सोमवार, २५ मे, २०२०

दिनविशेष 26 मे

*सॅली राईड*

*पहिली अमेरिकन महिला अंतराळयात्री*

*जन्मदीन - २६ मे १९५१*

अंतराळयुगाची म्हणजे 'स्पेस एज'ची सुरुवात झाली ती रशियाकडून. साहजिकच त्या देशाची सर्वच बाबतीत स्पर्धा करणाऱ्या अमेरिकेला स्वस्थ बसवणे शक्य नव्हते. रशियाने पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवून युरी गागारिनला आणि पहिली महिला अंतराळात पाठवून व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा यांचा विक्रम घडवला. त्यानंतर लगेच अमेरिकेने आपल्या 'स्पेस प्रोग्रॅम'ला वेग दिला. १९६० चं दशक पूर्ण होण्यापूर्वीच अमेरिका चंद्रावर माणूस पाठवेल अशी महत्त्वाकांक्षी घोषणा तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी केली. 'हे काम सोपे नाही. पण ते कठीण आहे म्हणूनच आम्ही आव्हान स्वीकारत आहोत,' असे स्फूर्तिदायक उद्गार काढून त्यांनी अमेरिकेच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवले.
त्याचा परिणाम म्हणून 'नासा'च्या कार्याला वेग आला. रशियाने व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा आणि स्वेतलाना सॅवित्स्काया या महिलांना १९६३ आणि १९८२ मध्ये अंतराळात पाठवले. मधल्या काळात अमेरिकेचे नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन हे अंतराळवीर १९६९ मध्ये चंद्र पादाक्रांत करून आले, पण तोपर्यंत एखाद्या महिलेला अंतराळात पाठवणं अमेरिकेला जमले नव्हते. १९८३ मध्ये तशी संधी सॅली राइड यांना मिळाली. वयाच्या ३२ व्या वर्षी अंतराळात जाणारी सॅली राइड सर्वात तरुण महिला अंतराळयात्री ठरली.
१९५१ मध्ये अमेरिकेतील लॉस एन्जेलिस येथे जन्मलेल्या सॅलीने भौतिकशास्त्र्ााचे शिक्षण घेतले होते. तिचे कॉलेजचे शिक्षण शिष्यवृत्तीवर (स्कॉलरशिपवर) झाले होते. विज्ञानाची आवड असलेल्या सॅलीने टेनिस खेळातही प्रावीण्य मिळवले होते. भाषा विषय तिचा आवडता होता. त्यामुळे तिने इंग्लिश आणि भौतिकशास्त्र्ा अशा विषयात पदवी प्राप्त केली. पुढे स्टॅनफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून १९७८ मध्ये तिने 'डॉक्टरेट' (पीएच.डी.) मिळवली. आंतरतारकीय म्हणजे दोन ताऱ्यांमधील क्ष-किरणांच्या प्रक्रियेविषयी तिने विशेष खगोलभौतिक अभ्यास केला.
त्याच वेळी म्हणजे १९७८ मध्ये 'नासा'ने 'स्पेस प्रोगॅम'साठी एक जाहिरात दिली होती. अमेरिकाभरच्या ८००० तरुण-तरुणींनी त्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी एकटय़ा सॅली राइडची निवड झाली. यावरून तिची बुद्धिमत्ता जाणवते. 'नासा'च्या कारकीर्दीत सुरुवातीला सॅलीने स्पेसमध्ये जाणाऱ्या अंतराळयानांच्या तंत्रज्ञानाच्या पृथ्वीवरील विभागात काम केले. त्याच वेळी तिने अंतराळयानाचा 'कॅनॅडेरम' रोबोट आर्म विकसित केला. सॅली अंतराळयात्रा करणार असे नासाने ठरवल्यावर तिला हा प्रवास झेपेल का, अशा आशयाचे प्रश्न विचारले गेले. त्यावर 'स्त्र्ााr अथवा पुरुष हा प्रश्न येतोच कुठे? मी एक 'ऍस्ट्रॉनॉट' आहे' असे परखड उत्तर तिने दिले. आणि चॅलेंजर या यानातून ती १८ जून १९८३ रोजी अंतराळात झेपावली. अंतराळात 'रोबर्ट आर्म'चा वापर करून उपग्रहात दुरुस्ती करणारीही ती पहिली महिला ठरली. १९८४ मध्ये सॅली राइड यांना पुन्हा एकदा 'चॅलेंजर'मधूनच अंतराळात जाण्याची संधी मिळाली. तिने एकूण ३४३ दिवस अंतराळात संशोधन करण्यात खर्च केले. पुढे 'चॅलेंजर'ला अपघात झाला. त्याबाबतच्या चौकशी समितीत राइड होत्या. १९८७ मध्ये सॅली राइड यांनी 'नासा'ची नोकरी सोडली. त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. या उत्साही संशोधक महिलेला कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाने ग्रासले. त्यातच २३ जुलै २०१२ रोजी एकसष्टाव्या वर्षी त्या कालवश झाल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा