सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

2 ऑगस्ट

 अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल*


*दूरध्वनी यंत्राचा शोध*

*स्मृतिदिन - २ ऑगस्ट १९२२*
 
अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल (३ मार्च १८४७, २ ऑगस्ट १९२२) यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला.
बालपण
बेल यांचा जन्म ३ मार्च १८४७ रोजी ।, स्कॉटलंड येथे झाला. त्यांचे आजोबा, वडील - अलेक्झांडर मेलव्हिल बेल आणि भाऊ या सगळ्यांचा मूक-बधिरांच्या शिक्षणाशी जवळचा संबंध होता. तर त्यांची आई आणि पत्नी या दोघीही कर्ण बधिर होत्या. लहानपणी अलेक्झांडर हे नाव ठेवण्यात तरी वयाच्या ११ व्या वर्षी स्वतःच्या नावात ग्रॅहॅम नाव टाकून घेऊन मग अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या नावाने पुढे ते ओळखले जाऊ लागले. मूक-बधिरांसाठी शिक्षण सुलभ व्हावे, त्यांना इतरांचे बोलणे कळावे यासाठी अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल सतत प्रयत्नशील होते. त्यासाठी बोस्टन विद्यापीठात स्वरयंत्राचे कार्यशास्त्र शिकविण्यासाठी नेमण्यात आले. तेथेच बधिरांसाठी यंत्र तयार करण्याचे प्रयत्न बेल करीत होते. असे यंत्र बनविण्याच्या पयत्नात बेल असतांनाच ते मेबल ह्यूबर्ड नावाच्या कर्ण बधिर मुलीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी त्यांचा विवाह झाला. पत्नीला बेलच्या यंत्राविषयी कळल्यावर तिनेच ओठांची हालचाल वाचता येणे हाच बधिरांसाठी कसा सर्वोत्तम पर्याय आहे हे पटवून सांगितले. मग बेल यांनी तसे यंत्र बनविण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्यातच दूरध्वनी यंत्राचे कोडे उलगडले.
कार्य
बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र तयार केले. दि. २ जून १८७५ या दिवशी आपले सहकारी वॉटसन यांच्यासह काम करीत असतांना दुसऱ्या खोलीतील वॉटसन यांच्या हाताच्या धक्याने ट्रान्समीटर थरथरला, तो लहानसा आवाजही बेल यांना ऐकू आला. मग बेल यांनी आपल्या ट्रान्समीटरचा उपयोग करून सहकारी वॉटसन यांना आपल्या खोलीत येण्याविषयी सांगितले. बेल यांचा तो संदेश सहकारी वॉटसन यांनी ऐकून तसा प्रतिसाद दिल्यावर संदेशाची देवाणघेवाण झाल्याबद्दल दोघांची खात्रीच पटली. बेल आणि वॉटसन यांनी या यंत्रावर आणखी प्रयोग करून दि. १५-०२-१८७६ या दिवशी आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी अर्ज दाखल केला. तेव्हा पेटंट कार्यालयातच बेल यांना समजले की अशाच प्रकारच्या प्रयोगासाठी आणखी चार अर्ज पेटंट कार्यालयात पडून होते. हे पेटंट युद्ध बराच काळ सुरू होते, शेवटी बेल यांना दूरध्वनी यंत्राचे पेटंट मिळाले.
योगदान
बेल यांनी तयार केलेल्या आपल्या यंत्राचे प्रयोग अमेरिकेत आणि युरोपमध्ये केले. त्यानुसार नोव्हेंबर १८७७ साली बेल यांना बर्लीन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. १८८५ साली बेल यांनी द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून ओळखली जावू लागली. दि. २ ऑगस्ट १९२२ या दिवशी बेल यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून समस्त अमेरिकेतील दूरध्वनी संच एक मिनीट बंद ठेवण्यात आले.
उल्लेखनीय
विज्ञान विषयक सर्व प्रकारची माहिती नियतकालिकारुपाने जगाच्या समोर यावी या हेतुने १८८२ साली बेल यांनी सायन्स नावाचे नियतकालिक सुरू करण्यात पुढाकार घेतला तसेच आपल्याजवळील पैसा लावून हे नियतकालिक आठ वर्षे सतत सुरू ठेवले. पुढे हे नियतकालिक अमेरिकन असोसिएशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे अधिकृत नियतकालिक झाले.
१८९८ ते १९०४ या काळात बेल नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचे अध्यक्ष होते.

1 ऑगस्ट

 *१ आॅगस्ट १७७४*


*जोसेफ प्रिस्टले आणि कार्ल विल्हेल्म यांनी आॅक्सजिनजचा शोध लावला*


ऑक्सिजन हे एक अधातू मूलद्रव्य आहे. हे रासायनिक घटक आहे. प्राणिमात्रांच्या जीवनासाठी अत्यावश्यक असल्यामुळे यास प्राणवायू असे सुद्धा म्हटले जाते. हा वायू सामान्य तापमानास वायुरूपात असतो. पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे २१% आहे.


पोलिश अल्केमिस्ट, दार्शनिक आणि चिकित्सक मायकेल सेंडिविगियस यांनी त्यांच्या कार्यामध्ये डी लॅपाइड फिलॉसॉफोरम ट्रॅक्टॅटस डुओडेसीम ई नट्युरे फोंट आणि मॅन्युअली अनुभवी डेम्रोटी (१६०४) यांनी हवेमध्ये असलेल्या पदार्थाचे वर्णन केले आहे. याचा अर्थ 'सिबस विटा' (जीवनाचे अन्न म्हणून संदर्भित आहे) , आणि हे पदार्थ ऑक्सिजन सारखेच आहे.[२] सेंडिविजिअस, १५९८ आणि १६०४ च्या दरम्यान केलेल्या प्रयोगांदरम्यान, पोटॅशियम नायट्रेटच्या थर्मल डिमपॉझिशनने प्रकाशीत केलेल्या वायू उपकरणाचे हे पदार्थ योग्यरित्या ओळखले गेले. बगजच्या दृश्यात, ऑक्सिजनचे पृथक्करण आणि जीवनासाठी हवेच्या त्या भागाच्या पदार्थाचा उचित संघटना, सेंडिविजिअसद्वारे ऑक्सिजनच्या शोधास पुरेसा वजन देतो. सेंडिविजिअसची ही शोध वारंवार नाकारण्यात आलेली. शास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञांच्या पिढीने ती नाकारली. स्वीडिश फार्मासिस्ट कार्ल विल्हेम शेले यांनी ऑक्सिजनचा प्रथम शोध लावला होता. त्यांनी १७७१ -२ रिक ऑक्साईड आणि विविध नाइट्रेट्स गरम करून ऑक्सिजन वायू तयार केला होता. शेले गॅस हे "अग्नि हवा" म्हणतात; कारण तो दहन समर्थन करण्यासाठी फक्त ज्ञात एजंट म्हणून कार्य करतो. त्यांनी या शोधाचा एक लेख लिखित स्वरुपात लिहिला आहे. त्या लेखात ट्रिटिझ ऑन एयर ॲंड फायर नावाचा एक हस्तलिखित आहे, जे त्यांनी १७७५ मध्ये आपल्या प्रकाशकांना पाठवले. ते कागदपत्र १७७७ मध्ये प्रकाशित झाले. दरम्यान, १ ऑगस्ट १७७४ रोजी ब्रिटीश पाळक जोसेफ प्रिस्टली यांनी केलेल्या प्रयोगाने काचेच्या नळ्यामध्ये असलेल्या मर्क्युरिक ऑक्साईड (एचजीओ) वर सूर्यप्रकाश केंद्रित केला, ज्याने "डिफ्लिस्टिस्टिकेटेड एअर" नावाचा गॅस सोडला.त्याने नोंद केले की गॅसमध्ये मेणबत्त्या अधिक उजळतात आणि की उंदीर अधिक सक्रिय होतो आणि श्वास घेताना तो जास्त काळ जगला. स्वतः गॅस श्वास घेतल्यानंतर प्रीस्टली यांनी लिहिले: "माझ्या फुफ्फुसांना याची भावना सामान्य वायुपेक्षा वेगळी नव्हती, परंतु मला वाटले की माझ्या छातीत अस्खलितपणे प्रकाश आणि नंतर काही काळ सहज वाटले." प्रिस्टलीने १७७५मध्ये "ऍन ऍट्वेट ऑफ फॉर डिस्कव्हरी इन इन एयर" नावाच्या पेपरमध्ये त्याचे निष्कर्ष प्रकाशित केले. या पुस्तकाचे प्रयोग त्यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या व्हॉल्यूममध्ये एक्सपर्टिम्स ॲंड ऑब्जर्व्हेशन्स ऑन डिफरन्स किंड्स ऑफ एअर असे करण्यात आले. त्याने आपले संशोधन प्रथम प्रकाशित झाल्याने, प्रिस्टलीला नेहमीच प्राधान्य दिले जात

31 जुलै

 *दत्तात्रेय बाळकृष्ण लिमये*

*रसायनशास्त्रज्ञ*

*जन्म दिन- ३१ जुलै १८८७

दत्तात्रेय बाळकृष्ण लिमये यांचा जन्म मणचे, ता. देवगड, जि. रत्नागिरी येथे झाला. वयाच्या पाचव्या वर्षीच एका मागोमाग आई आणि वडील निधन पावले विषय घेऊन एम.ए. (सायन्स) ही पदवी त्यांनी प्रथम क्रमांकाने संपादन केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, आर्थिकदृष्ट्या ओढगस्त असताना लिमये यांनी हे यश मिळवले. त्यांचे सगळे शिक्षण शिष्यवृत्तीवर झाले, इतकी गुणवत्ता त्यांनी आपल्या शिक्षणादरम्यान दाखवली होती. महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांचा लोभ त्यांना मिळाला. त्यामध्ये एल्फिन्स्टनचे प्राचार्य शार्प यांचा मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी लिमयांना नोकरीही देऊ केली होती, पण ती त्यांनी देशप्रेमामुळे नाकारली.


प्राचार्य कानिटकरांनी स्थापन केलेल्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये कानिटकरांचे साहाय्यक म्हणून त्यांनी काम सुरू केले. नंतर तिथे ते स्वकर्तृत्वाने संचालक झाले. औद्योगिक दृष्टीने उपयोगी पडेल असे काम लिमयांनी सुरू केले. त्यामध्ये हिरडा व तरवड यांचे अर्क काढून त्याचा कातडी कमावण्यासाठी उपयोग, लोखंड, मँगनीज, बॉक्साईट इत्यादी खनिजांचे रासायनिक विश्‍लेषण, काचेवर पारा चढवणे, बिलोरी काचेचे विविधरंगी गोळे बनवणे, पेनची, मुद्रणालयाची, कापडावर छापायची अशी वेगवेगळ्या पकारची शाई बनवणे, असे नानाविध प्रकारचे प्रयोग करून ते यशस्विरीत्या पार पाडले. गोंद, साबण, घासकामाचा कागद इत्यादीचे उत्पादन केले, तर संस्थेच्या नियामक मंडळाच्या सूचनेनुसार सिमेंट टेस्टिंगचे कामही केले. निंबोळी, उंडी, करंजेल या वनस्पतींवर त्यांनी संशोधन केले. त्यांना करंजेलमध्ये रवाळ स्फटिकरूप आणि अल्कोहोलमध्ये विरघळणारा फ्लॅव्होन जातीचा नवीन पदार्थ, तेलाच्या साक्यात मिळाला. त्याला ‘करंजिन’ असे नाव लिमयांनी दिले. रसोद प्रक्रिया, रंजोर्व प्रक्रिया, निधोन पद्धती अश वेगवेगळ्या पद्धतींना समर्पक नावे दिली. पाश्चात्त्य संशोधकांनीही लिमयांनी दिलेली नावे वापरली. यावरून त्यांच्या संशोधनाचे आणि प्रक्रियांचे महत्त्व अधोरेखित होते. आर्थिक बळाची कमतरता असताना त्यांनी असे महत्त्वाचे संशोधन करता येते, हे स्वत:च्या उदाहरणावरून दाखवून दिले. अडचणींवर मात करून उत्तम दर्जाचे संशोधन त्यांनी केलेच आणि आपल्या विद्यार्थ्यांकडून करूनही घेतले. त्यांच्या संशोधनानेच त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली.


त्यांचे एकूण ६२ संशोधनपर निबंध देशी-विदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. तसेच, त्यांनी सुमारे ५५ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर संशोधनासाठी मार्गदर्शन केले. पदव्युत्तर पातळीवर त्यांचे अनेक विद्यार्थी यशस्वी झाल्यावर मुंबई विद्यापीठाने त्यांना पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची मान्यता दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून चार विद्यार्थ्यांनी पीएच.डी. ही पदवी मिळवली.


रसायनशास्त्रातील संशोधनास मदत व्हावी म्हणून त्यांनी ‘रसायननिधी’चा शुभारंभ केला. त्यामध्ये प्रथम आपण रु.१,०००/- दिले आणि मग समाजाला आवाहन केले. संशोधनातील कामे सुचतात, पण त्यासाठी निधी नाही, अशी अडचण नवीन पिढीला येऊ नये म्हणून ही व्यवस्था केली. खूप प्रयत्नांनंतर विश्वस्तांनी एक लाख रुपये जमा केले. विश्वस्तांनी १९२५ साली रसायनशास्त्रावरील संशोधनास मान्यता दिली आणि १९३० साली रसायननिधी स्थापनाविषयक विश्वस्तपत्र लिमयांनी रजिस्टर केले. १९३० ते १९३९ साली रिसोरसिनॉल हा पदार्थ माहीत होता, पण त्यावर जगभर नवीन संशोधन सुरू होते. लिमये यांनी प्रदीर्घ संशोधनानंतर प्रक्रिया करून तीन टप्प्यांत अल्किल रिसोरसिनॉल यशस्विरीत्या मिळवले. या संशोधनाला ‘निधोन प्रोसेस’ हे नाव दिले. त्यामुळे लिमयांचे नाव जगभर ज्ञात झाले. याबाबत त्यांचा संशोधन निबंध त्यांनीच सुरू केलेल्या ‘रसायनम्’ या संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाला. नोबेल पुरस्कार विजेते प्रा.डोनाल्ड क्रम यांनी १९९० साली अमेरिकन जर्नलमध्ये लिमयांच्या संशोधन निबंधाचा संदर्भ दिला आहे. यातच लिमयांच्या संशोधनाचे महत्त्व समजते, तसेच संशोधन किती उच्च दर्जाचे होते, त्याची प्रचिती येते. १९६७ साली लिमये यांचा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन पुणे विद्यापीठाने  सत्कार केला.


बाळकृष्ण रसशाळा हा औद्योगिक प्रकल्प स्थापन करून त्यांनी आपल्या पायावर उभे राहण्याची कामगिरी केली. रसायननिधीच्या त्रैवार्षिक सभेस नोबेल पुरस्कार विजेते सर चंद्रशेखर रमण हे आले होते. त्यांनी लिमयेंच्या संशोधनाची माहिती समजून घेतली आणि त्यांच्या कामाविषयी नॅशनल केमिकल सोसायटीच्या समारंभात आणि सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनात गौरवोद्गार काढले, ही पण लिमयेंच्या कामाला मिळालेली पावतीच म्हणावी लागेल. ‘रसायनमंदिर’ या संस्थेला सरकारी अनुदान न मिळाल्यामुळे १९६४ साली रसायननिधीच्या विश्वस्तांना ते बंद करावे लागले आणि रसायननिधी पुणे विद्यापीठाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यातून विद्यापीठाने प्रा.द.बा. लिमये पदव्युत्तर रसायननिधी शोधवृत्ती चालू केली. १९८७ साली ‘डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ (डी.आर.डी.ओ.) तर्फे रसायननिधीच्या व्याजातून देण्यात येणार्‍या शोधवृत्तीमध्ये भर घालण्यात आली. पण ही शोधवृत्ती विशेष कोणालाही ज्ञात नाही.


लिमये यांचे कार्य तीन प्रकारचे आहे. त्यांनी साधनसामग्रीची संपन्नता नसतानाही कल्पकतेने संशोधन करून रसायनशास्त्रातील ज्ञानात मौलिक भर घातली, अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून संशोधकांची परंपरा निर्माण केली आणि संशोधनासाठी पैसा उपलब्ध व्हावा म्हणून रसायननिधीची उभारणी करून त्याचे संवर्धन केले. सर्वांना प्रेरणा देणारे असे कार्य त्यांनी केले, त्याचा तपशील ‘रसमहर्षी’ या समर्पक शीर्षक असलेल्या पुस्तकात वाचायला मिळेल.                                         

— दिलीप हेर्लेकर

30 जुलै

 *रामचंद्र भालचंद्र गुप्ते*

*भुशास्त्रज्ञ*

*जन्मदिन - ३० जुलै १९१९*

प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉ.रामचंद्र भालचंद्र गुप्ते यांचा जन्म ऐतिहासिक सरदार घराण्यात झाला. तैल व चिकित्सक बुद्धी, त्याबरोबरच भूशास्त्रीय प्रश्‍नांची उकल करण्याची हातोटी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, यामुळे त्यांनी भूशास्त्रीय क्षेत्रात आदराचे स्थान मिळविले होते. डॉ. गुप्ते खऱ्या अर्थी निरीश्वरवादी होते. त्यांनी अनेक दु:खाचे प्रसंग धीराने पचविले. महाविद्यालयात शिकणाऱ्या त्यांच्या एकुलत्या एका मुलाचे आकस्मिक दु:खद निधन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला मंत्रालयात झालेल्या ‘कोयना टेमर्स कमिटी’च्या बैठकीतील चर्चेत त्यांनी अविचल मनाने भाग घेतला होता.


पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातून त्यांनी बी.एस्सी. पदवी मिळवली. त्यांना त्या परीक्षेत ‘दक्षिणा फेलोशिप’ मिळाली होती. संशोधन करून एम.एस्सी. पदवी प्राप्त केल्यावर काही महिने त्यांनी भारतीय भूशास्त्र संस्था (जी.एस.आय.) मध्ये काम केले. त्यानंतर १९६६ सालापर्यंत त्यांनी अहमदाबाद, नागपूर व पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत अधिव्याख्याता म्हणून काम केले. मार्च १९६६ पासून जुलै १९७७ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक व भूशास्त्रीय विभागप्रमुख म्हणून होते.


१९५० सालापासून आयुष्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्राचा ८५ टक्के भूभाग व्यापणाऱ्या ‘डेक्कन टॅप’ खडकांविषयी त्यांनी मूलभूत संशोधन केले. त्यात खडकांचे विविध प्रकार, त्यांच्या क्षेत्रीय संरचना, त्यांचे विविध गुणधर्म याविषयी त्यांनी सखोल निरीक्षण व अभ्यास केला. त्यांच्या संशोधनामुळे या खडकांच्या बऱ्याच अज्ञात वैशिष्ट्यांविषयी नव्याने माहिती मिळाली. तसेच बऱ्याच जुन्या कल्पना चुकीच्या असल्याचे त्यांनी दाखवून दिले. संशोधनातील अप्रामाणिकपणा ते कधीच खपवून घेत नसत.


भूशास्त्र या विषयाचा अभ्यास प्रयोगशाळेपुरता मर्यादित न ठेवता, त्या संशोधनाचा उपयोग स्थापत्य अभियांत्रिकी कामात केला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. खडकांच्या विविध गुणधर्मांविषयी त्यांनी जी अचूक माहिती मिळविली होती, त्या माहितीचा अभियांत्रिकी भूशास्त्र समजण्यास फार उपयोग झाला. गेरू, ज्वालामुखी, ब्रेशिया, डाइक, भरितकुहरी, बेसॉल्ट या खडकांबद्दल अभियंत्यांच्या मनात चुकीच्या कल्पना असल्यामुळे धरणांचा पाया घेताना त्यांच्या मनांत काहीशी भीती असे. त्यामुळे प्रकल्पावर निष्कारण बराच खर्च केला जाई. डॉ. गुप्ते यांच्या संशोधनामुळे कोट्यवधी रुपये वाचू शकले. त्यामुळेच स्थापत्य अभियंते त्यांचा सल्ला शिरसावंद्य मानत.


१९६२ सालापासून महाराष्ट्र सरकारचे पाटबंधारे खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, मध्य रेल्वे, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स, टाटा इलेक्ट्रिसिटी कंपनीज, एम.आय.डी.सी., बृहन्मुंबई महानगरपालिका, न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन, इलेक्ट्रिसिटी टू लाओस यांसारख्या अभियांत्रिकी संघटनांसाठी अनेक धरणे, कालवे, बोगदे, रस्ते, लोहमार्ग, भूमिगत विद्युतगृहे व पूल यांसारख्या अनेक प्रकल्पांच्या ठिकाणी भूशास्त्रीय अभ्यास करून त्यांचे आराखडे व बांधकाम यांविषयी डॉ. गुप्ते यांनी मोलाचा सल्ला दिला. या प्रकल्पांव्यतिरिक्त बृहन्मुंबई पाणीपुरवठ्यासाठी भातसा, मध्य वैतरणा धरण, समुद्राखालील वसई खाडी बोगदा (क्रीक टनेल), केळशी बोगदा (अंडरक्रीक टनेल), सहार ते रेसकोर्स हा प्रमुख बोगदा व ५० कि.मी. लांबीचे पाण्यासाठीचे मुंबई शहरातील इतर बोगदे, वैतरणा जलविद्युत प्रकल्प, कोयना जलविद्युत प्रकल्पाचा तिसरा व चौथा टप्पा, पुण्याजवळील पानशेत, वरसगाव, टेमघर, भाभा आसखेड, चासकमान इत्यादी धरणांवर, तसेच मध्य रेल्वेच्या थळ आणि बोरघाटातील तिसरे रेल्वे मार्ग, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या तिसऱ्या व चौथ्या अणुभट्टीच्या जागा, लाओसमधील सेसेल, सेलाबाम इत्यादी जलविद्युत प्रकल्पांवर त्यांनी तज्ज्ञ म्हणून काम केलेले आहे.

नर्मदा पाणी तंट्याविषयी लवादाच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारचे भूशास्त्रीय सल्लागार म्हणून नवागाव व जलसिंधी येथील धरणांच्या जागेचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी महाराष्ट्र सरकारला लवादांशी संबंधित बाबींविषयी मोलाचा भूशास्त्रीय सल्ला दिला.

महाराष्ट्र सरकारच्या ‘कोयना ट्रेमर्स कमिटी’ व ‘एक्स्पर्ट कमिटी ऑन सिस्मॉलॉजी’चे एक तज्ज्ञ सदस्य म्हणून त्यांनी काम केले. कोयना भूकंप कोयना धरणामुळे झाला नाही हे भूशास्त्राच्या आधारे सिद्ध करण्यासाठी त्यांनी सखोल संशोधन केले. हा भूकंप धरणामुळे झाला असणे कसे शक्य नाही हे त्यांनी शोधनिबंध लिहून व विविध चर्चासत्रांत भाग घेऊन दाखवून दिले.

महाराष्ट्र सरकारच्या ‘सिंचन व जल आयोगा’चे सहयोगी तज्ज्ञ म्हणून त्यांनी आयोगाच्या अनेक कार्यशाळांत झालेल्या चर्चेत भाग घेतला व आयोगाला भूजलाच्या भूशास्त्रीय पैलूंविषयी टिप्पण्या तयार करण्यास सहकार्य केले.

भाषा संचालनालयाने मराठी भाषेत भूशास्त्रीय परिभाषा तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते. परिभाषा तयार करण्याच्या चर्चांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

डेक्कन टॅप खडकांच्या मूलभूत स्वरूपाविषयी व त्यांच्या अभियांत्रिकी भूशास्त्रीय गुणधर्मांविषयी त्यांचे पंचवीसहून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकांत प्रसिद्ध झालेले आहेत. ‘पी.डब्ल्यू.डी. हँड बुक प्रकरण क्र. ६’, तसेच ‘ए टेक्स्ट बुक ऑफ इंजिनिअरिंग जिऑलॉजी’ व ‘एजी सिरीज ऑफ जिऑलॉजिकल मॅप्स’ ही त्यांची पुस्तके भूशास्त्रातील आधारभूत ग्रंथ मानले जातात.

भूशास्त्रातील ज्ञानकोश असलेले डॉ. गुप्ते कालवश झाल्याने डेक्कन टॅप बेसॉल्ट खडकांच्या एका अभ्यासपर्वाचा अंत झाला, असेच म्हणावे लागेल.

— डॉ. बा. मो. करमरकर

29 जुलै

 *२९ जुलै २००५

*Mike Brown, Chad Trujillo, आणि David Rabinowitz यांना "Eris" हा बटुग्रह (dwarf planet) सापडल्याचे  जाहिर झाले

Eris was discovered by the team of Mike Brown, Chad Trujillo, and David Rabinowitz on January 5, 2005, from images taken on October 21, 2003. The discovery was announced on July 29, 2005, the same day as Makemake and two days after Haumea, due in part to events that would later lead to controversy about Haumea. The search team had been systematically scanning for large outer Solar System bodies for several years, and had been involved in the discovery of several other large TNOs, including 50000 Quaoar, 90482 Orcus, and 90377 Sedna.


Routine observations were taken by the team on October 21, 2003, using the 1.2 m Samuel Oschin Schmidt telescope at Palomar Observatory, California, but the image of Eris was not discovered at that point due to its very slow motion across the sky: The team's automatic image-searching software excluded all objects moving at less than 1.5 arcseconds per hour to reduce the number of false positives returned. When Sedna was discovered in 2003, it was moving at 1.75 arcsec/h, and in light of that the team reanalyzed their old data with a lower limit on the angular motion, sorting through the previously excluded images by eye. In January 2005, the re-analysis revealed Eris's slow motion against the background stars.


Follow-up observations were then carried out to make a preliminary determination of Eris's orbit, which allowed the object's distance to be estimated. The team had planned to delay announcing their discoveries of the bright objects Eris and Makemake until further observations and calculations were complete, but announced them both on July 29 when the discovery of another large TNO they had been tracking, Haumea, was controversially announced on July 27 by a different team in Spain.

Precovery images of Eris have been identified back to September 3, 1954.

More observations released in October 2005 revealed that Eris has a moon, later named Dysnomia. Observations of Dysnomia's orbit permitted scientists to determine the mass of Eris, which in June 2007 they calculated to be (1.66±0.02)×1022 kg,[12] 27%±2% greater than Pluto's

28 जुलै

 *२८ जुलै*

*जागतिक कावीळ दिवस*

(Hepatitis B Day)

*Baruch Blumberg*

*कावीळ आजारावर लस शोधुन काढली*

*जन्मदिन - २८ जुलै १९२५*

संसर्गजन्य रोगांच्या उत्पत्ती आणि त्यांचा प्रसार याबद्दलचे संशोधन तसेच त्यावरील नवीन यंत्रणेसंबंधित शोधांसाठी ब्लॉम्बरग यांना नोबेल पारितोषिक प्राप्त झाले." ब्लंबर्गने हेपेटायटीस बी विषाणूची ओळख पटविली आणि नंतर त्याचे निदान चाचणी आणि लस विकसित केली .


कावीळ किंवा कामला हा एक स्वतंत्र विकार मानण्यापेक्षा ते एक रोगलक्षण मानणे सयुक्तिक आहे. यकृतातून बाहेर जाणाऱ्या पित्तरसापेक्षा अधिक पित्तरस यकृतात तयार होऊ लागला म्हणजे कावीळ होते. जास्तीचा शिल्लक राहिलेला पित्ताचा भाग रक्तात मिसळला जातो व सर्व शरीरभर पसरतो. यातूनच डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. त्वचेचा रंग पिवळसर होऊ लागतो. लघवी पिवळी होते व तीव्र काविळीत लालसर पिवळी दिसते. पित्त यकृतातून बाहेर पडताना पित्तनलिकेत किंवा प्रत्यक्ष यकृतांतर्गत अडथळा निर्माण झाला, तर शौचास पांढरेफिके होऊ लागते.

कावीळ हे यकृतविकृतीचे किंवा रक्तातील तांबड्यापेशी जास्त नाश पावत असल्याचे चिन्ह होय. या रोगाचे निदान मुत्रपरीक्षेतून व रक्ताच्या चाचण्यांतून होते. नवजात बालकाला रक्तपेशींचे दान निसर्गाने जरा सढळपणे दिलेले असते. त्यामुळे जन्मानंतर काही दिवसांतच या जास्तीच्या पेशी नाश पावतात व मंद स्वरूपात कावीळ उद्भवते. पण ती आपोआपच थोड्याच दिवसांत नाहीशी होते. क्वचित ती तीव्र स्वरूपात व अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच दिसल्यास त्या बालकाला फोटोथेरपी हा अल्ट्राव्हाॅयलेट किरणांचा उपचार दिला जातो. हिमोलायटिक ऍनिमिया या रक्तक्षयाच्या आजारातही रक्तपेशींचा नाश होत असल्याने कावीळ होते. मूळ कारण दूर झाल्यास ती बरी होते.

आपण सहसा काविळीचा रुग्ण पाहतो, तो विषाणूजन्य पाण्यातून झालेल्या संसर्गाचा बळी असतो. तोंडावाटे पाण्यातून हे विषाणू शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे यकृताला सूज येते, कार्यात अडथळा होतो. यकृताचे तांबड्या रक्तपेशी नष्ट करण्याचे काम नीट न झाल्याने कावीळ दिसू लागते. मळमळ, ओकारी, भूक मंदावणे, गुबारा धरणे, शरीराला कंड सुटणे, मलावरोध ही लक्षणे प्राधान्याने सर्वच रुग्णांत दिसतात. डोळ्यांचा, त्वचेचा व मूत्राचा रंग पिवळा होतो, तर शौचास पांढरट चिकणमातीसारखे होऊ लागते. पचनास आवश्यक पित्तरसाचा अभाव झाल्याने ही लक्षणे दिसतात. सामान्यपणे पाच ते दहा दिवसांत हा आजार बरा होतो.

दुसऱ्या प्रकारच्या काविळीत म्हणजे रक्ताद्वारे संसर्ग होणाऱ्या काविळीत विषाणू एकाच्या रक्तातून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. इंजेक्शनच्या सुया, शस्त्रक्रियेच्या सुया वा रक्त यांच्याशी सतत संपर्क येणाऱ्या सिस्टर, डॉक्टर यांसारखी व्यक्ती, सर्जन यांना हा संसर्ग होण्याची शक्यता असते. ही कावीळ तीव्र स्वरूपाची असून बरी व्हायला खूप वेळ लागतो. काही वेळा यकृतदाह होऊन यकृताचे काम कायमचेच मंदावत जाते. यालाच 'लिव्हर सिर्‍हाॅसिस' असे म्हणतात. सिर्‍हाॅसिसमध्ये यकृत आक्रसत जाऊन त्याचे काम बंद पडत जाते. हा एक गंभीर रोग आहे. सध्या काविळीची लस (हेपॅटायटिस बी) टोचली जाते, ती या प्रकारच्या काविळीला प्रतिबंध करते. या प्रकारच्या काविळीवर उपचार नसल्याने प्रतिबंध हाच योग्य उपाय तर ठरतो.

अंथरुणात पडून पूर्ण विश्रांती, तोंडावाटे भरपूर शर्करायुक्त पेयद्रव्ये, हलका कर्बयुक्त आहार घेतल्यास सर्वसामान्य कावीळ आपोआप नियंत्रणात येते. तीव्र लक्षणांत शिरेवाटे ग्लुकोज सलाईन देऊन रुग्णाच्या पचनसंस्थेला आराम देऊन मदत केली जाते.

कावीळ हा विषाणूजन्य आजार असल्याने रुग्णाशी संपर्क आल्यास हात स्वच्छ धुणे, त्याची भांडी, अंथरूण, कपडे यांची वेगळी व्यवस्था करणे व अन्य लोकांनी पाणी उकळून पिणे हा प्रतिबंधाचा महत्त्वाचा मार्ग असतो.

शेवटी पण महत्त्वाचे, काविळीची लक्षणे व प्रत्यक्ष संसर्ग होण्याची कारणे जरी दूर झाली, तरी रुग्णाच्या डोळ्यांचा रंग काही आठवडे पिवळसर राहतो व हळूहळू नेहमीसारखा होतो.

27 जुलै

ए.पी.जे. अब्दुल कलाम

*भारताचे अकरावे राष्ट्रपती

*स्मृतिदिन - २७ जुलै २०१५*

अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.

कार्य

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.

स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.

वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे आहेत. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे.

26 जुलै

*Edwin Albert Link*

*Invented the flight simulator*

*Born - July 26, 1904*

Edwin Albert Link (July 26, 1904 – September 7, 1981) was an American inventor, entrepreneur and pioneer in aviation, underwater archaeology, and submersibles. He invented the flight simulator, which was called the "Blue Box" or "Link Trainer". It was commercialized in 1929, starting a now multibillion-dollar industry. In total, he obtained more than 27 patents for aeronautics, navigation and oceanographic equipment.

He took his first flying lesson in 1920.[6] In 1927, he obtained the first Cessna airplane ever delivered and eked out a living by barnstorming, charter flying and giving lessons.[6]

As a young man, Edwin Link used apparatus from his father's automatic piano and organ factory (of the Link Piano and Organ Company) to produce an advertising airplane. A punched roll and pneumatic system from a player piano controlled sequential lights on the lower surfaces of the wings to spell out messages like "ENDICOTT-JOHNSON SHOES". To attract more attention, he added a set of small but loud organ pipes, also controlled by the roll.

25 जुलै

 *एकनाथ वसंत चिटणीस

*उपग्रहशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ*

*जन्मदिन - २५ जुलै १९२५

प्रा.एकनाथ वसंत चिटणीस हे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या अहमदाबाद येथील अवकाश उपयोजन केंद्राचे, (स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर) माजी संचालक आहेत. कोल्हापूर येथे जन्मलेल्या प्रा.चिटणीस यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. प्रथम रसायनशास्त्र आणि नंतर भौतिकशास्त्र या विषयांत पदवी संपादन केलेल्या प्रा. चिटणीसांनी त्यानंतर रेडिओसंपर्क क्षेत्रातील पदविकेचा अभ्यासक्रम पूर्ण करून इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील पदव्युत्तर पदवीही प्राप्त केली. अहमदाबाद येथे डॉ. विक्रम साराभाईंनी स्थापन केलेल्या भौतिकशास्त्र संशोधन प्रयोगशाळेत त्यांनी आपल्या संशोधनास प्रारंभ केला. प्रा. चिटणीस हे भारतीय अंतराळ कार्यक्रमात अगदी सुरुवातीपासून सहभागी होते. अग्निबाण प्रक्षेपण केंद्रासाठी केरळमधील थुंबा या जागेची आणि उपग्रह प्रक्षेपण केंद्रासाठी श्रीहरिकोटा या जागेची निवड करण्यामागे मुख्यत्वे प्रा. चिटणीस यांचे परिश्रम कारणीभूत आहेत. भारताच्या अंतराळ क्षेत्रात अत्यंत यशस्वी ठरलेल्या ‘इन्सॅट’ मालिकेतील उपग्रहांच्या आखणीतही त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांत केला जाण्याच्या दृष्टीने त्यांनी बहुमोल कामगिरी केली आहे.


प्रा. चिटणीसांचे १९५०-१९६० या दशकातले संशोधन हे वैश्विक किरणांशी संबंधित होते. या संशोधनात तामीळनाडूमधील कोडाईकॅनॉल येथून केलेल्या वैश्विक किरणांच्या वर्षावाबद्दलच्या विशेष अभ्यासाचाही समावेश आहे. त्यांची पीएच.डी. ही पदवी याच विषयाशी संबंधित आहे. वैश्विक किरणांवरील संशोधनासाठी १९५८ ते १९६१ या तीन वर्षांच्या काळात ते अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थेतही राहिले होते. १९६०-१९७० या दशकांत प्रा. चिटणीसांनी क्ष-किरण खगोलशास्त्रावर आपले लक्ष केंद्रित केले. या संशोधनात अंतराळातील क्ष-किरणांच्या विविध स्रोतांचे वेध घेण्यासाठी अग्निबाणांवर बसवलेल्या उपकरणांचाही वापर केला गेला.


अंतराळ तंत्रज्ञानाचा शेत़ी, हवामान, आरोग्य, शिक्षण, दूरसंपर्क, मनोरंजन, अशा विविध क्षेत्रांत वापर करण्याच्या दृष्टीने भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने ‘नासा’च्या सहकार्याने १९७०च्या दशकात ‘साइट’ (सॅटेलाइट इंस्टक्शनल टेलिव्हिजन एक्सपरिमेंट) हा बहुपयोगी प्रकल्प आखला होता. अवकाश उपयोजन केंद्राचे तत्कालीन संचालक प्रा. यशपाल यांच्या सक्रिय पुढाकारातून साकारलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी प्रा. चिटणीस यांनी यशस्विरीत्या पार पाडली. १९७५-१९७६ साली प्रत्यक्षात आलेल्या या प्रकल्पामुळे विविध राज्यांतील सुमारे २९०० खेड्यांतील दूरचित्रवाणी संच उपग्रहाद्वारे एकमेकांना जोडले जाऊन विविध कार्यक्रमांचे सर्वत्र एकाच वेळी प्रसारण करणे शक्य झाले. या प्रकल्पामुळे दूरचित्रवाणी हे नुसतेच करमणुकीचे माध्यम न राहत़ा, या माध्यमाची राष्ट्रीय स्तरावरची सर्वंकष उपयुक्तता सिद्ध झाली.


भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमात सुरुवातीपासून सहभागी असणारे प्रा. चिटणीस १९६२ साली अंतराळ संशोधनासाठी डॉ. विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या राष्ट्रीय समितीचे (इन्कोसपार) सभासद सचिव होते. प्रा. चिटणीसांचा संयुक्त राष्ट्रसंघासारख्या संघटनांशी निकटचा संबंध आला असून त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय अंतराळविषयक परिषदांतून भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले आहे. १९८१-१९८५ या काळात प्रा. चिटणीस हे अहमदाबाद येथील अवकाश उपयोजन केंद्राचे संचालक होते. १९८५ साली या पदावरून निवृत्त झाल्यावर दोन वर्षांसाठी त्यांची याच संस्थेत सल्लागार म्हणून विशेष नेमणूक केली गेली होती. त्यानंतर त्या वेळी नुकत्याच सुरू झालेल्या ‘कंट्रिवाइड क्लासरूम’ या दूरदर्शनवरील शैक्षणिक कार्यक्रमाच्या संयोजनात त्यांचा सहभाग होता.


गेली अनेक वर्षे प्रा.चिटणीस हे पुणे विद्यापीठाच्या ‘व्यवस्थापन’, ‘पत्रकारित़ा’, ‘मास कम्युनिकेशन’, अशा विविध विषयांच्या अभ्यासक्रमांच्या आयोजनांस मार्गदर्शन करीत असून ते या विषयांत अध्यापनही करीत आहेत. १९८६ सालापासून ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या प्रतिष्ठित संस्थेच्या संचालक समितीवर असणाऱ्या प्रा. चिटणीसांनी २००८-२००९ या काळात या संस्थेचे अध्यक्षपदही भूषवले आहे. ‘राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाऴा’, ‘राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था’ यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या विज्ञान संशोधन संस्थांपासून ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापी़ठ’, ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापी़ठ’, ‘भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था’ यांसारख्या दर्जेदार शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापकीय समित्यांवरही त्यांनी काम केले आहे.


प्रा.चिटणीस हे आपल्या बहुविध कार्याद्वारे विविध सन्मानांचे मानकरी ठरले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतील बहुमोल योगदानाबद्दल १९८५ साली त्यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विज्ञान आणि समाज यांच्यातील अन्योन्य संबंधांवर आधारित कार्याबद्दल त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विशेष पारितोषिकाने गौरवण्यात आले. प्रा. चिटणीसांना ‘फाय फाउंडेशन’चा सन्मान  व ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे ‘आर्यभट्ट’ पारितोषिकही मिळाले आहे. दूरसंपर्क क्षेत्रातील असामान्य कामगिरीबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून प्रा. चिटणीसांचा विशेष पदक देऊन गौरव करण्यात आला आहे.

—डॉ. राजीव चिटणीस

24 जुलै

 *२४ जुलै १९११*

*"भारतीय विज्ञान संस्था" स्थापना*

भारतीय विज्ञान संस्था (Indian Institute of Science) ही संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी असलेली अग्रेसर शिक्षण संस्था बंगळूर, भारत येथे आहे. या संस्थेत पदव्युत्तर तसेच डॉक्टरेट कार्यक्रम आहेत. ज्यामध्ये २०० पेक्षा अधिक संशोधक ३७ पेक्षा अधिक विभागांमध्ये काम करतात. उदाहरणार्थ: अभियान्त्रिकीमध्ये अंतरीक्ष अभियांत्रिकी, संगणकशास्त्र आणि स्वयंचलन इत्यादी, आणि शास्त्रांमध्ये भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र इत्यादी. भारतीय विज्ञान संस्था भारतातील संशोधनसंस्थांमध्ये पहिल्या दर्जाची संस्था आहे.

भारतीय विज्ञान संस्था सन १९०९ मध्ये उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्या दूरदृष्टीतुन जन्माला आली. सन १८९८ मध्ये एक तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली. नोबेल पारितोषिक विजेते सर विलियम रॅम्से यांनी बंगळूर हे आदर्श ठिकाण सुचवले आणि मॉरिस ट्रॅव्हर्स संस्थेचे पहिले संचालक बनले.

23 जुलै

 *सॅली राईड*

*पहिली अमेरिकन महिला अंतराळयात्री*

*स्मृतिदीन - २३ जुलै २०१२*

अंतराळयुगाची म्हणजे 'स्पेस एज'ची सुरुवात झाली ती रशियाकडून. साहजिकच त्या देशाची सर्वच बाबतीत स्पर्धा करणाऱ्या अमेरिकेला स्वस्थ बसवणे शक्य नव्हते. रशियाने पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवून युरी गागारिनला आणि पहिली महिला अंतराळात पाठवून व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा यांचा विक्रम घडवला. त्यानंतर लगेच अमेरिकेने आपल्या 'स्पेस प्रोग्रॅम'ला वेग दिला. १९६० चं दशक पूर्ण होण्यापूर्वीच अमेरिका चंद्रावर माणूस पाठवेल अशी महत्त्वाकांक्षी घोषणा तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी केली. 'हे काम सोपे नाही. पण ते कठीण आहे म्हणूनच आम्ही आव्हान स्वीकारत आहोत,' असे स्फूर्तिदायक उद्गार काढून त्यांनी अमेरिकेच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवले.

त्याचा परिणाम म्हणून 'नासा'च्या कार्याला वेग आला. रशियाने व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा आणि स्वेतलाना सॅवित्स्काया या महिलांना १९६३ आणि १९८२ मध्ये अंतराळात पाठवले. मधल्या काळात अमेरिकेचे नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन हे अंतराळवीर १९६९ मध्ये चंद्र पादाक्रांत करून आले, पण तोपर्यंत एखाद्या महिलेला अंतराळात पाठवणं अमेरिकेला जमले नव्हते. १९८३ मध्ये तशी संधी सॅली राइड यांना मिळाली. वयाच्या ३२ व्या वर्षी अंतराळात जाणारी सॅली राइड सर्वात तरुण महिला अंतराळयात्री ठरली.

१९५१ मध्ये अमेरिकेतील लॉस एन्जेलिस येथे जन्मलेल्या सॅलीने भौतिकशास्त्र्ााचे शिक्षण घेतले होते. तिचे कॉलेजचे शिक्षण शिष्यवृत्तीवर (स्कॉलरशिपवर) झाले होते. विज्ञानाची आवड असलेल्या सॅलीने टेनिस खेळातही प्रावीण्य मिळवले होते. भाषा विषय तिचा आवडता होता. त्यामुळे तिने इंग्लिश आणि भौतिकशास्त्र्ा अशा विषयात पदवी प्राप्त केली. पुढे स्टॅनफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून १९७८ मध्ये तिने 'डॉक्टरेट' (पीएच.डी.) मिळवली. आंतरतारकीय म्हणजे दोन ताऱ्यांमधील क्ष-किरणांच्या प्रक्रियेविषयी तिने विशेष खगोलभौतिक अभ्यास केला.

त्याच वेळी म्हणजे १९७८ मध्ये 'नासा'ने 'स्पेस प्रोगॅम'साठी एक जाहिरात दिली होती. अमेरिकाभरच्या ८००० तरुण-तरुणींनी त्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी एकटय़ा सॅली राइडची निवड झाली. यावरून तिची बुद्धिमत्ता जाणवते. 'नासा'च्या कारकीर्दीत सुरुवातीला सॅलीने स्पेसमध्ये जाणाऱ्या अंतराळयानांच्या तंत्रज्ञानाच्या पृथ्वीवरील विभागात काम केले. त्याच वेळी तिने अंतराळयानाचा 'कॅनॅडेरम' रोबोट आर्म विकसित केला. सॅली अंतराळयात्रा करणार असे नासाने ठरवल्यावर तिला हा प्रवास झेपेल का, अशा आशयाचे प्रश्न विचारले गेले. त्यावर 'स्त्र्ााr अथवा पुरुष हा प्रश्न येतोच कुठे? मी एक 'ऍस्ट्रॉनॉट' आहे' असे परखड उत्तर तिने दिले. आणि चॅलेंजर या यानातून ती १८ जून १९८३ रोजी अंतराळात झेपावली. अंतराळात 'रोबर्ट आर्म'चा वापर करून उपग्रहात दुरुस्ती करणारीही ती पहिली महिला ठरली. १९८४ मध्ये सॅली राइड यांना पुन्हा एकदा 'चॅलेंजर'मधूनच अंतराळात जाण्याची संधी मिळाली. तिने एकूण ३४३ दिवस अंतराळात संशोधन करण्यात खर्च केले. पुढे 'चॅलेंजर'ला अपघात झाला. त्याबाबतच्या चौकशी समितीत राइड होत्या. १९८७ मध्ये सॅली राइड यांनी 'नासा'ची नोकरी सोडली. त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. या उत्साही संशोधक महिलेला कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाने ग्रासले. त्यातच २३ जुलै २०१२ रोजी एकसष्टाव्या वर्षी त्या कालवश झाल्या.

20 जुलै

 *गुलियेल्मो मार्कोनी*

*भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेता*

*स्मृतिदिन - २० जुलै १९३७*

गुलियेल्मो मार्कोनीचा जन्म इटलीतील 'बोलोन्या' शहरात एप्रिल २५, १८७४ रोजी झाला. मार्कोनीच्या जन्माच्या आधी १८६८ मध्ये मॅक्‍सेल या शास्त्रज्ञाने विजेचा प्रवाह वातावरणात आहे, अशी कल्पना मांडली होती. या वीजप्रवाहाचे गुणधर्मही त्याने वर्णिले होते. पण बाकीच्या शास्त्रज्ञांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

मार्कोनीला लहानपणापासूनच विजेच्या प्रवाहाबाबत कुतूहल होते. हाइनरिक हर्ट्‌‌‌झचे लेखही त्याने वाचले होते. १८९५ मध्ये मार्कोनी हर्ट्‌‌झच्या संशोधनावर आपल्या वडिलांच्या बोलोन्यातील मोठ्या वाड्यात काम करू लागला. तो आपला पहिला बिनतारी संदेश एक मैल लांब पाठवू शकण्यात यशस्वी झाला. जून २, १८९४ मध्ये इंग्लंडमधील मुख्य पोस्ट ऑफिसच्या छपरावरून मार्कोनीचे पहिले प्रात्यक्षिक करण्यात आले. सरकारी अधिकारी, पोस्टातील मान्यवर त्या वेळी उपस्थित होते.

सॅल्सबरीमध्ये दुसर्‍या प्रात्यक्षिकाला वायुदल व सेनादलातील बरेच अधिकारी आले. आता दोन मैलांवरून बिनतारी संदेश दहा मैलांपर्यंत पोचू शकत होता. हळूहळू मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचे जाळे सर्वत्र पसरत गेले. १९१४ मध्ये पहिले जागतिक युद्ध पुकारले गेले. मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचा इटालियन नौदल, वायुदलास फार उपयोग झाला. जगातील सर्वांत मोठे वायरलेस स्टेशन मार्कोनीने उभारले. मार्कोनीला भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक व इतर अनेक पारितोषिके मिळाल

22 जुलै

 *सँडफोर्ड फ्लेमिंग

*जागतिक प्रमाणवेळ संशोधन

*स्मृतिदिन - २२ जुलै १९१५*

सँडफोर्ड फ्लेमिंग हे स्काॅटिश कॅनेडियन अभियंता आणि संशोधक होते. तसेच कॅनडाच्या राॅयल सोसायटीचे फाऊंडर मेंबर आणि टोरांटो मधील सायन्स आॅर्गनायझेशनच्या कॅनडियन इन्स्टिट्युटचे फाउंडर होते.

जागतिक प्रमाणवेळ ठरवुन देण्याचे श्रेय त्यांना जाते.


प्रमाणवेळ ही जगातील वेगवेगळ्या स्थानांमध्ये पाळली जाणारी घड्याळाची एक वेळ आहे. बऱ्याचदा प्रमाणवेळेला "स्थानिक वेळ" असेही संबोधले जाते. प्रमाणवेळ ही यूटीसीपासून स्थानिक वेळफरकामध्ये लिहीली जाते, उदाहरणार्थ...

भारतीय प्रमाणवेळ = यूटीसी + ०५.३०, 

अमेरिकेची पूर्व प्रमाणवेळ = यूटीसी - ५:०० 

जपानची प्रमाणवेळ = यूटीसी + ९:००.

जगातील काही देशांमध्ये स्थानिक वेळेसोबत उन्हाळी प्रमाणवेळ (डेलाईट सेव्हिंग टाईम) वापरण्याची पद्धत प्रचलित आहे. ह्यानुसार उन्हाळी ऋतूमध्ये जास्त वेळ टिकणाऱ्या सूर्यप्रकाशाचा फायदा घेण्यासाठी सर्व स्थानिक घड्याळे १ तास पुढे ढकलली जातात.

21 जुलै

💥🌹आजचा दिनविशेष🌹💥

        🌸शंकर बाळकृष्ण दीक्षित🌸

(२१ जुलै १८५३–२७ एप्रिल १८९८).
*भारतीय ज्योतिषशास्त्र व गणिती.*
         भारतीय ज्योतिषशास्त्राच्या इतिहासाचा आढावा घेऊन त्यावरून त्यांनी काही ग्रंथांचे व घटनांचे काळ ठरविले तसेच भारतीय ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाला पुनश्च चालना दिली.

         त्यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण रत्‍नागिरी जिल्ह्यातील मुरूड गावी झाले. याच काळात त्यांनी घरी संस्कृत व वैदिक विषयांचा प्राथमिक अभ्यास पूर्ण केला. नंतर दोन वर्षे त्यांनी दापोलीच्या कोर्टात उमेदवारी केली व त्याच काळात इंग्रजीचे थोडे अध्ययनही केले. नंतर ते पुण्याच्या प्रशिक्षण महाविद्यालयात दाखल झाले व १८७४ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. याच काळात त्यांनी दुसऱ्या शाळेत इंग्रजीचे अध्ययनही केले. तद्‌नंतर त्यांनी रेवदंडा, ठाणे व बार्शी येथे मुख्याध्यापक आणि पुढे धुळे व पुणे येथील प्रशिक्षण महाविद्यालयांत अध्यापक म्हणून काम केले. या काळातच त्यांनी ज्यातिषशास्त्र व गणित यांचा तपशीलवार अभ्यास केला आणि भारतीय ज्योतिषशास्त्रातील विविध सिद्धांतांची माहिती करून घेतली. यासाठी त्यांनी पाचशेहून अधिक संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला होता. अशा प्राचीन भारतीय ग्रंथांमधील उल्लेखांवरून काही ग्रंथांचे काळ त्यांनी निश्चित केले. उदा., शतपथ ब्राह्मणातील एका ऋचेच्या आधारे त्यांनी त्या ग्रंथाचा काळ इ. स. पू. ३००० वर्षे, तसेच वेदांगज्योतिषाचा काळ इ. पू. १४०० वर्षे असा निश्चित केला. यावरून इतिहास व ज्योतिषशास्त्राचा विकास यांच्यात संगती लावण्याचा प्रयत्‍न त्यांनी केला. शिवाय वैदिक काळात कोणत्या ज्योतिषशास्त्रीय गोष्टी माहित होत्या, तेही त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. ग्रीक आणि भारतीय ज्योतिषशास्त्रीय विचारांचा तुलनात्मक अभ्यास करून भारतीय ज्योतिषशास्त्र हे स्वतंत्र वेध व संशोधन यांद्वारे भारतातच विकसित झालेले शास्त्र आहे, हे त्यांनी सिद्ध केले. पंचांग शोधनाचे शास्त्र, नक्षत्रसंस्था व अंकगणित हे भारतीयांनी जगाला दिल्याचे त्यांनी दाखवून दिले. उलट राशी व वार ही मूळची भारतीय नव्हेत, असेही त्यांना आढळून आले. त्यांचा फलज्योतिषावर विशेष विश्वास नव्हता, पण ते त्यावर विचार करीत होते.

त्यांनी मराठी व इंग्रजीत विपुल लेखन केले असून त्याद्वारे सोप्या व मनोरंजक भाषेत विविध शास्त्रीय विषयांची माहिती त्यांनी करून दिलेली आहे. विद्यार्थिबुद्धिवर्धिनी  (१८७६), सृष्टचमत्कार  (१८८२), ज्योतिर्विलास  (१८९३), भारतीय ज्योति:शास्त्र  (१८९७), धर्ममीमांसा  (१८९५–९७) आणि सोपपत्तिक अंकगणित (१८९७), धर्ममीमांसा (१९८५-९७) आणि सोपपत्तिक अंकगणित (१८९७) हे ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. ज्योतिर्विलास (अथवा रात्रीच्या दोन घटका मौज किंवा अंतरिक्षांतून फेरुटका) या ग्रंथात त्यांनी विश्वाची रचना, त्याचे अनंतत्त्व व त्यासंबंधीचे अढळ नियम तसेच प्राचीन व अर्वाचीन ज्योतिषशास्त्रीय विचार यांची सोप्या व मनोरंजक भाषेत माहिती दिली आहे. या ग्रंथांची सुधारित व आधुनिक माहिती घातलेली सहावी आवृत्ती रामचंद्र शंकर दीक्षित या त्यांच्या पुत्राने १९४८ साली प्रसिद्ध केली. इंडियन कॅलेंडर  (१८९५) हा इंग्रजी ग्रंथ त्यांनी आणि रॉबर्ट सेवेल यांनी मिळून लिहिला असून त्यातील इ. स. ३०० ते १९०० पर्यंतच्या तिथीतारखांचा मेळ घालणारी सारणी दीक्षितांची आहे. गुप्ताज इन्स्क्रिप्शन  हा ग्रंथ लिहिण्यासही फ्लीट यांना दीक्षितांनी मदत केली होती. यांशिवाय इंडियन अँटिक्वेरी एपिग्राफिका इंडिका, शालापत्रक  व ज्योतिषकल्पतरू  या मासिकांत व नेटिव्ह ओपिनियन या दैनिकात विविध शास्त्रीय विषयांवर त्यांनी लेख लिहिले होते. लेले व मोडक यांच्या सहाकार्याने त्यांनी सायन पंचांग काही दिवस काढले. या सहकाऱ्यांच्या मृत्यूनंतरही त्यांनी ते थोडे दिवस पदरमोड करून चालविले होते. ते विषमज्वराने पुण्याला मृत्यू पावले.

19 जुलै

🌹आजचा दिनविशेष🌹💥*

        *🌸जयंत विष्णू नारळीकर🌸*


*भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक*


*जन्म - जुलै १९, १९३८*

 

नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्‍नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.


*संशोधन*

स्थिर स्थिती सिद्धान्त


डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.


चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

*साहित्यातील भर*

विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर सातत्याने विज्ञानचिषयक माहितीने भरलेले ललित लेखन प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.


*विज्ञानकथा पुस्तके*

अंतराळातील भस्मासुर अभयारण्य टाइम मशीनची किमया प्रेषित यक्षांची देणगी याला जीवन ऐसे नाव वामन परत न आला व्हायरस


*इतर विज्ञानविषयक पुस्तके*

आकाशाशी जडले नाते गणितातील गमतीजमती युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी) 

नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर) 

विज्ञान आणि वैज्ञानिक विज्ञानगंगेची अवखळ वळणे विज्ञानाची गरुडझेप 

विश्वाची रचना 

विज्ञानाचे रचयिते 

सूर्याचा प्रकोप 

Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge) 

Seven Wonders Of The Cosmos


*आत्मचरित्र*

चार नगरांतले माझे विश्व


*पुरस्कार*

१९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला हे पुरस्कारही मिळाले आहेत. २०१४साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-२०१३ जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)


*चरित्र*

डॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे ’विज्ञान यात्री डॉ.जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.


*शाॅर्ट फिल्म*


खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एका लघुपटाद्वारे घेतला गेला आहे. साहित्य अकादमीची निर्मिती असलेल्या एका तासाच्या या लघुपटाचे दिग्दर्शन अनिल झणकर यांनी केले आहे.

*========================*

18 जुलै

🌹आजचा दिनविशेष🌹💥

        🌸कादम्बिनी गांगुली🌸
  पहली महिला फिजीशियन

*जन्मदिन - १८ जुलै १८६१*

कादम्बिनी गांगुली (जन्म- 18 जुलाई, 1861, भागलपुर, बिहार; मृत्यु- 3 अक्टूबर, 1923, कलकत्ता, ब्रिटिश भारत) भारत की पहली महिला स्नातक और पहली महिला फ़िजीशियन थीं। 

कादम्बिनी गांगुली पहली दक्षिण एशियाई महिला थीं, जिन्होंने यूरोपियन मेडिसिन में प्रशिक्षण लिया था। इन्होंने कोयला खदानों में काम करने वाली महिलाओं की लचर स्थिति पर भी काफ़ी कार्य किया। बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय की रचनाओं से कादम्बिनी बहुत प्रभावित थीं। उनमें देशभक्ति की भावना बंकिमचन्द्र की रचनाओं से ही जागृत हुई थी।

कादम्बिनी गांगुली का जन्म ब्रिटिशकालीन भारत में 18 जुलाई 1861 ई. में भागलपुर, बिहार में हुआ था। उनका परिवार चन्दसी (बारीसाल, अब बांग्लादेश में) से था। इनके पिता का नाम बृजकिशोर बासु था। उदार विचारों के धनी कादम्बिनी के पिता बृजकिशोर ने पुत्री की शिक्षा पर पूरा ध्यान दिया। कादम्बिनी ने 1882 में 'कोलकाता विश्वविद्यालय' से बी.ए. की परीक्षा उत्तीर्ण की थी।

'कोलकाता विश्वविद्यालय' से 1886 में चिकित्सा शास्त्र की डिग्री लेने वाली भी वे पहली महिला थीं। इसके बाद वे विदेश गई और ग्लासगो और ऐडिनबर्ग विश्वविद्यालयों से चिकित्सा की उच्च डिग्रियाँ प्राप्त कीं। देश में भले ही महिलाओं को उच्चतर शिक्षा पाने के लिए लंबा संघर्ष करना पड़ा हो, लेकिन कादम्बिनी गांगुली के रूप में भारत को एक अच्छी महिला डॉक्टर 19 वीं सदी में मिली। कादम्बिनी गांगुली को न सिर्फ भारत की पहला महिला फ़िजीशियन बनने का गौरव हासिल हुआ, बल्कि वे पहली साउथ एशियन महिला थीं, जिन्होंने यूरोपियन मेडिसिन में प्रशिक्षण लिया था।

3 अक्टूबर, 1923 में कादम्बिनी गांगुली का देहांत कलकत्ता (वर्तमान कोलकाता) में हुआ।
*========================

17 जुलै


*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*

          *🌷गॉर्डन गूल्ड🌷*

 *(१७ जुलै, इ.स. १९२० - १६ सप्टेंबर, इ.स. २००५)*

        हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. यांनी (तसेच थियोडोर मैमान यांनी) लेसरचा शोध लावला.


         *Gordon Gould*

*Invention of the laser*

*Born - July 17, 1920*

Gordon Gould (July 17, 1920 – September 16, 2005) was an American physicist who is widely, but not universally, credited with the invention of the laser. (Others attribute the invention to Theodore Maiman). Gould is best known for his thirty-year fight with the United States Patent and Trademark Office to obtain patents for the laser and related technologies. He also fought with laser manufacturers in court battles to enforce the patents he subsequently did obtain.

*========================*