शनिवार, १४ मार्च, २०२०

ओळख भारतीय शास्त्रज्ञांची भाग 11


      *💥🌸आर्यभट्ट🌸💥*

                 आर्यभट्ट यांचे मुळ गाव बिहारमधील कुसुमनगर हे आहे ,त्यांनी प्राचीन ज्योतिष ग्रथांचे संशोधन केले आहे तसेच स्वतः अनुभव घेऊन आर्यभट्टीय या ग्रथांची रचना केली गणितशास्त्रात आणि ज्योतिषशस्त्रात हा ग्रंथ अतिशय महत्वाचा समजला जातो गीतिकापडातील श्लोकांची संख्या १३ आहे यामध्ये आकाशाचा विस्तार पृथ्वी ,चंद्र ,सूर्य ,आणि ग्रह यांची अंतरे मोजण्याची लहान मोठी मापे या तेरा श्लोकांत दिली आहे आर्यभट हे वेध घेण्यात प्रवीण होते पृथ्वी स्वतः भोवती फिरते , हे निछितपणे सांगणारे आर्यभट हे पहिलेच शास्त्र असावेत आज रूढ़ असलेले अनेक सिद्धांत त्यांनी इ.स. च्या पाचव्या शतकात सर्वप्रथम सांगितले होते त्यांच्या ग्रंथाचा प्रचार व प्रसार दक्षिण भारतात झाला १६-१७ शतका पर्यंत दक्षिण भारतात त्याचे अध्ययन आणि अध्यापन सुरु होते आजही दक्षिणेतल्या वैशनव पंथात आर्यभटाना फार मान आहे १९ एप्रिल १९७५ या दिवशी भारताने आपला पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडला त्या उपग्रहला आर्यभटांचे नाव देऊन भारताने प्राचीन संशोधकाचा गौरव केलेला आहे

अमावस्येला सूर्यग्रहण व पौर्णिमेस चंद्रग्रहण यांचा संबंध चंद्र व पृथ्वी यांच्या सावल्यांशी आहे, हे त्यांना माहीत होते. तसे त्यांनीनोंदवून ठेवले आहे. पहिला आर्यभट्ट याने सूत्रांचा उपयोग खगोलशास्र विषयक ग्रंथांत मोठ्या प्रमाणावर केला. अशा ग्रंथांत आकडेमोड द्यावी लागते परंतु मजकूर तर मुख्यत्वे काव्यमय व यमकात असतो. मग संख्या पद्यात बसवण्यासाठी त्या अक्षराने निर्दिष्ट करायच्या व ती अक्षरे वृत्तात बसवून श्लोकात लिहावयाची असा मार्ग आर्यभट्टाने अवलंबला. त्यामुळे अक्षरसंख्या कमी होते, शिवाय वृत्तबद्ध लिखाण होते. त्यावेळी लेखनाची साधने उपलब्ध नसल्याने त्या संख्या अशा प्रकारे लक्षात ठेवणेही सोपे जात असे आर्यभटाने ० अंशापासून ते ९० अंशापर्यंत ३/१११ अंशाच्या फरकाने सर्व कोन घेऊन त्यांचे ज्यार्ध कसे काढावेत हे सांगितलेले आहे. तसेच पृथ्वी स्वत:भोवती एकसारखी फिरत असते, म्हणजेच तिला दैनंदिन गती आहे हे सांगणारा पहिला शास्रन होय. वर्षाचे दिवस ३६५, घटी १५, पळे ३९, विपळे १५ इतक्या सूक्ष्म भागांपर्यंत कालमापन नोंदवून ठेवले आहे. तसेच 'पाय' नावाची गणित संकल्पनेची किंमत ६३,८३२/२०,००० आहे असेही नोंदवले आहे सूर्यसिद्धान्तावर याने लिहिलेला एक टीका ग्रंथ 'सूर्य सिद्धान्त-प्रकाश ' या नावाने प्रसिद्ध आहे.

*आर्य ग्रथाचे भाग*

(१) गीतिका पाद, (२) गणितपाद,(३) कालक्रियापाद, (४) गोलपाद.

मात्र वर्तमानकाळात त्या ग्रंथाची एकही संहिता उपलब्ध नाही असे दिसून येते. अंकगणित ,बीजगणित व भूमिति या गणिताच्या शाखांचा त्याचा सखोल अभ्यास होता. आज बीजगणितावरचा उपलब्ध जुना ग्रंथ विख्यात ज्योतिर्वेत्ता आर्यभट्ट याचा आहे. व वयाच्या तेविसाव्या वर्षीच त्याने बीजगणितावरचा आणि ज्योतिषावरचा ग्रंथ लिहिला. म्हणून आर्यभट्ट यास बीजगणिताचा जनक असे मानण्यात येते.
 💡 *संकलन:*💡
श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛
════════════════

ओळख भारतीय शास्त्रज्ञांची भाग 10


💥उडुपी रामचंद्र राव💥

*भारतीय खगोलशास्त्रज्ञ*

*जन्मदिन - १० मार्च १९३२*

उडुपी रामचंद्र राव तथा यू.आर. राव हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ होते.

यू.आर. राव यांचा जन्म कर्नाटकातील दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील अदमारू या खेड्यात झाला. म्हैसूरमधील शिक्षणानंतर त्यांनी मद्रासला विज्ञानात पदवी, बनारस विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी व गुजरात विद्यापीठातून पीएच.डी. असे शिक्षण घेतले. नंतर ते अवकाशयानांच्या अभ्यासासाठी अमेरिकेला गेले.

*कारकीर्द*

अमेरिकेतील एमआयटी संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर यू.आर राव डलास येथील टेक्सास विद्यापीठात प्राध्यापक झाले. १९६६मध्ये भारतात परत येऊन अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीत ते संशोधन करू लागले. तेथे डॉ. विक्रम साराभाई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. देशाने पहिला आर्यभट्ट हा उपग्रह सोडला तेव्हापासून त्यांची अवकाश संशोधनातील कारकीर्द सुरू झाली.

*आर्यभट्ट*

पहिला उपग्रह सोडण्याचा प्रस्ताव त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींपुढे मांडला गेला, तेव्हा त्यांनी डॉ. राव यांना विचारले, उपग्रहाला पैसे किती लागतील, त्यावर राव यांनी तीन कोटी सांगितले. इंदिरा गांधींनी लगेच होकार दिला. त्या वेळी मनमोहन सिंग नुकतेच अर्थसचिव झाले होते. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत जो पहिला प्रकल्प मंजूर केला तो आर्यभट्ट उपग्रहाचा.

*अन्य उपग्रह*

यू.आर. राव यांनी १९८४ ते १९९४ या काळात भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे नेतृत्व केले. दहा वर्षे ते अवकाश खात्याचे सचिव व इस्रोचे अध्यक्ष होते. ‘आर्यभट्ट’नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भास्कर, अ‍ॅपल, रोहिणी, इन्सॅट आदी श्रेणींचे किमान वीस उपग्रह तयार झाले.

*मंगळाची मोहीम*

भारताने ४५० कोटी रुपयांतील परवडणारी मंगळ मोहीम राबवली व फत्तेही केली. त्याच्या पडद्यामागचे सूत्रधार डॉ. रावच होते. या मंगळ मोहिमेची घोषणा मनमोहन सिंग यांनी केली तेव्हा सिंग पंतप्रधान होते.

*पुरस्कार आणि सन्मान*

वॉशिंग्टन येथील ‘सॅटेलाइट हॉल ऑफ फेम ऑफ द सोसायटी ऑफ सॅटेलाइट प्रोफेशनल्स इंटरनॅशनल’ या संस्थेत समावेश झालेले यू.आर. राव हे पहिले भारतीय आहेत. (२०१३ मध्ये)
इंटरनॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅस्ट्रॉनॉटिक्सचा थिओडोर व्हान करमान पुरस्कार
पद्मविभूषण
युरी गागारिन पुरस्कार, वगैरे.
💡 *संकलन:*💡
श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

════════════════

ओळख भारतीय शास्त्रज्ञाची भाग 9


         चंद्रशेखर वेंकट रामन

            भौतिकशास्त्रज्ञ

जन्म - ७ नोव्हेंबर १८८८

चन्द्रशेखर वेंकट रामन् (नोव्हेंबर ७, १८८८-नोव्हेंबर २१, १९७०) हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते.
सी.व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन्‌हे काही काळ बंगलोरातही होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले.रमणचे ६ मे १९०७ रोजी लोकासुंदरी अम्मल (१८९२-१९८०) बरोबर लग्न झाले होते.त्यांना चंद्रशेखर आणि रेडिओ-खगोलशास्त्रज्ञ राधाकृष्णन हे दोन पुत्र होते.रमण हे सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांचे काका होते,ज्यांना पुढे १९३१ मध्ये चंद्रशेखर मर्यादेच्या शोधासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार (१९८३) जिंकला आणि तारकीय उत्क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या अणू प्रतिक्रियेवर त्यांनी केलेल्या त्यानंतरच्या कार्यासाठी.

आयुष्यभर,रमणने दगड, खनिज पदार्थांचे विस्तृत वैयक्तिक संग्रह विकसित केले आणि मनोरंजक प्रकाश-विखुरलेल्या गुणधर्मांसह साहित्य,जे त्याने आपल्या जगातून प्राप्त केले आहे आणि भेट म्हणून.नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी तो अनेकदा लहान हाताळण्या एवढा स्पेक्ट्रोस्कोप घेऊन जात असे.

*संशोधन*
त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) या शोधासाठी ते ओळखले जातात. १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन यांना मिळाले होते.

*सन्मान आणि पुरस्कार*
चंद्रशेखर वेंकटरामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकाला प्रसिद्धीसाठी पाठवला होता.

रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून त्यांची निवड झाली त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात (१९२४) आणि किताबधारी व्यक्ती म्हणून १९२९ मध्ये.
1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक त्याने जिंकले.
1941 मध्ये त्याला फ्रँकलिन पदक देण्यात आले.
१९५४ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1957 मध्ये त्यांना लेनिन शांतता पुरस्कार देण्यात आला.1998 मध्ये, अमेरिकन केमिकल सोसायटी आणि इंडियन असोसिएशन फॉर द कल्टीवेशन ऑफ सायन्स यांनी रामनचा शोध आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक केमिकल लँडमार्क म्हणून ओळखला.
सर सी.व्ही रामन यांच्या नावाने रँचो (रिसर्चर्स ॲन्ड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन) नावाची पुण्याची संस्था इ.स. २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबरमध्ये ’सर सी.व्ही. रामन पुरस्कार’ देत असते. २०१५ सालच्या पुरस्काराचे मानकरी :
1. आदित्य आशुतोष जोशी (वैद्यकीय तंत्रज्ञान)

2. ध्रुवीन व्यास

3. गोपाळ गाढवी

४. प्राची दुबळे (आदिवासी संगीत)
५. सुधीर पालीवाला (कचरा व्यवस्थापन)
६. रमेश बोतालजी (सांडपाणी व्यवस्थापन)

मृत्यू

ऑक्टोबर १९७० च्या शेवटी,रमण त्यांच्या प्रयोगशाळेत कोसळले;त्यांच्या हृदयातील झडप वाटेने निघाले होते. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आणि डॉक्टरांनी त्यांना चार दिवस जगण्यासाठी मुदत दिली.ते वाचले आणि काही दिवसांनी त्यांनी रुग्णालयात राहण्यास नकार दिला कारण त्यांनी त्यांच्या अनुयायांनी वेढलेल्या त्यांच्या संस्थेच्या बागेमध्ये मरणे पसंत केले.

रमणच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी,त्यांनी आपल्या एका माजी विद्यार्थ्यास सांगितले,"अकादमीच्या नियतकालिकांना मरण येऊ देऊ नका,ते देशात विज्ञानाच्या गुणवत्तेचे संवेदनशील संकेतक आहेत . "ती संध्याकाळ, रमण यांनी आपल्या संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाशी भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर संस्थेच्या व्यवस्थापनासंबंधीकार्यवाही बद्दल त्यांच्याशी चर्चा केली.२१ नोव्हेंबर १९७०रोजी रमनचा दुसर्‍या दिवशी पहाटे नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला.
💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛
════════════════

ओळख भारतीय शास्त्रज्ञांची भाग 8


एम.जी.के. मेनन

   प्रसिद्ध वैज्ञानिक

जन्मदिन - २८ आगस्ट १९२८

भारतीय भौतिकविज्ञ. त्यांनी प्रामुख्याने ⇨ विश्वकिरण व ⇨ मूलकण भौतिकी या विषयांत संशोधन केलेले आहे.

मेनन यांचा जन्म मंगलोर येथे झाला. त्यांचे शिक्षण जोधपूर येथील जसवंत कॉलेज, मुंबई येथील रॉयलइन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि इंग्लंडमधील ब्रिस्टल विद्यापीठ येथे झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम्. एस्‌सी. व ब्रिस्टल विद्यापीठा ची पी. एच्. डी. या पदव्या संपादन केल्या. ते ब्रिस्टल विद्यापीठात संशोधन सहाय्यक होते (१९५२–५३). त्यानंतर त्यांनी मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या संस्थेत प्रपाठक (१९५५–५८), सहयोगी प्राध्यापक (१९५८ ६०), भौतिकी विद्यापीठात प्राध्यापक व अधिष्ठाते (१९६०–६४), वरिष्ठ प्राध्यापक व उपसंचालक (भौतिकी, १९६४–६६) आणि होमी भाभा यांच्या अपघाती निधनानंतर संस्थेचे संचालक (१९६६–७५) या पदांवर कामे केली. यांखेरीज भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी विभागाचे सचिव व इलेक्ट्रॉनिकी आयोगाचे अध्यक्ष (१९७१–७८), संरक्षण खात्याच्या संशोधन व विकासाचे सचिव आणिसंरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या महासंचालकाचे वैज्ञानिक सल्लागार (१९७४–७८), कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्चचे महासंचालक (१९७८–८१), भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रविद्या विभागाचे सचिव (१९७८ पासून), पर्यावरण विभागाचे सचिव (१९८० पासून), अतिरिक्त उर्जा उद्‌गम आयोगाचे सचिव (१९८१ पासून), वगैरे विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. फेब्रुवारी १९८६ मध्ये पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली.

मेनन यांनी ब्रिस्टल येथे अणुकेंद्रीय मूलकणांच्या छायाचित्रण पायस [⟶ कण अभिज्ञातक] तंत्र व त्याचा मूलकणांच्या अभ्यासातील उपयोग यांसंबंधी संशोधन केले. त्यांनी केलेल्या तांत्रिक विकास कार्यामुळे बदलत्या उर्जेच्या म्यूऑनांचे, उच्च उर्जाभारित व ज्यांच्या उर्जा अतिशय अरुंद कक्षेत सामावलेल्या आहेत अशा पायॉनांचे आणि भारी मेसॉनच्या (K-मेसॉनच्या) क्षयक्रियेत दुय्यम कण म्हणून उद्‌भवणारे इलेक्ट्रॉन यांचे अस्तित्व प्रथमच दाखविता आले. त्यांच्या कार्यामुळे विचित्र कणांच्या गुणधर्माचे (विशेषतः K - मेसॉनांच्या Kπ2, Kμ3 व Ke3 या क्षयक्रियांचे) स्पष्टीकरण देणे शक्य झाले. त्यांनी अणुकेंद्रीय पायस तंत्राबाबत केलेल्या संशोधनामुळे हे तंत्र १९५४ पर्यंत १५ लि. इतका प्रचंड स्तरयुक्त पायसाच्या राशीचा उपयोग करण्याइतके विकसित झाले. भारतात परतल्यावर त्यांनी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये अतिशय उंचीवरील (सु. ३,३०० मी.) बलून उड्डाणा चे तंत्र विकसित केले आणि त्याच्या साहाय्याने चुंबकीय विषयवृत्ताच्या नजीक प्राथमिक विश्वकिरणांचा अभ्यास कार्यक्रम प्रस्थापित केला. बलून उडविणे, त्याचे मार्गनिरीक्षण करणे, पुनर्प्राप्ती करणे व लागणारी उपकरण सामग्री तयार करणे या सर्व गोष्टींचा या कार्यक्रमात समावेश होतो. १९६० सालापासून मेनन यांनी कोलारच्या सोन्याच्या खाणीत अतिशय खोल जागी म्यूऑन, न्यू ट्रिनो, दुर्बल आंतरक्रिया व इतर संबंधित आविष्कार यांविषयी अभ्यास करण्यासाठी प्रयोगांची उभारणी केलेली आहे. सध्या यांमध्ये प्रोटॉनाचे आयुर्मान (१०३० - १०३२ वर्षे) मोजण्याची योजना आहे याकरिता १५० टन वजनाचा अभिज्ञातक तयार करण्यात आला आहे.

मेनन यांना त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ रॉयल कमिशन फॉर द एक्झिबिशन ऑफ १८५१ याचा वरिष्ठ पुरस्कार (१९५३–५५), शांतिस्वरुप भटनागर पुरस्कार (१९६०), रॉयल एशियाटिक सोसायटीचे दुर्गाप्रसाद खेतान स्मृती पदक (१९७८), जवाहरलाल नेहरु विज्ञान पुरस्कार (१९८३), सी. व्ही. रामन संशोधन प्राध्यापक पुरस्कार (१९८५), तसेच पद्मश्री (१९६१) व पद्मभूषण (१९६८) हे सन्मान आणि जोधपूर, दिल्ली, अलाहाबाद, जादवपूर, सरदार पटेलव बनारस या विद्यापीठांच्या सन्मानीय पदव्या मिळालेल्या आहेत. ते इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (अध्यक्ष १९७४–७६), इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी (अध्यक्ष १९८१), महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, महाराष्ट्र ॲसोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स, रॉयल सोसायटी (लंडन), रशियाची ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्टस् ॲन्ड सायन्सेस वगैरे अनेक वैज्ञानिक संस्थांचे सदस्य आहेत. यांखेरीज भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. बंगलोर; भारत सरकारचा अवकाश आयोग; संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांची विज्ञान व तंत्रविद्या अनुप्रयोग सल्लागार समिती (१९७२–७९, दोन वर्षे अध्यक्ष); इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इन्स्टिट्यूट्‌स  फॉर ॲडव्हान्सड स्टडी, स्टॉकहो म; कॉस्मिक रे कमिशन ऑफ इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर ॲन्ड ॲप्लाइड फिजिक्स (१९६३–६९, सचिव १९६९–७२, अध्यक्ष १९७२–७५) इ. अनेक सरकारी, खाजगी, आंतरराष्ट्रीय व भारतीय संस्थांचे आणि आयोगांचे सदस्य, सल्लागारवा संचालक या नात्याने त्यांनी कामे केली आहेत वा अद्यापही करीत आहेत. विश्वकिरण व मूलकण भौतिकी या विषयांवरील त्यांचे ८१ शास्त्रीय निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.
════════════════

ओळख भारतीय शास्त्रज्ञांची भाग 7



     *💥वसंत गोवारीकर💥*

           *ज्येष्ठ शास्त्रज्ञ*

           अवकाश संशोधन, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या क्षेत्रातील त्यांचे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म १९३३ साली कोल्हापूरला झाला. कोल्हापूरला एमएस्सी करून त्यांनी लंडनच्या बìमगहॅम विद्यापीठातून पीएचडीची पदवी प्राप्त करून घेतली. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या एटॉमिक एनर्जी व एव्हिएशनमध्ये काम केले. या वेळी भारताच्या अवकाश संशोधनशास्त्राचे प्रमुख डॉ. विक्रम साराभाई यांनी त्यांना भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमासाठी भारतात बोलावून घेतले. १९६७ साली ते थुम्बा येथे रुजू झाले. अग्निबाणांसाठी लागणारे घन इंधन बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यासाठी त्यांनी प्रॉपेलंट इंधन कॉम्प्लेक्स, अमोनियम परक्लोरेट प्लान्ट अशी युनिट्स स्थापन केली. सॉलिड प्रॉपेलंट स्पेस बूस्टर प्लान्ट हे जगातले सर्वात मोठे युनिट त्यांनी स्थापन केले. त्यांनी बनवलेले एचटीपीबी हे घन इंधन विकसित करून आता ३० वष्रे झाली तरी आजही ते जगातले अद्ययावत असे इंधन आहे. १९७९ साली डॉ. वसंत गोवारीकर हे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक झाले. १९८७ ते १९९३ या कालावधीत गोवारीकर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. त्यांनी हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी मॉडेलही त्यांनी तयार केले. नंतर या मॉडेलला गोवारीकर मॉडेल म्हणून नाव देण्यात आले.
स्मृतिदिन - २ जानेवारी २०१५
════════════════

💥🌸दिनविशेष🌸💥 14 मार्च

💥🌸दिनविशेष🌸💥

       अल्बर्ट आइन्स्टाइन

    सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ

*जन्म - मार्च १४, इ.स. १८७९*

अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन (मराठी लेखन - अल्बर्ट आईन्स्टाईन), (जर्मन: Albert Einstein ;) (मार्च १४, इ.स. १८७९ - एप्रिल १८, इ.स. १९५५) हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. सापेक्षतावादाचा सिद्धान्त, (विशेष सिद्धान्त, सामान्य सिद्धान्त), प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंजभौतिकी, विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र वगैरे क्षेत्रांमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. त्यापैकी प्रकाशीय विद्युत परिणाम या सिद्धान्तासाठी आणि "त्यांच्या सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी" इ.स. १९२१ साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन "सन्मानित" केले गेले. आइन्स्टाइन यांना त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्तानंतर जगभर अफाट प्रसिद्धी मिळाली आणि ते जगातील प्रसिद्ध चेहर्‍यांपैकी एक बनले. "आइन्स्टाइन" या नावाचा अनेक ठिकाणी वापर (आणि/किंवा गैरवापर) होऊ लागला. त्या प्रकारांमुळे वैतागलेल्या आइन्स्टाइन यांनी "अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन" ची व्यापारचिन्ह म्हणून नोंदणी केली. एका शास्त्रज्ञाला त्याची इतकी प्रसिद्धी असणे आणि त्यामुळे होणारे परिणाम याचा अनुभव नव्हता. आज बुद्धिमत्ता आणि आइन्स्टाइन हे एक प्रकारे समीकरणच बनले आहे. त्यांच्या कारकीर्दीच्या प्रारंभी आइन्स्टाइन याने विचार केला की, न्युटनी यांत्रिकी ही विद्युत चुंबकीय नियमांसोबत पारंपरिक यांत्रिकीच्या नियमांशी मेळ घालणारी नव्हती. या घटनेने त्यांच्या विशिष्ट सापेक्षता सिद्धान्ताला चालना मिळाली. तथापि त्यांना असे वाटू लागले की, सापेक्षतेचे तत्त्व हे गुरुत्वाकर्षणाचेच सुधारित आणि विस्तारित रूप आहे. त्यांनी १९१६ साली त्यांच्या अनुबर्ती गुरुत्वाकर्षण सिद्धान्तावरून सामान्य सापेक्षता सिद्धान्तावर एक पेपर प्रकाशित केला. सांख्यिकीय यांत्रिकी आणि पुंजयांत्रिकी सिद्धान्त यांच्या समस्यांची उकल करण्यायास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना त्यांच्या आण्विक सिद्धांत आणि रेण्विक गती या संबंधित सिद्धान्त स्पष्ट करता आले. त्याचप्रमाणे त्यांनी प्रकाशाच्या औष्णिक गुणधर्माचा शोध लावल्यामुळे त्यांना प्रकाशकणांचा सिद्धान्त मांडता आला. १९१७ साली, आईन्स्टाइन यांनी त्यांचा सामान्य सापेक्षता सिद्धान्ताच्या स्पष्टीकरणासाठी एका भव्य विश्वाची रचनाकृती प्रदर्शित केली.

*💥🌸दिनविशेष🌸💥* 13 मार्च

*💥🌸दिनविशेष🌸💥*

१३ मार्च  १७८१

सर विल्यम हर्षल यांनी युरेनस या ग्रहाचा शोध लावला

 विल्यम हर्षल यांनी युरेनस या ग्रहाचा शोध लावला*

युरेनस सूर्यापासून सातव्या क्रमांकाचा ग्रह आहे. तो बराचसा वायूंचा बनलेला आहे. तो व्यासानुसार तिसरा आणि वस्तुमानानुसार चौथा ग्रह आहे. युरेनस ग्रह पृथ्वीच्या तुलनेत अनेक पटींनी मोठा आहे. पृथ्वीपासून त्याचे अंतर २.८ अब्ज कि.मी. आहे. युरेनसला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पुरी करण्यास ८४ वर्ष लागतात. नासाच्या "व्हॉयेजर २" या यानाने युरेनस ग्रहाला भेट दिली आहे. या ग्रहासाठी सध्या तरी कोणत्याही नव्या मोहिमेचा विचार नाही. इ.स. १९७७ साली पृथ्वीवरुन प्रक्षेपित केलेले "व्हॉयेजर २" यान जानेवारी २४ १९८६ या दिवशी युरेनसच्या सर्वांत जवळ पोहोचले. तेथुन ते नेपच्युन ग्रहासाठीच्यात्याच्या पुढच्या प्रवासाला निघून गेले.
आधुनिक काळात शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे. सर विल्यम हर्षल यांनी हा ग्रह मार्च १३ १७८१ ला शोधल्याची घोषणा केली.
युरेनसचा शोध
युरेनस हा पहिला ग्रह आहे की तो प्राचीन काळी माहिती नसला तरी त्याचे निरीक्षण मात्र केले जात होते. पण त्याला तारा म्हणून गणले जाई. विल्यम हर्शेलला सुद्धा तो प्रथम धूमकेतू वाटला होता.
भौतिक गुणधर्म
युरेनस हा प्रामुख्याने वायु व अनेक प्रकारच्या बर्फांसमान बनलेला आहे. याच्या वातावरणात ८३% हायड्रोजन, १५% हेलीयम, २% मिथेन व असिटिलीन चे काही अंश आहेत. तर अंतर्भागात ऑक्सिजन, कार्बन व नायट्रोजन यांची संयुगे तसेच खडकाळ पदार्थ आहेत. त्याचा हा अंर्तभाग गुरु व शनी ग्रहाच्या विरुद्ध आहे जो कि प्रामुख्याने हायड्रोजन व हेलीयमपासून बनलेला आहे.
नैसर्गिक उपग्रह
युरेनसला २७ नैसर्गिक उपग्रह (चंद्र) आहेत. या चंद्रांची नावे ही शेक्सपियर व अलेक्झांडर पोप यांच्या कथानकांमधील पात्रांची नावे आहेत. मिरांडा(Miranda), एरिएल(Ariel), उंब्रिएल(Umbiel), टायटानिया(Titania) आणि ओबेरॉन(Oberon) हे पाच प्रमुख चंद्र आहेत.

बुधवार, ११ मार्च, २०२०

ओळख भारतीय शास्त्रज्ञांची भाग 6

  *सतीश धवन*

*भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्वाचे योगदान*

दक्ष अध्यापक, संशोधक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंता, निष्ठावान, व्यापक दृष्टिकोन असलेला कार्यक्षम नेता या गुणांमुळे सतीश धवन हे ज्या क्षेत्रात शिरले, त्या संबंधित संस्थेत त्यांनी आमूलाग्र बदल घडवला. धवन यांचा जन्म काश्मीरमधील श्रीनगरचा. पंजाब (लाहोर) विद्यापीठाचे पदवीधर. गणित, भौतिकशास्त्रात बी. ए., इंग्रजी साहित्यात एम. ए., अभियांत्रिकीत बी. ई., मिनिसोटा विद्यापीठातून विमानविद्या अभियांत्रिकीत एम. एस. (१९४७), कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून विमानविद्या अभियंता, (१९४९) विमान विद्याशास्त्र व गणितात पीएच. डी., (१९५१) अशा तऱ्हेने कला-विज्ञान अभियांत्रिकी मानवशास्त्र यांना कवटाळण्यास शिक्षणविस्तार व विश्वव्यापी दृष्टिकोन असलेला असामान्य शास्त्रज्ञ म्हणजे डॉ. सतीश धवन!

धवन यांनी वायुगतिशास्त्रात संशोधन आरंभले. त्याकाळी रचनातीत प्रवाह (सुपरसॉनिक फ्लोज्) व शॉक फ्लोज् या गूढविषयावर शोधनिबंध डॉ. धवन यांनी ठोस निरीक्षणांसह सादर केले. त्यातील अचूकतेमुळे ते गाजले. पृष्ठीय घर्षणजन्य प्रेरणा (फ्रिक्शन ड्रॅग) मोजण्याची सोपी पद्धत त्यांनी शोधली. श्लिकटिंग यांच्या ‘बाऊंड्री लेयर’ या ग्रंथाच्या गेल्या अर्धशतकातील सर्व आवृत्त्यांमध्ये धवन यांच्या संशोधनांची नोंद झालीय.

१९५९-६१ दरम्यान डॉ. कलामांना वायुयान विकास संस्थेत (एडीई), हॉवरक्राफ्टच्या विरुद्ध दिशांनी फिरणा-या पंख्यांचा आराखडा बनवताना अडचण आली. आपल्या संचालकांच्या अनुमतीने ते भारतीय विज्ञान संस्थेत जाऊन ते धवनसरांना भेटले. रोज १ तासप्रमाणे १० शनिवार १० व्याख्याने डॉ. कलामांना दिली. व्याख्यानापूर्वी प्रश्न विचारून ते विद्यार्थ्यांची ग्रहणक्षमता व उपयायोजनक्षमता पारखून घेत. सत्रान्ती आराखडा बनवण्याइतके डॉ. कलामांचे मन खंबीर झाले.

१९७२ मध्ये अवकाश आयोग (स्पेस कमिशन) व भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) यांच्या अध्यक्षपदी आणि अवकाश विभागात (डिपार्टमेंट ऑफ स्पेस) भारत शासनाच्या सचिवपदी झालेली नियुक्ती अनेकांना प्रेरक ठरली. डॉ. साराभाईंनी अंतराळ कार्यक्रमात संघटनात्मक व व्यवस्थापकीय शिस्त निर्माण केली, तर इस्रोला अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त डॉ. धवन यांनी केले.

१९८० साली, बंगलोरमधील इस्रेच्या मुख्यालयात आगामी दोन दशकातील अंतराळ मोहिमांची सांगोपांग चर्चा डॉ. कलाम करत होते. दुस-या दिवशी डॉ. धवन यांनी त्या चर्चेची माहिती घेतली. त्यांनी सोबत आणलेल्या तक्त्यांच्या सहाय्याने आगामी १५ वर्षातील मोहिमांचे आराखडे तयार केले. त्यामध्ये भूस्थिर व उपग्रहांसाठी प्रक्षेपण याने व उपग्रहमालिका यांचा समावेश होता. धवनसर मोहिमेच्या यशाचे श्रेय इतरांना देऊन स्वत: चुका, त्रुटी व अपयशाचे धनी होत.

१० ऑगस्ट १९७९ रोजी, कलामांच्या अध्यक्षतेखाली झालेली मोहीम फसली. पण माध्यम पत्रकारांना तोंड देताना आपले अपयश मान्य करून आगामी मोहीम जबाबदारीने करण्याची ग्वाही धवनसरांनी दिली. यानंतर १९ जुलै १९८० रोजी, दुस-या प्रक्षेपण यानाने ‘रोहिणी’ उपग्रहाला यशस्वीरित्या भ्रमण कक्षात नेऊन सोडले, तेव्हा पत्रकारांसमोर डॉ. कलामांनाच त्यांनी बोलायला लावले. अशा तऱ्हेने धवनसरांनी सहका-यांमध्ये निकोप दायित्वाची भावना फुलवली. त्यांनी सहका-यांसाठी मूल्यमापन व बढत्या ही पद्धत आणली. त्यामुळे अधिक कार्यक्षम अभियंत्यांना पुढे जाण्यास वाव मिळाला. पुढे त्यांनी राष्ट्रीय अंतरीक्ष कार्यक्रम हा नागरी उपक्रम म्हणून राबवला.

या प्रकारात वरिष्ठांनी कनिष्ठांनी कसे वागावे याचा आदर्श ‘धवनसर’ असल्याचे कलमांना वाटे. १९८१ साली, डॉ. धवन यांना पद्मविभूषण व डॉ. कलाम यांना पद्मभूषण देऊन देशाने गौरविले. १९९० मध्ये हैद्राबादमध्ये ‘पक्ष्यांची उड्डाणे’ या विषयावर धवन सरांचे व्याख्यान झाले, त्यावेळी डॉ. कलामांनी त्यांची ओळख करून दिली. ३१ मे १९९२ रोजी, ‘लॉच व्हेइकल प्रोग्राम’वर धवनसरांनी चर्चा आयोजित केली होती. डॉ. कलामांनी इस्रे संचालकांसमोर आपले विचार मांडले. प्रा. धवन यांनी डॉ. कलामांच्या डीआरडीओमध्ये बदलीची घोषण करून सा-यांना धक्का दिला. १९८० पासून प्रा. धवन यांनी निश्चित केलेल्या पथावरून देशाची संरक्षण तंत्रज्ञानाबाबत प्रगती झाली व तो स्वयंपूर्ण ठरलाय.

१९९९ मध्ये, राष्ट्रीय एकात्मतेचा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ डॉ. सतीश धवन यांच्या चतुरस्र् व्यक्तिमत्त्वाला लाभला. राष्ट्रीय समस्या सा-यांना बरोबर घेऊन वैज्ञानिक मार्गाने सोडवण्याच्या धवनसरांच्या प्रतिभाशाली कर्तृत्वाचा सन्मान असल्याचे डॉ. कलाम यांना त्या क्षणी वाटले.

इस्रेचे अध्यक्ष म्हणून एक तपाच्या सेवेचा गौरव म्हणून त्यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर २००२ रोजी ‘इस्रेचे’ पुनर्नामकरण होऊन ते सतीश धवन स्पेस सेंटर असे केले गेले. डॉ. धवन यांची समस्येविषयीची आस्था व कार्यातील वस्तुनिष्ठता या नेतृत्वगुणांचा गौरव पंतप्रधान वायपेयी यांनी केला. शिक्षक दिनी ‘उत्कृष्ट शिक्षक’ असलेल्या आपल्या शास्त्रज्ञ गुरूचा सन्मान पाहून डॉ. कलामांचे मन समाधानाने भरून आले.
सतिश धवन (२५ सप्टेंबर – ३ जानेवारी २००२) यान्चे भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्वाचे योगदान होते. ते भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्यानंतर ISRO (Indian Space Research Organisation) चे १९७२ साली अध्यक्ष झाले. त्यांना भारतातील प्रायोगिक fluid dynamicsच्या संशोधनाचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म श्रीनगरमधे झाला आणि शिक्षण भारत तसेच अमेरिकेत झाले.
त्यांनी ग्रामीण शिक्षण, Remote Sensing तसेच Satellite Communication च्या क्षेत्रात मुलभूत संशोधन केले. त्यांच्या प्रयत्नांनी भारत INSAT - दूरसंचार उपग्रह, IRS - दूरसंवेद उपग्रह आणि PSLV - Polar Satellite Lanch Vehicle यासारखे प्रकल्प यशस्वी करू शकला.
त्यांच्या स्मरणार्थ श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण स्थळाचे सतीश धवन अंतराळ केंद्र असे नामकरण करण्यात आले.

ओळख भारतीय शास्त्रज्ञांची भाग 5


*राप्पल संगमेश्‍वर कृष्णन*

*भारतीय भौतिकशास्त्रज्ञ*

*जन्मदिन - २३ सप्टेंबर १९११*

       राप्पल संगमेश्‍वर कृष्णन यांचा जन्म केरळातील राप्पल येथे झाला. त्यांचे शिक्षण मद्रास विद्यापीठ (डी. एस्‌सी.), बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेज (पीएच्. डी.) येथे झाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत संशोधन साहाय्यक (१९३५–३८) आणि भौतिकीचे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर तेथेच त्यांनी १९४८–७२ या काळात भौतिकी विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केले. १९७३ मध्ये केरळ विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर त्यांची नेमणूक झाली. १९३८ मध्ये केंब्रिज येथील कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत संशोधन करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती.

राप्पल संगमेश्‍वर कृष्णन यांचे प्रमुख संशोधन कार्य प्रकाशाचे प्रकीर्णन (विखुरणे), वर्णपटविज्ञान, स्फटिक भौतिकी व अणुकेंद्रीय भौतिकी या शाखांतील आहे. त्यांनी नवीन प्रकाशकीय परिणामाचा शोध लावला व सैद्धांतिक रीत्या त्याचे व्यापक स्वरूप प्रस्थापित केले. भौतिक-रासायनिक प्रश्नांत उपयुक्त असलेल्या या परिणामाला ‘कृष्णन परिणाम’ असे नाव प्राप्त झाले आहे. स्फटिक भौतिकीसंबंधी १९५१ पासून ते संशोधन करीत असून १९५८ साली ‘प्रोग्रेस इन क्रिस्टल फिजिक्स’ हा व्याप्ति  प्रबंध त्यांनी प्रसिद्ध केला. त्यांचे १६० हून अधिक संशोधन पर निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.

इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स (लंडन), अमेरिकन फिजिकल सोसायटी, इंडियन अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सेस व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया या संस्थांचे ते फेलो आहेत. १९४९ च्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या भौतिकी विभागाचे ते अध्यक्ष होते. 

मंगळवार, १० मार्च, २०२०

ओळख भारतीय शास्त्रज्ञांची भाग-04

💥🌸सुब्रह्मण्यन चंद्रशेखर🌸💥

       *भारतीय खगोलशास्त्रज्ञ*

           सुब्रह्मण्यन चंद्रशेखर हे शास्त्रज्ञ आहेत. पद्मविभूषण सुब्रह्मण्यम् चन्द्रशेखर (१९१०-१९९५) भारतीय शास्त्रज्ञ. खगोलशास्त्राचे ब्रूस मेडल, नोबेल पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
 जीवन
डॉ. चन्द्रशेखर यांचा जन्म ऑक्टोबर १९ १९१० रोजी लाहोर येथे झाला. त्यांचे वडील सुब्रह्मण्यन् हे तेव्हा लाहोर येथे भारतीय रेल्वेच्या ऑडीट खात्यात होते. लाहोरला त्यांचा जन्म झाला त्याआधी काही महिने त्यांच्या आजोबांचे,रामनाथ चंद्रशेखरांचे निधन झाले होते.दाक्षिणात्य ब्राम्हण कुटुंबात आजोबांच्या मृत्युनंतर जन्माला आलेल्या अर्भकाला ,तीच व्यक्ती जन्माला आली,असे समजून तिचे नाव दिले जाते. तसे चंद्रशेखरांना त्यांच्या आजोबांचे नाव ठेवण्यात आले.लाहोरच्या लॉरेन्स गार्डन या भागात होते. वडील सुब्रह्मण्यन् हे कर्नाटक संगीताचे उत्तम जाणकार आणि स्व‌तः वायोलीन वादकही होते आणि संगीतशास्त्र वरील काही पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले तर चन्द्रशेखर यांच्या आई सीता बालकृष्णन याही अतिशय हुशार होत्या, त्यांनी इंग्रजीतील पुस्तकांचे तमिळ भाषेत अनुवाद केले. तर त्यांचे काका, विश्व प्रसिद्ध वैज्ञानिक सर सी. व्ही. रामन होते. अशा हुशार घराण्यातील असलेले डॉ. चन्द्रशेखर स्वतःही लहानपणापासून प्रतिभावान होते.
डॉ. चन्द्रशेखर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घरीच झाले, तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मद्रास येथे झाले. १९३० साली डॉ. चन्द्रशेखर बी. एस. सी. झाल्यानंतर केंब्रीज विद्यापीठातील ट्रिनीटी कॉलेज मध्ये उच्च शिक्षणासाठी दाखल झाले. तेथून पी. एच. डी. झाल्यानंतर डॉ. चन्द्रशेखर शिकागो विद्यापीठ येथे १९३९ साली सहाय्यक प्राध्यापक म्हणून रूजू झाले.
 संशोधन
डॉ. चन्द्रशेखर यांची खरी ओळख म्हणजे "चन्द्रशेखर मर्यादा". ११ जानेवारी १९३५ या दिवशी डॉ. चन्द्रशेखर यांनी एक सिद्धांत मांडला. पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांची सांगड घालून चन्द्रशेखर यांनी श्वेत बटूंची कमाल वस्तुमानमर्यादा सूर्यापेक्षा ४४ टक्के इतकी असू शकते असे आपल्या सिद्धांताद्वारे मांडले. यात सूर्यापेक्षा लहान असलेले तारे म्हणजे बटू तारे यांचे अस्तीत्त्व कशामुळे टिकून आहे हे गणीताद्वारे डॉ. चन्द्रशेखर यांनी मांडले. या सिद्धांतासाठी डॉ. चन्द्रशेखर यांचा विरोध करणारे डॉ. आर्थर एडिंगटन हेही याच समस्येवर विचार करीत होते, पण त्यांना यावर उत्तर सापडले नाही. एडिंटन यांनी चन्द्रशेखर यांच्या सिद्धांताला विरोध केल्याने तो सिद्धांत मागे पडला.
डॉ. चन्द्रशेखर यांनी १९३९ साली आपला सिद्धांत An Introduction to the Study of Stellar Structure नावाच्या पुस्तकात विस्तृत रुपात मांडला. १९५० च्या दशकात शास्त्रज्ञांना या सिद्धांतील मते पटू लागली. त्या दिशेने संशोधन सतत सुरूच होते. अखेर जगभरातील शास्त्रज्ञांना डॉ. चन्द्रशेखर यांचे म्हणणे पटले. १९८३ साली त्यांच्या संशोधनाची मान्यता म्हणून डॉ. चन्द्रशेखर यांना जगातील सर्वोच्च समजले जाणारे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
अखेरपर्यंत अमेरिकेतच स्थाईक राहणारे आणि संशोधन कार्यात कार्यरत राहणार्‍या डॉ. चन्द्रशेखर यांचा मृत्यु ऑगस्ट २१ १९९५ रोजी झाला.
 पुरस्कार
हेन्री नॉरिस रसेल व्याख्याता (इ.स. १९४९)
ब्रुस पदक (इ.स. १९५२)
रॉयल ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक (इ.स. १९५३)
पद्मविभूषण (१९६८) - भारत सरकार
हेन्री ड्रेपर पदक (इ.स. १९७१)
नोबेल पारितोषिक भौतिकशास्त्र (इ.स. १९८३)
रॉयल सोसायटीचे कोप्ली पदक (इ.स. १९८४)
════════════════

ओळख भारतीय शास्त्रज्ञांची भाग -०3

जयंत विष्णू नारळीकर

*भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक*

*जन्म - जुलै १९, १९३८*

नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेगव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्‍नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.

संशोधन
*स्थिर स्थिती सिद्धान्त*

डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.

चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
*साहित्यातील भर*
विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर सातत्याने विज्ञानचिषयक माहितीने भरलेले ललित लेखन प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.
*विज्ञानकथा पुस्तके*
अंतराळातील भस्मासुर अभयारण्य टाइम मशीनची किमया प्रेषित यक्षांची देणगी याला जीवन ऐसे नाव वामन परत न आला व्हायरस
इतर विज्ञानविषयक पुस्तके
आकाशाशी जडले नाते गणितातील गमतीजमती युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी)
नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)
विज्ञान आणि वैज्ञानिक विज्ञानगंगेची अवखळ वळणे विज्ञानाची गरुडझेप
विश्वाची रचना
विज्ञानाचे रचयिते
सूर्याचा प्रकोप
Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)
Seven Wonders Of The Cosmos

आत्मचरित्र
चार नगरांतले माझे विश्व

*पुरस्कार*
१९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला हे पुरस्कारही मिळाले आहेत. २०१४साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-२०१३ जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)
चरित्र
डॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे ’विज्ञान यात्री डॉ.जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.

*शाॅर्ट फिल्म*

खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एका लघुपटाद्वारे घेतला गेला आहे. साहित्य अकादमीची निर्मिती असलेल्या एका तासाच्या या लघुपटाचे दिग्दर्शन अनिल झणकर यांनी केले आहे.
════════════════

ओळख भारतीय शास्त्रज्ञांची 01


🔎 *माहिती शास्त्रज्ञांची*

    *वार - मंगळवार दि.31/12/2019*

 विश्वविख्यात शास्त्रज्ञ- सत्येंद्रनाथ बोस

*जन्म - जानेवारी १ १८९४*

सत्येंद्रनाथ बोस (बंगाली: সত্যেন্দ্রনাথ বসু} (1894-1974) भारतीय शास्त्रज्ञ
बोस-आइन्स्टाईन जोडीतील विश्वविख्यात शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ यांचा जन्म जानेवारी १ १८९४ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ हे रेल्वेत नोकरीला होते.
१९१५ सालीच सत्येंद्रनाथांनी अल्बर्ट आइनस्टाइन यांचा मूळ जर्मन भाषेतील असलेला सापेक्षता सिद्धांत सर्वप्रथम इंग्रजी भाषेत भाषांतरित केला. १९१६ ते १९२१ या काळात सत्येंद्रनाथांनी कोलकाता येथील विद्यापिठात प्राध्यापक पदावर काम कले. १९२१ साली ते ढाका येथील विद्यापिठातील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
१९२३ साली सत्येंद्रनाथांनी प्रसिद्ध गणिती मॉल्ट यांच्या समीकरणांशी संबंधित स्वतःचे शोध इंग्लंड येथून प्रकाशित होणारे मासिक फिलॉसॉफीकलकडे पाठविले पण ते शोध छापण्यास त्या मासिकाने नकार कळविला. या घटनेमुळे सत्येंद्रनाथ निराश झाले नाहीत, त्यांनी त्यांचा प्रबंध आइन्स्टाईन यांच्याकडे जर्मनीला पाठविला. आइन्स्टाईन यांनी तो लेख जर्मन भाषेत भाषांतरित करून तेथे तो छापून येण्यास मोलाची मदत केली. लेख जगभरातील गणितींच्या पसंतीस उतरला, त्यामुळे बोस प्रसिद्धिस आले. आपल्या कामाच्या व्यापातून सत्येंद्रनाथ यांनी सुट्टी काढून ते मादाम मेरी क्युरी यांच्यासह पॅरीस येथे १० महिने काम केले. हे काम आटोपून सत्येंद्रनाथ जर्मनीला गेले. तेथे त्यांचे भव्य स्वागत झाले. आइन्स्टाईन यांच्यामुळे इतर वैज्ञानिक जसे मॅक्स प्लांक, एर्विन श्रोडिंजर, वोल्फगांग पॉली, वर्नर हायझेनबर्ग, सोमरपॅण्ड यांच्याशी अनेक विषयांवर विस्तृत चर्चा करता आल्या.
१९४५ साली सत्येंद्रनाथांनी आपली ढाका येथील नोकरी सोडून ते कोलकाता येथे १९५६ पर्यंत प्रोफेसर म्हणून काम केले. या कामातून सेवानिवृत्त झाल्यावर विश्व भारती विद्याल्याचे उपकुलपति म्हणून त्यांची नेमणूक झाली.
भौतिकशास्त्र विषयाचे त्यांनी २४ लेख लिहिले. या विषयातील हे सर्व लेख अत्यंत महत्त्वाचे समजले जातात.
१९५८ साली सत्येंद्रनाथांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले आणि त्यांना राष्ट्रीय प्रोफेसर म्हणण्यात येऊ लागले, त्याच वर्षी लंडन येथील रॉयल सोसयटीने त्यांना आपला फेलो म्हणून जाहीर केले.
दि. फेब्रुवारी ४ १९७४ रोजी सत्येंद्रनाथांचे हृदय रोगामुळे निधन झाले.
💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛
════════════════