मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

💥🌸दिनविशेष🌸💥 15 एप्रिल


*💥🌸दिनविशेष🌸💥*
*लिओनार्दो दा विंची*

*एक महान चित्रकार भौतिकशास्त्रज्ञ व संशोधक*

*जन्मदिन - एप्रिल १५ १४५२*

लिओनार्दो हा १५ व्या शतकात रेनेसान्स काळात झालेला एक महान चित्रकार व संशोधक होता. कलेच्या इतिहासात त्याने संशोधक वृत्तीने दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्याचे नाव नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. लिओनार्दोने अनेक क्षेत्रांत योगदान दिले असले, तरी इतिहासात त्याचे नाव चित्रकार म्हणून ठळकपणे दिसते. मोनालिसा, द लास्ट सपर, मॅडोना ऑफ द रॉक्स ही त्याची काही जगप्रसिद्ध चित्रे आहेत. चित्रांवरून त्याचे तत्कालीन चर्च या धर्मसंस्थेसोबत असलेले मतभेद, उलट अक्षरे काढून लिहिण्याची सवय, नव्याने सापडलेल्या त्याच्या नोंदवह्यांतील आश्चर्यकारक माहिती व कित्येक विचारवंतांनी त्याचा अभ्यास करून मांडलेली मते, यांवरून लिओनार्डो विसाव्या शतकापासून काहीसा गूढतेच्या वातावरणात आला आहे. त्यातच त्याच्या विविध चित्रांचा अभ्यास वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून सुरू झाला. तत्कालीन सामाजिक, राजकीय व धार्मिक परिस्थितीचा अभ्यास केलेले विचारवंत त्याच्या चित्रांवरून वेगवेगळ्या संदेशांच्या कल्पना करतात. डॅन ब्राउन या लेखकाने नुकतीच 'दा व्हिंची कोड' या काल्पनिक कादंबरीत लिओनार्दोची वेगळीच गूढ भूमिका मांडली.
मॅडोना ऑफ द रॉक्स
चर्चच्या दबावामुळे लिओनार्दोला अखेर मॅडोना ऑफ द रॉक्सचे दुसरे चित्र ही रंगवावे लागले. पहिले चित्र सध्या फ्रान्सच्या पॅरिस येथील लूव्र संग्रहालय येथे आहे तर दुसरे लंडन येथील म्युझियममध्ये आहे. पहिल्या चित्राला सध्या मॅडोना ऑफ द रॉक्स (लुव्र व्हर्जन) व दुसरया चित्राला मॅडोना ऑफ द रॉक्स (लंडन व्हर्जन ) म्हणुन ओळखतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा