बुधवार, १० जून, २०२०

10 जून



  *जागतिक दृष्टीदान दिन*

10 जून

      नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी 10 जून हा दिवस जागतिक दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जागृती करण्यात येते. तुम्ही घेतलेल्या एका निर्णयामुळे एखाद्याचे आयुष्य सुंदर आणि सुखकर होऊ शकते. आज जागतिक दृष्टिदान दिनाच्या निमित्ताने दृष्टीदान विषयी माहिती जाणून घेऊया.

आज जागतिक दृष्टीदान दिन आहे. डोळा हा मानवी शरीराचा मुख्य अवयव आहे. दृष्टी नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर जग पाहता येत नाही. परंतु, या अतिशय महत्वाच्या अवयवाची आपण काळजी घेत नाही. सध्या मोबाईल, इंटरनेट यामुळे जग खूप जवळ आले असले, तरी त्याच्यामुळे लोकांना अंधत्व येण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. अंध लोकंची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
*जागतिक दृष्टीदान दिनाचा उद्देश्य*
जागतिक दृष्टीदान दिनाचे उध्दिष्टये नेत्रदानाचे महत्व या बद्दलची जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे आहे.विकासशील देशांमध्ये प्रमुख सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांपैकी अंधत्व ही मुख्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानि आणि अंधत्वच्या मुख्य कारणांपैकी आहे. 
 
*डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?*
*चांगल्या दृष्टीक्षेपासाठी निरोगी आहाराचे सेवन करावं:* - आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, अंडी, बीन्स, आणि गाजराचा समावेश जास्तीत जास्त करावा.

*धूम्रपान सोडावं :*- धूम्रपान केल्यामुळे मोतीबिंदू, ऑप्टिक आणि मज्जातंतूच्या नुकसानासह दृष्टी संबंधित समस्या उद्भवतात. 
*सूर्याच्या थेट प्रकाशापासून वाचण्यासाठी यूव्ही सनग्लासेस वापरा:* - जे आपल्या डोळ्यांचा संरक्षणासाठी चांगले आहेत.
*सेफ्टी ग्लासेस वापरा* :- आपण कार्यस्थळी धोकादायक पदार्थासोबत काम करीत असल्यास आपल्याला आपले डोळ्यांच्या संरक्षणासाठी सेफ्टी ग्लासेस घालणे आवश्यक आहे.
*संगणकावर बऱ्याच काळ काम करीत असल्यास*: वारंवार जागेवरून उठा. डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी डोळ्यांची उघडझाप करा.
*टीव्ही बघताना किंवा संगणकावर काम करतांना अँटी ग्लेयर चष्माचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.*
*कमी प्रकाशात वाचू नका :* डोळ्यांच्या त्रासांसाठी हे देखील कारणीभूत असतं.
*डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमाने डोळ्यांची तपासणी करा.*
* खिडकी किंवा दिव्यांमधून येणार थेट प्रकाश संगणकावर पडू देउ नये. डोळ्यांवर चकाकी पासून वाचण्याचा प्रयत्न करा. गरज असल्यास अँटी ग्लेयर स्क्रीनचा वापर करा.
*कॉन्टॅक्ट लॅन्सचा वापर करीत असाल तर जास्त काळ घालण्यापासून टाळावं:* कॉन्टॅक्ट लॅन्स वापरताना पोहणे आणि झोपणे टाळा. 
 
*असे बरेच कारणे आहेत ज्यामुळे लोकं नेत्रदान करत नाही.* भारतामधील नेत्रदान करणाऱ्यांची संख्या खालील कारणांमुळे अत्यंत कमी आहे-
1 सामान्य लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव 
2 संस्था आणि रुग्णालयात अपूर्ण सुविधा
3 प्रशिक्षित असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये इतरांना प्रेरित करण्याची क्षमता नसणे
4 सामाजिक आणि धार्मिक मान्यता

*वयाचे 1 वर्ष पूर्ण केलेला कोणताही व्यक्ती नेत्रदान करू शकतो...*
भारतामध्ये असलेल्या कायद्यानुसार, नेत्र दान हे मरणोत्तर करावे असे असले तरी, वयाचे एक वर्ष पूर्ण केलेला कोणताही व्यक्ती हा नेत्रदान करू शकतो. हे नेत्रदान मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह, उच्च मानसिक त्रास आणि चष्मा वापरत असणारे व्यक्तीही करु शकतात. आपल्या मृत्यू पत्रात नेत्रदानाची इच्छा व्यक्त करून आणि त्याविषयी जवळच्या नातेवाईकांना कल्पना देऊन मृत व्यक्तीचे डोळे पुढे कोणाच्यातरी उपयोगी पडू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर त्या मृतदेहाची जबाबदारी ही त्या व्यक्तीच्या वारसदाराची असते. मृत व्यक्तीच्या नेत्रदानासाठी त्याच्या वारसदाराची परवानगी घेणे आवश्यक असते. वारसदाराने परवानगी नाही दिली तर नेत्रदान होऊ शकत नाही. तसे मृत व्यक्तीने इच्छा व्यक्त केली नसली तरी वारसदाराच्या इच्छेने नेत्रदान केल्या जाऊ शकते. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने किमान दोन जणांना असंख्य रंगांनी बहारलेले नयनरम्य जग बघता येऊ शकते.

*जगाच्या एक तृतीयांश अंध लोक भारतात...*
संपूर्ण जगात ४५ दशलक्ष अंध लोक आहेत. त्यापैकी एक तृतीयांश म्हणजेच १५ दशलक्ष अंध लोक हे भारतात आहेत. भारतासह जगभरातल्या असंख्य देशांमध्ये गरिबीमुळे पोषण आहार न मिळाल्याने, अपघात, विविध आजार अशा विविध कारणांमुळे अनेकांना अंधत्व येते अशी नोंद आहे. अकाली अंधत्व आलेल्या लोकांवर ऑपरेशन करून नवीन दृष्टीपटल बसवून दृष्टी परत दिल्या जाऊ शकते.

*मृत्युनंतर 6 ते 8 तासाच्या आत नेत्रदान करणे गरजेचे*
नेत्रदान करणाऱ्या व्यक्तिच्या मृत्युनंतर 6 ते 8 तासाच्या आत नेत्रदान करणे गरजेचे असते. ज्या व्यक्तिला नेत्रदानासाठी कॉर्नियाचा वापर करायचा आहे, त्याला 24 तासाच्या आत कॉर्नियाचे प्रत्यारोपन करणे गरजेचे असते. नेत्रदानाचा अर्थ शरिरातून संपूर्ण डोळा काढून घेणे असा होत नाही. यात मृत व्यक्तीच्या डोळ्याचा कॉर्नियाचा वापर करण्यात येतो.

*तुम्हीही करू शकता नेत्रदान*
नेत्रदानाची प्रक्रिया मृत्युच्या काही तासांमध्ये करण्यात येते आणि यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. एका मृत्यू झालेल्या व्यक्तीने डोळे एका नेत्रहीन व्यक्तीला देण्यात येते. त्यामुळे त्या अंध व्यक्तीचे प्रकाशम य होते. तुम्हालाही एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उजळून टाकायचे असेल तर आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये संपर्क करून नेत्रदानासाठी नोंदनी करू शकता.
========================
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र
*दिनविशेष चाचणी सोडविण्यासाठी  लिंक क्लीक करा*
===================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा