सोमवार, १ जून, २०२०

दिनविशेष 29 मे


*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*

*💥एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी एव्हरेस्ट सर केले💥*

       *२९ मे १९५३*

माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतातील ह्या शिखराची उंची ८,८४८ मीटर (२९,०२९ फूट) इतकी असून ते नेपाळ व चीन (तिबेट) ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला सगरमाथाम्हणून ओळखतात तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा म्हणतात.

सन १८५६ मध्ये ब्रिटिश राजमधील भारतीय सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणामध्ये ह्या शिखराची उंची २९,०२९ फूट इतकी निश्चित करण्यात आली. ह्या अगोदर हे शिखर पीक XV ह्या नावाने ओळखले जात होते. सर्वेक्षणानंतर राधानाथ सिकदार यांनी सिद्ध केले की हिमालयाचे १५ वे शिखर जगातील सर्वात उंच शिखर आहे, आणि त्याची समुद्रसपाटीपासून उंची २९००२ फूट इतकी आहे. या कामगिरीसाठी ब्रिटिश सरकारने राधानाथांचा गौरव केला होता. त्या वेळचे भारतीय सर्वेक्षण खात्याचे प्रमुख(सर्व्हेयर जनरल) ॲन्ड्‌र्‍यू वॉ होते. त्यांनी आपल्या इ.स.१८४३ मध्ये निवृत्त झालेल्या साहेबाचे, म्हणजे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला दिले. म्हणून त्या शिखराला इ.स.१८६५ पासून माउंट एव्हरेस्ट म्हणू लागले.

माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत असल्याने जगातील सर्वच गिर्यारोहकांचे याला सर करण्याचे स्वप्न असते. अनेक गिर्यारोहक भरमसाठ किंमत मोजून (अंदाजे २५ हजार डॉलर प्रत्येकी) हे शिखर सर करण्याचा प्रयत्‍न करतात. माउंट एव्हरेस्ट हे अतिउंच शिखर असले तरी के२अथवा कांचनगंगा ह्या इतर शिखरांच्या तुलनेत कमी अवघड आहे. इतर कोणत्याही ८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांपेक्षा एव्हरेस्टवर सर्वाधिक गिर्यारोहण चढाया झाल्या आहेत, तरीही अतिउंचीच्या त्रासामुळे खराब हवामानामुळे अनेक गिर्यारोहक मृत्युमुखी पडतात. या शिखरावर पहिली चढाई १९५३ मध्ये ब्रिटिश मोहिमेतील न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी केली. त्यानंतर आजवर २,४३६ गिर्यारोहकांकडून ३,६७९ चढाया झाल्या आहेत.

माउंट एव्हरेस्ट वर चढाईसाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. नेपाळच्या हद्दीत असलेली आग्नेयेकडील पर्वत रांग, व तिबेटच्या हद्दीतली ईशान्येकडील रांग. या व्यतिरिक्त अजूनही मार्ग आहेत परंतु ते फारसे वापरले जात नाहीत.[७]या दोघां मार्गांपैकी आग्नेयेकडील मार्ग जास्ती सोपा व सोईस्कर आहे. त्यामुळेच गिर्यारोहकांच्या जास्ती पसंतीचा आहे. ह्याच मार्गाने सर एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी १९५३ मध्ये पहिली चढाई केली होती.[७] चीनचे पाश्चिमात्य देशांशी कटू संबंध यामुळे देखील नेपाळ मार्गाचा जास्त वापर होतो.

चढाईसाठी सर्वोत्तम महिना मे हा गणला जातो. या काळात थंडी कमी झालेली असते. चढाईसाठी आवश्यक असलेला कडक बर्फ हिवाळ्यानंतर भरपूर असतो. तसेच हवामानातील बदलामुळे वार्‍याची दिशा उत्तरेकडची होते व त्यामुळे पर्वतावरील सोसाट्याचा वारा कमी होतो.[९][१०]काहीवेळा मान्सूननंतरच्या काळात चढाईचे प्रयत्‍न होतात. परंतु, सोसाट्याचा वारा, मान्सूनमुळे पडलेला जास्तीचा व भुशभुशीत बर्फ व हवामानातील सातत्याचे बिघाड यामुळे चढाई अवघड होऊन बसते.

सन १८८५ मध्ये आल्पाईन क्लबचे अध्यक्ष क्लिंटन थॉमस डेंट यांनी आपल्या पुस्तकात अबोव्ह द स्नो लाइन या पुस्तकात एव्हरेस्टवर चढाई करणे शक्य आहे हे नमूद केले होते.[११]

जॉर्ज मॅलरी यांनी १९२१ मध्ये उत्तरेकडील मार्गाचा शोध लावला. ही एव्हरेस्ट काबीज करायची मोहीम नव्हती तर एव्हरेस्ट चढण्याचे मार्ग कुठून असण्याची शक्यता आहे हे पडताळण्यास होती. मॅलरी यांनी आपल्या शोधकार्यात पार एव्हरेस्टच्या सोंडांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. मॅलरी ही पहिली अशी व्यक्ती होती की ज्यांनी नॉर्थ कोल (७,००७ मी)वर पाऊल ठेवले. नॉर्थ कोलवरून त्यांनी पुढील रस्ता कसा असेल याची पडताळणी केली. त्यांची मोहीम इतक्या उंचीसाठी अद्ययावत नव्हती त्यामुळे त्यांना तेथून आवरते घ्यावे लागले.

पुढच्याच वर्षी सन १९२२ मध्ये ब्रिटिशांनी एव्हरेस्ट काबीज करायची मोहिम आखली. या मोहिमेत जॉर्ज फिंच यांनी भराभर चढत ८,००० मीटर पेक्षाही जास्त चढण केली व ८,००० मीटरपेक्षा अधिक चढाई करणारे ते पहिले ठरले. ही मोहीम जॉर्ज मॅलरी व ब्रिटिशांच्या अखिलाडू वृत्तीसाठी गाजली. मॅलरी व कर्नल फेलिक्स यांनी पुन्हा एकदा नॉर्थ कोलच्या बाजूने प्रयत्‍न केला. मॅलरी यांच्या चुकीमुळे हिमस्खलनामध्ये ७ स्थानिक वाहक मारले गेले.

१९२४ मध्ये मॅलोरी यांनी पुन्हा ब्रिटिशांनी मोहीम आखली. या मोहिमेत सुरुवातील मॅलरी व ब्रूस यांचे प्रयत्‍न खराब हवामानाने फोल ठरवले. पुढील प्रयत्‍न नॉर्टन व सॉमरवेल यांनी केले त्यांना सुरेख हवामानाची साथ मिळाली व त्यांनी विना ऑक्सिजन प्रयत्‍न केले. नॉर्टन ८,५५८ मीटर पोहोचले असताना मॅलरी व इर्व्हिन ह्यानी ऑक्सिजन देण्यासाठी म्हणून पुढाकार घेतला. नॉर्टनला बेसकँपकडे परत पाठवले व स्वतः मोहीमे फत्ते करायचे ठरवले. ८ जून १९२४ रोजी इर्व्हिन व मॅलरी चढा

ई करत असताना मरण पावले. १ मे १९९९ रोजी मॅलरी व इर्व्हिन फाउंडेशनच्या गिर्यारोहकांना एव्हरेस्ट शिखराच्या उत्तर बाजूला बर्फाच्या अस्तराखाली दफन झालेले मृतदेह शोधून काढण्यात यश मिळाले. शिखराच्या एवढे जवळ सापडलेल्या मृतदेहांमुळे इर्व्हिन व मॅलरी यांनी हिलरी व तेनसिंग नोर्गेच्या २४ वर्षे अगोदरच एव्हरेस्ट सर केले होते की काय अश्या चर्चांना उधाण आले. परंतु त्या मोहिमेतील सहकार्‍यांचे मत व ज्या परिस्थितीत मृतदेह सापडले त्यावरुन त्यांना शिखर सर करण्यात अपयश आले असे बहुतेकांचे मत आहे.

१९५२ मध्ये स्विस संघाने शर्थीचे प्रयत्‍न केले या मोहिमेचे नेतृत्व एडवर्ड डुनाँ यांनी केले होते. डुनाँ यांना नेपाळकडून चढाईची परवानगी मिळाली होती. त्यांनी खूंबू हिमनदीमधूनसाउथ कोल ७,९८६ मीटर (२६,२०१ फूट) उंचावर पोहोचण्याचा मार्ग शोधून काढला. या मोहिमेत रेमंड लँबर्ट व शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी ८,५९५ मीटर (२८,१९९ फूट) इतकी उंची गाठली की तो नवा विक्रम ठरला. स्विस संघाला आल्प्समधील अनुभवाचा चांगलाच फायदा झाला तसेच त्यांचे शेर्पांशी वर्तन अतिशय खेळीमेळीचे असायचे यामुळे स्विस संघाला पूर्वीच्या ब्रिटिश संघांपेक्षा चांगले यश मिळाले.
========================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा