*💥🌸दिनविशेष🌸💥*
*१ मे १९३०*
*सूर्यमालेतील बटु ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.*
प्लूटो हा सूर्यमालेतील वस्तुमानाने दुसरा आणि आकाराने सर्वात मोठा बटु ग्रह आहे. तसेच प्लूटो सूर्याला प्रदक्षीणा मारणारी आकाराने नववी सर्वात मोठी आणि वस्तुमानाने (एरिस नंतर) दहावी सर्वात मोठी वस्तू आहे. सुरुवातीला प्लूटोला ग्रह मानण्यात येत असे पण आता तो कायपरच्या पट्ट्यातील सर्वांत मोठी खगोलीय वस्तू म्हणून वर्गीकृत होतो. प्लूटोचे अधिकृत नाव १३४३४० प्लूटो असे आहे.
या नवीन वस्तूला नाव देण्याचे अधिकार लॉवेल वेधशाळेकडे होते. टॉमबॉघने स्लिफरला इतर कोणी करण्याच्या आधी लवकरात लवकर हे नामकरण करावे अशी विनंती केली.सर्व जगातून नावासाठी प्रस्ताव आले. कॉन्स्टंस लॉवेलने आधी झ्यूस, नंतर लॉवेल, आणि शेवटी स्वतःचे नाव मांडले. हे प्रस्ताव नामंजूर करण्यात आले.
प्लूटो हे नाव प्रथम व्हेनेशिया बर्ने (नंतरची व्हेनेशिया फेअर) या ११ वर्षाच्या ऑक्सफर्ड,इंग्लंड येथील शाळकरी मुलीने सुचविले. व्हेनेशियाला रोमन दंतकथा तसेच खगोलशास्त्रामध्ये रूची होती. प्लूटो हे, हेडेस या ग्रीक पाताळभूमीच्या (Underworld) देवाचे दुसरे नाव आहे. तिला हे नाव या संभाव्य काळ्या व थंड ग्रहासाठी योग्य वाटले. तिने तिचे आजोबा फाल्कोनर मॅडन (जे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बोडलेईयन वाचनालयाचे ग्रंथपाल होते) यांच्याशी बोलतांना सुचविले. मॅडन यांनी ते नाव प्राध्यापक हर्बर्ट हॉल टर्नर यांना सांगितले व त्यांनी ते आपल्या अमेरिकेतील सहकार्यांना तारेने पाठवून दिले.
या नवीन वस्तूला मार्च २४, इ.स. १९३० रोजी औपचारिकरित्या नाव देण्यात आले. लॉवेल वेधशाळेचा प्रत्येक सदस्यांचे तीन प्रस्तावित नावांवर मत घेण्यात आले. ही तीन नावे होती - "मिनर्वा" (जे आधीच एका लघुग्रहाला देण्यात आले होते), "क्रोनस" (हे नाव त्याकाळातील काहीशा अलोकप्रिय असलेल्या थॉमस जेफरसन जॅक्सन सी या खगोलशास्त्रज्ञाने सुचविले असल्यामुळे त्याबद्दल लोकमत थोडे वाईट होते) व प्लूटो. प्लूटोला सर्व मते मिळाली.नावाची घोषणा मे १, १९३० रोजी करण्यात आली. या घोषणेनंतर मॅडन यांनी व्हेनेशियाला पाच पाऊंड बक्षिस म्हनून दिले.
प्लूटो (Pluto) हे नाव पार्सिवाल लॉवेल यांच्या नावाच्या अद्याक्षराने सुरू होते. तसेच त्याची अद्याक्षराची आकृती (monogram) P-L हे प्लूटोच्या खगोलशास्त्रीय चिन्हात आहे. प्लूटोचे फलज्योतिष चिन्ह हे नेपच्यूनच्या चिन्हा सारखेच आहे, फक्त त्यात मध्यभागी वर्तूळ आहे तर नेपच्यूनच्या चिन्हात मध्यभागी त्रिशूळ आहे.
होउई नोजिरी यांच्या १९३०मधील सूचनेनुसार चायनीज, जापनीज व कोरियन भाषांमध्ये या नावाचे भाषांतर पाताळभूमीचा राजा तारा (冥王星), असे केले जाते. अनेक अयुरोपियन भाषा प्लूटो हेच नाव त्यांच्या लिपितून लिहितात (transliteration).परंतु काही भारतीय भाषा पाताळदेव यम हे नाव वापरतात. व्हिएतनामीज भाषेमध्येपण यमाचे नाव (Diêm Vương) प्लूटोचे नाव म्हणून वापरतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा