*💥🌸दिनविशेष🌸💥*
*मारियो जे. मोलिना*
*मेक्सिकन रसायनशास्त्रज्ञ*
*जन्म: १९ मार्च १९४३*
मारियो जे. मोलिना (स्पॅनिश: Mario José Molina-Pasquel Henríquez; जन्म: १९ मार्च १९४३) हा एक मेक्सिकन रसायनशास्त्रज्ञ आहे. पृथ्वीच्या वातावरणामधील अंटार्क्टिकावर पडलेले मोठे छिद्र शोधुन काढण्यासाठी त्याला पॉल जे. क्रुट्झन व फ्रँक शेरवूड रोलंड ह्या शास्त्रज्ञांच्या समवेत १९९५ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. नोबेल पारितोषिक मिळवणारा तो पहिला मेक्सिकन व्यक्ती आहे.
१९७० सालच्या आसपास ओझोनचा थर अंटार्क्टिकांवरती काही भागांत नष्ट झाला असून तेथे अतिनील किरणांचे प्राबल्य वाढले असल्याचे लक्षात आले. याचा शोध घेताना मानवनिर्मित क्लोरोफ्लुरोकार्बन (सीएफसी) च्या द्रव्याचा हा परिणाम असल्याचे लक्षात आले. हा एक तर्क आहे. हे सीएससीचे निरुपद्रवी कण जेव्हा हळूहळू ओझोनच्या थरातील ओझोनबरोबर संयोग पावतात, तेव्हा मोठ्या प्रमाणातील विघटनाला सुरुवात होते. यामुळे अतिनील किरणांचा पृथ्वीवर मारा वाढल्यास कातडीचे कर्करोग वाढतील व उष्णता वाढून बर्फ वितळून पाण्याची जागतिक पातळी वाढेल, अशी भीती व्यक्त केली गेली.
या सर्वांचा परिणाम म्हणून ओझोन वायू या दशकात चर्चेचा केंद्रबिंदुच बनला आहे. सीएफसीचा वापर सर्व एरोसोलमध्ये व शीतीकरणासाठी केला जातो. याचे उत्पादन बंद करून त्याचे पर्याय सर्वांनी वापरावेत, या स्वरूपाचा सर्व देशांनी एक करार मॉन्ट्रियल येथे केला आहे. टप्प्याटप्प्याने उत्पादन कमी करणे व पर्यायी वापर सुरू करणे हे त्यात अपेक्षित आहे.
काही शास्त्रज्ञांच्या मते ओझोनचा थराची थर नष्ट होणे यामध्ये मानव व प्राणिजातीला अणुयुद्धाएवढाच धोका उद्भवतो. काहींचे मत याला प्रतिकूल आहे. पण एक गोष्ट निर्विवाद आहे, ती म्हणजे ओझोनचा थर आहे तसाच टिकणे, हे आपल्यालाच काय, पण पृथ्वीवरच्या सर्वच सजीव सृष्टीला आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा