शनिवार, १३ जून, २०२०

14 जून



*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*

जागतिक रक्तदाता दिन

   *14 जून*

द्रव्यदानं परम दानम्   
अन्नदानं ततोधिकम्  
ततः श्रेष्ठ रक्तदानम् 
 
रक्तदानाचे पुण्य फार मोठे आहे. चरकांच्या शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त म्हणजे जीव असे सुश्रुताचार्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसर्‍याचा जीव वाचवू शकते.

 
जागतिक रक्त संक्रमणामध्ये सिकलसेल, एडस या रोगाचे प्रमाण वाढत असल्यामुळे व अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने ऐच्छिक रक्तदानाची चळवळ महत्वपूर्ण ठरत आहे.
सध्या कोविड-19(कोरोना) महामारीवर उपचार करण्यासाठी रक्ताची गरज भासत आहे.14 जून हा जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. जे लोक ऐच्छिक रक्तदान करून जीवनदान करतात त्यांचे आभार मानणे व नवीन लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणे असे या दिवसाचे उद्दिष्ट ठरवलेले आहे. रक्तदान केल्यास आपणास काहीही त्रास होत नाही, हे सांगणेही आवश्यक आहे.
 
हा दिवस जागतिक पातळीवर साजरा करण्यासाठी वर्ल्ड हेल्थ सेंटर ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल रेडक्रॉस व रेडक्रिेसंट सोसायटी कार्यरत आहेत. सुरक्षित रक्त रुग्णाला मिळवून देण्यासाठी ऐच्छिक रक्तदान महत्वाचे ठरते. मानवतेच्या दृष्टीने रक्तदात्यांची संख्या वाढविणे, नियमित रक्तदाते तयार होण्यासाठी काय करावे याचा अभ्यास या दिवशी करून मोबदल्याची अपेक्षा न करता रक्तदान करण्यास प्रवृत्त करणे हे मोलाचे कार्य आहे. एकविसाव्या शतकात मानवाचे सर्वच क्षेत्रात अनेक शोध लावले आहेत. शरीरात कृत्रिम अवयव बसविले जातात. परंतु कृत्रिम रक्त तयार करण्याचे तंत्र मानवाने अद्याप आत्मसात केलेले नाही. मानव रक्तावर प्रकिया करतो, त्याचे विघटन करू शकतो, परंतु प्रत्यक्षात रक्त तयार करू शकत नाही. त्यामुळे मानवी रक्ताला पर्याय सापडलेला नाही. मानवी रक्त फक्त मानवी शरीरातच तयार होते. म्हणून रक्तदान करून ही गरज भागवावी लागते. त्याची रक्तगटानुसार नोंद ठेवावी लागते.
 
रक्तदानामुळे काहीही त्रास होत नाही. सुदृढ, सशक्त, रोग न झालेला माणूस रक्तदान करू शकतो. वयाच्या 18 व्या वर्षापासून 60 व्या वर्षापर्यंत रक्तदान करता येते. रक्तदानानंतर कोणतेही कष्टाचे काम  करू शकतो. रक्तदातचे वजन 45 किलोच्या वर असावे. रक्तदाताच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण 12.5 असावे. नाडीचे ठोके 80 ते 100 असावेत.
 
आज धकाधकीच्या बर्‍याच ठिकाणी छोट्या मोठ्या अपघातात ऑपरेशनच्या वेळी रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यावर रक्तदान हाच एक उपाय आहे ओणि तो आपणासारखा सूज्ञ नागरिकच करू शकतो. आजच्या दिनी कोणतीही अपेक्षा न करता दर तीन महिन्यास मी रक्तदान करेन, असा संकल्प युवकांनी करावा.

*जागतिक रक्त दातांचा दिन कसा साजरा केला जातो?*

जगभरात रक्तदानाच्या महत्वाविषयी, तसेच सुरक्षित रक्तसंक्रमणाची गरज याबद्दल लोकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी जागतिक रक्तदाते दिन साजरा केला जातो. हे साजरी करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित केले जातात.

जसे आरोग्य सेवा संस्था "जागतिक आरोग्य संघटना, रेड क्रॉस इंटरनॅशनल फेडरेशन आणि लाल क्रेसेंट संस्था (IFRC), रक्तदाता संस्था इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल सोसायटी (Aifbeedio) आणि रक्त संक्रमण (ISBT)" जागतिक स्तरावर लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एकत्र काम करतात.

युरोप परिषद अनेक वर्षे मोहिम साजरा करण्यासाठी तयार केले आहे. जगभरात सुमारे 9 2 कोटी लोकांना रक्तदान केल्यानेही दिवसेंदिवस सुरक्षित रक्तसंक्रमणाची गरज वाढत आहे. सार्वजनिक मोकळी जागा, शाळा, महाविद्यालये, इतर शैक्षणिक संस्था, कार्यक्रम, सभा, चर्चा, वादविवाद, प्रश्न-उत्तर स्पर्धा, वर्तमानपत्र जगभरातील संबंधित लेख आणि प्रकाशन कथा, वैज्ञानिक परिषद, लेख उपक्रम आणि विद्यापीठातील खंडणी आयोजन प्रकाशन, आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक जर्नल, क्रिडा क्रियाकलाप आणि इतर जाहिरात-संबंधित क्रियाकलाप ते आहेत जागतिक रक्त दाता दिन थीम

जागतिक रक्त दाता दिन 2015 थीम आहे "माझे जीवन जतन केल्याबद्दल धन्यवाद."

वर्ल्ड ब्लड डोनर डे 2014 थीम होती "माता जतन करण्यासाठी रक्त जतन करा."

वर्ल्ड ब्लड डोनर डे 2013 थीम होता "जीवन द्या: रक्त दान"

वर्ल्ड ब्लड डोनर डे 2012 थीम "प्रत्येक लोभी व्यक्ती एक नायक आहे."

जागतिक रक्त दाता दिन 2011 थीम "अधिक रक्त, अधिक जीवन होते."

वर्ल्ड ब्लड डोनर डे 2010 विषय "न्यू ब्लड फॉर द वर्ल्ड" होता.

वर्ल्ड ब्लड डोनर डे 200 9 ची थीम "रक्त आणि रक्त भागांचे 100% गैर-बळी अर्पण करणे" होते.

जागतिक रक्त दाता दिन 2008 थीम "नियमित रक्त द्या."

वर्ल्ड ब्लड डोनर डे 2007 थीम "सुरक्षित मातृत्वासाठी सुरक्षित रक्त" होता.

वर्ल्ड ब्लड डोनर डे 2006 थीम "सुरक्षीत रक्ताची सार्वत्रिक उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्धता" होती.

वर्ल्ड ब्लड डोनर डे 2005 थीम "आपल्या रक्तवाहिनीचे साजरे करा."

वर्ल्ड ब्लड डोनर डे 2004 ची थीम "रक्तजीवन वाचवते. माझ्याबरोबर रक्त वाचवणे प्रारंभ करा. "

जागतिक रक्त दातांचा दिवस

"मी 1 9 80 पासून रक्तदान करण्यामध्ये गुंतलो आहे कारण ही एक नाजूक गरज आहे." - डोना रीड

"रक्तदानकर्त्यांसाठी माझे जीवन आभारी आहे. ज्याने मला रक्त दिले त्याचे मी आभारी आहे. "- निकी टेलर

"माझे लक्ष्य आहे रक्तदात्यांसाठी अधिक गरज असलेल्या शब्दाचा प्रसार करणे." - निकी टेलर
========================

13 जून

*
💥🌸दिनविशेष🌸💥*

           *१३ जुन १९८३*

*पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.*

पायोनियर १० एक २५८ किलोग्राम का अमेरिकी अंतरिक्ष यान है। इसे २ मार्च १९७२ को अमेरिकी अंतरिक्ष अनुसन्धान संस्था नासा ने एक ऐटलस-सेंटौर रॉकेट के ज़रिये अंतरिक्ष में छोड़ा। १५ जुलाई १९७२ से १५ फ़रवरी १९७३ के काल में यह हमारे सौर मंडल के क्षुद्रग्रह घेरे (ऐस्टरौएड बॅल्ट) को पार करने वाला पहला मानव-कृत यान बना। ६ नवम्बर १९७३ को इसने बृहस्पति ग्रह की तस्वीरें लेना शुर किया और ४ दिसम्बर १९७३ को बृहस्पति से केवल १,३२,२५२ किमी की दूरी पर पहुँचकर फिर उस से आगे निकल गया। चलते-चलते यह हमारे सौर मंडल के बाहरी क्षेत्रों में जा पहुँचा है। कम ऊर्जा के कारण २३ जनवरी २००३ के बाद इस यान का पृथ्वी से संपर्क टूट गया। उस समय यह पृथ्वी से १२ अरब किमी (८० खगोलीय ईकाईयों) की दूरी पर था।

शुक्रवार, १२ जून, २०२०

12 जून

💥🌹आजचा दिनविशेष🌹💥

         *१२ जून*

*जागतिक बालकामगार विरोधी दिन*

          बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा... असे आपण नेहमी म्हणतो. कारण बालपणीचा काळ सुखाचा आणि आनंदाचा असतो. ना कसली चिंता ना कसली काळजी, मनसोक्त खेळा, हसा, आनंद लुटा... पण असा हा सुखाचा काळ काही मोजक्याच मुलांच्या नशिबात असतो. कारण जेव्हा आपण घराबाहेर पडून समाजात वावरतो तेव्हा पोटाची खळगी भरण्यासाठी सिग्नलजवळ काही वस्तू विकणारी मुले, हॉटेल, बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर पाणी वाटणारी, टेबल साफ करणारी मुले पाहतो. अशा मुलांना कुठे सुखाचे बालपण अनुभवायला मिळते... कायदा असूनही त्यांचे बालपण हरवत चालले आहे. हेच ते बालकामगार... 12 जून बालकामगार विरोधी दिन त्याविषयी थोडंसं.

14 वर्षांखालील जी मुले स्वत:च्या आणि आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी, रोजगार कमवितात त्यांना बालकामगार म्हणतात. ज्या वयात शाळेत जावून शिकायचे, खेळायचे, बागडायचे त्या वयात हातात झाडू घेऊन साफ-सफाई करायची, भांडी, कपडे धुवायचे, विटा उचलायच्या, दगड फोडायचे अशी अनेक कामे करावी लागतात. एकीकडे बोट ठेवलं ती वस्तू विकत घेऊन देणारी हौशी मॉम-डॅड तर दुसरीकडे कामावर पाठविणारी नाईलाज मायबाप... समाजातील हे चित्र कसे बदलेल आणि कोण बदलणार...? हा समाजापुढे गहण प्रश्नच आहे.

12 जून हा दिवस देशात सर्वत्र बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. बालकामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्यावतीने जिल्हास्तरावर राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात 2004 पासून जिल्हधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविल्या जात आहे. या प्रकल्पांतर्गत 9 ते 14 वयोगटातील धोकादायक, व्यवसायामध्ये काम करणाऱ्या बालकामगारांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यात येते. प्रकल्पाचा मुख्य उद्देश बालकामगारांचा त्यांच्या कामापासून परावृत्त करून शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविणे व त्यांच्या पालकांचा आर्थिक स्तर उंचावणे, त्यांना विविध शासकीय😢 योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.

अमरावती जिल्ह्यात सध्या एकूण 37 विशेष प्रशिक्षण केंद्र विविध वस्त्यांमध्ये कार्यान्वित आहेत. प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनात साधारत: 150 कर्मचारी काम करीत आहे. या प्रकल्पांतर्गत बालकामगारांना विविध कौशल्य विकास योजनांचा लाभ मिळवून देण्यात येतो. बालकामगारांना अनौपचारिक शिक्षणाबरोबरच त्यांच्यातील कौशल्य व कलागुणांना वाव मिळावा, यासाठी विविध ट्रेडचे व्यवसायपूर्ण प्रशिक्षण देण्यात येते तसेच प्रकल्पाचे कार्य व बालकामगार प्रथेविषयी जनमानसात जनजागृती करण्यात येते.

*बालकामगारांना प्रकल्पांतर्गत मिळणारा लाभ*

प्रत्येक बालकामगाराला दरमहा 150 रुपये विद्यावेतन देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी मित्र अभ्यासक्रमाचा विशेष प्रशिक्षण केंद्रात अवलंब करण्यात येतो, शालेय पोषण आहार, पाठ्यपुस्तके आणि आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात, बालकामगारांना त्यांच्या आवडीनुसार तसेच त्यांच्यातील कौशल्यास अनुरूप असे व्यवसाय पूर्ण प्रशिक्षण देण्यात येते, बालकामगारांना विविधांगी उपक्रमातून शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात येते. तसेच जीवन कौशल्य राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पामार्फत बालकामगारांना जीवन कौशल्य विषयाचा प्रभावी संवाद कौशल्य, स्वत:ची जाणीव, प्रभावी नेतृत्व, निर्णयक्षमता, ध्येय निश्चिती, भावनिक समायोजन, कल्पकता, निरीक्षण निरोगी जीवन यासारख्या विविध विषयांच्या माध्यमातून भावी आयुष्यात सुजाण नागरिक घडविण्याचे प्रयत्न केले जातात.

अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात प्रकल्पाचे कामकाज सुयोग्यरित्या सुरू आहे. प्रकल्पाच्या सुरूवातीपासून 2017 पर्यंत 4 हजारांपेक्षा जास्त बालकामगारांना नियमित शाळेत दाखल करण्यात आले आहे. तसेच प्रकल्पामार्फत बालकामगारांना जन्म दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, संजय गांधी निराधार योजना, सुकन्या योजना, मतदान ओळखपत्र, जीवनदायी योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. यासाठी राज्य शासनाने 1986 सालापासून बालकामगार विरोधी कायदा बनविला असून या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाल्यास भविष्यात बालकामगार होण्यास आळा बसेल.

मुले शिकावी म्हणून अशा अनेक योजना शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयामार्फत राबविल्या जात आहेत. राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाच्या माध्यमातून बालकामगार होवू नये म्हणून सजगता निर्माण केली जात आहे. त्याला जिल्हास्तरावर भरघोस प्रतिसाद मिळत आहे, हेच या प्रकल्पाचे खरे यश आहे.

लेखिका: सारिका फुलाडी,
माहिती व जनसंपर्क कार्यालय, नागपूर.
माहिती स्रोत: महान्युज
========================
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र
*दिनविशेष चाचणी सोडविण्यासाठी वरील लिंक क्लीक करा*
======================

12 जून

💥🌸दिनविशेष🌸💥*

      *श्रीधर आजगावकर*

          *वैद्यकशास्त्रज्ञ*

*स्मृतिदिन - १२ जुन १९९४*

डॉ. श्रीधर शांताराम आजगावकर यांचा जन्म, तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवणमध्ये झाले. इंटर सायन्सपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत व वैद्यकीय शिक्षण पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झाले. त्यांनी उच्च वैद्यकीय शिक्षण डब्लिन व विएन्ना येथे घेतले. त्यांनी ‘डोळ्यांचे विकार’ या विषयात प्रावीण्य मिळविले. त्यानंतर मालवणला येऊन त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. पण ढोबळ व्यवसायापेक्षा वाचन व संशोधन यांत त्यांना विशेष रस वाटे. मालवणला १५ वर्षे व्यवसाय करत असताना, त्या काळात त्यांचे काका व वडील मधुमेहाने वारले. त्या वेळी भारतात मधुमेहाविषयी खास माहिती नव्हती. रुग्णही फार कमी होते. त्यामुळे आजच्यासारखे खास मधुमेहतज्ज्ञही नव्हते. आपले काका व वडील मधुमेहाने वारल्यामुळे डॉ.आजगावकरांना मधुमेहाविषयी कुतूहल वाटले व नंतर जिद्दीने त्या रोगावर  काम करण्यासाठी ते मुंबईत आले.

मुंबईत आल्यावर ते ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयामधील वैद्यकशास्त्राचे तज्ज्ञ डॉ.रा.वि. साठे यांना भेटले. डॉ.साठेंमध्ये त्यांना गुरू भेटला. डॉ.साठेंनी त्यांना सांगितले, ‘‘पश्चिम महाराष्ट्रात मला आता मधुमेही दिसू लागले आहेत. पण त्यांच्यावर उपचार करायला कोणी डॉक्टर नाहीत. तुम्ही नेत्रविशारद म्हणून काम न करता, मधुमेहावर लक्ष केंद्रित करा. चाचण्या, उपचार शोधून काढा.’’ १९४५ साली आजगावकरांनी नेत्रविकारतज्ज्ञ म्हणून करत असलेला व्यवसाय थांबवला आणि मधुमेहावर काम सुरू केले. त्या काळी अशी ध्येयाने प्रेरित झालेली खूप माणसे असायची. डोळ्याचे मर्यादित क्षेत्र सोडून मधुमेहासारखे विशाल क्षेत्र संशोधनाला मिळाले म्हणून डॉ.आजगावकर खूप समाधानी होते. संशोधन चालू असताना त्यांच्या लक्षात आले, की दृक्पटलावर (रेटायना) काही बदल दिसून आले होते, ते रुग्णाला झालेल्या मधुमेहामुळे असावेत. जसे वाचन व संशोधन वाढले, तसे त्यांच्या लक्षात आले की मधुमेह हा सर्व शरीरव्यापी रोग आहे. त्याचा शरीरावर होणारा प्रसार वेळीच नियंत्रित केला पाहिजे. त्यासाठी ते आयुर्वेदाकडे वळले. आयुर्वेदाने मधुमेहाबद्दल काय विचार केला आहे, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. आयुर्वेदातील जसद भस्माच्या उपचारपद्धतीचा डॉक्टरांनी अ‍ॅलोपथीच्या पद्धतीने अभ्यास सुरू केला. हे सर्व प्रयोग त्यांनी डॉ.साठेंच्या मार्गदर्शनाखाली जे.जे. रुग्णालयात केले. १९४५ ते १९६० या कालावधीत डॉ.आजगावकर सातत्याने मधुमेहावर काम करत होते. १९४८ साली प्रायोगिक पद्धतीवर त्यांनी स्वत:चे केंद्र सुरू केले. १९६० साली जे.जे. रुग्णालयात मधुमेह उपचाराचे केंद्र सुरू झाले. डॉ.आजगावकरांनी डॉ.साठेंचे स्वप्न पुरे केले. या केंद्रामुळे मधुमेहावर उपचार करणारे डॉक्टर्स तयार झाले. डॉ.आजगावकरांच्या संशोधनास १९६० साली ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने मान्यता दिली.

आजगावकरांचे कार्य ‘रोग्यांवर फक्त उपचार करणे’ एवढ्यापुरते मर्यादित नव्हते. त्या काळी सामान्य लोकांना मधुमेहाविषयी काहीच माहिती नव्हती. लोकांना मधुमेहाची सबंध माहिती देऊन सज्ञान करणे आवश्यक होते. ते काम त्यांनी हातात घेतले. मधुमेहाची लक्षणे कोणती, त्याचे निदान पक्के करण्यासाठी काय चाचण्या करायच्या, औषधे कोणती व कधी घ्यायची, आहारावरील पथ्ये काय असावीत, व्यायाम कसा, केव्हा व किती करायचा, ही सर्व माहिती त्यांनी भाषणरुपात देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मुंबई आणि नंतर सबंध भारतात फिरुन ते भाषणे देत असत. त्यासाठी त्यांनी स्लाइड्स केल्या होत्या व स्वत:चा स्लाइड प्रोजेक्टर बरोबर घेऊन जात असत. भाषणे मराठी व इंग्रजीतून असत. विशेषत: वैद्यकीय महाविद्यालये, इंडियन मेडिकल कौन्सिल व सामाजिक संस्था यांमध्ये जाऊन त्या काळी नवीन असणाऱ्या या रोगाविषयी माहिती देणे त्यांना फार आवडे. जणू या प्रेषणकार्याचे त्यांनी व्रतच घेतले होते. या कार्यात मानधनाची अपेक्षा न करता, त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते.

त्यांनी तज्ज्ञांसाठी चर्चासत्रे आयोजित केली. या कार्याची व्याप्ती वाढल्यावर त्यांनी ‘डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीझ’ची स्थापना केली. या संस्थेत त्यांनी कार्यवाह, उपाध्यक्ष, अध्यक्ष अशा निरनिराळ्या पदांवर काम केले. भारताच्या वेगवेगळ्या राज्यांत या संस्थेच्या ३२ शाखा काढल्या.

आजगावकरांनी मधुमेहावर मराठी व इंग्रजीत पुस्तके लिहिली. या पुस्तकांना पाठ्यपुस्तकांचे महत्त्व प्राप्त झाले. डॉक्टरांनी पुढाकार घेऊन मुंबईतील माहीम येथे खास मधुमेहींसाठी २०० खाटांचे अद्ययावत रहेजा रुग्णालय काढले.

‘आंतरराष्ट्रीय मधुमेह संस्थे’च्या कार्यकारिणीचे ते १९६४ सालापासून सभासद होते. त्यानंतरच्या २६ वर्षांमधील सर्व वार्षिक परिषदांना त्यांची उपस्थिती होती. त्यांच्या प्रयत्नाने १९७६ साली दिल्लीत आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद भरली होती. त्या परिषदेत आंतरराष्ट्रीय संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली व पुढे १९७९ साली अध्यक्ष म्हणूनही निवड झाली.

मराठी विज्ञान परिषदेच्या स्थापनेपासून (१९६६) ते परिषदेशी निगडित होते. कार्यकारिणी सभासदापासून विश्वस्त व सन्माननीय सदस्य अशी वेगवेगळी पदे त्यांनी भूषविली.

१९५२ साली आजगावकरांच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी मधुमेहाच्या संस्था, ‘मराठी विज्ञान परिषद’, ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय’ इत्यादी संस्थांसाठी आयुष्य वेचले.
             - डॉ. शशिकांत प्रधान
       स्त्रोत:-दिनविशेष व विज्ञान
https://bit.ly/2MNicff

11 जून

*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*

        *११ जुन १९३५*

*एडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.*

एफ.एम. हे फ्रीक्वेंसी मॉड्युलेशन (Frequency modulation) चे लघुरुप आहे. या मध्ये तरंगलांबी किंवा तरंगउंची न बदलता वारंवारिता बदल करून संदेशाचे प्रसारण केले जाते.

याचा वापर रेडिओमध्ये करण्याचा शोध एड्विन आर्मस्ट्राँग याने १९१४ मद्ये लावला. याव्दारे बाह्य वातावरणातील आवाज संदेशातुन वगळले जातात.
*--------------------------------*

*एडविन हावर्ड आर्मस्ट्रांग (18 दिसंबर, 1890 से फरवरी 1, 1954) एक अमेरिकी था आविष्कारक और 20 वीं सदी के महान इंजीनियरों में से एक।* उन्होंने कहा कि सबसे अच्छा एफएम (आवृत्ति मॉडुलन) रेडियो के लिए प्रौद्योगिकी के विकास के लिए जाना जाता है। आर्मस्ट्रांग ने अपने आविष्कार के लिए कई पेटेंट जीता और 1980 में फेम के राष्ट्रीय आविष्कारक हॉल में शामिल किया गया।

*शिक्षा*
आर्मस्ट्रांग केवल 11 साल की उम्र में जब था गुग्लिएल्मो मार्कोनी बनाया प्रथम ट्रान्स-अटलांटिक रेडियो प्रसारण । रोमांचित, युवा आर्मस्ट्रांग रेडियो का अध्ययन और निर्माण घर का बना वायरलेस उपकरणों, अपने माता पिता के पिछवाड़े में एक 125 फुट एंटीना सहित शुरू कर दिया। विज्ञान और प्रौद्योगिकी में उनकी रुचि कोलंबिया विश्वविद्यालय, जहां उन्होंने स्कूल के हार्टले प्रयोगशालाओं में अध्ययन किया और अपने प्रोफेसरों के कई पर एक मजबूत छाप छोड़ी को आर्मस्ट्रांग ले लिया। वह इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग में डिग्री के साथ 1913 में कॉलेज समाप्त हो गया।

*एफ एम रेडियो*
आर्मस्ट्रांग सबसे अधिक के लिए जाना जाता है आवृत्ति मॉडुलन की खोज करने , या एफएम रेडियो, 1933 में एफएम स्थिर बिजली के उपकरणों और पृथ्वी के वायुमंडल की वजह से नियंत्रित करने के द्वारा रेडियो के ऑडियो संकेत सुधार हुआ। इससे पहले, आयाम मॉड्यूलन (एएम) रेडियो अत्यंत ऐसे हस्तक्षेप है, जो क्या आर्मस्ट्रांग के लिए प्रेरित किया पहली जगह में समस्या की जांच के लिए गया था करने के लिए अतिसंवेदनशील हो गया था। उन्होंने कोलंबिया विश्वविद्यालय के दर्शन हॉल के तहखाने में अपने प्रयोगों का आयोजन किया। सन् 1933 में आर्मस्ट्रांग अपने एफएम प्रौद्योगिकी के लिए एक “उच्च आवृत्ति दोलन रेडियो प्राप्त करने की विधि के लिए” अमेरिका के पेटेंट 1,342,885 प्राप्त किया।

फिर, आर्मस्ट्रांग केवल एक ही इस तरह की तकनीक के साथ प्रयोग नहीं किया गया। अमेरिका के रेडियो कॉर्पोरेशन (आरसीए) के वैज्ञानिकों ने भी आवृत्ति मॉडुलन तकनीक का परीक्षण कर रहे थे रेडियो प्रसारण में सुधार होगा। सन् 1934 में आर्मस्ट्रांग आरसीए के अधिकारियों के एक समूह को अपने नवीनतम खोज प्रस्तुत; वह बाद में एम्पायर स्टेट बिल्डिंग के शीर्ष पर एक एंटीना का उपयोग कर तकनीक की शक्ति का प्रदर्शन किया। आरसीए, हालांकि, प्रौद्योगिकी के क्षेत्र में निवेश करने के लिए नहीं करने का फैसला और इसके बजाय टेलीविजन प्रसारण पर जोर दिया।
आर्मस्ट्रांग ने अपनी खोज में विश्वास है, हालांकि नहीं खोया था। उन्होंने कहा कि को परिष्कृत और एफएम रेडियो प्रौद्योगिकी को बढ़ावा देने के लिए जारी रखा, पहले जैसे कि जनरल इलेक्ट्रिक छोटी कंपनियों के साथ भागीदारी कर और उसके बाद संघीय संचार आयोग (एफसीसी) के लिए प्रौद्योगिकी पेश करके। आरसीए के अधिकारियों के विपरीत, एफसीसी प्रस्तुति में उन आर्मस्ट्रांग के प्रदर्शन से प्रभावित थे; जब वह उन्हें एफएम रेडियो पर एक जाज रिकॉर्डिंग खेला, वे ध्वनि की स्पष्टता के घेरे में आ गए थे।

1930 के दशक से अधिक एफएम प्रौद्योगिकी में सुधार मौजूदा प्रौद्योगिकियों के साथ यह अधिक से अधिक प्रतिस्पर्धी बना दिया। 1940 में, एफसीसी जो 40 चैनलों के साथ अगले वर्ष शुरू की एक वाणिज्यिक एफएम सेवा, बनाने का फैसला किया। हालांकि, के फैलने के द्वितीय विश्व युद्ध के संसाधन है कि नया रेडियो बुनियादी ढांचे की ओर लगाया जा सकता सीमित कर दिया। आरसीए-जो अभी भी AM उपयोग कर रहा था के साथ टकराव प्रसारण-भी लेने से एफएम रेडियो को रोका। यह युद्ध है कि तकनीक लोगों का समर्थन जीतने के लिए शुरू किया के बाद जब तक नहीं था।

1940 में, आरसीए, यह देखकर कि यह तकनीकी दौड़ खो रही थी, आर्मस्ट्रांग के पेटेंट के लाइसेंस की कोशिश की, लेकिन वह पेशकश ठुकरा दी। इसके बाद कंपनी अपने स्वयं के एफएम प्रणाली विकसित की। आर्मस्ट्रांग पेटेंट के उल्लंघन का आरोप लगाया आरसीए और कंपनी के खिलाफ मुकदमेबाजी शुरू किया, खो रॉयल्टी के लिए नुकसान को जीतने की उम्मीद में।
========================
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र
*दिनविशेष चाचणी सोडविण्यासाठी वरील लिंक क्लीक करा*
======================
📡📲 *तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
*महाराष्ट्र करू स्मार्ट* 📡📲

बुधवार, १० जून, २०२०

10 जून



  *जागतिक दृष्टीदान दिन*

10 जून

      नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी 10 जून हा दिवस जागतिक दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जागृती करण्यात येते. तुम्ही घेतलेल्या एका निर्णयामुळे एखाद्याचे आयुष्य सुंदर आणि सुखकर होऊ शकते. आज जागतिक दृष्टिदान दिनाच्या निमित्ताने दृष्टीदान विषयी माहिती जाणून घेऊया.

आज जागतिक दृष्टीदान दिन आहे. डोळा हा मानवी शरीराचा मुख्य अवयव आहे. दृष्टी नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर जग पाहता येत नाही. परंतु, या अतिशय महत्वाच्या अवयवाची आपण काळजी घेत नाही. सध्या मोबाईल, इंटरनेट यामुळे जग खूप जवळ आले असले, तरी त्याच्यामुळे लोकांना अंधत्व येण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. अंध लोकंची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
*जागतिक दृष्टीदान दिनाचा उद्देश्य*
जागतिक दृष्टीदान दिनाचे उध्दिष्टये नेत्रदानाचे महत्व या बद्दलची जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे आहे.विकासशील देशांमध्ये प्रमुख सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांपैकी अंधत्व ही मुख्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानि आणि अंधत्वच्या मुख्य कारणांपैकी आहे. 
 
*डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?*
*चांगल्या दृष्टीक्षेपासाठी निरोगी आहाराचे सेवन करावं:* - आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, अंडी, बीन्स, आणि गाजराचा समावेश जास्तीत जास्त करावा.

*धूम्रपान सोडावं :*- धूम्रपान केल्यामुळे मोतीबिंदू, ऑप्टिक आणि मज्जातंतूच्या नुकसानासह दृष्टी संबंधित समस्या उद्भवतात. 
*सूर्याच्या थेट प्रकाशापासून वाचण्यासाठी यूव्ही सनग्लासेस वापरा:* - जे आपल्या डोळ्यांचा संरक्षणासाठी चांगले आहेत.
*सेफ्टी ग्लासेस वापरा* :- आपण कार्यस्थळी धोकादायक पदार्थासोबत काम करीत असल्यास आपल्याला आपले डोळ्यांच्या संरक्षणासाठी सेफ्टी ग्लासेस घालणे आवश्यक आहे.
*संगणकावर बऱ्याच काळ काम करीत असल्यास*: वारंवार जागेवरून उठा. डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी डोळ्यांची उघडझाप करा.
*टीव्ही बघताना किंवा संगणकावर काम करतांना अँटी ग्लेयर चष्माचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.*
*कमी प्रकाशात वाचू नका :* डोळ्यांच्या त्रासांसाठी हे देखील कारणीभूत असतं.
*डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमाने डोळ्यांची तपासणी करा.*
* खिडकी किंवा दिव्यांमधून येणार थेट प्रकाश संगणकावर पडू देउ नये. डोळ्यांवर चकाकी पासून वाचण्याचा प्रयत्न करा. गरज असल्यास अँटी ग्लेयर स्क्रीनचा वापर करा.
*कॉन्टॅक्ट लॅन्सचा वापर करीत असाल तर जास्त काळ घालण्यापासून टाळावं:* कॉन्टॅक्ट लॅन्स वापरताना पोहणे आणि झोपणे टाळा. 
 
*असे बरेच कारणे आहेत ज्यामुळे लोकं नेत्रदान करत नाही.* भारतामधील नेत्रदान करणाऱ्यांची संख्या खालील कारणांमुळे अत्यंत कमी आहे-
1 सामान्य लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव 
2 संस्था आणि रुग्णालयात अपूर्ण सुविधा
3 प्रशिक्षित असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये इतरांना प्रेरित करण्याची क्षमता नसणे
4 सामाजिक आणि धार्मिक मान्यता

*वयाचे 1 वर्ष पूर्ण केलेला कोणताही व्यक्ती नेत्रदान करू शकतो...*
भारतामध्ये असलेल्या कायद्यानुसार, नेत्र दान हे मरणोत्तर करावे असे असले तरी, वयाचे एक वर्ष पूर्ण केलेला कोणताही व्यक्ती हा नेत्रदान करू शकतो. हे नेत्रदान मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह, उच्च मानसिक त्रास आणि चष्मा वापरत असणारे व्यक्तीही करु शकतात. आपल्या मृत्यू पत्रात नेत्रदानाची इच्छा व्यक्त करून आणि त्याविषयी जवळच्या नातेवाईकांना कल्पना देऊन मृत व्यक्तीचे डोळे पुढे कोणाच्यातरी उपयोगी पडू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर त्या मृतदेहाची जबाबदारी ही त्या व्यक्तीच्या वारसदाराची असते. मृत व्यक्तीच्या नेत्रदानासाठी त्याच्या वारसदाराची परवानगी घेणे आवश्यक असते. वारसदाराने परवानगी नाही दिली तर नेत्रदान होऊ शकत नाही. तसे मृत व्यक्तीने इच्छा व्यक्त केली नसली तरी वारसदाराच्या इच्छेने नेत्रदान केल्या जाऊ शकते. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने किमान दोन जणांना असंख्य रंगांनी बहारलेले नयनरम्य जग बघता येऊ शकते.

*जगाच्या एक तृतीयांश अंध लोक भारतात...*
संपूर्ण जगात ४५ दशलक्ष अंध लोक आहेत. त्यापैकी एक तृतीयांश म्हणजेच १५ दशलक्ष अंध लोक हे भारतात आहेत. भारतासह जगभरातल्या असंख्य देशांमध्ये गरिबीमुळे पोषण आहार न मिळाल्याने, अपघात, विविध आजार अशा विविध कारणांमुळे अनेकांना अंधत्व येते अशी नोंद आहे. अकाली अंधत्व आलेल्या लोकांवर ऑपरेशन करून नवीन दृष्टीपटल बसवून दृष्टी परत दिल्या जाऊ शकते.

*मृत्युनंतर 6 ते 8 तासाच्या आत नेत्रदान करणे गरजेचे*
नेत्रदान करणाऱ्या व्यक्तिच्या मृत्युनंतर 6 ते 8 तासाच्या आत नेत्रदान करणे गरजेचे असते. ज्या व्यक्तिला नेत्रदानासाठी कॉर्नियाचा वापर करायचा आहे, त्याला 24 तासाच्या आत कॉर्नियाचे प्रत्यारोपन करणे गरजेचे असते. नेत्रदानाचा अर्थ शरिरातून संपूर्ण डोळा काढून घेणे असा होत नाही. यात मृत व्यक्तीच्या डोळ्याचा कॉर्नियाचा वापर करण्यात येतो.

*तुम्हीही करू शकता नेत्रदान*
नेत्रदानाची प्रक्रिया मृत्युच्या काही तासांमध्ये करण्यात येते आणि यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. एका मृत्यू झालेल्या व्यक्तीने डोळे एका नेत्रहीन व्यक्तीला देण्यात येते. त्यामुळे त्या अंध व्यक्तीचे प्रकाशम य होते. तुम्हालाही एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उजळून टाकायचे असेल तर आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये संपर्क करून नेत्रदानासाठी नोंदनी करू शकता.
========================
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र
*दिनविशेष चाचणी सोडविण्यासाठी  लिंक क्लीक करा*
===================

10 जून

*आंद्रे-मरी ॲंपियर*

*विद्युतचुंबकीयत्वाचा शोध*

*स्मृतिदिन - १० जुन १८३६*

आंद्रे-मरी ॲंपियर (जानेवारी २०, इ.स. १७७५ - जून १०, इ.स. १८३६) हा फ्रांसचा भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होता.

याने विद्युतचुंबकीयत्वाचा शोध लावला.सोलेनॉइडआणि इलेक्ट्रिकल टेलीग्राफ सारख्या असंख्य अनुप्रयोगांचे ते शोधक देखील आहेत. ॲंपियर हे फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य आणि इकोले पॉलीटेक्निक आणि कोलेज डे फ्रान्सचे प्रोफेसर होते. विद्युतप्रवाहाच्या एककाला याचे नाव (ॲंपियर) देण्यात आले आहे.

विद्युतप्रवाह तारेतून वाहत असताना तो मोजण्याचे माप म्हणजे अॅम्पिअर (Ampere) होय. हे मोजण्याच्या साधनाला अॅमिटर (Ammeter) असे म्हणतात.  फ्रेंच शास्त्रज्ञ आंद्रे ऍम्पीअर याने वीजप्रवाह कसा मोजायचा, ते शोधून काढले. त्याच्याच नावाने हे मोजमाप मग प्रचलित झाले आहे.
विद्युत प्रवाह वाहतो म्हणजे तारेतील इलेक्ट्रॉन एका दिशेने वाहत असतात. विजेचा दिवा लावला असताना त्याच्या तारेतून एका सेकंदाला तीन मिलियन मिलियन मिलियन इतके इलेक्ट्रॉन वाहतात. एक मिलियन म्हणजे एक दशलक्ष. आकडा बरोबर लिहिण्यासाठीसुद्धा मिनिटभर लागेल.
मग हे सारे सोप्या शब्दात व्यक्त करण्यासाठी आपण विद्युतप्रवाह अँपिअरध्ये मोजतो. याचा उच्चार थोडक्यात अँप असाही करतात. एक अँपिअर म्हणजे दर सेकंदाला ६ मिलियन मिलियन मिलियन इलेक्ट्रॉनचा प्रवाह होय.
अॅमिटरने जेव्हा विद्युतप्रवाह मोजतात, तेव्हा हा अॅमिटर विजेच्या 'सर्किट'मध्ये जोडला जातो. त्यावरचा काटा किती वीजप्रवाह वापरला जात आहे, हे तात्काळ दर्शवतो.
घरगुती वापरासाठी आपण अर्धा ते पाच अँपिअरचा वीजप्रवाह वापरत असतो. इस्त्री, विजेची शेगडी, पाणी तापवायचा गिझर यांन जास्त वीजप्रवाह लागतो. तर विजेचे दिवे, ट्यूबलाइट, पंखे यांना जेमतेम अर्धा ते एक अँपिअरचा प्रवाह लागतो. विजेचा प्रवाह जितका जास्त लागणार असेल तितकी विजेच्या तारांची जाडी वाढवावी लागते. एखाद्या कारखान्याच्या विजेच्या तारा घरातील तारांपेक्षा किती जाड असतात, ते लक्ष देऊन बघण्यासारखे असते.
वीजप्रवाहाचा एक महत्त्वाचा गुणधर्म हा की त्यामुळे चुंबकसूची हलते म्हणजे चुंबक क्षेत्र निर्माण होते. दुसरा महत्त्वाचा गुणधर्म हा की वीजप्रवाहाने उष्णता निर्माण होते. जितका वीजप्रवाह जास्त तितकी त्याची उष्णता निर्माण करण्याची शक्ती वाढत जाते. वेल्डिंग मशीनमधील पन्नास ते तीनशे ॲम्पिअरचा प्रवाह धातु वितळवण्याइतकी सुद्धा उष्णता निर्माण करू शकतो.
साभार:- स्रोत

9 जून दिनविशेष

💥🌹आजचा दिनविशेष🌹💥
         *जार्ज स्टीफेन्सन*

       *रेल्वे इंजिनचे जनक*

      *जन्मदिन - ९ जुन १७८१*

       जॉर्ज स्टीफेन्सन यांचा जन्म 9 जून, 1781 रोजी ब्रिटनमध्ये विलेम शहरात झाला होता.
जॉर्ज स्टीफनसन  मेकॅनिकल अभियंता होता जो स्टीम लोकोमोटिव्हज शोधण्यासाठी ओळखला जात होता.त्याच्या शोधामुळे औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या वस्तू आणि प्रवाशांची वाहतूक संपूर्ण ठिकाणी झाली. त्याच्या शोधामुळे युरोपमध्ये एक चांगला बदल घडून आला.
जॉर्ज स्टीफनसन या ब्रिटिश इंजिनियरचा जन्म सन १७८१ मध्ये एका निरक्षर कुटुंबात झाला. त्याला लहानपणी शाळेत जायची संधी मिळाली नाही. 
वयाच्या अठराव्या वर्षी तो कोळशाच्या खाणीत मजूर म्हणून नोकरीला लागला. त्यानंतर त्याने रात्रीच्या शाळेत जाऊन शिक्षण घेतले, तसेच स्वतःच्या हुषारीने खाणींमधील सर्व यंत्रे कशी चालतात हे उत्तमरीत्या समजून घेऊन तो त्यांची दुरुस्ती करण्यात प्रवीण झाला आणि मालकांच्या मर्जीतला झाला. त्याला नवीन कामे करण्याची संधी मिळाली. त्या काळात नव्याने निघालेल्या वाफेच्या इंजिनांवरून प्रेरणा घेऊन त्याने सन १८१४ मध्ये प्रथम एका कोळशाच्या खाणीसाठी एक इंजिन तयार केले. त्यानंतर त्याने अनेक सुधारणा करून एकाहून एक वरचढ अशी नवनवी इंजिने तयार केली.  सन १८२५ मध्ये त्याने तयार केलेल्या लोकोमोशन नावाच्या इंजिनावर चालणारी जगातली पहिली सार्वजनिक रेल्वे सेवा सुरू झाली.  त्यानंतर त्याने सन १८३० मध्ये रॉकेट नावाचे इंजिन तयार केले, स्वतःची कंपनी सुरू केली आणि रेल्वे इंजिने पुरवायला तसेच रेल्वे लाइनी बांधायला सुरुवात केली. लवकरच इंग्लंडशिवाय युरोप आणि अमेरिकेतसुद्धा स्टीफनसनची इंजिने धावायला लागली.

यावरून असे दिसते की एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातले अनेक इंजिनियर वाफेवर चालणारे फिरते इंजिन तयार करण्याचा प्रयत्न करीत होते. रुळावरून चालणाऱ्या पण घोडे जुंपलेल्या गाड्या त्याच्याही आधीच सुरू झाल्या होत्या, पण त्या मुख्य करून खाणींमध्ये किंवा कारखान्यांमधले जड सामान वहाणाऱ्या मालगाड्या होत्या. घोड्यांच्या जागी वाफेवर चालणारे स्वयंचलित इंजिन लावले तर ते जास्त शक्तीशाली असेल, अधिक काम करेल आणि फायद्याचे ठरेल या विचाराने हे सगळे प्रयत्न चालले होते आणि त्यांना थोडे थोडे यश येतही होते.  जॉर्ज स्टीफनसन याने या इंजिनांमध्ये चांगले क्रांतिकारक बदल घडवून आणले. ती इंजिने आकाराने सुटसुटीत झाली, ती सुरळीत, सुरक्षित आणि खात्रीपूर्वक काम करायला लागली. त्यामुळे प्रवाशांना घेऊन जाणारी सार्वजनिक रेल्वे वाहतूक सुरू करणे शक्य झाले. पहिल्या अशा सेवेचे यश पाहून इंग्लंडमध्ये देशभर रेल्वे कंपन्या निघाल्या आणि पुढे लवकरच रेल्वेचे जाळे जगभर पसरले.  यामुळे जॉर्ज स्टीफनसन इतक्या मोठ्या प्रकाशझोतात आला की त्यानेच रेल्वे इंजिनाचा शोध लावला असे म्हणून त्याचेच नाव घेतले जाऊ लागले आणि आजही त्यालाच रेल्वेचा जनक मानले जाते.
*====================*
George Stephenson (9 June 1781 – 12 August 1848) was an English civil engineerand mechanical engineer. Renowned as the "Father of Railways",[1] Stephenson was considered by the Victorians a great example of diligent application and thirst for improvement. Self-help advocate Samuel Smiles particularly praised his achievements. His chosen rail gauge, sometimes called 'Stephenson gauge',[i] was the basis for the 4 feet 8 1⁄2 inches (1,435 mm) standard gaugeused by most of the world's railways.

Pioneered by Stephenson, rail transport was one of the most important technological inventions of the 19th century and a key component of the Industrial Revolution. Built by George and his son Robert's company Robert Stephenson and Company, the Locomotion No. 1 is the first steam locomotive to carry passengers on a public rail line, the Stockton and Darlington Railwayin 1825. George also built the first public inter-city railway line in the world to use locomotives, the Liverpool and Manchester Railway, which opened in 1830.
========================
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र
*दिनविशेष चाचणी सोडविण्यासाठी वरील लिंक क्लीक करा*
======================
📡📲 *तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
*महाराष्ट्र करू स्मार्ट* 📡📲

8 जून दिनविशेष

*टिम बर्नर्स ली*

*इंटरनेटचे जनक*
*विश्व व्यापी वेब (www) चे अविष्कारक*

*जन्म: ८ जून, १९५५*

सर टीम बर्नर्स ली (जन्म: ८ जून १९५५-हयात) हे जागतिक माहितीजालाचे जनक आहेत. य़ुरोपीयन नाभिकीय सन्शोधन संस्थेत (सर्न) असताना त्यानी २५ डिसेम्बर १९९० रोजी क्लायन्ट सर्वर संवादाचा (जागतिक माहितीजालाच्या सुरळीत कार्यासाठी आवश्यक असणारा घटक) प्रयोग यशस्वी करून दाखविला. ते सध्या वर्ल्ड वाईड वेब कोन्सोर्टियमचे निर्देशक आणि एम आय टी संगणकशास्त्र आणि कृत्रिम बुद्धीमत्ता प्रयोगशाळेत ३कौम संस्थापक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

टिम बरनर्स् ली का जन्म 8 जून, 1955 को इंगलैंड में हुआ था। माता पिता दोनो गणितज्ञ थे। कहा जाता है कि उन्होने टिम को गणित हर जगह, यहां तक कि खाने की मेज पर भी बतायी।
टिम ने अपनी उच्च शिक्षा क्वीनस् कॉलेज, ऑक्सफ़ोर्ड विश्वविद्यालय से पूरी की। विश्वविद्यालय में उन्हें अपने मित्र के साथ हैकिंग करते हुऐ पकड़ लिया गया था। इसलिये उन्हें विश्वविद्यालय कंप्यूटर का प्रयोग करने से मना कर दिया गया। 1976 में, उन्होने विश्विद्यालय से भौतिक शास्त्र में डिग्री प्राप्त की।
वेब तकनीक - अविष्कार
सर्न (en:CERN) यूरोपियन देशों की नाभकीय प्रयोगशाला है। टिम 1984 से वहीं फेलो के रूप में काम करने लग गये। वहां हर तरह के कंप्यूटर थे जिन पर अलग अलग के फॉरमैट पर सूचना रखी जाती थी। टिम का मुख्य काम था कि वे सूचनाये एक कंप्यूटर से दूसरे पर आसानी से जा सकें। उन्हे लगा कि क्या कोई तरीका हो सकता है कि इन सब सुचनाओं को इस तरह से पिरोया जाय कि ऐसा लगे कि वे एक जगह ही हैं। बस इसी का हल सोचते सोचते, उन्होने वेब तकनीक का अविष्कार किया और दुनिया का पहला वेब पेज 6 अगस्त 1991 को सर्न में बना। निहःसन्देह यह तकनीक, 21वीं शताब्दी की सबसे लोकप्रिय संपर्क साधन है।
टिम ने इस तकनीक का आविष्कार किया जब वे सर्न में काम कर रहे थे और यह सर्न की बौद्घिक संपदा थी। 30 अप्रैल 1993 को, टिम के कहने पर सर्न ने इस तकनीक को मुक्त कर दिया। अब इसे दुनिया के लिए न केवल मुफ्त, पर मुक्त रूप से उपलब्ध है। इसके लिए किसी को, कोई भी फीस नहीं देनी पड़ती है। यह निर्णय न केवल महत्वपूर्ण था पर इंटरनेट के शुरवाती दौर के निर्णयो के अनुरूप था जो हर तकनीक को मुफ्त व मुक्त रूप से उपलब्ध कराने के लिये कटिबद्ध थे।
टिम, बाद में अमेरिका चले गये। 1994 में उन्होने, मैसाचुसेटस् इंस्टिट्युट ऑफ टेकनॉलोजी में विश्व व्यापी वेब संघ (W3C) की स्थापना की। यह वेब के मानकीकरण में कार्यरत है।
सम्मान
टिम बरनर्स् ली को, 2001 में, रॉयल सोसायटी का सदस्य बनाया गया। 2004 में नाईटहुड की उपाधि दी गयी थी। 13 जून 2007 को, ऑर्डर ऑफ मेरिट, इंगलैंड के सबसे महत्वपूर्ण सम्मान से सम्मानित किया गया। यह सम्मान महारानी द्वारा कला, विज्ञान के क्षेत्र में महत्वपूर्ण योगदान के लिये दिया जाता है। इसी लिये टाइम पत्रिका ने उन्हें, 20वीं शताब्दी के 100 महान वैज्ञानिकों और विचारकों में चुना है।


रविवार, ७ जून, २०२०

7 जून


*अलन ट्युरिंग*

*आधुनिक संगणकाचा जनक*

*स्मृतिदिन - ७ जुन १९५४*

आज आपण संगणक शास्त्राचा वापर करून जी काही तंत्रज्ञानामध्ये प्रगती करत आहोत, त्याचे सर्व श्रेय अॅलन ट्युरिंगकडे जाते. आधीच्या काळी, संगणक हा फक्त त्यामध्ये फिड करण्यात आलेल्या गोष्टी करण्यापुरताच मर्यादित होता. त्यासाठीदेखील खूप कष्ट घ्यावे लागत. ‘त्या’ काळात अतिशय अशक्यप्राय समजली जाणारी गोष्ट म्हणजे मशीनला विचार करायला लावून, तिच्याकडून एखादे काम करवून घेणे. आणि यात अॅलन यशस्वी झाला होता. अॅलन ट्युरिंगच्या कामाचा, प्रोग्रामिंग भाषा तयार करण्यामध्ये मोठा प्रभाव आहे. एवढेच नव्हे तर आज ‘मानवनिर्मित बुद्धिमत्ता’ (Artificial Intelligence) ही जी संगणकीय शास्त्राची एक शाखा आहे, तिचादेखील अॅलन ट्युरिंगच जनक आहे. गूगलची ‘सेल्फ-ड्रायव्हिंग कार’, मायक्रोसॉफ्टचे ‘कोर्टाना’ (Cortana) आणि अॅपलची‘सिरी’ (Siri) हे वैयक्तिक सहाय्यक (PA) अॅप्, Cleverbot, … हे सर्व याच शाखेचे उपयोजनं आहेत.

अॅलन ट्युरिंगला लहानपासुनच गणित व विज्ञानाकडे नैसर्गिक ओढ होती आणि ‘शेर्बोर्ने पब्लिक स्कूल’मध्ये शिक्षकांचा भर हा साहित्यावर होता. अॅलन ट्युरिंगची गणित आणि विज्ञानाविषयी असलेली आवड हि अभ्यासाच्या बाहेरील होती.
तेव्हा तेथील शिक्षकांनी अॅलनच्या आईला बोलावून, ‘त्याला जर वैज्ञानिक क्षेत्रात कारकीर्द करायची असेल तर तो येथे त्याचा वेळ वाया घालवत आहे.’ असे स्पष्टपणे सांगितले होते.
लहानपणीच ‘कॅल्क्युलस’ (गणिताचा एक प्रकार) न शिकताच तो गणितातील अतिशय कठीण
प्रश्न सोडवत असे. वयाच्या १६व्या वर्षी, त्याची आईन्स्टाईनच्या कामाशी ओळख झाली. तेव्हा आईनस्टाईनच्या सर्व कामाचा स्वतःच अभ्यास करून, त्याने त्याच्या नोट्सदेखील बनवल्या होत्या. 

त्याने लिहिलेल्या प्रबंधाने संपूर्ण तंत्रज्ञान पूर्णपणे बदलणार होते. या प्रबंधामुळेच एक नवीन प्रकारच्या मशीन जन्मास आल्या, त्यांना आपण ‘ट्युरिंग मशीन’ (Turing Machine)
म्हणतो. हि एक काल्पनिक/थेरॉटिकल संगणकीय मशीन आहे कि ज्यामध्ये आधीपासूनच काही नियम सेट केलेले असतात, आणि त्या नियमांनुसार मशीनला दिलेल्या इनपुट पासून एक आउटपुट मिळते. थोडक्यात ‘ट्युरिंग मशीन’ हि एक अशी मशीन आहे ज्यामध्ये आधीपासूनच लॉजिक सेट केलेले असते आणि त्याचा वापर करून डेटा वाचू/लिहू शकतो.
साभार:-
दिनविशेष-आणि-विज्ञान