सोमवार, ६ एप्रिल, २०२०

💥🌼दिनविशेष🌼 *३० मार्च



*💥🌼दिनविशेष🌼
            *३० मार्च १८४२*

*अमेरिकन सर्जन डॉ. क्रॉफर्ड लॉंग यांनी भूल देणारे औषध म्हणजेच 'एनेस्थेसिया' चा वापर सर्वप्रथम एका रुग्णाच्या ब्रेनटयूमर शस्त्रक्रियेसाठी केला.*

मज्जातंतूंद्वारे वेदना मेंदूपर्यंत पोचवणे जेव्हा थांबवले जाते, तेव्हा त्या प्रक्रियेला बधिरीकरण म्हणतात. एखादे ऑपरेशन करायचे असेल की, रुग्णाला डॉक्टर भूल देतात. त्यामुळे त्याला वेदना समजेनासा होतात. मग ऑपरेशन सहज शक्य होते. या भूल देण्याच्या विविध पद्धतींना भूलशास्त्र (Anesthesiology) असे म्हटले जाते.

 आपल्याला नेहमीच्या बघण्यातून, ऐकण्यातून दोनच प्रकार माहित असतात. ज्या जागी कापायचे ती जागा इंजेक्शन देऊन बधिर करणे हा पहिला, तर दुसऱ्यामध्ये रुग्णाला पूर्ण गुंगी आणून बेशुद्ध केले जाते. या पुर्ण गुंगी आणण्याच्या प्रकाराला १८४० मध्ये सुरुवात झाली. त्याआधी शस्त्रक्रिया म्हणजे रुग्णांचे व डॉक्टरांचे दोघांचेही हालच असत. दारू पाजून वा अफूचा डोस देऊन रुग्णाला बांधून घालून शस्त्रक्रिया उरकल्या जात. वेदना असह्य झाल्याने त्याचा चाललेला आरडाओरडा ऐकत डॉक्टरांना शस्त्रक्रिया पार पाडाव्या लागत.

 पण जेव्हा क्लोरोफॉर्मचा प्रथम शोध लागला, तेव्हा हा प्रकार कमी झाला. त्यानंतर इथर आला. हल्ली नायट्रस ऑक्साईड हा वायूही वापरला जातो. याहीपुढे जाऊन आता सोडियम पेंटाथाॅल हा द्रवपदार्थ शिरेतून टोचून भूल देण्याची पद्धत वापरली जाते. शिवाय ट्रायलिनचाही वापर केला जातो.

 पूर्वीच्या या हल्लीच्या पद्धतीमध्ये भूल दिल्यावर रुग्णाच्या वेदनांच्या संवेदना मेंदूकडे पाठवणे थांबते. याच जोडीला मेंदूला ग्लानी येते. त्यामुळे पाहिजे तितका वेळ घेऊन व्यवस्थित शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आहे. संपूर्ण भूल देण्याखेरीज पाठीच्या मणक्यांमध्ये विविध पातळ्यांवर औषध टोचून त्याखालील भाग बधीर करता येतो. रुग्ण शुद्धीवर राहून त्याला टोचलेल्या भागाखालील भागांना वेदना समजत नाहीत. यालाच 'स्पायनल अॅनेस्थेशिया' म्हणतात. या प्रकारात वेदनांचे संवहन थांबवले जाते.

 एखाद्याच्या पायावर हातावर शस्त्रकर्म करायचे असेल तर त्या दिशेला जाणारी प्रमुख नस (Nerve) उगमाच्या जागी बधीर करायचे औषध टोचून पूर्ण हात वा पाय बधिर करण्याचीही पद्धत आहे. याला वा या अनुषंगाने वापरल्या जाणाऱ्या भुलेला 'ब्लॉक अनास्थेशिया' असे नाव दिले जाते. दात काढण्यासाठी दातांचे डॉक्टर अशा प्रकारे दातांच्या मुळांशी असलेल्या नसा बधिर करतात. डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी आणखीनच वेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो. ज्या डोळ्याचे ऑपरेशन करायचे, त्यापूरतीच जागा इंजेक्शन देऊन बधिर केली जाते. गमतीने म्हणावयाचे तर अगदी उघड्या डोळ्याने रुग्ण ऑपरेशन सहन करतो. भूलशास्त्र जस जसे प्रगत होत गेले तसतशी शस्त्रक्रियेच्या शास्त्रातही प्रगती होत गेली. आजकाल हृदय वा मेंदूवरही शस्त्रक्रिया शक्य होत आहे, ती केवळ त्यामुळेच.

*💥🌼दिनविशेष🌼💥*
*३० मार्च १८४२*

*अमेरिकन सर्जन डॉ. क्रॉफर्ड लॉंग यांनी भूल देणारे औषध म्हणजेच 'एनेस्थेसिया' चा वापर सर्वप्रथम एका रुग्णाच्या ब्रेनटयूमर शस्त्रक्रियेसाठी केला.*

संज्ञाहरण (एनेस्थेशिया) या संज्ञाहीनता (वर्तनी में अंतर देखें; ग्रीक के αν- से व्युत्पन्न, an-, "बिना"; और αἴσθησις, aisthēsis, "संवेदन"), का पारंपरिक अर्थ है संवेदनशीलता (दर्द महसूस करने सहित) महसूस करने की स्थिति का अवरोधन अथवा अस्थायी रूप से हरण. यह औषधीय प्रेरित होती है और शब्दस्मृतिलोप, पीड़ाशून्यता, सजगता की हानि, कंकालीय मांसपेशी प्रतिक्रिया या कम तनाव प्रतिक्रिया या सभी के साथ अनुवर्ती हैं। यह रोगियों को तनाव तथा दर्द महसूस किये बिना शल्यक्रिया से गुजरने की अनुमति देती है। एक वैकल्पिक परिभाषा है "प्रतिवर्ती जागरूकता की कमी" जिसमें जागरूकता का पूर्ण रूप से अभाव होता है (उदाहरण स्वरूप एक सामान्य चेतनाशून्य करने वाली औषधी), या शरीर के किसी एक भाग में चेतना का अभाव है जैसे रीढ़ में चेतनालोप. एनेस्थेसिया शब्द का गठन, वर्ष 1846 में ऑलिवर वेंडेल होम्स, सीनियर ने किया था।
संज्ञाहरण के प्रकारों में स्थानीय संज्ञाहरण, क्षेत्रीय संज्ञाहरण, सामान्य संज्ञाहरण और अलग करनेवाली संज्ञाहरण शामिल हैं। स्थानीय संज्ञाहरण शरीर के एक विशिष्ट स्थान के भीतर संवेदना बोध को रोकता है जैसे दांत या मूत्राशय. शरीर के एक भाग और रीढ़ की हड्डी के बीच तंत्रिका आवेगों के संचारण को अवरूद्ध करने के द्वारा क्षेत्रीय संज्ञाहरण शरीर के एक बड़े क्षेत्र को घेरे में लेता है। क्षेत्रीय संज्ञाहरण के दो अक्सर प्रयुक्त होने वाले प्रकार हैं रीढ़ संज्ञाहरण और एपीड्यूरल संज्ञाहरण. सामान्य संज्ञाहरण मस्तिष्क के स्तर पर संवेदन, मोटर और तंत्रिका संचरण को रोकते हैं जिसके परिणामस्वरूप बेहोशी और संवेदन का अभाव होता है। अलग करनेवाला संज्ञाहरण एजेंट का प्रयोग करता है जो कि दिमाग के उच्च केन्द्र (जैसे मस्तिष्क प्रांतस्था के रूप में) और निम्न केन्द्र जैसे लिम्बिक प्रणाली के भीतर पाया जाता है, के बीच तंत्रिका आवेगों के संचरण को रोकता है।


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा