शुक्रवार, १५ मे, २०२०

*दिनविशेष 15 मे

*दिनविशेष*

*पिएरे क्युरी*

*भौतिकशास्त्रातले नोबेल पारितोषिक*

*जन्मदिन - १५ मे १८५९*

जन्म व बालपण
पिएर क्युरी यांचा जन्म १५ मे १८५९ या दिवशी पॅरिस येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव युजीन असे होते. त्यांचे वडील व आजोबा हे दोघही डॉक्टर होते. त्यांच्या आईचे नाव सोफी असे होते. त्यांना जॅक नावाचा एक भाऊ होता. पिएर क्युरी हे शाळेत गेलेच नाही. त्यांना युजीन आणि सोफी यांनी घरीच शिक्षण दिले. पिएर क्युरी यांना लहानपणी प्रत्येक विषयाच्या मुळाशी जायला आवडत.

शिक्षण
पिएर क्युरी हे शाळेत गेले नाहीत. त्यांना युजीन आणि सोफी यांनी घरीच शिक्षण दिले. नंतर त्यांना खासगी शिकवणी लावली. ते वयाच्या १६ व्या वर्षी बी.एस्सी. आणि १८ व्या वर्षी एम.एस्सी झाले.

विवाह
पिएर क्युरी यांचा विवाह नोबेल पुरस्कार प्राप्त मेरी क्युरी यांच्याशी २६ जुलै १८९५ साली झाला.

संशोधन व कार्य
पिएर आणि जॅक या दोघांनी मिळून पिझो इलेक्ट्रिक क्वार्ट्झ चा शोध लावला. पिझो क्वार्ट्झ इलेक्ट्रोमीटर चे उपकरण तयार केले. पिएर क्युरी यांनी क्युरी स्केल नावाची मोजमापपट्टीही तयार केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा