सोमवार, ६ एप्रिल, २०२०

💥🌸दिनविशेष🌸💥* ४ एप्रिल



*💥🌸दिनविशेष🌸💥*
*४ एप्रिल १९६९*

*कृत्रिम हृदय बसवण्याचा पहिला प्रयोग डॉ. डेंटन कूली यांनी केला*

अमेरिकेस परत आल्‍यानंतर कूली यांनी डॉ. मायकेल डिबाकी यांच्‍यासमवेत काम करण्‍यास सुरुवात केली. डॉ. डिबाकी तेव्‍हा बेयलर विद्यापीठात शल्‍यचिकित्‍सेचे प्रमुख होते. १९५१ पासून १९६९ मध्‍ये बेबनाव होऊन राजीनामा देईपर्यंत डिबाकी व कूली यांनी एकत्र काम केले. कृत्रिम हृदय विकसित करण्‍यासाठी ते दोघे प्रयत्‍नशील होते. त्यासाठी ते प्राण्‍यांवर प्रयोग करत होते. ते प्रयोग यशस्‍वी झाले परंतु अद्यापि मानवी रुग्‍णावर त्‍याची चाचणी झाली नव्‍हती. त्‍यामुळे मानवी रुग्‍णावर कृत्रिम हृदय प्रत्‍यारोपित करावयास अजून काही अवधी पाहिजे असे डॉ. डिबाकी यांचे मत होते. यादरम्‍यान कार्प या नावाचा रुग्‍ण इस्पितळात दाखल झाला. त्‍याचे हृदय अत्‍यंत कमकुवत झाले होते व त्‍यामुळे रक्‍तपुरवठा सुरळीत ठेवण्‍याचे काम करण्‍यास असमर्थ होते. इतक्‍या कमकुवत हृदयावर उपचारास मर्यादा होत्‍या. एक वेळ अशी आली की त्‍यापुढे उपचार होणे शक्‍य नव्‍हते. त्‍यावेळी कूली यांनी त्यावर कृत्रिम हृदय प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. डिबाकी यांचे एक सहकारी अर्जेंटिना येथील डॉ. डोमिंगो लिओट्टा, डिबाकी व कूली यांच्‍या समवेत कृत्रिम हृदयावर काम करीत होते. कूली यांनी लिओट्टा यांच्‍या मदतीने प्रयोगशाळेतून कृत्रिम हृदय आणविले. सोळा सहकार्‍यांच्‍या पथकासह शस्‍त्रक्रिया करून कार्प यांचे हृदय काढून त्‍या जागी हे कृत्रिम हृदय बसविले. या संपूर्ण प्रक्रियेला तीन तास इतका वेळ लागला. प्‍लॅस्टिक व डॅक्रॉन यांचा उपयोग करून हे हृदय बनविण्‍यात आले होते व ते एक नियंत्रणप्रणालीला जोडले होते. शस्‍त्रक्रियेनंतर ६४ तासपर्यंत या यंत्राने काम केले. हा देखील विक्रमच होता. याआधी प्राण्‍यांवर प्रयोग करीत असतांना हे यंत्र यापेक्षा कमी वेळ चालले होते. या अवधीत कार्प यांच्‍यासाठी सुयोग्‍य दात्‍याचा शोध युद्धपातळीवर सुरू झाला. तसा दाता मिळाल्‍यावर कार्प यांच्‍यावर परत एकदा शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली व मानवी हृदय प्रत्‍यारोपित करण्‍यात आले. शस्त्रक्रिया केल्यानंतर ३२ तासांनी कार्प यांचे न्‍यूमोनियामुळे निधन झाले. ४ एप्रिल १९६९ ला सुरू झालेल्‍या या वादळी प्रक्रियेचा तो अंत होता. या क्रांतिकारी घटनेनंतर कूली यांना बराच रोष सहन करावा लागला. कृत्रिम हृदय बसविण्‍यापूर्वी त्‍यांनी डिबाकी यांची परवानगी घेतली नव्‍हती. कृत्रिम हृदयावर संशोधन करण्‍याच्‍या प्रकल्‍पास अमेरिकन केंद्र शासनाचे अनुदान मिळत होते. कूली यांच्‍या या शस्‍त्रक्रियेमुळे या प्रकल्‍पाचे अनुदान थांबविण्‍यात येईल अशी भीती डिबाकी यांना वाटली. इतकेच नव्‍हे तर घाईघाईने, प्रसिद्धीसाठी कूली यांनी बालिशपणे वागून सदर शस्‍त्रक्रिया केली असे डिबाकी यांचे मत झाले. कूली यांना अर्थातच या गोष्‍टी अमान्‍य होत्‍या. त्‍यांचे म्‍हणणे असे पडले की प्रयोगादरम्‍यान एखाद्या उपकरणामुळे जर रुग्‍णाचे प्राण वाचण्‍यास मदत होत असेल तर त्‍यात काहीच वावगे नाही व त्‍यामुळे अनुदानासाठीच्‍या अटींचा भंग होत नाही. पुढे जाऊन कूली असेही म्‍हणाले की रशियनांनी अंतराळात पहिली झेप घेतली व अमेरिकेस मागे टाकले. या क्षेत्रातही ते आघाडी घेऊ शकले असते पण मी त्‍यांना मागे टाकले.

या घटनेनंतर डिबाकी व कूली यांच्‍यात जे वितुष्‍ट आले ते चाळीस वर्षेपर्यंत. डिबाकी यांच्‍या ९७व्‍या वर्षी त्‍यांना 'डेंटन कूली कार्डिओव्‍हॅस्‍क्‍युलर सोसायटी'तर्फे जीवन गौरव पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. डिबाकी वृद्ध झाले होते. व्‍हीलचेअरवर बसून त्‍यांनी तो पुरस्कार स्‍वीकारला तेव्‍हा ८६ वर्षांचे कूली व्‍यासपीठावरून खाली उतरून डिबाकी यांच्‍याजवळ गेले. वाकून दोघांनी हस्‍तांदोलन केले व वादाला पूर्णविराम दिला.

डॉ. कूली निष्‍णात शल्‍यविशारद होते. शस्‍त्रक्रियेला लागणारा वेळ व रुग्‍ण बरा होण्‍याचा कालावधी यांचा सरळ संबंध असतो असे त्‍यांचे मत होते व त्‍यामुळे जलद गतीने शस्‍त्रक्रिया करणे ही त्‍यांची खासियत होती. जर्मनीतील बर्लिन येथील 'हार्ट इन्स्टिट्यूट'चे माजी संचालक डॉ. रोलंड हेत्सर, कूली यांचे एकेकाळचे सहकारी होते. "कूली जलद गतीने काम करतात पण शस्‍त्रक्रियेदरम्‍यान ते अत्‍यंत संथ वाटतात. परंतु त्‍यांनी घातलेला प्रत्‍येक टाका परिपूर्णच असतो. कोठलीच क्रिया त्‍यांना परत करावी लागत नाही इतके ते निष्‍णात आहेत. त्‍यामुळे सकृतदर्शनी ते संथ वाटत असले तरी त्यांची प्रत्येक कृती परिपूर्ण असल्याने त्यांची गती अत्यंत वेगवान रहाते." डॉ. हेत्सर यांची ही प्रतिक्रिया अत्‍यंत बोलकी आहे.

डॉ. कूली व डॉ. डिबाकी या दोघांनी मिळून क्रांतिकारी वाटणार्‍या शल्‍यचिकित्‍सेतील कित्येक उपचारप्रणाली विकसित केल्‍या. रक्‍तवाहिन्‍यांमधील प्राणघातक फुगवटे तसेच मान व पायातील रक्‍तवाहिन्‍यांतील अर्धांगवायूच्‍या झटक्‍याला निमंत्रण देणारे अडथळे दुरुस्‍त करू शकणारी शस्‍त्रक्रिया त्‍यांनी विकसित केली. स्‍वतंत्रपणे कूली यांनी देखील हृदयशल्‍यचिकित्‍सेतील कितीतरी नवीन तंत्रे विकसित केली. 'रक्‍तविरहित शस्‍त्रक्रिया' करण्‍यात ते विशेष प्रवीण होते. हार्ट-लंग मशीन मधून रुग्‍णाच्‍या शरीरात बाहेरून जाणारे, दात्‍याच्‍या रक्‍ताचे प्रमाणे मर्यादित ठेवण्‍यात कूली यशस्‍वी झाले होते. याचा सर्वात मोठा फायदा म्‍हणजे 'हेपॅटायटिस बी' या प्रकारची गंभीर कावीळ होण्‍याचा धोका कमी झाला. कूली जेव्‍हा 'ओपन हार्ट' शस्‍त्रक्रिया करत होते तेव्‍हा 'हेपॅटायटिस बी' वर उपचार होतील अशी औषधे नव्‍हती, त्‍यामुळे असा संसर्ग होणे म्‍हणजे मृत्‍यूला निमंत्रण देण्‍यासारखेच होते. तसेच असे कित्‍येक रुग्‍ण असतात की ज्‍यांना काही धार्मिक कारणांमुळे दुसर्‍याचे रक्‍त स्‍विकारता येत नसते. त्‍यांनाही कूली यांच्‍या तंत्रामुळे फायदा होऊ लागला. १९८४ मध्‍ये कूली यांना 'प्रेसिडेंटस् मेडल ऑफ फ्रीडम' ने सन्‍मानित करण्‍यात आले. 'रेने लेरिच' पुरस्‍कारही कूली यांना प्रदान करण्‍यात आला. याव्‍यतिरिक्‍तही असंख्‍य सन्‍मान व पुरस्‍कारांनी कूली यांना गौरविण्‍यात आले. कूली यांच्‍याकडे १०० हृदयप्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया सर्वप्रथम करण्‍याचा मान जातो. कूली निष्‍णात शल्‍यविशारद होतेच. वयाच्‍या पन्नाशीतच त्‍यांनी ५००० पेक्षा जास्‍त हृदयशस्‍त्रक्रिया व १७ हृदयप्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया केल्‍या होत्‍या. त्‍यांनी विपुल लिखाणही केले. त्‍यांची १२ पुस्‍तके व १४०० पेक्षा जास्‍त शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

- डॉ हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे




*💥🌸दिनविशेष🌸💥*

     *Zénobe Gramme*

*Inventor of gramme machine (electric generator)*

*Born - 4 April 1826*

Zénobe Théophile Gramme was a Belgian electrical engineer. He was born at Jehay-Bodegnée on 4 April 1826, the sixth child of Mathieu-Joseph Gramme,[1] and died at Bois-Colombes on 20 January 1901. He invented the Gramme machine, a type of direct current dynamo capable of generating smoother (less AC) and much higher voltages than the dynamos known to that point.
A Gramme machine, Gramme ring, Gramme magneto, or Gramme dynamo is an electrical generator that produces direct current, named for its Belgian inventor, Zénobe Gramme, and was built as either a dynamo or a magneto.[1] It was the first generator to produce power on a commercial scale for industry. Inspired by a machine invented by Antonio Pacinotti in 1860, Gramme was the developer of a new induced rotor in form of a wire-wrapped ring (Gramme ring) and demonstrated this apparatus to the Academy of Sciences in Paris in 1871. Although popular in 19th century electrical machines, the Gramme winding principle is no longer used since it makes inefficient use of the conductors. The portion of the winding on the interior of the ring cuts no flux and does not contribute to energy conversion in the machine. The winding requires twice the number of turns and twice the number of commutator bars as an equivalent drum-wound armature.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा