*!! त्रिकोण !!*
एका सरळ रेषेत नसलेले तीन बिंदु सरळ रेषांनी जोडून तयार झालेल्या आकृतीस *त्रिकोण* म्हणतात. या रेषांना त्रिकोणाच्या बाजू म्हणतात. त्रिकोणाच्या आकृतीतील सर्वात खालच्या बाजूला त्रिकोणाचा पाया म्हणतात. सर्वात वरच्या कोनबिंदूला शिरोबिंदू. शिरोबिंदूपासून पायावर टाकलेल्या लंबरेषेच्या, शिरोबिंदू ते पाया या लांबीला त्रिकोणाची उंची म्हणतात. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज १८० अंश असते. त्यामुळे कोणतेही दोन कोन माहीत असल्यास तिसरा कोन सहज काढता येतो. त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूसमोरील कोन सर्वात मोठा असतो. त्रिकोणाचा पाया व उंची माहीत असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते.
*त्रिकोणाचे क्षेत्रफळ = १/२*पाया*उंची*
*बाजूंची तुलनात्मक लांबी विचारात घेऊन त्रिकोणांचे तीन प्रकार पडतात.*
▪समभुज त्रिकोण
▪समद्विभुज त्रिकोण
▪विषमभुज त्रिकोण
*त्रिकोणाच्या कोनांवरून पडलेले त्रिकोणाचे तीन प्रकार आहेत.*
▪लघुकोन त्रिकोण
▪विशालकोन त्रिकोण
▪काटकोन त्रिकोण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा