शुक्रवार, २७ मार्च, २०२०

💥🌸दिनविशेष🌸💥 26 मार्च

*💥🌸दिनविशेष🌸💥*
*बाबूराव रामचंद्र बागूल*

*विज्ञानवादी दृष्टिकोन असलेले मराठी लेखक, कवी*

*स्मृतिदिन - मार्च २६, २००८*

बाबूराव रामचंद्र बागूल (जुलै १७, १९३० - मार्च २६, २००८) हे दलित साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते. विद्रोही दलित कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवणाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. प्रभावी भाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारूण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते.

वेदा आधी तू होतास
     वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास
     पंचमहाभूतांचे पाहुन
विराट, विक्राळ रूप
     तू व्यथित, व्याकुळ होत होतास
     आणि हात उभारून तू
याचना करीत होतास
     त्या याचना म्हणजे ऋचा
सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव
     तूच साजरे केलेस,
सर्व प्रेषितांचे बारसेही
     तूच आनंदाने साजरे केलेस,
हे माणसा,
     तूच सूर्याला सूर्य म्हंटले
आणि सूर्य सूर्य झाला,
     तूच चंद्राला चंद्र म्हटले
आणि चंद्र चंद्र झाला
     अवघ्या विश्वाचे नामकरण
तूच केलेस
     अन प्रत्येकाने ते मान्य केले
हे प्रतिभावन माणसा
     तूच आहेस सर्व काही
तुझ्यामुळेच सुंदर
     झाली ही मही

या त्यांच्या कवितेतुन त्यांची वैज्ञानिक दृष्टी दिसुन येते.

मानसन्मान, पुरस्कार
धारावी (मुंबई), येथे ७ फेब्रुवारी १९९९ रोजी भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. उद्‌घाटनाचे भाषण डॉ. आ.ह. साळुंखे यांनी केले होते.
बागुलांच्या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ’जनस्थान पुरस्कार’ २००७ साली त्यांना देण्यात आला.
महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार
मार्च २६, २००८ रोजी बागुलांचे नाशकात निधन झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा