मंगळवार, १४ जुलै, २०२०

एमील हेरमान फिशर 15 जुलै


♻️विज्ञान शिक्षक मित्र♻️*
------------------------------------------------
*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*
        
       *🌸एमील हेरमान फिशर🌸*

            *जर्मन रसायनशास्त्रज्ञ*

    *स्मृतिदिन - १५ जुलै १९१९*

एमील हेरमान फिशर : (९ ऑक्टोबर १८५२ - १५ जुलै १९१९). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी विविध शर्करा व प्यूरिने यांच्या संश्लेषणाविषयी (कृत्रिम रीतीने तयार करण्याविषयी ) महत्त्वाचे प्रायोगिक कार्य केले असून या कार्याबद्दल त्यांना १९०२ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांचा जन्म जर्मनीतील आइस्किर्खन येथे झाला. त्यांचे शिक्षण प्रथम खाजगी रीतीने आणि नंतर व्हेट्‌सलार व बॉन येथे झाले. १८७१ मध्ये त्यांनी बॉन विद्यापीठात प्रवेश केला. तेथे त्यांना आउगुस्ट फोन केकूले यांच्या अध्यापनाचा लाभ मिळाला. १८७२ मध्ये ते स्ट्रॅस्‌बर्गला गेले व आडोल्फ फोन बेयर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून १८७४ मध्ये त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळविली. त्यानंतर बेयर यांच्याबरोबर तेही म्यूनिकला गेले व तेथे १८७८ मध्ये व्याख्याते व १८७९ मध्ये साहाय्यक प्राध्यापक झाले. नंतर १८८२ साली ते एर्लांगेन येथे, १८८५ मध्ये वुर्ट्‌सबर्ग येथे व १८९२ मध्ये बर्लिनला रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून गेले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीतील रासायनिक द्रव्यांच्या उत्पादनाचे व्यवस्थापन त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

⇨ कीटोने व ⇨ आल्डिहाइडे या वर्गांचे लाक्षणिक विक्रियाकारक (विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे) म्हणून प्रसिद्ध असलेले फिनिल हायड्रॅझीन हे संयुग त्यांनी प्रथम बनविले व त्याचा उपयोग करून अनेक कार्बोहायड्रेटांच्या संरचना निश्चित केल्या. त्यांनी ग्‍लुकोज, फ्रुक्टोज, मॅनोज व सॉर्बोज या शर्करांचे संश्लेषण केले. आणि त्यांच्या संरचना व विन्यास (रेणूतील अणूंची त्रिमितीय मांडणी) ठरविले. निसर्गात नसलेल्या कित्येक शर्कराही त्यांनी संश्लेषणाने बनविल्या व त्यांच्या संरचना व विन्यास निश्चित केले. ग्‍लुकोसाइडांच्या संरचना वलयी असतात, हे एकाच शर्करेपासून दोन ग्‍लुकोसाइडे मिळण्याचे कारण असल्याचे त्यांनी सुचविले. 

प्राण्याच्या शरीरात असणाऱ्या यूरिक अम्‍ल, झँथीन, हायपोझँथीन, ॲडेनीन, ग्‍वानीन आणि वनस्पतिसृष्टीतील कॅफीन, थिओब्रोमीन व थिओफायलीन या संयुगांच्या विक्रियांचा अभ्यास आणि संश्लेषण करून त्यांनी त्यांचे परस्परसंबंध सिद्ध केले व त्यांच्या संरचना ज्या मूलभूत सांगाड्यावर आधारलेल्या आहेत, त्या प्यूरीन या संयुगाचेही संश्लेषण केले [→ प्यूरिने]. त्यांनी शोधून काढलेल्या कित्येक संश्लेषण प्रक्रियांचा उपयोग औषधनिर्मितीच्या व्यवसायास झाला आहे. 

त्यांनी एंझाइमांच्या (जीवरासायनिक विक्रियांना मदत करणाऱ्या प्रथिनांच्या) विक्रियांचाही अभ्यास केला. विशिष्ट एंझाइम विशिष्ट तऱ्हेचा विन्यास असलेल्या शर्करेवरच विक्रिया घडविते यावरून त्यांच्या विक्रिया विवेचक असतात, हे त्यांनी दाखवून दिले. 

प्रथिनांच्या जलीय विच्छेदनाने (पाण्याच्या साहाय्याने रेणूचे तुकडे करून) मिळणाऱ्या, त्या वेळी माहीत असलेल्या ॲमिनो अम्‍लांसारखी कित्येक ॲमिनो अम्‍ले त्यांनी संश्लेषणाने बनविली व त्यांच्या संरचना व विन्यास निश्चित केले. ॲमिनो अम्‍लांच्या एस्टरांच्या दोन रेणूंपासून डायपेप्टाइडे आणि अनेक रेणूंपासून पॉलिपेप्टाइडे त्यांनी बनविली. या रेणूंमध्ये असणाऱ्या -CONH- या दुव्याची पुनरावृत्ती प्रथिनांच्या दीर्घ शृंखलाकृती रेणूंमध्ये अनेकदा झालेली असते, असे त्यांनी प्रतिपादन केले व उच्च रेणुभाराची अनेक पॉलिपेप्टिइडे बनविली. चिनी टॅनिनाचे संघटन त्यांनी ठरविले आणि या वर्गाच्या संयुगांच्या संरचनांचे स्वरूप विशद केले.

त्यांना रॉयल सोसायटीचे डेव्ही पदक मिळाले होते (१८९०) व त्यांची या सोसायटीचे विदेशी सदस्य म्हणून निवड झाली होती (१८९९). त्यांनी संशोधनात्मक लेखांच्या रूपात विपुल लेखन केले असून या लेखांचे आठ मोठे खंड प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे. ते बर्लिन येथे मरण पावले. 
*========================*

14 july

*♻️🌸Today in Science🌸♻️*

*Robert F. Overmyer*

*NASA astronaut*

*Born - July 14, 1936*

Robert Franklyn "Bob" Overmyer (July 14, 1936 – March 22, 1996) (Col, USMC) was an American test pilot, naval aviator, aeronautical engineer, physicist, United States Marine Corps officer and USAF/NASA astronaut. Overmyer was selected by the Air Force as an astronaut for its Manned Orbiting Laboratory in 1966. Upon cancellation of this program in 1969, he became a NASA astronaut and served support crew duties for the Apollo program, Skylab program and Apollo-Soyuz Test Project. In 1976, he was assigned to the Space Shuttle program and flew as pilot on STS-5 in 1982 and as commander on STS-51-B in 1985. He was selected as a lead investigator into the Space Shuttle Challenger disaster and retired from NASA in 1986. Ten years later, Overmyer died in Duluth, Minnesota while testing the Cirrus VK-30 composite homebuilt aircraft.

दिनकर धोंडो कर्वे 13 जुलै

विज्ञान शिक्षक मित्र समूह*
========================
संकलन :-श्री सतिश दुवावार, चंद्रपूर
https://vidnyanmitr.blogspot.com/
------------------------------------------------
*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*
            *🌸दिनकर धोंडो कर्वे।🌸*

             *रसायनशास्त्रज्ञ*

*जन्मदिन - १३ जुलै १८९९*

दिनकर धोंडो कर्वे हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे तृतीय पुत्र होते. त्यांच्या आईचे नाव आनंदी होते. दिनकर कर्वे यांचे शिक्षण पुणे येथे झाले. ते बी. एस्सी. पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना बंगलोर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेची शिष्यवृत्ती मिळाली. त्यांची रसायनशास्त्रविषयक जाण उत्तम असल्यामुळे, ते जर्मनीच्या लॅपझिग युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले होते. तेथे त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना त्या विद्यापीठाने डी. फिल. पदवी प्रदान केली. डॉ.दिनकर कर्वे पुण्याला परत आल्यावर डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे आजीव सदस्य झाले. ते रसायनशास्राचे नामवंत प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, विज्ञान प्रसारक होते. पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयाचे ते वीस वर्षे प्राचार्य होते.

शिक्षणक्षेत्रातच उत्तम कामगिरी करण्याचा ध्यास डॉ. कर्वे यांनी घेतला. फर्गसन महाविद्यालयामध्ये ते भौतिकी रसायनशास्त्र हा विषय शिकवीत होते. त्यांचा अनुभव, विज्ञानाधारित अभ्यासू वृत्ती आणि शिस्तप्रियता लक्षात घेऊन फर्गसन महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी सुरू केलेल्या अनेक उपक्रमांमुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक विषयामध्ये आवड निर्माण झाली. फर्गसन महाविद्यालयामधील त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. त्यांच्या कडक शिस्तप्रियतेचा अनुकूल परिणाम महाविद्यालयाच्या प्रांगणात दिसून आला. दर्जाबाबत डॉ.दिनकर कर्वे यांनी कधीही तडजोड केली नाही. ते त्यांचे एक वैशिष्ट्य ठरले. त्यांच्यामुळे दर्जेदार शिक्षण संस्थांमध्ये फर्गसन महाविद्यालयाचे नाव अग्रगण्य झाले.

त्या काळामधील विज्ञानाच्या समविचारी प्राध्यापकांचे सहकार्य मिळवून त्यांनी ‘सृष्टिज्ञान’ या नियतकालिकाचा दर्जा अधिकाधिक चांगला करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ‘सृष्टिज्ञान’मध्ये त्यांनी विज्ञान विषयावर बरेच लेख लिहिले. त्यायोगे विज्ञान प्रसारही केला. वीस वर्षे प्राचार्यपदाची जबाबदारी पार पाडून ते निवृत्त झाले. तथापि त्यांनी त्यानंतर सुमारे दहा वर्षे ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज’ या संस्थेचे भारतातील संचालक म्हणून कार्य केले.

डेक्कन महाविद्यालयामधील प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ प्रा.इरावती कर्वे या डॉ.दिनकर धोंडो कर्वे यांच्या पत्नी होत्या. ‘हिंदू सोसायटी - अ‍ॅन इंटरप्रिटेशन’ हा ग्रंथ प्रा. इरावती कर्वे यांनी लिहिला होता. त्याचे मराठीकरण डॉ.दिनकर कर्वे यांनी केले. ‘हिंदू समाज - एक अन्वयार्थ’ त्या ग्रंथाचे शीर्षक होते. त्याचे प्रकाशन असे ११ ऑगस्ट, १९७५ रोजी झाले होते. १९५९ साली त्यांचे ज्येष्ठ बंधू रघुनाथ कर्वे यांनी ‘संतती नियंत्रण: विचार व आचार’ हे पुस्तक लिहिलेले होते त्याची अभ्यासपूर्ण आणि विज्ञानाधिष्ठित प्रस्तावना  डॉ.दिनकर कर्वे यांनी लिहिलेली होती.

१९६४ साली प्रकाशित झालेल्या ‘ए हिस्टरी ऑफ एज्युकेशन इन इंडिया अ‍ॅण्ड पाकिस्तान’ या पुस्तकाचे डॉ.दिनकर कर्वे सहलेखक होते. त्यांनी ‘दि न्यू ब्राह्मण्स: फाइव्ह महाराष्ट्रीयन फॅमिलीज’ महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिलेला होता. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या वडलांसह तत्कालीन सामाजिक कार्याला झोकून देणाऱ्या पाच कुटुंबीयांच्या कार्याचा आढावा  घेतला होता.

१९७४ साली वैद्यकशास्त्रातील नोबेल विजेते शास्रज्ञ कोनराड झचारियस लॉरेंझ यांनी ‘सिव्हिलाइझ्ड मॅन्स एट डेडली सिन्स’ हे पुस्तक प्रकाशित केले होते. डॉ.कर्वे यांनी त्याचे भाषांतर केले होते. मानववंश शास्त्रज्ञ ब्रोनिस्लाव्ह मॅलिनोवस्की यांनी लिहिलेल्या ‘सेक्स अ‍ॅन्ड रिप्रेशन इन सॅव्हेज सोसायटी’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘असंस्कृत समाजातील लैंगिकता’ या शीर्षकाखाली डॉ.कर्वे यांनी केला. १९७८ साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे ते पुस्तक प्रकाशित झाले.

बुद्धिप्रामाण्य आणि विचारांची तर्कशुद्धता यांवर डॉ. दिनकर कर्वे यांचा संपूर्ण विश्वास  होता. त्याचा परिपाक म्हणून धार्मिक कर्मकांड; समाज ज्याला धर्म मानतो, त्याची सबंध चौकट, देवाच्या अस्तित्वावर विश्वास या सर्व गोष्टी त्यांनी नाकारल्या होत्या. ते कट्टर निरीश्वरवादी होते. आपल्या मतीला जे पटेल तेच करण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे ते प्रवाहपतित झाले नाहीत.
-डाॅ. अनिल लचके
*========================*

सोमवार, १३ जुलै, २०२०

12 जुलै



*जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर*

*अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ*

*जन्मदिन - जुलै १२, १८६४*

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर (जुलै १२, १८६४ - जानेवारी ५, १९४३) हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते. गुलामगीरीच्या काळात जन्माला आलेले कार्व्हर यांना त्यांचे मालक मोझेस कार्व्हर यांनी मोठे केले व आपले नावही दिले. गुलामगीरी नष्ट झाल्यानंतर कृष्णवर्णीयांना शिक्षणाची दारे खुली झाली होती. चित्रकला, गायन व अनेक कलेत निपुण असलेल्या कार्व्हर यांना त्यांच्या आयुष्यात अनेक हितचिंतकांनी उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. जात्याच प्रगल्भ असल्याने शेती विषयक क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण केले. चित्रकला वा इतर कलेत प्राविण्य असूनही त्यांनी पुढील आयुष्यात आपल्या कार्याचा उपयोग इतर कृष्णवर्णीय बांधवाना व्हायला पाहिजे या जाणिवेने त्यांनी आपले आयुष्य शेतीविषयक संशोधनाला वाहून घेतले. शेंगदाण्यापासून तेल, डिंक, रबर, इ. वस्तू तयार करण्यासाठीच्या प्रक्रियांचा त्यांनी अभ्यास केला. आयुष्यभर कोणत्याही पदाची, पैशाचा मोबदला यांचा हव्यास न धरता आपले कार्य करत राहिले. आज कार्व्हर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या महानायकांमध्ये समावेश होतो.
मराठीत वीणा गवाणकर यांनी कार्व्हर यांच्या आयुष्यावर आधारित एका होता कार्व्हर हे राजहंस प्रकाशनाकडून प्रकाशित पुस्तक लिहिले आहे.


11 जुलै

११ जुलै २०१२*

*प्लुटोचा पाचवा चन्द्र स्टिक्स चा शोध*

बौना (स्टिक्स - स्टायक्स) हा प्लूटो या ग्रहाचा एक छोटा उपग्रह आहे.  याचा शोध 11 जुलै 2012 रोजी जाहीर करण्यात आला.  त्याच्या शोधात हबल स्पेस टेलीस्कोप वापरला गेला.

 'स्टिक्स'चा आकार खूपच लहान आहे.  त्याचा व्यास अंदाजे 10 ते 25 किलोमीटर दरम्यान आहे.  त्याच्या लहान आकारामुळे, त्याचे गुरुत्व देखील कमी आहे आणि ते स्वत: ला संकुचित करून गोल आकार प्राप्त करण्यास सक्षम असेल याची शक्यता कमी आहे.  म्हणून असा अंदाज आहे की तो किंचित बेढब आहे (म्हणजे गोल नाही).

 प्लूटो चे बरेच चंद्र पाहून खगोलशास्त्रज्ञ असा अंदाज लावतात की कदाचित एखादी वस्तू खोलच्या भूतकाळात प्लुटोवर आदळली असेल आणि त्याच टक्करीपासुन अवकाशात फेकल्या गेलेल्या ढिगार्‍यापासून हे चंद्र तयार झाले.  त्यांना वाटते की बर्‍याच अंशी स्टिक्सचा भाग बर्फापासुन बनलेला आहे.

जागतिक लोकसंख्या दिन

*♻️विज्ञान शिक्षक मित्र♻*
️========================
संकलन :-श्री सतिश दुवावार, चंद्रपूर
https://bit.ly/3gIqLVq
------------------------------------------------
*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*
    *🌎जागतिक लोकसंख्या दिन*

         जगभरात दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केले जाते. ११ जुलै १९८७ रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले. यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जनमानसात जागृती निर्माण झाली. अखेर युनोने पण याची दखल घेवून १९८९ सालापासून हा दिवस जागतिक दिन म्हणून घोषित केला.
   
प्रत्येक वर्षी जगभरामध्ये ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या (World Population Day 2020) नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी योगदान द्यावे, याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक उपक्रम राबवले जातात.
जेणेकरून लोकसंख्या नियंत्रणात राहणे आवश्यक आहे, याबाबत योग्य पद्धतीने जनजागृती होण्यास मदत मिळेल. जगातील अनेक देशांसमोर लोकसंख्या वाढीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. विशेषतः विकसनशील देशांमधील वाढती लोकसंख्या ही चिंताजनक बाब आहे.

११ जुलै १९८७ रोजी संयुक्त विकास कार्यक्रमांतर्गत ‘जागतिक लोकसंख्या दिन’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. ११ जुलै १९८७ पर्यंत संपूर्ण जगाची लोकसंख्या ५०० कोटी इतकी होती. ही संख्या पाहता लोकसंख्या नियंत्रणात राहावी, यासाठी जगभरामध्ये कार्यक्रम घेण्यात आले. लिंग समानता, कुटुंब नियोजन, गरिबी, महिलांचे आरोग्य, मानव इत्यादी विषयांवर जनजागृती करण्यात आली. आजही जागतिक लोकसंख्या दिनी जनजागृती करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्यामध्ये सोशल मीडिया, विविध सामाजिक कार्यक्रम व मेळावे, रोड शो, पथ नाटके इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात.

*जागतिक लोकसंख्या दिन २०२० (world population day 2020 theme) ची थीम* कोव्हिड १९ विषाणूवर आधारित आहे. या महामारीच्या काळात जगभरातील महिला आणि मुलींचे आरोग्य आणि हक्कांचे संरक्षण या विषयावर आधारीत ही थीम आहे. जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसवर अद्याप प्रभावी लस सापडलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चेहऱ्यावर मास्क लावणे, हात वारंवार धुणे, स्वच्छता बाळगणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केले जात आहे. पण दिवसेंदिवस या व्हायरचा प्रादुर्भाव वाढतच आहे.
(करोनाला हरवण्यासाठी तुमच्या शरीराला या २ घटकांचा पुरवठा होणे गरजेचं)
*लोकसंख्येचा डेटा*
जनगणनेसोबत विविध माध्यमांद्वारे लोकसंख्येविषयी डेटा जमवला जातो. उदाहरणार्थ स्त्री-पुरुष संख्येचे गुणोत्तर, जन्मदर, मृत्युदर, आरोग्य इत्यादी. या सर्व माहितीचा देशाच्या नियोजनासाठी उपयोग होतो.
*वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम*
बेरोजगारी : लोकसंख्या वाढल्याने लोक रोजगाराच्या शोधात वेगवेगळ्या शहरांकडे वळू लागले. नोकरीच्या संधी कमी झाल्याने बेरोजगारी वाढूही लागली. परिणामी गरिबीमध्येही झपाट्याने वाढ होऊ लागली. साधनसंपत्तीची कमतरता भासू लागली.
रोगराई : वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्याच्या सोयी देखील अपुऱ्या पडू लागल्या. साथीचे रोग मोठ्या प्रमाणात पसरू लागले.
प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला. पोटासाठी जंगले तोडून, वन्यजीवांना मारण्याचे प्रकार वाढू लागले. यामुळे निसर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
आपले भविष्य वाचवण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात राहणे अतिशय गरजेचं आहे. यासाठी प्रत्येकाने योगदाने द्यावे.
*========================*
*लोकसंख्या दिन चाचणी सोडविण्यासाठी वरील लिंक क्लीक करा*
======================

10 जुलै

♻️विज्ञान शिक्षक मित्र♻
️========================
संकलन :-श्री सतिश दुवावार, चंद्रपूर
https://bit.ly/3euWx7O
------------------------------------------------
*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*
       
       *♻️निकोला टेसला♻️*

*सर्बियाचा भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक*

*जन्मदिन - जुलै १०, इ.स. १८५६*
 
निकोला टेसला (जुलै १०, इ.स. १८५६: स्मिल्यान, क्रोएशिया - जानेवारी ७, इ.स. १९४३: न्यूयॉर्क) हा मूळचा सर्बियाचा भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, विद्युत अभियंता होता. अनेक शास्त्रज्ञांच्या मते हा जगातील सर्वश्रेष्ठ अश्या वैज्ञानिकांपैकी एक होता.
त्याच्या शोध आणि शोधनिबंधात एसी विद्युत, एसी मोटर, पॉलिफेज विद्युत पारेषण या आता मूलभुत समजल्या जाण्याऱ्या वस्तूंचा समावेश आहे.

टेस्ला यांनी चक्रीय चुंबकीय क्षेत्राच्या सिद्धांताचा शोध लावला. त्यांचा एक आणखी महत्वपूर्ण अविष्कार म्ह्जंजे एसी विद्युत मोटार (AC Electric Motor) आहे ज्याने DC विद्युत प्रणालीला पूर्णपणे मार्जीनल बनवले. त्याने नायगारा धबधब्यावर पहिले जल विद्युत पावर स्टेशन (Water electric power station) तयार केले, ज्यानंतर केवळ अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगानेच AC विद्युत वितरण प्रणालीचा स्वीकार केला.

१८८७ मध्ये टेस्ला यांनी AC current वर चालणारी इंडक्शन मोटार बनवली, या आविष्काराने टेस्ला यांच्यासाठी प्रगतीची दारे खुली केली. यानंतर टेस्ला आणि एडिसन यांच्यात AC current आणि DC current यांच्यावरून लढाई चालू राहिली. परंतु शेवटी टेस्ला यांचा AC current विजयी झाला कारण तो दूर अंतरापर्यंत विजेच्या वाहनाला उपयुक्त होता.

असे मानले जाते की टेस्ला यांनी रांटजेन यांच्या अगोदर १८९५-९६ मध्ये क्ष किरणांचा शोध लावला होता होता. परंतु त्यांच्या प्रयोगशाळेत लागलेल्या आगीत सर्व कागदपत्र आणि उपकरणे जाळून खाक झाले.
*========================*

9 जुलै

*
💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*
        
          *🌸एलियस हाॅवे🌸*

 *शिलाई मशीनच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध*
जन्मदिन - ९ जुलै १८१९

        हे एक अमेरिकन शोधक होते आणि आधुनिक लॉकची शिलाई असलेल्या मशीनच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध होते.
 इतर बर्‍याच लोकांनी हाॅवे यांच्याआधी या यंत्राची कल्पना केली होती.
 १७९० च्या सुरुवातीस, काहींनी हाॅवे यांच्या डिझाईन्सची पेटंट घेतली आणि कार्यरत मशीन निर्माण केली, नंतर हॉवेने त्याच्या पूर्वीच्या डिझाईन संकल्पनांमध्ये लक्षणीय सुधारणा केली आणि १० सप्टेंबर, १८४६ रोजी लॉक स्टिचडिझाइनच्या शिलाई मशीनसाठी पेटंट घेतले. त्यांच्या मशीनमध्ये सर्वात अत्याधुनिक यंत्रसामग्री असलेल्या तीन आवश्यक वैशिष्ट्यांचा समावेश होता:
१) डोळ्याच्या आकाराचे छिद्र असणारी सुई.

२) कपड्याखालुन शटलच्या सहाय्याने शिवण टिप मारण्याची पद्धत

३) शिवणकामासाठी लागणारा स्वयंचलित पुरवठा
*========================

8 जुलै दिनविशेष

*पीटर कपिज़ा*

*भौतिकशास्त्रज्ञ*

*जन्मदिन - ८ जुलै १८९४*

पीटर लिओ निडोविच कपिझा ( रशियन : Пётр Леони́дович Капи́ца); 8 जुलै 1894 - 8 एप्रिल 1984)) एक रशियन भौतिकशास्त्रज्ञ होता. १९७८  मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

त्यांचा जन्म ८ जुलै १८९४ रोजी क्रोन्स्टॅटमध्ये झाला होता. त्यांचे प्रारंभिक शिक्षण पेट्रोग्राडमध्ये झाले . त्यानंतर , ते केंब्रिजमधील लॉर्ड रदरफोर्डचे विद्यार्थी होते आणि अणु विघटन संशोधनाच्या क्षेत्रात अत्यंत प्रबळ चुंबकीय क्षेत्र निर्मितीच्या तांत्रिक प्रणालीच्या विकासात ते खास होते. १९२४ मध्ये , ते कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत चुंबकीय संशोधन सहाय्यक संचालक म्हणून नियुक्त झाले आणि १९३२ पर्यंत ते या पदावर राहिले. १९३० ते १९३५ पर्यंत ते रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवडले गेले आणि १९४२ मध्ये त्यांना फॅराडे मेडल देण्यात आले. याव्यतिरिक्त, त्यांना भौतिकशास्त्रात १९४१ मध्ये आणि पुन्हा १९४१ मध्ये स्टालिन पुरस्कार प्राप्त झाला. १९४३ आणि १९४४ मध्ये तुम्हाला ऑर्डर ऑफ लेनिन ही पदवी देखील देण्यात आली.

१९३४ मध्ये जेव्हा ते रजेवर (रशिया) घरी गेलात तेव्हा सोव्हिएत सरकारने त्यांना पुन्हा देश सोडण्याची परवानगी दिली नाही. त्यानंतर मॉस्कोच्या भौतिक समस्यांबद्दलचे संचालक कपिझाची लवकरच नियुक्ती केली गेली, .

त्यांचे मुख्य कार्य ' मॅग्नेटिझम ' आणि क्रायोजेनिक्स (अत्यंत थंड उष्णता) शी संबंधित आहे . ते 30 टेस्लापर्यंत चुंबकीय क्षेत्रे तयार करण्यात यशस्वी झाले आणि हायड्रोजन आणि हीलियम लिक्विंक्शन प्लांटची यशस्वी रचना देखील दिली.


7 जुलै

💥🌸दिनविशेष🌸💥*

*ओटो फ्रेडरिक रोहवेडर*

*स्वयंचलित ब्रेड - स्लाइसिंग मशीन तयार केली*

*जन्मदिन - ७ जुलै १८८०*

ओट्टो फ्रेडरिक रोहवेडर हे अमेरिकन शोधक आणि अभियंता होते ज्यांनी व्यावसायिक वापरासाठी प्रथम स्वयंचलित ब्रेड - स्लाइसिंग मशीन तयार केली . याचा प्रथम वापर चिलीकोथे बेकिंग कंपनीने केला होता.

रोहवेडरने प्रथम एक ज्वेलर होता. ते सेंट जोसेफमधील तीन दागिन्यांच्या दुकानांचे मालक झाले. ब्रेड स्लाइसिंग मशीन विकसित करता येईल ही अपेक्षा ठेवून त्याने दागिन्यांची दुकानं मशीन तयार करण्यासाठी विकली. १९१७ मध्ये रोहवेडर आपले मशीन तयार करत असलेल्या कारखान्यात भीषण आग लागली. त्याचा प्रोटोटाइप आणि ब्लूप्रिंट नष्ट झाले. पुन्हा निधी मिळण्याची गरज असताना, ब्रेड स्लाइसर बाजारात आणण्यात रोहवेडरला कित्येक वर्षे उशीर झाला.

१९२७ मध्ये रोहवेडरने एक मशीन यशस्वीरीत्या तयार केली ज्याने फक्त ब्रेड कापलेच नाही तर ते कापुन त्याची पॅकिंग देखील होत होती. त्याने आपल्या शोधाच्या पेटंटसाठी अर्ज केला आणि १९२८ मध्ये चिलीकोथे, मिसुरी येथील चिलीकोथे बेकिंग कंपनी येथे स्थापित केलेल्या बेकर फ्रँक बेंच यांना प्रथम मशीन विकली. स्लाईस्ड ब्रेडची पहिले उत्पादन ७ जुलै १९२८ रोजी व्यावसायिकपणे विकले गेले. इतर बेकरींकडे मशीनची विक्री वाढली आणि स्लाइस्ड् ब्रेड देशभर उपलब्ध झाले.
सौजन्य:-
दिनविशेष-आणि-विज्ञान