========================
संकलन :-श्री सतिश दुवावार, चंद्रपूर
https://vidnyanmitr.blogspot.com/
------------------------------------------------
*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥
*कॅरोलिन शुमाकर*
*शुमेकर (लेवी ९) या धुमकेतुचे सहसंशोधन*
*जन्मदिन - २४ जुन १९२९*
कॅरोलिन शुमाकर ही एक अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ आहे.
तिने शुमाकर लेवी ९ या धुमकेतुचे सहसंशोधन केले आहे. तिने सर्वात जास्त धुमकेतु शोधण्याचे रेकाॅर्डदेखील केले आहे.
१६ जुलै १९९४ रोजी शूमेकर लेव्ही-९ हा धूमकेतू गुरु ग्रहावर आदळला. या टकरीत या धुमकेतूचे अनेक तुकडे होऊन ते दूरवर पसरले. ही प्रक्रिया २२ जुलै १९९४ पर्यंत चालू होती. तो धूमकेतू गुरूऐवजी पृथ्वीवर आदळला असता तर काही क्षणातच पृथ्वीवरील सजीव सृष्टी नष्ट झाली असती. इतकी तीव्रता या धूमकेतूमध्ये होती.
हा धूमकेतू डेव्हिड लेव्ही आणि करोलीन व युजीन शुमेकर या खगोलशास्त्रज्ञांनी शोधला होता म्हणून या धूमकेतूचे नाव शुमेकर-लेव्ही असे पडले. २४ मार्च १९९३ च्या रात्री या धुमकेतूचा शोध लागला होता. हा त्यांचा ११ वा धूमकेतू होता पण ११ धूमकेतुंपैकी २ धूमकेतू असे होते की जे पृथ्वीला पुनः कधीच भेट देणार नव्हते (non-periodic orbit) आणि त्यामुळे हा धूमकेतू ९वा होता ज्याचा आवर्तनकाळ २०० वर्षांपेक्षा कमी होता आणि पुनः येऊ शकत होता; म्हणूनच या धूमकेतूचे नाव पडले “शूमेकर लेव्ही-९”.
खर तर हा धूमकेतू गुरूने १९६०-७० च्या आसपासच गिळंकृत केला असता. पण तेव्हा त्यांची धडक टळली होती. ७ जुलै १९९२ च्या दिवशी हा धूमकेतू गुरु ग्रहावरील ढगांपासून फ़क्त ४०००० किमी अंतरावरून गेला होता, जे अंतर गुरुचा एक उपग्रह मेटीसच्या त्रिज्येइतकी भरेल. मेटीस हा गुरूचा चंद्र आहे आणि तो गुरूच्या गुरुत्वाकर्षणात पुरता बांधला गेलाय. त्याचा आकारही अगदी ओबडधोबड आहे. जेव्हा हे धूमकेतू महाशय जसजसे गुरुच्या आणखी जवळ जाऊ लागले होते तेव्हाच हे निश्चित झाले होते की या दोघांची “गळाभेट” अगदी निश्चित आहे म्हणून…. शुमेकर लेव्ही-९ धूमकेतू गुरूच्या “रोश लिमिट” त्रिज्येच्या आत आला होता म्हणून गुरूने त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे धूमकेतूचे तुकडे केले होते. कोणत्याही ग्रहासाठी एक “रोश लिमिट” असते ज्याच्या आतमध्ये एखादी वस्तू आली तर ती वस्तू त्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे खेचली जाते. पृथ्वी आणि चंद्रासाठी ही रोशची मर्यादा सुमारे ९५०० किमी इतकी आहे,म्हणजे समजा चंद्र हळूहळू पृथ्वीच्या जवळ येऊ लागला आणि त्याने पृथ्वीपासुनची ९५०० किमीची रोशची मर्यादा भंग केली तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्राचेही धूमकेतूप्रमाणे तुकडे पडतील आणि चंद्र पृथ्वीच्या पोटात गडप होईल. म्हणूनच तर सावधगिरी बाळगत चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३,८४,००० किमी अंतरावरूनच प्रदक्षिणा मारतोय.
खगोलशास्त्रज्ञांना ही पर्वणीच होती ,कारण आजवर कोणत्याही खगोलशास्त्रज्ञाने दोन खगोलीय वस्तूंची धडक प्रत्यक्ष पाहिली नव्हती. जुलै १९९४ च्या सुमारास या दोघांची धडक होईल हे गणिताने जवळपास निश्चित केले होते. शूमेकर लेव्ही-९ ने गुरूच्या गुरुत्वाकर्षणात प्रवेश केल्याने त्याचे २१ तुकडे उडाले होते, ज्यांना शास्त्रज्ञांनी इंग्रजी आद्याक्षरांची ( A to W ) नावे दिली होती. त्यातील काही तुकड्यांचा आकार काहीशे मीटरपासून दोन किमीपर्यंत होता. म्हणजेच मूळ धूमकेतूच्या केंद्रकाचा अंदाज शास्त्राज्ञांना आला होता जे सुमारे ५ किमीच्या त्रिज्येचे होते जे १९९६ ला दिसलेल्या “ह्याकुताके” धूमकेच्याच आकाराचा होता.
१६ जुलै १९९४ ला धूमकेतूच्या पहिला तुकडा-A गुरूवर आदळला. जेव्हा हा तुकडा गुरूवर आदळला तेव्हा याचा वेग होता सुमारे ६० किमी प्रतिसेकंद इतका प्रचंड…… ही धडक इतकी जबरदस्त होती की यामुळे गुरुवर एक मोठा लाल रंगाचा ठिपका तयार झाला जो लहान दुर्बिणीतूनही स्पष्ट दिसला. याची त्रिज्या सुमारे ३००० किमी होती म्हणजे एका प्रुथ्वीएवढा ठिपका गुरूवर तयार झाला होता. पुढील ६ दिवस धूमकेतूचे सारे २१ तुकडे एकेक करून गुरूवर जाऊन आदळत होते. सर्वात मोठा तुकडा-G, १८ जुलै १९९४ ला धडकला होता. या तुकड्याने गुरूवर सुमारे १२००० किमीचा मोठा गडद ठिपका गुरूवर निर्माण केला होता. यातून मुक्त झालेली उर्जा सुमारे ६०००००० मेगाटन TNT (जगातील एकूण न्युक्लियर उर्जेच्या ६०० पट) इतकी प्रचंड होती. शेवटचा तुकडा W २२ जुलैला धडकेपर्यंत या तुकड्याच्या धडकेची दाहकता टिकून होती.
*========================*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा