सोमवार, ६ एप्रिल, २०२०

💥🌼दिनविशेष🌼💥* ३ एप्रिल



*💥🌼दिनविशेष🌼💥*
*३ एप्रिल १९८४*

*भारताचा पहिला अवकाश यात्री राकेश वर्मा याची अंतराळ प्रवासास सुरुवात*

राकेश शर्मा हे नाव ऐकल्यावर आपल्याला भारताचा तो पहिला व्यक्ती आठवतो ज्याने अंतराळात पाऊल ठेवले होते. त्यांच्या याच कामगिरीमुळे अंतराळात झेप घेणारा भारत हा जगातील १४ वा देश ठरला आणि भारताने जागतिक पटलावर आपली छाप सोडली.
१३ जानेवारी १९४९ रोजी जन्मलेले राकेश शर्मा मुळचे पंजाबचे! पण त्यांनी आपलं शिक्षण हैद्राबाद येथून पूर्ण केलं.

राष्ट्रीय सुरक्षा अॅकॅडमी मधून पास झाल्यानंतर भारतीय वायू दलामध्ये टेस्ट पायलट पदावर ते रुजू झाले.

एक टेस्ट पायलट असल्याकारणाने पाकिस्तान विरोधातील युद्धामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

२० सप्टेंबर १९८२ रोजी इस्रो आणि सोव्हिएत इंटरकॉसमॉसस्पेस प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या अवकाश मोहिमेमध्ये अवकाशयात्री म्हणून राकेश शर्मा यांची निवड करण्यात आली.

३ एप्रिल १९८४ रोजी राकेश शर्मा यांनी Soyuz T-11 मोहिमे अंतर्गत अवकाशयानामधून Salyut 7 स्पेस स्टेशनच्या दिशेने अंतराळात झेप घेतली आणि ते भारताचे पहिले अंतराळवीर ठरले.

ते जवळपास २१ तास आणि ४० मिनिटे अंतराळात वावरले.

या मोहिमेत त्यांची भूमिका होती शास्त्रीय आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करणे ज्यात बायो मेडिसिन आणि रिमोट सेन्सिंग या दोन विषयावर त्यांनी संशोधन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा