बुधवार, १० जून, २०२०

9 जून दिनविशेष

💥🌹आजचा दिनविशेष🌹💥
         *जार्ज स्टीफेन्सन*

       *रेल्वे इंजिनचे जनक*

      *जन्मदिन - ९ जुन १७८१*

       जॉर्ज स्टीफेन्सन यांचा जन्म 9 जून, 1781 रोजी ब्रिटनमध्ये विलेम शहरात झाला होता.
जॉर्ज स्टीफनसन  मेकॅनिकल अभियंता होता जो स्टीम लोकोमोटिव्हज शोधण्यासाठी ओळखला जात होता.त्याच्या शोधामुळे औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या वस्तू आणि प्रवाशांची वाहतूक संपूर्ण ठिकाणी झाली. त्याच्या शोधामुळे युरोपमध्ये एक चांगला बदल घडून आला.
जॉर्ज स्टीफनसन या ब्रिटिश इंजिनियरचा जन्म सन १७८१ मध्ये एका निरक्षर कुटुंबात झाला. त्याला लहानपणी शाळेत जायची संधी मिळाली नाही. 
वयाच्या अठराव्या वर्षी तो कोळशाच्या खाणीत मजूर म्हणून नोकरीला लागला. त्यानंतर त्याने रात्रीच्या शाळेत जाऊन शिक्षण घेतले, तसेच स्वतःच्या हुषारीने खाणींमधील सर्व यंत्रे कशी चालतात हे उत्तमरीत्या समजून घेऊन तो त्यांची दुरुस्ती करण्यात प्रवीण झाला आणि मालकांच्या मर्जीतला झाला. त्याला नवीन कामे करण्याची संधी मिळाली. त्या काळात नव्याने निघालेल्या वाफेच्या इंजिनांवरून प्रेरणा घेऊन त्याने सन १८१४ मध्ये प्रथम एका कोळशाच्या खाणीसाठी एक इंजिन तयार केले. त्यानंतर त्याने अनेक सुधारणा करून एकाहून एक वरचढ अशी नवनवी इंजिने तयार केली.  सन १८२५ मध्ये त्याने तयार केलेल्या लोकोमोशन नावाच्या इंजिनावर चालणारी जगातली पहिली सार्वजनिक रेल्वे सेवा सुरू झाली.  त्यानंतर त्याने सन १८३० मध्ये रॉकेट नावाचे इंजिन तयार केले, स्वतःची कंपनी सुरू केली आणि रेल्वे इंजिने पुरवायला तसेच रेल्वे लाइनी बांधायला सुरुवात केली. लवकरच इंग्लंडशिवाय युरोप आणि अमेरिकेतसुद्धा स्टीफनसनची इंजिने धावायला लागली.

यावरून असे दिसते की एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातले अनेक इंजिनियर वाफेवर चालणारे फिरते इंजिन तयार करण्याचा प्रयत्न करीत होते. रुळावरून चालणाऱ्या पण घोडे जुंपलेल्या गाड्या त्याच्याही आधीच सुरू झाल्या होत्या, पण त्या मुख्य करून खाणींमध्ये किंवा कारखान्यांमधले जड सामान वहाणाऱ्या मालगाड्या होत्या. घोड्यांच्या जागी वाफेवर चालणारे स्वयंचलित इंजिन लावले तर ते जास्त शक्तीशाली असेल, अधिक काम करेल आणि फायद्याचे ठरेल या विचाराने हे सगळे प्रयत्न चालले होते आणि त्यांना थोडे थोडे यश येतही होते.  जॉर्ज स्टीफनसन याने या इंजिनांमध्ये चांगले क्रांतिकारक बदल घडवून आणले. ती इंजिने आकाराने सुटसुटीत झाली, ती सुरळीत, सुरक्षित आणि खात्रीपूर्वक काम करायला लागली. त्यामुळे प्रवाशांना घेऊन जाणारी सार्वजनिक रेल्वे वाहतूक सुरू करणे शक्य झाले. पहिल्या अशा सेवेचे यश पाहून इंग्लंडमध्ये देशभर रेल्वे कंपन्या निघाल्या आणि पुढे लवकरच रेल्वेचे जाळे जगभर पसरले.  यामुळे जॉर्ज स्टीफनसन इतक्या मोठ्या प्रकाशझोतात आला की त्यानेच रेल्वे इंजिनाचा शोध लावला असे म्हणून त्याचेच नाव घेतले जाऊ लागले आणि आजही त्यालाच रेल्वेचा जनक मानले जाते.
*====================*
George Stephenson (9 June 1781 – 12 August 1848) was an English civil engineerand mechanical engineer. Renowned as the "Father of Railways",[1] Stephenson was considered by the Victorians a great example of diligent application and thirst for improvement. Self-help advocate Samuel Smiles particularly praised his achievements. His chosen rail gauge, sometimes called 'Stephenson gauge',[i] was the basis for the 4 feet 8 1⁄2 inches (1,435 mm) standard gaugeused by most of the world's railways.

Pioneered by Stephenson, rail transport was one of the most important technological inventions of the 19th century and a key component of the Industrial Revolution. Built by George and his son Robert's company Robert Stephenson and Company, the Locomotion No. 1 is the first steam locomotive to carry passengers on a public rail line, the Stockton and Darlington Railwayin 1825. George also built the first public inter-city railway line in the world to use locomotives, the Liverpool and Manchester Railway, which opened in 1830.
========================
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र
*दिनविशेष चाचणी सोडविण्यासाठी वरील लिंक क्लीक करा*
======================
📡📲 *तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
*महाराष्ट्र करू स्मार्ट* 📡📲

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा