शुक्रवार, ५ जून, २०२०

6 june

*Robert Stirling*

*inventor of the Stirling engine*

*Died - 6 June 1878*
   
The Reverend Dr Robert Stirling (25 October 1790 – 6 June 1878) was a Scottish clergyman, and inventor of the Stirling engine. Stirling was born at Cloag Farm near Methven, Perthshire, the third of eight children. He inherited his father's interest in engineering, but studied divinity at the University of Edinburgh and the University of Glasgow, becoming a minister of the Church of Scotland as second charge of the Laigh Kirk of Kilmarnock in 1816. He was Minister of Galston Parish Church from 1824 until 1878.

5 जून जागतिक पर्यावरण दिन


💥🌹आजचा दिनविशेष🌹💥
     
५ जून*

*🌳जागतिक पर्यावरण दिवस🌴*

पर्यावरणाचे आपल्याभोवती असणे आपण गृहीत धरून, गेली काही दशके, त्यातील विविध घटकांची हानी करत आलो आहोत. परंतु, पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचे परिणाम दैनंदिन जीवनातही जगभर दिसू लागल्याने याबाबत जागृती करण्याची गरज उत्पन्न झाली.
१९७२ साली युनोच्या  सर्वसाधारण सभेने, मानव व पर्यावरण याविषयी आयोजित केलेल्या परिषदेत, पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राजकीय, औद्योगिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर कृतिशील सहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले. त्यानुसार शाश्वत विकासावर भर देण्यात येत आहे.

पर्यावरण संरक्षणाचे स्थान आणि त्यांच्या संवर्धनाची गरज लक्षात घेऊन  सहभागी देशांमध्ये विविध प्रकल्प राबविले जात आहेत. कारण निसर्गातील सजीवांच्या अनेक अन्नसाखळ्या तुटण्याच्या स्थितीला पोहोचल्या आहेत. अनेक सजीव पृथ्वीवरून कायमचे नष्ट झाले आहेत व होत आहेत. प्रदूषण वाढत आहे. हवामान बदलत आहे. आणि या सर्व स्थितीला आधुनिक मानवाची बेफिकीर जीवनशैली कारणीभूत आहे! २०५० मध्ये जगाची लोकसंख्या तब्बल ९.६ अब्ज असण्याची शक्यता आहे. चंगळवाद भागवण्यासाठी मानवाने निसर्गाला ओरबाडणे असेच चालू ठेवले तर त्यावेळी पृथ्वीवर जगणेच मुश्किल होईल असा इशारा पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे!
५ जून १९७२ रोजी पर्यावरणाचा नाश रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. भारतासह एकूण १३० देशांचे प्रतिनिधी या परिषदेला हजर होते. परिषदेत पर्यावरणविषयक जाहीरनामा काढण्यात आला. पर्यावरण रक्षण ही मानवाची जबाबदारी आहे, हे मान्य करून शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण शिक्षण हा विषय समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने सर्व देश दर वर्षी ५ जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिवस' म्हणून साजरा करू लागले.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पर्यावरण शिक्षणाचा आराखडा 18 डिसेंबर 2003 ला तयार करण्यात आला. आपल्याकडे पर्यावरण हा विषय पाचवी ते नववीपर्यंतच्या वर्गात शिकवला जाऊ लागला. दरवर्षी ५ जून हा दिवस पर्यावरण दिवस म्हणून साजरा होऊ लागला. परंतु प्रत्यक्षात हा विषय कृतीमध्ये उतरविला गेला नाही.

आपण ज्या पृथ्वीवर राहतो, तिच्यावर जी प्राकृतिक परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला 'पर्यावरण' असे म्हणतात. मानवाकडून कळत-न-कळत आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे केल्या जाणाऱ्या अयोग्य कृतीमुळे नैसर्गिक परिस्थितीमध्ये जो बिघाड निर्माण केला जातो, त्याला 'प्रदूषण' म्हणतात. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी भारताच्या घटनेमध्ये सुमारे दोनशे कायदेही समाविष्ट करण्यात आले परंतु त्यांची अंमलबजावणी पाहिजे तशी झाली नाही. वन्यजीवन संरक्षक कायदा १९७२मध्ये करण्यात आला. पाण्याचा प्रदूषण नियंत्रणाचा कायदा १९७४ मध्ये करण्यात आला. जंगलाच्या संवर्धनाचा कायदा १९८०मध्ये करण्यात आला. हवा प्रदूषण नियंत्रण कायदा १९८१ मध्ये करण्यात आला. पर्यावरण संरक्षणाचा कायदा १९८२मध्ये करण्यात आला. हे सर्व उत्तम कायदे कागदावरच राहिले आहेत. वर्षभरात हे कायदे मोडणाऱ्या किती लोकांवर कोणती कारवाई झाली, याची माहिती लोकांपर्यंत पोचणे अत्यंत गरजेचे आहे.

सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून पर्यावरण समस्यांकडे अधिक जागरुकपणे पाहणे आणि या चळवळीत सर्वांना सामील करून घेऊन आपले भविष्य सुरक्षित व समृद्ध करण्याचा प्रयत्न करणे या हेतूने हा दिवस दरवर्षी साजरा केला जात असतो. पर्यावरणाचे रक्षण करणे ही एक सवयच झाली पाहिजे. यासाठी समाज प्रबोधन सातत्याने केले जाण्याची जरूरी आहे. समाज प्रबोधन केले की काही उद्दीष्टे साध्य होतात, याची दोन उदाहरणे सहजपणे सांगता येतील. दिवाळीसारख्या प्रकाशाच्या उत्सवात फटाके लावले तर ध्वनिप्रदूषण व वायूप्रदूषण कसे होते, हे जेव्हा शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांना पटवून दिले गेले तेव्हा मागील चार वर्षांपासून फटाक्यांचे प्रमाण खूपच कमी झालेले दिसून आले. एक वर्षी पाण्याचा मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी 'सुकी होळी खेळा' हा संदेश लोकांना दिला गेला तेव्हा लोकांनी तसे करून दाखविले.

ठाणे शहरात रस्तारूंदीकरण, पूल बांधणीसाठी बरेच वृक्ष तोडले जात आहेत. मी जेव्हा निरीक्षण केले तेव्हा लक्षात आले की अगोदर काहीतरी करून हे हिरवेगार वृक्ष सुकवले जातात. मग तोडले जातात. काहीवेळा अगोदर फांद्या तोडल्या जातात मग मुळासकट वृक्षच नाहिसा केला जातो. ही गोष्ट इतक्या बेमालूम पद्धतीने केली जाते की जनसामान्यांच्या ती लक्षातही येत नाही. वृक्षांची संख्या कमी झाली त्यामुळे चिमण्या, कावळे इत्यादी पक्ष्यांची संख्याही कमी झाली आहे. ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु आज या तलावांची स्थिती पाहिली की खूप दु:ख होते.

भूप्रदूषण, वायुप्रदूषण, जलप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होणार नाही यासाठी सर्वांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपण निसर्गाला जपले तरच निसर्ग आपणास जपणार आहे. ही पृथ्वी जशी माणसांची आहे तशीच ती वृक्ष, पशु, पक्षी इत्यादींचीही आहे. प्राचीन कालीही आपल्या भारतातील ऋषी-मुनींनी पर्यावरणाचे महत्त्व सांगितले होते. संत तुकारामांनी 'वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे' या शब्दांत मानवाचे निसर्गाशी असलेले दृढ नाते सांगितले होते. ज्यादिवशी पुस्तकात असलेल्या पर्यावरणासंबंधीच्या या गोष्टी आपण कृतीमध्ये उतरवू, त्याच दिवशी आपणास पर्यावरण दिन साजरा केल्याचे समाधान मिळू शकेल.
========================

गुरुवार, ४ जून, २०२०

4 जून दिनविशेष

*पुरुषोत्तम गोपाळ तुळपुळे*

*जन्मदिन - ४ जुन १९२३*

*पोषणशास्त्रज्ञ*

डॉ. पुरुषोत्तम गोपाळ तुळपुळे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण श्री गोपाळ हायस्कूल, पुणे येथे झाले, तर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नवरोज वाडिया महाविद्यालय, पुणे येथे घेतले. १९४७ साली ते मुंबई विद्यापीठातून एम.एस्सी. झाले. त्याच वर्षी त्यांना संशोधन शिष्यवृत्ती मिळून ते पोषण संशोधन प्रयोगशाळा, कुन्नूर (आता राष्ट्रीय पोषण संस्था, हैदराबाद) येथे रुजू झाले.  त्या वेळचे संस्थेचे संचालक डॉ. वि. ना. पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जीवनसत्त्व ब६ आणि आवश्यक मेदाम्ले यांचे परस्पर संबंध’ या विषयावर संशोधन करून त्यांनी जीवरसायनशास्त्रात १९५१ साली पीएच.डी.ची पदवी मिळवली. या संशोधनात त्यांनी ‘फ्रेनोडर्मा किंवा बेडकाची कातडी हा त्वचेचा विकार आवश्यक मेदाम्लांच्या कमतरतेमुळे होतो’, हे सिद्ध केले. पीएच.डी.पश्चात संशोधनासाठी त्यांना अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठाने फुलब्राइट शिष्यवृत्ती दिली. त्यानंतर त्यांनी भारतात परत येऊन राष्ट्रीय पोषण संस्थेत अन्न-विष विज्ञानातील संशोधनाला वाहून घेतले.

डॉ. तुळपुळे यांचे मूलभूत शास्त्रीय ज्ञानात आणि कृषीविषयक, तसेच मानवाच्या प्रकृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे काम कवकविष (अफ्लॉटॉक्सीन) या बुरशीच्या विषाबद्दलचे आहे.  कृषिउत्पन्न, मुख्यत्वे मका आणि भुईमूग यांचा साठा करताना बाष्प जास्त प्रमाणात राहिले, तर ‘अ‍ॅस्पर्शिलस फ्लॅवस’ या विषारी कवकाची त्यावर वाढ होते व अफ्लॉटॉक्सीन निर्माण होते. त्याच्या प्रतिबंधाकरिता काय उपाय योजावेत हे डॉ. तुळपुळेंच्या संशोधनाने दाखवून दिले. या विषामुळे यकृताचा कर्करोग होतो हे त्यांनी माकडांवर प्रदीर्घ प्रयोग करून दाखवून दिले. राजस्थानात टोळीने राहणाऱ्या जमातीत दिसून येणारे यकृताचे विकार (सिऱ्हॉसिस) अफ्लॉटॉक्सीनमुळे होतात हे त्यांच्या संशोधनाने सिद्ध झाले.

ते १९७१ साली सहायक निर्देशक आणि अन्न, तसेच औषध विषशास्त्राचे प्रमुख झाले. १९८० साली ते राष्ट्रीय पोषण संस्थेचे (जी इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आय.सी.एम.आर.) अखत्यारीत आहे) संचालक झाले आणि १९८३ साली निवृत्त झाले. त्यांच्या ३०-३५ वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनकार्यात डॉ. तुळपुळे यांनी आहार व पोषणशास्त्राच्या विविध क्षेत्रांत मूलभूत संशोधन केले असून त्यांचे ऐंशीहून अधिक लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उच्च दर्जाच्या वैज्ञानिक नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत. 

त्यांचे खास संशोधन क्षेत्र अन्नविषविज्ञान होते आणि कवकविषासंबंधीचे संशोधन त्यांनी देशात सुरू केले. त्यांनी ‘कवकविषाचे हिंदुस्थानातील आरोग्याला धोके’ ही पुस्तिका प्रसिद्ध केली.  त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना पीएच.डी.च्या संशोधनाकरिता मार्गदर्शन केले. जागतिक आरोग्य संघटना, अन्नविषयक संघटना, आहार परिमाणित मध्यवर्ती समिती अशा विविध जागतिक संस्थांमधून डॉ. तुळपुळे यांनी महत्त्वाचे कार्य केले. डॉ. तुळपुळे यांनी भारतीय पोषण मंडळात सचिव, खजिनदार आणि नंतर उपाध्यक्ष ही वेगवेगळी पदे सांभाळली. ते १९८१ साली भरलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षिक संमेलनाचे अध्यक्ष होते. डॉ. तुळपुळे यांनी त्यांच्या कारकिर्दीत राष्ट्रीय पोषण संस्थेच्या कार्याला नवीन दिशा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच संस्थांबरोबर सहकार्याच्या योजना सुरू झाल्या. त्यांच्या अखत्यारीत त्यांनी सरकारला, तसेच काही आंतरराष्ट्रीय कार्यालयांना सल्ला दिला.
— डॉ. तरला नांदेडकर


4 जून दिनविशेष

💥🌸दिनविशेष🌸💥

*ख्रिस्तोफर क्राॅकरेल*

*हाॅवरक्राफ्टचे संशोधन*

*जन्मदिन - ४ जुन १९१०*

Sir Christopher Sydney Cockerell CBE RDIFRS[1] (4 June 1910 – 1 June 1999) was an English engineer, best known as the inventor of the hovercraft.

होवरक्राफ्ट (Hovercraft) हवाई गद्दों वाला एक ऐसा वाहन है, जो जल और जमीन के साथ-साथ बर्फीली सतह तथा कीचड़ पर भी आसानी से दौड़ सकता है। इस में एक बड़े पंखे से हवा की एक गद्दी तैयार की जाती है जिस पर यह हावरक्राफ्ट तैरता है। इस गद्दी के कारण क्राफ्ट की गति की विपरीत दिशा में लगने वाला श्यान-घर्षण बल बहुत कम हो जाता है। क्राफ्ट के हल्ल (hull) तथा उसके नीचे के तल (पानी, मिट्टी, कीचड़, बर्फ आदि) के बीच हवा को कम दाबतथा उच्च आयतन पर बनाए रखा जाता है। ये वाहन प्रायः नीचे के तल से २०० मिमी से लेकर ६०० मिमी की ऊँचाई पर 'तैरते' हुए आगे बढ़ते हैं। इनकी गति २० किमी/घण्टा से अधिक होती है।

वर्ष १९५२ में ब्रिटिश इंजिनियर सर क्रिस्टोफर कोकरेल ने एक वैक्युम क्लीनर की मोटर व दो छोटे-छोटे बेलनाकार डिब्बों के साथ एक प्रयोग करते हुए पहली बार यह साबित किया कि हवाई कुशन से युक्त किसी वाहन से किसी इंजिन के जरिए हवा को तेजी से पीछें फेंका जाए तो इससे उपजा दबाव वाहन कों जल या थल में भी आगे दौड़ा सकता है। इसी सिद्धांत पर आगे चलकर ब्रिटिश विमान निर्माता सॉन्डर्स रोए ने पहला व्यवहारिक होवरक्राफ्ट बनाया जो इंसान कों ले जाने में सक्षम था। इसे एसआर-एन वन नाम दिया गया। पहले इसे सैन्य इस्तेमाल के लिहाज से ही बनाया गया था, लेकिन बाद में इसका आम नागरिकों के लिए भी इस्तेमाल किया जाने लगा। वर्ष १९५९ से १९६१ तक इस होवरक्राफ्टको इंग्लिश चैनल पार करने समेत कई तरह के परीक्षणों से गुजारा गया। इसमें एक इंजिन लगा था और यह दो आदमियों कों ले जाने में सक्षम था। हालांकि पहला विशुद्ध पैसेंजर होवरक्राफ्ट विकर्स विए - ३ था, जिसमें दो टर्बोप्रोप इंजन लगे थे और प्रोपेलर्स के सहारे चलता था।

मंगळवार, २ जून, २०२०

3 जून दिनविशेष



*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*

       *🌸अतुल चिटणीस🌸*

*"लिनक्‍स सॉफ्टवेअर' वापराची ओळख करून देनारे भारतीय संगणकअभियंता*

*स्मृतिदिन - ३ जून २०१३*
 
अतुल चिटणीस (20 फेब्रुवारी 1962 - ३ जून २०१३ ) हे जर्मनीत जन्मलेले भारतीय संगणक अभियंता होते. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युजर्सना "लिनक्‍स सॉफ्टवेअर' वापराची ओळख करून देण्याचा मान प्रथम चिटणीस यांच्याकडे जातो. त्यांनी प्रसिद्ध नियतकालिक "पीसीक्वेस्ट'साठी सहा वर्षे सल्लागार संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
कारकिर्द
तंत्रज्ञानामुळे पारदर्शक कारभाराची गुरूकिल्ली हाती येते ; तरी कित्येकदा तंत्रज्ञानही मक्तेदारीमध्ये जखडून ठेवण्याची खेळी प्रस्थापितांकडून केली जाते. या जोखडातून कम्प्युटर तंत्रज्ञानाची सुटका करून ते सर्वांना उपलब्ध व्हावे ,याचा पाठपुरावा करण्यात ओपन सोर्सचे प्रणेते अतुल चिटणीस यांनी आपली कारकीर्द घडवली. फ्री आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे प्रणेते म्हणून १९९४पासून अतुल चिटणीस हे नाव भारताला ठाऊक झाले. साधारण त्याच काळात उद्योगव्यवहारांमध्ये वह्यापेन्सिली आणि कागदी फायलींची जागा कम्प्युटर घेऊ लागला होता. कदाचित त्यावेळी , सॉफ्टवेअर कुणा कंपन्यांच्या मक्तेदारीत बांधलेले नसावे , या विचाराचे मोल सर्वांना तितकेसे उमजत नसावे. नंतर भारतीय भाषांच्या वापरातील अडचणी , परवान्यासाठी मोजावी लागणारी किंमत तसेच भारतीय डेटाची सुरक्षितता व परावलंबित्वाचे प्रश्न यामुळे ओपन सोर्सची गरज सर्वांना पटू लागली. अतुल चिटणीस यांनी मात्र १९८०पासूनच कम्प्युटर तंत्रज्ञानावर हुकुमत मिळविली होती. त्यामुळेच लिनक्स सॉफ्टवेअर तसेच फ्री व ओपन सोर्सचा नारा त्यांनी पुकारला. अतुल यांचे वडील भारतीय , तर आई जर्मनीची. त्यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षणही बर्लिनमध्ये झाले. त्यानंतर मात्र त्यांचे शिक्षण बेळगाव मिलिटरी स्कूलमध्ये झाले व गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी बीई-मेकॅनिकल केले. वर्षभरातच त्यांचा प्रवास कम्प्युटरनिगडित तंत्रज्ञानाकडे झाला. कम्प्युटरनिगडित अनेक गोष्टींचा प्रथम पुरस्कार त्यांनी केला. मोडेमचा वापर शिकविला. इंटरनेटचा प्रसार होण्यापूर्वीच्या काळात डेटाकम्युनिकेशन ,नेटवर्किंग यांची सुरुवात त्यांनी केली. सीआयएक्स- बुलेटिन बोर्ड सिस्टिम ही भारतातील पहिली ऑनलाइन सेवा त्यांनी सुरू केली. ऑनलाइन संपर्क आणि समूहसंवादाचे ते आद्य माध्यम होते. १९९३ ते १९९७ या काळात त्यांनी पीसी-क्वेस्ट या कम्प्युटरआधारित नियतकालिकातून कम्प्युटरजागृतीचा वसा घेतला. भारत सरकारने बुलेटिन बोर्ड सिस्टिमला करांच्या कक्षेत आणण्याचा घाट घातला असताना चिटणीस यांनी इलेक्ट्रॉनिक चळवळीद्वारे त्यावर प्रहार केले. ही पहिलीच ऑनलाइन चळवळ यशस्वी ठरली. विविध व्यासपीठांवर त्यांनी लिनक्स आणि ओपनसोर्सविषयी जनजागरण केले. २१व्या शतकातील नव्या तंत्रज्ञानानुसार त्यांनी मोबाइल कम्प्युटिंग , कन्व्हर्ज्ड कम्युनिकेशन यांतही उडी घेतली. पीसी क्वेस्टचे सल्लागार संपादक म्हणून विपुल लिखाण केले. ते स्वतः हौशी संगीतकारही होते व संगीताची तंत्रज्ञानाशी सांगड घालण्याचे कसबही त्यांच्या अंगी होते. रेडिओव्हर्व हे इंटरनेट रेडिओ स्टेशन त्यांनी सुरू केले होते. त्यांच्या अकाली निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.  त्यांना कर्करोग झाल्याचे निदान ऑगस्ट २०१२ झाले होते. त्यांचे केमोथेरपीच्या उपचारादरम्यान ३ जून २०१३ रोजी निधन झाले.
========================
साभार:-विकिपीडिया
विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र
======================

2 जून दिनविशेष

💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*

        *२ जुन १८००* 

*कॅनडातील न्यू फाउंडलंड प्रांतात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.*

कांजिण्या हाही प्रामुख्याने लहान मुलांचा आजार आहे. हा आजार एकदा येऊन गेला, की परत होत नाही. पण काही व्यक्तींमध्ये हे विषाणू सुप्तावस्थेत राहतात आणि प्रौढावस्थेत 'नागीण' या रोगाद्वारे प्रकट होतात.

*कारणे*

हा आजार व्हेरिसेला झोस्टर(Varicella zoster virus (VZV) या विषाणुंमुळे होतो. कांजिण्या (चिकन पॉक्स) हा एक सामान्य पण वेगाने पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. बहुतेक वेळा याची लागण लहान मुलाना होते. पण प्रौढाना सुद्धा कांजिण्याची लागण झाल्याचे आढळून आले आहे. कांजिण्यामधे खाजणारे बारीक पुरळ त्वचेवर येतात. हे पुरळ आठवडभर राहतात. रुग्णास त्याबरोबर तापही येतो. एकदा कांजिण्या झाल्या म्हणजे रुग्णामध्ये कांजिण्याविरुद्ध आयुष्यभर टिकून राहील एवढी प्रतिकारशक्ती तयार होते. कांजिण्या झाल्याचे लक्षणावरून त्वरित घ्यानात येते. रुग्ण दिसायला विचित्र दिसला तरी ठरावीक कालावधी मध्ये तो बरा होतो. सहसा रुग्णास हॉस्पिटलमधे दाखल करावे लागत नाही. घरी उपचार केले तरी चालतात. आजारामध्ये गुंतागुंत झाल्यास वैद्यकीय मदतीची गरज भासते.

कांजिण्या हा वॅरिसेल्ला- झोस्टर या विषाणूमुळे ( हर्पिस विषाणू कुलातील ) होणारा आजार आहे. रुग्णाशी प्रत्यक्ष संपर्क येणे किंवा हवेमधून याचा प्रसार होतो. संसर्ग झाल्यानंतर विषाणूचा परिपाक काल 10-21 दिवसांचा आहे. त्यानंतर आजाराची लक्षणे दिसू लागतात. अंगावर पुरळ येण्याआधी दोन दिवस रुग्णापासून इतराना संसर्ग होऊ शकतो. अंगावर पुरळ येऊन त्यावर खपली धरेपर्यंत रुग्ण विषाणूचा वाहक असतो. पुरळ ये ऊन त्यावर खपल्या धरेपर्यंतचा काल सु. सात दिवसांचा असतो. प्रौढामध्येहा कालावधि अधिक असतो. कांजिण्या झालेल्या मुलाना सात दिवस शाळेपासून दूर ठेवण्याचा सल्ला यामुळे दिला जातो. अंगावरील पुरळांच्या सर्व खपल्या पडून जाईपर्यंत थांबण्याची फारशी गरज नसते.

वाढत्या मुलांच्या आयुष्यामधील कांजिण्या हा एक सामान्य आजार आहे. नागरी भागामधील नऊ ते दहा वयोगटातील 80-90% मुलाना कांजिण्या येऊन गेलेल्या असतात . सध्या कांजिण्यावरील लसीला नागरी भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागातील मुलाना कांजिण्याची प्रतिकारशक्ती तयार झालेली नसते. कारण कांजिण्याची तीव्रता कमी अधिक असली तरी एकदा कांजिण्या हो ऊन गेल्यानंतर आयुष्यभर पुन्हा कांजिण्या होत नाहीत. प्रौढामध्ये कांजिण्याची तीव्रता अधिक असते. कधीकधी प्रौढामधील कांजिण्यामुळे गुंतागुंतीचे आजार होऊ शकतात. कांजिण्यामुळे झालेल्या मृत्यूमधील निम्म्याहून अधिक व्यक्ती प्रौढ असतात.

*लक्षणे*

कांजिण्या कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय दिसणारा आजार आहे. बरे ना वाटणे आणि थोडा तापाने त्याची सुरवात होते. काहीं तासात किंवा एकदोन दिवसात डोके, मान किंवा शरीराच्या वरील भागामध्ये तांबूस रंगाचे लहान पुरळ येण्यास प्रारंभ होतो. पुढील 12ते 24 तासात पुरळावर खाज सुटते,पुरळ पाण्याने भरतात. दोन ते पाच दिवसात त्यांच्या संख्येत वाढ होते. त्वचेवर जुन्या पुरळाबरोबर नवे येतच राहतात. कधी कधी शरीराच्या सर्व त्वचेवर पुरळ उठतात. काही रुग्णामध्ये तोंडाच्या आतील बाजूस, नाकामध्ये, कानामध्ये आणि योनिमार्ग आणि गुदमार्गात पुरळ उठतात. काहीं रुग्णामध्ये पुरळांची संख्या कमी असते. पण शरीरावर 250-500 पुरळ येणे ही सर्वसामान्य बाब आहे. कालांतराने पुरळावर खपली धरते. खपल्या पडून जातात. पुरळ खाजविले नाहीत तर त्वचेवर डाग पडत नाहीत. खाजविल्याने पुरळामध्ये जंतुसंसर्ग होतो. कधीकधी पुरळ आलेल्या ठिकाणी त्वचा अधिक काळवंडते. खाजेचे प्रमाण कमी अधिक असते. काही कांजिण्याच्या रुग्णामध्ये डोकेदुखी, ताप , पोटदुखी अशी लक्षणे दिसतात. पाच ते दहा दिवसात रुग्ण पूर्ण बरा होतो. प्रौढ रुग्णामध्ये रोगाची तीव्रता वाढते.

कांजिण्या हा काळजी करण्यासारखा आजार नसला तरी कधी कधी रुग्णामध्ये गुंतागुंत होऊ शकते. पुरळामध्ये न्यूमोनिया, अतिसार, मेंदू ज्वर, आणि काविळीचा संसर्ग झाल्यास गंभीर परिस्थितिओढवू शकते. 1. अर्भक- एका वर्षाहून लहान अर्भकास कांजिण्या झाल्यास रुग्ण गंभीर स्थितीत जातो. या वयातील रुग्णामध्ये कांजिण्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता असते . काहीं वेळा आईस प्रसूतिपूर्वी कांजिण्या झाल्यास अर्भकास मेंदूची वाढ पुरेशी न होण्याने बालकाच्या मृत्यूची शक्यता असते. गर्भधारणेनंतर लगेचच आईस कांजिण्या झाल्यास बालकाच्या वाढीवर परिणाम होतो. अशा बालकामध्ये जन्मजात दोष उद्भवण्याची शक्यता असते. 2. प्रतिकारशक्ति विरहित बालके- जनुकीय घटकामुळे , वैद्यकीय उपचाराने किंवा आजारामुळे ज्या बालकांची प्रतिकारशक्ति झाली आहे अशा रुग्णामध्ये कांजिण्याचे गंभीर स्वरूप होतात. कांजिण्यामुळे झालेल्या मृत्यूचे हे दुसऱ्या क्रमांकाचे कारण आहे. 3. प्रौढ आणि 15 वर्षाहून अधिक वयाचे रुग्ण- कांजिण्या झालेल्या प्रौढ रुग्णामध्ये आजारचे स्वरूप गंभीर
असल्याने आजाराची गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते. अधिक संवेदनशील असणा-या वरील रुग्णांची उपचारादरम्यान अधिक काळजी घ्यावी लागते.

*निदान*

लहान मुलांची बाबतीत कांजिण्याचे निदान घरी, शाळेतील परिचारिका, ग्रामीण भागात नोंदणी झालेली परिचारिका, आरोग्य सेविका , शिक्षक यांचाकडून होते. काहीं संशयास्पद वाटल्यास वैद्यकीय सल्ला टेलिफोनवरून मिळू शकतो. तातडीची वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी काहीं गोष्टींची खात्री करावी

१ रुग्णाचा ताप 102 डि फॅ हून अधिक ( 39.2 सें) . ताप चार दिवस उतरत नसेल

२ रुग्णाच्या त्वचेवरील पुरळामध्ये इतर संसर्ग झाल्याची शंका आल्यास.

३ मानसिक दृष्ट्या रुग्ण मंद, गोंधळलेले, प्रतिसाद देण्यास अक्षम, सतत झोप येणारे, आढळल्यास. मान ताठ होणे, तीव्र उजेडाकडे पाहण्यास टाळाटाळ करणे- उदा.खिडक्या उघडू ना देणे, चालताना तोल जाणे, सतत खोकला येणे, छातीत दुखण्याची तक्रार, उलट्या आणि फिटस आल्यास ही मेंदू ज्वराची किंवा रेये सिंड्रोमची लक्षणे असल्याची शक्यता आहे. अशी स्थिति ओढवल्यास रुग्ण गंभीर आहे असे समजावे.

*उपचार*

कांजिण्यावर उपचार घरीच करता येतात. उपचारामध्ये ताप कमी करणे आणि बरे होण्यास मदत करणे एवढ्या दोन बाबींचा समावेश आहे. कांजिण्या हा विषाणूजन्य आजार असल्याने प्रतिजैविके अँेटिबायोटिक्स देऊन उपयोग होत नाही. अंगावर ओल्या कापडाच्या पट्ट्या ठेवणे किंवा रुग्णास थंड अथवा कोमट पाण्याने स्नान घालण्याने अंगाची खाज कमी होण्यास मदत होते. आंघोळीच्या पाण्यात शंभर ग्रॅम खाण्याचा सोडा ( हे प्रमाण टबभर पाण्याचेआहे ). आणि दोन कप ओट मील घालून स्नान करावे. ( भारतामध्ये बादलीभर पाण्यात एक चहाचा चमचा खाण्याचा सोडा आणि चमचाभर डाळीचे पीठ घालावे. सौम्य साबणाचा वापर करावा. अंघोळीनंतर अंग टिपून घ्यावे. पुसू नये. कॅलॅमिन सारखे लोशन लावल्यास खाज कमी होते. खाजविल्यानंतर जंतुसंसर्ग होत असल्याने रुग्णाची नखे कापून घावीत. मोठ्या वयाच्या मुलाना खाजवू नका अशी सूचना द्यावी. अगदी लहान मुलांच्या हातास मऊ कापड बांधून ठेवावे.

तोंडामध्ये पुरळ उठल्यास पाणी पिणे किंवा अन्न गिळणे कठीण होते. अशा वेळी थंड पेये, सरबते,मऊ खीर, लापशी असे सहज गिळता येतील असे पदार्थ खाण्यास द्यावेत. डॉक्टरच्या सल्ल्याने योनिमार्ग किंवा शिश्नावरील पुरळावर जंतुनाशक क्रीम लावावे. पुरळामध्ये जंतुसंसर्ग झाल्यास प्रतिजैविके वैद्यकीय सल्ल्याने वापरावीत. ॲेसीटॅमिनोफेन किंवा इतर तत्सम ॲस्पिरिन विरहित औषधाने ताप कमी होतो. ॲयस्पिरिन किंवा इतर सॅलिसायलेट गटातील औषधे कांजिण्याच्या रुग्णाना देऊ नयेत. ॲ स्पिरिनच्या वापराने कांजिण्याच्या रुग्णामध्ये ‘ रेये सिंड्रोमची लक्षणेदिसू लागतात. रुग्णास नेमके कोणते औषध द्यावे यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा. जन्मजात प्रतिकारशक्ती क्षीण असलेल्या रुग्णाना ॲेसिक्लोव्हिर हे विषाणूप्रतिबंधक औषध देतात. झोव्हिरॅक्स सुद्धा अपेक्षित परिणाम साधते. पण झोव्हिरॅक्स च्या सार्वजनिक वापरावर अजून तज्ञांचे एकमत झालेले नाही.

*पर्यायी उपाययोजना*

कांजिण्यामुळे आलेला ताप इतर त्रास यावर पर्यायी उपाय योजना करण्यात येते. थंड किंवा कोमट पाण्याने स्नान. पाण्यात रोल्ड ओटस घातल्याने त्यामधील बीटा ग्लुकॅन हे विद्राव्य तंतू पाण्यात विरघळतात. या विद्राव्य तंतूमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. रोल्ड ओटसची पुरचुंडी पाण्यात सोडून ठेवल्यास त्यातील विद्राव्य पदार्थ पाण्यात उतरतो. या पाण्याने खाज कमी होते. खाज कमी करण्यासाठी कोरफडीचा गर अंगावर लावतात. कॅलँडुला नावाचे होमिओपॅथीमधील एक औषध खाज कमी करण्यासाठी प्रभावी आहे. याशिवाय एमेटिक ( ॲोन्टिमोनियम टार्टारिकम) पॉयझन आयव्ही आणि गंधकयुक्त औषधांचा चांगला उपयोग झाल्याचे आढळून आले आहे.

*अनुमान*

बहुतेक रुग्णामध्ये कांजिण्या आठवड्याभरात बरी होते. कांजिण्या बरी झाल्यानंतर फारशी काळजी घ्यावी लागत नाही. कांजिण्या झाल्यानंतर वीस टक्के पन्नाशीच्या पुढील व्यक्तीमध्ये दीर्घ मुदतीचे परिणाम शरीरावर शिल्लक राहतात. हर्पिस जातीच्या विषाणूचे वैशिष्ट्य म्हणजे वॅरिसेला झोस्टर विषाणू कांजिण्या ब-या झाल्या तरी शरीरातून संपूर्णपणे कधीच जात नाही. विषाणू चेता पेशीमध्ये सुप्तावस्थेमध्ये राहतो. दीर्घ काळानंतर तो पुन्हा कार्यरत हो ऊन त्या वेळी त्याचे रूपांतर शिंगल्स नावाच्या आजारामध्ये होते. प्रतिकारक्षमता क्षीण झाल्याचे हे लक्षण आहे. अत्यंत वेदनाजन्य या आजारास हर्पिसया नावानेओळखले जाते. या आजारात चेतांचा दाह होतो. चेतादाहाबरोबर ताप , चेहरा आणि अंगावर पुरळ अशीही लक्षणे दिसतात. हा त्रास सुमारे दहा दिवस होतो. ज्याठिकाणी चेता दाह शिंगल्स मुळे झालाआहे तेथे महिनोन महिने किंवा वर्षे आजारोत्तर वेदना होत राहतात. सध्या शिंगल्स वर दोन प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. व्हॅल्ट्रेक्स आणि फॅमव्हिर. लक्षणे दिसण्यास प्रारंभ केल्यानंतर 96 तासामध्ये ही औषधे दिल्यास हर्पिस विषाणूचे विभाजन था

ंबते. प्रतिकार यंत्रणा क्षीण झालेल्या रुग्णामध्ये यांचा उपयोग कसा करता येतो यावर पुरेसे संशोधन झाले नाही. फॅमव्हिर अठरा हून लहान व्यक्तीस देता येत नाही.

*प्रतिबंधात्मक उपाय*

व्हेरिसेला झोस्टर इम्युनोग्लोबिन ‘ व्हीझीआयजी’ या नावाचे प्रथिन सध्या कांजिण्या प्रतिबंधक लस म्हणून उपस्थित आहे. लहान मुले आणि प्रतिकारशक्ती क्षीणझालेल्या रुग्णामध्ये आजाराची लक्षणे दिसायला लागल्यापासून 96 तासाच्या आत व्ही झी आयजी इंजेकशन दिल्यास याचा परिणाम दिसून येतो. 96 तासानंतर हे प्रथिन दिल्यास अपेक्षित परिणाम दिसत नाही. नुकत्याच संसर्ग झालेल्या रुग्णाच्या रक्तामधून व्हीझीआयजी गॅमा ग्लोब्युलिन प्रथिन मिळविले जाते. व्हॅरिवॅक्स ही सौम्य विषाणू लस आहे. कांजिण्यापासून 85% संरक्षण देण्यात हे सक्षम आहे. गंभीर प्रकारच्या कांजिण्यापासून 100% प्रतिबंध या लसीने झाल्याचे आढळून आले आहे. इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी एखादा पुरळ एवढीच प्रतिक्रिया शरीराची असते. सेंटर फॉर डिसीझ कंट्रोल यांच्या सूचनेनुसार ही लस सर्व बालकाना 12-18 महिन्यात दिली पाहिजे. (अति संवेदनक्षम बालकांचा अपवाद सोडून) मीझल्स-मम्स- रुबेला लसीकरणाच्या वेळी ही लस दिलीतर योग्य. भारतात पोलिओट्रिपल च्या वेळी. बारा वर्षापर्यंत च्या मुलाना नक्की कांजिण्या आधी झाल्या होत्या की नाही याची खात्री झाली नसेल तर कांजिण्याची लस देता येते. आरोग्य कर्मचारी आणि ग्रामीण आरोग्य सेवक आणि जननक्षम माताना कांजिण्या होण्याची शक्यता अधिक असल्याने कांजिण्याची लस घेणे श्रेयस्कर ठरते. अशा पासून इतराना रोगप्रसार होण्याची शक्यताही अधिक असते. यासाठी हा प्रतिबंधात्मक उपाय करावा.

बारा वर्षांच्या मुलाना कांजिण्याची लस एकदा देणे पुरेसे ठरते. त्याहूनमोठ्या मुलाना आठ आठवड्यानी आणखीएक डोस द्यावा लागतो. सन 2000 मध्ये एका दिन शाळेमध्ये पसरलेल्या कांजिण्याच्या साथीने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडालेली होती. कारण या साठीमध्ये सर्व मुलाना एकदा कांजिण्याची लस दिलेली होती. त्यामुळे 2002 पासून आणखी एकदा लस देणे सुरू झाले. लसीकरणाचे शुल्क वैद्यकीयविमा कंपन्यानी नाकारल्याने अठरा वयापर्यंतच्या मुलांचा लसीकरणाचा खर्च आता अमेरिकन शासन करते. ज्याना कांजिण्याची लक्षणे दिसायला लागली आहेत अशाना व्हेरिवॅक्स दिले जात नाही. जुनाट मूत्रपिंडाच्या –वृक्काच्या आजाराने ग्रस्त असलेल्याना ही लस देणे अपायकारक आहे अशी समजूत होती. पण अशाही मुलाना 2003 पासून ही लस सुरक्षित ठरली आहे. ही माहिती महत्त्वाची ठरण्याचे कारण वृक्क रोपणकेलेल्या रुग्णामध्ये कांजिण्याचा आजार जीवघेणा ठरत होता.

व्हेरिवॅक्स लस गरोदर स्त्रियाना देता येत नाही. लसीकरणानंतर तीन महिन्यानी स्त्रियानी गर्भधारणेचा प्लॅन करावा. कांजिण्याच्या संपर्कात आल्यानंतर जेंव्हा कांजिण्या ऐन भरातअसतो त्यावेळी लसीकरण करावे असा सल्ला दिला जातो. अशावेळी कांजिण्यापासून योग्य प्रतिबंध होतो. अमेरिकन सांसर्गिक रोग सोसायटीच्या म्हणण्याप्रमाणे ज्या प्रौढाना कधीही कांजिण्या झाल्या नाहीतअशा सर्व प्रौढानी कांजिण्याची लस घेऊन प्रतिबंधात्मक उपाय करावेत. प्रारंभीच्या काळात लसीच्या सुरक्षिततेबद्दल आणि परिणामकारकतेबद्द्ल पालकाना शंका होत्या. जसे अधिक राज्यानी आपापल्या शाळेमधील मुलाना लस देण्याबद्द्ल आग्रह धरल्यानंतर लसीकरणाचा विरोध दूर झाला. 2001 मधील कांजिण्या लसीच्या अभ्यासानंतर लसीची परिणामकारकता आणखी एकदा तपासली गेली. सहा वर्षाच्या संशोधनानंतर कांजिण्या हा पहिला मानवी हर्पिस विषाणू लसीकरणाने आटोक्यात आल्याचे सिद्ध झाले. आधी संशय व्यक्त केल्याप्रमाणे लसीकरणानंतर शिंगल्स चा धोका असल्याचे वाटत होते. पण आता अशा रुग्णांची संख्या घटत असल्याचे घ्यानात आले आहे.

*उपचार*

हा रोग विषाणुजन्य असल्यामुळे उपचार मुख्यत्वे तापनियंत्रण व स्वच्छता यावर केंद्रित असते. तापाकरिता तापनाशक औषधे पॅरासिटॅमॉल, निमसुलाईड, व इत्यादी वापरले जातात.
========================
*२ जून १८९६ : गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी ’रेडिओ’चे पेटंट घेतले.*
======================
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र
*दिनविशेष चाचणी सोडविण्यासाठी वरील लिंक क्लीक करा*
======================

1 जून दिनविशेष

💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*
  
         *१ जुन १९४५*

*टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना*

टाटा मूलभूत संशोधन संस्था "(इंग्लिश-टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च)" १९४५ साली जे. आर. डी. टाटा आणि डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या पुढाकाराने मुंबई येथे झाली. १९६२ साली दक्षिण मुंबईतील नेव्ही नगर परिसरात या संस्थेचे स्थलांतर करण्यात आले. देशातील आजपर्यंतचे अनेक नामवंत शास्त्रज्ञ याच संस्थेतून घडलेले आहेत. आज संस्थेच्या तीन मुख्य विद्याशाखेतून ४०० पेक्षा अधिक शास्त्रज्ञ संस्थात्मक संशोधन आणि मार्गदर्शन करतात. या तीन शाखांमध्ये विश्वकिरण-आवकाशातून येणारे अतिशय भेदक किरण, उच्चउर्जा भौतिकी व गणिती यांचा समावेश होतो. मुंबईची देवनार येथील होमी भाभा सेंटर फॉर सायन्स अँड एज्युकेशन, पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्‍स, बेंगलूरची इंटरनॅशनल सेंटर फॉर थेरॉटिकल सायन्सेस आणि नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसया संस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्याच कार्याचा भाग आहेत. या संस्थेचे ग्रंथालय भारतातील सर्वांत मोठे ग्रंथालय असल्याचे सांगितले जाते.

*🌸संस्थेची उद्दिष्टे*

पदार्थविज्ञानामधील नवनवीन शाखांमध्ये संशोधन करणे. मानवी ज्ञानाच्या विस्तारलेल्या कक्षात संशोधन करून वैज्ञानिक प्रगती साध्य करण्यासाठी हुशार भारतीय तरुणांना त्यादृष्टीने प्रशिक्षण देणे
========================
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र
*दिनविशेष चाचणी सोडविण्यासाठी वरील लिंक क्लीक करा*
========================
संकलन :-श्री सतिश दुवावार, चंद्रपूर
------------------------------------------------

दिनविशेष 31 मे


*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*
                  *३१ मे*

*♻️जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन♻️*

                31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची माहिती देणारा हा लेख.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

*तंबाखू सेवन व्याप्ती आणि परिणाम*

तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: 10 लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: 36 टक्के पुरुष व 5 टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते.

*राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम*

केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगाने राज्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून व्यसन करणारे लोक व मुले व्यसनाला बळी पडून अकाली मृत्यू कमी व्हावेत यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जनजागृतीमुळे या व्यसनाचे गंभीर परिणामही जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. या कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी, शैक्षणिक संस्थेचा 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनावर धोक्याच्या सुचना देणे याचा अंतर्भाव होतो. शासकीय कार्यालयात व परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी असून अशा लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्येष्ठांचेच अनुकरण लहान मुले करतात व परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील. व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.

*आपली जबाबदारी*

व्यसनाधिनतेचे परिणाम आपल्या आजूबाजूला व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांना सांगुन त्यांना व्यसनापासून रोखणे व त्यांना त्यापासून परावृत्त करणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध एल्गार केला आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला तर नक्कीच भारतीय नागरिकांचे व भारताचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यास मदत होईल हीच अपेक्षा.

सोमवार, १ जून, २०२०

दिनविशेष 30 मे


*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*
          *🌸विल्बर राइट🌸*

          *विमान संशोधक*

*स्मृतिदिन - ३० मे १९१२*

 विमानविद्येतील आद्य अमेरिकन संशोधक बंधू. त्यांनी १९०३ मध्ये हवेपेक्षा जड अशा विमानाची पहिली यशस्वी शक्तिचलित, अविरत व नियंत्रित उड्डाणे साध्य करण्याचे आणि १९०५ मध्ये पहिले पूर्णपणे व्यवहार्य विमान तयार करण्याचे व उडविण्याचे महत्कार्य केले.

विल्बर यांचा जन्म इंडियानातील मिलव्हिलजवळ, तर ऑर्व्हिल यांचा ओहायओतील डेटन येथे झाला. दोघांचेही शिक्षण जरी उच्च माध्यमिक शाळेपलीकडे गेले नाही, तरी त्यांनी स्वतःच त्या काळच्या तंत्रविद्याविषयक साहित्याचा व गणिताचा अभ्यास केला. वर्तमानपत्राची घडी घालणाऱ्या यंत्राचा अभिकल्प (आराखडा) तयार करून व एक मोठे मुद्रणालय उभारून त्यांनी प्रारंभीच आपले यांत्रिक कौशल्य दाखवून दिले. बरीच वर्षे मुद्रणव्यवसाय केल्यानंतर त्यांनी १८९२ मध्ये सायकलींची विक्री आणि दुरुस्ती करणाऱ्या राइट सायकल कंपनीची स्थापना केली व पुढील १० वर्षे सायकलीचे अभिकल्प, उत्पादन व विक्री यशस्वीपणे केली.

ओटो लीलिएंटाल या जर्मन संशोधकांनी उड्डाणविषयक केलेल्या प्रयोगासंबंधी व १८९६ मध्ये ग्लायडिंगमधील अपघातात झालेल्या त्यांच्या मृत्यूसंबंधी वाचल्यानंतर राइट बंधूंनी विमानविद्येचा सखोल अभ्यास करण्याचे ठरविले. लीलिएंटाल यांनी उड्डाणासाठी हँगग्लायडरचा उपयोग केलेला होता आणि त्याचे नियंत्रण शरीराला इष्ट त्या दिशेने हेलकावा देऊन गुरुत्वमध्याचे (ज्यातून गुरुत्वाकर्षणाची परिणामी प्रेरणा कार्य करते त्या बिंदूचे) स्थान बदलून साध्य केले होते. राइट बंधूंनी या पद्धतीऐवजी दृढ द्विपंखी विमान वापरावयाचे ठरविले. बझर्ड पक्षी उडताना हवेत आपला समतोल कसा साधतो याचे निरीक्षण केल्यावर विल्बर यांना असे कळून आले की, विमान यशस्वीपणे उडण्यासाठी तीन अक्षांवर त्याचे कार्य होणे आवश्यक आहे. पक्ष्याप्रमाणे उडणाऱ्या यंत्राच्याही बाबतीत एका वा दुसऱ्या बाजूला तिरपे होणे, वर चढणे वा खाली उतरणे, उजव्या वा डाव्या बाजूस वळणे आणि आवश्यकतेप्रमाणे एकाच वेळी या क्रियांपैकी दोन वा सर्व क्रिया करता येणे आवश्यक आहे. राइट बंधूंना उड्डाण नियंत्रण मूलभूत महत्त्वाचे असल्याची खात्री झालेली होती. बझर्ड पक्षी आपल्या दोलन गतीचे नियंत्रण पंखांना पीळ देऊन करतात असे त्यांना आढळले. १८९९ मध्ये त्यांनी तयार केलेल्या द्विपंखी पतंगाला बसविलेले पंख यांत्रिक रीत्या पिळवटता येतील अशी त्यात व्यवस्था केलेली होती. यामुळे एका बाजूचे उत्थापन जास्त व दुसरीचे त्याच वेळी कमी होऊन यान तिरपे होण्याकरिता वळविणे किंवा वाऱ्याने विक्षोभित झालेले असल्यास दोलनाने पुन्हा योग्य पातळीत आणणे त्यांना शक्य झाले.  

नॉर्थ कॅरोलायनातील किटी हॉक येथे १९०० व १९०१ मध्ये केलेल्या प्रत्यक्ष प्रयोगांवरून व तात्पुरत्या ग्लयडिंग चाचण्यांवरून त्यांना असे आढळून आले की, त्या काळी उपलब्ध असलेली बहुतेक सर्व वायुगतिकीय (वायूच्या सापेक्ष गतिमान असणाऱ्या वस्तूंवर क्रिया करणाऱ्या प्रेरणांविषयीची) माहिती चुकीची होती. म्हणून त्यांनी एक लहान⇨वातविवर उभारून त्यात १९०१ साली अनेक नमुनेदार वातपर्णाच्या [⟶ वायुयामिकी] चाचण्या घेतल्या आणि त्यावरून विश्वसनीय वायुगतिकीय माहिती मिळविली.

या सर्व अभ्यासावरून तीन ग्लायडर तयार करून व किटी हॉकजवळ १९०० ते १९०२ या काळात त्यांची उड्डाणे करून राइट बंधूंनी योग्य उड्डाण नियंत्रण साध्य केले. याकरिता त्यांनी शेवटच्या ग्लायडरमध्ये वर-खाली नियंत्रणासाठी अग्रीय उत्थापक (समायोजनक्षम पृष्ठभाग), उजव्या डाव्या बाजूस वळण्यासाठी मागील बाजूस उभे सुकाणू आणि दोलन यंत्रणासाठी पंखांना सर्पिलाकार पीळ देणारी यंत्रणा अशी योजना केलेली होती. अशा प्रकारे त्यांनी साध्य केलेली त्रिअक्षीय नियंत्रण पद्धती ही त्यांची वायुगतिकीतील व व्यवहार्य विमानोड्डाणातील महत्त्वाची कामगिरी होती. या पद्धतीचे त्यांनी १९०६ मध्ये एकस्व (पेटंट) मिळविले व तेव्हापासून ती सर्व विमानांत वापरण्यात येत आहे. १९०३ मध्ये त्यांनी पहिले शक्तिचलित विमान तयार केले आणि त्याकरिता त्यांनी वापरलेले १२ अश्वशक्तीचे एंजिन व प्रचालक (पंखा) यांचा अभिकल्प आणि उत्पादन त्यांनीच केलेले होते. प्रचालकाकरिता त्यांनी स्वतः विकसित केलेले सिद्धांत आधारभूत धरलेले होते. या विमानाने १७ डिसेंबर १९०३ रोजी किलडेव्हिल हिल्सनजीक चार यशस्वी उड्डाणे केली. त्यांतील पहिल्या उड्डाणात ऑर्व्हिल हे चालक होते व त्यांनी १२ सेकंदात सु. ३६ मी. अंतर कापले. शेवटच्या सर्वांत जास्त काळ झालेल्या उड्डाणात विल्बर हे चालक होते व त्यांनी ५९ सेकंदांत सु. २५५ मी. अंतर कापले. ‘किटी हॉक’ याच लोकप्रिय नावाने ओळखण्यात येणारे हे विमान पुढे १७ डिसेंबर १९४८ रोजी वॉशिंग्टन येथील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनमध्ये ठेवण्यात आले.

राइट बंधूंनी आपल्या विमानात व ते चालविण्याच्या आपल्या कौशल्यात सुधारणा करण्याकरिता पुढील पाच वर्षे खर्च केली. १९०५ मध्ये त्यांनी बांधलेले तिसरे विमान हे जगातील पहिले पूर्णपणे व्यवहार्य विमान ठरले. हे विमान वळणे, वर्तुळाकार फेरी मारणे व इंग्रजी आठाच्या आकारात उड्डाण करणे या हालचाली करू शकत असे आणि एका वेळी सु. अर्धा तास हवेत राहू शकत असे. त्याच वर्षी त्यांनी आपले एकस्व व संकलित केलेली वैज्ञानिक माहिती अमेरिकेच्या युद्ध खात्याला देऊ केली; पण तिचा स्वीकार झाला नाही. विमानाचा पहिला उपयोग युद्धात होण्याची खात्री पटल्याने राइट बंधूंनी परेदशी बाजारात आपल्या विमानासाठी ग्राहक शोधण्यास सुरुवात केली. अनेक नकारांनंतर १९०८ मध्ये फ्रान्समधील व्यापारी संस्थांनी व अमेरिकेच्या सरकारने त्यांच्याकडून विमाने घेण्याचे करार केले. त्याच वर्षी फ्रान्समध्ये राइट कंपनीची स्थापना झाली. दोन्ही देशांत प्रात्यक्षिक चाचण्या दाखविण्यासाठी ऑर्व्हिल यांनी अमेरिकेत व विल्बर यांनी फ्रान्समध्ये उड्डाणे केली. यामुळे राइट बंधूंच्या विमानोड्डाणाबद्दलच्या सर्व शंका दूर होऊन अमेरिका व यूरोप या दोन्ही खंडांतून त्यांच्यावर सन्मानांचा व स्तुतीचा वर्षाव झाला. १९०९ मध्ये ऑर्व्हिल यांनी फोर्ट मायर येथे आपल्या ‘राइट ए’ या नवीन विमानाचे यशस्वी उड्डाण केले व त्यामुळे त्यांना अमेरिकेच्या लष्कराचे कंत्राट मिळून त्यांचे विमान जगातील पहिले लष्करी विमान ठरले. १९०९ सालाच्या अखेरीस अमेरिकन राइट कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर राइट बंधूंनी आपले लक्ष इतरांना उड्डाणाचे तंत्र शिकविण्याकडे व राइट कंपनीचा कारभार पहाण्याकडे वळविले.

सुधारित राइट विमाने १९१० व १९११ मध्येही प्रचारात आली व त्यांचे उड्डाणही उत्तम होत असे; परंतु त्यानंतर यूरोपीय प्रतिस्पर्ध्यांनी त्यांना मागे टाकले. बिल्वर हे डेटन येथे आंत्रज्वराने (टायफॉइडने) मृत्यू पावले. ऑर्व्हिल यांनी १९१५ मध्ये राइट कंपनीतून आपले अंग काढून घेतले. आपले उर्वरित आयुष्य त्यांनी मुख्यत्वे विमानविद्येतील संशोधनाकरिता खर्च केले. विमानविद्येच्या राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले (१९१५ –४८). ते डेटन येथे मृत्यू पावले.
========================
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र
*दिनविशेष चाचणी सोडविण्यासाठी  वरील लिंक ला क्लीक करा* 
======================

दिनविशेष 29 मे


*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*

*💥एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी एव्हरेस्ट सर केले💥*

       *२९ मे १९५३*

माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतातील ह्या शिखराची उंची ८,८४८ मीटर (२९,०२९ फूट) इतकी असून ते नेपाळ व चीन (तिबेट) ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला सगरमाथाम्हणून ओळखतात तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा म्हणतात.

सन १८५६ मध्ये ब्रिटिश राजमधील भारतीय सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणामध्ये ह्या शिखराची उंची २९,०२९ फूट इतकी निश्चित करण्यात आली. ह्या अगोदर हे शिखर पीक XV ह्या नावाने ओळखले जात होते. सर्वेक्षणानंतर राधानाथ सिकदार यांनी सिद्ध केले की हिमालयाचे १५ वे शिखर जगातील सर्वात उंच शिखर आहे, आणि त्याची समुद्रसपाटीपासून उंची २९००२ फूट इतकी आहे. या कामगिरीसाठी ब्रिटिश सरकारने राधानाथांचा गौरव केला होता. त्या वेळचे भारतीय सर्वेक्षण खात्याचे प्रमुख(सर्व्हेयर जनरल) ॲन्ड्‌र्‍यू वॉ होते. त्यांनी आपल्या इ.स.१८४३ मध्ये निवृत्त झालेल्या साहेबाचे, म्हणजे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला दिले. म्हणून त्या शिखराला इ.स.१८६५ पासून माउंट एव्हरेस्ट म्हणू लागले.

माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत असल्याने जगातील सर्वच गिर्यारोहकांचे याला सर करण्याचे स्वप्न असते. अनेक गिर्यारोहक भरमसाठ किंमत मोजून (अंदाजे २५ हजार डॉलर प्रत्येकी) हे शिखर सर करण्याचा प्रयत्‍न करतात. माउंट एव्हरेस्ट हे अतिउंच शिखर असले तरी के२अथवा कांचनगंगा ह्या इतर शिखरांच्या तुलनेत कमी अवघड आहे. इतर कोणत्याही ८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांपेक्षा एव्हरेस्टवर सर्वाधिक गिर्यारोहण चढाया झाल्या आहेत, तरीही अतिउंचीच्या त्रासामुळे खराब हवामानामुळे अनेक गिर्यारोहक मृत्युमुखी पडतात. या शिखरावर पहिली चढाई १९५३ मध्ये ब्रिटिश मोहिमेतील न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी केली. त्यानंतर आजवर २,४३६ गिर्यारोहकांकडून ३,६७९ चढाया झाल्या आहेत.

माउंट एव्हरेस्ट वर चढाईसाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. नेपाळच्या हद्दीत असलेली आग्नेयेकडील पर्वत रांग, व तिबेटच्या हद्दीतली ईशान्येकडील रांग. या व्यतिरिक्त अजूनही मार्ग आहेत परंतु ते फारसे वापरले जात नाहीत.[७]या दोघां मार्गांपैकी आग्नेयेकडील मार्ग जास्ती सोपा व सोईस्कर आहे. त्यामुळेच गिर्यारोहकांच्या जास्ती पसंतीचा आहे. ह्याच मार्गाने सर एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी १९५३ मध्ये पहिली चढाई केली होती.[७] चीनचे पाश्चिमात्य देशांशी कटू संबंध यामुळे देखील नेपाळ मार्गाचा जास्त वापर होतो.

चढाईसाठी सर्वोत्तम महिना मे हा गणला जातो. या काळात थंडी कमी झालेली असते. चढाईसाठी आवश्यक असलेला कडक बर्फ हिवाळ्यानंतर भरपूर असतो. तसेच हवामानातील बदलामुळे वार्‍याची दिशा उत्तरेकडची होते व त्यामुळे पर्वतावरील सोसाट्याचा वारा कमी होतो.[९][१०]काहीवेळा मान्सूननंतरच्या काळात चढाईचे प्रयत्‍न होतात. परंतु, सोसाट्याचा वारा, मान्सूनमुळे पडलेला जास्तीचा व भुशभुशीत बर्फ व हवामानातील सातत्याचे बिघाड यामुळे चढाई अवघड होऊन बसते.

सन १८८५ मध्ये आल्पाईन क्लबचे अध्यक्ष क्लिंटन थॉमस डेंट यांनी आपल्या पुस्तकात अबोव्ह द स्नो लाइन या पुस्तकात एव्हरेस्टवर चढाई करणे शक्य आहे हे नमूद केले होते.[११]

जॉर्ज मॅलरी यांनी १९२१ मध्ये उत्तरेकडील मार्गाचा शोध लावला. ही एव्हरेस्ट काबीज करायची मोहीम नव्हती तर एव्हरेस्ट चढण्याचे मार्ग कुठून असण्याची शक्यता आहे हे पडताळण्यास होती. मॅलरी यांनी आपल्या शोधकार्यात पार एव्हरेस्टच्या सोंडांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. मॅलरी ही पहिली अशी व्यक्ती होती की ज्यांनी नॉर्थ कोल (७,००७ मी)वर पाऊल ठेवले. नॉर्थ कोलवरून त्यांनी पुढील रस्ता कसा असेल याची पडताळणी केली. त्यांची मोहीम इतक्या उंचीसाठी अद्ययावत नव्हती त्यामुळे त्यांना तेथून आवरते घ्यावे लागले.

पुढच्याच वर्षी सन १९२२ मध्ये ब्रिटिशांनी एव्हरेस्ट काबीज करायची मोहिम आखली. या मोहिमेत जॉर्ज फिंच यांनी भराभर चढत ८,००० मीटर पेक्षाही जास्त चढण केली व ८,००० मीटरपेक्षा अधिक चढाई करणारे ते पहिले ठरले. ही मोहीम जॉर्ज मॅलरी व ब्रिटिशांच्या अखिलाडू वृत्तीसाठी गाजली. मॅलरी व कर्नल फेलिक्स यांनी पुन्हा एकदा नॉर्थ कोलच्या बाजूने प्रयत्‍न केला. मॅलरी यांच्या चुकीमुळे हिमस्खलनामध्ये ७ स्थानिक वाहक मारले गेले.

१९२४ मध्ये मॅलोरी यांनी पुन्हा ब्रिटिशांनी मोहीम आखली. या मोहिमेत सुरुवातील मॅलरी व ब्रूस यांचे प्रयत्‍न खराब हवामानाने फोल ठरवले. पुढील प्रयत्‍न नॉर्टन व सॉमरवेल यांनी केले त्यांना सुरेख हवामानाची साथ मिळाली व त्यांनी विना ऑक्सिजन प्रयत्‍न केले. नॉर्टन ८,५५८ मीटर पोहोचले असताना मॅलरी व इर्व्हिन ह्यानी ऑक्सिजन देण्यासाठी म्हणून पुढाकार घेतला. नॉर्टनला बेसकँपकडे परत पाठवले व स्वतः मोहीमे फत्ते करायचे ठरवले. ८ जून १९२४ रोजी इर्व्हिन व मॅलरी चढा

ई करत असताना मरण पावले. १ मे १९९९ रोजी मॅलरी व इर्व्हिन फाउंडेशनच्या गिर्यारोहकांना एव्हरेस्ट शिखराच्या उत्तर बाजूला बर्फाच्या अस्तराखाली दफन झालेले मृतदेह शोधून काढण्यात यश मिळाले. शिखराच्या एवढे जवळ सापडलेल्या मृतदेहांमुळे इर्व्हिन व मॅलरी यांनी हिलरी व तेनसिंग नोर्गेच्या २४ वर्षे अगोदरच एव्हरेस्ट सर केले होते की काय अश्या चर्चांना उधाण आले. परंतु त्या मोहिमेतील सहकार्‍यांचे मत व ज्या परिस्थितीत मृतदेह सापडले त्यावरुन त्यांना शिखर सर करण्यात अपयश आले असे बहुतेकांचे मत आहे.

१९५२ मध्ये स्विस संघाने शर्थीचे प्रयत्‍न केले या मोहिमेचे नेतृत्व एडवर्ड डुनाँ यांनी केले होते. डुनाँ यांना नेपाळकडून चढाईची परवानगी मिळाली होती. त्यांनी खूंबू हिमनदीमधूनसाउथ कोल ७,९८६ मीटर (२६,२०१ फूट) उंचावर पोहोचण्याचा मार्ग शोधून काढला. या मोहिमेत रेमंड लँबर्ट व शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी ८,५९५ मीटर (२८,१९९ फूट) इतकी उंची गाठली की तो नवा विक्रम ठरला. स्विस संघाला आल्प्समधील अनुभवाचा चांगलाच फायदा झाला तसेच त्यांचे शेर्पांशी वर्तन अतिशय खेळीमेळीचे असायचे यामुळे स्विस संघाला पूर्वीच्या ब्रिटिश संघांपेक्षा चांगले यश मिळाले.
========================

दिनविशेष 29 मे

*२९ मे १९९९*

*'डिस्कव्हरी' हे अंतराळयान (space shuttle) प्रथमच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला (ISS) जोडले गेले*

ज्या यानातून कल्पना चावलाने अंतराळ प्रवास केला ते कोलंबिया यान किंवा ज्या यानातून सुनीता पंड्याने अवकाशात झेप घेतली ते डिस्कव्हरी यान ही अमेरिकेने बांधलेल्या स्पेस शटल यानांची उदाहरणे. उपग्रह किंवा अवकाशयान पाठविण्याच्या प्रत्येक मोहिमेत एक अग्निबाण खर्ची पडतो, जळून जातो. देशाचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान कमी व्हावे या हेतूने परत परत वापरता येणारा अग्निबाण असावा, या कल्पनेतून स्पेस शटल यानांची निर्मिती झाली.

'डिस्कव्हरी' हे अंतराळयान (space shuttle) पृथ्वीवर परत आणता येते. या यानाच्या मदतीने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची (ISS) बरीचशी बांधणी अंतराळातच केली गेली आहे.

पांढर्‍या रंगाचे विमानासारखे दिसणारे यान हे मुख्यतः अ‍ॅल्युमिनियम पासुन बनलेले होते आणि सुर्यापासुन व वातावरणातील वायुकणांशी घर्षन झाल्यानंतर तयार झालेल्या प्रचंड उष्णतेपासुन सरंक्षण होण्यासाठी त्याभोवती एक विशिष्ठ आवरण असे. यामध्ये अंतराळवीर, अवकाशस्थानकासाठी लागणार्‍या वस्तू तसेच उपग्रह ठेवलेले असे. इंधनटाकी वेगळी झाल्यानंतर त्या कक्षेतून अंतरीक्षयान मग अंतराळस्थानकाच्या कक्षेत पोहचत असे. त्यानंतर अंतराळस्थानक व यान एकाच कक्षेत प्रवास करत असतानाच अंतराळवीर स्पेस शटलवरील यंत्रनेचा वापर करून यान अवकाशस्थानकाला जोडले जात असे, यालाच डॉकिंग असे म्हणत. त्यानंतर अंतराळवीर अवकास्थानकात पोहचत असे. एखादा उपग्रह कक्षेत पाठवण्याताना स्पेस शटल याच पद्धतीने ठरावीक कक्षेत पोहचत असे. त्यानंतर अंतराळवीर त्याचा विशिष्ठ पोशाख घालून सोबत नेलेला उपग्रह त्या कक्षेत सोडुन परत पृथ्वीवर येत असे. याचप्रकारे हबल दुर्बिन अवकाशात पाठविण्यात आली होती व वेळोवेळी त्या कक्षेत पोहचून दुर्बिनीला पकडुन दुरूस्ती करण्यात आली होती. 


दिनविशेष 28 मे

*शंतनू लक्ष्मण किर्लोस्कर*

*संशोधक, उद्योजक*

*जन्मदिन - २८ मे १९०३*

शंतनु लक्ष्मण किर्लोस्कर यांचा जन्म सोलापूरला झाला. शालेय शिक्षण औंध येथे झाले आणि पुण्यात झाल्यावर त्यांनी अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून यंत्र अभियांत्रिकीमधील पदवी १९२७ साली प्राप्त केली.

पारतंत्र्याच्या काळात स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करून यंत्रनिर्मिती करण्याचे धाडस करणारा उद्योगसमूह म्हणूनच ‘किर्लोस्कर उद्योग समूहा’ची ओळख करून द्यायला हवी. ‘किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड’ ही भारतातील पहिली कंपनी, की ज्यांनी स्वत:चेच गुणवत्ता मापदंड निश्चित करून ‘चारा कापण्याचे यंत्र’ आणि ‘लोखंडी नांगर’ अशी दोन अवजारे बाजारात आणली. विशेष म्हणजे, त्या काळी अशाच प्रकारच्या ब्रिटिश अवजारांशी स्पर्धा करून ‘किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड’चे नाव सातासमुद्रापलीकडे प्रसिद्धी पावले. भारतात जणू स्वदेशी यंत्रयुगाला सुरुवात झाली. शेंगदाण्याची टरफले काढणारे यंत्र, उसाचा रस काढणारे यंत्र, पाणी उपसण्याचा पंप, अशा हातयंत्रांची निर्मिती करून नव्या अर्थव्यवस्थेच्या भारतीय उद्योगजगतात किर्लोस्कर कंपनीने क्रांतीच घडवून आणली. आता गरज होती ती या यंत्रांना ऊर्जा देऊन गतिमान करण्याची. हेही आव्हान किर्लोस्कर ब्रदर्सने स्वीकारले आणि भारतीय उद्योगजगतात स्वयंचलित यंत्रयुगाला सुरुवात झाली. डीझेल इंजीन, कोलगॅस जनरेटर्स, विद्युत मोटर अशा स्वदेशी यंत्रांच्या साहाय्याने भारतीय उद्योगात चैतन्याचे वारे वाहू लागले, त्याला एक वेगळीच गती प्राप्त झाली. पंप आणि झडपा (व्हाल्व्ह्स) तयार करणारा सर्वांत मोठा भारतीय उद्योगसमूह म्हणून किर्लोस्कर ब्रदर्स उदयाला आला.

जागतिक युद्धकालीन परिस्थितीत भारतीय उद्योगांची अवस्था खूपच बिकट झाली होती. आमच्याकडे स्वदेशी तंत्रज्ञानाचा अभाव आणि ब्रिटिश सरकारने ब्रिटिश बनावटीची यंत्रसामग्री भारतात पाठवण्यास घातलेली बंदी अशा अवस्थेत किर्लोस्करचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. या दृष्टीने भारतीय उद्योगपतीने ‘मशीन टूल्स’ तयार करण्याचा धाडसी निर्णय घेऊन ब्रिटिश सरकारला चकित केले. शेतीची अवजारे बनवणारे किर्लोस्कर, मशीन टूल्सकडे वळले हे भारतीय उद्योगजगतातील क्रांतिकारक वळणच म्हणायला हवे. यासाठी त्यांनी ‘हरिहर’ येथे ‘मैसूर किर्लोस्कर लिमिटेड’ ही कंपनी सुरू केली. या कामी मैसूरचे महाराजा त्यांना हितचिंतक म्हणून लाभले. त्या वेळी तयार केलेली सातही ‘लेथ मशीन्स’ हातोहात विकली गेली.

भारताची वाटचाल वसाहतवादाकडून स्वातंत्र्याकडे सुरू झाली. १९४० साली भारताचे राजकीय वातावरण बदलले. महाराजांच्या आशीर्वादाची आता गरज उरली नाही. भारताचे औद्योगिक धोरण बदलले आणि त्याचा किर्लोस्कर ग्रूपला खूपच मोठा फायदा झाला. शंतनुराव किर्लोस्कर यांनी अखेर पुणे गाठले आणि डीझेल इंजीन तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले. उद्योग उभारण्यासाठी पुणे येथे जमीन मिळविण्यासाठी त्यांना जनतेच्या विरोधाला आणि नोकरशाहीवृत्तीला तोंड द्यावे लागले. माणसापेक्षा उद्योगधंद्यांचे आयुष्य दीर्घकालीन असते असे लोकांना पटवून शंतनुरावांनी ‘किर्लोस्कर ऑइल इंजीन लिमिटेड’साठी जागा मिळवली. यासाठी त्यांना ‘असोसिएटेड ब्रिटिश ऑइल इंजीन एक्स्पोर्ट लिमिटेड’ या इंग्लंडच्या कंपनीशी करार करावा लागला. या करारानंतर तब्बल एका वर्षाने किर्लोस्करांना जागा ताब्यात मिळाली. परदेशी कंपनीशी करार करून तंत्रज्ञानाची दरी ‘टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर’द्वारा भरून काढण्याचा प्रयत्न करणारा पहिला भारतीय उद्योगपती म्हणून शंतनुरावांचे नाव घ्यायला हवे. १९४६ साली किर्लोस्कर ऑइल इंजीन लिमिटेड कंपनी अस्तित्वात आली आणि या कंपनीने भारताला पहिले स्वदेशी असे ‘व्हर्टिकल हाय स्पीड इंजीन’ प्रदान केले. हे पहिले इंजीन खरेदी करणारे ब्रिजलाल सारडा यांनी ४० वर्षे हे इंजीन उत्तम चालल्याची पावतीसुद्धा दिली आहे.

विद्युत मोटारी तयार करणे हे लक्ष्मणरावांचे स्वप्न होते, ते १९४६ साली पूर्ण झाले. लक्ष्मणरावांचा धाकटा मुलगा रवी याने १० हेक्टर जागेवर किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी लिमिटेड उद्योग सुरू केला. पुढे १९५८ साली एअर कॉम्प्रेसर्स तयार करण्याचा परिपूर्ण कारखाना शंतनुरावांचे धाकटे चिरंजीव श्रीकांत यांनी समर्थपणे सांभाळला. इंग्लंडच्या ब्रूम अ‍ॅण्ड वेड या कंपनीच्या सहकार्याने किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेडने एअर कॉम्प्रेसर्स आणि न्यूमॅटिक साधनांचे उत्पादन सुरू केले.

आज अमेरिकेच्या ‘ट्वि डिस्क’ या कंपनीच्या सहकार्याने किर्लोस्कर न्यूमॅटिकने टॉर्क इन्व्हर्टर्स, मरीन गिअर बॉक्स आणि रेल ट्रॅक्शन ट्रान्समिशन्स यांचेदेखील उत्पादन सुरू केले आहे. आता मात्र किर्लोस्कर उद्योगाच्या एवढ्या प्रचंड ज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्याचा उपयोग भारतातील  उदयोन्मुख उद्योजकांना होणे गरजेचे होते. यातूनच १९६३ साली ‘किर्लोस्कर कन्सल्टंट्स लिमिटेड’ ही कंपनी उदयाला आली. गेल्या २५ वर्षांत किर्लोस्कर समूहाने संरक्षण, पर्यावरण, रस्ते आणि शेती या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. १९६४ साली किर्लोस्कर समूहाने सेवा उद्योग क्षेत्रात पदार्पण केले. ‘पुणे इंडस्ट्रियल हॉटेल लिमिटेड’ कंपनीतर्फे पुण्यात ‘हॉटेल ब्लू डायमंड’ आणि कोल्हापुरात ‘हॉटेल पर्ल’ सेवाक्षेत्रात रुजू झाले. यातूनच पुढे ‘बेकर्स बास्केट कन्फेक्शनरी चेन’ आणि ‘हॉटेल अ‍ॅण्ड कॅटरिंग कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ या सेवा संस्था अस्तित्वात आल्या. आज शेती, पाणीपुरवठा, ऊर्जा आणि शेतकीकरण या क्षेत्रांत किर्लोस्कर समूहाने कमावलेल्या नावाचे श्रेय शंतनुराव किर्लोस्कर यांनाच जाते.

किर्लोस्कर उद्योग समूहाचा व्याप त्यांनी देशी-परदेशी वाढवल्याने ते केवळ किर्लोस्कर समूहाचे नेते नव्हते, तर पुण्यात ज्यांना उद्योग करायचा, त्या सर्वांना ते सल्ला देत. त्यासाठी त्यांनी वेगळे खातेच सुरू केले होते. ते वेगवेगळ्या वीस कंपन्यांच्या संचालक मंडळांवर होते. १९६५-१९६६ साली भारतीय उद्योगांची शिखर संस्था असलेल्या ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’चे ते अध्यक्ष होते. ‘बोर्ड ऑफ ट्रेड’वर ते सल्लागार होते. ‘इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’चे ते अध्यक्ष होते. पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’ या शिक्षणसंस्थेचे ते १५ वर्षे अध्यक्ष होते. वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.

— डॉ. रंजन गर्गे

दिनविशेष 28 मे

💥🌹आजचा दिनविशेष🌹💥

*विनायक दामोदर सावरकर*

*विज्ञाननिष्ठ, महान क्रांतिकारक*

*जन्मदिन - २८ मे १८८३*

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महान देशभक्त, जहाल क्रांतिकारक, झुंजार स्वातंत्र्यसेनानी, धैर्याचे मेरुमणी, प्रतिभासंपन्न कवी, सिध्दहस्त लेखक, नाटककार, प्रखर बुद्धिवादी, विज्ञानवादी, हिंदुत्ववादी, तत्त्वनिष्ठ राजकारणी, सहस्रावधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे वक्ते, चिंतनशील, कर्ते समाजसुधारक, भाषा शुध्दीचे प्रवर्तक आणि यंत्रयुगाचे समर्थक असे विविध पैलू होते.

'मी समुद्रात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालेल, पण माझा सामाजिक विचार त्यांनी  विसरू नये' या त्यांच्या प्रतिपादनातून ते साजसुधारणांना किती महत्त्व देत होते हे समजून येते. ते हिंदू समाजापुरते बोलत आणि लिहीत होते. तरीपण त्यांना विज्ञाननिष्ठ, पोथीमुक्त आणि ऐहिकतेचे भान असलेला भारतीय समाज घडवायचा होता. सर्व पंथांना एकत्र करून आचार विचार भेद न मानता 'या भूमीला पितृभू आणि पुण्यमू मानणारे ते हिंदू' अशी माझी बौध्दिक व्याख्या आहे, असे ते म्हणत. त्यांच्या सामाजिक विचारांचा हिंदुत्व हा गाभा होता. त्यांनी आधुनिक विश्वसंस्कृतीस हिंदुत्वाला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हिंदू धर्मग्रंथांचा, शास्त्रांचा अनुकूल असा अर्थ लावला नाही. त्यांनी वेदांचे प्रामाण्य मानले नाही. ते मनुस्मृतीला, वेदांना अभ्यासनीय, आदरणीय ग्रंथ मानत. पण ते अनुकरणीय नाहीत हे सुध्दा परखडपणे सांगतात. विज्ञानयुगाची, यंत्रयुगाची कास धरण्याचे आवाहन करतात. आधुनिकीकरण ही एक मानसिक प्रक्रिया असल्यामुळे मानसिक आधुनिकीकरणासाठी सर्वप्रथम धर्मग्रंथाचे दास्य झुगारून दिले पाहिजे, असे त्यांचे मत होते. धर्मग्रंथ हे ईश्वरनिर्मित आहेत, हे त्यांना मान्य नव्हते तर धर्मग्रंथ मानवनिर्मित आहेत, अशी त्यांची धारणा होती. त्यांचे सामाजिक विचार हे इहवादावर आणि भौतिकवादावर आधारित होते. तरीपण ते अध्यात्माचे वैयक्तिक स्तरावर महत्त्व मान्य करीत. विज्ञानाच्या संशोधन ग्रंथांनाच ते धर्मग्रंथ मानतात. बुध्दीची प्रतिष्ठापना केल्यावर जो धर्म समाजात अस्तित्वात राहील त्यालाच ते विज्ञानधर्म मानतात. हिंदुस्थानला धार्मिक अज्ञानाच्या तमोयुगातून आजच्या सुधारलेल्या विज्ञान युगात आणून सोडणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे, हाच खरा धर्म आहे, असे ते म्हणतात. धर्मनिष्ठा बाजूला केल्याशिवाय विज्ञाननिष्ठा प्रस्थापित होत नाही, विज्ञानधर्माशिवाय माणसाचा विकासच होऊ शकत नाही, असे त्यांचे ठाम मत होते.

ते विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ असल्याने प्रत्क्षनिष्ठ आणि प्रयोगसिध्द विज्ञानच आजच्या परिस्थितीत आमच्या राष्ट्राचा वेद झाला पाहिजे, असे त्यांचे ठाम प्रतिपादन होते. पाच हजार वर्षांपूर्वीच्या अज्ञानयुगाकडे पाठ फिरवा आणि विज्ञानुगाचे स्वागत करा, अशी त्यांची भूमिका असल्यामुळे त्यांनी शुध्द इहवाद मांडला. ते गाईला-बैलाला उपयुक्त पशू मानत. त्यांना देव मानणे म्हणजे मनुष्यास पशूहूनही नीच मानण्यासारखे आणि माणुसकीला कमीपणा आणणारे आहे, असे ते म्हणत. गोमतापूजन, सत्यनारायण, वास्तुशांती या गोष्टी त्यांना वेडेपणाच्या वाटत. गाय ही बैलाची माता आहे, मनुष्याची नव्हे अशा भाषेत ते गाईबद्दल धर्मश्रध्देची चिकित्सा करतात.


2 मे 1921 रोजी सावरकरांची रत्नागिरीमध्ये स्थानबध्दता आणि कोणत्याही राजकीय आंदोलनात भाग न घेण्याच्या मुख्य अटींवर सुटका करण्यात आली. अंदामानातील बंदिवासात आणि रत्नागिरीतील 1924 ते 1937 या तेरा वर्षांच्या स्थानबध्दतेच्या कालखंडात त्यांनी सखोल असे समाजचिंतन केले. या काळात त्यांनी सामाजिक आंदोलनावर, समाज प्रबोधनावर आणि विज्ञानाच्या प्रसारावर लक्ष केंद्रित केले. जातिभेदाचे उन्मूलन, अस्पृश्यता निवारण, भाषाशुध्दी, अंधश्रध्दा निर्मलून, लिपी सुधारणा, हिंदूंचे संघटन आणि शुद्धिकरण हे त्यांनी आपले कार्यक्षेत्र निश्चित केले. त्यासाठी व्याख्याने देणे, लेख लिहिणे, विचार विनिमय, चर्चा, प्रश्नोत्तरे शंकांचे समाधान, वैयक्तिक गाठीभेटी याद्वारे सवर्णांचे प्रबोधन आणि दलितांमध्ये जाणीवजागृतीला त्यांनी सुरुवात केली. सनातन्यांचा, धर्ममार्तंडांचा आपल्या कार्याला विरोध होणार, प्रतिकूल ते घडणार हे त्यांनी गृहीत धरलेले होतेच. परंतु सावरकरांच्या चार वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर रत्नागिरीतील बहुतांशी लोकांची मानसिकता समाजसुधारणांना अनुकूल होऊ लागली.

हिंदूंच्या समाजजीवनावर आघात करणार आणि हिंदूंनी आपल्या हातांनी हौसेने पायात घालून घेतलेल्या वेदोक्त बंदी, व्यवसाय बंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुध्दीबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी या सात बेड्या तोडून घेतल्याशिवाय राष्ट्र त्याग केला पाहिजे. परधर्मात गेलेल्या किवा परधर्मीयांना हिंदू धर्मात घेता आले पाहिजे. त्यांना समतने आणि ममतेने वागवावे, अशी त्यांची शिकवण होती. यज्ञाने पाऊस पडतो हे साफ कोटे असून यज्ञात तुपाचा एक थेंबही वाया गावू नका 

असे ते सांगत. यज्ञाने पेटलेल्या भारतात दुष्काळ कसे पडतात? असा सवाल ते विचारतात. रत्नागिरीत अस्पृश्यतेचा पुतळा जाळण्यासाठी त्यांनी तरुणांना संमती दिली. 
त्यांनी केलेले कार्य म्हणजे देशभक्तीचे, मानवतवादी, चिरकालीन महत्त्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले होते. सावरकरांचे हिंदुत्वाबद्दलचे, हिंदू राष्ट्राबद्दलचे विचार हे वादग्रस्त असू शकतील, पण त्यांचे पोथीमुक्तीचे, विज्ञानवादी, सुधारणावादी आणि इहवादी विचार त्यांच्या अनुयायांनाही पेलले नाहीत. पण त्यांचे हे विचार सगळ्यांनीच स्वीकारले, अमलात आणण्याच्या दृष्टीने पावले टाकली तर जातिवादचे, अंधश्रद्धांचे निर्मूलन होऊन जग सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करू शकेल. अशा या विज्ञानवादी, समाजसुधारक, उत्कट देशभक्तीचे प्रतीक झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना शतश: नमन 🙏🏼
========================
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र
*दिनविशेष चाचणी सोडविण्यासाठी क्लीक करा* 👇👇👇👇👇👇
======================