*12 मे*
*जागतिक परिचारिका दिन*
मे १२ हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळला जातो. इसवी सन १८५४साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करणारी आद्य परिचारिका(नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते.
----------------------------------
*फ्लॉरेन्स नाइटिंगेल*
फ्लॉरेन्स नाइटिंगेल (मे १२,१८२० - ऑगस्ट १३,१९१०) या अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या. इ.स. १८५३ साली झालेल्या क्राइमियन युद्धदरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना "लेडी विथ द लॅम्प" (The Lady with the Lamp) असे म्हणत. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या. रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांनी त्यांना 'लेडी विथ द लॅम्प' ही उपाधी दिली. त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रूग्णसेवा केल्यामुळेच परिचर्याशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये "जागतिक परिचर्यादिन" म्हणून साजरा केला जातो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा