परिमेय संख्या & अपरिमेय संख्या
👉 *परिमेय संख्या* – [p/q - a≠0] p या पूर्णांकांला q या शुन्येत पूर्णांकाने भागले असता मिळणारी गुणोत्तरीय संख्या म्हणजे परिमेय संख्या.
सर्व धन व ऋण पूर्णांक व अपूर्णांक संख्या ज्यांच्या छेद शुन्येतर आहे. अशा सर्व संख्या परिमेय संख्या असतात.
👉 *अपरिमेय संख्या* – ज्या परिमेय संख्या नाहीत त्या अपरिमेय संख्या होत.
उदा.- √(३ ) , √(२ ) इत्यादी
*या संख्याचे आवर्ती दशांशातही रुपांतर होत नाही.*
👉 *परिमेय संख्या रुपांतर –*
*नियम –*
धन (+) परिमेय संख्येची विरुद्ध संख्या ऋण (-) परिमेय संख्या असते व ऋण परिमेय संख्येची विरुद्ध संख्या धन परिमेय संख्या असते.
*उदा*.- १) ४ ची विरुद्ध संख्या -४ , -३ ची विरुद्ध संख्या ३
0 हा पूर्णांक धनही नाही व ऋणही नाही.
कोणतीही परिमेय संख्या आणि ० यांचा गुणाकार ० येतो.
कोणतीही परिमेय संख्या व १ यांचा गुणाकार अथवा भागाकार त्या संख्ये एवढाच येतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा