे 1973 में शुरू हुई. इसकी शुरुआत एस्टॉनोमिकल एसोसिएशन आफ नार्थन कैलिफोर्निया ( Astronomical Association Of North California) के अध्यक्ष Doug Berger ने की थी, उन्होंने सोचा की अंतरिक्ष विज्ञान (Space Science) में दिलचस्पी रखने वाले सभी लोग अंतरिक्ष वेधशाला तक सफर करके नहीं जा सकते इसके लिए छोटे-छोटे टेलीस्कोप्स उनके शहर में ही उपलब्ध कराए जाने चाहिए जिससे वह वर्ष में दो बार आकाश का अध्ययन कर सकें इसके लिए उन्होंने शहरों, शॉपिंग मॉल्स गली के कोनो आदि में छोटे-छोटे टेलीस्कोप लगवाए .
उनका यह आइडिया काम कर गया, लोगों ने वर्ल्ड एस्ट्रोनॉमी डे में काफी दिलचस्पी दिखाई, पहले जिन लोगों ने टेलीस्कोप से आकाश का अध्ययन नहीं किया था उन्होंने भी इसका उपयोग किया और उनकी दिलचस्पी से बढ़ गई, अब यह लोग जानना चाहते थे कि ऑब्जर्वेटरी में लगे बड़े बड़े टेलिस्कोप से आकाश किस प्रकार दिखाई देता है इसके लिए उन्होंने सबसे पास स्थित ऑब्जर्वेटरी में जाना शुरू किया इससे जनता की भीड़ एस्ट्रोनॉमी क्लब और एस्ट्रोनॉमी ऑब्जर्वेट्रीज में आने लगी.
अमेरिका में सफल होने के बाद इस कांसेप्ट को दुनिया के दूसरे देशों में भी अपना लिया गया दुनिया भर में स्कूल, कॉलेज तथा एस्ट्रोनॉमी क्लब प्रतिवर्ष दो बार एस्ट्रोनॉमी डे पर कई इवेंट आयोजित करते हैं
एस्ट्रोनॉमी डे पर क्या क्या गतिविधियां इवेंट्स होते हैं
What Events Take Place On World Astronomy Day In Hindi
एस्ट्रोनॉमी डे इवेंट पर एस्टॉनोमर्स, एस्ट्रोफिजिसिस्ट वैज्ञानिकों को जनता से बात करने के लिए बुलाया जाता है, तरह-तरह के कंपटीशन, गेम्स आयोजित किए जाते हैं एस्ट्रोनॉट्स किस प्रकार का खाना खाते हैं यह आम जनता को दिखाया जाता है, कई तरह के मॉडल्स जनता के सामने प्रस्तुत किए जाते हैं, तथा छोटे छोटे पोर्टेबल टेलीस्कोप्स के द्वारा रात्रि में चंद्रमा, जूपिटर, नेबुला आदि दिखाए जाते हैं, दिन के समय सुरक्षित तरीके से सूर्य का किस प्रकार अध्ययन किया जाए यह सिखाया जाता है, स्कूल में टीचर्स एस्ट्रोनॉमी डे पर विभिन्न कार्यक्रम आयोजित कर इस विज्ञान में बच्चों की दिलचस्पी पैदा करने की कोशिश करते हैं.
💥🌸दिनविशेष🌸💥* 2 मे
*💥🌸दिनविशेष🌸💥*
*लिओनार्दो दा विंची*
*एक महान चित्रकार व संशोधक*
*स्मृतिदिन - मे २, १५१९*
लिओनार्दो हा १५ व्या शतकात रेनेसान्स काळात झालेला एक महान चित्रकार व संशोधक होता. कलेच्या इतिहासात त्याने संशोधक वृत्तीने दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्याचे नाव नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. लिओनार्दोने अनेक क्षेत्रांत योगदान दिले असले, तरी इतिहासात त्याचे नाव चित्रकार म्हणून ठळकपणे दिसते. मोनालिसा, द लास्ट सपर, मॅडोना ऑफ द रॉक्स ही त्याची काही जगप्रसिद्ध चित्रे आहेत. चित्रांवरून त्याचे तत्कालीन चर्च या धर्मसंस्थेसोबत असलेले मतभेद, उलट अक्षरे काढून लिहिण्याची सवय, नव्याने सापडलेल्या त्याच्या नोंदवह्यांतील आश्चर्यकारक माहिती व कित्येक विचारवंतांनी त्याचा अभ्यास करून मांडलेली मते, यांवरून लिओनार्डो विसाव्या शतकापासून काहीसा गूढतेच्या वातावरणात आला आहे. त्यातच त्याच्या विविध चित्रांचा अभ्यास वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून सुरू झाला. तत्कालीन सामाजिक, राजकीय व धार्मिक परिस्थितीचा अभ्यास केलेले विचारवंत त्याच्या चित्रांवरून वेगवेगळ्या संदेशांच्या कल्पना करतात. डॅन ब्राउन या लेखकाने नुकतीच 'दा व्हिंची कोड' या काल्पनिक कादंबरीत लिओनार्दोची वेगळीच गूढ भूमिका मांडली.
बालपण
लिओनार्दो त्याच्या आईवडिलांचे अनौरस अपत्य होता. जन्मानंतर त्याचा सांभाळ ५ वर्षे आईनेच केला. त्यानंतर मात्र त्याच्या वडिलांनी त्याचा सांभाळ करायची तयारी दर्शविली व याचवेळी त्याच्या आईचेही लग्न ठरले. अशात लिओनार्दो त्याच्या वडिलांकडे फ्लॉरेन्सला आला. त्याचे वडिल सधन होते. लिओनार्दोच्या शिक्षणाकडे , देखभालीकडे त्यांनी योग्य लक्ष पुरवले. त्याची कलेतील आवड लक्षात घेऊन त्याला वेरोशिओ या प्रसिद्ध् चित्रकाराकडे शिक्षणासाठी पाठवले. चित्रकला , शिल्पकला अशा शास्त्रांचा अभ्यास त्याने वेरोशिओ कडे केला. याचवेळी त्याने स्वत: हुन इतर शाखांचाही अभ्यास चालु ठेवला.
मॅडोना ऑफ द रॉक्स
चर्चच्या दबावामुळे लिओनार्दोला अखेर मॅडोना ऑफ द रॉक्सचे दुसरे चित्र ही रंगवावे लागले. पहिले चित्र सध्या फ्रान्सच्या पॅरिस येथील लूव्र संग्रहालय येथे आहे तर दुसरे लंडन येथील म्युझियममध्ये आहे. पहिल्या चित्राला सध्या मॅडोना ऑफ द रॉक्स (लुव्र व्हर्जन) व दुसरया चित्राला मॅडोना ऑफ द रॉक्स (लंडन व्हर्जन ) म्हणुन ओळखतात.
💥🌸दिनविशेष🌸💥* 1 मे
*💥🌸दिनविशेष🌸💥*
*मनमोहन शर्मा*
*रसायनशास्त्रज्ञ*
*जन्मदिन - १ मे १९३७*
डॉ. मनमोहन शर्मा यांचा जन्म जोधपूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण त्या काळात जोधपूर येथील महेश्वरी शाळेत, तसेच सरदार विद्यालयामध्येही झाले. जसवंत महाविद्यालय, जोधपूर येथून त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. मुंबई विद्यापीठातून बी.ई. ही रसायन अभियांत्रिकीतील पदवी त्यांनी १९५८ साली, तसेच एम.टेक. ही पदवी १९६० साली संपादन केली. आपल्या विद्यार्थिदशेत त्यांना फुटबॉल व टेबल टेनिस या खेळांची आवड होती.
मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये (आय.सी.टी.) त्यांनी १९५८ साली आपल्या शास्त्रीय संशोधनाची सुरुवात केली. त्यानंतर ते केंब्रिज विद्यापीठात पुढील संशोधनाकरिता गेले व त्यांनी १९६४ साली पीएच.डी. ही पदवी मिळवली. आय.सी.टी. संस्थेमध्ये अध्यापक, प्राध्यापक, विभागप्रमुख इत्यादी पदांवर त्यांनी १९८९ सालापर्यंत काम केले व १९८९ साली ते आय.सी.टी.चे संचालक म्हणून काम पाहू लागले. वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी ते प्राध्यापक झाले.
रसायन अभियांत्रिकीमधील सर्व शाखांमध्ये त्यांनी संशोधनाचे कार्य केले. रासायनिक प्रक्रिया घडत असताना संयंत्रांमधील सर्व घटकांच्या निरनिराळ्या टप्प्यांत होणार्या हालचालींवरील (मास ट्रान्सफर) त्यांचे संशोधन जागतिक मान्यतेचे ठरले. निरनिराळ्या अवस्थांतील रसायनांच्या प्रक्रियांवरील संशोधन, उत्प्रेरक आणि त्याच्या विविध स्वरूपांचे परिणाम, ‘आयन प्रक्रिया उत्प्रेरक’ (आयन एक्स्चेंज कॅटॅलिस्ट) आणि रासायनिक प्रक्रियांतील विघटन या विषयांत त्यांनी मौलिक संशोधन केले.
गुंतागुंतीच्या दोन किंवा जास्त अवस्थेतील रासायनिक प्रक्रियांवर त्यांनी मूलभूत संशोधन केले व त्यायोगे अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळवली. त्यांनी मोजमापनाकरिता शोधून काढलेल्या नवीन पद्धतीने अतिशीघ्र रासायनिक क्रियांची गती मोजणे शक्य झाले. पदार्थाच्या रासायनिक संयंत्रात पदार्थांच्या शुद्धीकरणाकरिता पदार्थशोषण व त्याचे विघटन या क्रियांना फार महत्त्व असते व अशा प्रकारच्या प्रक्रियांना वरील मूलभूत संशोधनातून त्यांनी गणितिसूत्रे तयार केली. दोन द्रवपदार्थांतील मिश्रण व त्याचा रासायनिक प्रक्रियेकरिता उपयोग या विषयांतही त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले.
रासायनिक पदार्थांच्या शुद्धीकरणाकरिता उपयोगात येणार्या प्रक्रिया ऊर्ध्वपतन, स्फटिकीकरण इत्यादींमध्ये नावीन्यपूर्ण संशोधन करून त्यांचा उपयोग रसायन अभियांत्रिकीमध्ये मोठ्या प्रमाणात केला.
डॉ. शर्मा हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रसायन अभियंता असून जगातील निरनिराळ्या विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे काम केले आहे. देशातील आणि देशाबाहेरील रसायन उद्योगाच्या बर्याच प्रकल्पांमध्ये त्यांच्या संशोधनाचा उपयोग केला जात आहे. त्यांनी लिहिलेली, त्यांच्या विषयातील पुस्तके जगभरातील विद्यापीठात वापरली जातात. त्यांना निरनिराळे पुरस्कार व मानद सभासदत्वे मिळाली.
शास्त्रीय संशोधनातील उत्कृष्ट कामगिरीकरिता भारत सरकारतर्फे ‘शांती स्वरूप भटनागर’ पुरस्कार ४५ वर्षांखालील संशोधकास दिला जातो. डॉ. शर्मा यांना हा पुरस्कार १९७३ साली त्यांच्या वयाच्या छत्तिसाव्या वर्षी मिळाला, तर ते ४५ वर्षांचे होण्याअगोदर त्यांच्या एका विद्यार्थ्यासही तो मिळाला. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीतर्फे दिला जाणारा ‘मेघनाथ साहा’ पुरस्कार त्यांना १९९६ साली मिळाला. इंग्लंडच्या रॉयल सोसायटीतर्फे त्यांना १९८२ मध्ये ‘फेलोशिप’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याच संस्थेतर्फे ‘लिव्हरह्यूम पुरस्कार’ त्यांना १९९६ साली देण्यात आला. त्यांना ‘फेलो’ म्हणून मान्यता देण्यात येणार्या संस्था नॅशनल सायन्स अकॅडमी, इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स, थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्स या होत्या. १९८५ साली त्यांना ओमप्रकाश भसीन पुरस्कार देण्यात आला. त्याच साली त्यांना विश्वकर्मा पुरस्कार मिळाला. ‘जी.एम. मोदी सायन्स पुरस्कार १९९१ साली त्यांना मिळाला. त्यांनी केलेल्या संशोधन व शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्याकरिता त्यांना १९८९ साली पद्मभूषण व २००१ साली पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
त्यांनी आय.सी.टी.मध्ये संशोधन करत असतानाच एकंदर ७१ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीसाठी मार्गदर्शन केले. यांमध्ये डॉ. माशेलकर व डॉ. जे.बी. जोशींसारखे नामवंत संशोधकही होते. सध्या त्यांच्या या गुरुकुलातील चौथी पिढी कार्यरत आहे. केंब्रिज व मुंबई विद्यापीठात ते आपल्या कुशाग्र निरीक्षण व स्मरणशक्तीमुळे सर्वांस परिचित आहेत. १९६० सालापासून ४० वर्षे त्यांनी संस्थेच्या प्रगतीचे कार्य इतक्या सक्षमपणे केल्यामुळेच आज सर्व जगभर ‘आय.सी.टी.’चे नाव एक अग्रगण्य शिक्षण संस्था, असे प्रसिद्ध झाले आहे. आज भारतातच नव्हे, तर जगभर त्यांचे विद्यार्थी ‘आय.सी.टी.’चे, पर्यायाने त्यांनी सुरू केलेले संशोधनकार्य करीत आहेत. ‘मेटोजीनिअस रिअॅक्शन’ या विषयावरील त्यांनी लिहिलेले दोन ग्रंथ आजही जगभर संशोधन व उद्योग क्षेत्रास मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत.
— डॉ. श्रीराम मनोहर
बुधवार, २९ एप्रिल, २०२०
*💥🌸दिनविशेष🌸💥 29 एप्रिल
*💥🌸दिनविशेष🌸💥
डॉ. शंकर आबाजी भिसे (इंग्लिश: Shankar Aabaji Bhise) (जन्म मुंबई, २९ एप्रिल १८६७; मृत्यू : ७ एप्रिल १९३५) हे एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक होते. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जाते.
*संशोधन आणि आविष्कार*
त्याच सुमाराला म्हणजे साधारण १८९७मध्ये ' इन्व्हेन्टर रिव्ह्यू ॲन्ड सायंटिफिक रेकॉर्ड' नामक मासिकाने 'स्वयंमापन यंत्र' करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिऱ्हाइकाला हवे तेवढे वजन करुन देणारे यंत्र. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून मासिकाकडे पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. शंकर आबाजी भिसे यांच्या संशोधक कारकिर्दीची ही सुरुवात होती.
पुढील आयुष्यात शंकर आबाजी भिसे यांनी दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावले आणि त्यांतील ४०हून अधिक आविष्कारांची पेटंटे घतली.
१९०० साली मद्रास येथे भरलेल्या 'इंडियन इंडस्ट्रियल काँग्रेस'चे ते अध्यक्ष होते. त्या काली प्रचलित असलेल्या लायनो, मोनो, स्ट्रिंजरटाइप, विक्स आणि त्या काळच्या इतर मुद्रण यंत्रांच्या रचना आणि त्यांच्या वापराच्या कमाल कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून शंकरराव भिसे यांनी ’भिसोटाइप’ हे छापण्यासाठीचे खिळे पाडण्यासाठी आणि नंतर ते जुळवण्यासाठीचे यंत्र शोधले आणि त्याचे पहिले तात्पुरते पेटंट इंग्लंडमध्ये, २ डिसेंबर १९०१ रोजी घेतले. नंतर भिसे यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आदी देशांतही ’भिसोटाइप’ची पेटंटे घेतली. या यंत्राच्या उत्पादनासाठी आणि एकूण भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसठी त्यांनी रतन टाटा यांच्या भागीदारीत ’टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट’ या कंपनीची लंडन येथे स्थापना केली, पण १९१५साली ही कंपनी बंद पडली. . १९१६साली भिसे अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी युनिव्हर्सल टाइप मशीन या कंपनीच्या विनंतीनुसार ’आयडियल टाइप कास्टर’ या यंत्राचा आविष्कार केला, व अमेरिकेत त्याचे पेटंट घेतले. १९२० साली त्यांनी 'अमेरिकन भिसे आयडियल टाइप कास्टर कॉर्पोरेशन'ची स्थापना करून १९२१साली पहिले यंत्र विक्रीस आणले. याशिवाय अशी अनेक मुद्रण यंत्रांचे आराखडे, डॉ. भिसे यांनी बनविले. त्यांच्या टाइप कास्टिंगच्या शोधाचा अमेरिकेच्या तत्कालीन पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला होता. १९२७ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाने शंकररावांना डी.एस्सी. ही पदवी दिली.
भिसे यांनी काचेचा कारखाना काढला. १८९० मध्ये उत्तर हिंदुस्थानात जाऊन आग्रा लेदर फॅक्टरी काढली. भिसे यांनी सामाजिक कार्य देखील केले. धी सायंटिफिक क्लबची स्थापना केली. दादाभाई नौरोजींच्या सहाय्याने भिसे यांनी १९०१ साली ‘पेटंट सिंडिकेट’ नावाची कंपनी काढली.
सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती.
१९१०मध्ये भिसे आजारी पडले. त्यावेळी त्यांना देण्यात आलेले एक भारतीय औषध त्यांना फार गुणकारी वाटले. त्या औषधाचे त्यांनी रासायनिक पृथक्करण करून घेतले. त्यात आयोडीन असल्याचे कळताच भिसे यांनी १९१४साली एक नवीनच औषध तयार करून त्याला ’बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरले. अमेरिकेच्या लष्कराने या औषधाचा पहिल्या महायुद्धात पुरेपूर उपयोग केला. याच औषधावर संशोधन करून आयोडीन हा घटक असलेले पण पोटात घेता येण्यासारखे एक औषध, भिसे यांनी बनवले. आणि त्याच्या उत्पादनासाठी न्यूयॉर्क येथे कंपनी स्थापन केली. १९२७मध्ये या औषधाच्या उत्पादनाचे आणि वितरणाचे हक्क भिसे यांनी शेफलीन या कंपनीला विकले. या औषधाला शंकर आबाजी भिसे यांनी ’ॲटोमिडीन’ (ॲटॉमिक आयोडीन) हे नाव दिले होते. हे औषध बऱ्याच रोगांवर गुणकारी आहे.
*भिसे यांनी आविष्कार केलेली यंत्रे*
मुंबई उपनगरीय रेल्वेत गर्दीमुळे अपघात होतात. डब्यात लोंबकळणारे प्रवासी खाली पडतात व मरतात. त्यामुळे स्वयंचलित दरवाजे लावण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी २०१६साली केली, पण आगगाडीच्या स्वयंचलित दरवाजाचा शोध डॉ. भिसे यांनी १८९८ मध्ये लावला होता. त्या काळात आजच्यासारखी गर्दी नव्हती, पण पुण्याहून मुंबईस येत असताना कल्याण स्टेशनवर उतरताना एका प्रवाशाची बोटे दरवाजात चिरडली. त्यामुळे रेल्वेवर टीका झाली. अशा प्रकारचा अपघात टळावा म्हणून डॉ. भिसे यांनी असा शोध लावला की, प्रवाशाने गाडीच्या दरवाजात मुद्दाम बोट घातले वा कोणी निष्काळजीपणे दरवाजा लावला तरीही प्रवाशास इजा होणार नाही. या शोधाचे पेटंट भिसे यांनी घेतले नाही. मुंबईतील प्रदर्शनात त्यांनी या स्वयंचलित दरवाजाचे नमुने ठेवले व त्यास बक्षीस मिळाले. आज आपल्याला जे हवे आहे ते डॉ. भिसे यांनी १८९८ मध्येच निर्माण केले.
स्वयंचलित वस्तूंचे वजन करणारे यंत्र. स्पर्धेसाठी बनविलेले यंत्र. यासाठी त्यांना पहिले बक्षिस मिळाले.
स्वयंचलित आगामी स्थानदर्शक यंत्र - त्यांच्या या यंत्रा
मुळे रेल्वे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आधीच कळणार होते. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरण्यास नकार दिला.
आज आपण प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘इंडिकेटर’ बोर्ड पाहतो. त्या इंडिकेटर बोर्डाचे निर्माते डॉ. भिसे आहेत.
भिसे मुद्रण यंत्र - हे मुद्रणशास्त्रात मैलाचा दगड ठरले. या यंत्राचे पहिले ’गुणित मातृका’ नावाचे मॉडेल मिनिटाला १२०० अक्षरे छापी. हे यंत्र १९१६मध्ये विक्रीला आले.
मिनिटाला २४०० टाइप(खिळे) पाडणारे आणखी एक यंत्र भिसे यांनी बनवले होते.
त्यांनी पगड्या तयार करण्याचे यंत्र बनवले. पिठाच्या चक्क्या बनवल्या. सायकल जागच्या जागी उभे करणारे स्वयंचलित यंत्र, १९०६ साली तारेने दूरवर फोटो पाठविण्याची युक्ती त्यांनी शोधून काढली.
डॉ. भिसे यांनी ‘टिंगी’नावाच्या अजब अशा छोट्या यंत्राचा शोध लावला. टिंगीमुळे अंगरख्याची परीटघडी न बिघडवता बटणे बसविता येत असत.
सौर ऊर्जेवर चालणार्या मोटारीचा शोध १९१८ सालीच लावून ते मोकळे झाले.
समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा.
वातावरणातील विविध वायू वेगळे करणारे यंत्र.
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विजेच्या साहाय्याने छायाचित्रे पाठविणारे यंत्र.
धुण्यासाठी ' रोला ' नावाचा रासायनिक पदार्थ.
जखमांवर लावण्यासाठी ’बेसलीन’ आणि पाण्यात विरघळणारे पोटात घेण्यासाठी ’ॲटोमिडीन’ (आण्विक आयोडीन) - या आविष्काराने भिसे यांना जगभर कीर्ती मिळवून दिली.
बॉडी मसाजरचा शोध त्यांनी त्या काळात लावला. डोके दुखू लागल्यास शिरा चेपणारे हे यंत्र होते. त्यांनी ‘चटण्या’ वगैरे वाटणारे ‘मिक्सर’ बनवले.
एडिसन
भिसे हे खर्या अर्थाने आपले ‘एडिसन’ होते, पण स्वातंत्र्यानंतर हा एडिसन उपेक्षित राहिला. भिसे यांचा सन्मान म्हणून त्यांच्यावर एक टपाल तिकीट काढावे यासाठी दिलीप प्रभाकर गडकरी व पार्ल्याचे रघुनाथ पी. मेढेकर २०१० सालापासून प्रयत्न करीत आहेत. भिसे यांच्या संशोधन कार्याबाबत सर्व माहिती व पुरावे सादर करूनही त्यांचे पोस्टाचे तिकीट निघू शकले नाही व ही मागणी फेटाळण्यात आली.
कारकीर्द
शंकररावांचे वडील धुळ्याला मॅजिस्ट्रेट होते. तिथल्या शाळेत शंकररावांचे प्राथमिक शिक्षण झाले. मुलाची यंत्राची आवड पाहून वडिलांना फार आनंद होत असे. त्यामुळे उत्तेजनार्थ त्यांनी शंकररावांना महिना ३० रुपये पगारावर अकाउन्टन्ट जनरलच्या ऑफिसमध्ये कारकून म्हणून चिकटवले.
गौरव
जागतिक दर्जाच्या 'हू’ज हू' या संदर्भग्रंथात भारताचे एडिसन असे म्हणून शंकर आबाजी भिसे यांना गौरवण्यात आले आहे. खऱ्या थॉमस अल्व्हा एडिसननेही भिसे नामक भारतीय एडिसनची २३ डिसेंबर १९३० रोजी न्यू जर्सी येथे भेट घेतली होती. २९ एप्रिल१९२७ रोजी, म्हणजे भिसे यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या दिवशी अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत ’अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. मात्र त्यापूर्वीच म्हणजे १९०८ सालापासूनच अमेरिकन वृत्तपत्रे भिसे यांचा भारताचे एडिसन म्हणून उल्लेख करीत होती.
💥🌸दिनविशेष🌸💥 30 एप्रिल
*💥🌸दिनविशेष🌸💥*
*श्रीपाद अच्युत दाभोळकर*
*गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ, प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक*
*स्मृतिदिन - ३० एप्रिल २००१*
श्रीपाद अच्युत दाभोळकर (मृत्यू : ३० एप्रिल २००१) ऊर्फ मुकुंद दाभोळकर हे महाराष्ट्रातील ’प्रयोग परिवार’ या संकल्पनेचे प्रवर्तक आणि जमनालाल बजाज या प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी होते.
श्रीपाद अच्युत दाभोळकर हे कोल्हापूरचे एक गणितज्ञ होते. ते कोल्हापूरजवळच्या गारगोटी महाविद्यालयात प्राध्यापक होते. आपल्याला जन्मापासूनच प्रयोग चिकटलेला आहे असे ते म्हणत. माठात भोपळा वाढवणे, स्वत: पपई पिकवून आणि खाऊन त्याच्या सालांवर व बियांवर कोंबडीपालन करणे, नागफणीवर शेळी वाढवणे, स्वमूत्रावर केळी वाढवणे असे त्यांचे प्रयोग लहानपणापासूनच सुरू होते. आपल्या पृथ्वीवरच्या सर्व प्राणिमात्रांच्या ऊर्जेचा मूळ स्रोत सूर्य, हा आपल्या प्रकाशाचे सर्वाना समान वाटप करत असतो. त्याच्या या प्रकाशाला जास्तीतजास्त हिरव्या पानांनी शोषून घेतले तर शेतकरी खूप समृद्ध होऊ शकेल, हेच दाभोळकर आयुष्यभर प्रयोगाने सिद्ध करत राहिले. कोल्हापूरला कुंडीत वाढविलेल्या द्राक्षाच्या एका वेलीवरच्या प्रत्येक पानाला अधिकाधिक सूर्यप्रकाश मिळवून देऊन त्यांनी द्राक्षाच्या तब्बल शंभर घडांचे उत्पन्न मिळवले. ते बघून शेतकऱ्यांना सूर्यशेतीची महती उमगली आणि मग महाराष्ट्रात द्राक्षाची क्रांती झाली. कुठल्याही शेतकी महाविद्यालयात न शिकवता केवळ अनौपचारिक शिक्षण देऊन दाभोळकरांनी महाराष्ट्राला शेतीत समृद्ध केले. एका रिकाम्या सिमेंटच्या पोत्यात कुजलेल्या काँग्रेस गवतावर त्यांनी ऊस लागवड केली. भरपूर उपलब्ध असलेला सूर्यप्रकाश वापरून पाच महिने तो ऊस यशस्वीपणे वाढवला. रसायनांच्या मागे न लागता फक्त सूर्यप्रकाशाच्या शक्तीवर शेतात साखरेची निर्मिती कशी करता येईल, हे त्यांनी दाखवले. सकाळी आंघोळ करताना आपल्या शरीराचा मळ निघून जातो. या मळात शेण कुजण्यासाठी आवश्यक असणारे कोट्यवधी जीवाणू असतात, असे दाभोळकर म्हणत.
आंबा व नारळ खड्डा न करता ढीग पद्धतीने घेणे, घरातील सर्वांचे आंघोळीचे पाणी वापरून सूर्यमंडल पद्धतीने रोजच्या गरजेचा भाजीपाला एका गुंठ्यात उगवणे, सजीव बांबूंचा कुंपण-बायोगॅससाठी उपयोग आदी विविध तंत्रांची माहिती दाभोळकरांच्या पुस्तकांत आहे.
श्री.अ. दाभोळकरांनी लिहिलेली पुस्तके
आधुनिक द्राक्ष लागवड
आपला हात जगन्नाथ
केल्याने होत आहे रे
प्लेन्टी फॉर ऑल (इंग्रजी)
विपुलाच सृष्टी
सर्जन-विसर्जन-सर्जन।
सोमवार, २७ एप्रिल, २०२०
🌼दिनविशेष🌼💥 28 एप्रिल
*💥🌼दिनविशेष🌼💥*
*युजेन शुमाकर*
*'शुमाकर - लेव्ही ९' या धुमकेतुचा शोध*
*जन्मदिन - २८ एप्रिल १९२८*
युजेन शुमाकर हा एक भुगर्भशास्त्रज्ञ होता. त्याने आणि त्याची पत्नि कॅरोलिन शुमाकर दोघांनी *'शुमाकर - लेव्ही ९'* या धुमकेतुचा शोध लावला.
