सोमवार, १ जून, २०२०

दिनविशेष 29 मे

*२९ मे १९९९*

*'डिस्कव्हरी' हे अंतराळयान (space shuttle) प्रथमच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला (ISS) जोडले गेले*

ज्या यानातून कल्पना चावलाने अंतराळ प्रवास केला ते कोलंबिया यान किंवा ज्या यानातून सुनीता पंड्याने अवकाशात झेप घेतली ते डिस्कव्हरी यान ही अमेरिकेने बांधलेल्या स्पेस शटल यानांची उदाहरणे. उपग्रह किंवा अवकाशयान पाठविण्याच्या प्रत्येक मोहिमेत एक अग्निबाण खर्ची पडतो, जळून जातो. देशाचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान कमी व्हावे या हेतूने परत परत वापरता येणारा अग्निबाण असावा, या कल्पनेतून स्पेस शटल यानांची निर्मिती झाली.

'डिस्कव्हरी' हे अंतराळयान (space shuttle) पृथ्वीवर परत आणता येते. या यानाच्या मदतीने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची (ISS) बरीचशी बांधणी अंतराळातच केली गेली आहे.

पांढर्‍या रंगाचे विमानासारखे दिसणारे यान हे मुख्यतः अ‍ॅल्युमिनियम पासुन बनलेले होते आणि सुर्यापासुन व वातावरणातील वायुकणांशी घर्षन झाल्यानंतर तयार झालेल्या प्रचंड उष्णतेपासुन सरंक्षण होण्यासाठी त्याभोवती एक विशिष्ठ आवरण असे. यामध्ये अंतराळवीर, अवकाशस्थानकासाठी लागणार्‍या वस्तू तसेच उपग्रह ठेवलेले असे. इंधनटाकी वेगळी झाल्यानंतर त्या कक्षेतून अंतरीक्षयान मग अंतराळस्थानकाच्या कक्षेत पोहचत असे. त्यानंतर अंतराळस्थानक व यान एकाच कक्षेत प्रवास करत असतानाच अंतराळवीर स्पेस शटलवरील यंत्रनेचा वापर करून यान अवकाशस्थानकाला जोडले जात असे, यालाच डॉकिंग असे म्हणत. त्यानंतर अंतराळवीर अवकास्थानकात पोहचत असे. एखादा उपग्रह कक्षेत पाठवण्याताना स्पेस शटल याच पद्धतीने ठरावीक कक्षेत पोहचत असे. त्यानंतर अंतराळवीर त्याचा विशिष्ठ पोशाख घालून सोबत नेलेला उपग्रह त्या कक्षेत सोडुन परत पृथ्वीवर येत असे. याचप्रकारे हबल दुर्बिन अवकाशात पाठविण्यात आली होती व वेळोवेळी त्या कक्षेत पोहचून दुर्बिनीला पकडुन दुरूस्ती करण्यात आली होती. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा