बुधवार, २७ मे, २०२०

दिनविशेष 27 मे


*💥🌹दिनविशेष🌹💥*

*🌸पाॅल एडवर्ड योस्ट🌸*

*हाॅट एयर बलुनचा शोध*
*स्मृतिदिन - २७ मे २००७*

Paul Edward Yost (June 30, 1919 – May 27, 2007) was the American inventor of the modern hot air balloon and is referred to as the "Father of the Modern Day Hot-Air Balloon." [1] He worked for a high-altitude research division of General Mills when he helped establish Raven Industries in 1956.

In October 1955, Yost developed and flew the first prototype of the modern hot-air balloon in a tethered flight.[2] The envelope was plastic film, and heat was provided by burning kerosene. This prototype flight uncovered conceptual flaws that Yost worked to overcome.

On 22 October 1960, Yost made the first-ever free flight of a modern hot-air balloon from Bruning, Nebraska.[2] His balloon flew untethered for 1 hour and 35 minutes (1:35) with the aid of heat generated by a propane burner. The balloon's 40-foot (12 m) envelope was sewn from heat-resistant fabric especially selected by Yost for this purpose.[3]After further refining and improving on this designs and materials, in 1963 Yost piloted the first modern balloon flight across the English Channel with crew member Don Piccard in a balloon later named the “Channel Champ.”[2]

In 1976, Yost set 13 aviation world’s records for distance traveled and amount of time aloft in his attempt to cross the Atlantic Ocean —solo— by balloon. He designed and built his balloon, the “Silver Fox," himself, partly in his home garage. It featured a gondola that was shaped like a boat in the event that he would be forced down at sea — which is precisely what occurred. Although he had traveled far in excess of the distance needed to reach Europe from his launch point off the coast of Maine, his flight path began to point South rather than the hoped-for East direction due to inaccurate weather forecasting. The dream was achieved two years later with Yost’s assistance in a Yost-built balloon, Double Eagle II.[2]

Yost also contributed to the advancement of the sport of ballooning and lighter-than-air flight. He helped to found the Balloon Federation of America (BFA) and assisted in the organization of the first U.S. National Ballooning Championship in Indianola, Iowa.[2]

Yost founded the Balloon Historical Society (BHS) in 2002, which dedicated four monuments on the rim of the Stratobowl on 28 July 2004, to memorialize the Stratobowl projects in the 1930s as well as the second flight of a modern hot-air balloon.[4]

On 27 May 2007, Yost died of a heart attack at the age of 87 at his home in Vadito, near Taos, New Mexico. He was buried in the Allison cemetery in Allison, Iowa.
========================
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र
*दिनविशेष चाचणी सोडविण्यासाठी क्लीक करा* 👇👇👇👇👇
======================

सोमवार, २५ मे, २०२०

दिनविशेष 26 मे


*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*

*🌸बेंजामिन पिअरी पाल🌸*

*भारतीय कृषि-वनस्पतिवैज्ञानिक*

*जन्मदिन - २६ मे १९०६*

पाल, बेंजामिन पिअरी : (२६ मे १९०६ - ). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषि-वनस्पतिवैज्ञानिक व ख्यातनाम संशोधक.⇨ तांबेऱ्यासारख्या  रोगांना दाद न देणारे आणि अधिक प्रमाणात उत्पादन देणारे गव्हाचे अनेक उत्तम प्रकार त्यांनी शोधून काढले. शोभिवंत वनस्पतींवरही त्यांनी महत्त्वाचे संशोधन करून गुलाबाचे अनेक प्रकार निर्माण केले.

त्यांचा जन्म पंजाबमधील मुकुंदपूर येथे झाला. त्यांनी ब्रह्मदेशातील रंगून विद्यापीठाची बी.एस्‌सी . (ऑनर्स) ही पदवी १९२८ मध्ये व एम्‌.एस्‌सी . (ऑनर्स) ही पदवी १९२९ मध्ये संपादन केली. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात रोलँड बिफेन व फ्रँक एंगलडो यांच्यासारख्या गव्हावरील संशोधनाकरिता प्रसिद्ध असलेल्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गव्हाच्या नवीन प्रकारांचे प्रजनन व आनुवंशिकी यांविषयी संशोधन करून १९३२ मध्ये पीएच्‌.डी पदवी मिळविली. १९३३ मध्ये ते ब्रह्मदेशात परत आले आणि म्हावबी येथील सेंट्रल राइस रिसर्च स्टेशन या संस्थेत साहाय्यक भात संशोधक अधिकारी म्हणून रुजू झाले. ह्याच वर्षी पुढे त्यांची बिहारमधील पुसा येथील इंपीरियल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट या संशोधन संस्थेत दुय्यम आर्थिक (अनुप्रयुक्त) वनस्पतिवैज्ञानिक या हुद्यावर नेमणूक झाली. १९३७ मध्ये ते ह्याच संस्थेत शाही आर्थिक वनस्पतिवैज्ञानिक व वनस्पतिविज्ञान विभागाचे प्रमुख झाले. १९५० मध्ये ते ह्या संस्थेचे (स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ह्या संस्थेचे नाव इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट असे बदलले गेले) संचालक झाले. या हुद्यावर १५ वर्षे काम केल्यानंतर पाल यांची १९६५ मध्ये इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेचे पहिले महासंचालक म्हणून नेमणूक झाली. या पदावरून १९७२ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते त्याच संस्थेत गुणश्री शास्त्रज्ञ (एमेरिटस् सायंटिस्ट) या नात्याने काही संशोधनात मार्गदर्शन करीत आहेत.

बेंजामिन पिअरी पालपाल यांनीआनुवंशिकी आणि वनस्पतींचे प्रजनन या विषयांवर मूलभूत, महत्त्वपूर्ण व उपयुक्त संशोधन केले. त्यांनी गव्हासंबंधी विशेष संशोधन करून तांबेरा या अतिशय उपद्रवकारक रोगाला प्रतिकार करणाऱ्या गव्हाच्या प्रकारांचा अधिक उत्पादन देणाऱ्या दाणेदार गव्हाच्या प्रकारांशी संकर घडवून आणून अधिक उत्पादन देणाऱ्या व रोगांना न जुमानणाऱ्या दाणेदार गव्हाच्या अनेक प्रकारांची निर्मिती केली. त्यांत एन.पी. ७१०, ७१८, ७६१, ७७०, ७९९ व ८०९ हे प्रकार भारतीय शेतकऱ्यांमध्ये अधिक लोकप्रिय व यशस्वी झाले. तांबेरा या रोगाच्या तिन्ही प्रकारच्या उपद्रवांना न जुमानणारा व अधिक प्रमाणात फलित होणारा एन.पी ८०९ हा गव्हाचा सुप्रसिद्ध प्रकार पाल यांनी १९५४ मध्ये शोधून काढला. नंतरही असेच काही प्रकार त्यांनी शोधून काढले. ह्या प्रकारांनी गव्हाच्या उत्पादनात क्रांती केली. नॉर्मन बोर्‌लॉग या मेक्सिकन शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या बुटक्या गव्हाच्या प्रकारानंतरच पाल यांच्या गव्हाच्या प्रकारांची लोकप्रियता थोडी कमी झाली, पण जेव्हा भारताची अन्नधान्य-उत्पादनक्षमता कमी होती व अन्नधान्यसमस्या बिकट होती त्या काळात त्यांनी शोधून काढलेल्या गव्हाच्या अनेक वाणांमुळे भारतात गव्हाचे पीक वाढले हे नक्की [→ गहू].

गव्हाशिवाय पाल यांनी बटाटा व तंबाखू यांच्यावरही अधिक उत्पादनाच्या दृष्टीने संशोधन केले. विविध पिकांत आढळून येणाऱ्या संकरज ओजासंबंधीही (भिन्न प्रकारच्या वनस्पतींच्या संकरामुळे निर्माण झालेल्या नव्या प्रकारात मूळ वनस्पतींमध्ये आढळतो त्यापेक्षा अधिक जोम, अधिक रोगप्रतिकारक्षमता आणि परिसराशी जुळवून घेण्याची अधिक क्षमता यांसंबंधीही) त्यांनी खूप संशोधन केले. भारतात वनस्पतिप्रवेशन संघटना स्थापन करण्यात त्यांनी शिकस्तीचे प्रयत्न केले. या संघटनेने भारतात ४०,००० च्या वर उपयुक्त वनस्पतींचे प्रकार प्रचारात आणले. आर्थिक दृष्ट्या त्यांतील काही वनस्पती भारताची उत्पादनक्षमता व समृद्धी वृद्धींगत करू शकतात, असे दिसून आले आहे.

पाल यांनी १९५६ साली जपानमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय आनुवंशिकी परिसंवादात आपले गव्हावरचे संशोधन प्रविष्ट केले. रोगांच्या प्रतिकारक्षमतेच्या बाबतीत संकरित गव्हाच्या प्रत्येक प्रकारात जनुकांचे [आनुवंशिक लक्षणे निर्देशित करणाऱ्या गुणसूत्रावरील एककांचे;  →जीन] दोन गट असतात. एका गटाची जनुके रोगाच्या जंतूंशी सरळ सामना करतात, तर दुसऱ्या गटातील जनुके रोगप्रतिकारक विक्रियांचेच दमन किंवा अंतर्निरोधन करतात. त्यामुळे गव्हाच्या कोणत्याही प्रकारात जनुकांच्या कोणत्या गटाचे आधिक्य आहे ह्यावरच त्या संकरित गव्हाच्या प्रकाराची रोगप्रतिकारक्षमता अवलंबून असते, असे त्यांनी या परिसंवादात सांगितले. त्याचप्रमाणे संकरज ओजाचा मक्यासारख्या परपरागित [→ परागण] वनस्पतींच्या बाबतीतच समुपयोग करता येतो असे नव्हे, गव्हा

सारख्या स्वपरागित वनस्पतींच्या बाबतीतही संकरज ओजाचा समुपयोग करता येतो, असेही पाल यांनी त्या परसंवादात सिद्ध करून दिले. तांबेरा रोगाची साथ पसरलेली असतानासुद्धा एन.पी. ८०० मालेतील गव्हाचे काही प्रकार पेरून दाणेदार गव्हाची निपज करता येते, हा त्यांच्या संशोधनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या संशोधनाने प्रभावित होऊन लंडनच्या रॉयल सोसायटीने १९७२ मध्ये पाल यांना सदस्य (फेलो) करून घेऊन त्यांचा सन्मान केला. खाद्यान्न देणाऱ्या वनस्पतींशिवाय पाल यांनी काही अलंकारिक किंवा शोभिवंत फुले देणाऱ्या वनस्पतींवरही संशोधन केले. द ब्युटिफुल क्लाइंबर्स ऑफ इंडिया हे त्यांचे पुस्तक १९६० मध्ये प्रकाशित झाले. गुलाबाच्या अनेकविध जाती त्यांनी संकरक्रियेने निर्माण केल्या. गुलाबांच्या अनेक प्रदर्शनात त्यांनी पारितोषिके मिळविली. ‘देहली प्रिन्सेस ’ व ‘द पंजाब बेल ’ हे गुलाबाचे प्रकार अतिशय लोकप्रिय झाले आहेत. द रोझ इन इंडिया   (भारतातील गुलाब) नावाचे गुलाबावरील पुस्तक त्यांनी १९६६ मध्ये प्रसिद्ध केले. व्हीट  (१९६६), कॅरोफायटा  (१९६६), फ्लॉवरिंग श्रबस  (१९६७) व बुगनविलियाज  (१९७४) ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. ह्या सहा पुस्तकांशिवाय त्यांचे १६० च्या वर संशोधनात्मक व माहितीपूर्ण लेख मान्यवर शास्त्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत.

संशोधन करण्याबरोबरच त्यांनी इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील कृषिविज्ञानाच्या व वनस्पततिविज्ञानाच्या पदव्युत्तर शिक्षणाचा उपयुक्त आकृतिबंध तयार केला. खेडोपाडी जाऊन कृषिविज्ञानातील संशोधित निष्कर्ष सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अनेक तरुण कृषि-पदवीधरांना प्रवृत्त केले.
ऑस्ट्रेलिया, चीन, फ्रान्स, इंग्लंड, इटली, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व सोव्हिएट रशिया या देशांत भरलेल्या अनेक शास्त्रीय संमेलनांत, परिषदांत, परिसंवादांत व चर्चासत्रांत भाग घेऊन पाल यांनी भारतीय कृषिवैज्ञानिक प्रतिनिधींचे नेतृत्व केले. फिलिपीन्समधील आंतरराष्ट्रीय भात संशोधन मंडळाचे ते एक विश्वस्त असल्यामुळे १९६७-७० या कालावधीत त्यांनी फिलिपीन्सला अनेकदा भेटी दिल्या.

अनेक मान्यवर शास्त्रीय संस्थांनी त्यांना आपले सदस्य करून घेतले आहे. लिनीअन सोसायटी ऑफ लंडन, रॉयल हॉर्टिकल्चरल सोसायटी (यू.के.), इंडियन बोटॅनिकल सोसायटी, इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लँट ब्रीडिंग, फायटॉलॉजिकिल सोसायटी ऑफ इंडिया आणि इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी यांसारख्या नामांकित संस्थांचे ते सदस्य म्हणून निवडले गेले आहेत. ऑल-युनियन लेनिन ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस, जेनेटिक्स सोसायटी ऑफ जपान आणि द जपान ॲकॅडमी ह्या संस्थांचे ते सन्माननीय सभासद आहेत. जपानमध्ये 1968 मध्ये भरलेल्या बाराव्या इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ जेनेटिक्सचे ते उपाध्यक्ष होते. पॅरिसमधील 1966 च्या युनेस्कोच्या कृषि-शैक्षणिक व कृषि-वैज्ञानिक मंडळाचे ते सभासद होते. द रोझ सोसायटी ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष आहेत. अनेक गुलाबपुष्पांच्या ज्ञानाबद्दल जाणत्यांनी त्यांना ‘द बेस्ट-नोन रोझेरियन’ अशी कौतुकास्पद उपाधी प्रदान केली आहे.

इ.स. १९४६ व १९५४ च्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या वनस्पतिविज्ञान व कृषिविज्ञान विभागाचे पाल अध्यक्ष होते. ह्याच संस्थेच्या बंगलोर येथे जानेवारी १९७१ मध्ये भरलेल्या वार्षिक अधिवेशनाचे ते मुख्य अध्यक्ष होते. इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमीचे १९७५ मध्ये ते मुख्य अध्यक्ष होते.

पाल यांनी अनेक पारितोषिके, सन्मानचिन्हे, सन्माननीय पदव्या मिळविल्या. कृषिविज्ञान व वनस्पतिविज्ञानाचे रफी अहमद किडवाई मेमोरियल प्राइझ (१९६०), वनस्पतिविज्ञानाचे बिरबल सहानी सुवर्णपदक (१९६२), श्रीनिवास रामानुजन सुवर्णपदक (१९६४), ग्रँट पदक (१९७१) व बार्कली पदक (१९७१) ही त्यांतील काही महत्त्वाची मानचिन्हे होत. अनेक भारतीय शासकीय, शैक्षणिक व शास्त्रीय समित्यांचे ते सभासद आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे ते प्रथमपासून सभासद होते. भारत सरकारने १९५८ मध्ये पद्मश्री व १९६८ मध्ये पद्मभूषण हे किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. १९७० मध्ये पंजाब कृषी विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली. यानंतर सरदार पटेल विद्यापीठ, उत्तर प्रदेश कृषी विद्यापीठ आणि हरियाना कृषी विद्यापीठांनीही त्यांना सन्माननीय
डी. एस्सी . ही पदवी दिली.
========================
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र
*दिनविशेष चाचणी सोडविण्यासाठी क्लीक करा* 👇👇👇👇👇👇
======================

दिनविशेष 26 मे

*सॅली राईड*

*पहिली अमेरिकन महिला अंतराळयात्री*

*जन्मदीन - २६ मे १९५१*

अंतराळयुगाची म्हणजे 'स्पेस एज'ची सुरुवात झाली ती रशियाकडून. साहजिकच त्या देशाची सर्वच बाबतीत स्पर्धा करणाऱ्या अमेरिकेला स्वस्थ बसवणे शक्य नव्हते. रशियाने पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवून युरी गागारिनला आणि पहिली महिला अंतराळात पाठवून व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा यांचा विक्रम घडवला. त्यानंतर लगेच अमेरिकेने आपल्या 'स्पेस प्रोग्रॅम'ला वेग दिला. १९६० चं दशक पूर्ण होण्यापूर्वीच अमेरिका चंद्रावर माणूस पाठवेल अशी महत्त्वाकांक्षी घोषणा तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी केली. 'हे काम सोपे नाही. पण ते कठीण आहे म्हणूनच आम्ही आव्हान स्वीकारत आहोत,' असे स्फूर्तिदायक उद्गार काढून त्यांनी अमेरिकेच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवले.
त्याचा परिणाम म्हणून 'नासा'च्या कार्याला वेग आला. रशियाने व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा आणि स्वेतलाना सॅवित्स्काया या महिलांना १९६३ आणि १९८२ मध्ये अंतराळात पाठवले. मधल्या काळात अमेरिकेचे नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन हे अंतराळवीर १९६९ मध्ये चंद्र पादाक्रांत करून आले, पण तोपर्यंत एखाद्या महिलेला अंतराळात पाठवणं अमेरिकेला जमले नव्हते. १९८३ मध्ये तशी संधी सॅली राइड यांना मिळाली. वयाच्या ३२ व्या वर्षी अंतराळात जाणारी सॅली राइड सर्वात तरुण महिला अंतराळयात्री ठरली.
१९५१ मध्ये अमेरिकेतील लॉस एन्जेलिस येथे जन्मलेल्या सॅलीने भौतिकशास्त्र्ााचे शिक्षण घेतले होते. तिचे कॉलेजचे शिक्षण शिष्यवृत्तीवर (स्कॉलरशिपवर) झाले होते. विज्ञानाची आवड असलेल्या सॅलीने टेनिस खेळातही प्रावीण्य मिळवले होते. भाषा विषय तिचा आवडता होता. त्यामुळे तिने इंग्लिश आणि भौतिकशास्त्र्ा अशा विषयात पदवी प्राप्त केली. पुढे स्टॅनफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून १९७८ मध्ये तिने 'डॉक्टरेट' (पीएच.डी.) मिळवली. आंतरतारकीय म्हणजे दोन ताऱ्यांमधील क्ष-किरणांच्या प्रक्रियेविषयी तिने विशेष खगोलभौतिक अभ्यास केला.
त्याच वेळी म्हणजे १९७८ मध्ये 'नासा'ने 'स्पेस प्रोगॅम'साठी एक जाहिरात दिली होती. अमेरिकाभरच्या ८००० तरुण-तरुणींनी त्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी एकटय़ा सॅली राइडची निवड झाली. यावरून तिची बुद्धिमत्ता जाणवते. 'नासा'च्या कारकीर्दीत सुरुवातीला सॅलीने स्पेसमध्ये जाणाऱ्या अंतराळयानांच्या तंत्रज्ञानाच्या पृथ्वीवरील विभागात काम केले. त्याच वेळी तिने अंतराळयानाचा 'कॅनॅडेरम' रोबोट आर्म विकसित केला. सॅली अंतराळयात्रा करणार असे नासाने ठरवल्यावर तिला हा प्रवास झेपेल का, अशा आशयाचे प्रश्न विचारले गेले. त्यावर 'स्त्र्ााr अथवा पुरुष हा प्रश्न येतोच कुठे? मी एक 'ऍस्ट्रॉनॉट' आहे' असे परखड उत्तर तिने दिले. आणि चॅलेंजर या यानातून ती १८ जून १९८३ रोजी अंतराळात झेपावली. अंतराळात 'रोबर्ट आर्म'चा वापर करून उपग्रहात दुरुस्ती करणारीही ती पहिली महिला ठरली. १९८४ मध्ये सॅली राइड यांना पुन्हा एकदा 'चॅलेंजर'मधूनच अंतराळात जाण्याची संधी मिळाली. तिने एकूण ३४३ दिवस अंतराळात संशोधन करण्यात खर्च केले. पुढे 'चॅलेंजर'ला अपघात झाला. त्याबाबतच्या चौकशी समितीत राइड होत्या. १९८७ मध्ये सॅली राइड यांनी 'नासा'ची नोकरी सोडली. त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. या उत्साही संशोधक महिलेला कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाने ग्रासले. त्यातच २३ जुलै २०१२ रोजी एकसष्टाव्या वर्षी त्या कालवश झाल्या.

दिनविशेष 25 मे

*बाळ दत्तात्रय टिळक*

*रसायनशास्त्रज्ञ*

*स्मृतिदिन - २५ मे १९१९*

रसायनशास्त्राचे नामवंत शिक्षक आणि संशोधक पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एन.सी.एल.) १९६६ ते १९७८ या कालखंडातील संचालक. बाळ दत्तात्रय टिळक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील कारंजा या गावी झाला. त्यांचे वडील दत्तात्रय टिळक हे जळगावमधील खानदेश मिल्समध्ये एक अभियंता म्हणून नोकरी करीत होते. वस्त्रोद्योग क्षेत्रातील एक जाणकार तंत्रज्ञ म्हणून ते परिचित होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे १९३३ साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर टिळकांनी पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथून १९३७ साली रसायनशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी बी.एस्सी. पदवी प्रथम श्रेणीमध्ये, प्रथम क्रमांक मिळवून प्राप्त केली.

त्या काळामध्ये वस्त्रोद्योगासाठी आवश्यक असणारे विविध रंग आणि अन्य औद्योगिक क्षेत्रांमध्ये नित्य लागणारी रसायने आपल्या देशात तयार होऊ लागलेली होती. तथापि दर्जेदार प्रशिक्षित तंत्रज्ञ मिळत नसत. हे लक्षात घेऊन टिळक यांनी मुंबई येथील ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेमध्ये प्रवेश घेतला. १९३९ साली बी.एस्सी. (तंत्रज्ञान) ही पदवी मिळवल्यावर त्यांनी मुंबई विद्यापीठ-डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (बी.यू.डी.सी.टी.) मध्ये पीएच.डी.साठी संशोधन करायचे ठरवले. तेथे प्रा. के. व्यंकटरामन हे अत्यंत नावाजलेले प्रोफेसर औद्योगिक रसायनशास्त्रातील दर्जेदार संशोधन करीत असत. त्यांचे मार्गदर्शन टिळकांना मिळाले. १९४३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळवली. सेंद्रिय रसायनशास्त्रामध्येच अजूनही सखोल संशोधन करण्याची टिळकांची इच्छा होती. यासाठी त्यांनी इंग्लंडच्या ऑक्स्फर्ड विद्यापीठात सर रॉबर्ट रॉबिन्सन यांच्या प्रयोगशाळेत संशोधन सुरू केले. प्रयोगशाळेत विविध संरचना असलेल्या सेंद्रिय रसायनांची जडणघडण करण्यात प्रा. रॉबिन्सन यांनी बरेच प्रावीण्य मिळवले होते. त्यांना आधुनिक सेंद्रिय रसायनशास्त्रातील ‘पितामह’ म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये १९४४ ते १९४६ या कालावधीत संशोधन केल्यानंतर डॉ.टिळक यांचा अनुभव अधिक समृद्ध झाला. तर ऑक्सफर्ड विद्यापीठाने १९४६ साली टिळकांना डी.फिल. ही पदवी प्रदान करून त्यांना सन्मानित केले.

इंग्लंडमध्ये संशोधन केल्यावर डॉ. टिळक मुंबईच्या ‘बी.यू.डी.सी.टी.’मध्ये अध्यापन आणि संशोधन करू लागले. स्टिरॉइडवर्गीय रंगाच्या रसायनशास्त्रामध्ये त्यांनी मोलाची भर टाकली. हेटेरोसायक्लिक (विषमचक्रीय) संयुगांचे महत्त्व औद्योगिक रसायनशास्त्रात वाढत आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी तशा प्रकारच्या संयुगांची जडणघडण प्रयोगशाळांमध्ये करून पाहिली. त्यांचे मूलभूत गुणधर्म तपासले आणि सखोल संशोधनही केले. या संशोधनावर आधारित ‘न्यू ट्रेन्ड्स इन हेटेरोसायक्लिक केमिस्ट्री’ या शीर्षकाचे एक महत्त्वपूर्ण पुस्तक त्यांनी, त्यांचे सहकारी संशोधक डॉ.आर.बी. मित्रा यांच्याबरोबर लिहिले. गंधकाशी संबंधित असलेल्या एका रासायनिक प्रक्रियेला ‘टिळक प्रक्रिया’ (टिळक रिअ‍ॅक्शन) असे नाव आहे. कृषी उद्योगामध्ये कीटकनाशकांचे महत्त्व उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने गरजेचे असते. हे लक्षात घेऊन डॉ. टिळकांनी कीटकनाशकांसंबंधी संशोधन सुरू केले.

१९६० साली ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना डी.एस्सी. ही सन्माननीय पदवी प्रदान केली. त्यानंतर अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात त्यांना प्रा. रॉबर्ट बर्न्स वुडवर्ड यांच्याबरोबर सेंद्रिय रसायनशास्त्रातील क्लिष्ट संरचना असलेल्या संयुगांचे संशोधन करण्याची संधी मिळाली. १९६०-१९६१ साली त्यांनी प्रा.वुडवर्ड यांच्या प्रयोगशाळेत हेटेरोसायक्लिक कार्बन संयुगांवर संशोधन केले होते. इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रा. रॉबर्ट रॉबिन्सन आणि हार्वर्ड विद्यापीठाचे प्रा. रॉबर्ट वुडवर्ड हे दोघेही रसायनशास्त्रातील नोबेल मानकरी होते. प्रा. रॉबिन्सन यांनी जीवशास्त्रामध्ये विशेष क्रियाशील असणाऱ्या अल्कोलॉइडवर्गीय रसायनांचे संशोधन केले होते, म्हणून त्यांना १९४७ साली नोबेल पुरस्कार मिळाला होता. प्रा. वुडवर्ड यांनी प्रयोगशाळेत अनेक सेंद्रिय रसायने घडवलेली होती. त्याबद्दल त्यांना १९६५ साली नोबेल पुरस्कार मिळाला होता. डॉ. टिळकांना या दोन्ही निष्णात संशोधकांबरोबर त्यांच्या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष संशोधन करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांचा अनुभव समृद्ध होत गेला. साहजिकच त्यांच्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ तर झालाच, पण औद्योगिक क्षेत्रातील तंत्रज्ञांना रसायननिर्मिती करताना डॉ. टिळकांच्या मार्गदर्शनाची मदत झाली. रसायन उद्योगक्षेत्रातील अनेक उद्योजक, तंत्रज्ञ त्यांच्याकडे सल्लामसलतीसाठी येऊ लागले. देशातील आणि परदेशातील अनेक संस्थांमध्ये जाऊन त्यांनी रसायननिर्मितीशी संबंधित अनेक व्याख्याने दिली. वैज्ञानिक संशोधन आणि विकास या संदर्भात अनेक आंतरदेशीय करार होत असतात. त्यासाठी परदेशात जाणाऱ्या पथकांचे त्यांनी अनेकदा नेतृत्व केले होते.

मुंबईच्या बी.यू.डी.सी.टी.मध्ये ‘प्रोफेसर ऑफ डायस्टफ टेक्नॉलॉजी’ या पदावर १९५० ते १९६५ सालापर्यंत डॉ. टिळकांनी अध्यापन आणि संशोधन केले. १९६५ साली त्यांनी पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये संचालकपदाचा स्वीकार केला. त्या काळात रसायननिर्मितीसाठी बहुतांशी परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहावे लागत असे. ‘वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे’च्या (कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च) आत्मनिर्भरतेच्या धोरणानुसार डॉ. टिळकांनी प्रयोगशाळेच्या वाटचालीचा आराखडा बनवला. भारताकडे आवश्यक ती कच्ची रसायने आहेत व आणि आपल्या संशोधक आणि तंत्रज्ञांकडे पुरेशी गुणवत्ता आहे, हे त्यांच्या लक्षात आले. रंगोद्योग, जंतुनाशके, कीडनाशके, कृषिक्षेत्रात नित्य लागणारी रसायने यांसंबंधीचे संशोधन प्रकल्प सुरू करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. नेमून दिलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी आणि प्रासंगिक अडचणी दूर करण्यासाठी ते संशोधकांसह नियमितपणे बैठका घेत असत. छोट्या आणि मोठ्या उद्योगधंद्यांच्या उभारणीसाठी आणि रसायननिर्मिती करतानादेखील त्यांची दूरदृष्टी, अनुभव, बुद्धिमत्ता, तसेच कौशल्यदेखील उपयुक्त ठरले. उपयोजित संशोधन करीत असताना, रसायनशास्त्रातील मूलभूत संशोधनाकडे डॉ. टिळकांनी विशेष लक्ष दिले होते.

दर्जेदार वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये त्यांनी सुमारे २०० शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ६० विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली आणि ३५ जणांनी एम.टेक. किंवा एम.फिल.साठीचे प्रबंध लिहिले. त्यांचे अनेक विद्यार्थी रसायनशास्त्रामध्ये लक्षणीय संशोधन करू शकले. विशेषत: औद्योगिक रसायनशास्त्रामधील अनेक विद्यार्थी स्वत:चा उद्योग उभारू शकले.

डॉ. टिळक यांचा अनुभव आणि व्यासंग लक्षात घेऊन त्यांची ‘हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स’ या रसायननिर्मितीशी संबंधित असलेल्या कंपनीच्या अध्यक्षपदी १९६९-१९७६ सालाच्या दरम्यान नेमणूक झाली. तसेच ‘हिंदुस्थान अँटिबायोटिक्स’, ‘इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड’, ‘इंडियन पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ अशा कंपन्यांचे एक संचालक म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी केली.

महाराष्ट्र सरकारने डॉ. टिळक यांना ‘विज्ञान-तंत्रज्ञान विभागा’चे मानद सल्लागार म्हणून १९८१ साली आमंत्रित केले. भारत सरकारच्या ‘नॅशनल टॅलन्ट अँड टेक्नॉलॉजी’च्या संचालकपदी डॉ. टिळकांनी काही काळ कार्य केलेले होते. भारताने रसायननिर्मितीच्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर व्हावे म्हणून डॉ. टिळकांनी विशेष परिश्रम केले. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालकपद त्यांनी १९६६ साली स्वीकारले, तेव्हा प्रयोगशाळेच्या संशोधनावर आधारित असलेल्या रसायनांचे औद्योगिक उत्पन्न सुमारे पंधरा लाख रुपये होते. १९७८ साली डॉ. टिळक सेवानिवृत्त झाले, त्या वर्षी तो आकडा ८१ कोटी रुपये एवढा वाढला होता. प्रयोगशाळेतील संशोधन केवळ प्रयोगशाळेतच राहता कामा नये, त्याचा औद्योगिक उत्पादन वाढवण्यासाठी उपयोग व्हावा, असे त्यांना वाटत असे. नित्य आयात केल्या जाणाऱ्या रसायनांचे भारतामध्येच उत्पादन व्हावे, म्हणून त्यांनी आयात-पर्यायी रसायनांचे संशोधन हाती घेतले होते. त्या काळामध्ये भारतात परकीय चलनाची खूप कमतरता होती. त्याची बचत होण्याकडे त्याचा उपयोग झाला.

सेवानिवृत्तीनंतरही डॉ. टिळक सतत कार्यमग्न राहिले. त्यांनी ग्रामोद्धाराचे कार्य हाती घेतले. भारतीय पारंपरिक ज्ञान, अनुभव यांचा उपयोग कसा करता येईल, यासंबंधी विचार केला.

जैवविविधतेचे संरक्षण, महिलांचे सबलीकरण, पशुपालन, आहार, आरोग्य, स्वच्छता, ग्रमोद्योग आदी विषयांशी संबंधित अनेक योजना किंवा प्रकल्प त्यांनी सुरू केले. खेड्यांमधील भारतीय नागरिकांची आर्थिक उन्नती त्यामुळे होऊ शकेल हे डॉ. टिळकांनी ओळखले. ऊती संवर्धन तंत्र वापरून दुर्मीळ वृक्षांची लागवड आणि वनौषधींचे आधुनिक पद्धतीने लागवड करण्याचे प्रयत्न केले. त्यांनी कर्करोगरोधक वनस्पतींचाही अभ्यास केला. ग्रमोद्धार करण्यासाठी त्यांनी ‘सेंटर फॉर अ‍ॅप्लिकेशन  सायन्स  अँड  टेक्नॉलॉजी  फॉर  रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ (सी.ए.एस.टी.एफ.ओ.आर.डी.-कॅस्टफोर्ड) ही संस्था स्थापन केली. त्यामुळे अनेक छोटेमोठे प्रकल्प त्यांना पार पाडता आले. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’ या संस्थेतर्फे ‘फोरम ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रूरल एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट’ (एफ.ओ.एस.टी.इ.आर.ई.डी.-फॉस्टेरॅड) हा कक्ष त्यांनी सुरू केला. कृषी मालाची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने काही यशस्वी प्रयत्न त्यांना त्यामुळे करता आले. विशिष्ट रसायनांचा सूक्ष्म तवंग जर एखाद्या छोट्यामोठ्या जलाशयाच्या पृष्ठभागावर पसरवता आला, तर पाण्याचे बाष्पीभवन काही प्रमाणात थोपवता येते. बरेचसे पाणी जमिनीत जिरते. हे लक्षात घेऊन, याचे संशोधनही डॉ. टिळकांनी दीर्घकाळ केले.

डॉ. टिळकांच्या कार्याला राजमान्यता आणि जनमान्यताही वेळोवेळी मिळत गेली. भारतातील वैज्ञानिकांना मिळणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’ हा वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेतर्फे देण्यात येणारा सन्मान डॉ. टिळकांना १९६३ साली मिळाला. भारत सरकारने त्यांना १९७२ साली ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. ‘इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे, आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस’चे ते मानद सदस्य झाले. के.जी. नाईक सुवर्णपदक (१९५९), बॅनर्जी सुवर्णपदक (१९६०) या सन्मानाचेदेखील ते मानकरी झाले. डॉ. टिळक औद्योगिक रसायनशास्त्राचे मान्यवर संशोधक होते. प्रयोगशाळेतील ज्ञान-विज्ञान आणि अनुभव यांद्वारे ग्रमीण विकास साधण्यासाठी ते अखेरपर्यंत प्रयत्नशील राहिले. हृदयविकारामुळे त्यांचे निधन झाले.
— डॉ. अनिल लचके

दिनविशेष 25 मे



*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*

         *२५ मे २०१२*

*'स्पेस एक्स ड्रॅगन' हे पहिले व्यावसायिक अंतराळयान झाले*

Dragon is a reusable cargo spacecraftdeveloped by SpaceX, an American private space transportation company. Dragon is launched into orbit by the company's Falcon 9two-stage-to-orbit launch vehicle.

During its maiden flight in December 2010, Dragon became the first commercially built and operated spacecraft to be recovered successfully from orbit. On 25 May 2012, a cargo variant of Dragon became the first commercial spacecraft to successfully rendezvous with and attach to the International Space Station (ISS). SpaceX is contracted to deliver cargo to the ISS under NASA's Commercial Resupply Services program, and Dragon began regular cargo flights in October 2012. With the Dragon spacecraft and the Orbital ATKCygnus, NASA seeks to increase its partnerships with domestic commercial aviation and aeronautics industry.

On 3 June 2017, the CRS-11 capsule, largely assembled from previously flown components from the CRS-4 mission in September 2014, was launched again for the first time, with the hull, structural elements, thrusters, harnesses, propellant tanks, plumbing and many of the avionics reused while the heat shield, batteries and components exposed to sea water upon splashdown for recovery were replaced.

SpaceX has developed a second version called Dragon 2, which includes the capability to transport people. Flight testing is scheduled to complete in the first half of 2019 with the first flight of astronauts, on a mission contracted to NASA, scheduled to occur later the same year.
*-----------------------------------*
*💥दहा वर्षांनंतर ‘नासा’ची पहिली अंतराळ मोहीम; दोन अंतराळवीरांसह ‘स्पेस एक्स’ झेपावणार💥*
*ऑनलाइन लोकमत* on Fri, May 22, 2020 6:17am

*फ्लोरिडास्थित अंतराळयान प्रक्षेपणस्थळाहून अमेरिकन अंतराळवीर पुन्हा एकदा अंतराळ मोहिमेवर जाणार असून नासा आणि अंतराळ कार्यक्रमासाठी हा अद्भुत क्षण आहे.*

केप कॅनाव्हरल : तब्बल नऊ वर्षांनंतर अमेरिकेच्या धरतीवरून होणाऱ्या ‘नासा’च्या पहिल्या अंतराळ उड्डाणाच्या एक आठवडाआधीच दोन अंतराळवीर केनेडी अंतराळ यान प्रक्षेपण केंद्रावर दाखल झाले आहेत. *सरकारी मोहिमेऐवजी खाजगी कंपनी अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यिाविषयी ही पहिलीच वेळ आहे.* अंतराळवीर डग हर्ले आणि बॉब बेकन यांना सोबत घेत स्पेस एक्सचे अंतराळयान एक आठवड्याने अंतराळी झेपावणार आहेत.
अंतराळवीर डग हर्ले अािण बॉब बेकन हे अंतराळ संस्थेच्या विमानाने ह्युस्टनहून फ्लोरिडा येथे दाखल झाले आहेत.
फ्लोरिडास्थित अंतराळयान प्रक्षेपणस्थळाहून अमेरिकन अंतराळवीर पुन्हा एकदा अंतराळ मोहिमेवर जाणार असून नासा आणि अंतराळ कार्यक्रमासाठी हा अद्भुत क्षण आहे. आजपासून आठवडाभरात आम्ही अंतराळी भरारी घेऊत. आमच्यासाठी ही एक संधी तर आहेच, तसेच अमेरिकी जनता, स्पेस एक्स आणि नासासाठी आमची जबाबदारी आहे, असे आम्ही मानतो, असे अंतराळवीर हर्ले यांनी फ्लोरिडा येथे पोहोचल्यानंतर पत्रकारांना सांगितले. पुढच्या बुधवारी दुपारी हे दोन्ही अंतराळवीर स्पेस फाल्कन ९ रॉकेटच्या साह्याने स्पेस एक्स ड्रॅगन अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राकडे रवाना होतील.
========================
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र

दिनविशेष 24 मे

*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*

*🌸डॅनियल फॅरनहाइट🌸*

*तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित केले*

*जन्मदिन - २४ मे १६८६*
   
डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट (२४ मे १६८६ - १६ सप्टेंबर १७३६) हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. शिक्षणानंतर त्यांचे सारे आयुष्य नेदरलँड्स देशात गेले, मृत्यु ऍम्स्टरडॅम येथे झाला. तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
वायू आणि द्रवपदार्थांचा उपयोग करून तापमापी यंत्र बनविण्याचे असंख्य प्रयोग गॅलिलिओ पासून न्यूटन पर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी केले. १७१९ ते १७२४ या काळात डॅनिएल फॅरनहाइट यांनीही तापमापकावर प्रयोग केले. फॅरनहाइट यांनी काचेच्या उभ्या नळीत आधी अल्कोहोल वापरून आपल्या प्रयोगाला सुरूवात केली, त्यात अपेक्षित असे यश न आल्याने मग त्यांनी पारा वापरून प्रयोग सुरूच ठेवले. हे तापमापक जास्त सुटसुटीत व अचूक ठरले. पाण्याचा बर्फ होणे, वाफ होणे, मानवाच्या शरिराचे तापमान या गोष्टी अचूकपणे नोंदवित असल्याची खात्री पटल्यावर फॅरनहाइट यांनी त्या तापमापकाला आपले नाव देऊन प्रयोग जगासमोर आणला.
आजही आपण अंगातील ताप मोजण्यासाठी वापरतो त्या तापमापीवर सेल्सियस सह फॅरनहाइट ची पट्टी असतेच पण बोलण्यात नेहमी गृहित धरले जाते ते फॅरनहाइट या एककाचे तापमान. (उदा. १०० डिग्री ताप)
========================
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र
*दिनविशेष चाचणी सोडविण्यासाठी क्लीक करा* 👇👇👇👇👇👇
======================