हा धुमकेतु जुलै १९९४ ला गुरु या ग्रहावर आदळुन नष्ट झाला.
धूमकेतू हे नाव ऐकल्यावरच कसलं 'लै भ्भारी' वाटतं ना. धूमकेतू ही चीज आहेच मुळी त्याच्या नावाप्रमाणेच! भन्नाट वेग, आसमानात उधळलेल्या खोंडाप्रमाणे बेगुमान फिरायची हिम्मत आणि समोर येईल त्याला टक्कर देण्याचं सामर्थ्य! मग भले समोर येणारे गृहस्थ हे 'गुरु' सारखे दिग्गज ग्रह असोत, किंवा स्वत: सूर्यनारायण असोत, 'आम्हा काय त्याचे' असं गात हा धूमकेतू आसमंतात भटकत असतो.
धूमकेतू हे सुद्धा सूर्यमालेचाच भाग आहेत. आता बाकी ग्रह आणि धूमकेतू यांत अनेक दृश्य फरक आहेत आणि अनेक तांत्रिक फरक देखील आहेत. त्यातलाच एक फरक असा की सूर्यमालेतील ग्रह हे साधारण वर्तुळाकार आणि पृथ्वीसापेक्ष समतल कक्षेत फिरतात, पण धूमकेतू असल्या ग्रह-कक्षेच्या नियमांचे बांधील नाहीत. ते सूर्याभोवती लंब-वर्तुळाकार कक्षेत फिरतात आणि 'समतल' वगैरे गोष्टींना फाट्यावर मारतात. असे असले तरीही धूमकेतूसुद्धा गुरुत्वाकर्षणाच्या नियमांनी बांधलेले आहेत आणि म्हणूनच आपण हॅलेचा धूमकेतू दर ७५-७६ वर्षांनी पाहू शकतो.
धूमकेतूच्या कक्षेबद्दल सांगण्याचा हेतू हा की धूमकेतूचा नैसर्गिक अविष्कार हा त्याच्या लंब-वर्तुळाकार कक्षेत दडलाय. धूमकेतू जेव्हा सूर्यापासून दूर असतो तेव्हा त्याच्यात आणि अवकाशातील इतर अ-ग्रहीय वस्तूंमध्ये फरक करणं मुश्कील होऊन बसतं. त्यावेळी त्याची निरपेक्ष तेजस्विता (absolute magnitude) ही साधारण +१० ते +१६ असते. तेजस्विता जितकी 'मायनस' तितकी ती जास्त असते आणि जितकी 'प्लस' तितकी ती कमी असते. आपला सूर्य -२६ तेजस्वीतेचा आहे. मानवी डोळ्यांनी कमीत कमी +६ तेजस्वितेचे ऑब्जेक्टस दिसू शकतात. आता इतक्या कमी तेजस्वितेचे हे धूमकेतू तर अतिशय ताकदवान दुर्बिणी घेऊनच बघावे आणि शोधावे लागतात. पण जसजसा धूमकेतू सूर्याच्या जवळ येऊ लागतो, सौरवात आणि किरणोत्सर्ग यामुळे त्यावरील बर्फ आणि वायूचे मिश्रण वितळू लागते, धूमकेतूच्या केंद्रकाभोवती तात्पुरते वातावरण निर्माण होते आणि पृष्ठभागावरील धूळ, बर्फ आणि वायू मिळून त्याला एक अतिशय सुंदर शेपटी दिसायला लागते. त्यावर कडी म्हणजे वायूंचे आयनीभवन (ionization) होऊन धूमकेतूला अजून एक शेपटी फुटते. या दोन शेपट्यांमध्ये फरक कसा ओळखायचा? तर, वायूंचे आयनीभवन होऊन बनलेल्या शेपटीला वस्तुमान नसल्यामुळे ती शेपटी थोडीशी फिक्कट आणि सरळ दिसते, तर धूळ, बर्फ, वायू यांच्या मिश्रणातून तयार झालेली शेपटी ही किंचित वळलेली दिसते. तसेच प्रत्येक धूमकेतूची आयनीभवन झालेली शेपटी दिसेलच असे नाही, पण मुख्य शेपटी दिसतेच.
काही धूमकेतू हे नियमितपणे प्रदक्षिणा घालतात. काही धूमकेतूंच्या कक्षा ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे बदलतात, काही धूमकेतू हजारो वर्षांची प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा दर्शन देतात. *शुमाकर-लेव्ही९ नावाचा धूमकेतू असाच भटकताना गुरूच्या कक्षेत सापडला, बरीच वर्षे त्याच्याभोवती फिरला, आणि नंतर १९९४ मध्ये गुरु वर आदळून नष्ट झाला.* असे अनेक धूमकेतू सूर्याजवळून जाताना सूर्यामध्ये खेचले जातात आणि नष्ट होतात. काही धूमकेतू अनंताच्या प्रवासाला निघून जातात. 'एन्के' सारखे धूमकेतू अतिशय वेगाने आणि अतिशय कमी वेळात प्रदक्षिणा पूर्ण करतात, पण त्यांचा वेग, वस्तुमान आणि अंत:स्थ ग्रहांना छेदून जाणारी त्यांची कक्षा यामुळे ते स्वत:चीच कक्षा आणि वेग बदलत राहतात.
💥🌼दिनविशेष🌼💥 27 एप्रिल
*💥🌼दिनविशेष🌼💥*
*सैमुएल मोर्स*
*टेलिग्राफच्या माध्यमातुन पाठवल्या जणार्या 'मोर्स कोड'चे संशोधन*
*जन्मदिन - २७ एप्रिल १७९१*
मोर्स कोड, सन्देश भेजने की एक पद्धति है। इसकी रचना सैमुएल मोर्स ने १८४० के दशक के आरम्भिक वर्षों में वैद्युत टेलीग्राफ के माध्यम से सन्देश भेजने के लिये की थी। बाद में १८९० के दशक से मोर्स कोड का उपयोग रेडियो संचार के आरम्भिक दिनों में भी हुआ।
मोर्स कोड के अन्तर्गत एक लघु संकेत तथा दूसरा दीर्घ संकेत प्रयोग किये जाते हैं। इन दो संकेतों के पूर्व निर्धारित मानकीकृत समन्वय से किसी भी संदेश को अभिव्यक्त किया जा सकता है। कागज आदि पर मोर्स कोड में कुछ लिखने के लिये लघु संकेत के लिये डॉट का प्रयोग तथा दीर्घ संकेत के लिये डैश का प्रयोग किया जाता है। किन्तु मोर्स कोड के लघु और दीर्घ संकेतों के लिये अन्य रूप भी प्रयुक्त हो सकते हैं ; जैसे - ध्वनि, पल्स या प्रकाश संकेत आदि
अन्तर्राष्ट्रीय मार्स कोड के पाँच अवयव हैं:
1. लघु मार्क, डाट या डिट (·) — एक इकाई लम्बा
2. दीर्घ मार्क, डैश या डा (-) — तीन इकाई के तुल्य लम्बा
3. लघु एवं दीर्घ संकेतों के बीच रिक्त स्थान या समय — एक इकाई लम्बा
4. छोटा रिक्त स्थान (दो अक्षरों के बीच में) — तीन इकाई लम्बा
5. मध्यम रिक्ति (दो शब्दों के बीच में) — सात इकाई लम्बा
मोर्स कोड, बाइनरी कोड (द्विक कोड) से मिलता-जुलता है किन्तु ध्यान से इसका विश्लेषण करने से पता चलेगा कि यह बाइनरी नहीं है क्योंकि लघु एवं दीर्घ संकेत के अलावा रिक्त स्थान भी छोड़ना पडता है।
Today in Science 27 april
*💥🌸Today in Science🌸💥*
*Samuel Morse*
*invention of a single-wire telegraph & Morse code*
*Born - April 27, 1791*
Samuel Finley Breese Morse (April 27, 1791 – April 2, 1872) was an American painter and inventor. After having established his reputation as a portrait painter, in his middle age Morse contributed to the invention of a single-wire telegraph system based on European telegraphs. He was a co-developer of the Morse code, and helped to develop the commercial use of telegraphy.
Witnessing various experiments with Jackson's electromagnet, Morse developed the concept of a single-wire telegraph. He set aside his painting, The Gallery of the Louvre.[9] The original Morse telegraph, submitted with his patent application, is part of the collections of the National Museum of American History at the Smithsonian Institution.[10] In time the Morse code, which he developed, would become the primary language of telegraphy in the world. It is still the standard for rhythmic transmission of data.
रविवार, २६ एप्रिल, २०२०
💥🌼दिनविशेष🌼💥* 26 एप्रिल
*श्रीनिवास रामानुजन*
*भारतीय गणितज्ञ*
*स्मृतिदिन - एप्रिल २६, १९२०*
श्रीनिवास रामानुजन (डिसेंबर २२, १८८७:तंजावर - एप्रिल २६, १९२०) भारतीय गणितज्ञ होते.
रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.
जन्म व संशोधन
या महान गणितज्ञाचा जन्म डिसेंबर २२, १८८७ रोजी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना या शाळेत शिष्यवृत्तीही मिळाली. माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.
रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजमनी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.
मृत्यु
१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरूणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी – एप्रिल २७, १९२० रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणिती विश्वाचीच अपरिमित हानी झाली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)











