शुक्रवार, १९ जून, २०२०

20 जून

*लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर*

*किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक*
*तंत्रज्ञान क्षेत्रात महत्वाचे पाऊल*

*जन्म - २० जून, इ.स. १८६९*
 
लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर (लकाकि) ( २० जून, इ.स. १८६९ - २६ सप्टेंबर, इ.स. १९५६) हे मराठी, हे भारतीय उद्योजक होते. ते किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक होते.
इ.स. १८८८ साली त्यांनी बेळगावात सायकल दुरुस्तीचे दुकान थाटत व्यावसायिक क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. शेतीसाठी त्यांनी बनवलेले लोखंडी नांगर हे पुढे विस्तारलेल्या किर्लोस्कर समूहाचे पहिले उत्पादन होते. किर्लोस्करवाडी येथे त्यांनी इ.स. १९१० साली कारखाना काढला; तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी औद्योगिक वसाहत स्थापली.
किर्लोस्कर समूहाची धुरा त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र शंतनुराव किर्लोस्कर यांनी सांभाळली.

19 जून

💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*

        *ब्लेझ पास्काल*

*दाब व निर्वाताविषयी महत्वपुर्ण संशोधन*

*जन्मदिन - जून १९, इ.स. १६२३*

ब्लेझ पास्काल (देवनागरी लेखनभेद: ब्लेस पास्कल; फ्रेंच: Blaise Pascal ; जून १९, इ.स. १६२३ - ऑगस्ट १९, इ.स. १६६२) हा फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक व होता. त्याने आरंभीच्या काळात मूलभूत व उपयोजित विज्ञानात, विशेषकरूनद्रव पदार्थांच्या भौतिक गुणधर्मांबद्दल महत्त्वपूर्ण संशोधन केले. एवांगेलिस्ता तॉरिचेल्ली याने दाब व निर्वाताविषयी पहिल्यांदा प्रतिपदलेल्या संकल्पनांचे स्पष्टीकरण पास्कालाने मांडले. त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे आधुनिक विचारवंतांमधील त्यांचे स्थान अनन्यसाधारण गणले जाते. त्यांचा जन्म क्लेरमाँ-फेराँ येथे झाला. १६२६ मध्ये त्यांची आई मृत्यू पावली व १६३१ मध्ये पास्काल कुटुंबाने पॅरिसला प्रयाण केले.
ब्लेझ पास्कालचे वडील उत्तम गणितज्ञ होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पास्कार अभ्यास न करता प्रथम लॅटिन व ग्रीक भाषांवर प्रभुत्व मिळवावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. तथापि वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी भूमितीच्या अभ्यासास सुरुवात केली व चौदाव्या वर्षापासून ते वडिलांसह रोबेर्व्हाल, मेर्सेन इ. भूमितिविज्ञांच्या साप्ताहिक बैठकींना हजर राहू लागले. १६३९ मध्येच त्यांनी ‘शांकवामध्ये [⇨ शंकुच्छेद] अंतर्लिखित केलेल्या षट्कोनाच्या विरुद्ध बाजूंच्या जोड्यांचे छेदबिंदू एकरेषीय असतात’ हे आता त्यांच्यात नावाने ओळखण्यात येणारे व प्रक्षेपय भूमितीत [⇨ भूमिति] महत्त्वाचे म्हणून मानण्यात येणारे प्रमेय मांडले. १६४० साली पास्कार कुटुंब या भूमितिविज्ञांच्या Brouillon project या ग्रंथाच्या आधारे शांकवांवरील निबंधांचा एक ग्रंथ (Essai pour les coniques) लिहून पूर्ण केला. या असामान्य ग्रंथामुळे त्यांना लहान वयातच पुष्कळ प्रसिद्धी लाभली व देकार्तसारख्या गणितज्ञांना सुद्धा त्यांचा हेवा वाटला.
वडिलांच्या हिशेबाच्या कामात मदत करण्याच्या उद्देशाने पास्कार यांनी बेरीज व वजाबकी करणारे एक यंत्र तयार करण्याची योजना १६४२ मध्ये आखली; हे यंत्र तयार करण्याचा व त्याचे वितरण करण्याचा एकाधिकार त्यांना १६४९ मध्ये प्राप्त झाला, तथापि ते महाग व क्लिष्ट असल्याने त्याचा फारसा प्रसार होऊ शकला नाही.
एव्हांजेलिस्ता टोरिचेल्ली (१६०८-४७) यांनी पाऱ्याच्या वायुदाबमापकांसंबंधी केलेल्या प्रयोगांची माहिती १६४६ मध्ये मिळाल्यावर पास्कार यांनी निरनिराळ्या उंचीवर वायुदाबमापकातील पाऱ्याच्या उंचीचे निरीक्षण केले व वाढत्या उंचीबरोबर वातावरणीय दाब कमी होत जातो, असा निष्कर्ष काढला. तसेच ‘स्थिर द्रायूमधील (द्रव वा वायूमधील) एखाद्या बिंदूपाशी बाह्य दाब लावला असता तो सर्व दिशांना सारखाच प्रेषित होतो’, हा ⇨ द्रायुयामिकीतील त्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा महत्त्वाचा नियम मांडला. वायुदाबमापकातील पाऱ्याच्या वर निर्वात (पोकळी) असतो असे त्यांनी प्रतिपादन केले व त्यासंबंधी त्यांचा ई. नोएल यांच्याबरोबर वादविवादही झाला. या संदर्भात पास्काल यांनी एखाद्या गृहीतकाची परीक्षा पाहण्यासंबंधीच्या अटींविषयी केलेले विवेचन वैज्ञानिक पद्धतीच्या इतिहासात उद्‍बोधक ठरले आहे. एखादाच विरोधी आविष्कारसुद्धा गृहीतकाच्या असत्याचा पुरावा म्हणून पुरेसा आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी द्रायुस्थितिकीचे (स्थिर द्रायूंच्या गुणधर्मांच्या शास्त्राचे) नियम व हवेच्या वजनामुळे होणारे विविध परिणाम यांसंबंधीचा एक ग्रंथ १६५४ च्या सुरुवातीस लिहून पूर्ण केला; परंतु तो त्यांच्या मृत्यूनंतर १६६३ मध्ये प्रसिद्ध झाला.
त्यांनी १६५४ मध्ये अंकगणितीय त्रिकोणाचा [(क+ख)न याच्या विस्तारातील सहगुणकांनी बनलेल्या संख्यांच्या त्रिकोणाकार मांडणीचा; न=०,१,२,…] अंकगणित व ⇨ समचयात्मक विश्लेषण यांतील प्रश्नांच्या संदर्भात सखोल अभ्यास केला. हा त्रिकोण ‘पास्काल त्रिकोण’ याच नावाने ओळखण्यात येतो. याविषयी त्यांनी लिहिलेला Trait du triangle arithmetique हा ग्रंथ व त्यांनी प्येअर द फेर्मा (१६०१-६५) या गणितज्ञांबरोबर केलेला पत्रव्यवहार यांच्याद्वारे त्यांनी संभाव्यता कलनशास्त्राचा [⇨ संभाव्यता सिद्धांत] पाया घातला.
कॉर्नेलिस यानसेन (१५८५-१६३८) या धर्मशास्त्रवेत्त्यांच्या अनुयायांबरोबर १६४६ साली त्यांचा निकटचा संबंध आला व त्यामुळे यानसेन यांच्या शिकवणुकीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. त्यांची बहीण १६५१ मध्ये त्यांच्या इच्छेविरुद्ध पोर्ट रॉयल येथे मठवासिनी (नन) झाली. १६५२-५४ या काळात पास्काल यांचे धार्मिक गोष्टींवरील लक्ष उडाले आणि त्यांनी हा काळ जुगारी व बदफैली लोकांच्या संगतीत घालविला. तथापि या आयुष्याला व पराकाष्ठेच्या वैज्ञानिक कार्याला कंटाळून पुन्हा त्यांना धार्मिक बाबींमध्ये रस उत्पन्न झाला. २३ नोव्हेंबर १६५४ रोजी त्यांना आलेल्या गूढ धार्मिक अनुभवामुळे (nauit de feu) वैज्ञानिक कार्य सोडून देऊन चिंतन व धार्मिक कार्य यांनाच वाहून 

घेऊन यानसेन पंथाच्या अनुयायांना लेखाद्वारे व अन्य प्रकारे मदत करण्याचा त्यांनी निश्चय केला. तथापि १६५८ मध्ये त्यांनी चक्रजासंबंधीचा (एका सरळ रेषेवरून फिरत जाणाऱ्या वर्तुळाच्या परिघावरील एका बिंदूद्वारे रेखाटल्या जाणाऱ्या वक्रासंबंधीचा) आपला प्रबंध लिहिला. त्यामध्ये त्यांनी चक्रजाचे अनेक गुणधर्म आणि चक्रज अक्षाभोवती, पायाभोवती व शिरोबिंदूजवळील स्पर्शरेषेभोवती फिरविला असता तयार होणाऱ्या भ्रमण प्रस्थांचे (घनाकृतींचे) गुणधर्म चर्चिले होते. त्यामध्ये पास्काल यांनी वापरलेली पद्धत बरीचशी सध्या वापरात असलेल्या समाकलन पद्धतीशी [⇨अवकलन आणि समाकलन] जुळणारी आहे. १६५४ नंतर ते पोर्ट रॉयल येथेच स्थायिक झाले.
========================
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र
=======================
संकलन :-श्री सतिश दुवावार, चंद्रपूर

------------------------------------------------

18 जून


------------------------------------------------
*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*

*🌸झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी🌸*

लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ - जून १८, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या; हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.
*🌸बालपण*
लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मनिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.

 *🌸व्यक्तिमत्त्व *
धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत धोंडोपंत बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे आणि जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातही प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.

लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले.

इ.स. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मी असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.

दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली.

गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इ.स. १८५३ मध्ये गंगाधररावांचे निधन झाले.

*🌸झाशी संस्थान खालसा*
ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देण्याचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या.

परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, इ.स. १८५४ रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने मी माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.

झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.


*🌸इ.स. १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध*
इ.स. १८५७ चा उठाव हा संपूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकारसूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षित भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकुरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले; राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणाऱ्या हजार-दीड हजार गरिबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणाऱ्या राणीने गोवध बंदी केली. त्यांनी किल्ल्यावर रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम केले.

अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले.

दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणीस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.

उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणाऱ्याया ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज भवानीशंकर, कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. घौसखान याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष.

शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.

राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला व तो अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’

या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १८ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणाऱ्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणाऱ्या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरुषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाहीत. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.

*🌸विशेष *
ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख `’हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क' असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्ये, पोवाडे रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंचे विचार आजच्या काळातही खूप प्रेरणादायी आहेत. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधीस्थानावर इ.स. १९६२ मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. ते समाधीस्थान पाहिल्यानंतर कविवर्य भा. रा. तांबे यांनी पुढील यथार्थ ओळी सुचल्या. ``* रे हिंद बांधवा, थांब या स्थळी। अश्रू दोन ढाळी।।
ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशिवाली।।

खूब लड़ी मर्दानी वो तो झॉंसी वाली रानी थी। ..कवयित्री : सुभद्रा कुमारी चौहान

*झाशीच्या राणीवर लिहिली गेलेली ऐतिहासिक पुस्तके, कादंबऱ्या, काव्ये, चरित्रे, चित्रपट, नाटके*
The Queen of Jhansi (मूळ इंग्रजी. लेखिका महाश्वेता देवी) हिंदी भाषांतर : सागरी सेनगुप्ता व मंदिरा सेनगुप्ता
खूब लड़ी मर्दानी : झांसी की रानी (हिंदी दूरचित्रवाणी मालिका, २०१९; प्रमुख भूमिका - अनुष्का सेन, विकास माणकताला)
झाशी : १८५७ - लेखक अविनाश वासुदेव पुराणिक
झॉंसीकी रानी : दूरचित्रवाणीवरील मालिका. हिचे १८-८-२००९ ते १९-६-२०११ या काळात ४८० भाग (एपिसोड्‌स) प्रसारित झाले होते.
झाशीची रणचंडी : कादंबरी : लेखक पोपटराव भसे
झाशीची राणी, ताराबाई मोडक, माधव जुलियन - चरित्रे तीन पुस्तके एकत्रित (ललितकला शुक्ल, १९९६)
झाशीची राणी लक्ष्मीबाई : लेखक दा.वि. कुलकर्णी
झाशीची राणी लक्ष्मीबाई : लेखक वि.श्री. जोशी
झाशीची राणी लक्ष्मीबाई’ : लेखक म.स. भावे
झाशीची राणी लक्ष्मीबाई : लेखिका प्रतिभा रानडे
झाशीची राणी लक्ष्मीबाई : लेखक वृंदावनलाल वर्मा
झाशीची वाघीण : लेखक भास्कर महाजन
झाशी राणी लक्ष्मीबाई : हिंदी पु्स्तक. लेखक : रामप्रसाद एन.एस.
झाशीची राणी : झाशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब ह्यांचे चरित्र : लेखक दत्तात्रेय बळवंत पारसनीस
मर्दानी : झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या जीवनावरील कादंबरी, लेखक : विद्याधर गोखले
मर्दानी रणरागिणी ... : आत्मकथा स्वरूपातील ललित पुस्तक, लेखिका मंदा खापरे
मनकर्णिका - दि क्वीन ऑफ झाशी (हिंदी चित्रपट, २०१७, दिग्दर्शक - केतन मेहता). या चित्रपटात अतुल कुलकर्णी यांनी तात्या टोपेंचे काम केले आहे.
स्वोर्ड्‌स ॲन्ड स्केप्टर्स (हाॅलिवूडचा इंग्रजी चित्रपट, २०१८) (लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत, इंडो-अमेरिकन अभिनेत्री देविका भिसे) (हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये निघाला आहे.)
वीज म्हणाली धरतीला (नाटक : लेखक वि.वा. शिरवाडकर)
वीरांगना लक्ष्मीबाई : हिंदी पुस्तक. लेखक : रामाश्रय सविता
समरसौदामिनी : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावरील हृदयद्रावक कादंबरी, लेखक भा.द. खेर
सोहराब मोदी यांनी इ.स. १९५६ मध्ये 'झॉंसी की रानी' नावाचा भव्य हिंदी चित्रपट काढला होता. त्यात झाशीच्या राणीचे काम मोदी यांची पत्‍नी मेहताब हिने केले होते. हा भारतात बनलेला पहिला रंगीत (टेक्निकलर) चित्रपट होता.

*🌸लक्ष्मीबाईंचे पुतळे*
♻️ग्वाल्हेर येथील समाधीस्थानावर
 ♻️नवी दिल्ली येथे 'रानी झांसी रोड आणि देशबंधु गुप्ता मार्ग' यांनी बनलेल्या चौकात.
पुण्यात संभाजी उद्यानाजवळ (जंगली महाराज रोड)पुणे
 ♻️नागपूर येथे झॉंशी रानी चौकात बर्डी मार्ग येथे झॉंशीच्या रानी चा पुतळा आहे
 ♻️कोल्हापूर येथील कावळा नाका येथे भव्य पुतळा
========================

17 जून

लोकसत्ता कुतूहल

🎯 *वाळवंटीकरण प्रतिरोध-दिन*

वाळवंट म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठभागावरील अतिकोरडा आणि अतिशय कमी पर्जन्यमान असलेला प्रदेश की जेथे वनस्पती व प्राणीजीवन अत्यंत विरळ असते. सामान्यपणे शुष्क, ओसाड, वालुकामय भूमीला वाळवंट म्हणून ओळखले जात असले, तरी तांत्रिकदृष्टय़ा वसाहतीच्या दृष्टीने अतिथंड प्रदेशांचाही यात समावेश केला जातो. उष्ण वाळवंटी प्रदेशांनी पृथ्वीच्या भूभागापैकी १८ टक्के, तर थंड वाळवंटांनी १६ टक्के भाग व्यापलेला आहे. बदलते हवामान, जैवविविधतेचा ऱ्हास यांबरोबर वाळवंटी व दुष्काळी क्षेत्रांची वाढ हीदेखील चिंतेची बाब बनली आहे. संयुक्त राष्ट्रांनी या संदर्भात १९९२ साली रिओ दि जानिरो येथे झालेल्या वसुंधरा परिषदेत (‘अर्थ समिट’मध्ये) ठराव मांडला आणि १९९४ मध्ये त्याला संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळून ‘यूएनसीसीडी’ (संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिरोधक कार्यक्रम) मार्फत त्याची अंमलबजावणी सुरू झाली. यानिमित्ताने दरवर्षी १७ जून हा दिवस ‘जागतिक वाळवंटीकरण प्रतिरोध दिन’ म्हणून जगभर पाळला जातो.

जमिनीची धूप होणे तसेच कस कमी होणे, बदलते हवामान, वाढते वाळवंटीकरण, स्थानिक मर्यादा व गरजा अशांसारख्या मुद्दय़ांचा दुष्काळी स्थितीशी असलेला संबंध ‘यूएनसीसीडी’कडून अभ्यासला जातो. विकासाची पर्यावरणविरोधी संकल्पना बदलून शाश्वत विकास, स्थानिकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे, जमिनीचा योग्य वापर, शेतीची नवी तंत्रे अशा बाबी स्वीकारल्यानेही वाढत्या वाळवंटीकरणाचा सामना करता येईल.

या वर्षीच्या ‘जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिरोध दिना’ची संकल्पना आहे ‘मानवासाठी अन्न, पशुधनासाठी खाद्य आणि पुन्हा मानवासाठी वस्त्र’ या गरजा भागविण्यासाठी शाश्वत विकास आणि वापर. दिवसेंदिवस जगाच्या वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी जंगलतोड करून शेतजमीन मिळवावी लागत आहे. त्यामुळे २०३०पर्यंत अन्न उत्पादनास अतिरिक्त ३०० दशलक्ष हेक्टर जमीन लागेल असा अंदाज आहे. सन २०५० पर्यंत दहा अब्ज लोकांच्या गरजा भागविण्यासाठी  जमिनीची उत्पादकता वाढवणे, आपली जीवनशैली बदलणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण व कमी वापर करणे आवश्यक आहे. जंगलतोड हा यावर उपाय नाही. त्यामुळे पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. या  दिनानिमित्ताने निरनिराळे उपक्रम राबविले जाऊन समाजात याबाबत जागरूकता निर्माण केली जाते.
🖊 *शुभदा वक्टे*
मराठी विज्ञान परिषद

17 जून


*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*
               *17 जून*
*🌍जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन🌍*

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापुराने लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे, तर मराठवाडय़ात पावसाअभावी पाण्याची टंचाई आहे. एकाच वेळी ओला व कोरडा दुष्काळ महाराष्ट्राला सहन करावा लागत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र हे विकसित राज्य आहे; पण पूर आणि दुष्काळामुळे होत असलेल्या वा अपेक्षित विकासात नैसर्गिक आणि मानवी हस्तक्षेप बाधा आणत आहेत. ही स्थिती जगभर पाहायला मिळते आहे. छोटय़ा, गरीब आणि विकसनशील देशांना या आपत्तीच्या आर्थिक फटक्यातून सावरणे कठीण होऊन बसले आहे..

जैवविविधतेचा ऱ्हास, पर्यावरणीय बदल आणि सुपीक जमिनींचा नाश हे तिन्ही घटक आर्थिक आणि सामाजिक विकास रोखण्याचे काम करत आहेत. पर्यावरणीय बदलांमुळे विकसित देश घाबरलेले आहेत. त्यांच्या औद्योगिकीकरणाच्या वेगामुळे पृथ्वीवरील तापमान वाढू लागले असून, आता ते नियंत्रित करण्याला प्राधान्य दिले जात आहे. औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेपूर्वी पृथ्वीचे तापमान जितके होते त्यापेक्षा दीड अंश सेल्सिअसपर्यंत ते वाढू देण्यावर सहमती होत असली तरी अमेरिकेसारखे देश ही जबाबदारी स्वत: न घेता भारत-चीन यांसारख्या विकसनशील देशांवर टाकत आहेत. विकसनशील देशांसाठी आता महत्त्वाचे ठरू लागले आहे ते जैवविविधतेचा ऱ्हास रोखणे. पण सुपीक जमिनीच्या होत असलेल्या ऱ्हासाकडे विकसित देश फारसे गांभीर्याने पाहत नाहीत असे दिसते. १९९२ मध्ये रिओ परिषदेत पर्यावरणीय बदलाचा अजेंडा प्रमुख ठरला होता. छोटय़ा आणि विकसनशील देशांच्या आग्रहामुळे सुपीक जमिनीच्या ऱ्हासाचा मुद्दा उपस्थित केला गेला आणि त्यानंतर ‘यूएनसीसीडी’ची स्थापना करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर जशी पर्यावरणाची चर्चा होते तशी ती जमिनींबाबत व्हावी यासाठी हे नवे व्यासपीठ तयार केले गेले. हे व्यासपीठ म्हणजे ‘युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन’ (यूएनसीसीडी)!


डेझर्टिफिकेशन म्हणजे सुपीक जमिनींचे वाळवंटात रूपांतर होणे. या जमिनी नापीक होणे. जमिनीतील कस निघून गेल्यामुळे शेतीसाठी त्या जमिनीची उपयुक्तता संपणे. जमिनीचा ऱ्हास होणे. जंगलतोड होणे. जमिनीची धूप होणे. हे जमिनीचे वाळवंटीकरण पर्यावरणातील बदलांमुळे आणि मानवी कृत्यांमुळे झालेले आहे. परिणामी दुष्काळ वाढताहेत. शेतीचे उत्पादन कमी होत आहे. सुपीक जमीन आणि पाण्याअभावी स्थानिक संघर्ष वाढत आहेत. भूकबळींचे प्रमाण वाढले आहे. अर्धभुकेल्या लोकांची संख्या वाढू लागली आहे. रोजगार कमी झाल्याने उपजीविकेसाठी स्थलांतरेही वाढली आहेत. जगभर अशांततेत भर पडली आहे. त्याचा दबाब आता युरोप आणि अमेरिकेसारख्या विकसित देशांना जाणवू लागला आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे ती पर्यावरणीय बदल रोखण्याच्या प्रक्रियेत ‘यूएनसीसीडी’ला मुख्य धारेत आणण्याची!

दिल्लीत ‘यूएनसीसीडी’ची १४ वी परिषदेत ‘यूएनसीसीडी’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर दिली जाणारी सावत्रपणाची वागणूक कशी थांबवता येईल यावर प्रामुख्याने विचार झाला. उच्चस्तरीय बैठकीच्या उद्घाटनाच्या भाषणात सेंट विन्सेंट या कॅरेबियातील छोटय़ा देशाचे पंतप्रधान डॉ. रॉल्फ गोन्सालवीस यांनी ‘यूएनसीसीडी’ला मुख्य धारेत आणण्याचा मुद्दा उपस्थित केला. जमिनीचे वाढते वाळवंटीकरण रोखायचे असेल आणि नापीक जमिनी पुन्हा सुपीक करायच्या असतील तर मोठय़ा प्रमाणावर निधी लागेल. हा निधी प्रत्येक देश आपापल्या क्षमतेनुसार उभा करील. पण ते पुरेसे नाही. छोटय़ा अर्थव्यवस्थांना निधी उभारणे शक्यही नाही. त्याकरता या निधीसाठी विकसित देशांवर संवादातून दबाव वाढवावा लागेल. शिवाय खासगी क्षेत्रालाही यात सहभागी करून घ्यावे लागेल. सार्वजनिक आणि खासगी समन्वय कसा साधता येईल यावर यूएनसीसीडीचे महासचिव इब्राहिम थिओं यांनी भर दिला. खासगी क्षेत्रातून नवनव्या पद्धतीने निधीउभारणी करता येऊ शकते. खासगी कंपन्यांच्या सहभागातून संयुक्त राष्ट्रांनी काढलेल्या कर्जरोख्यांना मिळालेला प्रतिसाद याची साक्ष देतो, असे संयुक्त राष्ट्रांच्या उप महासचिव अमिना महम्मद यांनी स्पष्ट केले. थिओं, अमिना आणि गोन्सालवीस यांच्या भाषणांमधील सारांशामधून दिल्ली परिषदेचा उद्देश आणि गाभा विशद होतो.

जमीन सुधारात खासगी गुंतवणूकही हवी!

इब्राहिम थिओं, महासचिव, यूएनसीसीडी

‘यूएनसीसीडी’च्या एका कर्मचारी जोडप्याच्या घरात चिमुकली जन्मली आहे. या चिमुकलीचे भविष्य फक्त तिच्या पालकांच्या हातात नाही, तर ते संपूर्ण मनुष्यजातीच्या हातात आहे. या नवजात बालकासह जगभरात आज जन्माला आलेल्या मुलामुलींना २५ वर्षांनंतर सुरक्षित, उज्ज्वल, न्याय्य जग द्यायचे असेल तर तसे प्रयत्न करावे लागतील. जगभर अधिकाधिक सुपीक जमीन पुन्हा प्रस्थापित करणे हा त्या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग आहे आणि हेच ‘यूएनसीसीडी’चे उद्दिष्ट आहे. ‘संयुक्त राष्ट्रां’चे तत्कालीन महासचिव कोपी अन्नान यांनी अफगाणिस्तानातील मुलींनादेखील विकसित देशांतील मुलींइतकीच जगण्याची संधी मिळाली पाहिजे असे मत मांडले होते. पण वीस वर्षांनंतरही तिथल्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. हवामानातील बदल, जमीन आणि जैववैविध्यता यांचा एकमेकांशी अनन्यसाधारण संबंध आहे. या तिघांचे होणारे नुकसान मानवी जगण्यावर विपरित परिणाम करत आहे. पण ही स्थिती अधिक बिघडू द्यायची की त्यात सुधारणा करायची, हे आपल्या हातात आहे. पर्यावरण- बदलांसंदर्भातील चर्चा पुन्हा रुळावर आणण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत यावर विचारविनिमय होत आहे. पण ‘कॉप’ दिल्लीतील ‘यूएनसीसीडी’च्या या बैठकीत जगभरातील जमीन सुपीक बनविण्यासाठीची प्रक्रिया अधिक वेगाने आणि व्यापक पातळीवर कशी घडवून आणता येईल यावर लक्ष केंद्रित केले गेले. त्याकरता निव्वळ सार्वजनिक गुंतवणूक पुरेशी नाही, तर मोठय़ा प्रमाणावर खासगी गुंतवणूकही वाढवावी लागेल. यासाठी काय करावे लागेल, हेही ठरवावे लागेल. खासगी गुंतवणूक याचा अर्थ जमिनींचे खासगीकरण नव्हे! जमीन पुन्हा वापरायोग्य बनवण्यातून आर्थिकच नव्हे, तर सामाजिक लाभही मिळणार आहेत. त्यातून ऊर्जा, माहिती-तंत्रज्ञान, पर्यटन, शेती अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठी रोजगारनिर्मिती होऊ शकते. छोटय़ात छोटी गुंतवणूकदेखील रोजगार, उत्पन्न आणि आर्थिक विकासाचे चक्र पुढे नेणारी असते. उदा. २०३० पर्यंत ३५० दशलक्ष हेक्टर नापीक जमीन सुपीक केली तर त्यातून निर्माण झालेल्या पर्यावरणीय सेवांमधून तब्बल नऊ ट्रिलियन डॉलर्स निर्माण होऊ शकतात. शिवाय २६ गिगा टन ग्रीनहाऊस गॅसेस कमी होतील. पण या मोठय़ा आकडय़ांचा प्रत्यक्षात अर्थ काय? छोटय़ा छोटय़ा देशांमधील शेतकरी, मेंढपाळांसाठी त्यांची पारंपरिक जमीन कसण्यासाठी परत मिळेल. त्यातून त्यांना नियमित उत्पन्न मिळू लागेल. परिणामी ठिकठिकाणचे मानवी संघर्ष कमी होतील. भारत, चीन, श्रीलंका या देशांतील चहांचे मळे वाचू शकतील.  मळ्यांतले उत्पादन वाढेल. मादागास्करमधील भाताचे उत्पादन ४० टक्क्य़ांनी वाढेल.

या जमीन सुधाराचे सामाजिक परिणाम काय होतील? अनेक देशांमध्ये महिला शेतीप्रक्रियेत सहभागी झालेल्या असतात; त्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. त्यांना जमिनीचा मालकी हक्क मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. पिण्याचे पाणी आणण्यासाठी करावी लागणारी मैलोन् मैल वणवण कमी होईल. जमीन सुधारासाठी खासगी गुंतवणूक तर लागेलच; पण ही सुधार प्रक्रिया अमलात आणण्यासाठी विविध देशांची केंद्रीय सरकारे, स्थानिक सरकारे, स्थानिक जनसमूह, बिगर- सरकारी संघटना, शास्त्रज्ञ, संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्था अशा सगळ्याच स्तरांवर एकत्रित प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यातून जमीन सुधार प्रक्रियेचा वेग अनेक पटीने वाढवता येऊ शकेल. ‘कॉप’अंतर्गत महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे. लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देशांनी ‘२०२० लक्ष्य’ आखले आहे. आफ्रिकेत ‘हरित भिंत’ (ग्रेट ग्रीन वॉल) उभी राहत आहे. चीन आणि भारताने हरित कवच विस्तारण्याच्या लक्ष्यातही वाढ केली आहे. जगभरात दर मिनिटाला २५० नवजात बालके जन्माला येतात. त्या प्रत्येक बालकास विकास होण्यासाठी समान संधी मिळाली पाहिजे. पर्यावरणातील बदल, दुष्काळ, गरिबी, असमान विकास यांतून जगभर वाढत असलेली अशांतता कमी करायची असेल तर जमीन सुधार हा त्याकरता एक प्रमुख पर्याय असू शकतो.

जमीन सुधार आराखडय़ावर निव्वळ चर्चा आणि देवाणघेवाणच नव्हे, तर प्रत्येक देशात त्याची अंमलबजावणी कशी होऊ शकेल याचा विचार गांभीर्याने करावा लागेल. जमीन जितकी निकृष्ट होत जाईल, तितक्या जास्त प्रमाणात हरित वायूचे उत्सर्जन वाढते. जंगलतोड, नापीक जमिनीमुळे जगातील निम्म्या लोकसंख्येवर आर्थिक, सामाजिक आणि आरोग्याच्या दृष्टीने विपरित परिणाम झालेला आहे. त्यामुळे सुपीक जमीन वाचवणे व ती वाढवण्याशिवाय आपल्या हाती दुसरा पर्यायच उरलेला नाही. जमिनीच्या नापिकीमुळे दरवर्षी जागतिक विकासदरातील वाढ दहा टक्क्य़ांनी कमी होत आहे. ठिकठिकाणी हिंसक संघर्ष आणि बळजबरीने होणारी स्थलांतरे वाढली आहेत. त्याचा थेट परिणाम महिला व बालकांवरच होतो. दुष्काळामुळे जर्मनीतील औद्योगिक उत्पादन घटले आहे. अमेरिकेतही नापिकीमुळे दरवर्षी ४४ अब्ज डॉलरचे नुकसान होत आहे. अ‍ॅमेझॉनसारख्या जंगलांना लागणाऱ्या आगींपासून पश्चिम आशियाई देशांमध्ये वाढलेली वाळूंची वादळे अशा दुर्घटनांमुळे लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. जमिनीचे जितके नुकसान होते, त्याचा तितकाच मोठा फटका माणसांना बसतो. जमीन सुधारासाठी तीन उपाय करावे लागतील. एक- आपल्याला स्वतपुरतेच बघण्याची वृत्ती सोडून द्यावी लागेल. ८२० दशलक्ष लोकांना एका दिवसाचे पुरेसे अन्न मिळत नाही. त्यासाठी १५० दशलक्ष हेक्टर शेतजमीन पुन्हा सुपीक बनवली तर दरवर्षी आणखी २०० दशलक्ष लोकांचे पोट भरू शकेल. तसेच छोटय़ा शेतकऱ्यांचे उत्पन्न ३० अब्ज डॉलरने वाढू शकेल. दरवर्षी दोन गिगा टन हरित वायूंचे उत्सर्जन कमी होईल. दोन- नैसर्गिक संसाधनांचा वापर काटेकोरपणे केला पाहिजे. संयुक्त राष्ट्रांच्या ‘ग्लोबल कॉम्पॅक्ट’ आणि इटालियन कंपनीने काढलेल्या कर्जरोख्यांतून १.५ अब्ज डॉलर उभे राहिले. कर्जरोख्यांची अपेक्षेपेक्षा तीन पटीने अधिक खरेदी झाली. त्यातून पर्यावरणाशी निगडीत कर्जरोख्यांची मागणी वाढत असल्याचे दिसते. अशा स्वरूपाच्या कर्जरोखे विक्रीत जगातील अन्य कंपन्यांनीही सहभागी व्हायला हवे. जमीन सुधारासाठी कर्जरोख्यांमुळे पैसे उभे राहत असले तरी नापीक जमिनींमुळे दरवर्षी ट्रिलियन डॉलरचे नुकसान होते, हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे छोटय़ा देशांमध्ये आर्थिक गुंतवणुकीची नितांत गरज आहे. तीन- जमीन सुधारासाठी नवनवी भागीदारी व प्रत्येक देशाचे स्वतचे प्रयत्न आवश्यक ठरतात. जमीन सुधाराचे लक्ष्य काय असायला हवे, यावर चर्चा करण्यात पुढील दहा वर्षे वाया घालवणे आपल्याला परवडणारे नाही. तापमानातील वाढ दोन टक्क्य़ांपेक्षा कमी कशी राहील, यावर न्यूयॉर्कमध्ये दोन आठवडय़ांनी होणाऱ्या पर्यावरणीय बैठकीत पुन्हा चर्चा होणार आहे. त्यामुळे जमीन सुधारासाठी काय करता येईल हे ठरवण्यासाठीदेखील आपल्याकडे तितकाच काळ हाताशी आहे. त्यादृष्टीने दिल्लीतील ही परिषद महत्त्वाची आहे.

विकसित देशांनी गंगाजळी उघडलीच पाहिजे! 

डॉ. रॉल्फ गोन्सालवीस, पंतप्रधान, सेंट विन्सेंट

जैवविविधतेचा ऱ्हास, पर्यावरणीय बदल आणि सुपीक जमिनीची नासाडी या तीनही बाबी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत आणि एकमेकांवर विपरित परिणाम करीत आहेत. या तिन्ही घटकांवर एकत्रितपणे उपाययोजना करणे गरजेचे आहे. तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर जमीन सुधारासाठी उभ्या केलेल्या ‘यूएनसीसीडी’ला अनावश्यक आणि परकेपणाचीच वागणूक दिली जात आहे. ‘यूनसीसीडी’ला अनौरस अपत्य मानले गेल्यामुळे त्याच्या वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे जमीन सुधाराचे लक्ष्य गाठणे कठीण होऊन बसले आहे. जमिनीचे वाळवंटीकरण, अन्नधान्य उत्पादन, पाण्याचे स्रोत, ऊर्जानिर्मिती, वस्त्रपुरवठा, निवारा या जगण्याच्या अत्यावश्यक गरजांवर या गोष्टी परिणाम करत आहेत आणि हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळे जागतिक स्तरावर विविध पर्यावरणीय ऱ्हास रोखण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांच्या मध्यभागी आता ‘यूएनसीसीडी’ला आणले गेले पाहिजे. ‘यूएनसीसीडी’ हा साइड शो नव्हे! गरिबी निर्मूलन, पायाभूत सुविधांचा विकास, जंगलांची आग आणि जंगलतोडीला प्रतिबंध, टिकाऊ शेती, किनारपट्टींचा ऱ्हास रोखणे, प्रदूषण नियंत्रण, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करणे, विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षणातून मनुष्यबळ विकास या सगळ्यासाठी मोठा निधी लागणार आहे. छोटे आर्थिक उत्पन्न असणाऱ्या आणि त्यातच नागरिकांचे कसेबसे पोट भरू शकणाऱ्या देशांकडून हा निधी येणार नाही. ज्या देशांचा कधीकाळी आत्ताच्या गरीब देशांशी संबंध होता अशा आर्थिकदृष्टय़ा विकसित देशांकडूनच हा निधी मिळायला हवा. वसाहतवाद आणि साम्राज्यवादामुळे शोषण झालेल्या देशांकडून ही अपेक्षा धरणे चुकीचे ठरेल. यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांसारख्या व्यासपीठावर विकसित देशांशी संघर्ष नव्हे, पण निदान संवाद करणे अपेक्षित आहे. विकसित देशांनी याकरता केवळ भाकरीचा तुकडा टाकू नये. त्यांनी जमिनीचा ऱ्हास रोखण्यासाठी निधी पुरवण्यात मोठा वाटा उचलायलाच हवा. उत्तर आफ्रिकेतील घडामोडींमुळे युरोपात स्थलांतर आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनतो. त्यामुळे जमिनीशी निगडीत समस्या सगळ्याच देशांवर.. अगदी विकसित देशांवरदेखील परिणाम करणारी ठरते. हैती हा कॅरेबियन बेटांवरील एक छोटा देश आहे. पण जमिनीचे वाळवंटीकरण, किनाऱ्यांचा ऱ्हास यामुळे हा देश गरिबीच्या दुष्टचक्रात अडकला आहे. मात्र, त्यांच्या या स्थितीला फक्त देशवासीच जबाबदार नाहीत. हैती स्वतंत्र होताना फ्रान्सने वसाहतवादी अटीही लादल्या. त्याची शंभर वर्षे परतफेड करता करता हैती गरिबीत अडकला. हे वास्तव कसे नाकारता येईल? वसाहतवादाच्या ‘ऐतिहासिक चुका’ सुधारायच्या असतील तर विकसित देशांचे सहकार्य मिळाले पाहिजे. विकसित देशांमुळे छोटय़ा देशांचे नुकसान झाले आहे. पण त्याची किंमत न चुकवता सवलती आणि मदतनिधी देऊन छोटय़ा देशांची बोळवण केली जात आहे. तेव्हा या शक्तिशाली देशांच्या दूरदृष्टी नसलेल्या नेतृत्वाला वास्तव स्वीकारायला भाग पाडले पाहिजे. हे नेतृत्व आपल्याकडे दुर्लक्ष करणार नाही याची खबरदारी घेतलीच पाहिजे.
========================

16 जून


         
*चार्ल्स स्टर्ट*

      मृत्यू 16 जून

 (२८ एप्रिल, इ.स. १७९५ - १६ जून, इ.स. १८६९) 
चार्ल्स स्टर्ट हा ऑस्ट्रेलियाचे मूलभूत सर्वेक्षण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या मध्यभागात शोधमोहिमा काढणारा संशोधक होता. याने ऑस्ट्रेलियातील डार्लिंग नदीचा शोध लावला.

*परिचय*
स्टर्टचे वडील थॉमस स्टर्ट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत न्यायाधीश म्हणून नोकरीला होते. त्यांची नेमणूक ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतात असताना बंगालमध्येच चार्ल्स स्टर्टचा जन्म २८ एप्रिल, इ.स. १७९५ साली झाला.बालपणातील पहिले पाच वर्ष बंगालमध्ये काढल्यावर वयाच्या पाचव्या वर्षी त्याला शिक्षणासाठी नातेवाईकांकडे इंग्लंडला पाठविण्यात आले. शिक्षण पूर्ण झाल्यावर इ.स. १८१३ साली तो लष्करात भरती झाला. लष्करात कॅप्टन या पदावर काम करीत असताना कैद्यांना ऑस्ट्रेलियाला नेण्याच्या कामावर त्याची नेमणूक झाली. इ.स. १८३३ साली चार्ल्स स्टर्ट ऑस्ट्रेलियाचा सर्व्हेअर जनरल बनला.

*मोहिमा *

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या मध्यभागी एखादा मोठा समुद्र असावा असे मानले जात होते. याचा शोध घेण्यासाठी न्यू साउथ वेल्सचा गव्हर्नर सर राल्फ डार्लिंग याने ४ नोव्हेंबर, इ.स. १८२८ रोजी स्टर्टने पाठविलेला प्रस्ताव मंजूर करुन त्याला मोहिम काढण्यास परवानगी दिली व त्या मोहिमेचे नेतृत्व चार्ल्सकडेच सोपविण्यात आले. या मोहिमेदरम्यान चार्ल्स आणि त्याचा सहकारी हॅमिल्टन ह्यूम यांनी मॅक्वायर नदीतून प्रवास केला. मॅक्वायर नदीतून प्रवास केल्यावर पुढे त्यांना दलदलीचा मोठा प्रदेश लागला. हा दलदलीचा प्रदेश ओलांडल्यानंतर एका मोठ्या नदीचा त्यांना शोध लागला. न्यू साउथ वेल्सचा गव्हर्नर डार्लिंगच्या नावावरुन स्टर्टने या नदीला डार्लिंग असे नाव दिले.

इ.स. १८३० साली स्टर्टने दुसरी मोहिम काढली. यावेळेस त्याने जॉर्ज मेकॉलेसोबत डार्लिंग नदीला मिळणार्या मुर्हे या नदीतून ६५० किलोमीटरचा प्रवास केला. मुर्हे नदीच्या मुखापाशी त्यांना एका मोठ्या जलाशयाचा शोध लागला. या जलाशयाला स्टर्टने लेक अलेक्झांड्रीना असे नाव दिले.

इ.स. १८४४-४६ दरम्यान चार्ल्स स्टर्टने ॲडिलेडहून उत्तरेकडे मोहिम काढली. यावेळी तो मिलपरीन्का भाग ओलांडून सिम्पसन वाळवंटात पोहोचला. या कामासाठी 'रॉयल जिओग्राफीकल सोसायटी'ने सुवर्णपदक देऊन त्याचा सन्मान केला.
========================

16 जून

*एल्मर अ‍ॅम्ब्रोज स्पेरी*

*जायरोकंपास (gyrocompass) चा शोध*

*स्मृतिदिन - १६ जुन १९३०*

एल्मर अ‍ॅम्ब्रोज स्पेरी हे आधुनिक नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा जनक" म्हणून ओळखले जात असे. ते 'स्पेरी जायरोस्कोप कंपनीचे संस्थापक होते.

स्पायरीचे कंपास आणि स्टेबिलायझर्स युनायटेड स्टेट्स नेव्हीने स्वीकारले आणि दोन्ही जागतिक युद्धांमध्ये वापरले.

होकायंत्र ज्यावेळी स्थिर राहू शकत नाही, हेलकावे, वळणे, हिंदकळणे यांमुळे त्याचा लोहचुंबक दिशा नीट दाखवायला जेव्हा असमर्थ ठरू लागतो, त्या वेळी जाइरोस्कोप वापरावा लागतो. जमिनीला समांतर स्वरूपात होकायंत्र स्थिर असेल, तेव्हा त्यावरून नेमकी दिशा ज्ञात करून घेता येते. पण पाण्यावर जेव्हा एखादे जहाज वादळात सापडून सतत हेलकावू लागते, तेव्हा आपण पकडलेली दिशा कोणती, असा प्रश्न उद्भवतो. अशीच काहीशी स्थिती विमानात येते.
जायरोस्कोप म्हणजे एक जड, स्वतःभोवती फिरणारे चक्रच असते. एका विशिष्ट अक्षाभोवती हे चक्र अत्यंत वेगाने फिरू शकते. या अक्षाची दिशा त्याभोवती असलेल्या मोजपट्टीवर पाहिजे त्या ठिकाणी स्थिर करून मग हे चक्र फिरवायला सुरुवात करतात. थोडक्यात म्हणजे होकायंत्रावरून प्रवासाचे अक्षांश रेखांश पक्के ठरले की सुकाणूची दिशा पकडण्यासाठी जायरोस्कोप स्थिर करून त्याचे चक्र फिरवायला सुरुवात केली जाते. एकदा का चक्र वेगाने फिरू लागले की, याची दिशा हलवणे व त्याचा फिरणारा चक्राचा पृष्ठभाग अक्ष बदलून फिरणे ही जवळपास न होणारी गोष्ट बनते.
चक्राने घेतलेला स्वतः भोवतीचा वेग केंद्रीभूत होऊन अशी काही अक्षाभोवती पकड घेतो की ती पकड हलणे व्यवहारत: अशक्य असते. यालाच जायरोस्कोपिक इनर्शिया' किंवा 'जडत्व' असे म्हणतात. यासाठी एकाच गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे चक्राचा फिरण्याचा वेग अबाधित राखणे. हा वेग जर काही कारणाने कमी होऊ लागला, तर मात्र ज्या आधारावर जायरोस्कोप उभा केलेला, आधारलेला असतो, त्यालाच तो संथपणे गोलाकार फेरी घालू लागतो.

 जायरोस्कोपचा वापर होकायंत्राच्या जोडीला सर्व प्रकारच्या लांब पल्ल्याच्या जल व हवेतील प्रवासासाठी केला जातो. होकायंत्र वाचणे व त्याचा वापर करणे हे तल्लख खलाशाचे व अधिकाऱ्याचे काम; पण या ऐवजी जाइरोस्कोप दाखवेल ती दिशा पकडणे ही मात्र कोणाही माणसाला जमणारी गोष्ट असू शकते. हाही महत्त्वाचा उपयोग नाही काय ? 
अंतराळ प्रवासात होकायंत्र बिनकामी ठरते; पण जाइरोस्कोप वापरता येतो.


15 जून


*१५ जून १७५२*

*वैज्ञानिक बेंजामिन फ्रँकलिनने आकाशातील वीज ही वीज असल्याचे सिद्ध केले*

बेंजामिन फ्रैंकलिन हे संशोधक, वैज्ञानिक, राजकीय विचारक, राजकारणी, लेखक, व्यंगकार होते. बेंजामिन फ्रैंकलिन यांनी संयुक्त राष्ट्रांचे प्रारुप आणि संविधान बनविण्यासाठी सहाय्य केले. तसेच  वैज्ञानिक कार्यामध्ये  इलेक्ट्रिसिटी, गणित आणि नकाशे बनवणे सामील आहेत. बेंजामिन फ्रैंकलिन सारखे लेखक आपल्या बुद्धी आणि ज्ञानामुळे आळखले जातात. त्यांनी रिचड्स यांचे अल्मनैक प्रसिद्ध केले. त्यांनी बायोफोकल ग्लास चा शोध लावला आणि पहिली यशस्वी अमेरिकन लेंडींग लायब्ररी ची स्थापना केली.

अमेरिकन इतिहासातील एक मोठे मिथक म्हणून आजही ज्याची नोंद आहे, ते म्हणजे बेंजामिन फ्रॅंकलिन आणि त्यांचा  पतंग. शाळेच्या पुस्तकातून आपण वाचत आलो, की बेन्जामिन महाशय एकदा बाहेर पडले असतांना, अचानक आलेल्या भर वादळात त्यांनी आपला पतंग उडवला आणि त्या पतंगावर वीज कोसळली. अशा प्रकारे बेंजामिन यांनी अपघाताने का होईना, विजेचा शोध लावला.

जर ती वीज खरोखरच त्या पतंगावर पडली असती, तर आमचे बेंजामिन महाशय त्यानंतर झालेल्या अमेरिकेच्या ऐतिहासिक स्वातंत्र्य जाहीरनाम्यावर सही करण्यास उपस्थित राहू शकले नसते. एवढेच नव्हे १७३२ ते १७५८ या काळात दर वर्षी प्रसिद्ध होणारे Poor Richard’s Almanac हे बेंजामिन यांनी टोपण नावाने लिहिलेले पंचांगही निघाले नसते. स्पष्ट म्हणायचे झाले तर त्या वादळी हवामानात पतंग उडवण्यातून त्यांचा वेडेपणा दिसून आला असता.

गंमत म्हणजे अशा प्रकारचा विजेचा प्रयोग करू पाहाणारा बेंजामिन हे काही पहिलेच शोधक नव्हते. आणि या संबंधातील सत्य काय ते काळजीपूर्वक तपासले असता असे आढळून आले की बेंजामिन यांच्या कोणत्याही खासगी डायरीत आपल्या या पतंग उडवण्याच्या प्रयोगाची नोंद नाही. 

एक मात्र खरे की फ्रॅंकलिन यांनी एक ऑक्टोबर १७५२ रोजी लिहिलेल्या एका पत्रात पतंग कसा तयार करावा आणि वादळाच्या वेळी कसा उडवावा, याचा  बारीकसारीक तपशील दिलेला आहे. एक उत्तम शास्त्रज्ञ या नात्याने त्यांनी असा कोणताही प्रयोग केल्याचे लिहून ठेवलेले नाही. आणि तसे त्यांनी केलेही नसते. त्यांनी जे काही तोंडी वर्णन केले, ते जोसेफ प्रिस्टले या तत्कालीन नावाजलेल्या संशोधकाने लिहून घेतले होते. ही नोंद इतिहासकारांना पुरेशी आहे.