भारतीय शास्त्रज्ञ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भारतीय शास्त्रज्ञ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १३ मे, २०२०

🌸 दिनविशेष🌸 14 मे

*💥🌸 दिनविशेष🌸💥*

      *प्रणव मिस्त्री*

*कंप्युटर सायंटिस्ट व संशोधक*
*सिक्स्थ सेंसचा शोध लावला*

जन्मदिन - १४ मे १९८१

 जगभरातील तंत्रप्रेमींना भुरळ घालणाऱ्या गेम ज्या ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीच्या भक्कम पायावर उभा आहे तो पाया रचणार्यात एक भारतीयाचे नाव अग्रेसर आहे,
संवेदना (सिक्स्थ सेन्स), परिधेय उपकरणांसाठीचे आवश्यक तंत्रज्ञान असे एक ना अनेक तंत्रविष्कार जे आज आपण अनुभवत आहोत, वापरत आहोत या सर्वाचा पायाही ज्याने रचला, अवघ्या वयाच्या पस्तीशीत ज्याने जगभरातील बडय़ा कंपन्यांना त्याच्यावर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय ठेवला नाही अशा या भारतीयाचे नाव *प्रणव मिस्त्री.*

सर्वप्रथम हे नाव २००९ मध्ये जगासमोर आले. मसाच्युसेट्स तंत्रविद्यापीठातील ‘एमआयटी लॅब’मध्ये सुरू असलेल्या सिक्स्थ सेन्सच्या संशोधनात या तरुणाने भरीव कामगिरी करत या प्रयोगाला मूर्त स्वरूप दिले. त्याच्या या कामगिरीसाठी प्रणवची निवड एमआयटी लॅबच्या सवरेत्कृष्ट ३५ संशोधकांमध्ये झाली. या प्रयोगाचे फलित काय असेल हे सांगत असताना प्रणवने आपल्या दोन्ही हाताचा अंगठा आणि पहिले बोट यात एक तंत्रज्ञानाधारित टोपी घातली.. त्याच्या गळ्यात पदकासारखे एक उपकरण होते आणि दोन्ही हातांच्या दोन-दोन बोटांत छोटय़ा टोप्या. या चार बोटांचा आयत करून छायाचित्र टिपले! तेव्हाच त्याने परिधेय तंत्रज्ञानाबाबत भाकीत केले होते. याच काळात प्रणवने तयार केलेल्या ‘स्पर्श’ या तंत्रज्ञानाची जगभरात चर्चा होती. ‘स्पर्श’मध्ये कॉपी-पेस्टऐवजी टच अ‍ॅण्ड पेस्टची संकल्पना असून उपकरणातील माहिती आपण दुसऱ्या उपकरणात आपल्याच हाताच्या बोटाने (अर्थात तंत्रज्ञानाचे अंगुस्तान घालून) घेऊ शकत होतो. जगभरातील बडय़ा कंपन्यांनी त्याला आपल्याकडे काम करण्याची गळ घातली. प्रणवने मायक्रोसॉफ्ट, गुगल, सीएमयू, नासा अशा विविध ठिकाणी आपल्या संशोधनाचा ठसा उमटवला व २०१२ पासून तो सॅमसंगमध्ये रुजू झाला. प्रणव सध्या सॅमसंगच्या संशोधन विभागाचा जागतिक अध्यक्ष आहे. सॅमसंग गिअर स्मार्टवॉच हे त्याने स्वतंत्रपणे विकसित केलेले उत्पादन. त्याच्या नावावर दहापेक्षा अधिक संकल्पनांचे स्वामित्व हक्कआहेत. अर्थात हे स्वामित्व हक्क त्याने केवळ व्यावसायिक संशोधनांसाठीच घेतले.

गुजरातमधील पालनपूर गावात वास्तुरचनाकार आणि टेक्नोक्रॅट असलेले कीर्ती मिस्त्री आणि नयना यांच्या घरात *१४ मे १९८१ रोजी प्रणवचा जन्मला.* शालेय शिक्षण याच गावात पूर्ण केल्यानंतर त्याने वास्तुरचनाकार पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मात्र तेथे तो नापास झाला. पण खचून न जाता त्याने गुजरात विद्यापीठात संगणक अभियांत्रिकी शाखेत पदवी मिळवली. यानंतर २००३ ते २००५ या कालावधीत आयआयटी मुंबईतील आयडीसीमध्ये त्याने अभिकल्पाचे शिक्षण घेतले. आयडीसीमधील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने अमेरिकेत एमआयटी लॅबमध्ये पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी शिक्षण पूर्ण केले. त्याचे शंभरहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत.

सोमवार, ११ मे, २०२०

*💥🌼दिनविशेष🌼💥* 11 मे

*💥🌼दिनविशेष🌼💥*

*रिचर्ड फिलिप्स फाइनमन*

*नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक*

*जन्मदिन - ११ मे १९१८*

रिचर्ड फिलिप्स फाइनमन (मे ११, इ.स. १९१८ - फेब्रुवारी १५, इ.स. १९८८)एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.त्यांच्या क्वाँटम मेकेनिक्समधल्या पाथ इंटिग्रल फोर्म्युलेशन तसेच क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्सचा मुलभूत सिद्धांत,अतिशीत हेलिअमच्या सुपरफ्लुईडिटी तत्त्वाची भौतिकी तसेच पदार्थविज्ञानातील सर्वांत महत्त्वपूर्ण असे पार्टन मॉडेल त्यांनी सुचवले.त्यांच्या क्वाँटम डायनामिक्समधल्या या योगदानाप्रीत्यर्थ १९६५ सालचे जुलिअन श्विंगर व शिन-इतिरो-तोमोनागा यांच्यासमवेत भौतिकीतले नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. आण्विक भौतिकीतल्या उपआण्विक कणासंबंधातील गणितीय सुत्रांचे चित्ररुपांतर त्यांनी केले जेणेकरून आकलनक्षमता रुंदावी ज्या फेनमन आकृत्या म्हणून प्रसिद्ध आहेत.एक इंग्रजी मासिक द फिजिक्स वर्ल्डने जगातल्या आघाडीच्या १३० भौतिकशास्त्रज्ञात १९९१ साली केलेल्या सर्वेक्षणात दहा सर्वोत्कृष्ट भौतिकशास्त्रज्ञात त्यांचा समावेश केला.

१९४२ मध्ये पीएचडी केल्यानंतर ते विस्कोंसिन विद्यापीठ,मेडिसन येथे रुजू झाले. मॅनहॅटन प्रकल्पाशी संलग्न झाल्यावर त्यांनी विद्यापीठातील प्राध्यापकपद सोडले.१९४५ मध्ये त्यांना विस्कोंसिन विद्यापीठातून डीनमार्क इनग्राम यांनी पत्र पाठवून पुन्हा विद्यापीठात शिकवण्याची विनंती केली.फाइनमन यांनी परत येण्याचा वायदा न केल्यामुळे त्यांची नियुक्ती वाढवण्यात आली नाही.त्यानंतर विद्यापीठात आल्यावर ते म्हणाले की "ज्या विद्यापीठामुळे मी तडफदार झालो ते फक्त हेच विद्यापीठ आहे."

युद्धानंतर त्यांनी प्रिन्स्टनमधील "इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज"मध्ये शिकवणे नाकारले.विशेषत: त्यांनी ॲल्बर्ट आईनस्टाईन,कुर्त गोडहेल,जॉन वॉन नुमान यांच्यासारख्या प्रतिभावंत लाभलेल्या संस्थेला नाकारले होते.फाइनमन हान्स बेथे यांचे समर्थक होते.त्यांनी १९४५ ते १९५० दरम्यान कॉर्नेल विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकीचे धडे दिले.हिरोशिमावर झालेल्या अणूबाँब हल्ल्याच्या मनस्तापातून भौतिकीतल्या क्लिष्ट समस्यांवर लक्ष केंद्रित केले.हे त्यांनी कोणत्याही गरजेतून नव्हे तर स्वयंसंतुष्टीसाठी केले.त्यातल्या काही समस्या जशी ट्वर्लिंगची भौतिकी,नटेटिंग डिशची हवेतली गतीचे विश्लेषण हे होत.या अभ्यासादरम्यान त्यांनी वर्तुळाकार गतीसाठी विविध समीकरणांचा वापर केला ज्यांनी त्यांना नोबेल पारितोषिकाच्या उंबरठ्यावर नेले.परंतु त्यांच्या आतली उत्कंठा अजून देखील संपली नव्हती.अनेक विद्यापीठांकडून आलेली प्राध्यापकपदाची मागणी इतकी होती की ते आश्चर्यचकीत होत.त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज यासाठी सोडले की तेथे शिक्षक म्हणून त्यांना करण्यासाठी काहीही नव्हते. फाइनमन यांच्या मते "विद्यार्थी हे प्रेरणास्रोत आहेत व काहीही न करण्यापेक्षा शिकवणे हे निमित्त" त्यामुळे प्रिन्स्टन विद्यापीठाने त्यांना अशी सुविधा देऊ केली की ज्यामुळे ते विद्यापीठात राहतीलही आणि शिकवतीलही.पण तरीही त्यांनी केलटेकमध्ये शिकवले. फाइनमन यांना उत्कृष्ट स्पष्टीकर्ता म्हणून संबोधले गेले.त्यांनी दिलेले प्रत्येक स्पष्टीकरण इतके प्रभावी होते की त्यामुळे त्यांना फार मान मिळाला.त्यांचा शिकवण्याचा मूलमंत्रच हा होता की "जर नवख्या व्याख्यानातच एखादी गोष्ट कळाली नाही तर ती कधीच पूर्णपणे कळणार नाही." त्यांनी नेहमीच रटाळवाण्या शिक्षणपद्धतीचा धिक्कार केला.स्पष्ट विचार व स्पष्ट मांडणी हा त्यांच्या अध्यापनाचा गाभा होता.

शुक्रवार, १ मे, २०२०

💥🌸दिनविशेष🌸💥* 1 मे

*💥🌸दिनविशेष🌸💥*

         *मनमोहन शर्मा*

          *रसायनशास्त्रज्ञ*

*जन्मदिन - १ मे १९३७*

डॉ. मनमोहन शर्मा यांचा जन्म जोधपूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण त्या काळात जोधपूर येथील महेश्‍वरी शाळेत, तसेच सरदार विद्यालयामध्येही झाले. जसवंत महाविद्यालय, जोधपूर येथून त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. मुंबई विद्यापीठातून बी.ई.  ही रसायन अभियांत्रिकीतील पदवी त्यांनी १९५८ साली, तसेच एम.टेक. ही पदवी १९६० साली संपादन केली. आपल्या विद्यार्थिदशेत त्यांना फुटबॉल व टेबल टेनिस या खेळांची आवड होती. 

मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये (आय.सी.टी.) त्यांनी १९५८ साली आपल्या शास्त्रीय संशोधनाची सुरुवात केली. त्यानंतर ते केंब्रिज विद्यापीठात पुढील संशोधनाकरिता गेले व त्यांनी १९६४ साली पीएच.डी. ही पदवी मिळवली. आय.सी.टी. संस्थेमध्ये अध्यापक, प्राध्यापक, विभागप्रमुख इत्यादी पदांवर त्यांनी १९८९ सालापर्यंत काम केले व १९८९ साली ते आय.सी.टी.चे संचालक म्हणून काम पाहू लागले. वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी ते प्राध्यापक झाले.

रसायन अभियांत्रिकीमधील सर्व शाखांमध्ये त्यांनी संशोधनाचे कार्य केले. रासायनिक प्रक्रिया घडत असताना संयंत्रांमधील सर्व घटकांच्या निरनिराळ्या टप्प्यांत होणार्‍या हालचालींवरील (मास ट्रान्सफर) त्यांचे संशोधन जागतिक मान्यतेचे ठरले. निरनिराळ्या अवस्थांतील रसायनांच्या  प्रक्रियांवरील संशोधन, उत्प्रेरक आणि त्याच्या विविध स्वरूपांचे परिणाम, ‘आयन प्रक्रिया उत्प्रेरक’ (आयन एक्स्चेंज कॅटॅलिस्ट) आणि रासायनिक प्रक्रियांतील विघटन या विषयांत त्यांनी मौलिक संशोधन केले.

गुंतागुंतीच्या दोन किंवा जास्त अवस्थेतील रासायनिक प्रक्रियांवर त्यांनी मूलभूत संशोधन केले व त्यायोगे अनुत्तरित प्रश्‍नांची उत्तरे मिळवली. त्यांनी मोजमापनाकरिता शोधून काढलेल्या नवीन पद्धतीने अतिशीघ्र रासायनिक क्रियांची गती मोजणे शक्य झाले. पदार्थाच्या रासायनिक संयंत्रात पदार्थांच्या शुद्धीकरणाकरिता पदार्थशोषण व त्याचे विघटन या क्रियांना फार महत्त्व असते व अशा प्रकारच्या प्रक्रियांना वरील मूलभूत संशोधनातून त्यांनी गणितिसूत्रे तयार केली. दोन द्रवपदार्थांतील मिश्रण व त्याचा रासायनिक प्रक्रियेकरिता उपयोग या विषयांतही त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले.

रासायनिक पदार्थांच्या शुद्धीकरणाकरिता उपयोगात येणार्‍या प्रक्रिया ऊर्ध्वपतन, स्फटिकीकरण इत्यादींमध्ये नावीन्यपूर्ण संशोधन करून त्यांचा उपयोग रसायन अभियांत्रिकीमध्ये मोठ्या प्रमाणात केला.

डॉ. शर्मा हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रसायन अभियंता असून जगातील निरनिराळ्या विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे काम केले आहे. देशातील आणि देशाबाहेरील रसायन उद्योगाच्या बर्‍याच प्रकल्पांमध्ये त्यांच्या संशोधनाचा उपयोग केला जात आहे. त्यांनी लिहिलेली, त्यांच्या विषयातील पुस्तके जगभरातील विद्यापीठात वापरली जातात. त्यांना निरनिराळे पुरस्कार व मानद सभासदत्वे मिळाली.

शास्त्रीय संशोधनातील उत्कृष्ट कामगिरीकरिता भारत सरकारतर्फे ‘शांती स्वरूप भटनागर’ पुरस्कार ४५ वर्षांखालील संशोधकास दिला जातो. डॉ. शर्मा यांना हा पुरस्कार १९७३ साली त्यांच्या वयाच्या छत्तिसाव्या वर्षी मिळाला, तर ते ४५ वर्षांचे होण्याअगोदर त्यांच्या एका विद्यार्थ्यासही तो मिळाला. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीतर्फे दिला जाणारा ‘मेघनाथ साहा’  पुरस्कार त्यांना १९९६ साली मिळाला. इंग्लंडच्या रॉयल सोसायटीतर्फे त्यांना १९८२ मध्ये ‘फेलोशिप’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याच संस्थेतर्फे ‘लिव्हरह्यूम पुरस्कार’ त्यांना १९९६ साली देण्यात आला. त्यांना ‘फेलो’ म्हणून मान्यता देण्यात येणार्‍या संस्था नॅशनल सायन्स अकॅडमी, इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स, थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्स या होत्या. १९८५ साली त्यांना ओमप्रकाश भसीन पुरस्कार देण्यात आला. त्याच साली त्यांना विश्वकर्मा पुरस्कार मिळाला. ‘जी.एम. मोदी सायन्स पुरस्कार १९९१ साली त्यांना मिळाला. त्यांनी केलेल्या संशोधन व शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्याकरिता त्यांना १९८९ साली पद्मभूषण व २००१ साली पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

त्यांनी आय.सी.टी.मध्ये संशोधन करत असतानाच एकंदर ७१ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीसाठी मार्गदर्शन केले. यांमध्ये डॉ. माशेलकर व डॉ. जे.बी. जोशींसारखे नामवंत संशोधकही होते. सध्या त्यांच्या या गुरुकुलातील चौथी पिढी कार्यरत आहे. केंब्रिज व मुंबई विद्यापीठात ते आपल्या कुशाग्र निरीक्षण व स्मरणशक्तीमुळे सर्वांस परिचित आहेत. १९६० सालापासून ४० वर्षे त्यांनी संस्थेच्या प्रगतीचे कार्य इतक्या सक्षमपणे केल्यामुळेच आज सर्व जगभर ‘आय.सी.टी.’चे नाव एक अग्रगण्य शिक्षण संस्था, असे प्रसिद्ध झाले आहे. आज भारतातच नव्हे, तर जगभर त्यांचे विद्यार्थी ‘आय.सी.टी.’चे, पर्यायाने त्यांनी सुरू केलेले संशोधनकार्य करीत आहेत. ‘मेटोजीनिअस रिअ‍ॅक्शन’ या विषयावरील त्यांनी लिहिलेले दोन ग्रंथ आजही जगभर संशोधन व उद्योग क्षेत्रास मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत.
— डॉ. श्रीराम मनोहर

बुधवार, २९ एप्रिल, २०२०

💥🌸दिनविशेष🌸💥 30 एप्रिल

                   
                    *💥🌸दिनविशेष🌸💥*


*श्रीपाद अच्युत दाभोळकर*

*गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ, प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक*

*स्मृतिदिन - ३० एप्रिल २००१*

श्रीपाद अच्युत दाभोळकर (मृत्यू : ३० एप्रिल २००१) ऊर्फ मुकुंद दाभोळकर हे महाराष्ट्रातील ’प्रयोग परिवार’ या संकल्पनेचे प्रवर्तक आणि जमनालाल बजाज या प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी होते.

श्रीपाद अच्युत दाभोळकर हे कोल्हापूरचे एक गणितज्ञ होते. ते कोल्हापूरजवळच्या गारगोटी महाविद्यालयात प्राध्यापक होते. आपल्याला जन्मापासूनच प्रयोग चिकटलेला आहे असे ते म्हणत. माठात भोपळा वाढवणे, स्वत: पपई पिकवून आणि खाऊन त्याच्या सालांवर व बियांवर कोंबडीपालन करणे, नागफणीवर शेळी वाढवणे, स्वमूत्रावर केळी वाढवणे असे त्यांचे प्रयोग लहानपणापासूनच सुरू होते. आपल्या पृथ्वीवरच्या सर्व प्राणिमात्रांच्या ऊर्जेचा मूळ स्रोत सूर्य, हा आपल्या प्रकाशाचे सर्वाना समान वाटप करत असतो. त्याच्या या प्रकाशाला जास्तीतजास्त हिरव्या पानांनी शोषून घेतले तर शेतकरी खूप समृद्ध होऊ शकेल, हेच दाभोळकर आयुष्यभर प्रयोगाने सिद्ध करत राहिले. कोल्हापूरला कुंडीत वाढविलेल्या द्राक्षाच्या एका वेलीवरच्या प्रत्येक पानाला अधिकाधिक सूर्यप्रकाश मिळवून देऊन त्यांनी द्राक्षाच्या तब्बल शंभर घडांचे उत्पन्न मिळवले. ते बघून शेतकऱ्यांना सूर्यशेतीची महती उमगली आणि मग महाराष्ट्रात द्राक्षाची क्रांती झाली. कुठल्याही शेतकी महाविद्यालयात न शिकवता केवळ अनौपचारिक शिक्षण देऊन दाभोळकरांनी महाराष्ट्राला शेतीत समृद्ध केले. एका रिकाम्या सिमेंटच्या पोत्यात कुजलेल्या काँग्रेस गवतावर त्यांनी ऊस लागवड केली. भरपूर उपलब्ध असलेला सूर्यप्रकाश वापरून पाच महिने तो ऊस यशस्वीपणे वाढवला. रसायनांच्या मागे न लागता फक्त सूर्यप्रकाशाच्या शक्तीवर शेतात साखरेची निर्मिती कशी करता येईल, हे त्यांनी दाखवले. सकाळी आंघोळ करताना आपल्या शरीराचा मळ निघून जातो. या मळात शेण कुजण्यासाठी आवश्यक असणारे कोट्यवधी जीवाणू असतात, असे दाभोळकर म्हणत.

आंबा व नारळ खड्डा न करता ढीग पद्धतीने घेणे, घरातील सर्वांचे आंघोळीचे पाणी वापरून सूर्यमंडल पद्धतीने रोजच्या गरजेचा भाजीपाला एका गुंठ्यात उगवणे, सजीव बांबूंचा कुंपण-बायोगॅससाठी उपयोग आदी विविध तंत्रांची माहिती दाभोळकरांच्या पुस्तकांत आहे.

श्री.अ. दाभोळकरांनी लिहिलेली पुस्तके

आधुनिक द्राक्ष लागवड
आपला हात जगन्नाथ
केल्याने होत आहे रे
प्लेन्टी फॉर ऑल (इंग्रजी)
विपुलाच सृष्टी
सर्जन-विसर्जन-सर्जन।


शनिवार, २५ एप्रिल, २०२०

दिनविशेष 24 एप्रिल

दिनविशेष
भारतीय शास्त्रज्ञ
*मोरेश्वर वासुदेव चिपळोणकर*

*स्मृतिदिन - २४ एप्रिल १९८८*

पुणे विद्यापीठाच्या स्थापनेनंतर भौतिकशास्त्र विषयात जे काही उल्लेखनीय कार्य शिक्षण व संशोधन या क्षेत्रात झाले, त्याचा पाया डॉ. मोरेश्वर वासुदेव चिपळोणकर यांनी रचला. त्यांचा जन्म अकोला, खानदेश येथे झाला. त्यांनी एम.एस्सी. पदवी बनारस विद्यापीठातून प्राप्त केल्यानंतर भौतिकशास्त्र विषयातील ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ ही पदवी १९४२ साली मिळविली. एम.एस्सी. नंतर थेट डी.एस्सी. ही पदवी मिळविणे निश्चितच प्रशंसनीय बाब आहे. त्याचबरोबर त्यांनी उत्कृष्ट प्रबंधाबद्दल मुंबई विद्यापीठाचे मूस सुवर्णपदकही मिळविले. त्यानंतर काही काळ त्यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये ‘स्कूल ऑफ रेडिओ फिजिक्स अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स’ या विभागात प्राध्यापक व संचालक म्हणून काम केले. पुढे त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ मीटिऑरॉलॉजीमध्ये प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतरचा १९५२ ते १९६९ हा काळ त्यांनी पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख या पदावर व्यतीत केला. त्यांनी केलेले संशोधनकार्य हे मुख्यत: रेडिओ फिजिक्स, नाइट एअर ब्लो, हवामानशास्त्र अभ्यास, खगोलशास्त्र आणि भारतीय संगीतातील विज्ञान इत्यादी विषयांशी निगडित होते. ढग, वीजवावटळी, विजांचा कडकडाट, जमिनीजवळील विद्युतक्षेत्र व निरनिराळ्या उंचीवरील हवेचे तापमान आणि दाब इत्यादी घटकांसंबंधीचा प्रायोगिक व तात्त्विक अभ्यास करून डॉ. चिपळोणकरांनी अनेक प्रबंध प्रसिद्ध केले आहेत. वाऱ्यापासून ऊर्जा मिळवण्याच्या उद्देशाने हिंदुस्थानच्या पश्चिम आणि दक्षिण प्रदेशावर वाहणाऱ्या वाऱ्यांचा अभ्यासही त्यांनी केलेला आहे.

‘ओझोनोस्फिअर’मधील आणि जमिनीलगतच्या थरांतीलही ओझोन वायूसंबंधीची अचूक मोजमापे हिंदुस्थानात करणारे हे पहिलेच संशोधक होत. वारिसात तोफोंच्या नैसर्गिक आविष्कारात उत्पन्न झालेल्या ध्वनिलहरींच्या साहाय्याने ओझोनोस्फिअरमधील तापमानाचा त्यांनी अचूक अंदाज केलेला आहे व त्या आविष्काराचे उगमस्थानही निश्चित केले आहे. ‘अ‍ॅटमॉस्फेरिक्स’ किंवा रेडिओमध्ये ऐकू येणारा खडखडाट यासंबंधी व त्यावरून ‘आयनोस्फिअर’संबंधीचा प्रायोगिक अभ्यास त्यांनी स्वत: व अनेक विद्यार्थ्यांच्या मदतीनेही बरीच वर्षे करून या शाखेत भर घातली आहे.

संधीप्रकाशाच्यावेळी आकाशातून येणाऱ्या तेजाचेही अचूक मोजमाप अनेक वर्षे करून ‘स्ट्रॅटोस्फिअर’मधील निरनिराळ्या उंचीवरील हवेचे तपमान व घनताही अजमावली आहेत. त्याचप्रमाणे आयनोस्फिरमधील निरनिराळ्या थरांतून रात्रीच्या वेळी येत असलेल्या अत्यंत मंद प्रकाशाचे म्हणजेच रात्रीप्रकाशाचे मोजमाप निरनिराळ्या पद्धतींनी त्यांनी स्वत: आणि विद्यार्थ्यांकरवीही अनेक वर्षे केलेले आहे.

स्फोटक ध्वनिलहरींच्या परिणामामुळे धातूंच्या अंतर्रचनेत आणि त्यांच्या गुणधर्मात जे बदल घडून येतात त्यासंबंधीही त्यांनी संशोधन केले आहे. आकाश निरीक्षणासारख्या अनेक उपक्रमांत त्यांचा सहभाग होता.

पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभाग हा देशातील अग्रगण्य विभाग म्हणून गणला जातो. या विभागाने अलीकडच्या काळात भौतिकशास्त्रातील शाखांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटविला आहे. त्यांपैकी हवामानशास्त्र आणि अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेले अवकाशशास्त्र या विषयांत झालेल्या प्रगतीचा पाया चिपळोणकर यांनी अनेक दशकांपूर्वी घातला. ही परंपरा त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी पुढे चालू ठेवली. डॉ. मो. वा. चिपळोणकर यांच्याकडून त्यांना मिळालेली संशोधनाची प्रेरणा ही त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांची साक्ष देते.

१९७०च्या दशकानंतर संशोधनासाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या. त्याचप्रमाणे नवीन विषयांचा विकास झाला. त्यात मटेरियल सायन्स, न्यूक्लिअर फिजिक्स, बायोफिजिक्स, लेझर त्याचप्रमाणे सैद्धान्तिक भौतिकी यांचा समावेश करता येईल. या पार्श्वभूमीवर विचार केला, तर मो. वा. चिपळोणकर यांच्या काळात संशोधन करणे ही अत्यंत जिकिरीची बाब होती. परंतु डॉ. मो. वा. चिपळोणकर यांच्यामध्ये असणारी संशोधनाची आवड, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी, वागणुकीतील साधेपणा आणि सरळमार्गी व्यवहार या गोष्टींच्या बळावर त्यांनी संशोधन सुरू ठेवले. ते स्वत: अत्यंत कडक शिस्तीचे भोक्ते होते. त्यांचा व्यवहार हा अत्यंत सचोटीचा होता.

अध्यापन, संशोधन व इतर शैक्षणिक जबाबदाऱ्यांमधूनही डॉ. चिपळोणकर वाचन व अध्ययन चिकाटीने व जिद्दीने करीत. त्यांच्या दिनक्रमात सकाळचा वेळ हा वाचन आणि अध्ययनाकरिता राखून ठेवलेला असे. विभाग आणि विद्यापीठाचे अनुशासन व प्रशासन हे नेहमी दुपारी १२ ते ३ या वेळात असे. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा व त्यांना मार्गदर्शन या करता नंतरचे दोन-तीन तास वापरले जात. ते संध्याकाळी आणि रात्री आपल्या आवडीच्या शास्रीय विषयांचे वाचन करीत. त्यांचे ज्येष्ठ सहकारी व नामवंत रसायनशास्रज्ञ डॉ. शंकर खंडो कुलकर्णी-जतकर यांनी अध्ययन आणि वाचन निष्ठा जागृत ठेवण्याच्या त्यांच्या जिद्दीबद्दल खूपच प्रशंसोद्गार काढलेले आहेत. ज्येष्ठ व तरुण वैज्ञानिकांना एकत्र येता यावे व विचारांचे आदान प्रदान व्हावे याबाबत त्यांनी ‘विज्ञान’ नावाचा वैचारिक मेळावा भरवण्याचे कार्य केले. प्रत्येक वर्षी हा तीन दिवसीय मेळावा ते स्वखर्चाने भरवीत असत. अंगीकृत कार्य उत्कृष्टपणे व्हावे यासाठी पदरमोड करण्यास ते सदैव तयार असत.

‘मराठीतून विज्ञान प्रसार’ या विषयात त्यांनी केलेले योगदानही खूपच अमूल्य आहे. प्रसाराची साधने अत्यंत सीमित असतानाही त्यांनी केसरी, सकाळ, सृष्टिज्ञान, विज्ञानयुग, स्वराज्य यांसारख्या नियतकालिके आणि साप्ताहिकांमधून शंभरहून अधिक लेख लिहिले. विज्ञानातील अचूकपणावर त्यांचा कटाक्ष असे. सृष्टिज्ञान मासिकाच्या संपादक मंडळात त्यांनी अनेक वर्षे काम केले. इंडियन फिजिक्स असोसिएशन, पुणे विभागातर्फे विज्ञान प्रसाराचे कार्य करणार्‍या व्यक्तीस ‘डॉ. मो. वा. चिपळोणकर’ हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे आणि हा पुरस्कार मिळणे म्हणजे मराठीतून विज्ञान प्रसाराच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचीच पावती समजली जाते. यातच चिपळोणकर यांच्या कार्याचे आणि निष्ठापूर्ण जीवनाचे महत्त्व सामावलेले आहे.

— डॉ. पंडित विद्यासागर

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

भारतीय शास्त्रज्ञांची माहिती भाग 15 *वसंत खानोलकर*

*📱आम्ही तंत्रस्नेही शिक्षक*
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================

🔎 *माहिती शास्त्रज्ञांची भाग 15*

    *वार -मंगळवार  दि.14/04/2020*

💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

*💥🌸 डॉ वसंत रामजी खानोलकर🌸💥*

(आधुनिक वैद्यक शास्त्राचे जनक)

जन्म :-13 एप्रिल 1895

भारतात आधुनिक वैद्यक संशोधनाची पायाभरणी करणारे आघाडीचे वैद्यकशास्त्रज्ञ डॉ. वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म रत्नागिरीजवळच्या मठ या लहानशा गावात झाला. त्यांचे वडील ब्रिटिश सरकारच्या लष्करात शल्यचिकित्सक (सर्जन) होते. त्या निमित्ताने खानोलकर कुटुंबाचे वास्तव्य पूर्वीच्या अविभाज्य हिंदुस्थानातील, सध्या पाकिस्तानात असलेल्या क्वेट्टा या शहरात होते. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण तेथेच पूर्ण झाल्यावर खानोलकर ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी दाखल झाले. तेथून एम.बी.बी.एस. ही पदवी उत्तम गुणांनी मिळवल्यावर पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला रवाना झाले. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज हॉस्पिटल व मेडिकल स्कूल या संस्थेत त्यांनी विकृतिशास्त्र (पॅथॉलॉजी) या विषयात विशेष प्रावीण्य मिळविले. त्यापूर्वी सतत तीन वर्षे विकृतिशास्त्र या विषयात एकाही विद्यार्थ्यास परीक्षेत यश मिळाले नव्हते. त्यानंतर १९२३ साली विकृतिशास्त्र विषय घेऊन एम.डी. परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान एकाच विद्यार्थ्यास मिळाला. हा बहुमान मिळवणारी व्यक्ती म्हणजे खानोलकर. स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांचे हे यश केवळ देदीप्यमान होते.

परीक्षेतील यशामुळे खानोलकरांना पुढील अभ्यासासाठी ग्रॅहम संशोधन शिष्यवृत्ती सहजच मिळाली. या शिष्यवृत्तीमुळे त्यांची दृष्टी वैद्यकीय संशोधनाकडे वळली. या काळातच वैद्यकशास्त्राच्या प्रगतीसाठी मूलभूत संशोधन करणे आवश्यक आहे, हा विचार त्यांच्या मनात पक्का रुजला. स्वदेशाच्या प्रगतीसाठी वैद्यकीय संशोधन करण्याचा निश्चय करून खानोलकर मुंबईस परतले. ज्या ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयामधून त्यांनी पदवी मिळवली होती, तेथेच त्यांनी स्वत:ची वैद्यकीय कारकीर्द सुरू केली. ग्रॅन्ट वैद्यकीय कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना त्यांनी अनेक तरुण डॉक्टरांना वैद्यकीय संशोधन करण्याची प्रेरणा दिली.

मुंबई महानगरपालिकेने १९२६ साली, किंग एडवर्ड मेमोरियल (के.ई.एम.) हॉस्पिटल व सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय कॉलेजची नव्याने स्थापना केली. तेथे एका तरुण, व्यासंगी व वैद्यकीय संशोधनाची आवड असणाऱ्या विकृतिशास्त्रज्ञाची (पॅथॉलॉजिस्टची) गरज होती. या पदासाठी खानोलकरांना निवडण्यात आले. जी.एस. वैद्यकीय कॉलेजमध्ये विकृतिशास्त्र विभागात त्यांनी मानवी शरीरातील ऊतींच्या नमुन्यांची मांडणी करून म्यूझियम उभारले. या संग्रहालयाचा उपयोग रोगनिदानासाठी, तसेच शवचिकित्सेच्या आधारे मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठीही होऊ लागला. त्यांनी रुग्णांच्या सोईसाठी रोगचिकित्सा कक्ष सुरू केला. विकृतिशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विकृत ऊतींची माहिती देण्यासाठी शवविच्छेदन करण्याचे तंत्र शिकविले. विद्यार्थ्यांमध्ये व्यायाम व खेळाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी एक जिमखाना बांधून घेतला.

डॉक्टरांना बऱ्याचदा पेशंट, तसेच ऊती किंवा पेशींची छायाचित्रे घ्यावी लागतात. त्यासाठी डॉ. खानोलकरांनी छायाचित्रण विभाग सुरू केला. आज हे सर्व विभाग रुग्णालयात असणे गृहीत धरले जाते. परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीस या विभागांची निर्मिती करणे क्रांतिकारक तर होतेच, पण व्यावहारिकही होते. खानोलकर शिस्तीचे भोक्ते होते. त्यामुळेच के.ई.एम. रुग्णालयामधील प्राध्यापकपद स्वीकारताना त्यांनी आपणांस नियमाप्रमाणे पंचावन्नाव्या वर्षी निवृत्त करण्यात यावे, अशी अट घातली होती.

के.ई.एम. रुग्णालय व जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असताना त्यांच्या आयुष्यात एक दु:खद घटना घडली. १९३५ साली क्वेट्टा येथे झालेल्या भूकंपात त्यांच्या सर्व निकटवर्तीयांचा मृत्यू झाला. या संकटावर त्यांनी धीरोदात्तपणे मात केली. वडिलांचा संस्कृत व इतर भाषांतील मौल्यवान ग्रंथसंग्रह डॉ. खानोलकरांनी मुंबई विद्यापीठास प्रदान केला. खानोलकरांचे मराठी व इंग्रजीप्रमाणेच जर्मन, फ्रेंच, उर्दू, पर्शियन इत्यादी भाषांवरही प्रभुत्व होते.

जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय व के.ई.एम. रुग्णालयामध्ये असताना त्यांनी ‘इंडियन चाइल्डहुड सिरोसिस’ या रोगावर महत्त्वपूर्ण संशोधन केले, तसेच कुष्ठरोगावरील संशोधनाची सुरुवात केली. कुष्ठरोगाचे जंतू मज्जापेशीत वसतात हे त्यांनी प्रयोगशाळेत ऊती संवर्धनाचे तंत्र वापरून दाखवून दिले. त्यांच्या या कार्याचा गौरव जागतिक स्तरावर करण्याकरिता सीबा फाउंडेशनने एक परिसंवाद आयोजित केला होता.

के.ई.एम. रुग्णालयामध्ये कार्यरत असताना, खानोलकरांपुढे एक आव्हान नव्याने उभे राहिले. ते म्हणजे कर्करोग संशोधन व रोग्यावर उपचार करण्यासाठी नव्याने बांधलेल्या टाटा स्मारक रुग्णालयाची स्थापना.

पंधरा वर्षांच्या योगदानानंतर त्यांनी के.ई.एम. रुग्णालय स्वेच्छेने सोडून टाटा स्मारक रुग्णालयाच्या विकृतिशास्त्र विभागाचे संचालकपद स्वीकारले. खानोलकरांच्या सहभागामुळे टाटा स्मारक रुग्णालयाला प्रतिष्ठा लाभली. वैद्यकीय संशोधन हे वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे याबद्दल त्यांची खात्री होती. त्यांना मिळालेल्या जागतिक प्रसिद्धीमुळे कित्येक तरुण विकृतिशास्र व संशोधन या विषयाकडे आकर्षित झाले. यांतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे दिवंगत धन्वंतरी डॉ.दोराब दस्तूर. त्यांनी खानोलकरांच्या मार्गदर्शनाखाली मज्जातंतुविकृतिशास्त्र (न्युरोपॅथॉलॉजी) या विषयात एम.डी. पदवी मिळवली व संपूर्ण आयुष्य कुष्ठरोग संशोधनासाठी वेचून जगन्मान्यता मिळवली.

टाटा स्मारक रुग्णालयामध्ये डॉ. खानोलकरांनी नव्याने आधुनिक विभागाची मांडणी केली. विविध प्रकारच्या कर्करोगांचे अचूक निदान होण्यासाठी शिक्षण देऊन कुशल विकृतिशास्त्रज्ञाची (पॅथॉलॉजिस्ट) नवी पिढी तयार केली. कर्करोग्यांना योग्य तऱ्हेचा व वेळीच उपचार मिळावा या हेतूने संशोधनाचा पाया घातला. विकृतिशास्त्र या विषयाची उंची वाढविण्यासाठी त्यांनी ‘टीचिंग पॅथॉलॉजिस्ट’ ही चळवळ उभी केली. यात त्या-त्या विभागातील तज्ज्ञांच्या अनुभवावर चर्चा, वादविवाद होत असत व शोधनिबंध वाचले जात. तसेच भारतातील सर्व विकृतिशास्त्रज्ञांना एकत्रित करण्यासाठी ‘इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट्स’ हे व्यासपीठ तयार केले.  मानवाच्या सवयी, राहणीमान यांमुळे कर्करोग उद्भवतो, हे त्यांनी दाखवून दिले. स्वत:च्या निरीक्षणातून त्यांनी अनुमान काढले, की तंबाखूच्या व्यसनाने मुखाचा कर्करोग होतो, वर्षानुवर्षे धोतराची घट्ट गाठ बांधलेल्या जागी त्वचेला इजा पोहोचून त्या ठिकाणी त्वचेचा कर्करोग होतो, तसेच काश्मीरमध्ये थंडीपासून रक्षण करण्यासाठी बाहेरील डगल्याच्या आत कांगरी नावाची निखाऱ्यांनी भरलेली शेगडी सतत ठेवल्यानेदेखील त्वचेचा कर्करोग होतो. जीवनशैली व कर्करोग यांचा घनिष्ठ संबंध पुढील काळात जगभरातील वैज्ञानिकांनी दाखवून दिला असला, तरी या क्षेत्रात खानोलकर अग्रेसर होते. त्यांनी सुरू केलेल्या लहानशा विकृतिशास्त्र विभागाचे १९५२ साली ‘इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर’ या नवीन संस्थेत रूपांतर झाले. या संस्थेचे संस्थापकपद स्वीकारल्यावर त्यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. यासाठी तंत्रज्ञ व वैज्ञानिक या दोन गटांची गरज होती. कर्करोग संशोधनाच्या सुरुवातीस त्यांनी हुशार विद्यार्थी निवडून त्यांच्याकरवी उत्तम संशोधन करून घेतले. पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्करोग संशोधनाचे पैलू दाखवून प्रत्येक शाखेत नेतृत्व तयार केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे ‘कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट’ला जागतिक मान्यता मिळाली. या संस्थेत त्यांनी टिश्युकल्चर, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, बायोफिजिक्स, इम्युनोलॉजी, केमोथेरपी, एन्डोक्राइनॉलॉजी, एम्ब्रायॉलॉजी व  ह्यूमन जेनेटिक्स विभाग निर्माण केले.

कर्करोग संशोधनात प्राण्यांचा वापर आवश्यक असतो. याकरिता खानोलकरांनी संस्थेत प्राणिगृहाची स्थापना केली. या विभागाच्या देखरेखीसाठी एका तंत्रज्ञाला इंग्लंड येथे एका वर्षाकरिता शिक्षण व अनुभव घेण्यासाठी पाठवले. या तंत्रज्ञाने मायदेशी आल्यावर अनेकांना शिक्षित तयार केले व कर्करोग संशोधनास उपयुक्त अशा कितीतरी जातींची निपज केली. त्याचप्रमाणे, संस्थेचा छायाचित्रण विभाग (फोटोग्राफी डिपार्टमेंट) अद्ययावत असावे, या हेतूने एका तंत्रज्ञास इंग्लंड व युरोपमधील प्रयोगशाळांत धाडून प्रशिक्षित केले व उत्तम छायाचित्रण विभागाची स्थापना केली. कर्करोग संशोधनासाठीदेखील खानोलकरांनी कुशल नेतृत्व तयार केले. संस्थेतील प्रत्येक संशोधकाने परदेशातील प्रयोगशाळांत काम करून अनुभव व ज्ञानाची कक्षा वाढवावी, ही त्यांची धारणा होती. कर्करोगावरील जागतिक संशोधनाची त्यांना सखोल माहिती असे व आपल्या देशात कोणत्या प्रकारचे संशोधन केले पाहिजे, याबद्दल त्यांचे विचार पक्के होते.

खानोलकरांनी वैद्यकशास्त्रातील वैज्ञानिक चळवळ उभारली. यातूनच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ (एन.आय.आर.आर.एच.), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहिमॅटोलॉजी या संस्था निर्माण झाल्या. या संस्थांचे तसेच भाभा अणू संशोधन केंद्रातील बायोमेडिकल ग्रूपचे बीज त्यांच्या प्रेरणेने टाटा स्मारक रुग्णालयाच्या सुरुवातीच्या विकृतिशास्त्र प्रयोगशाळेत व नंतर कर्करोग संशोधन केंद्रातच रोवले गेले. देशापुढील वैद्यकीय समस्या ओळखून त्यांचे निराकरण करण्यासाठी अचूक दृष्टी असणाऱ्या  खानोलकरांना देश-विदेशांत अनेक सन्मान मिळाले. इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट कॅन्सर (यु.आय.सी.सी.) या जागतिक संस्थेच्या स्थापनेत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. या संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. अणुविभाजनातून उद्भवणाऱ्या वाईट परिणामांपासून संरक्षण करण्याबाबतच्या वैज्ञानिक समितीवर भारताचे प्रतिनिधी व नंतर उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली. अमेरिका, युरोपातील देश, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांतील वैज्ञानिकांनी त्यांचा सन्मान केला. भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पदवीने गौरविले. ते १९६० ते १९६३ या काळात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. मराठी विज्ञान परिषदेने आपल्या १९६७ सालच्या मराठी विज्ञान संमेलनात त्यांचा सन्मान केला होता.
 🌹 *समूह प्रमुख व प्रशासिका*
*वृषाली खाड्ये,मुंबई*
*मो.9967001411*
════════════════

रविवार, १२ एप्रिल, २०२०

*दिनविशेष* वसंत रामजी खानोलकर

* दिनविशेष*
 वसंत रामजी खानोलकर
आधुनिक वैद्यक शास्त्राचे जनक
जन्म :-13 एप्रिल 1895
भारतात आधुनिक वैद्यक संशोधनाची पायाभरणी करणारे आघाडीचे वैद्यकशास्त्रज्ञ डॉ. वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म रत्नागिरीजवळच्या मठ या लहानशा गावात झाला. त्यांचे वडील ब्रिटिश सरकारच्या लष्करात शल्यचिकित्सक (सर्जन) होते. त्या निमित्ताने खानोलकर कुटुंबाचे वास्तव्य पूर्वीच्या अविभाज्य हिंदुस्थानातील, सध्या पाकिस्तानात असलेल्या क्वेट्टा या शहरात होते. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण तेथेच पूर्ण झाल्यावर खानोलकर ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी दाखल झाले. तेथून एम.बी.बी.एस. ही पदवी उत्तम गुणांनी मिळवल्यावर पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला रवाना झाले. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज हॉस्पिटल व मेडिकल स्कूल या संस्थेत त्यांनी विकृतिशास्त्र (पॅथॉलॉजी) या विषयात विशेष प्रावीण्य मिळविले. त्यापूर्वी सतत तीन वर्षे विकृतिशास्त्र या विषयात एकाही विद्यार्थ्यास परीक्षेत यश मिळाले नव्हते. त्यानंतर १९२३ साली विकृतिशास्त्र विषय घेऊन एम.डी. परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान एकाच विद्यार्थ्यास मिळाला. हा बहुमान मिळवणारी व्यक्ती म्हणजे खानोलकर. स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांचे हे यश केवळ देदीप्यमान होते.

परीक्षेतील यशामुळे खानोलकरांना पुढील अभ्यासासाठी ग्रॅहम संशोधन शिष्यवृत्ती सहजच मिळाली. या शिष्यवृत्तीमुळे त्यांची दृष्टी वैद्यकीय संशोधनाकडे वळली. या काळातच वैद्यकशास्त्राच्या प्रगतीसाठी मूलभूत संशोधन करणे आवश्यक आहे, हा विचार त्यांच्या मनात पक्का रुजला. स्वदेशाच्या प्रगतीसाठी वैद्यकीय संशोधन करण्याचा निश्चय करून खानोलकर मुंबईस परतले. ज्या ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयामधून त्यांनी पदवी मिळवली होती, तेथेच त्यांनी स्वत:ची वैद्यकीय कारकीर्द सुरू केली. ग्रॅन्ट वैद्यकीय कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना त्यांनी अनेक तरुण डॉक्टरांना वैद्यकीय संशोधन करण्याची प्रेरणा दिली.

मुंबई महानगरपालिकेने १९२६ साली, किंग एडवर्ड मेमोरियल (के.ई.एम.) हॉस्पिटल व सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय कॉलेजची नव्याने स्थापना केली. तेथे एका तरुण, व्यासंगी व वैद्यकीय संशोधनाची आवड असणाऱ्या विकृतिशास्त्रज्ञाची (पॅथॉलॉजिस्टची) गरज होती. या पदासाठी खानोलकरांना निवडण्यात आले. जी.एस. वैद्यकीय कॉलेजमध्ये विकृतिशास्त्र विभागात त्यांनी मानवी शरीरातील ऊतींच्या नमुन्यांची मांडणी करून म्यूझियम उभारले. या संग्रहालयाचा उपयोग रोगनिदानासाठी, तसेच शवचिकित्सेच्या आधारे मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठीही होऊ लागला. त्यांनी रुग्णांच्या सोईसाठी रोगचिकित्सा कक्ष सुरू केला. विकृतिशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विकृत ऊतींची माहिती देण्यासाठी शवविच्छेदन करण्याचे तंत्र शिकविले. विद्यार्थ्यांमध्ये व्यायाम व खेळाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी एक जिमखाना बांधून घेतला.

डॉक्टरांना बऱ्याचदा पेशंट, तसेच ऊती किंवा पेशींची छायाचित्रे घ्यावी लागतात. त्यासाठी डॉ. खानोलकरांनी छायाचित्रण विभाग सुरू केला. आज हे सर्व विभाग रुग्णालयात असणे गृहीत धरले जाते. परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीस या विभागांची निर्मिती करणे क्रांतिकारक तर होतेच, पण व्यावहारिकही होते. खानोलकर शिस्तीचे भोक्ते होते. त्यामुळेच के.ई.एम. रुग्णालयामधील प्राध्यापकपद स्वीकारताना त्यांनी आपणांस नियमाप्रमाणे पंचावन्नाव्या वर्षी निवृत्त करण्यात यावे, अशी अट घातली होती.

के.ई.एम. रुग्णालय व जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असताना त्यांच्या आयुष्यात एक दु:खद घटना घडली. १९३५ साली क्वेट्टा येथे झालेल्या भूकंपात त्यांच्या सर्व निकटवर्तीयांचा मृत्यू झाला. या संकटावर त्यांनी धीरोदात्तपणे मात केली. वडिलांचा संस्कृत व इतर भाषांतील मौल्यवान ग्रंथसंग्रह डॉ. खानोलकरांनी मुंबई विद्यापीठास प्रदान केला. खानोलकरांचे मराठी व इंग्रजीप्रमाणेच जर्मन, फ्रेंच, उर्दू, पर्शियन इत्यादी भाषांवरही प्रभुत्व होते.

जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय व के.ई.एम. रुग्णालयामध्ये असताना त्यांनी ‘इंडियन चाइल्डहुड सिरोसिस’ या रोगावर महत्त्वपूर्ण संशोधन केले, तसेच कुष्ठरोगावरील संशोधनाची सुरुवात केली. कुष्ठरोगाचे जंतू मज्जापेशीत वसतात हे त्यांनी प्रयोगशाळेत ऊती संवर्धनाचे तंत्र वापरून दाखवून दिले. त्यांच्या या कार्याचा गौरव जागतिक स्तरावर करण्याकरिता सीबा फाउंडेशनने एक परिसंवाद आयोजित केला होता.

के.ई.एम. रुग्णालयामध्ये कार्यरत असताना, खानोलकरांपुढे एक आव्हान नव्याने उभे राहिले. ते म्हणजे कर्करोग संशोधन व रोग्यावर उपचार करण्यासाठी नव्याने बांधलेल्या टाटा स्मारक रुग्णालयाची स्थापना.

पंधरा वर्षांच्या योगदानानंतर त्यांनी के.ई.एम. रुग्णालय स्वेच्छेने सोडून टाटा स्मारक रुग्णालयाच्या विकृतिशास्त्र विभागाचे संचालकपद स्वीकारले. खानोलकरांच्या सहभागामुळे टाटा स्मारक रुग्णालयाला प्रतिष्ठा लाभली. वैद्यकीय संशोधन हे वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे याबद्दल त्यांची खात्री होती. त्यांना मिळालेल्या जागतिक प्रसिद्धीमुळे कित्येक तरुण विकृतिशास्र व संशोधन या विषयाकडे आकर्षित झाले. यांतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे दिवंगत धन्वंतरी डॉ.दोराब दस्तूर. त्यांनी खानोलकरांच्या मार्गदर्शनाखाली मज्जातंतुविकृतिशास्त्र (न्युरोपॅथॉलॉजी) या विषयात एम.डी. पदवी मिळवली व संपूर्ण आयुष्य कुष्ठरोग संशोधनासाठी वेचून जगन्मान्यता मिळवली.

टाटा स्मारक रुग्णालयामध्ये डॉ. खानोलकरांनी नव्याने आधुनिक विभागाची मांडणी केली. विविध प्रकारच्या कर्करोगांचे अचूक निदान होण्यासाठी शिक्षण देऊन कुशल विकृतिशास्त्रज्ञाची (पॅथॉलॉजिस्ट) नवी पिढी तयार केली. कर्करोग्यांना योग्य तऱ्हेचा व वेळीच उपचार मिळावा या हेतूने संशोधनाचा पाया घातला. विकृतिशास्त्र या विषयाची उंची वाढविण्यासाठी त्यांनी ‘टीचिंग पॅथॉलॉजिस्ट’ ही चळवळ उभी केली. यात त्या-त्या विभागातील तज्ज्ञांच्या अनुभवावर चर्चा, वादविवाद होत असत व शोधनिबंध वाचले जात. तसेच भारतातील सर्व विकृतिशास्त्रज्ञांना एकत्रित करण्यासाठी ‘इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट्स’ हे व्यासपीठ तयार केले.  मानवाच्या सवयी, राहणीमान यांमुळे कर्करोग उद्भवतो, हे त्यांनी दाखवून दिले. स्वत:च्या निरीक्षणातून त्यांनी अनुमान काढले, की तंबाखूच्या व्यसनाने मुखाचा कर्करोग होतो, वर्षानुवर्षे धोतराची घट्ट गाठ बांधलेल्या जागी त्वचेला इजा पोहोचून त्या ठिकाणी त्वचेचा कर्करोग होतो, तसेच काश्मीरमध्ये थंडीपासून रक्षण करण्यासाठी बाहेरील डगल्याच्या आत कांगरी नावाची निखाऱ्यांनी भरलेली शेगडी सतत ठेवल्यानेदेखील त्वचेचा कर्करोग होतो. जीवनशैली व कर्करोग यांचा घनिष्ठ संबंध पुढील काळात जगभरातील वैज्ञानिकांनी दाखवून दिला असला, तरी या क्षेत्रात खानोलकर अग्रेसर होते. त्यांनी सुरू केलेल्या लहानशा विकृतिशास्त्र विभागाचे १९५२ साली ‘इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर’ या नवीन संस्थेत रूपांतर झाले. या संस्थेचे संस्थापकपद स्वीकारल्यावर त्यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. यासाठी तंत्रज्ञ व वैज्ञानिक या दोन गटांची गरज होती. कर्करोग संशोधनाच्या सुरुवातीस त्यांनी हुशार विद्यार्थी निवडून त्यांच्याकरवी उत्तम संशोधन करून घेतले. पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्करोग संशोधनाचे पैलू दाखवून प्रत्येक शाखेत नेतृत्व तयार केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे ‘कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट’ला जागतिक मान्यता मिळाली. या संस्थेत त्यांनी टिश्युकल्चर, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, बायोफिजिक्स, इम्युनोलॉजी, केमोथेरपी, एन्डोक्राइनॉलॉजी, एम्ब्रायॉलॉजी व  ह्यूमन जेनेटिक्स विभाग निर्माण केले.

कर्करोग संशोधनात प्राण्यांचा वापर आवश्यक असतो. याकरिता खानोलकरांनी संस्थेत प्राणिगृहाची स्थापना केली. या विभागाच्या देखरेखीसाठी एका तंत्रज्ञाला इंग्लंड येथे एका वर्षाकरिता शिक्षण व अनुभव घेण्यासाठी पाठवले. या तंत्रज्ञाने मायदेशी आल्यावर अनेकांना शिक्षित तयार केले व कर्करोग संशोधनास उपयुक्त अशा कितीतरी जातींची निपज केली. त्याचप्रमाणे, संस्थेचा छायाचित्रण विभाग (फोटोग्राफी डिपार्टमेंट) अद्ययावत असावे, या हेतूने एका तंत्रज्ञास इंग्लंड व युरोपमधील प्रयोगशाळांत धाडून प्रशिक्षित केले व उत्तम छायाचित्रण विभागाची स्थापना केली. कर्करोग संशोधनासाठीदेखील खानोलकरांनी कुशल नेतृत्व तयार केले. संस्थेतील प्रत्येक संशोधकाने परदेशातील प्रयोगशाळांत काम करून अनुभव व ज्ञानाची कक्षा वाढवावी, ही त्यांची धारणा होती. कर्करोगावरील जागतिक संशोधनाची त्यांना सखोल माहिती असे व आपल्या देशात कोणत्या प्रकारचे संशोधन केले पाहिजे, याबद्दल त्यांचे विचार पक्के होते.

खानोलकरांनी वैद्यकशास्त्रातील वैज्ञानिक चळवळ उभारली. यातूनच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ (एन.आय.आर.आर.एच.), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहिमॅटोलॉजी या संस्था निर्माण झाल्या. या संस्थांचे तसेच भाभा अणू संशोधन केंद्रातील बायोमेडिकल ग्रूपचे बीज त्यांच्या प्रेरणेने टाटा स्मारक रुग्णालयाच्या सुरुवातीच्या विकृतिशास्त्र प्रयोगशाळेत व नंतर कर्करोग संशोधन केंद्रातच रोवले गेले. देशापुढील वैद्यकीय समस्या ओळखून त्यांचे निराकरण करण्यासाठी अचूक दृष्टी असणाऱ्या  खानोलकरांना देश-विदेशांत अनेक सन्मान मिळाले. इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट कॅन्सर (यु.आय.सी.सी.) या जागतिक संस्थेच्या स्थापनेत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. या संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. अणुविभाजनातून उद्भवणाऱ्या वाईट परिणामांपासून संरक्षण करण्याबाबतच्या वैज्ञानिक समितीवर भारताचे प्रतिनिधी व नंतर उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली. अमेरिका, युरोपातील देश, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांतील वैज्ञानिकांनी त्यांचा सन्मान केला. भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पदवीने गौरविले. ते १९६० ते १९६३ या काळात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. मराठी विज्ञान परिषदेने आपल्या १९६७ सालच्या मराठी विज्ञान संमेलनात त्यांचा सन्मान केला होता.
— डॉ. रजनी भिसे
स्त्रोत :-इंटरनेट

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

भारतीय शास्त्रज्ञ भाग 1 *सत्येंद्रनाथ बोस*


📱आम्ही तंत्रस्नेही शिक्षक*
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================
 *माहिती भारतीय शास्त्रज्ञांची भाग 1*

    *वार - मंगळवार दि.31/12/2019*
💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛
 *विश्वविख्यात शास्त्रज्ञ- सत्येंद्रनाथ बोस*

*जन्म - जानेवारी १ १८९४*

सत्येंद्रनाथ बोस (बंगाली: সত্যেন্দ্রনাথ বসু} (1894-1974) भारतीय शास्त्रज्ञ
बोस-आइन्स्टाईन जोडीतील विश्वविख्यात शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ यांचा जन्म जानेवारी १ १८९४ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ हे रेल्वेत नोकरीला होते.
१९१५ सालीच सत्येंद्रनाथांनी अल्बर्ट आइनस्टाइन यांचा मूळ जर्मन भाषेतील असलेला सापेक्षता सिद्धांत सर्वप्रथम इंग्रजी भाषेत भाषांतरित केला. १९१६ ते १९२१ या काळात सत्येंद्रनाथांनी कोलकाता येथील विद्यापिठात प्राध्यापक पदावर काम कले. १९२१ साली ते ढाका येथील विद्यापिठातील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
१९२३ साली सत्येंद्रनाथांनी प्रसिद्ध गणिती मॉल्ट यांच्या समीकरणांशी संबंधित स्वतःचे शोध इंग्लंड येथून प्रकाशित होणारे मासिक फिलॉसॉफीकलकडे पाठविले पण ते शोध छापण्यास त्या मासिकाने नकार कळविला. या घटनेमुळे सत्येंद्रनाथ निराश झाले नाहीत, त्यांनी त्यांचा प्रबंध आइन्स्टाईन यांच्याकडे जर्मनीला पाठविला. आइन्स्टाईन यांनी तो लेख जर्मन भाषेत भाषांतरित करून तेथे तो छापून येण्यास मोलाची मदत केली. लेख जगभरातील गणितींच्या पसंतीस उतरला, त्यामुळे बोस प्रसिद्धिस आले. आपल्या कामाच्या व्यापातून सत्येंद्रनाथ यांनी सुट्टी काढून ते मादाम मेरी क्युरी यांच्यासह पॅरीस येथे १० महिने काम केले. हे काम आटोपून सत्येंद्रनाथ जर्मनीला गेले. तेथे त्यांचे भव्य स्वागत झाले. आइन्स्टाईन यांच्यामुळे इतर वैज्ञानिक जसे मॅक्स प्लांक, एर्विन श्रोडिंजर, वोल्फगांग पॉली, वर्नर हायझेनबर्ग, सोमरपॅण्ड यांच्याशी अनेक विषयांवर विस्तृत चर्चा करता आल्या.
१९४५ साली सत्येंद्रनाथांनी आपली ढाका येथील नोकरी सोडून ते कोलकाता येथे १९५६ पर्यंत प्रोफेसर म्हणून काम केले. या कामातून सेवानिवृत्त झाल्यावर विश्व भारती विद्याल्याचे उपकुलपति म्हणून त्यांची नेमणूक झाली.
भौतिकशास्त्र विषयाचे त्यांनी २४ लेख लिहिले. या विषयातील हे सर्व लेख अत्यंत महत्त्वाचे समजले जातात.
१९५८ साली सत्येंद्रनाथांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले आणि त्यांना राष्ट्रीय प्रोफेसर म्हणण्यात येऊ लागले, त्याच वर्षी लंडन येथील रॉयल सोसयटीने त्यांना आपला फेलो म्हणून जाहीर केले.
दि. फेब्रुवारी ४ १९७४ रोजी सत्येंद्रनाथांचे हृदय रोगामुळे निधन झाले.
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग 2 🌸होमी जहांगीर भाभा🌸

📱आम्ही तंत्रस्नेही शिक्षक
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================
🔎 *माहिती शास्त्रज्ञांची भाग -०२*

 *वार - मंगळवार    दि ७/०१/२०२०*
💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)

⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

 *🌸होमी जहांगीर भाभा🌸  
- भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ*

*जन्मदिन - ऑक्टोबर ३०, इ.स. १९०९*

होमी भाभा (इ.स. १९०९ - इ.स. १९६६) भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते.
जीवन
भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. वडील जहांगीर भाभा हे बॅरीस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तीमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम वक्ताही होते.
त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रातच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरींगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रीज विद्यापिठातून इ.स. १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली.
इ.स. १९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टी ची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.
संयुक्त राष्ट्रच्या सभेला जातांना २४ जानेवारी, इ.स. १९६६ या दिवशी फ्रान्सच्या हद्दीत असतांना त्यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यु नंतर ट्रॉम्बे येथील अणु संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र असे ठेवण्यात आले.
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग 3 *जयंत नारळीकर*

📱आम्ही तंत्रस्नेही शिक्षक*
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================
🔎 *माहिती शास्त्रज्ञांची भाग ३*

    *वार -मंगळवार  दि.१४/०१/२०२०*

💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

*जयंत विष्णू नारळीकर*

*भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक*

*जन्म - जुलै १९, १९३८*

नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्‍नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.

संशोधन
*स्थिर स्थिती सिद्धान्त*

डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.

चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
*साहित्यातील भर*
विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर सातत्याने विज्ञानचिषयक माहितीने भरलेले ललित लेखन प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.
*विज्ञानकथा पुस्तके*
अंतराळातील भस्मासुर अभयारण्य टाइम मशीनची किमया प्रेषित यक्षांची देणगी याला जीवन ऐसे नाव वामन परत न आला व्हायरस
इतर विज्ञानविषयक पुस्तके
आकाशाशी जडले नाते गणितातील गमतीजमती युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी)
नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)
विज्ञान आणि वैज्ञानिक विज्ञानगंगेची अवखळ वळणे विज्ञानाची गरुडझेप
विश्वाची रचना
विज्ञानाचे रचयिते
सूर्याचा प्रकोप
Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)
Seven Wonders Of The Cosmos

आत्मचरित्र
चार नगरांतले माझे विश्व

*पुरस्कार*
१९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला हे पुरस्कारही मिळाले आहेत. २०१४साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-२०१३ जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)
चरित्र
डॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे ’विज्ञान यात्री डॉ.जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.

*शाॅर्ट फिल्म*

खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एका लघुपटाद्वारे घेतला गेला आहे. साहित्य अकादमीची निर्मिती असलेल्या एका तासाच्या या लघुपटाचे दिग्दर्शन अनिल झणकर यांनी केले आहे.
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग 4 *सुब्रह्मण्यन चंद्रशेखर*

आम्ही तंत्रस्नेही शिक्षक
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================
🔎 *माहिती शास्त्रज्ञांची -०४*

    वार -मंगळवार  दि.२१/०१/२०२०
💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

   *💥🌸सुब्रह्मण्यन चंद्रशेखर🌸💥*

       *भारतीय खगोलशास्त्रज्ञ*

           सुब्रह्मण्यन चंद्रशेखर हे शास्त्रज्ञ आहेत. पद्मविभूषण सुब्रह्मण्यम् चन्द्रशेखर (१९१०-१९९५) भारतीय शास्त्रज्ञ. खगोलशास्त्राचे ब्रूस मेडल, नोबेल पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
 जीवन
डॉ. चन्द्रशेखर यांचा जन्म ऑक्टोबर १९ १९१० रोजी लाहोर येथे झाला. त्यांचे वडील सुब्रह्मण्यन् हे तेव्हा लाहोर येथे भारतीय रेल्वेच्या ऑडीट खात्यात होते. लाहोरला त्यांचा जन्म झाला त्याआधी काही महिने त्यांच्या आजोबांचे,रामनाथ चंद्रशेखरांचे निधन झाले होते.दाक्षिणात्य ब्राम्हण कुटुंबात आजोबांच्या मृत्युनंतर जन्माला आलेल्या अर्भकाला ,तीच व्यक्ती जन्माला आली,असे समजून तिचे नाव दिले जाते. तसे चंद्रशेखरांना त्यांच्या आजोबांचे नाव ठेवण्यात आले.लाहोरच्या लॉरेन्स गार्डन या भागात होते. वडील सुब्रह्मण्यन् हे कर्नाटक संगीताचे उत्तम जाणकार आणि स्व‌तः वायोलीन वादकही होते आणि संगीतशास्त्र वरील काही पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले तर चन्द्रशेखर यांच्या आई सीता बालकृष्णन याही अतिशय हुशार होत्या, त्यांनी इंग्रजीतील पुस्तकांचे तमिळ भाषेत अनुवाद केले. तर त्यांचे काका, विश्व प्रसिद्ध वैज्ञानिक सर सी. व्ही. रामन होते. अशा हुशार घराण्यातील असलेले डॉ. चन्द्रशेखर स्वतःही लहानपणापासून प्रतिभावान होते.
डॉ. चन्द्रशेखर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घरीच झाले, तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मद्रास येथे झाले. १९३० साली डॉ. चन्द्रशेखर बी. एस. सी. झाल्यानंतर केंब्रीज विद्यापीठातील ट्रिनीटी कॉलेज मध्ये उच्च शिक्षणासाठी दाखल झाले. तेथून पी. एच. डी. झाल्यानंतर डॉ. चन्द्रशेखर शिकागो विद्यापीठ येथे १९३९ साली सहाय्यक प्राध्यापक म्हणून रूजू झाले.
 संशोधन
डॉ. चन्द्रशेखर यांची खरी ओळख म्हणजे "चन्द्रशेखर मर्यादा". ११ जानेवारी १९३५ या दिवशी डॉ. चन्द्रशेखर यांनी एक सिद्धांत मांडला. पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांची सांगड घालून चन्द्रशेखर यांनी श्वेत बटूंची कमाल वस्तुमानमर्यादा सूर्यापेक्षा ४४ टक्के इतकी असू शकते असे आपल्या सिद्धांताद्वारे मांडले. यात सूर्यापेक्षा लहान असलेले तारे म्हणजे बटू तारे यांचे अस्तीत्त्व कशामुळे टिकून आहे हे गणीताद्वारे डॉ. चन्द्रशेखर यांनी मांडले. या सिद्धांतासाठी डॉ. चन्द्रशेखर यांचा विरोध करणारे डॉ. आर्थर एडिंगटन हेही याच समस्येवर विचार करीत होते, पण त्यांना यावर उत्तर सापडले नाही. एडिंटन यांनी चन्द्रशेखर यांच्या सिद्धांताला विरोध केल्याने तो सिद्धांत मागे पडला.
डॉ. चन्द्रशेखर यांनी १९३९ साली आपला सिद्धांत An Introduction to the Study of Stellar Structure नावाच्या पुस्तकात विस्तृत रुपात मांडला. १९५० च्या दशकात शास्त्रज्ञांना या सिद्धांतील मते पटू लागली. त्या दिशेने संशोधन सतत सुरूच होते. अखेर जगभरातील शास्त्रज्ञांना डॉ. चन्द्रशेखर यांचे म्हणणे पटले. १९८३ साली त्यांच्या संशोधनाची मान्यता म्हणून डॉ. चन्द्रशेखर यांना जगातील सर्वोच्च समजले जाणारे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
अखेरपर्यंत अमेरिकेतच स्थाईक राहणारे आणि संशोधन कार्यात कार्यरत राहणार्‍या डॉ. चन्द्रशेखर यांचा मृत्यु ऑगस्ट २१ १९९५ रोजी झाला.
 पुरस्कार
हेन्री नॉरिस रसेल व्याख्याता (इ.स. १९४९)
ब्रुस पदक (इ.स. १९५२)
रॉयल ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक (इ.स. १९५३)
पद्मविभूषण (१९६८) - भारत सरकार
हेन्री ड्रेपर पदक (इ.स. १९७१)
नोबेल पारितोषिक भौतिकशास्त्र (इ.स. १९८३)
रॉयल सोसायटीचे कोप्ली पदक (इ.स. १९८४)
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग 5 *राप्पल कृष्णन*

*📱आम्ही तंत्रस्नेही शिक्षक*
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================

🔎 *माहिती शास्त्रज्ञांची -भाग ५*

    *वार - मंगळवार  दि.२७/०१/२०२०*
💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

*राप्पल संगमेश्‍वर कृष्णन*

*भारतीय भौतिकशास्त्रज्ञ*

*जन्मदिन - २३ सप्टेंबर १९११*

       राप्पल संगमेश्‍वर कृष्णन यांचा जन्म केरळातील राप्पल येथे झाला. त्यांचे शिक्षण मद्रास विद्यापीठ (डी. एस्‌सी.), बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेज (पीएच्. डी.) येथे झाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत संशोधन साहाय्यक (१९३५–३८) आणि भौतिकीचे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर तेथेच त्यांनी १९४८–७२ या काळात भौतिकी विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केले. १९७३ मध्ये केरळ विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर त्यांची नेमणूक झाली. १९३८ मध्ये केंब्रिज येथील कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत संशोधन करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती.

राप्पल संगमेश्‍वर कृष्णन यांचे प्रमुख संशोधन कार्य प्रकाशाचे प्रकीर्णन (विखुरणे), वर्णपटविज्ञान, स्फटिक भौतिकी व अणुकेंद्रीय भौतिकी या शाखांतील आहे. त्यांनी नवीन प्रकाशकीय परिणामाचा शोध लावला व सैद्धांतिक रीत्या त्याचे व्यापक स्वरूप प्रस्थापित केले. भौतिक-रासायनिक प्रश्नांत उपयुक्त असलेल्या या परिणामाला ‘कृष्णन परिणाम’ असे नाव प्राप्त झाले आहे. स्फटिक भौतिकीसंबंधी १९५१ पासून ते संशोधन करीत असून १९५८ साली ‘प्रोग्रेस इन क्रिस्टल फिजिक्स’ हा व्याप्ति  प्रबंध त्यांनी प्रसिद्ध केला. त्यांचे १६० हून अधिक संशोधन पर निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.

इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स (लंडन), अमेरिकन फिजिकल सोसायटी, इंडियन अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सेस व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया या संस्थांचे ते फेलो आहेत. १९४९ च्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या भौतिकी विभागाचे ते अध्यक्ष होते.
*----------------------------------------*
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग 7 वसंत गोवारीकर


आम्ही तंत्रस्नेही शिक्षक
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================
🔎 *माहिती शास्त्रज्ञांची भाग ७*
   *वार -मंगळवार  दि.११/०२/२०२०*

💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

      *💥वसंत गोवारीकर💥*
           *ज्येष्ठ शास्त्रज्ञ*

           अवकाश संशोधन, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या क्षेत्रातील त्यांचे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म १९३३ साली कोल्हापूरला झाला. कोल्हापूरला एमएस्सी करून त्यांनी लंडनच्या बìमगहॅम विद्यापीठातून पीएचडीची पदवी प्राप्त करून घेतली. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या एटॉमिक एनर्जी व एव्हिएशनमध्ये काम केले. या वेळी भारताच्या अवकाश संशोधनशास्त्राचे प्रमुख डॉ. विक्रम साराभाई यांनी त्यांना भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमासाठी भारतात बोलावून घेतले. १९६७ साली ते थुम्बा येथे रुजू झाले. अग्निबाणांसाठी लागणारे घन इंधन बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यासाठी त्यांनी प्रॉपेलंट इंधन कॉम्प्लेक्स, अमोनियम परक्लोरेट प्लान्ट अशी युनिट्स स्थापन केली. सॉलिड प्रॉपेलंट स्पेस बूस्टर प्लान्ट हे जगातले सर्वात मोठे युनिट त्यांनी स्थापन केले. त्यांनी बनवलेले एचटीपीबी हे घन इंधन विकसित करून आता ३० वष्रे झाली तरी आजही ते जगातले अद्ययावत असे इंधन आहे. १९७९ साली डॉ. वसंत गोवारीकर हे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक झाले. १९८७ ते १९९३ या कालावधीत गोवारीकर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. त्यांनी हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी मॉडेलही त्यांनी तयार केले. नंतर या मॉडेलला गोवारीकर मॉडेल म्हणून नाव देण्यात आले.
स्मृतिदिन - २ जानेवारी २०१५
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग 6 *सतीश धवन*

आम्ही तंत्रस्नेही शिक्षक
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================

🔎 *माहिती शास्त्रज्ञांची भाग ६

    *वार -मंगळवार  दि.४/०२/२०२०*
💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛
         
          *सतीश धवन*

*भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्वाचे योगदान*

           दक्ष अध्यापक, संशोधक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंता, निष्ठावान, व्यापक दृष्टिकोन असलेला कार्यक्षम नेता या गुणांमुळे सतीश धवन हे ज्या क्षेत्रात शिरले, त्या संबंधित संस्थेत त्यांनी आमूलाग्र बदल घडवला. धवन यांचा जन्म काश्मीरमधील श्रीनगरचा. पंजाब (लाहोर) विद्यापीठाचे पदवीधर. गणित, भौतिकशास्त्रात बी. ए., इंग्रजी साहित्यात एम. ए., अभियांत्रिकीत बी. ई., मिनिसोटा विद्यापीठातून विमानविद्या अभियांत्रिकीत एम. एस. (१९४७), कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून विमानविद्या अभियंता, (१९४९) विमान विद्याशास्त्र व गणितात पीएच. डी., (१९५१) अशा तऱ्हेने कला-विज्ञान अभियांत्रिकी मानवशास्त्र यांना कवटाळण्यास शिक्षणविस्तार व विश्वव्यापी दृष्टिकोन असलेला असामान्य शास्त्रज्ञ म्हणजे डॉ. सतीश धवन!

धवन यांनी वायुगतिशास्त्रात संशोधन आरंभले. त्याकाळी रचनातीत प्रवाह (सुपरसॉनिक फ्लोज्) व शॉक फ्लोज् या गूढविषयावर शोधनिबंध डॉ. धवन यांनी ठोस निरीक्षणांसह सादर केले. त्यातील अचूकतेमुळे ते गाजले. पृष्ठीय घर्षणजन्य प्रेरणा (फ्रिक्शन ड्रॅग) मोजण्याची सोपी पद्धत त्यांनी शोधली. श्लिकटिंग यांच्या ‘बाऊंड्री लेयर’ या ग्रंथाच्या गेल्या अर्धशतकातील सर्व आवृत्त्यांमध्ये धवन यांच्या संशोधनांची नोंद झालीय.

१९५९-६१ दरम्यान डॉ. कलामांना वायुयान विकास संस्थेत (एडीई), हॉवरक्राफ्टच्या विरुद्ध दिशांनी फिरणा-या पंख्यांचा आराखडा बनवताना अडचण आली. आपल्या संचालकांच्या अनुमतीने ते भारतीय विज्ञान संस्थेत जाऊन ते धवनसरांना भेटले. रोज १ तासप्रमाणे १० शनिवार १० व्याख्याने डॉ. कलामांना दिली. व्याख्यानापूर्वी प्रश्न विचारून ते विद्यार्थ्यांची ग्रहणक्षमता व उपयायोजनक्षमता पारखून घेत. सत्रान्ती आराखडा बनवण्याइतके डॉ. कलामांचे मन खंबीर झाले.

१९७२ मध्ये अवकाश आयोग (स्पेस कमिशन) व भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) यांच्या अध्यक्षपदी आणि अवकाश विभागात (डिपार्टमेंट ऑफ स्पेस) भारत शासनाच्या सचिवपदी झालेली नियुक्ती अनेकांना प्रेरक ठरली. डॉ. साराभाईंनी अंतराळ कार्यक्रमात संघटनात्मक व व्यवस्थापकीय शिस्त निर्माण केली, तर इस्रोला अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त डॉ. धवन यांनी केले.

१९८० साली, बंगलोरमधील इस्रेच्या मुख्यालयात आगामी दोन दशकातील अंतराळ मोहिमांची सांगोपांग चर्चा डॉ. कलाम करत होते. दुस-या दिवशी डॉ. धवन यांनी त्या चर्चेची माहिती घेतली. त्यांनी सोबत आणलेल्या तक्त्यांच्या सहाय्याने आगामी १५ वर्षातील मोहिमांचे आराखडे तयार केले. त्यामध्ये भूस्थिर व उपग्रहांसाठी प्रक्षेपण याने व उपग्रहमालिका यांचा समावेश होता. धवनसर मोहिमेच्या यशाचे श्रेय इतरांना देऊन स्वत: चुका, त्रुटी व अपयशाचे धनी होत.

१० ऑगस्ट १९७९ रोजी, कलामांच्या अध्यक्षतेखाली झालेली मोहीम फसली. पण माध्यम पत्रकारांना तोंड देताना आपले अपयश मान्य करून आगामी मोहीम जबाबदारीने करण्याची ग्वाही धवनसरांनी दिली. यानंतर १९ जुलै १९८० रोजी, दुस-या प्रक्षेपण यानाने ‘रोहिणी’ उपग्रहाला यशस्वीरित्या भ्रमण कक्षात नेऊन सोडले, तेव्हा पत्रकारांसमोर डॉ. कलामांनाच त्यांनी बोलायला लावले. अशा तऱ्हेने धवनसरांनी सहका-यांमध्ये निकोप दायित्वाची भावना फुलवली. त्यांनी सहका-यांसाठी मूल्यमापन व बढत्या ही पद्धत आणली. त्यामुळे अधिक कार्यक्षम अभियंत्यांना पुढे जाण्यास वाव मिळाला. पुढे त्यांनी राष्ट्रीय अंतरीक्ष कार्यक्रम हा नागरी उपक्रम म्हणून राबवला.

या प्रकारात वरिष्ठांनी कनिष्ठांनी कसे वागावे याचा आदर्श ‘धवनसर’ असल्याचे कलमांना वाटे. १९८१ साली, डॉ. धवन यांना पद्मविभूषण व डॉ. कलाम यांना पद्मभूषण देऊन देशाने गौरविले. १९९० मध्ये हैद्राबादमध्ये ‘पक्ष्यांची उड्डाणे’ या विषयावर धवन सरांचे व्याख्यान झाले, त्यावेळी डॉ. कलामांनी त्यांची ओळख करून दिली. ३१ मे १९९२ रोजी, ‘लॉच व्हेइकल प्रोग्राम’वर धवनसरांनी चर्चा आयोजित केली होती. डॉ. कलामांनी इस्रे संचालकांसमोर आपले विचार मांडले. प्रा. धवन यांनी डॉ. कलामांच्या डीआरडीओमध्ये बदलीची घोषण करून सा-यांना धक्का दिला. १९८० पासून प्रा. धवन यांनी निश्चित केलेल्या पथावरून देशाची संरक्षण तंत्रज्ञानाबाबत प्रगती झाली व तो स्वयंपूर्ण ठरलाय.

१९९९ मध्ये, राष्ट्रीय एकात्मतेचा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ डॉ. सतीश धवन यांच्या चतुरस्र् व्यक्तिमत्त्वाला लाभला. राष्ट्रीय समस्या सा-यांना बरोबर घेऊन वैज्ञानिक मार्गाने सोडवण्याच्या धवनसरांच्या प्रतिभाशाली कर्तृत्वाचा सन्मान असल्याचे डॉ. कलाम यांना त्या क्षणी वाटले.

इस्रेचे अध्यक्ष म्हणून एक तपाच्या सेवेचा गौरव म्हणून त्यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर २००२ रोजी ‘इस्रेचे’ पुनर्नामकरण होऊन ते सतीश धवन स्पेस सेंटर असे केले गेले. डॉ. धवन यांची समस्येविषयीची आस्था व कार्यातील वस्तुनिष्ठता या नेतृत्वगुणांचा गौरव पंतप्रधान वायपेयी यांनी केला. शिक्षक दिनी ‘उत्कृष्ट शिक्षक’ असलेल्या आपल्या शास्त्रज्ञ गुरूचा सन्मान पाहून डॉ. कलामांचे मन समाधानाने भरून आले.
सतिश धवन (२५ सप्टेंबर – ३ जानेवारी २००२) यान्चे भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्वाचे योगदान होते. ते भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्यानंतर ISRO (Indian Space Research Organisation) चे १९७२ साली अध्यक्ष झाले. त्यांना भारतातील प्रायोगिक fluid dynamicsच्या संशोधनाचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म श्रीनगरमधे झाला आणि शिक्षण भारत तसेच अमेरिकेत झाले.
त्यांनी ग्रामीण शिक्षण, Remote Sensing तसेच Satellite Communication च्या क्षेत्रात मुलभूत संशोधन केले. त्यांच्या प्रयत्नांनी भारत INSAT - दूरसंचार उपग्रह, IRS - दूरसंवेद उपग्रह आणि PSLV - Polar Satellite Lanch Vehicle यासारखे प्रकल्प यशस्वी करू शकला.
त्यांच्या स्मरणार्थ श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण स्थळाचे सतीश धवन अंतराळ केंद्र असे नामकरण करण्यात आले.
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग 8 एम.जी.के. मेनन

आम्ही तंत्रस्नेही शिक्षक*
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================

🔎 *माहिती शास्त्रज्ञांची भाग 8*

    *वार -मंगळवार  दि.18/02/2020*
💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

*एम.जी.के. मेनन*

   प्रसिद्ध वैज्ञानिक ,जन्मदिन - २८ आगस्ट १९२८

भारतीय भौतिकविज्ञ. त्यांनी प्रामुख्याने ⇨ विश्वकिरण व ⇨ मूलकण भौतिकी या विषयांत संशोधन केलेले आहे.

मेनन यांचा जन्म मंगलोर येथे झाला. त्यांचे शिक्षण जोधपूर येथील जसवंत कॉलेज, मुंबई येथील रॉयलइन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि इंग्लंडमधील ब्रिस्टल विद्यापीठ येथे झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम्. एस्‌सी. व ब्रिस्टल विद्यापीठा ची पी. एच्. डी. या पदव्या संपादन केल्या. ते ब्रिस्टल विद्यापीठात संशोधन सहाय्यक होते (१९५२–५३). त्यानंतर त्यांनी मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या संस्थेत प्रपाठक (१९५५–५८), सहयोगी प्राध्यापक (१९५८ ६०), भौतिकी विद्यापीठात प्राध्यापक व अधिष्ठाते (१९६०–६४), वरिष्ठ प्राध्यापक व उपसंचालक (भौतिकी, १९६४–६६) आणि होमी भाभा यांच्या अपघाती निधनानंतर संस्थेचे संचालक (१९६६–७५) या पदांवर कामे केली. यांखेरीज भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी विभागाचे सचिव व इलेक्ट्रॉनिकी आयोगाचे अध्यक्ष (१९७१–७८), संरक्षण खात्याच्या संशोधन व विकासाचे सचिव आणिसंरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या महासंचालकाचे वैज्ञानिक सल्लागार (१९७४–७८), कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्चचे महासंचालक (१९७८–८१), भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रविद्या विभागाचे सचिव (१९७८ पासून), पर्यावरण विभागाचे सचिव (१९८० पासून), अतिरिक्त उर्जा उद्‌गम आयोगाचे सचिव (१९८१ पासून), वगैरे विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. फेब्रुवारी १९८६ मध्ये पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली.

मेनन यांनी ब्रिस्टल येथे अणुकेंद्रीय मूलकणांच्या छायाचित्रण पायस [⟶ कण अभिज्ञातक] तंत्र व त्याचा मूलकणांच्या अभ्यासातील उपयोग यांसंबंधी संशोधन केले. त्यांनी केलेल्या तांत्रिक विकास कार्यामुळे बदलत्या उर्जेच्या म्यूऑनांचे, उच्च उर्जाभारित व ज्यांच्या उर्जा अतिशय अरुंद कक्षेत सामावलेल्या आहेत अशा पायॉनांचे आणि भारी मेसॉनच्या (K-मेसॉनच्या) क्षयक्रियेत दुय्यम कण म्हणून उद्‌भवणारे इलेक्ट्रॉन यांचे अस्तित्व प्रथमच दाखविता आले. त्यांच्या कार्यामुळे विचित्र कणांच्या गुणधर्माचे (विशेषतः K - मेसॉनांच्या Kπ2, Kμ3 व Ke3 या क्षयक्रियांचे) स्पष्टीकरण देणे शक्य झाले. त्यांनी अणुकेंद्रीय पायस तंत्राबाबत केलेल्या संशोधनामुळे हे तंत्र १९५४ पर्यंत १५ लि. इतका प्रचंड स्तरयुक्त पायसाच्या राशीचा उपयोग करण्याइतके विकसित झाले. भारतात परतल्यावर त्यांनी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये अतिशय उंचीवरील (सु. ३,३०० मी.) बलून उड्डाणा चे तंत्र विकसित केले आणि त्याच्या साहाय्याने चुंबकीय विषयवृत्ताच्या नजीक प्राथमिक विश्वकिरणांचा अभ्यास कार्यक्रम प्रस्थापित केला. बलून उडविणे, त्याचे मार्गनिरीक्षण करणे, पुनर्प्राप्ती करणे व लागणारी उपकरण सामग्री तयार करणे या सर्व गोष्टींचा या कार्यक्रमात समावेश होतो. १९६० सालापासून मेनन यांनी कोलारच्या सोन्याच्या खाणीत अतिशय खोल जागी म्यूऑन, न्यू ट्रिनो, दुर्बल आंतरक्रिया व इतर संबंधित आविष्कार यांविषयी अभ्यास करण्यासाठी प्रयोगांची उभारणी केलेली आहे. सध्या यांमध्ये प्रोटॉनाचे आयुर्मान (१०३० - १०३२ वर्षे) मोजण्याची योजना आहे याकरिता १५० टन वजनाचा अभिज्ञातक तयार करण्यात आला आहे.

मेनन यांना त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ रॉयल कमिशन फॉर द एक्झिबिशन ऑफ १८५१ याचा वरिष्ठ पुरस्कार (१९५३–५५), शांतिस्वरुप भटनागर पुरस्कार (१९६०), रॉयल एशियाटिक सोसायटीचे दुर्गाप्रसाद खेतान स्मृती पदक (१९७८), जवाहरलाल नेहरु विज्ञान पुरस्कार (१९८३), सी. व्ही. रामन संशोधन प्राध्यापक पुरस्कार (१९८५), तसेच पद्मश्री (१९६१) व पद्मभूषण (१९६८) हे सन्मान आणि जोधपूर, दिल्ली, अलाहाबाद, जादवपूर, सरदार पटेलव बनारस या विद्यापीठांच्या सन्मानीय पदव्या मिळालेल्या आहेत. ते इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (अध्यक्ष १९७४–७६), इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी (अध्यक्ष १९८१), महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, महाराष्ट्र ॲसोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स, रॉयल सोसायटी (लंडन), रशियाची ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्टस् ॲन्ड सायन्सेस वगैरे अनेक वैज्ञानिक संस्थांचे सदस्य आहेत. यांखेरीज भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. बंगलोर; भारत सरकारचा अवकाश आयोग; संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांची विज्ञान व तंत्रविद्या अनुप्रयोग सल्लागार समिती (१९७२–७९, दोन वर्षे अध्यक्ष); इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इन्स्टिट्यूट्‌स  फॉर ॲडव्हान्सड स्टडी, स्टॉकहो म; कॉस्मिक रे कमिशन ऑफ इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर ॲन्ड ॲप्लाइड फिजिक्स (१९६३–६९, सचिव १९६९–७२, अध्यक्ष १९७२–७५) इ. अनेक सरकारी, खाजगी, आंतरराष्ट्रीय व भारतीय संस्थांचे आणि आयोगांचे सदस्य, सल्लागारवा संचालक या नात्याने त्यांनी कामे केली आहेत वा अद्यापही करीत आहेत. विश्वकिरण व मूलकण भौतिकी या विषयांवरील त्यांचे ८१ शास्त्रीय निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग 9 *चंद्रशेखर वेंकट रामन*


📱आम्ही तंत्रस्नेही शिक्षक
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================
🔎 *माहिती शास्त्रज्ञांची भाग ९*

    *वार - मंगळवार दि.२५/०२/२०२०*

💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

         *चंद्रशेखर वेंकट रामन*

*जन्म - नोव्हेंबर ७, १८८८*

चन्द्रशेखर वेंकट रामन् (नोव्हेंबर ७, १८८८-नोव्हेंबर २१, १९७०) हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते.
सी.व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन्‌हे काही काळ बंगलोरातही होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले.रमणचे ६ मे १९०७ रोजी लोकासुंदरी अम्मल (१८९२-१९८०) बरोबर लग्न झाले होते.त्यांना चंद्रशेखर आणि रेडिओ-खगोलशास्त्रज्ञ राधाकृष्णन हे दोन पुत्र होते.रमण हे सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांचे काका होते,ज्यांना पुढे १९३१ मध्ये चंद्रशेखर मर्यादेच्या शोधासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार (१९८३) जिंकला आणि तारकीय उत्क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या अणू प्रतिक्रियेवर त्यांनी केलेल्या त्यानंतरच्या कार्यासाठी.

आयुष्यभर,रमणने दगड, खनिज पदार्थांचे विस्तृत वैयक्तिक संग्रह विकसित केले आणि मनोरंजक प्रकाश-विखुरलेल्या गुणधर्मांसह साहित्य,जे त्याने आपल्या जगातून प्राप्त केले आहे आणि भेट म्हणून.नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी तो अनेकदा लहान हाताळण्या एवढा स्पेक्ट्रोस्कोप घेऊन जात असे.

*संशोधन*
त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) या शोधासाठी ते ओळखले जातात. १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन यांना मिळाले होते.

*सन्मान आणि पुरस्कार*
चंद्रशेखर वेंकटरामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकाला प्रसिद्धीसाठी पाठवला होता.

रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून त्यांची निवड झाली त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात (१९२४) आणि किताबधारी व्यक्ती म्हणून १९२९ मध्ये.
1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक त्याने जिंकले.
1941 मध्ये त्याला फ्रँकलिन पदक देण्यात आले.
१९५४ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1957 मध्ये त्यांना लेनिन शांतता पुरस्कार देण्यात आला.1998 मध्ये, अमेरिकन केमिकल सोसायटी आणि इंडियन असोसिएशन फॉर द कल्टीवेशन ऑफ सायन्स यांनी रामनचा शोध आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक केमिकल लँडमार्क म्हणून ओळखला.
सर सी.व्ही रामन यांच्या नावाने रँचो (रिसर्चर्स ॲन्ड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन) नावाची पुण्याची संस्था इ.स. २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबरमध्ये ’सर सी.व्ही. रामन पुरस्कार’ देत असते. २०१५ सालच्या पुरस्काराचे मानकरी :
1. आदित्य आशुतोष जोशी (वैद्यकीय तंत्रज्ञान)

2. ध्रुवीन व्यास

3. गोपाळ गाढवी

४. प्राची दुबळे (आदिवासी संगीत)
५. सुधीर पालीवाला (कचरा व्यवस्थापन)
६. रमेश बोतालजी (सांडपाणी व्यवस्थापन)

मृत्यू

ऑक्टोबर १९७० च्या शेवटी,रमण त्यांच्या प्रयोगशाळेत कोसळले;त्यांच्या हृदयातील झडप वाटेने निघाले होते. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आणि डॉक्टरांनी त्यांना चार दिवस जगण्यासाठी मुदत दिली.ते वाचले आणि काही दिवसांनी त्यांनी रुग्णालयात राहण्यास नकार दिला कारण त्यांनी त्यांच्या अनुयायांनी वेढलेल्या त्यांच्या संस्थेच्या बागेमध्ये मरणे पसंत केले.

रमणच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी,त्यांनी आपल्या एका माजी विद्यार्थ्यास सांगितले,"अकादमीच्या नियतकालिकांना मरण येऊ देऊ नका,ते देशात विज्ञानाच्या गुणवत्तेचे संवेदनशील संकेतक आहेत . "ती संध्याकाळ, रमण यांनी आपल्या संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाशी भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर संस्थेच्या व्यवस्थापनासंबंधीकार्यवाही बद्दल त्यांच्याशी चर्चा केली.२१ नोव्हेंबर १९७०रोजी रमनचा दुसर्‍या दिवशी पहाटे नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग १० 💥उडुपी रामचंद्र राव💥


📱आम्ही तंत्रस्नेही शिक्षक
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================

🔎 *माहिती भारतीय शास्त्रज्ञांची भाग १०*

   *वार -मंगळवार  दि.३/०२/२०२०*
💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

*💥उडुपी रामचंद्र राव💥*

*भारतीय खगोलशास्त्रज्ञ*

*जन्मदिन - १० मार्च १९३२*

उडुपी रामचंद्र राव तथा यू.आर. राव हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ होते.

यू.आर. राव यांचा जन्म कर्नाटकातील दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील अदमारू या खेड्यात झाला. म्हैसूरमधील शिक्षणानंतर त्यांनी मद्रासला विज्ञानात पदवी, बनारस विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी व गुजरात विद्यापीठातून पीएच.डी. असे शिक्षण घेतले. नंतर ते अवकाशयानांच्या अभ्यासासाठी अमेरिकेला गेले.

*कारकीर्द*

अमेरिकेतील एमआयटी संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर यू.आर राव डलास येथील टेक्सास विद्यापीठात प्राध्यापक झाले. १९६६मध्ये भारतात परत येऊन अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीत ते संशोधन करू लागले. तेथे डॉ. विक्रम साराभाई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. देशाने पहिला आर्यभट्ट हा उपग्रह सोडला तेव्हापासून त्यांची अवकाश संशोधनातील कारकीर्द सुरू झाली.

*आर्यभट्ट*

पहिला उपग्रह सोडण्याचा प्रस्ताव त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींपुढे मांडला गेला, तेव्हा त्यांनी डॉ. राव यांना विचारले, उपग्रहाला पैसे किती लागतील, त्यावर राव यांनी तीन कोटी सांगितले. इंदिरा गांधींनी लगेच होकार दिला. त्या वेळी मनमोहन सिंग नुकतेच अर्थसचिव झाले होते. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत जो पहिला प्रकल्प मंजूर केला तो आर्यभट्ट उपग्रहाचा.

*अन्य उपग्रह*

यू.आर. राव यांनी १९८४ ते १९९४ या काळात भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे नेतृत्व केले. दहा वर्षे ते अवकाश खात्याचे सचिव व इस्रोचे अध्यक्ष होते. ‘आर्यभट्ट’नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भास्कर, अ‍ॅपल, रोहिणी, इन्सॅट आदी श्रेणींचे किमान वीस उपग्रह तयार झाले.

*मंगळाची मोहीम*

भारताने ४५० कोटी रुपयांतील परवडणारी मंगळ मोहीम राबवली व फत्तेही केली. त्याच्या पडद्यामागचे सूत्रधार डॉ. रावच होते. या मंगळ मोहिमेची घोषणा मनमोहन सिंग यांनी केली तेव्हा सिंग पंतप्रधान होते.

*पुरस्कार आणि सन्मान*

वॉशिंग्टन येथील ‘सॅटेलाइट हॉल ऑफ फेम ऑफ द सोसायटी ऑफ सॅटेलाइट प्रोफेशनल्स इंटरनॅशनल’ या संस्थेत समावेश झालेले यू.आर. राव हे पहिले भारतीय आहेत. (२०१३ मध्ये)
इंटरनॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅस्ट्रॉनॉटिक्सचा थिओडोर व्हान करमान पुरस्कार
पद्मविभूषण
युरी गागारिन पुरस्कार, वगैरे.
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग ११ 💥🌸आर्यभट्ट🌸💥



*📱आम्ही तंत्रस्नेही शिक्षक*
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================
🔎 *माहिती भारतीय शास्त्रज्ञांची भाग ११*

  *वार - मंगळवार दि.९/०३/२०२०*
💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

      *💥🌸आर्यभट्ट🌸💥*

                 आर्यभट्ट यांचे मुळ गाव बिहारमधील कुसुमनगर हे आहे ,त्यांनी प्राचीन ज्योतिष ग्रथांचे संशोधन केले आहे तसेच स्वतः अनुभव घेऊन आर्यभट्टीय या ग्रथांची रचना केली गणितशास्त्रात आणि ज्योतिषशस्त्रात हा ग्रंथ अतिशय महत्वाचा समजला जातो गीतिकापडातील श्लोकांची संख्या १३ आहे यामध्ये आकाशाचा विस्तार पृथ्वी ,चंद्र ,सूर्य ,आणि ग्रह यांची अंतरे मोजण्याची लहान मोठी मापे या तेरा श्लोकांत दिली आहे आर्यभट हे वेध घेण्यात प्रवीण होते पृथ्वी स्वतः भोवती फिरते , हे निछितपणे सांगणारे आर्यभट हे पहिलेच शास्त्र असावेत आज रूढ़ असलेले अनेक सिद्धांत त्यांनी इ.स. च्या पाचव्या शतकात सर्वप्रथम सांगितले होते त्यांच्या ग्रंथाचा प्रचार व प्रसार दक्षिण भारतात झाला १६-१७ शतका पर्यंत दक्षिण भारतात त्याचे अध्ययन आणि अध्यापन सुरु होते आजही दक्षिणेतल्या वैशनव पंथात आर्यभटाना फार मान आहे १९ एप्रिल १९७५ या दिवशी भारताने आपला पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडला त्या उपग्रहला आर्यभटांचे नाव देऊन भारताने प्राचीन संशोधकाचा गौरव केलेला आहे

अमावस्येला सूर्यग्रहण व पौर्णिमेस चंद्रग्रहण यांचा संबंध चंद्र व पृथ्वी यांच्या सावल्यांशी आहे, हे त्यांना माहीत होते. तसे त्यांनीनोंदवून ठेवले आहे. पहिला आर्यभट्ट याने सूत्रांचा उपयोग खगोलशास्र विषयक ग्रंथांत मोठ्या प्रमाणावर केला. अशा ग्रंथांत आकडेमोड द्यावी लागते परंतु मजकूर तर मुख्यत्वे काव्यमय व यमकात असतो. मग संख्या पद्यात बसवण्यासाठी त्या अक्षराने निर्दिष्ट करायच्या व ती अक्षरे वृत्तात बसवून श्लोकात लिहावयाची असा मार्ग आर्यभट्टाने अवलंबला. त्यामुळे अक्षरसंख्या कमी होते, शिवाय वृत्तबद्ध लिखाण होते. त्यावेळी लेखनाची साधने उपलब्ध नसल्याने त्या संख्या अशा प्रकारे लक्षात ठेवणेही सोपे जात असे आर्यभटाने ० अंशापासून ते ९० अंशापर्यंत ३/१११ अंशाच्या फरकाने सर्व कोन घेऊन त्यांचे ज्यार्ध कसे काढावेत हे सांगितलेले आहे. तसेच पृथ्वी स्वत:भोवती एकसारखी फिरत असते, म्हणजेच तिला दैनंदिन गती आहे हे सांगणारा पहिला शास्रन होय. वर्षाचे दिवस ३६५, घटी १५, पळे ३९, विपळे १५ इतक्या सूक्ष्म भागांपर्यंत कालमापन नोंदवून ठेवले आहे. तसेच 'पाय' नावाची गणित संकल्पनेची किंमत ६३,८३२/२०,००० आहे असेही नोंदवले आहे सूर्यसिद्धान्तावर याने लिहिलेला एक टीका ग्रंथ 'सूर्य सिद्धान्त-प्रकाश ' या नावाने प्रसिद्ध आहे.

*आर्य ग्रथाचे भाग*

(१) गीतिका पाद, (२) गणितपाद,(३) कालक्रियापाद, (४) गोलपाद.

मात्र वर्तमानकाळात त्या ग्रंथाची एकही संहिता उपलब्ध नाही असे दिसून येते. अंकगणित ,बीजगणित व भूमिति या गणिताच्या शाखांचा त्याचा सखोल अभ्यास होता. आज बीजगणितावरचा उपलब्ध जुना ग्रंथ विख्यात ज्योतिर्वेत्ता आर्यभट्ट याचा आहे. व वयाच्या तेविसाव्या वर्षीच त्याने बीजगणितावरचा आणि ज्योतिषावरचा ग्रंथ लिहिला. म्हणून आर्यभट्ट यास बीजगणिताचा जनक असे मानण्यात येते.
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग 12 💥मोक्षगुंडम विश्वेश्वरैया💥


*📱आम्ही तंत्रस्नेही शिक्षक*
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================
🔎 *माहिती शास्त्रज्ञांची भाग 12*

    *वार -मंगळवार  दि.17/03/2020*
💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

*💥मोक्षगुंडम विश्वेश्वरैया💥*

*भारतीय अभियंता-नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर'*

*स्मृतिदिन - १४ एप्रिल १९६२*

        सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' ; (कन्नड भाषा|ಶ್ರೀ ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ); सप्टेंबर १५ १८६१ - एप्रिल १४ १९६२). हे एक भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूरतालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी जन्मलेले समर्थ अभियंते व नागरीक होते. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला.ब्रिटीशांनी पण त्यांना,त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो. काही ठिकाणी,विशेषतः, त्यांच्या जन्मराज्य असलेल्या कर्नाटकात,या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.

अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर,त्यांनी बॉम्बे (सध्याचे मुंबई) येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली.नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून निमंत्रण आले.त्यांनी, दख्खन क्षेत्रात पाटबंधाऱ्यांची एक अतीशय क्लिष्ट योजना राबविली. त्यांनी 'सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली' विकसीत केली व त्याचे पेटेंट घेतले जी सन १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील खडकवासलाधरणास लावण्यात आली. ही द्वारे,धरणातील साठ्याची पूरपातळी,पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आलीत.या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे,ती टिग्रा? धरण ग्वाल्हेर व कृष्णराज सागर धरण म्हैसूर येथे बसविण्यात आली. विश्वेश्वरैया यांनी हैदराबाद शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्याने त्यांना सत्कार मुर्ती झाले.विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.

सर मो. विश्वेश्वरैया यांनी,कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासुन ते उदघाटनापर्यंत सर्व कामांची देखरेख केली.या धरणाचे बांधकामाने,ते बांधल्या गेल्याच्या वेळचे,आशियातील सर्वात मोठे सरोवर निर्माण झाले. त्यांना यामुळे, 'म्हैसूर राज्याचे पिता' म्हणून ओळखले जायचे.त्यांचे म्हैसूर राज्याचे नोकरीदरम्यान,त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील म्हैसूर सोप फॅक्टरी,,किटकनाशक प्रयोगशाळा,भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्,श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट,बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी,स्टेट बँक ऑफ मैसुर,सेंचुरी क्लब,मीसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले. त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला.ते, प्रामाणीकपणा, वेळेचे नियोजन,व एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते. तिरुमला-तिरुपतीदरम्यानच्या रस्तेबांधणीतहेए त्यांनी योगदान केले.
════════════════

भारतीय शास्त्रज्ञ भाग 13 💥श्रीनिवास रामानुजन💥



*📱आम्ही तंत्रस्नेही शिक्षक*
(महाराष्ट्र राज्य जिल्हानिहाय समूह)
=======================

🔎 *माहिती शास्त्रज्ञांची भाग 13*


    *वार -मंगळवार  दि.30/03/2020*

💡 *संकलन:*💡
*श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर*
(चंद्रपूर जिल्हा समूह प्रशासक)
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛

    *💥श्रीनिवास रामानुजन💥*

श्रीनिवास रामानुजन (जन्म : तिरोड-तंजावर, २२ डिसेंबर १८८७; मृत्यू : कुंभकोणम, २६ एप्रिल १९२०) भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.

*जन्म व संशोधन*
या महान गणितज्ञाने वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.

रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजनने त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले.इंग्लंडला गेल्यावर रामानुजन यांची तब्येत खराब झाली.रामानुजन यांना इंग्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा त्यांना भेटण्यासाठी जी.एच .हार्डी एका मोटारीतून गेले. त्या मोटारीचा क्रमांक होता १७२९ .हार्डीनी रामानुजन यांना ही गोष्ट सांगताना मोटारीचा क्रमांक बोरिंग होता असं सांगितले.तेव्हा तत्काळ रामानुजन यांनी 'नाही तो क्रमांक बोरिंग नव्हता, उलट तो एक खूपच चांगला नंबर आहे. ही दोन वेगवेगळ्या घनांच्या बेरजेने येणारी सगळ्यात लहान संख्या आहे.' {१२३+१३=१७२९ आणि १०३+९३=१७२९). तेव्हापासून १७२९या संख्येला हार्डी -रामानुजन संख्या म्हटले जात . १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.

रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी केली जाते. गणिताच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे रामानुजन फाईन आर्ट्‌समध्ये नापास झाले होते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. त्याकाळी कागदाची किंमत जास्त असल्याने रामानुजन पाटीवर गणित सोडवायचे. काही काळानंतर त्यांनी वहीवर गणित सोडवण्यास सुरुवात केली.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या तीन वह्या समोर आल्या. एका वहीमध्ये ३५१ पाने होती. त्यांत १६ धडे सहज वाचता येतील व समजतील असे होते. मात्र काही मजकूर विस्कळीत,अस्पष्ट होता. दुसऱ्या वहीमध्ये २५६ पाने होती. त्यातील २१ स्पष्ट होती, तर१०० पानांवरील मजकूर समजण्यासारखा नव्हता .तिसऱ्या वहीमध्ये ३३ पाने अव्यवस्थित होती .

*मृत्यू*

शारंगपाणीजवळच्या रस्त्यावर, कुंभकोणम येथे रामानुजनच्या घरी
१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरुणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी – एप्रिल २७, १९२० रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण गणितविश्वाचे नुकसान झाले.
════════════════