*विद्युतचुंबकीयत्वाचा शोध*
*स्मृतिदिन - १० जुन १८३६*
आंद्रे-मरी ॲंपियर (जानेवारी २०, इ.स. १७७५ - जून १०, इ.स. १८३६) हा फ्रांसचा भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होता.
याने विद्युतचुंबकीयत्वाचा शोध लावला.सोलेनॉइडआणि इलेक्ट्रिकल टेलीग्राफ सारख्या असंख्य अनुप्रयोगांचे ते शोधक देखील आहेत. ॲंपियर हे फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य आणि इकोले पॉलीटेक्निक आणि कोलेज डे फ्रान्सचे प्रोफेसर होते. विद्युतप्रवाहाच्या एककाला याचे नाव (ॲंपियर) देण्यात आले आहे.
विद्युतप्रवाह तारेतून वाहत असताना तो मोजण्याचे माप म्हणजे अॅम्पिअर (Ampere) होय. हे मोजण्याच्या साधनाला अॅमिटर (Ammeter) असे म्हणतात. फ्रेंच शास्त्रज्ञ आंद्रे ऍम्पीअर याने वीजप्रवाह कसा मोजायचा, ते शोधून काढले. त्याच्याच नावाने हे मोजमाप मग प्रचलित झाले आहे.
विद्युत प्रवाह वाहतो म्हणजे तारेतील इलेक्ट्रॉन एका दिशेने वाहत असतात. विजेचा दिवा लावला असताना त्याच्या तारेतून एका सेकंदाला तीन मिलियन मिलियन मिलियन इतके इलेक्ट्रॉन वाहतात. एक मिलियन म्हणजे एक दशलक्ष. आकडा बरोबर लिहिण्यासाठीसुद्धा मिनिटभर लागेल.
मग हे सारे सोप्या शब्दात व्यक्त करण्यासाठी आपण विद्युतप्रवाह अँपिअरध्ये मोजतो. याचा उच्चार थोडक्यात अँप असाही करतात. एक अँपिअर म्हणजे दर सेकंदाला ६ मिलियन मिलियन मिलियन इलेक्ट्रॉनचा प्रवाह होय.
अॅमिटरने जेव्हा विद्युतप्रवाह मोजतात, तेव्हा हा अॅमिटर विजेच्या 'सर्किट'मध्ये जोडला जातो. त्यावरचा काटा किती वीजप्रवाह वापरला जात आहे, हे तात्काळ दर्शवतो.
घरगुती वापरासाठी आपण अर्धा ते पाच अँपिअरचा वीजप्रवाह वापरत असतो. इस्त्री, विजेची शेगडी, पाणी तापवायचा गिझर यांन जास्त वीजप्रवाह लागतो. तर विजेचे दिवे, ट्यूबलाइट, पंखे यांना जेमतेम अर्धा ते एक अँपिअरचा प्रवाह लागतो. विजेचा प्रवाह जितका जास्त लागणार असेल तितकी विजेच्या तारांची जाडी वाढवावी लागते. एखाद्या कारखान्याच्या विजेच्या तारा घरातील तारांपेक्षा किती जाड असतात, ते लक्ष देऊन बघण्यासारखे असते.
वीजप्रवाहाचा एक महत्त्वाचा गुणधर्म हा की त्यामुळे चुंबकसूची हलते म्हणजे चुंबक क्षेत्र निर्माण होते. दुसरा महत्त्वाचा गुणधर्म हा की वीजप्रवाहाने उष्णता निर्माण होते. जितका वीजप्रवाह जास्त तितकी त्याची उष्णता निर्माण करण्याची शक्ती वाढत जाते. वेल्डिंग मशीनमधील पन्नास ते तीनशे ॲम्पिअरचा प्रवाह धातु वितळवण्याइतकी सुद्धा उष्णता निर्माण करू शकतो.
साभार:- स्रोत

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा