गुरुवार, ७ मे, २०२०

शेकडेवारी-2

!! शेकडेवारी-2 !!

*1) दिलेल्या संख्येचे 12.5% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/8 ने गुणा.*
उदा. 368 चे 12.5% = ?
368×12.5/100
= 368×1/8= 46

*2) दिलेल्या संख्येचे 20% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/5 (0.2) ने गुणा.*
उदा. 465 चे 20% = 93    
 465×20/100
= 465×1/5 ने गुणा = 93

*3) दिलेल्या संख्येचे 25% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¼ (0.25) ने गुणा.*
उदा. 232 चे 25% = 58
232×25/100
= 232×1/4= 58

*4) दिलेल्या संख्येचे 37 1/2% (37.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 3/8 ने गुणा.*
उदा. 672 चे 37.5% = 252    
 672×37.5/100
= 672×3/8
= 252

*5) दिलेल्या संख्येचे 50% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ½ (0.5) ने गुणा.*
उदा. 70 चे 50% = 35   
 70×50/100
= 70×1/2
= 35

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा