Pages
- Home
- गणितीय सूत्रे
- विज्ञान दिनविशेष
- शोधांचा मागोवा
- लोकसत्ता कुतूहल
- विकासपीडिया
- विज्ञान पुस्तके
- ऑनलाइन टेस्ट
- नवोपक्रम निकाल
- वर्तमानपत्र e पेपर
- वाचनालय e-library
- अभासक्रम फ्लिपबूक
- भारतीय वैज्ञानिक माहिती
- Dixa smart
- सायन्स प्रोजेक्ट
- डिस्कवरी
- विशेष चाचणी
- Inspire awards
- सामान्य ज्ञान (G.K Test)
- शै. व्हिडिओ
- कोविड-19 प्रश्नमंजुषा
- अवकाशवेध
- दिनविशेष प्रश्नमंजुषा
- वर्ग 1 ते 9 ऑनलाइन टेस्ट
- ISRO compitation
- राणी लक्ष्मीबाई दिनविशेष चाचणी
- योगदिन प्रश्नमंजुषा
- लोकसंख्या दिन प्रश्नमंजुषा
- आपले नाव मंगळ ग्रहावर पाठवा
- इयत्ता निहाय शैक्षणिक दिनदर्शिका
- शिक्षक दिन चाचणी
- भारतीय वैज्ञानिक
शनिवार, १६ मे, २०२०
दिनविशेष 17 मे
Today in Science 17 may
Today in Science
शुक्रवार, १५ मे, २०२०
दिनविशेष 16 मे
डेव्हिड एडवर्ड ह्युजेस एक ब्रिटिश अमेरिकन संशोधन, व्यावहारिक experimenter व प्रिटींग तार आणि मायक्रोफोनवर संशोधनासाठी ओळखले जाणारे संगीत प्राध्यापक होते.
He is generally considered to have been born in London but his family moved around that time so he may have been born in Corwen, Wales. His family moved to the U.S. while he was a child and he became a professor of music in Kentucky. In 1855 he patented a printing telegraph.
He moved back to London in 1857 and further pursued experimentation and invention, coming up with an improved carbon microphone in 1878.
In 1879 he identified what seemed to be a new phenomenon during his experiments: sparking in one device could be heard in a separate portable microphone apparatus he had set up. It was most probably radio transmissions but this was nine years before electromagnetic radiation was a proven concept and Hughes was convinced by others that his discovery was simply electromagnetic induction.
Today in Science
Today in Science
Johannes Georg Bednorz is a German physicist who shared the 1987 Nobel Prize for Physics (with Karl Alex Müller) for their joint discovery of superconductivity in a new class of materials at temperatures higher than had previously been thought attainable. They startled the world by reporting superconductivity in a layered, ceramic material at a then record-high temperature of 33 kelvin (that is 33 degrees above absolute zero, or roughly -460 degrees Fahrenheit). Their discovery set off an avalanche of research worldwide into related materials that yielded dozens of new superconductors, eventually reaching a transition temperature of 135 kelvin. Today, he develops complex oxide compounds with novel crystal structures for possible uses in microelectronics.
Today in Science
Pierre Curie
*दिनविशेष 15 मे
जन्म व बालपण
पिएर क्युरी यांचा जन्म १५ मे १८५९ या दिवशी पॅरिस येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव युजीन असे होते. त्यांचे वडील व आजोबा हे दोघही डॉक्टर होते. त्यांच्या आईचे नाव सोफी असे होते. त्यांना जॅक नावाचा एक भाऊ होता. पिएर क्युरी हे शाळेत गेलेच नाही. त्यांना युजीन आणि सोफी यांनी घरीच शिक्षण दिले. पिएर क्युरी यांना लहानपणी प्रत्येक विषयाच्या मुळाशी जायला आवडत.
शिक्षण
पिएर क्युरी हे शाळेत गेले नाहीत. त्यांना युजीन आणि सोफी यांनी घरीच शिक्षण दिले. नंतर त्यांना खासगी शिकवणी लावली. ते वयाच्या १६ व्या वर्षी बी.एस्सी. आणि १८ व्या वर्षी एम.एस्सी झाले.
विवाह
पिएर क्युरी यांचा विवाह नोबेल पुरस्कार प्राप्त मेरी क्युरी यांच्याशी २६ जुलै १८९५ साली झाला.
संशोधन व कार्य
पिएर आणि जॅक या दोघांनी मिळून पिझो इलेक्ट्रिक क्वार्ट्झ चा शोध लावला. पिझो क्वार्ट्झ इलेक्ट्रोमीटर चे उपकरण तयार केले. पिएर क्युरी यांनी क्युरी स्केल नावाची मोजमापपट्टीही तयार केली.
गुरुवार, १४ मे, २०२०
🌹 दिनविशेष🌹 15 मे
दिनविशेष 14 मे
बुधवार, १३ मे, २०२०
🌸 दिनविशेष🌸 14 मे
जन्मदिन - १४ मे १९८१
जगभरातील तंत्रप्रेमींना भुरळ घालणाऱ्या गेम ज्या ऑगमेंटेड रिअॅलिटीच्या भक्कम पायावर उभा आहे तो पाया रचणार्यात एक भारतीयाचे नाव अग्रेसर आहे,
संवेदना (सिक्स्थ सेन्स), परिधेय उपकरणांसाठीचे आवश्यक तंत्रज्ञान असे एक ना अनेक तंत्रविष्कार जे आज आपण अनुभवत आहोत, वापरत आहोत या सर्वाचा पायाही ज्याने रचला, अवघ्या वयाच्या पस्तीशीत ज्याने जगभरातील बडय़ा कंपन्यांना त्याच्यावर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय ठेवला नाही अशा या भारतीयाचे नाव *प्रणव मिस्त्री.*
सर्वप्रथम हे नाव २००९ मध्ये जगासमोर आले. मसाच्युसेट्स तंत्रविद्यापीठातील ‘एमआयटी लॅब’मध्ये सुरू असलेल्या सिक्स्थ सेन्सच्या संशोधनात या तरुणाने भरीव कामगिरी करत या प्रयोगाला मूर्त स्वरूप दिले. त्याच्या या कामगिरीसाठी प्रणवची निवड एमआयटी लॅबच्या सवरेत्कृष्ट ३५ संशोधकांमध्ये झाली. या प्रयोगाचे फलित काय असेल हे सांगत असताना प्रणवने आपल्या दोन्ही हाताचा अंगठा आणि पहिले बोट यात एक तंत्रज्ञानाधारित टोपी घातली.. त्याच्या गळ्यात पदकासारखे एक उपकरण होते आणि दोन्ही हातांच्या दोन-दोन बोटांत छोटय़ा टोप्या. या चार बोटांचा आयत करून छायाचित्र टिपले! तेव्हाच त्याने परिधेय तंत्रज्ञानाबाबत भाकीत केले होते. याच काळात प्रणवने तयार केलेल्या ‘स्पर्श’ या तंत्रज्ञानाची जगभरात चर्चा होती. ‘स्पर्श’मध्ये कॉपी-पेस्टऐवजी टच अॅण्ड पेस्टची संकल्पना असून उपकरणातील माहिती आपण दुसऱ्या उपकरणात आपल्याच हाताच्या बोटाने (अर्थात तंत्रज्ञानाचे अंगुस्तान घालून) घेऊ शकत होतो. जगभरातील बडय़ा कंपन्यांनी त्याला आपल्याकडे काम करण्याची गळ घातली. प्रणवने मायक्रोसॉफ्ट, गुगल, सीएमयू, नासा अशा विविध ठिकाणी आपल्या संशोधनाचा ठसा उमटवला व २०१२ पासून तो सॅमसंगमध्ये रुजू झाला. प्रणव सध्या सॅमसंगच्या संशोधन विभागाचा जागतिक अध्यक्ष आहे. सॅमसंग गिअर स्मार्टवॉच हे त्याने स्वतंत्रपणे विकसित केलेले उत्पादन. त्याच्या नावावर दहापेक्षा अधिक संकल्पनांचे स्वामित्व हक्कआहेत. अर्थात हे स्वामित्व हक्क त्याने केवळ व्यावसायिक संशोधनांसाठीच घेतले.
गुजरातमधील पालनपूर गावात वास्तुरचनाकार आणि टेक्नोक्रॅट असलेले कीर्ती मिस्त्री आणि नयना यांच्या घरात *१४ मे १९८१ रोजी प्रणवचा जन्मला.* शालेय शिक्षण याच गावात पूर्ण केल्यानंतर त्याने वास्तुरचनाकार पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मात्र तेथे तो नापास झाला. पण खचून न जाता त्याने गुजरात विद्यापीठात संगणक अभियांत्रिकी शाखेत पदवी मिळवली. यानंतर २००३ ते २००५ या कालावधीत आयआयटी मुंबईतील आयडीसीमध्ये त्याने अभिकल्पाचे शिक्षण घेतले. आयडीसीमधील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने अमेरिकेत एमआयटी लॅबमध्ये पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी शिक्षण पूर्ण केले. त्याचे शंभरहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत.
मंगळवार, १२ मे, २०२०
🌹दिनविशेष🌹 13 मे
दिनविशेष🌸 12 मे*
🌸दिनविशेष🌸 12 मे
सोमवार, ११ मे, २०२०
*💥🌼दिनविशेष🌼💥* 11 मे
रविवार, १० मे, २०२०
*💥दिनविशेष💥* 11 मे
११ मे, १९९८ रोजी भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दाखवली. या प्रगतीचे प्रतीक म्हणून ११ मे हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. तंत्रज्ञान हे मानवी संस्कृती घडवणा-या घटकांत शासनव्यवस्था, समाजरचना, कर्म, तत्त्वज्ञान यांच्याइतकेच महत्त्वाचे आहे, असे मानले जाते. भारताचे तंत्रसामर्थ्य आजपर्यंत वेळोवेळी दिसून आलेले आहे.
सर्वसाधारणपणे मनुष्याने लावलेल्या आयुधे, साधने, तंत्रे, क्रिया अशा विविध प्रकारच्या, मनुष्याला जगून राहण्यासाठी आणि विकासासाठी उपयोगी अशा शोधांचा (इन्व्हेन्शन्स) तंत्रज्ञानात समावेश होतो. तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशील प्रज्ञेचे द्योतक आहे.
आपल्या या सर्जनशीलतेच्या जोरावर आपल्या ज्ञानेंद्रियाच्या आणि शारीरिक क्षमतेच्या हजारोपट पुढे जाऊन मानवाने भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीचे एकामागोमाग एक टप्पे गाठले आहेत आणि एका बाजूने सूक्ष्मतम अणूतील ऊर्जा आपल्या कामी आणली आहे आणि दुस-या बाजूला अनंत अवकाशात भरारी घेतली आहे.
आज विज्ञान आणि तंत्रज्ञान हे अनेक वेळा एकत्र मानले गेले असले तरी ते दोन्ही एकत्र नाहीत. विज्ञान हे फार अलीकडचे आहे, तर तंत्रज्ञान लाखो वर्षापूर्वीचे आहे. आधुनिक माणसाच्या पूर्वजांनी जेव्हा लाकूड, दगड आणि प्राण्यांची हाडे यांच्यापासून अगदी साधी शस्त्रे बनवायला सुरुवात केली आणि अग्नीचा शोध लावला, तेव्हापासून तंत्रज्ञान अस्तित्वात आहे.
सोप्या शब्दात विज्ञान ‘का?’ या प्रश्नाचे उत्तर शोधते, तर तंत्रज्ञान ‘कसे’ याचे. इतिहासामध्ये ‘कसे’ साध्य झाल्यानंतर ‘का’ हा प्रश्न उपस्थित केला गेला याचे अनेक दाखले आहेत. उदा. वाफेचे, डिझेलचे अशी इंजिने वापरात आल्यानंतर कालांतराने त्यांच्या कार्यामागची तत्त्वे सांगणारे उष्मागतिशास्त्र विकसित झाले.
आता मात्र, विज्ञानाचा पद्धतशीर उपयोग करून नवनवीन उत्पादने, तंत्रे, प्रक्रिया विकसित करण्यासाठी प्रचंड प्रयोगशाळा उभारल्या गेल्या आहेत. आधुनिक औषधनिर्मितिशास्त्र हे याचे बोलके उदाहरण आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हा आधुनिक जगात एक मोठा, सुसंघटित मानवी व्यवहार झाला आहे.
सुदैवाने भारताला विसाव्या शतकात असे नेतृत्व लाभले की, ज्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखले. देशाच्या प्रगतीसाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या, शिक्षणाच्या, संशोधनाच्या संस्था उभारल्या पाहिजेत, उद्योग उभारले पाहिजेत, हे लक्षात घेऊन त्यांनी पावले उचलली.
२००८ साली चंद्रावर पोहोचलेले ‘चांद्रयान’, आपण उभारलेल्या अणुभट्टय़ा, १९९८ सालची अणुचाचणी, आपल्या संशोधनसंस्था, माहिती-तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील आपली लक्षणीय प्रगती, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती, अन्नधान्याच्या बाबतीत आपल्याला स्वावलंबी बनवणारी ‘हरितक्रांती’ इत्यादी सर्व अभिमानाच्या बाबी आहेत.
राष्ट्रीय तंत्रज्ञानाच्या दिवशी त्या आठवून आपल्या स्वसामर्थ्यांची जाणीव करून घ्यायला हवी. त्याचबरोबर एक लक्षात घ्यायला हवे, अनेक वेळा तंत्रज्ञान ज्यांच्याकडे ते विकत घेण्याची, वापरण्याची क्षमता आहे, त्यांना आणखी पुढे जाण्यासाठी ते उपयोगी पडते, परिणामी समाजातील विषमता वाढते. या विषमतेची दरी कमी कशी करता येईल, तंत्रज्ञान सर्वोपयोगी कसे ठरेल या दृष्टीने विचार आणि कृती करण्यासाठी तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने आपण संकल्पबद्ध व्हावयास हवे.
Today in Science 11 may
British astrophysicist who won the Nobel Prize for Physics in 1974 for his discovery of pulsars (cosmic objects that emit extremely regular pulses of radio waves). In late Nov 1967, using a radio telescope, Hewish and Ph.D. student Jocelyn Bell observed an unusual signal corresponding to a sharp burst of radio energy at a regular interval of approximately one second. It is believed that rapidly rotating neutron stars with intense electromagnetic fields emit radio waves from their north and south poles. From a great distance, these radio emissions are perceived in pulses, similar to the way one sees the light from a lighthouse's rotating lantern. Hewish and Bell's discovery served as the first evidence of this phenomenon.
सर्व महत्वाची सूत्रे
👉 सरळव्याज :-
👉 सरळव्याज (I) = P×R×N/100
👉 मुद्दल (P) = I×100/R×N
👉 व्याजदर (R) = I×100/P×N
👉 मुदत वर्षे (N) = I×100/P×R
👉 चक्रवाढव्याज रास (A)= P×(1+R/100)n, n= मुदत वर्षे.
👉 नफा तोटा :-
👉 नफा = विक्री – खरेदी
👉 विक्री = खरेदी + नफा
👉 खरेदी = विक्री + तोटा
👉 तोटा = खरेदी – विक्री
👉 विक्री = खरेदी – तोटा
👉 खरेदी = विक्री – नफा
👉 शेकडा नफा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी
👉 शेकडा तोटा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी
👆 विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100+ शेकडा नफा)/100
👉 विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100 – शेकडा तोटा) / 100
👉 खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 + शेकडा नफा)
👉 खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 – शेकडा नफा) .
👉 आयत -
👉 आयताची परिमिती = 2×(लांबी+रुंदी)
👉 आयताचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी
👉 आयताची लांबी = (परिमिती ÷ 2) – रुंदी
👉 आयताची रुंदी =(परिमिती÷2) – लांबी
👉 आयताची रुंदी दुप्पट व लांबी निमपट केल्यास क्षेत्रफळ तेवढेच राहते.
👉 आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते.
👉 चौरस -
👉 चौरसाची परिमिती= 4×बाजूची लांबी
👉 चौरसाचे क्षेत्रफळ=(बाजू)2 किंवा (कर्ण)2/2
👉 चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते.
👉 दोन चौरसांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या मापांच्या वर्गाच्या पटीत असते.
👉 समभुज चौकोण -
समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = कर्णाच्या लांबीचा गुणाकार/2
👉 समलंब चौकोण -
👉 समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ = समांतर बाजूंच्या लांबीचा बेरीज×लंबांतर/2
👉 समलंब चौकोनाचे लंबांतर = क्षेत्रफळ×2/समांतर बाजूंची बेरीज
👉 समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज = क्षेत्रफळ×2/लबांतर .
👉 त्रिकोण -
👉 त्रिकोणाचे क्षेत्रफळ = पाया×उंची/2
👉 काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ
👉 = काटकोन करणार्या बाजूंचा गुणाकार/2 .
👉 पायथागोरस सिद्धांत -
काटकोन त्रिकोणात (कर्ण)2 = (पाया)2+(उंची)2
👉 प्रमाण भागिदारी :-
👉 नफयांचे गुणोत्तर = भंडावलांचे गुणोत्तर × मुदतीचे गुणोत्तर
👉 भंडावलांचे गुणोत्तर = नफयांचे गुणोत्तर ÷ मुदतीचे गुणोत्तर
👉 मुदतीचे गुणोत्तर = नफयांचे गुणोत्तर ÷ भंडावलांचे गुणोत्तर .
👉 गाडीचा वेग – वेळ – अंतर :-
👉 A) खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5
👉 B) पूल ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी + पूलाची लांबी / ताशी वेग × 18/5
👉 C) गाडीचा ताशी वेग = कापवयाचे एकूण एकूण अंतर / लागणारा वेळ × 18/5
👉 D) गाडीची लांबी = ताशी वेग × खांब ओलांडताना लागणारा वेळ × 5/18
👉 E) गाडीची लांबी + पूलाची लांबी = ताशी वेग × पूल ओलांडताना लागणारा वेळ × 5/18
👉 F) गाडीची ताशी वेग व लागणारा वेळ काढताना 18/5 ने गुण व अंतर काढताना 5/18 ने गुणा.
👉 1 तास = 3600 सेकंद / 1 कि.मी. = 1000 मीटर = 3600/1000 = 18/5
👉 G) पाण्याचा प्रवाहाचा ताशी वेग = (नावेचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग – प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ताशी वेग) ÷ 2
👉 H) गाडीने कापावायचे एकूण अंतर – गाडीची लांबी = बोगध्याची लांबी
👉 I) भेटण्यास दुसर्या गाडीला लागणारा वेळ =
वेळेतील फरक × पहिल्या गाडीचा वेग / वेगातील फरक
लागणारा वेळ = एकूण अंतर / दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज
👉 वर्तुळ -
👉 त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात.
👉 वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात.
👉 वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो.
👉 जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.
👉 व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय.
👉 वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो.
👉 वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो.
👉 वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D
👉 अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7
👉 अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36
👉 वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)
👉 वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22
👉 वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30
👉 अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2
👉 अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/11
👉 अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36
👉 दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर.
👉 दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते.
👉 घनफळ -
👉 इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)
👉 काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची
👉 गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या)
👉 गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2
👉 घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3
👉 घनचितीची बाजू = ∛घनफळ
👉 घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते.
👉 घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2
👉 वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h
👉 वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2
👉 वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h .
👉 इतर भौमितिक सूत्रे -
👉 समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची
👉 समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार
👉 सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2
👉 वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2
👉 वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr
👉 घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2
👉 दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh
👉 अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2
👉 अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3
👉 त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )
👉 शंकूचे घनफळ = 1/3 πr3h
👉 समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2
👉 दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h)
👉 अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2
(S = 1/2 (a+b+c) = अर्ध परिमिती)
👉 वक्रपृष्ठ = πrl
👉 शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r (r+l) r= त्रिज्या,
दिनविशेष 10 मे
भारतात येऊन गेलेल्या विदेशी पर्यटकांनी आपल्या देशाचे वर्णन “तळ्यांचा देश” असे केले आहे. यावरुन आपल्या पुर्वजांनी जलसंधारणाचे महत्त्व त्या काळातच जाणले होते, याचा प्रत्यय येतो. पण, एकेकाळी “सुजलाम् सुफलाम्” असणाऱ्या आपल्या देशाला पाणीटंचाईचे ग्रहण लागले आहे. दुष्काळाच्या खुणा पावलोपावली दिसत आहे. या सगळ्यावर मात करण्यासाठी जालीम उपायांपैकी एक असलेला उपाय म्हणजे *“जलसंधारण”*
जलसंधारण व्यवस्थापनाचे तीन प्रमुख भाग आहेत.
पहिला भाग म्हणजे पाण्याची भूपृष्ठावर साठवण करणे, यासाठी लहान मोठी धरणे बांधली जातात. दुसरा भाग अर्थात पाण्याची भूगर्भात साठवण करणे, यासाठी पाणलोट क्षेत्र विकास आणि जलसंधारणाची कामे केली जातात. तिसरा भाग म्हणजे पावसाच्या पाण्याने शेत जमिनीवरील कसदार सुपीक मातीचा थर वाहून जाऊ नये म्हणून मृद संधारणाची कामे केली जातात. पावसाद्वारे पडणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरवून भूजल साठे निर्माण करून भूजल पातळी योग्य प्रमाणात राखणे हे जल संधारणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे चांगले भूजल साठे राज्याच्या सर्वदूर क्षेत्रात निर्माण झाले तर विहिरीद्वारे त्या पाण्याचा उपयोग सिंचन व इतर कामासाठी केला जाऊ शकतो. ही कामे सिंचन प्रकल्पांच्या लाभ क्षेत्राबाहेरील जमिनीसाठी अत्यावश्यक आहेत. जे राज्याच्या एकूण लागवड योग्य क्षेत्राच्या अंदाजे सत्तर टक्के आहे. यावरून पाणलोट क्षेत्र विकास आणि जल संधारणाच्या कामाचे महत्व लक्षात येईल. आज महाराष्ट्र शासनाचा भर या जलसंधाणाच्या कामांना गती देण्याचा आहे. म्हणजे अजून यावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होणार आणि मूल्यमापन यंत्रणा नसल्यामुळे त्यातून काय लाभ होणार हे कळण्याची सोय नाही. पुढील काळात पाणलोट क्षेत्र विकासाच्या व भूजलच्या कामांसाठी केळकर समितीने ३०६५९ कोटीची तरतुद सुचविली आहे. असे म्हटले जाते की, राज्यात १२६ लाख हेक्टर्स क्षेत्रावर कामे झाली आहेत. त्यापासून ३१ लाख हेक्टर सिंचन समता निर्माण होणे अपेक्षित होते, परंतु ती झाली नाही. ही कामे योग्य पद्धतीने झाली नाहीत, असे समितीने नमुद केले आहे. जलसंधारणाची कामे पाणलोट क्षेत्र निहाय नियोजन पूर्वक तंत्रशुद्ध पद्धतीने होऊन त्या कामांची योग्य ती देखभाल आणि सातत्याने मूल्यमापन होत राहणे आवश्यक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्र विकास आणि जलसंधारणासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम अशी स्वतंत्र यंत्रणा राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असणे आवश्यक वाटते.
महाराष्ट्रात मा.नाना पाटेकर व मा.मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. तसेच अभिनेता आमीर खान याने स्थापन केलेल्या पाणी फाऊंडेशन अंतर्गत राज्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजीत केली जाते. या दोन्हीला भरघोस प्रतीसाद मिळतो.
आपण घरच्या घरी सुध्दा जलसंधारण करु शकतो. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातुन.
रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचे पाणी जमा करणे. ही संकल्पना भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. बुंदेला चौक, कुंडी, तालाब, कुल, बावडी, कुंड, तलाई अशी अनेक नावे आहेत. जमिनीवर आणि इमारतींच्या छपरांवर पडणारे पावसाचे पाणी अशा दोन ठिकाणांहून शहरात पाणी मिळू शकते.
कसे करावे रेनवॉटर हार्वेस्टिंग
शहरी भागात पावसाचे पाणी दोन ठिकाणांहून मिळू शकते.
जमिनीवर पडलेले पाणी जमिनीवर पडलेला पाऊस आपल्याला शंभर टक्के गोळा करता येत नाही. त्यातील थोडाफार जमिनीत मुरतो. काहीचे बाष्पीभवन होते, तर काही वाहून जाते. त्यामुळे आपल्याला अंदाजे ५० टक्के पाऊस जमा करता येतो. आपण अंदाजे ०.८५ इतका जास्तीत जास्त पाऊस गोळा करू शकतो.
इमारतींच्या छपरावर पडणारे पाणी जर आपल्याकडे ५०० चौरस मीटरचा प्लॉट आहे. त्यावर १०० चौरस मीटरचे बांधकाम आहे. त्यावर पडणारे पाणी किती असेल व ते आपल्याला किती मिळेल, याचा विचार करावा. छतावर पडणारे पाणी तुलनेने खूपच स्वच्छ, शुद्ध असते. पहिल्या पावसाचे पाणी सोडून देऊन पुढील पाऊस अडवून आपण ते एखाद्या हौदात साठवू शकतो. एवढे पाणी साठविणे हे खर्चाचे असल्याने आपल्याला लागेल तेवढेच पाणी साठवून उरलेले पाणी बोअरवेलच्या पुनर्भरणासाठी वापरता येईल. पाणी साठविण्यासाठी कॉंक्रीट, वीट, सिंटेक्सर किंवा फेराक्रिट या कोणत्याही प्रकारात हौद बांधता येतो. हे पाणी कुंड्यांना, बागेला, गाड्या धुण्यासाठी व इतर सफाईसाठी वापरता येते. जिथे पाण्याची खूप कमतरता आहे, तिथे त्याची गुणवत्ता बघून ते शुद्ध करून पिण्यासाठीही वापरता येते. पाणी शुद्ध राहण्यासाठी हौदाला झाकण हवे व तेथे सूर्यप्रकाश आत जाणार नाही, याची काळजी घ्यावी. बोअरवेल किंवा विहीर नसल्यास आपल्या परिसरातील एखाद्या बोअरवेलमध्ये सामूहिक पद्धतीने पुनर्भरण करता येईल अथवा झिरप खड्डा तयार करून, जमिनीत चर खणून, झाडे लावूनही पाणी मुरविता येते.
कूपनलिका
पुनर्भरण कसे करावे?
पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडणे म्हणजेच कूपनलिका पुनर्भरण होय. कूपनलिकेजवळ नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे. (ओढ्याचे पाणी क्षार व रसायनविरहित हवे) कूपनलिकेच्या सभोवताली दोन मीटर रुंद व दोन मीटर खोल आकाराचा खड्डा खोदावा. खड्ड्यातील उंचीएवढ्या केसिंग पाइपच्या भागात एक-दोन सें. मी. अंतरावर सर्व बाजूंनी विशिष्ट व्यासाची छिद्रे पाडावीत.
या छिद्रांवर नारळदोरी (काथ्या) घट्ट गुंडाळावी. खड्ड्याचे चार भागांत विभाजन करून सर्वांत खालच्या भागात दगडगोटे, त्यावरील भागात खडी, त्यानंतरच्या भागात वाळूची चाळ व सर्वांत वरच्या भागात बारीक वाळू भरावी. अशा प्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाईल आणि कूपनलिकेचे पुनर्भरण होईल.
विहीर पुनर्भरण कसे करावे
पाणलोट विहिरी, विंधन विहिरी, भूजल स्रोतांचे पुनर्भरण करण्याच्या दृष्टीने विहिरीजवळ गाळप उपचार करावेत. प्रारंभीच्या गाळप उपचाराचा विसर्ग, जाड वाळूच्या दुसऱ्या गाळप उपचाराद्वारा विहिरीत सोडण्यात यावा. गाळप उपचारांचे नियोजन विहिरीलगतच्या भूपृष्ठाच्या पातळीपेक्षा खालच्या स्तरात करण्यात यावे. विहिरी क्षेत्राच्या उंच भागात असल्यास क्षेत्राच्या नैसर्गिक खोल भागात गाळप उपचार घेण्यात येऊन सिमेंट वा प्लॅस्टिक पाइप (सहा इंच व्यास) अथवा बंद चराद्वारा विहिरीत योग्य खोलीवर जोडण्यात यावेत.
आज “जलसंधारण दिना निमीत्त आपणही संकल्प करुया पावसाचा थेंब न थेंब वाचवायचा….
======================
Today in Science 10 may
British-born American astronomer who discovered that stars are made mainly of hydrogen and helium and established that stars could be classified according to their temperatures.









